Sunday, August 21, 2022

Bhokarvadichya_Goshti भोकरवाडीच्या गोष्टी : द. मा. मिरासदार / कथासंग्रह (Marathi), by D. M. MIRASDAR.

................................................................................................

Bhokarvadichya_Goshti  
भोकरवाडीच्या गोष्टी : द. मा. मिरासदार / कथासंग्रह
by D. M. MIRASDAR.   
................................................................................................
................................................................................................

Most of this collection isn't about hilarious, unexpected turns as much as very familiar characters and a gentle humour that grows. 

But one story in the collection, very different, is hideous in its humour, and it's unclear if this tale with detailed descriptions about a new bride being assaulted by her husband - and by disappointed thieves - is a vicious revenge by the author, or written in spirit of disturbing the society that takes such happenings around as normal. 
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
अनुक्रम 

भोकरवाडी ‘हाय’  
गुप्त धन  
बाबू पैलवानाचे उपोषण  
भोकरवाडीतील भुताटकी  
खव्याचा गोळा  
भोकरवाडीतील मारामारी  
परसातील खजिना  
पाठलाग  
दक्षता  
तपकीर  
दरोडा  
बबीचे मंगळसूत्र  
कावळ्यांचे मानसशास्त्र  
रघोबा : एक स्वातंत्र्यसैनिक

REVIEW 

"शिवा जमदाड्याचा सकाळचा कार्यक्रम अगदी आखीव असायचा. सकाळी उठून पाण्याची तपेली घेऊन गावाबाहेरच्या रानात जायचे. देहकर्म उरकून विहिरीत हातपाय, तोंड धुवायचे. लिंबाची काडी घेऊन तेथेच दात घासण्याचा कार्यक्रम उरकायचा. मग परत येता-येता दुसऱ्याच्या रानात कडेला जे काही दिसेल, ते उपटून धोतराच्या घोळात टाकायचे. कधी मिरची-कोथिंबीर, कधी कांदे, वांगी, भोपळा असले माळवे. जमले तर चार-दोन ऊससुद्धा उपटायचे. मोळी करून घरी आणायचे. महाराजांच्या कृपेने झालेला पोरगा आता पाच-सात वर्षांचा होता. त्याला उठल्याबरोबर रोज सकाळी खायला लागत असे. ते घेतल्याशिवाय तो अंथरुणातून उठतच नसे. आता शिवा रोज विकत खायला कुठून आणणार? म्हणून हा धंदा सोर्इचा होता. कधी गाजरे, कधी काकड्या, तर कधी ऊस. रानातल्या मालकाने आरडाओरडा केलाच, तर दुसऱ्या बाजूच्या रानात घुसायचे. चार-आठ दिवस दक्षिण-दिग्विजय मग उत्तर-दिग्विजय असा त्याचा रोजचा नेम सुरळीतपणे सुरू होता."
................................................................................................

"सपावरच्या पाण्यात पाय बुडवले. हात खंगाळले. मग ओंजळीत पाणी घेऊन त्याने चूळ भरली. 

"पण भरली कसली? तोंडात गेलेले पाणी त्याला असे काही चमत्कारिक लागले की, ते आपोआपच त्याच्या तोंडातून बाहेर पडले. एकदम रॉकेलसारखा वास आला. तोंड वेडेवाकडे करून ‘थु: थु:’ करीत शिवाने विहिरीतील पाण्याकडे निरखून पाहिले. 

"सबंध पाण्यावर तेलाचा दाट तवंग दिसत होता. नव्हे, सगळे तेलच आहे, असे दिसत होते.  ... "
................................................................................................

"आपल्या नवऱ्याला तसे डोके नाहीच, हे शिवाच्या बायकोचे मत फार पूर्वीपासून होते. पण जे काय आहे ते आज फिरले असावे, अशी तिला जोरदार शंका आली. शिवाने मग जीव तोडून-तोडून काय घडले ते समजावून सांगितले, तेव्हा तीही चकित झाली. नवऱ्याकडे टकामका बघतच राहिली. चमत्कार! नक्की हा देवाने काहीतरी चमत्कार दाखवलेला आहे खरा. शिवाची तर खात्रीच पटली. महाराजांच्या कृपेने जसा मागे मुलगा झाला, तशीच ही पण महाराजांची कृपा आहे. दुसरे काय? हे महाराजलोक फार विलक्षण असतात. दुसऱ्यावर कृपा करण्याचा त्यांचा उद्योग सतत सुरुच असतो. त्यांना अंतर्ज्ञानाने कळले असावे की, यांच्या घरात रॉकेल नाही म्हणून. चला... सबंध विहीर रॉकेलने भरून टाकली. छू: मंतर... घ्या, पाहिजे तेवढे रॉकेल घ्या. स्वत: घ्या, दुसऱ्याला द्या."
................................................................................................

"शिवाने आपला विचार पूर्ण केला. डोळे बारीक करून खासगी आवाजात तो म्हणाला, 

"‘‘ही बातमी आता आणखी पर्कूलेट करू नका. हीर माजी – कबूल. पण आपल्या समद्या कंपनीला मी वाटा दीन की. मला तरी एकट्याला हे समदं रेटतं काय?’’ त्याबरोबर सगळ्यांचे चेहरे एकदम उजळले. 

"‘‘म्हंजे? कसं-कसं म्हनतोस गड्या?’’"
................................................................................................

"अशी बोलणी झाली. उद्या सकाळी शिवा जमदाड्याच्या विहिरीकडे सगळ्यांनी गुपचूप जायचे आणि या सगळ्या गोष्टीची नीट शहानिशा करून घ्यायची, हे ठरले. शिवाने शपथेवर सांगितल्याप्रमाणे ती तेलाची विहीरच असेल, तर मग ‘भोकरवाडी हाय’ म्हणून एक तेल कंपनीच आपण सगळ्यांनी मिळून काढायची, हेही सगळ्यांनी एकमताने मान्य केले. ... गणामास्तराने आणखीही काही गमतीदार माहिती पुरवली. आपल्या महाराष्ट्रात अनेक ‘शुगरकिंग’ आहेत. तिकडे मध्य प्रदेशात कुणी तरी एक ‘बिडी-किंग’ आहे. निपाणीकडं कुणीतरी एक ‘तंबाखू-किंग’ म्हणून राज्य करतो म्हणतात. ही तेल कंपनी जर जोरदार चालली, तर आपण सगळे शिव्या जमदाड्याला पण ‘घासलेट-किंग’ म्हणून जाहीर करून टाकू."
................................................................................................

" ... रॉकेलचा मोठा साठा करून काळा बाजार करायचा. पब्लिकचा आन् आमचा जीव खायचा –’’ 

"‘‘मग?’’ 

"‘‘आम्ही धाड घालायच्या आत माल पळवला साल्यांनी. डबेच्या डबे या विहिरीत आणून टाकले. ढुंगणावर लाथा घातल्या, तेव्हा कबूल झाले ... "
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................

August 20, 2022 - August 20, 2022. 

"‘‘बाबा, तोंडावरनं माणूस वळखतो मी. मागचं-पुढचं बराबर सांगतो.’’ 

"एवढे बोलून त्या माणसाने पुढे बराच वेळ बडबड केली. त्यावरून नाना चेंगटाला समजले की, हा माणूस म्हणजे साधासुधा असामी नव्हे. अख्ख्या होल इंडियात प्रसिद्ध असलेला असा तो ज्योतिषी आहे. सध्या काशीहून रामेश्वरला पायी चाललेला आहे. वाटेत योगायोगाने भोकरवाडी गाव लागते. म्हणूनच घटकाभर थांबला आहे, इतकेच. एरवी असल्या ठार खेडेगावात तो कशाला येतो? हा ज्योतिषी पत्रिका बघतो, हात बघतो... एवढेच नव्हे, तर नुसते तोंड बघून भविष्य सांगतो. अन् असे तसे नव्हे, अगदी करेक्ट सांगतो. तशी त्याची फी जबरदस्त आहे. पण नानाची परिस्थिती जाणून त्याला पाच रुपये दिले, तरी संतुष्ट होण्यासारखा आहे. मात्र या पाच रुपयांत तो जे काही सांगेल, ते पृथ्वीमोलाचे असेल. ते कधीही खोटे होणार नाही. कारण पैशासाठी काहीतरी गोडगोड बोलणे, हे त्याच्या स्वभावात नाही."
................................................................................................

"‘‘ह्या गावात गुप्त धन है – त्यो पडका वाडा है ना, तिथं!’’ 

"‘‘आँ? त्यो देशमुखाचा वाडा है –’’

"‘‘त्योच. तिथचं है. कुठं है, किती है – मी सांगत न्हार्इ, पण ते तुझ्या नशिबात है. घावलं तर तुलाच घावंल. दुसऱ्या कोणाला घावणार न्हार्इ.’’ बुवाने चेंगटाला आणखीही माहिती पुरवली. भोकरवाडीत अनेक जुनी घरे आहेत. पडीक वाडे आहेत. उकीरडे आहेत. जुने मोडकळीस आलेले गावकूस आहे. त्याची तटबंदी कुठेकुठे शिल्लक आहे. झालंच तर, हागंदारी आहे. ओढ्याकाठी डगर आहे. यात अनेक ठिकाणी गुप्त धन आहे. देशमुखाच्या वाड्यात तर नक्कीच आहे. पूर्वीच्या लोकांनी ते पुरून ठेवलेले आहे. कदाचित तो हंडा असेल. कदाचित तो एखादा रांजण असेल. मोहरा-पुतळ्या, रुपये असल्या वस्तू त्यात असतील. कदाचित सोने-नाणे, चांदी, हिरे-माणिक असले काहीतरी असेल. काय असेल ते सांगता येणार नाही. त्यासाठी पुष्कळ मंत्र-तंत्र, साधना करावी लागेल. त्याला खर्चही बराच येर्इल. तो नाना करणार असेल तर हे धन कुठे आहे, किती आहे, कसे मिळेल याचा पत्ता लावता येर्इल. पण खर्च मात्र करावा लागेल. निदान एक शंभराची नोट तरी आवश्यक आहे. त्याची व्यवस्था होत असेल, तर आपण मुक्काम वाढवू. केवळ चेंगटाच्या आयुष्याचे कल्याण व्हावे म्हणून, नाहीतर मग चाललो. तेव्हा काय करतोस ते पाहा."
................................................................................................

"‘‘पण गणामास्तर, गुप्त धन आसतं, ही गोष्ट तर खरी. कार्इकार्इंना घावतंच. नशिबात मात्र पायजे. तुकाराममहाराजांनी म्हनल्यालंच है –’’ 

"‘‘काय म्हनल्यालं है?’’ रामाने संशयी मुद्रेने शिवाकडे पाहत विचारले, ‘‘कुठलीही गोष्ट निघाली तरी तुकाराममहाराजांनी काहीतरी म्हटलेलंच असते, हे कसे? का शिवा जमदाडे लेकाचा त्याच्या नावावर काही पण सांगतो?’’"
................................................................................................

" ... गणामास्तर म्हणाला, ‘‘चेंगट, तुझ्या नशिबात –’’ एवढ्यात चेंगटाच्या पाठीत एक जोराचा दणका बसला आणि या क्षणी आपल्या नशिबात काय आहे, हे त्याला बरोबर कळलं. नुसत्या दणक्यावरून च त्याला कळले की, बाबू आला. आता काही आपली धडगत नाही. नक्की बाबूच हा! मागे वळून न पाहता चेंगटाने ओळखले. कारण बाबूचा हात आणि त्याची पाठ यांचे मेतकूट नेहमीच फार सुरेख जमत असे. हाताची ओळख पाठीला पटली. बाबू चेंगटाजवळ मांडी घालून बसला. पण चेंगटाच्या मांडीवर एक प्रेमळ थाप हाणून बोलला, ‘‘काय चेंगटू, कसं काय?’’ भेदरलेला चेंगट हळूहळू लांब सरकत म्हणाला, ‘‘है की, बरं है –’’"
................................................................................................

"‘‘गुप्त धन?’’ बाबूला आश्चर्य वाटलं. मग एकदम त्याने आपला मोहरा नानाकडे वळवला. 

"‘‘मग मला कसं बोलला न्हार्इस तू?’’ 

"आता पुन्हा बाबू एक टिंबा ठेवून देतो की काय, अशी चेंगटाला साधार भीती वाटली. कारण बाबू दोन कारणांसाठी नानाच्या वाटेला जात असे. एक त्याला राग आला म्हणजे, अन् दुसरे याला नानाबद्दल प्रेमाचा पान्हा फुटला म्हणजे. यापैकी आत्ता नेमके काय होते, हे सांगणे कठीण होते. तरी पण बाबूचा दणका पुन्हा बसायला नको म्हणून तो गडबडीने उठला आणि गणामास्तरजवळ जाऊन बसला."
................................................................................................

"बाबूची आयडिया म्हटल्यावर चेंगट एकदम घाबरला होता. कारण बाबूच्या डोक्यातून कसली आयडिया कोणत्या वेळी निघेल याचा नेम नसे. पण आज बाबूने काढलेली आयडिया काही वार्इट नव्हती. दोघांनी मिळून रोज रात्री हिंडायचे. आधी देशमुखाचा वाडा हाणायचा. तिथं काही नसलं तर पडके वाडे, जुनाट ओसाड जागा, हागंदारी, डगर इकडे चक्कर मारायची. प्रचीती येते का पाहायचे. काय हरकत आहे? काही कमी-जास्त झालं तर बाबू मदतीला असलेला बरा. समजा, हंड्यावर नाग दिसला तर बाबूच उपयोगी पडेल. बाबू बोलला नसला तरी त्याला आपण काहीतरी हिस्सा देऊ, म्हणजे त्याचीही कुरकुर नको."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 20, 2022 - August 20, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
बाबू पैलवानाचे उपोषण  
................................................................................................
................................................................................................

"बाबू पैलवान उद्यापासून उपोषणाला बसणार आहे, ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि संबंध भोकरवाडीत फार मोठी खळबळ उडाली. 

"भोकरवाडीत खळबळ उडायला तसे फार मोठे कारण लागायचे नाही. मागे गोपाळ रेडे डोक्याला बँडेज बांधून कुणाच्या तरी मोटरसायकलीवर बसून गावात आला होता आणि मागच्या मागे उशी खाऊन पुन्हा जोरात आदळला होता, तेव्हाही गावात खळबळ माजली होती. खुद्द बाबू पैलवान एका फडात कुस्ती जिंकून कुणाच्या तरी खांद्यावर बसून गावात घुसला होता, त्या वेळीही अशीच खळबळ माजली होती. एकदा खाकी ड्रेसातील एक-दोघे पोलीस कसल्यातरी चौकशीसाठी गावात येऊन गेले होते. त्या वेळी सगळे गाव कुतूहलाने चावडीपाशी गोळा झाले होते. सारांश काय, भोकरवाडी जागी व्हायला अगदी लहानसहान गोष्टसुद्धा चालते. मग आज समजलेली गोष्ट तर फार मोठी होती. बाबू म्हणजे पैलवानगडी. दिवसभर चरणारा उमेदवारगडी. तो उपोषण करील, ही गोष्ट कुणाच्या स्वप्नातही येणे शक्य नव्हते. तो उद्यापासून उपोषणाला बसणार आहे, ही गोष्ट ऐकली आणि सगळे गाव खडबडून जागे झाले."
................................................................................................

"नाना चेंगटाने सांगितलेली बातमी फार महत्त्वाची होती. बाबू पैलवान उपोषण करणार, ही वार्ता सगळ्या गावाला संकटात टाकणारी होती. एक तर भरल्या पोटी एरवीही बाबू गावातून दंगा करीत फिरत असे. कुणाशीही मस्ती करीत असे. उपाशी पोटी बाबू म्हणजे तर फारच हिंस्त्र प्रकरण. गडी भलताच खवळेल! समोर येणाऱ्याचं काही खरं नाही. किंबहुना, त्याच्या घरासमोरून जाणेही धोक्याचे. आजच्या आज त्याला भेटले पाहिजे. या उपोषणापासून त्याला परावृत्त केले पाहिजे."
................................................................................................

"‘‘बाबू, तुझं उपोशन उद्यापास्नं सुरू हाय ना?’’ 

"‘‘हा –’’ बाबू गुरगुरला, ‘‘खबरदार जर कुनी उपोशन सोडा म्हनायला आला असशील तर! अजाबात सोडनार न्हार्इ, सांगून ठिवतो.’’ 

"‘‘पन उपोशन कसं? प्रानांतिक का लिमिटेड?’’ 

"बाबू गोंधळला. मग स्वत:ला सावरून म्हणाला, 

"‘‘पयल्यांदा दोन-चार दिवसांचं प्रानांतिक करणार. कार्इ उपयोग झाला, तर बरं. न्हार्इतर मग लिमिटेड करनार.’’

"खरे म्हणजे बाबूला गणामास्तराचा हा प्रश्न नीट समजलेला नव्हता. त्याने हा प्रकार तालुक्याच्या गावी नुकताच पाहिला होता. तेथील एका गुरुजींनी आपल्यावरील अन्याय दूर व्हावा, म्हणून प्राणांतिक उपोषण सुरू केले होते. ते बघायला योगायोगाने बाबू चार लोकांबरोबर गेला होता. गुरुजींची गुटगुटीत, तेज:पुंज मुद्रा बघून बाबूचे उपोषण या प्रकाराबद्दल फार अनुकूल मत झाले होते. आपल्या गावी आपणही हा प्रयोग करून पाहावा, असे त्याच्या मनाने घेतले होते. तीन-चार दिवसांच्या आतच गुरुजींचे हे प्राणांतिक उपोषण संपले होते. मुसंब्याचा रस पिऊन त्यांनी ते संपविले होते. त्यामुळे त्यांची मुद्रा जास्तच टवटवीत बनली होती, हेही बाबूच्या कानावर आले होते. या भानगडीत प्राणांतिक म्हणजे नेमके काय अन् लिमिटेड म्हंजे कुठपर्यंत याचा खुलासा विचारण्याचे राहूनच गेले होते. गणामास्तराने या बाबतीत आपले अज्ञान बाहेर काढणे, हे त्याला आवडण्यासारखे नव्हते. त्यापेक्षा असे चाणाक्षपणाने उत्तर देणं केव्हाही शहाणपणाचे."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 20, 2022 - August 20, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
भोकरवाडीतील भुताटकी  
................................................................................................
................................................................................................

"भोकरवाडी गावात पूर्वी भुतांचा उपद्रव अजिबात नव्हता. गावात पडकी घरे होती. ओसाड विहिरी होत्या. वडा-पिंपळाची झाडे होती. इतर गावात अंधार होर्इ, तसाच भोकरवाडी गावातही होर्इ. महिन्यातून नियमाने एकदा अमावस्येची काळीकट्ट रात्र येर्इ. पण तरीही गावाला भुताखेतांचा विशेष असा त्रास नव्हता. कुणी कुठेही जात-येत असे. पण भुताने एकटा-दुकटा माणूस गाठून धरले आणि घोळसले, असा बोभाटा क्वचितच केव्हातरी होर्इ. 

"पण तुकाराम टेंगळे गावात राहायला आला आणि परिस्थिती एकदम बदलून गेली! 

"बायको-पोरांचे लेंढार घेऊन तुकाराम गावात मुक्कामाला आला, त्याच वेळी नेमका भुताखेतांनीही भोकरवाडीत प्रवेश केला. तुकाराम काहीच उद्योग न करणारा माणूस होता. सकाळी लवकर उठावे. चहा पिऊन बिड्या ओढीत वेळ काढावा. मग जेवण झाल्यावर जी ताणून द्यावी, ती चार-पाच वाजेपर्यंत! संध्याकाळी मात्र तुकाराम गावातल्या चार मंडळींत ऊठ-बस करी. इकडच्या-तिकडच्या गप्पा हाणी आणि रात्र झाली की घरी येर्इ. 

"लोकांना पाहिल्यांदा तुकारामाचा उद्योग माहीतच नव्हता. हळूहळू गप्पा-गोष्टींतून त्यांना कळलं की, तुकाराम देवऋषीपणाचा धंदा करतो. कुणाच्याही अंगात आले, कुणालाही भुताने झपाटले की, तुकाराम त्या ठिकाणी हजर... मंत्र-तंत्र करून, छा-छू करून तो त्या माणसाची भुतापासून सुटका करी. भुताला खायला टाकायला सांगी आणि रुपया-दोन रुपये कनवटीला लावून परत येर्इ. तो गावात आला आणि पहिल्यांदा भुताने गावात धरले, ते साळ्याच्या यशोदेला. गेले दोन-तीन दिवस ती तापाने फणफणली होती. तापात तिची बडबडही सुरू असायची. एरवी, ती आजारी आहे आणि काहीतरी दवापाणी द्यायला पाहिजे, एवढ्यावर हा विषय संपला असता. पण संध्याकाळी चार मंडळींत विषय निघाला आणि तुकारामाने झटक्यासरशी आपला अंदाज सांगितला.  

"‘‘कुठं तरी तिन्हीसांजेला झाडाखालनं गेली असणार. बराबर धरलं पिशाच्यानं.’’ सगळे लोक तुकारामाकडे ‘आ’ करून पाहू लागले."
................................................................................................

"‘‘डागदरला काय डोस्कं है? त्यो नुस्ता नाडी बघनार आन् सुर्इ मारणार. सुया मारायला लर्इ दनका आसतोय त्यांचा... का, तर पैसे मिळत्यात ना?’’ 

"ही गोष्ट खरी होती. डॉक्टरलोकांना दंड धरायचा नि सुर्इ खुपसायची, याचा नाद फार... अजिबात न ऐकणारी जात. मागे पटकी आली, पटकी आली – म्हणून जरा बोंब उठली की, तालुक्याहून डॉक्टर इथं ठ्यां करून हजर. धर माणूस की खुपस सुर्इ. बार्इ नाही, पुरुष नाही – सगळ्यांच्या दंडात धडाधड सुया खुपसल्या अन् मग गडी शांत झाला. त्याला भुता-खेतातले काय कळते? तुकाराम म्हणतो त्यात नक्कीच काहीतरी तथ्य असले पाहिजे."
................................................................................................

" ... तुकारामाने सांगितल्याप्रमाणे दहीभात, नारळ, तेलच्या इ. भरगच्च नैवेद्य एका झाडाखाली ठेवण्यात आला. तो नैवेद्य दुसऱ्या दिवशी संपूर्णपणे नाहीसाही झाला, तेव्हा तर सगळ्यांची खात्रीच पटली. आठ दिवसांत यशोदेचाही ताप उतरला. ती पुन्हा हिंडू-फिरु लागली, तेव्हा तर तुकारामाच्या ज्ञानाबद्दल काही प्रश्नच उरला नाही. जिकडे-तिकडे त्याचा बोलबाला झाला. तो होता म्हणून यशोदा वाचली, नाहीतर भुताने तिला आणखी किती दिवस घोळसले असते याचा काही नेमच नव्हता, असे लोक मोकळेपणाने कबूल करू लागले."
................................................................................................

"आणि मग जिकडे-तिकडे भुतांचा खेळ गावात रोज सुरू झाला. कुणी एखाद्या पडक्या घराजवळून गेला की, धर्रकन त्याच्या अंगावर काटा यायचा. कुणी एखादा गावाशेजारच्या विहिरीपासून चालला की, त्याला कसले तरी चमत्कारिक आवाज ऐकू यायचे. कुणी अंधारात एकटाच निघाला की, पाठीमागून कुणाची तरी पावले वाजताहेत आणि कुणीतरी हळूच अंधारातून आपल्यामागे येत आहे... याबद्दल त्याची खात्रीच पटायची. मग काय? ‘राम राम’ करीत गडी जो धूम पळायचा, तो चार मंडळींत येऊन पोहचेपर्यंत थांबायचा नाही. नाना चेंगटाला तर एकदा फारच भीषण अनुभव आला. आपल्या वहाणा सापडेनात म्हणून त्या दिवशी शेजारच्या भानाच्या जडशीळ वहाणा घालून तो माळवं आणायला रानात गेला होता. परत यायला अंधार झाला. वहाणांना नाल मारलेले होते. त्यामुळे त्याचा आवाज फारच मोठा येत होता. अशाच जडशीळ नालाच्या वहाणा घालून कुणी तरी आपल्या मागून बराच वेळ चालत येत आहे, असा नानाला अंधारात भास झाला. एकदोनदा खात्री करून घेण्यासाठी तो थांबला. त्याबरोबर तो आवाजही बंद झाला. नानाने अंधारात मागे वळून पाहिले, तर कुणी दिसले नाही. एकदम गडप! पुन्हा तो चालायला लागला की, पुन्हा खणखण असा आवाज. थांबून मागे वळून पाहिले की, आवाज बंद. गडी गडप! मग मात्र नाना भयंकर भेदरला, जीव मुठीत धरून घेऊन तो जो पळाला, तो थेट गावात गणामास्तराचे घर येर्इपर्यंत थांबला म्हणून नाही. त्याने मागे वळूनही पाहिले नाही. गंमत अशी की, नाना पळत सुटला तसा भुतानेही त्याचा बेजान पाठलाग केला. मैलभर नुस्ता वाहणांचा खणखण आवाज एकसारखा ऐकू येत होता... पण नाना पहिल्यापासून पळण्यात अगदी एक्का. त्यामुळे तो वाऱ्याच्या वेगानं पळाला. भुताच्या खार्इतून कसाबसा पळाला.

"दुसऱ्या दिवशी ही गोष्ट गावात जिकडे-तिकडे झाली! कारण नानानेच ती तिखटमीठ लावून सर्वांना सांगितली. त्याने सांगितलेल्या हकिगतीवरून लोकांना कळले की, नाना चेंगटाने जवळजवळ भूत प्रत्यक्ष पाहिलेच. हे भूत कमीत कमी नारळाच्या झाडाएवढे उंच होते आणि त्याचे हातपाय बुरडाच्या बांबूइतके तरी लांबलचक होते. त्याचे तोंड तर फारच विचित्र असावे, केवळ त्याचे पाय उलटे असल्यामुळे त्याला जोरात पळता आले नाही, इतकेच! नाहीतर नाना चेंगट आज काही जिवंत सापडत नव्हता. नानाचा जवळजवळ पुनर्जन्मच झाला म्हणानात!"
................................................................................................

" ... तुकारामाला कामामधून उसंत मिळेनाशी झाली. रोज कुणाला ना कुणाला तरी तो छड्या मारु लागला. रोज कुणी ना कुणी तरी दहीभात-नारळ घेऊन रस्त्याने चाललेला दिसे. वाण्या-बामनाचे काम असले तर दहीभात-नारळ... कुणब्याचे काम असले तर कोंबडी... पुलाव... कुणी ना कुणी पळत-पळत संध्याकाळचा गावाबाहेर चाललेला आहे, असा देखावा रोजचाच झाला. ... "
................................................................................................

"‘‘न्हार्इ तर आसं असंल....’’ 

"‘‘कसं?....’

"’‘‘भुताची साथ आली आसंल.’’" 
................................................................................................

"‘‘त्यो तुकाराम –’’ 

"‘‘हां –’’ 

"‘‘भुताचा एजंट आसंल. भुतांनी इथं येऊन दंगा करायचा आन् ह्यानं कमिशन खायचं. भुतांना मेजवानी आन् ह्येला दक्षिणा.’’ 

"बाबूचे हे संशोधन अभूतपूर्व होते. भुताचे कुणी एजंट असतात आणि ते भुतांना घेऊन येतात, त्यांच्या मदतीने कमिशन मिळवतात, हा प्रकार अद्यापि कुणाच्या कानावर आलाही नव्हता. भूत काढण्याबद्दल देवरुषाला पैसे मिळत होते, ही गोष्ट खरी. भुतांनाही मुर्गी पुलाव, दहीभात मिळू लागला होता, हीही गोष्ट खरी. पण दोघांचा मिळून भागीदारीतील हा धंदा चालला असेल, हे कुणाच्याही टाळक्यात आले नव्हते. त्यामुळे बाबूचा हा निष्कर्ष ऐकल्यावर जो-तो एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागला."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 20, 2022 - August 20, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
खव्याचा गोळा  
................................................................................................
................................................................................................

"मधल्या वेळचे काम संपवून सखाराम आत आला आणि त्याचे लक्ष त्या खव्याच्या परातीकडे गेले. त्याच्या तोंडाला एकदम पाणी सुटले. हाडकुळा, एक डोळ्याचा हा पोरगा मोठा कलमी होता. कुणाला नकळत हॉटेलातील चांगल्या-चांगल्या पदार्थांवर कसा ताव मारावा, या बाबतीतील त्याचे कसब वाखाणण्याजोगे होते. पांडूसारख्या खवीस मालकालासुद्धा तो कधी सापडला नव्हता."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 20, 2022 - August 20, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
भोकरवाडीतील मारामारी  
................................................................................................
................................................................................................

"मारामारीचा खेळ हा काय प्रकार आहे, हे त्याला समजले नाही. पण ‘मारामारी’ म्हटल्याबरोबर बाबूचे डोळे एकदम चमकले. मारामारी हा त्याचा अगदी ऐच्छिक विषय होता. हा शब्द ऐकल्याबरोबर तो खूश होत असे."
................................................................................................

"‘‘असा फुडं ये की चेंगटू. मारामारी म्हंजी काय झालंय? कुनाकुनात...’’ 

"‘‘भायेरचे लोक हैत –’’ नाना हळुवारपणे डोक्याचा मागील भाग कुरवाळीत बोलला, ‘‘चार-पाच हैत.’’  

"‘‘भायेरचे लोक? आन् हितं येऊन मारामारीचा खेळ करत्यात? आन् आमी काय मेलोय?’’ बाबू चवताळलाच. ‘‘कुठं, चाललीया कुठं मारामारी?’’"
................................................................................................

"चार-सहा माणसे एका म्हाताऱ्याला बडवीत आहेत, हे ऐकल्याबरोबर बाबूचे डोके एकदम चढले. डोळे लाल करून तो ताड्कन् उठला. ओरडला, 

"‘‘आं? आमच्या गावात येऊन ह्रो दंगा? थांबा तुमच्या आयला –’’ 

"नाना खूश होऊन बोलला, 

"‘‘तुम्ही चला बाबूराव लवकर. त्या बिगर न्हार्इ ऐकायची बेनी कुनाला ती. मी तिथंच म्हनालो लोकांना –’’ 

"‘‘काय म्हनलास?’’ बाबूने संशयाने विचारले. 

"‘‘म्हनलं, आमचा बाबू येऊ दे रे. न्हार्इ एकेकाचं त्यानं तंगडं मोडलं, तर नावाचा चेंगट न्हवं.’’"
................................................................................................

"बाबूला आश्चर्य वाटले. ही कसली मारामारीची पद्धत? तो म्हातारा तिथेच उभा राहून ऐकतोय आन् हा लेकाचा सांगतोय – ‘तू हिकडनं ये आन् तू तिकडनं ये’– काय टाळकंबिळकं हाये का न्हार्इ? मारामारी कशी एकदम सुरू झाली पाहिजे. कुणाला काही कळायच्या आत एकदम पटात शिरून , दन्नादन्नी करून , आपटाआपटी करायची आणि पसार व्हायचं. ही कसली मारामारी? तो म्हातारा वेडपटच असावा. काय चाललंय, हे तो कानांनी ऐकतोय. पण लेकाचा पळून काही जात नाही. तिथंच उभा आहे. थूत् त्याच्या...."
................................................................................................

"‘‘– अहो तसं नाही,’’ असे म्हणत काहीतरी हातवारे करीत म्हातारा उठून उभा राहत होता. त्या हातवाऱ्यांचा अर्थ बाबूला समजला नाही. त्याने हात देऊन म्हाताऱ्याला नीट उभे केले. त्याच्या तोंडाला माती लागली होती. ती पुसण्यासाठी बाबूने मोठ्या प्रेमळपणे त्याच्या तोंडावरून आपला खरबरीत हात फिरवला.... 

"– तो म्हाताऱ्याच्या पांढऱ्याधोट मिशाच बाबूच्या हातात आल्या."
................................................................................................

"‘‘मी आन् हा चेंगट ते काम करतो. तुमाला काय नगाला नग असला म्हंजे झालं. तुमचं काम भागीवतो. मग झालं?’’ 

"डायरेक्टरसाहेबांना बाबूची ही सूचना विचार करण्यासारखी वाटली. त्यांनी बाबूकडे एकदा निरखून पाहिले. आहेच पैलवानगडी. धटिंगण तर दिसतोच आहे. चालेल, काही हरकत नाही. एकच तर सीन घ्यायचा आहे; घेऊन टाकू."
................................................................................................

"दिग्दर्शकांनी पुन्हा सूचना दिली. पुन्हा ‘ट्रायल सुरु’ म्हणून सांगितले. 

"या खेपेला बाबूने कोणाकडे ढुंकूनही पाहिले नाही. दातओठ खाऊन तो एकदम पुढे धावला ते थेट म्हाताऱ्याच्या अंगाशी भिडला. एका क्षणात तो त्याला पाडून त्याच्या उरावर बसला. इतक्या गडबडीने मारामारी करायची नाही, हे समजल्यावर त्याने पुढच्या खेपेला नृत्याचेच पवित्रा घेतले. गिरक्या घेत, सावकाश पावले टाकीत तो फार उशिरा पोचला. त्यामुळे म्हाताऱ्याऐवजी त्याच्या छाताडावर बसलेल्या धिंटगणालाच त्याने हाताने ओढले आणि त्यालाच कुचलले. मारामारी करताना चेहरा इतका प्रेमळ आणि हसरा असता कामा नये, अशी दोन-तीनदा ताकीद दिल्यामुळेच त्याने सुरुवातीला चेहरा इतका भीषाण केला की, तो पाहिल्यावर म्हातारा आधीच खाली पडला आणि ‘मेलो मेलो...’ म्हणून ओरडला. एकदा या गडबडीत त्याने नाना चेंगटाचाच गळा धरला आणि ‘मेलो मेलो...’ म्हणून स्वत:च किंकाळी फोडली."
................................................................................................

"बाबूने जीभ चावली. या सगळ्या भानगडीत सिनेमाचे नाव काय, हे विचारायचे राहूनच गेले. आता कसे कळणार, कोणता सिनेमा ते? तालुक्याला लागला तरी कळणार नाही. सगळी मेहनत फुकट गेली. एकदम खवळून तो म्हणाला, ‘‘मी एक इसरलो; तू न्हार्इ इचारून घ्याचं?’’ 

"नाना मागे सरकत-सरकत म्हणाला, 

"‘‘पन तू का इसरलास?’’ 

"‘‘आता हानू का तुला रट्टा?’’ 

"त्याबरोबर आपल्या मुरगळलेल्या पायाची पर्वा न करता चेंगटाने एकदम धूम ठोकली. बाबूला आणखीनच चीड आली. ‘आता सोडतच नाही तुला’ असे म्हणून तोही त्याच्यामागे धूम पळत सुटला आणि ‘पेटलं पेटलं... आता हुतीया पुन्हा हानाहानी’ असे म्हणत बाकीचे लोकही त्या दोघांच्या मागनं धावत निघाले."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 20, 2022 - August 20, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
परसातील खजिना  
................................................................................................
................................................................................................

"नवरा जेवायला बसला की त्याला अशा घरातील कटकटीच्या गोष्टी सांगून भंडावून सोडायचे, ही प्रत्येक पतिव्रतेला ठाऊक असलेली गोष्ट शिवाच्या बायकोच्याही अंगवळणी पडली होती. त्या दिवशी धोतराला हात पुसून शिवा जेवायला बसला. पहिला घास त्याने गिळला न गिळला तेवढ्यात बायको म्हणाली, 

"‘‘तुम्हाला कार्इ लाजबीज है का न्हार्इ?’’"
................................................................................................

"अखेर निघाला तो एक पितळेचा मोठा तांब्या. वर तोंडाला घट्ट सील केलेला एक तांब्या. हंडा नाहीच. 

"‘‘उघडा की मालक – का उघडू मी?’’ आशाळभूत मुद्रेने मारत्याने विचारले. 

"‘‘नको-नको. मी बगतो काय करायचं ते मागनं.’’"
................................................................................................

"दोघांची अशी बाचाबाची सुरू झाली आणि बंडा एकदम शिवाच्या अंगावर धावून गेला. शिवाच्याच ओसरीवर जंगी मारामारी झाली. बंड्याने चार-दोन तडाखे जोरदार हाणले. शिवाचे डोके त्या गडबडीत खांबावर आदळून खोक पडली. रक्त सगळ्या धोतरावर सांडले. शिवाची बायको ओरडत, बोंबलत बाहेर आली. तिने आरोळी ठोकली तसे भराभरा बाहेरून लोक धावत आले. गणामास्तर आला, रामा खरात आला, बाबू पैलवानही आला. आल्या-आल्या त्याने बंड्याच्या छाताडात एक गुद्दा असा ठेवून दिला की, तो उलथापालथाच झाला. मग बाबूने पुन्हा अलगद वर उचलून त्याला खाली फेकून दिले. त्याबरोबर तो तोंडावर आदळला. त्याचा घुळणा फुटला. रक्त वाहू लागले. त्याच्या नाकातली सबंध दिवसभरातली तपकीर बाहेर पडली. त्याचीही बायको रडत-ओरडत आली. 

"सगळीकडे नुसता कालवा झाला. 

"बंडाला आणखीन हाणण्याच्या विचारात बाबू होता. पण लोकांनी त्याला आवरले. बायकोने बंडाला घरी नेले. या सगळ्या भानगडीत शिवाच्या परसातील जमिनीत एक तांब्या सापडला असून त्यात नगद पैसे आहेत, ही बातमी ज्यांना पूर्वी ठाऊक नव्हती, त्यांनाही कळली. सगळीकडे याच विषयाची चर्चा सुरू झाली."
................................................................................................

"चेंगट मधेच म्हणाला, 

"‘‘पन बाबूराव, शिवाचा बा जित्ता हाय. तिकडं एकलासपुराला असतो, धाकल्या पोराकडं. एवढ्यात ‘स्मरनार्थ’ कसं काय?’’ 

"लोक एकदम हसले. चेंगटाचा प्रश्न बिनतोड होता. पण म्हणून बाबू चिडला. तो एकदम खेकसला, 

"‘‘असा काय कायदा है का? त्याची आठवन म्हनून हितं देऊळ बांधलंय म्हनून सांगायचं. इचारलं तर आजून हाय म्हनायचं. मग काय हरकत?’’"
................................................................................................

"बाबूने इकडे-तिकडे करून त्या तांब्याशी जोरदार झटापट केली. वरच्या झाकणावर बुक्क्या हाणल्या. त्याचा परिणाम एवढाच झाला की, एकदा तो जड तांब्या त्याच्या हातातून पडून एकदम त्याच्याच एका पायावर आदळला. पायाला चांगलाच मार लागला. दुसऱ्या खेपेस तांब्या जो उडाला तो गर्दीत पुढे तोंड काढून बघणाऱ्या नाना चेंगटाच्या थोबाडावर दाण्कन् आपटला आणि खाली पडला. नानाचे थोबाड चांगलेच सुजले. ‘आगं आर्इ गं... मेलो... मेलोऽऽ तिच्या आयला...’ असे ओरडत तो बाजूला झाला. असा आणखी दोघा-तिघांना कमी-अधिक प्रसाद मिळाला. 

"अखेरीस बाबूने अंगणातलाच एक दगड घेऊन तांब्याच्या झाकणावर हाणला. मग मात्र झाकण फुटले. तांब्याचे तोंड मोकळे झाले."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 20, 2022 - August 20, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
पाठलाग  
................................................................................................
................................................................................................

"नेहमी नानाच्या डोक्यात असे विचार येत आणि तो गावातून हलत नसे. पण आता वेळ बदलली होती. म्हातारीने अंथरूण धरले होते. भावाने ‘आत्याबार्इला भेटून चार दिवस राहून ये’ म्हणून तीनतीनदा बजावून सांगितले होते. नानाचा अगदी निरुपाय झाला होता. म्हातारीजवळ थोडे फार डबोले असल्याची वदंता होती. तिला नाराज करणे शक्य नव्हते. म्हणून कित्येक वर्षांचा नेम मोडून नाना तालुक्याच्या गावी आला होता. आत्याबार्इचे क्षोमकुशल विचारून झाले होते. म्हातारी अंथरुणात असली तरी अजून टुणटुणीत दिसत होती. सतत बडबड करीत राहण्याचा आणि नानाला उपदेशाच्या चार गोष्टी सांगण्याचा तिचा उत्साह कायम होता. दिवसभर तिच्या उशाशी बसून तिची बडबड ऐकण्याचा नानाला कंटाळा आला. घटकाभर बदल म्हणून बाहेर भटकण्यासाठी तो घराबाहेर पडला. जेवणखाण आटोपलेच होते. आता रात्रीपर्यंत निश्चिंती होती. तेवढा वेळ बाहेर काढावा, म्हणून नाना बाहेर पडला. रस्ता फुटेल तसा हिंडू लागला."
................................................................................................

"आणि मग दोघांत धावण्याची शर्यत सुरू झाली. जोरात पाठलाग सुरू झाला. नानाला कसलेच भान राहिले नाही. दात-ओठ खाऊन तो त्या काळ्या कुत्र्याच्या मागे धावत सुटला."
................................................................................................

"या पाठलागात आणखी काही नव्या घडामोडी घडल्या. पळून-पळून ते कुत्रे आता धापा टाकीत होते आणि चेव चढलेला नाना आता पिसाळल्याप्रमाणे त्याच्या मागे धावत होता. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी ते कुत्रे सैरावैरा धावत होते. जेथे वाट दिसेल तेथे घुसत होते. नानाही तावातावात त्याच्या मागोमाग धावत होता. या भानगडीत ते कुत्रे एका घराच्या उघड्या दारातून आत शिरले आणि बाहेरची खोली, माजघर, कोठीची खोली, परसदार या क्रमाने घर पार करीत परसदाराच्या मागील दाराने पुन्हा बाहेर पाठीमागील रस्त्यावर आले. नानाही अर्थातच त्याच्या पाठोपाठ आत घुसला. बाहेरची खोली, माजघर, कोठीची खोली या क्रमाने धावता-धावता चुकून तो स्वयंपाकघरात घुसला. तेथील बार्इने त्याचे वटारलेले डोळे आणि पिंजारलेले केस पाहून मोठ्यांदा किंकाळी फोडली. त्यामुळे बिचकून जाऊन नानाने आपला मोहरा वळवला तो बाळंतिणीच्या खोलीत गेला. तिथल्या चार-पाच बायकांनी त्याला पाहिल्यावर सामुदायिक किंकाळी फोडली. त्याबरोबर घरातली पुरुषमंडळी जागी झाली आणि तेथे धावून आली. सुदैवाने तोपर्यंत नाना परसदाराच्या मागील दारापर्यंत पोचला. त्याची फक्त पळती पाठ घरातल्या लोकांना दिसली, म्हणूनच नाना बचावला. पण त्या घरातून दोन-तीन पुरुष ‘चोर...चोर’ करीत धावत बाहेर आले आणि पळत सुटले, तेव्हा रस्त्यावरचे रिकामटेकडे लोकही उगीचच धावत सुटले आणि काही वेळ सबंध गल्लीत नुसती पळापळ झाली. या सगळ्या पळणाऱ्या लोकांच्या गर्दीत नानाही सापडला. सगळ्या लोकांबरोबर त्यांच्याच गतीने पळत सुटला. बाकीचे लोक आपल्याबरोबर का पळताहेत याचे मनात आश्चर्य करीत तोही पळत राहिला."
................................................................................................

"‘‘लागलं तर लागू दे गं, त्याचं एवढं इशेष न्हार्इ. पर ते कुत्रं पिसाळल्यालं न्हार्इ, एवढं नक्की. एवढ्या भानगडीत ते कुण्णा कुण्णाला चावलं म्हणून न्हार्इ. आता काय घाबरायचं कारण न्हार्इ.’’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 20, 2022 - August 20, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................
दक्षता  
................................................................................................
................................................................................................

"नारायणाला दरदरून घाम आला. गणेशोत्सव, मोहरम असल्या भानगडी म्हणजे आधीच पोलीस खात्याची कंबक्ती. केव्हा शांतताभंग होर्इल याचा नेम नाही. त्यातून हे गाव शांतताभंगाची अतोनात आवड असलेले. काही घडायचा अवकाश – लठ्ठालठ्ठी, मारामारी सुरुच. तशात हा प्रकार म्हणजे तर सबंध समाजाच्या धार्मिक भावनांचा प्रश्न. मूर्ती भग्न झाली म्हटल्यावर काय होर्इल अन् काय नाही!... झाला दोन समाजांत दंगा सुरु, म्हणजे मग काय? हरताळ, मोर्चे, निदर्शने, लाठीहल्ला आणि शेवटी गोळीबार... मेलो आता...."
................................................................................................

"मूर्ती बनवल्यानंतर ऐन गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी एक ऑर्डरच्या गणपतीची सोंड गणप्याच्या लहान पोराने मोडली होती. गणप्याने ती घार्इघार्इत चिकटवली होती आणि पुन्हा रंग लावून, बेगड फासून जिथल्या तिथे सगळे करून ठेवले होते. कुणाला काही पत्ता नव्हता. पण तो दुसरा कुठला तरी सार्वजनिक गणपती होता. दादा गल्लीचा नव्हता, हे नक्की. मग त्याची सोंड कशी तुटली? काय भानगड आहे, कोण जाणे. पण आता वादावादी करून उपयोग नाही. मिटवामिटवी केली पाहज."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 20, 2022 - August 20, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................
तपकीर  
................................................................................................
................................................................................................

" ... शाळेतील वात्राट कार्टी त्यांना ‘तपकीरमहाराज’ म्हणूनच हाका मारीत. बरोबरीचे मास्तर त्यांचीच तपकीर ओढून त्यांची टिंगल करीत. पण मास्तरांना त्याचे काही सुख-दु:ख नव्हते. ते आपले मुकाट्याने तपकिरीचा बार भरत आणि कामाला लागत. हातात पुस्तके आणि डबी घेऊन वर्गावर जात."
................................................................................................

" ... पण हळूहळू मुख्याध्यापकसाहेबांनी मास्तरलोकांचीही तपासणी चालवली तेव्हा कठीण प्रसंग आला. शिक्षकांनी शाळेत पंधरा मिनिटे आधी यावे, त्यांचा पोषाख नीटनेटका आणि स्वच्छ असावा, त्यांनी वेळेवर वर्गात जावे, इतकेच नव्हे तर त्यांनी मुलांना शिकवावेसुद्धा, अशी एकामागोमाग एक फर्माने सुटू लागली. त्यामुळे मास्तरवर्गाची अगदी गाळण उडाली. आपण सांगतो आहोत त्याप्रमाणे घडत आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी मुख्याध्यापक श्री. जोशी हे स्वत: शाळेतून हिंडू लागले, तेव्हा तर फारच खळबळ उडाली. बरे, नुसते फेरफटका मारून मुख्याध्यापक थांबले तरी गोष्ट निराळी होती. पण मास्तरांना हाका मारून ते त्यांना आपला अभिप्राय निर्भीडपणे ऐकवू लागले, तेव्हा मात्र बाका प्रसंग आला. बकासुराच्या गावातील माणसाप्रमाणे, आता आपली पाळी केव्हा येते कोण जाणे, अशी ज्याला-त्याला धास्ती वाटू लागली."
................................................................................................

"‘‘तुम्हाला काही सूचना सांगणं माझ्या जिवावर येतं.’’ 

"‘‘तसं काही वाटायचं कारण नाही. खरं म्हणजे, तुम्ही मुख्य आहात. आम्हाला सूचना करायचा तुमचा अधिकारच आहे.’’ 

"कुठलीही गोष्ट बावळे स्वत:च सोपी करून सांगत असत. तर्कशुद्ध पद्धतीने मांडीत असत. त्यामुळे त्यांच्याशी बोलणारा माणूस अनेकदा गोंधळात पडत असे. हेडमास्तर जोशीही त्यांच्या ह्या सरळ बोलण्याने जरा बिचकले."
................................................................................................

"‘‘हे तपकीर-प्रकरण मला बिलकुल आवडत नाही.’’ 

"बावळ्यांना हेडमास्तरांचे हे म्हणणे बिलकुल समजले नाही. आवडत नाही म्हणजे काय? नसेल आवडत. प्रत्येकाला हे प्रकरण आवडलेच पाहिजे, असा कायदा थोडाच आहे? नसेल आवडत तर तुम्ही ओढू नका. तुमचे हातपाय दाबून कुणी नाकात तपकीर कोंबते आहे की काय इथं? गंमतच आहे!...."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 20, 2022 - August 20, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................
दरोडा  
................................................................................................
................................................................................................

" ... सगळेच बिनकामाचे. गावात बेकार म्हणून हिंडणारे. कुठल्याही मार्गाने, पण माणसाने हजारो रुपये झटक्यात मिळवले पाहिजेत, या एकाच उदात्त भावनेने भारलेले."
................................................................................................

" ... एसटीतील उतारुंकडून पैसे, दागिने, सामानसुमान वगैरे पळवून दरोडेखोर पसार झाले, हा वृत्तांत अनेकांना ठाऊक होता. त्यानंतर ते दरोडेखोर सापडले किंवा त्यांना शिक्षा झाल्याबद्दल कुणालाच कसलीच माहिती नव्हती. तेव्हा ही कल्पना काही वाईट नव्हती. दहा-वीस हजारांचा तरी लग्गा साधायला हरकत नव्हती. पण ही गोष्ट करायची कशी? केव्हा?"
................................................................................................

" ... म्हादा चिडून बोलला, ‘‘पोलिसाचं माजं ठरलं होतं, त्यांना निदान दोन हजार तरी द्यायचं म्हणून. हितं मुदलात खोट. पदरचं पैसे द्यायची पाळी आली. म्हणून पैसंच परत दिलं. दरोडा पडलाच न्हाई. पुलिसात कंप्लेट गेलीच न्हाई तर काई द्यावं लागणार न्हाई. न्हाई तर पदराला खारष्ठ हं, चला –’’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 20, 2022 - August 20, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................
बबीचे मंगळसूत्र  
................................................................................................
................................................................................................

" ... मधूनमधून छगन्या कापडाचे लहान-लहान तुकडे कपड्याच्या आत गुंडाळून घरी आणायचा. त्याची विक्री गुपचूप व्हायची. कधी एखाद्या दोस्ताला गिऱ्हाईक बनवून त्याच्या पिशवीत जादा कापड कोंबून त्याच्याकडून कमिशन घ्यायचा. अशी एकूण वरकड प्राप्तीही बऱ्यापैकी होती. त्यामुळे त्याच्या घरात एका खोलीतच – सगळा थाटमाट होता. स्टेनलेसचे डबे होते. रेडिओ होता. ट्रॅन्झिस्टर होता. झुळझुळीत कपडे तर होतेच होते. सायकल होती. लग्न झाल्यावर तर त्याच्या उत्साहाला उधाण आले होते. वरकड प्राप्ती अशीच वाढावी आणि त्यातून टीव्ही, लोखंडी कपाट या वस्तू पण हळूहळू घ्याव्यात, असे त्याच्या मनात येत होते. एकूण, तो मोठा नेटका संसारी पुरुष होता. 

"बबी त्याला अनुरूप अशीच बायको होती. नट्टापट्टा, नवे कापड-चोपड, दागदागिने या गोष्टींची सगळ्या बायकांप्रमाणे तिलाही आवड होती. मुख्य म्हणजे स्वयंपाकपाण्याचा तिला मनापासून कंटाळाच होता. त्या दृष्टीने ती सुशिक्षित महिलांतच जमा झाली असती. हॉटेलात खाण्याची हौस मनापासून. दुसऱ्याच्या घरी खायला मिळालं तर वाईट नाही. घरी काही केलंच तर निरुपायाने, अगदी कर्तव्यबुद्धीने. दोन-तीन पदार्थांत सगळे भागायचे. त्यांना घशाखाली उतरण्याएवढी चव असली म्हणजे संपले! अधिक चवदार पदार्थ करायला घर म्हणजे काय हॉटेल आहे?"
................................................................................................

"हा गोंधळ बाहेर चाळीत ऐकू गेला, पण कोणी चौकशी केली नाही की तिकडे फिरकले पण नाही. घरोघर हाच प्रकार होता. त्यामुळे त्यात काही विशेष आहे, असे कुणाला वाटले नाही. लग्न होऊन चार-सहा महिने झाले. अजून मारहाण, भांडाभांडी याला सुरुवात कशी झाली नाही, याचे काही जणांना उलटे आक्रीतच वाटत होते. आता त्यांचा जीव भांड्यात पडला. हां, आज खरा जोडीचा संसार सुरू झाला. झकास झाले!"
................................................................................................

"लोक जमले. बघता-बघता गर्दी झाली. नाही-नाही त्या चौकशा सुरू झाल्या. पण आता काही उपयोग नव्हता. मंगळसूत्र नेणारे चोरटे केव्हाच नाहीसे झाले होते. त्यांचा मागमूस नव्हता. लोकांनी फक्त बबीला प्रश्न विचारून भंडावून सोडले. कोरडी सहानुभूती व्यक्त केली. ‘‘हल्ली हे मंगळसूत्र चोरणाऱ्याचं फार पीक माजलं आहे. सरकारनं काहीतरी करायला पाहिजे –’’ वगैरे वगैरे. असे उद्गार काढले आणि मग हळूहळू एकेकाने काढता पाय घेतला. गर्दी विरळ झाली. बबी रडत-भेकतच उठली. हळूहळू घराकडे गेली."
................................................................................................

"छगन्याने तिला आणखीन टिंबे ठेवून दिले. बाहेर चाळीत सगळ्यांना हा आरडा-ओरडा नीट ऐकू आला. सगळ्या चाळकऱ्यांनी समाधानाचे सुस्कारे सोडले. वा! छगन्या खरा मर्द पुरुष आहे. रोज ठोकाठोकी सुरू झाली. आता त्याचा संसार सुरळीतपणे चालणार यात काही शंकाच नाही."
................................................................................................

"‘‘हीच ती बाई उस्ताद. परवाची –’’ 

"‘‘आसं? आरं तुज्या मी –’’ 

"असे म्हणून त्या जाड्याने एकाएकी बबीच्या तोंडावर एक ठोसा मारला. तिचे थोबाड फुटले. तोंडावर रक्त वाहू लागले. ती खालीच आपटली. 

"‘‘साली खोटं मंगळसूत्र घालून हिंडतीस का? सबंद सराफकट्ट्यात आमची आब्रू घालवलीस –’’ 

"कुलुंगी म्हणाला, 

"‘‘हाना वस्ताद, हाना. आता सोडू नका. ह्या बायांना खोटं दागिनं घालायची आजकाल लै खोड लागलीया. समदी म्हेनत वाया गेली परवाची... हाना –’’"
................................................................................................

"मग कितीतरी वेळ बबी मोठ्यांदा ओरडत राहिली आणि छगन तिला सटके देत राहिला."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 20, 2022 - August 20, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................
कावळ्यांचे मानसशास्त्र  
................................................................................................
................................................................................................

"कॉमनरुमच्या दारापाशी उभे राहून कावळ्यांनी गोडबोल्याची सहज इतर चौकशी केली. त्याबरोबर गोडबोल्याने भराभरा आपली माहिती सांगून टाकली. त्यावरून त्याची परिस्थिती फारच गरिबीची असावी, हे कावळ्यांच्या एकदम लक्षात आले. सगळेच शिकणारे भाऊ, लग्न न झालेल्या बहिणी, खाणारी तोंडे जास्ती अन् वडिलांचे तुटपुंजे उत्पन्न. रोज एक वेळच जेवावे लागते. कपडे, पुस्तके, फी... सगळे कठीणच. इतक्या सगळ्या अडचणीतून कॉलेजचे शिक्षण कसे घ्यायचे?"
................................................................................................

"‘‘हं, हं, खरेदी-बिरेदी आता बंद करा हं सगळी. माझ्याजवळ अजिबात पैसे नाहीत, सांगून ठेवतो.’’ 

"‘‘वा: असं काय करता? कपाटात ते दोनशे आहेत ना?’’ 

"‘‘ते विम्याचा हप्ता भरायला ठेवलेत. त्याला हात लावू नका.’’ 

"कावळ्यांनी हे शेवटचे वाक्य जास्तीत जास्त निश्चयाने आणि रागाने उच्चारण्याचा प्रयत्न केला. मग त्यांनी टेबलावरचे वर्तमानपत्र उचलले आणि ते तिन्ही बाजूंनी तोंडाभोवती धरले. अशा सफार्इने की, बघायचे म्हटले तरी आपले तोंड कोणाला दिसू नये. राग व्यक्त करण्याची ती त्यांची नेहमीची पद्धत होती. आपल्याला हवे ते शब्द दुसऱ्याच्या तोंडून निघेपर्यंत वर्तमानपत्र बाजूला म्हणून करायचे नाही, असा त्यांचा निर्धार असे. पण दुर्दैव एवढेच होते की, ते रागावलेले आहेत, हे त्यांच्या स्वत:खेरीज दुसऱ्या कोणालाही घरात समजतच नसे. घरातल्या लोकांची स्वच्छ समजूत होर्इ की, कावळे हे वर्तमानपत्र तरी वाचीत असावेत किंवा वाचता-वाचता त्यांना नेहमीप्रमाणे झोप लागली असावी. समजूत म्हणण्यापेक्षा खात्रीच, असे म्हटले तरी चालेल. आणि त्यामुळे घरातल्या सगळ्यांचे व्यवहार नेहमीप्रमाणे चालत. त्यात कोणताही बदल होत नसे. कावळ्यांनाच थोड्या वेळाने कंटाळा येर्इ. मग टेबलावरची टाचणी घेऊन हळूच ते वर्तमानपत्राला चार-दोन ठिकाणी भोके पाडत आणि त्यातून ते पाहत. घरात काय चालले आहे याचा अदमास घेत."
................................................................................................

"‘‘मग? काय करू?’’ 

"‘‘मग आण जा. जा, चांगली दोन घेऊन ये. रेशमीच काय, ती कसली हातमागाची नाही तर वूलनचीसुद्धा आण पाहिजे तर. दहा-पाच रुपये जास्त गेले तरी हरकत नाही.’’ 

"हातमाग आणि वूलन नावाचे प्रकार बरेच महाग असतात, एवढे कावळ्यांना माहीत होते. 

"प्रोफेसरीणबार्इंच्या तोंडावर नाराजी दिसली. 

"‘‘नको बार्इ! तुमचे विम्याचे पैसे –’’ 

"‘‘विम्याचं बघू मागाहून. विम्याचा हप्ता नाही भरला म्हणून काही माणूस मरत नाही. पुष्कळ पैसे यायचेत माझे. हलकट –’’ कावळ्यांचा संताप पुन्हा एकदा अनावर झाला. 

"‘‘मघाशीच घेतलेत पैसे ते. आता तुम्ही म्हणताच आहात तर जाते बार्इ.’’ 

"असे म्हणून प्रोफेसरीणबार्इ मोठ्या कष्टाने उठल्या. अगदी नाइलाजाने त्या कपाटाजवळ गेल्या आणि निरुपाय होऊन त्यांनी कपाटातले आणखी पैसे घेऊन पर्समध्ये टाकले. मग चपला मात्र त्यांनी घार्इघार्इने पायात अडकवल्या."
................................................................................................

"असा कार्यक्रम सुमारे पाच मिनिटे सुरू राहिला. मग त्यातल्या चुणचुणीत विद्यार्थ्याने जवळ उभ्या असलेल्या कावळ्यांच्या कन्येला विचारले, ‘‘काय, तुम्ही अगदी कशात भाग घेत नाही? निदान ड्रामामध्ये तरी पार्ट घ्या. आम्ही सगळे आहोतच.’’ 

"प्रोफेसर कावळ्यांची मुलगी बेबी दिसायला ठसठशीत होती, दहा जणींत उठून दिसावे असे तिचे रूप होते. त्यामुळे अर्थातच तिने ‘ड्रामात’ एखादा ‘पार्ट’ करावा, अशी मुलांची इच्छा असणे स्वाभाविक होते. किंबहुना, तिने कॉलेजच्या सर्वच ‘अॅक्टिव्हटीज’मध्ये भाग घ्यावा, अशी बऱ्याच मुलांची इच्छा होती. ही इच्छा त्यांच्या तोंडावर नेहमीच उमटत असे. पण बेबी फार लाजाळू होती. त्यामुळे कुणी काही बोलले तरी ती फारशी बोलत नसे. मान खाली घालून ऐकून घेर्इ आणि एखादाच शब्द बोले. 

"आजही तिने मान खाली घातली आणि हळूच उत्तर दिले, 

"‘‘मला नाटकातलं काय कळतं?’’"
................................................................................................

"‘‘विचार करते.’’ 

"‘‘तुम्ही विचारच फार करता बुवा. थोडा अविचार करा आता, अविचार.’’ डोळे मिचकावून कवी कमलेश आपल्या विनोदावर खूश होऊन हसले. शेजारचे नटवर्यही हसले. यामुळे बेबीलाही निरुपायाने तोंडाची घडी मोडावी लागली. पलीकडे उभे असलेले एक क्रिकेटपटूही कान पाडून हा संवाद ऐकतच होते. शक्य असते तर त्यांनी बेबीला क्रिकेट टीममध्ये येण्याचाही आग्रह केला असता. पण ती शक्यता नव्हती. हसण्याची ही लाट अंगावर घेत तोही मग या संभाषणात सफार्इने सामील झाला. हळूहळू उरलेलेही एक-दोघे या घोळक्यात आले आणि काहीतरी बोलत राहिले. त्या सर्वांच्या बोलण्याची गोळाबेरीज इतकीच होती की, मिस् कावळे या फार सुंदर आहेत, त्यामुळे अर्थातच हुशार आणि कलावंत आहेत. तेव्हा त्यांनी कॉलेजचे नाटक, वाङ्मय मंडळ यातच नव्हे तर राष्ट्रभाषा प्रचारसभा, प्लॅनिंग फोरम, सोशल सर्व्हिस लीग, गेम्स, वक्तृत्व सभा इत्यादी सर्वच कार्यक्रमांत भाग घेणे आवश्यक आहे. त्या बाबतीत तिला काही अडचण असेल, तर ही सर्व तरुण मंडळी तिला साह्या करायला एका पायावर तयार आहेत."
................................................................................................

"‘‘नाही तर काय? तुमच्याबरोबर फिरायला आले की नेहमी अस्सं होतं. इतकी माणसं भेटतात.’’ 

"प्रोफेसर कावळ्यांना तिचे बोलणे एकदम पटले. असे झाले होते खरे. ज्या-ज्या वेळी बेबी बरोबर फिरायला येर्इ, त्या-त्या वेळी माणसे खूप भेटत. कावळ्यांशी खूप गप्पा मारीत. मोठा गमतीदार योगायोग म्हणायचा. बेबीचा पायगुण मोठा विशेष होता... या योगायोगाचे कौतुक करीत ते म्हणाले,  

"‘‘पण आता अंधार झालाय. परत कशी –’’ 

"‘‘त्यांचा सुभाष आहे ना, तो पोचवील मला –’’ बेबीचा चेहरा नकळत लाल झाला. 

"‘‘वा वा:! सुभाषा ना? फार चांगला मुलगा. मला ठाऊक आहे. परवाच तो मला सांगत होता माझ्या टीचिंगबद्दल. ते तास अजून विसरलो नाही म्हणत होता. फार चांगला!’’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 20, 2022 - August 20, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................
रघोबा : एक स्वातंत्र्यसैनिक
................................................................................................
................................................................................................

" ... पेठेतल्या एका दुकानात रघू मुनीम आहे. मालकाच्या चिक्कूपणाच्या गोष्टी हा त्याचा नेहमीचा विषय. मग बायको परवा सुनेबद्दल काय म्हणत होती, पोरगा काही कसा उद्योग करीत नाही, दिलेल्या नोकर्‍या टिकवीत नाही, सध्याच्या परिस्थितीत कसं भागत नाही. अनेक गोष्टी – खरे म्हणजे, या सगळ्या गोष्टी कटकटीच्या. पण रघू शांतपणे आणि मजेत सगळे सांगत होता. कसलीही कुरकूर नाही. वर पुन्हा – ‘फक्कड चाललंय’ – म्हणायची तयारी. आणि हे सगळं अगदी मनापासून."
................................................................................................

"रघू माझ्यापेक्षा तसा पाच-सात वर्षांनी मोठा. पण घरची गरिबी आणि उनाडपणा यामध्ये गोते खात स्वारी माझ्या वर्गात दाखल झाली होती. रघ्या वार लावून जेवत होता, पण त्याची कसलीही खंत त्याला नव्हती. आपण शिकलं पाहिजे, ही ओढही नव्हती. जिथं जेवायला जायचं तिथल्या लोकांच्या नकला करणं, टिंगल करणं, अभ्यासाच्या बाबतीत प्रामाणिकपणे अंगचोरपणा करणं – हे रघूचं वैशिष्ट्य. अत्यंत व्रात्य आणि उपद्व्यापी बाळ. एकदा मास्तर त्याला म्हणाले,  

"‘‘जा रे काळ्या, टोल देऊन ये घंटेचा.’’ 

"मराठी शाळेत प्रत्येक तास संपल्यावर घंटेचा टोल पडायचा. शाळा सोडायची असली तर गजर करायचा. शिपाई कुठं बाहेर गेला होता म्हणून मास्तरांनी या थोराड पोराला ते काम सांगितलं. रघ्याने पळत-पळत जाऊन लाकडी हातोडा उचलला आणि ठाण्ठाण्ठाण् करून जोरात गजर करून टाकला. ‘हेऽऽऽ’ करून सगळ्या वर्गांतली पोरं वर्गातनं सुटली. दप्तरं घेऊन पळापळ. दुपारी तीनलाच रघ्याने शाळा सोडली. सगळे मास्तर हतबुद्ध होऊन हा गोंधळ बघत उभे नुसते."
................................................................................................

" ... मधेच हैदराबाद सत्याग्रहाची चळवळ निघाली. गावातली पुष्कळ तरुण पोरं सत्याग्रहात गेली. मोगलाईतल्या तुरुंगात जाऊन खितपत पडली. कसं काय कोण जाणे, पण रघोबाही त्यात गेले. मी त्या वेळी शाळेत होतो."
................................................................................................

"‘‘एक-दोन जण झाले. मग आले आपले नारायणाचार्य –’’ 

"‘‘हां हां –’’ 

"नारायणाचार्य मला माहीत होते. नारायणाचार्य वैष्णव हे गावातले जुन्या वळणाचे भिक्षुक गृहस्थ. कथा-कीर्तनं करून उदरभरण चालायचं. तेही सत्याग्रहात गेले होते. मला ऐकून माहिती होती. 

"‘‘बरं मग, पुढं काय झालं?’’ 

"‘‘पुढं काय? त्या दाढीवाल्यानं विचारलं की – ‘तुम्हारा नाम?’ हे म्हणाले, ‘नारायणाचार्य’. त्यानं तोंड वेडेवाकडे करून कसं तरी ते उर्दूत लिहिलं बाबा. मग म्हणाला, ‘तुम्हारे वालिद का नाम?’ हे म्हणाले, ‘अनिरुद्धाचार्य.’ ’’ दाढीवाला खेकसला,  

"‘‘क्या?’’ 

"‘‘अनिरुद्धाचार्य.’’ 

"‘‘फिरसे बोलो.’’ 

"‘‘अ-नि-रु-द्धा-चा-र्य.’’ 

"‘‘क्या नाम भी एकेक होते है साले –’’ असं म्हणून त्यानं तोंड वाकडं करीत कसंतरी ते वहीत लिहिलं. त्यांना दिलं आत पाठवून. हा सगळा संवाद ऐकला की आमच्या लायनीतल्या लोकांनी. त्यांना मजाच वाटली. आम्ही म्हटलं, ‘‘चला रे, ह्या दाढीवाल्याची जरा मजा करू या.’’ बाळ्या कुलकर्णी सगळ्यात पुढं. त्याला विचारलं, ‘‘तुम्हारा नाम?’’ 

"बाळ्या म्हणाला, 

"‘‘प्रद्युम्नाचार्य.’’ 

"‘‘क्या? –’’ दाढीवाला असा खिंकाळला म्हणतोस! आम्ही सगळे खॅ: खॅ: करून हसायला लागलो. 

"‘‘नाम बताव सिधे.’’ 

"‘‘बताया ना, प्रद्युम्नाचार्य.’’ 

"घेतलं बुवा कसं तरी वेडवाकडं लिहून. मग त्यानं विचारलं, ‘‘अच्छा, वालिद का नाम?’’ 

"‘‘धृष्टद्युम्नाचार्य.’’ बाळ्या शांतपणे म्हणाला. 

"तो जो संतापला... बाळ्याला म्हणाला, 

"‘‘जाव-जाव अंदर. चिल्लाना मत.’’ 

"मग मला विचारलं, ‘‘तुम्हारा नाम?’’ आम्ही तयारच. मी सांगितलं, 

"‘‘राघवेंद्राचार्य –’’ 

"‘‘जाव अंदर –’’ तो दाढीवाला असा ओरडला म्हणतोस! वही बंदच केली त्यानं. 

"‘‘सब चार्य लोग अंदर भागो. बकवास मत करो.’’ 

"सत्याग्रहात लोकांनी दाबून खोटी नावं सांगितली होती, हे मला ऐकून माहीत होते. पण ह्यात इतक्या गमतीजमती झालेल्या असतील याची कल्पना नव्हती. खरेखोटे कोण जाणे, पण रघ्याने सांगितलेली हकिगत ऐकून हसू मात्र फार आले. आम्ही दोघंही पोट धरधरून हसत राहिलो. त्या गडबडीत रघूचे माफी-प्रकरण मी पार विसरून गेलो. रघू अशा काही गोष्टी आठवून-आठवून सांगायचा. खूप हसू यायचे. ... "
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 20, 2022 - August 20, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
Bhokarvadichya_Goshti (Marathi) 
Marathi Edition  by D. M. MIRASDAR  (Author)  
................................................
................................................
August 11, 2022 - 
August 20, 2022 - August 20, 2022. 
Purchased August 01, 2022. 

Publisher‏:- MEHTA PUBLISHING HOUSE 
(1 January 1983)
Language:- Marathi
Format: Kindle Edition
Kindle Edition

ASIN:- B01NCNFNMM
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4914296260