Monday, April 29, 2024

Aani Achanak आणि अचानक लेखिका सुनीता देवस्थळी By Sunita Devasthali.

................................................................................................

कथासंग्रह 
आणि अचानक 
लेखिका सुनीता देवस्थळी

Hard hitting. 

CONTENTS 

अनुक्रमणिका 

1. अचानक 
2. भविष्य 
3. पीव्ही 
4. व्यंकट 
5. एक होता वाल्या

REVIEW

A rich man demands the home of a poor relative, and the poor one gives up life; the twist, he had an uncanny knack of having his word come true, and when asked for his home, had said he'd be reborn as the grandson of the two men. Consequently, the guilty rich grandfather hates the newborn grandson, until the couple is forced to shift residence. 

"“समज तुझा दुसरा मुलगा म्हणून तुझ्या पोटी मी जन्मलो; तर......” 

"प्रश्न अत्यंत अनाठाई असल्याचे भाव नंदिता आणि विजयच्या डोळ्यात जाणवले. नीरजला स्वतःच्या जवळ घेत त्याच्या केसांवरून प्रेमाने कुरवाळत दादुंवर नजर स्थिर करत नंदिताने विचारलं, 

"“तर...?” 

"“तर.... माझ्याविषयीचा राग तू त्याच्यावर काढशील की माझाच पुनर्जन्म आहे हे माहित असूनही तू त्याच्यावर नीरज इतकीच माया करशील?” 

"दोघांनीही चमकून दादूंकडे पाहिलं, अर्थपूर्ण दृष्टीने एकमेकांकडे पाहिलं. नीरज विषयी ते आज प्रथमच काहीतरी बोलले होते. अनेक वर्षं पडलेलं कोडं सुटू शकण्याच्या आशेचा किरण त्यातून दिसत होता. विजयचे हात मोबाईल चाचपडू लागले. नंदिता आणखी प्रेमाने नीरजला जवळ ओढून घेत म्हणाली, 

"“दादू, जन्मलेलं बाळ कोरी पाटी घेऊन जन्माला येतं. जीवघेण्या वेणा सहन करत प्रसवून जन्माला घातलेलं प्रत्येक बाळ त्याच्या आईला तिच्या जीवाहून अधिक प्रिय असतं. पोटी कोण जन्माला आलं यावर आईचं प्रेम अवलंबून नसतं. पुनर्जन्म असतो की नाही हे मला माहित नाही. वरच्याची लीला अगाध आहे..... म्हणूनच जन्मदात्री आणि जन्मलेला जीव दोघंही निर्व्याज मनाने एकमेकांचा स्वीकार करत असतात. चल नीरज... बाहेर गाडीत बस.” अनेक वर्षांच्या प्रश्नाला उत्तर मिळाल्याचा सुटकेचा आनंद मिश्रित शिथिल भाव चेहऱ्यावर झेलत ती बाहेर पडली."
................................................................................................
................................................................................................

................................................

April 28, 2024 - April 28, 2024. 

Strangely enough this title is second in contents but missing between the story above and below. It's included, instead, after the next. 

"शंतनुरावांनी दोन्ही मुलांना मुहूर्त पाहूनच तर आपल्या पोटी घातलं! मुलांना पोटात जन्माला घालायचा सुद्धा मुहूर्त पाहिला त्यांनी! शी!! अशा गोष्टी का कोणी मुहूर्त पाहून करतं? उत्कट प्रेमभावना नाही, जीवा-शिवाने समरस होणं नाही! सगळ्या गोष्टी वरच्या ग्रहांच्या तालावर नाचवायच्या आणि त्यात आपल्याला खूप काही कळत असल्याच्या फुशारक्या मारायच्या! त्या जोरावर भविष्यवेत्त्याचा आव आणून नोकरीतून उरलेल्या वेळात दहा टाळकी भोवती जमा करायची."

"आपल्यालाही लुईसासारखं कोरडं राहता यायला हवं होतं. ती कशी पोटी जन्मलेल्या मुलाला सोडून गेली? कसं ही झालं तरी पोटचं पोर आहे हे तिच्या! वाटेत आडवं येतंय म्हटल्यावर सोडून द्यायचं? अजून जेमतेम स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकतंय! आपल्याला जमलं असतं? समीरण सुद्धा त्याचा बाप आहे. असं कसा अलिप्तपणे पोराला आईकडे सोपवून निघून जाऊ शकतो? पोराला अशा अवस्थेत आईकडे आणून टाकला; रस्त्यावर फेकला नाही हे नशीब! विकत आणलेली वस्तू मनाजोगी नाही निघाली तर उचलून फेकून देता येते; जन्माला घातलेल्या मुलांच्या बाबतीत कुणी असं कसं करू शकतं?"

"समीरणची गाडी दारात येईपर्यंत गंगेने आवश्यक तेवढ्या सामानाची बांधाबांध केली. घरातून पिट्टू बरोबर बाहेर पडताना नवऱ्याचं भाकीत खोटं ठरवत असल्याचं वेगळंच समाधान गंगाच्या चेहऱ्यावर दिसत होतं. 

"संदीपनच्या मठीत पोहोचेपर्यंतच समीरणची मदत होऊ शकते हे गंगा जाणून होती. संदीपनला ती सांगणार होती, ‘तुझ्या निवडलेल्या मार्गात माझा आणि पिट्टूचा अडसर नको. तुझं सामाजिक कार्य तसंच चालू दे. आई नाही; तर समाजातला एक घटक समजून मला माझ्या पायांवर उभं राहायला मदत कर. कष्ट करायला माझी अजूनही तयारी आहे; फक्त माझं भविष्य मला स्वतःला घडवू दे.’"
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 28, 2024 - April 28, 2024. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................
3. पीव्ही 
................................................................................................
................................................................................................

"पीव्ही रिटायर्ड होईपर्यंत, ते करायचे ती बहुतेक कामं ऑनलाईन व्हायला लागली. अगदी भाजी सुद्धा ऑनलाईन घरपोच मिळायला लागली. तरीही प्रत्येक वेळी पीव्ही आठवायचेच!"

"संजयच्या शब्दा-शब्दात वडिलांविषयी तिरस्कार जाणवत होता. आईचं वेळीच चेकअप केलं असतं तर ती वाचली असती. असं तो पुन्हा-पुन्हा सांगत होता. प्रचंड अपराधीपणाची भावना घेऊनच आम्ही परतीची वाट धरली. आम्हाला आराम मिळावा म्हणून आम्ही खुशाल पीव्हींवर कामं टाकत होतो. चोवीस तासांतून ते घरासाठी वेळ कधी काढत असतील हा प्रश्न सुद्धा आमच्यापैकी कुणाच्या डोक्यात कधी आला नव्हता."
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 28, 2024 - April 29, 2024. 

"दिड्मुढ होऊन उभ्या असलेल्या मनालीच्या काळजात चर्र झालं. तिच्याकडे पाहत व्यंकट म्हणाला, “घाबरू नका मॅडम, मी काही करत नाही तिला; मी फक्त जाणीव करून देतोय की जिच्या जन्मदात्याला दुसऱ्यांच्या मुली उपभोग्य वाटत असतील; त्यांच्यावर जे पेरलं त्याचीच फळ खाण्याची वेळ येऊ शकते. क्षमा करा मॅडम मला; गेले कित्येक दिवस मी तुम्हाला त्रास दिला. पण त्या खेरीज विनयाच्या त्रासाची जाणीव साहेबांना झाली नसती. अजूनही त्यांना तितकीशी ती झाली असेल की नाही माहित नाही; पण तुम्ही ती त्यांना करून द्यायला समर्थ आहात. निघतो मी. यापुढे तुम्हाला माझ्याकडून त्रास होणार नाही.”"
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 29, 2024 - April 29, 2024. 

"हल्ली गेले काही महिने टीव्हीच्या खिडक्यांमधून आत्मविश्वासाने ओरडून खोट्याचं खरं करून सांगणारा त्याचा चेहरा दिसत नव्हता. काही दिवस वृत्तपत्रातून छोट्याशा रकान्यात प्रकृती अस्वास्थ्य, गृह कलह वगैरे वगैरे कारणं अधूनमधून त्याच्या बाबतीत डोकावत होती. कुणी बातमी आणली होती की कुठल्याशा अफरातफरीत तो अडकला आहे. काही तरी विपरीत घडलं होतं खास! जनसामान्यांच्या आठवणीतून तर तो एव्हाना हद्दपार झाला होता. हे होणारच होतं...."

"समोर बसून ‘वाल्या’ची दोन्ही मुलं मला धमकावत होती ..... वकिलामार्फत ‘वाल्या’ने राजाभैयाच्या मदतीने कायदेशीर तरतुदी करवून घेतल्या होत्या. ‘वाल्या’च्या ओळखीही कमी नव्हत्या; पण निःस्वार्थ मनाचे आम्ही ट्रस्टीमध्ये असावे ही ‘वाल्या’ची इच्छा! आठ-दहा ट्रस्टीपैकी नेमकं मलाच या मुलांनी का गाठलं हे मला कळत नव्हतं. मनात थोडं भय दाटून आलं. माझ्या एकटीच्या हातात काही नाही आणि मालमत्तेची कागद-पत्र ट्रस्टच्या ताब्यात आहेत हे सांगूनही त्यांना पटत नव्हतं."
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 28, 2024 - April 28, 2024. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
Aani Achanak 
आणि अचानक 
 लेखिका सुनीता देवस्थळी 
By Sunita Devasthali. 
................................................
................................................
April 28, 2024 - April 29, 2024. 
................................................
................................................
14 अंजना रेसिडेन्सी 
46/6/1B अद्वैतनगर लेन, 
पौड रोड पुणे – 411038 
मोबाईल : 9970803112 / 9096800573