Thursday, June 10, 2021

Dhadpadnari Mule (धडपडणारी मुले) by Sane Guruji साने गुरुजी.


................................................................................................
................................................................................................
धडपडणारी मुले by साने गुरुजी
................................................................................................
................................................................................................


Sane Guruji (साने गुरुजी) is, more than anything, and very deservedly, known for his memoirs of his mother, where he is introduced in a foreword by one of the students regarding his relationship and popularity amonst them, and reasons thereof. 

In this work we see it in his own words, although he does not claim to be the protagonist who is a monk, but everything - thoughts, philosophy, style and more, is his own. 

The title translates as "Striving Kids", and this relates to youth of his time, struggling with various ideologies and existing circumstances. He is writing specifically about a hostel for schoolboys run by a man of progressive thinking, who brings in a monk to guide them, and one gets a feeling he's describing people he knew in his own life. 

Here, also, we get to know his devotion to Gandhian thinking and more. Often he errs in going with it, but those days this was the revolutionary thinking. Then again, he amazes one with his sheer intellect, when he puts away the congress-left blinkers. 

For instance, his thoughts on "mixed marriages" are far more accurate than most people can reach a century later, when he points out that caste (in Indian system) isn't a matter of ancestry but of occupation and vocation, and thus the marriage between children of Gandhi and Rajaji (Chakravarty Rajagopalachari) is really not inter-caste, but within caste, while a traditional match between progeny of Gandhi and that of another tradesman from Gujarat would be mixing castes. 

This thinking is entirely correct, but wouldn't be even easily comprehended by most even now. 

It's interesting to see thst, while a devout follower of Gandhi on the whole, Sane Guruji isn't a blind follower who'd allow no arguments - in fact, often he argues it out. There's the question of mechanization, and he goes to question the abrahmic assumption of guilt and sin, preferring the ancient Indian wisdom and knowledge, about every soul being a drop of the ocean that's the Divine. This is related to the mechanisation discussion, and well argued about well being of animals along with freedom for humanity. 

He'd, of course, not seen far enough ahead to know about environmental disaster due to usage of fossil fuels, but at that too he's pointed out that deforestation was a disaster in making. And his thoughts about reforestation needs for the world, especially for India, are not merely timely then - and desperately needed to be acted on now even a century later, they are deeply rooted in eternal values of India of antiquity. 

Later, he brings it to notice of those who haven't yet realised it, and there are those that still haven't severaldecades later, that British remuneration for public services and those employed in governing machinery in India were exorbitant; this was certainly so until independence, but the power they wield, especially in rural regions, is still considerable; and the aura of prestige that goes with success in competitive examinations that wins a candidate such a post, is still unlike anything else in the world. There is an unreality in this that belongs, could belong, only to a colonial empire and her top prized colony, not to a nation independent. 
................................................................................................


"कधी रण-रागिनी झाशीची राणी लक्ष्मीबाई मुलांसमोर उभी राही, तर कधी सात्त्विकतेची मूर्ती सीतादेवी हिचे चित्र रंगवलेले दिसे. कधी भीष्म, तर कधी चिमाजीअप्पा. कधी भगवान बुद्ध, तर कधी रामकृष्ण परमहंस, कधी मीराबाई, तर कधी जनाबाई. कधी देशबंधू दास, तर कधी दीनबंधू अँड्यूज. कधी लोकमान्य, तर कधी महात्मा. सारे तेथे ओतण्यात येई. 

"कधी इस्लामी संस्कृतीचा हिंदू संस्कृतीवर झालेला परिणाम तेथे वर्णिलेला असे, तर कधी भारतीय संस्कृतीचा जगत्संचार तेथे दाखवला जाई, कधी जपानचा कोरियातला धिंगाणा येई, तर कधी स्वदेशातल्या अन्यायांची कहाणी येई. कधी रशियातले नवप्रयोग, तर कधी तुर्कस्थानातले नवस्वातंत्र्य. कधी आयर्लंड, तर कधी इजिप्त. कधी सन्यत्सेनेचे मृत्युपत्र, तर कधी रूसो-जपानी युद्धातले रोमांचकारक प्रसंग, कधी टॉलस्टॉयची गोष्ट, तर कधी उपनिषदातल्या कथा. कधी फ्रेंच राज्यक्रांती तर कधी अमेरिकेतले वॉशिंग्टन, गारफिंल्ड, लिंकन. कधी रवींद्रनाथ, इकबाल यांच्या कवितांचे अनुवाद, तर कधी व्हिटमन, गटे, बायरन, शेले यांच्या कवितांची सुंदर रूपांतरे. कधी मिलेटसारख्या चित्रकारांच्या आठवणी, तर कधी अजंठा-वेरूळच्या लेण्यांची हकिकत!"
................................................................................................


"पूर्वजांच्या वैभवावर ऐट मारणारे हे ऐदी शेणगोळे पाहिजे, की एक प्रकारची खरोखरच चीड येते. पूर्वजांचा पराक्रम गेला. पूर्वजांची तलवार गेली, पूर्वजांची दिलदारी व पूर्वजांचा त्याग सारे गेले. खोटा अभिमान व ऐट ही मात्र या मेषपात्रांजवळ शिल्लक असतात, दागदागिने घालतील, जरीचे पोषाख करतील व मोटारीतून मिरवतील."
................................................................................................


"तपोवनाची संस्कृती ज्या भारतभूमीत जन्मली. तेथे वृक्षासंबंधी केवढी उदासीनता! तपोवने म्हणजे भारताची भूषणे, भूमातेच्या हिरव्या पदराखाली भारतीय संस्कृतीचे बाळ जन्मले, पोसले गेले, वाढले; परंतु हे बाळ आता उघडे पडू लागले. दरवर्षी लाखो झाडे तोडली जातात, परंतु नवीन किती लावली जातात? कोण विचार करतो? या कृषिप्रधान भारतवर्षाला मोठमोठ्या जंगलाची फार जरूर आहे. झाडे मेघांना ओढून आणतात. झाडी कमी झाली. तर पाऊस कमी होतो. ठिकठिकाणी पाऊस कमी होत आहे. देवाच्या नावाने ओरडून काय होणार? आपली ही पापे, आपला हा आळशीपणा, आपली ही विचारशून्यता! प्रत्येकाने निदान एक तरी झाड पावसाळ्यात लावावे. इटली देशात मागे सरकारने तीन लक्ष झाडे लावली! अमेरिकेमध्ये वॉशिंग्टनच्या दोन वाढदिवसांच्या दिवशी लाखो झाडे लावली गेली आणि अमेरिकेत पुन्हा जंगलांची वाण नाही. मैलच्या मैल पसरलेली अफाट वने, कानने तेथे आहेत. दर वर्षी अमेरिकेत मुलामुलींकडून लक्षावधी झाडे लावली जातात. वृक्षारोपणाच्या दिवशी मिरवणुकी निघतात. भूमातेची, वृक्षांची सुंदर गाणी म्हणण्यात येतात! वाद्ये असतात. झेंडे असतात! परंतु आपल्या या कर्मशून्य देशात काय आहे? 

"हिंदुस्थानातली खेडी पूर्वी भरगच्च आंबराईत असत. भूमातेच्या हातांनी आलिंगलेली खेडी असत. वृक्ष म्हणजे पृथ्वीचे हजारो हातच होत. या हातांच्या प्रेमळ वेष्टनात गावे सुखाने नांदत; परंतु हे हिरवे हिरवे हात काटले गेले, छाटले गेले. गावांची रया गेली, तेज गेले. आंबराया नाहीशा होत चालल्या. गायी-गुरांना बसायला छाया नाही. मुला-बाळांना खेळायला जायला जागा नाही. ही माझ्या हातची दहा झाडे, असे ज्याला म्हणता येईल, असे किती भाग्यवान लोक आपल्या भारतात असतील?"

"एका प्रचंड वटवृक्षाखाली सभा होणार होती. वड म्हणजे वृक्षवनस्पतींचा राजा,"

"छाया देणारी, सुगंध देणारी, फळ देणारी आठवण ठेवून जा. अशोक, चंदन, बकुळ, आम्र, शिरीष, निंब, पुन्नाग, जांभूळ लावा. नाना प्रकारची झाडे, त्यांना कुंपण घाला. पाऊस नसेल, तेव्हा पाणी घाला. आपल्या हातांनी काही निर्माण करा."

"वड, पिंपळ, औदुंबर, आवळी, बेल, इत्यादी वृक्षांना आपण कसे पावित्र्य दिले आहे. आवळीखाली जेवावे, वनभोजनाला जावे, पत्रावळीवर जेवावे, त्यांची व्रते घ्यावी, कसा महिमा आहे! आपल्याकडे वृक्ष-वेलींची आपण लग्नेही कशी लावीत होतो! शाकुंतला नाटकात शकुंतला आम्रवृक्षाचे जातिमुक्तलतेशी कसे लग्न लावते! तुळशीचे लग्न अद्याप कसे अस्तित्वात आहे व त्या लग्नात आवळे, चिंचा, झेंडू यांचे महत्त्व कसे आहे,"

"झाडांना रात्री तोडू नये. रात्री पानफूल तोडू नये, यातही केवढी सहृदयता आहे. रात्रीच्या वेळी झाडे निजतात! यात केवढे काव्य आहे!"
................................................................................................


"“अरे जात म्हणजे तरी काय? विणकराने विणकराच्या मुलीशीच लग्न करावे असे होते. कारण काय? त्या दोघांचा आचार, विचार, उच्चार, आहार सारे समान असणार म्हणून. ज्यांच्या आहार, ज्यांचा आचार, विचार, उच्चार समान त्यांची एक जात होय. विणकराला विणकराचीच मुलगी जीवनयात्रेत उपयोगी पडेल. ताण कसा करावा. फणी कशी भरावी, पांजण कशी करावी, हे माहीत असलेली, त्या धंद्यातले शब्द, पारिभाषिक ज्ञान माहीत असलेलीच मुलगी विणकराला उपयोगी पडणार! परंतु बाप शिंपी असतो नि नवरा मिळतो वकील! मुलीने घरी विणकाम पाहिलेले. शिवण्याचे यंत्र तिला चालवता येते. तिचा वकिलाला काय उपयोग होणार! परंतु आडनाव व गोत्र पाहतात! आडनावावरून जात ओळखतात! रोजचे जे कर्म, त्यावरून ओळखत नाहीत. एका दृष्टीने वकील म्हणजे वैश्यच तो, पैशात रात्रंदिवस रमलेला. एखाद्या ज्ञानात रमलेल्या खऱ्या ब्राह्मणाने तिथे मुलगी का द्यावी? मी वैश्य कमी मानतो. असे नाही. मला समाजसेवेचे सारे धंदे पवित्र वाटतात. खादी वापरणारा, शाकाहार घेणारा, देशासाठी तळमळणारा, एखादा हरिजन, तो माझ्या जातीचा आहे. पण माझा सख्खा भाऊही जर खादीची टर उडवीत असेल, परदेशीला परब्रह्म मानील असेल, देशाच्या ध्येयाची थट्टा करीत असेल, तर तो माझ्या जातीचा नव्हे. नुसते एका आईच्या पोटचे असून भागत नाही. एका ध्येयाच्या पोटचे असावे लागते. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणत, 

"‘माझिये जातीचे मज भेटो कोणी।’" 

"आणि बर्नार्ड शॉ एकदा महात्माजींना म्हणाले, “तुम्ही आम्ही एक जातीचे आहोत.” म्हणूनच महात्माजी व राजगोपालचारी यांच्या मुलामुलीत झालेला विवाह हा खरा जातीय विवाह. कारण महात्माजींशी जास्तीतजास्त जवळ असे राजाजीच आहेत. त्यांची जात एक आहे. विलायती वस्त्रांचा व्यापार करणारा गुजराथी व्यापारी महात्माजींच्या जातीचा कसा होईल? 

"“विवाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. काहीकाही जाती, काहीकाही शाखा इतक्या लहान आहेत, की त्या जर जवळच्या सदृश असा दुसऱ्या जातीशी मिसळणार नाहीत, तर त्या जाती व शाखा नष्ट होतील. त्या-त्या शाखातल्या साऱ्यांचे रक्त जणू एक होऊन गेले आहे. सारे एकमेकांचे आप्त, सगेसोयरे, हे डबक्यातल विवाह बंद झाले पाहिजेत. नाही तर प्रजा खुरटी होत जाईल, असे वाटते. त्या अगदी लहान डबक्यातच, एक झालेल्या जातीतच विवाह करणाऱ्या लोकांकडे पाहा. दिवसेंदिवस त्यांची ऊंची कमी होत आहे. प्रजा खुरटी निर्माण होत आहे. या गोष्टीला जर आळा न घातला, तर अंगुष्ठाएवढे बाल्यखिल्य भारतवर्षात निर्माण होऊ लागतील!” 

"“त्या त्या जातीतच विवाह हे काही काल ठीक असतात, परंतु काही शतके गेली, की मिश्रविवाह करणेच योग्य असते असे मला वाटते. जमिनीतून एकच पीक आपण नेहमी घेत नाही. सारखी कपाशीच घेत नाही. मध्येच, एखाद्या वर्षी बाजरी, भुईमूग असे पीक त्या जमिनीत घेतो नि मग पुन्हा कपाशी घेतो. आज शेकडो वर्षे त्या त्या जाती एकच पीक घेत आहेत. त्यामुळे टपोरे दाणे निपजत नाहीसे झाले आहेत. अपवाद असतील, ते सोडून दिले पाहिजेत. सर्वसामान्य जनता पाहिली पाहिजे. शरीराची, मनाची, बुद्धीची निस्तेजता स्वच्छ दिसत आहे. याला दारिद्र्य, दास्य ही इतर कारणे आहेतच; परंतु हे डबक्यातले विवाह, हेही एक कारण असावे. 

"“सापापेक्षाही अकरमाशा अधिक क्रूर असतो. अकरमाशा हा मिश्र विवाहाचे अपत्य असतो. मिश्र विवाहाने गुणधर्म वाढतात, हाच त्याचा अर्थ, आपले सारे ऋषी मिश्र विवाहाची फळे आहेत. अर्जुनापेक्षा बभ्रुवाहन अधिकच पराक्रमी, कारण तो नागकन्येपासून झाला होता! म्हणून आपण म्हण केली, ‘ऋषीचे पाहू नये कूळ, नदीचे पाहू नये मूळ.’ परंतु यात कमीपणा थोडाच आहे? त्यात नीतीचे उल्लंघन थोडेच आहे? आपण जिथे विवाह केला, तिथे जे प्रेमाने, निष्ठेने राहिलो नाही, तर ती अनीती होईल; परंतु भिन्न जातीत विवाह केल्याने नीती कशी काय बिघडते? जात तरी कुठे आहे? 

"“आज मिश्र विवाहाची वेळ आहे. सर्वसामान्य जनता अधिक उत्साही नि तेजस्वी व्हायला हवी असेल, तर आज मिश्र विवाहाशिवाय गत्यंतर नाही. मिश्र विवाहाने ऐक्य वाढेल, वगैरे कल्पना मात्र फोल आहेत. युरोपियन वाटेल तिथे लग्न लावतात, म्हणून का त्यांची भांडणे कमी होत आहेत? उत्साह, तेज, बुद्धी ही वाढतील. काही शतकं अशी गेली, की पुन्हा जातीय विवाह सुरू करावेत. एकच पीक एका जमिनीत वर्षांनुवर्ष घेऊ नये, हा त्याचा नियम होय.” 

"“थोडक्यात सांगायचे झाले, तर विवाह डबक्यातले नसावेत नि समुद्रातलेही नसावेत; प्रवाहातले, विशाल नदीतले असावेत. एकदम एखादे अमेरिकेतले पीक भारतभूमीत येणार नाही; भारतीय बी अमेरिकेत फोफावणार नाही; परंतु गुजराथमधले महाराष्ट्रात, ओरिसाचे आंध्रात पेरायला हरकत नाही. समुद्र नको, डबकं नको; नदी घ्या.”"
................................................................................................


""मनुष्य हा मुळात पापी आहे. का पुण्यवान आहे? ख्रिस्ती धर्म मानतो, की मनुष्य हा मुळात पापीच आहे. उपनिषदे म्हणतात, मनुष्य परब्रह्म आहे. कोणते स्वरूप खरे?""
................................................................................................


""प्रेमाच्या संबंधाने माणसे नि पशू एकत्र सहकार्याने नांदत आहेत. हे दर्शन मला पवित्र नि पावन वाटते,” स्वामी म्हणाले. 

"“तुम्हाला काव्य दिसते, पण मला गुलामगिरी दिसते. मोटेला तासन्‌तास जुंपलेला बैल मानवाला धन्यवादच देत असेल नाही? बैलाला बोट-बोट आरा टोचतात. त्याच्या अंगाची चाळण करतात, हे काव्यच नाही का? बैलगाडीत कधीही बसावेसे मला वाटत नाही. तुम्ही प्रेमाचे पोवाडे गाणारे लोक बैलाला फटके मारीत नि आरा टोचीत खुशाल जाता नि वर त्याला काव्य म्हणता? माझ्या अंगणातले दाणे खायला चिमणी येईल नि उडून जाईल. तिला पिंजरा ठेवायची काय जरुरी? गायी-गुरे राहू देत रानात. भोगू देत स्वातंत्र्य. आपण हरणं उड्या मारताना पाहतो, त्याप्रमाणे दुरून गायीगुरांना पाहू.”"
................................................................................................


""इतर देशात सरकारी नोकरास पगार कसे कमी आहेत, इतर देशात शिक्षणावर कसा कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतो. एका जपान देशात सातशेच्यावर उद्योगधंद्याच्या शाळा आहेत व हिंदुस्थानात सातसुद्धा कशा नाहीत, इतर देशांतल्या सहकारी पेढ्यांचे भांडवल कसे मुबलक असते, आपल्याकडे कसा खेळखंडोबा आहे. सारा इतिहास खेड्यातल्या जनतेला कळू लागला. 

"प्रचारक कोणी जेवायला बोलावले, तर त्याच्याकडे जात, नाही तर स्वतः हाताने करीत. भाकरीचे व बेसनाचे पीठ, कांदे, तवा, पितळी लोटा त्यांच्याबरोबर असे. त्या त्या गावात खादीधारी कोण आहेत, निर्भय वृत्तीचे कोण आहेत. वर्तमानपत्रे कोणाकडे येतात, कोणती येतात, गावात भांडणे आहेत की काय, गावात गुरे-ढोरे किती, गावाचा शेतसारा किती, पूर्वी किती होता, किती वाढला, गावाला कर्ज किती, सोसायट्यांचे किती, सावकरांचे किती, शाळा आहे की नाही, मुली शाळेत जातात की नाही, लिहायला किती लोकांना येते सर्व माहिती प्रचारक गोळा करीत असत. तालुक्याचा तो उत्कृष्ट अहवाल तयार झाला असता. शंभर वर्षांत खेडी कशी झाली, त्याचा तो जळजळीत इतिहास तयार होत होता.""
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................

June 05, 2021 - June 10, 2021. 

Purchased February 13, 2021. 

Kindle Edition, 314 pages 

Published by Public Domain Books 

ASIN:- B01MQDW646
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................