Monday, August 22, 2022

Sarmisal सरमिसळ : द. मा. मिरासदार / विनोदी कथासंग्रह (Marathi), by D.M. MIRASDAR.

................................................................................................

Sarmisal (Marathi) 
सरमिसळ : द. मा. मिरासदार / विनोदी कथासंग्रह 
by D.M. MIRASDAR

Neither the book, nor any of the first few sites on internet, give any clue about the date of publication of this book. Kindle claims it was 25 May 1905, but since the author wasn't born until some years after a couple of decades later, this isn't possible. One may guess the publisher had editors who forgot there was a new millennium. 

Then one comes across one article herein about the year of writing of that piece being the centenary of birth of Gandhi, so that piece was obviously pre-1970s, or just about so. 

So one may guess that this is a collection of articles written at various times, published on 25 May 2005, not 1905. But it's a guess, that's all. 

More than one piece seems to have been written around late sixties, judging from another piece - दोन बैलांची सुरस गोष्ट.

Mirasdar changes completely when he writes about his beloved Pandharpur. 

Who knew, judging from his Jawaibapu, that he could write like this! 
................................................................................................

"हे गांधींच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. महात्मा गांधींचा गौरव करण्यासाठी सरकारने अनेक कार्यक्रम चालू केले आहेत. नभोवाणीवर शुक्रवारी होणारे कार्यक्रम आपल्याला (न ऐकून) ठाऊकच आहेत. बापूजींचे चित्र नोटांवर छापल्यामुळे श्रीमंतांपासून गोरगरिबांपर्यंत बापूंची प्रतिमा नेऊन पोहोचवली आहे. व्याख्याने, चर्चा, परिसंवाद यांचा तर पाऊस पडतो आहे.

"सरकारने आणखी एक सोय केलेली तुम्हाला ठाऊक आहे काय? नव्या दिल्लीत बापूजींचा आवाज ऐकू येईल अशी एक खास व्यवस्था झाली आहे. तुम्ही एक विशिष्ट क्रमांक फोनवर फिरविलात की, गांधींच्या भाषणाची रेकॉर्ड तुम्हाला ऐकू येते. केव्हाही हा फोन-नंबर फिरविलात की, बापूंचे भाषण ऐकू येण्याची उत्तम सरकारी सोय अशा रीतीने झालेली आहे."

And then Mirasdar takes off, with a conversation between a minister - and Gandhi at the other end. 

Western authors often refer to hypocrisy of modern era of last few centuries with an assertion about what the king of Jews would encounter on his coming; from non-recognition, almost always assumed, to further disappointments and much worse, various scenarios have been portrayed by different authors. 

Mirasdar replaces him with Gandhi, here. 

But not without mentioning him explicitly, and in a wry turn of humour that has the stymied man returned from heaven exclaim about now having comprehended why his philosophy was a failure in Maharashtra. 

"एकीसाठी शिंडक्या आपणहून गोठ्यात जाऊन बसला. अशा रीतीने एकीचाच शेवटी विजय झाला. इंडक्या आता रानात एकटाच फिरतो. वाटेल ते खातो. कोल्हा, गाढव, लांडगा सगळे त्याच्या मागून हिंडत-हिंडत पोटभर चरतात. सगळे चैन करतात. 

"हल्ली ऊस कडाकडा फोडताना कोल्हा डोळे मिचकावून गाढवाला म्हणतो– ‘‘शिंडक्या मरायलाच टेकला आहे. फिफ्टी पर्सेंट काम झालंच आहे. चार दिवस इंडक्याला चरू दे पोटभर. मग मात्र आपण सिंहाला बोलावू. तो चुटकीसरशी याचा निकाल लावील. मग सबंध रान आपल्यासाठी मोकळं! हां: हां:!’’"

One has to wonder if this was written before or after the president was Giri instead of Reddy. 

Mirasdar describes what amounts to an equivalent for Maharashtra of what's Kashi for all of India.

"कुणाला खरे वाटेल की नाही कोण जाणे, पण आमचे गाव म्हणजे एक आदर्श तीर्थक्षेत्र आहे. इथे घरांपेक्षा मठ अधिक. शहाण्या लोकांपेक्षा वेडे अधिक. (आणि सुवासिनींपेक्षा सोवळ्या बाया अधिक असाही बोभाटा आहे.) गावाच्या लोकांपेक्षा परगावचे अधिक, असे हे चमत्कारिक गाव आहे. गाव नव्हेच, एक प्रचंड कोडे. लहानसे शहर म्हणण्यापेक्षा मोठे खेडे असे वाटणारे हे गाव खरोखरीच एक मोठे कोडे आहे. उभे-आडवे एक मोठे पसरलेले कोडेच! मला तरी दुसरा शब्दच सुचत नाही. सगळ्या महाराष्ट्रातल्या महाराज मंडळींचे, संस्थानाधिपतींचे मठ आणि वाडे यांचीच संख्या इथे अधिक आहे. या मठांतून, वाड्यांतून त्या-त्या भागातले लोक वर्षानुवर्षे राहतात. चतुर्मासात सगळ्या महाराजांचा मुक्काम परिवारासह इथे असतो. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण... सगळीकडून ही मंडळी येतात. यात्रेत तर हे मठ ‘हाऊसफुल्ल’ असतात. त्यामुळे सच्च्या पंढरपूरकराला मायबोली मराठीच्या सगळ्या छटा उपजत ठाऊक आहेत. कुणी कोणत्याही बोलीत बोलले तरी पंढपूरकराला ती उमगली नाही असे कधी होणारच नाही. इथली दुकानदार मंडळी त्या-त्या बोलीत गिर्‍हाइकाशी सहज बोलतील. इतकेच नव्हे तर उच्चारावरून हा बोल परभणीचा का धुळ्याचा, नगरचा का नागपूर-वर्ध्याचा हे बरोबर ओळखतील. मायबोलीच्या सगळ्या छटांचे इथे कायमचे संमेलन भरलेले दिसेल आणि संयुक्त महाराष्ट्राचे व्यापक दर्शन सहजगत्या घडून जाईल. या वातावरणाचा नकळत फायदा मला कितीतरी झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, सातारा, कोल्हापूर यावरचे प्रादेशिक वाङ्मय मी सहज वाचू शकतो. त्यातले संवाद योग्य अर्थासह, उच्चारासह बोलून दाखवू शकतो. एखाददुसरा शब्द सोडला तर मला ते दुर्बोध कधीच वाटले नाही. माझ्या गावचे माझ्यावर हे अनंत उपकार आहेत.

Another unexpected one is ‘देव आहे काय?’- काही देवांच्या मुलाखती. Mirasdar wrote this as a witty commentary on the then current state of affairs as understood by most. 

One would have wished it were better written, avoiding inappropriate terms. 

But then Mirasdar had no clue about how true certain parts were. Especially when he speaks of an aspect or form of the Mother Goddess - well, She wasn't the then PM as Mirasdar sarcastically says, but She certainly was the power helping Divine Victory in 1971; the then PM, in fact, didn't use the power given by Divine Mother for the purpose, not to the extent given and intended by the Divine Mother, falling short due to earthly considerations. 
................................................................................................

At some point, it was suggested to Government of India that Bengal tiger, not the Indian lion as it was until then, should be designated the national animal. This was fine to save tigers, thought being that lions number had been decimated beyond possibility of recovery, due to hunting by British during the colonial era. 

Those of us genuinely fond of lions didn't quite approve when we came to know of the switch. 

Was 'पशूंची निषेध सभा- राष्ट्रीय प्राणी ‘सिंह?' छे!' written at that time? 

One would expect so, but it seems it was written when decision to designate lion the national animal. 
................................................................................................

The piece titled पानिपतचे चौथे युद्ध must have been written, and published, soon after March 1971. 

Most of us remember 1971 very differently. 

Events that led to Bangladesh began already in 1970 with the horrendous floods that drowned over a hundred thousand in East Bengal- known within Bengal, before partition, as 'Jal Bangla', literally, 'water Bengal'. 

Everything he describes - wasn't that in 1969? Wikipedia mentions V. V. Giri as President of India from 1969 on, and that was the key fight that broke the party into O and I factions, with the latter winning, hence the President then was Giri. 
................................................................................................

Quoted from Wikipedia:- 

"On 12 November 1969, the Prime Minister of India Indira Gandhi was expelled from the Congress party for violating the party discipline. The party finally split with Indira Gandhi setting up a rival organization, which came to be known as Congress (R). In the All India Congress Committee, 446 of its 705 members walked over to Indira's side.[10] The Indian National Congress (Organisation) was also occasionally informally referred to as the Syndicate and the Indira faction by "Indicate". K Kamaraj and later Morarji Desai were the leaders of the INC(O).

"INC(O) led governments in Bihar under Bhola Paswan Shastri, Karnataka under Veerendra Patil, and in Gujarat under Hitendra K Desai. It was also a part of the Janata Morcha that ruled Gujarat under Babubhai J. Patel from 1975–1976 during the emergency era.

"The split can in some ways be seen as a left-wing/right-wing division. Indira wanted to use a populist agenda in order to mobilize popular support for the party. The regional party elites, who formed the INC(O), stood for a more right-wing agenda, and distrusted Soviet help.

"In the 1971 general election, the INC(O) won about 10% of the vote and 16 Lok Sabha seats, against 44% of the vote and 352 seats for Indira's Congress. In March 1977, the party fought the post-Emergency election under the banner of Janata Party."

Mirasdar must be referring to the general election of 1971, rather than the party split, as war. 

"The Janata Party alliance inflicted crushing defeat to Indira's Congress Party. Nevertheless, the total vote share of Congress (O) in 1977 was almost halved from 1971 and they lost three seats.[citation needed]. Later the same year, INC(O) formally merged with the Bharatiya Lok Dal, Bharatiya Jan Sangh, Socialist Party of India, Swatantra Party and others to form the Janata Party. Congress (O)'s leader Morarji Desai served as the fourth Prime Minister of India from 1977 to 1979 which was India's first non-Congress government.[11]"

So he must have written this piece before the results of 1977 election were out. 

It's rather cute that Mirasdar thought teaching would continue exactly as he'd known - human teachers and all. 

He hadn't taken computers into account, and internet was far into future, probably, when he wrote this. 

What's less forgivable is that he sketches out previous history exactly as taught by invaders since a millennium and a half ago, instead of history known to India (and deliberately labeled myth by invaders). 

Or did he not realise about Panipat, also called Thanesar (Sthaneshwar), being the site of Kurukshetra, the setting of the great War of Mahabharata?

"पश्चिम पाकिस्तानात भावलनगर या गावचा चित्तथरारक वृत्तांत कळला की नाही? फार ऐकण्यासारखा आहे. या भावलनगरात माश्या मारण्याची मोहीम काढण्यात आली. मासे नव्हेत, माश्या! आणि ही मोहीम अगदी युद्धपातळीवरून चालू झाली. दिसेल ती माश्यी मेलीच पाहिजे असा निर्धार या पाठीमागे होता. या जिद्दीने माश्या मारण्यात आल्या आणि नंतर त्या एकत्र करण्यात आल्या. त्यांचे वजन आठ मण भरले. ही माहिती सांगोवांगीही नव्हे. पाकिस्तानचे राज्यमंत्री महंमद यासीन यांनीच सांगितली आहे. अशीच मोहीम कम्युनिस्ट चीननेही क्रांती होऊन राजसत्ता हाती आल्याबरोबर पहिल्याच वर्षी हाती घेतली होती म्हणतात."

Seriously?

"पण उन्हाळा सुरू झाल्याची खरी जाणीव ‘पाहुणा’ या प्रकारामुळे जितकी होते तितकी क्वचितच इतर गोष्टीमुळे होत असेल. पुणे हे मध्यवर्ती शहर वधू-वरांची फार मोठी उतारपेठ असल्यामुळे या दिवसांत पाहुण्यांच्या धाडीच्या धाडी कोसळतात. ढेकूण आणि पाहुणा यांनी प्रत्येक घर भरून जाते. नातेवाईक, इष्टमित्र, सोबती, परिचित, अपरिचित– सगळ्यांनाच कुणा ना कुणाची तरी प्रेमळ आठवण होते आणि मंडळींची एंट्री हळूहळू होऊ लागते. एक पाहुणा जातो न जातो तोच दुसरा दारात पिशवी घेऊन हजर. इतकेच नव्हे तर एक घरात असेपर्यंत दुसरा अवतीर्ण होतो. त्यांच्या आनंदी मुद्रेने आणि किलबिलाटाने घराचे अगदी गोकुळ होऊन जाते. पोराबाळांसहित आलेला एखादा सधेनू व सवत्स पाहुणा असेल तर मग प्रश्नच नाही. कुणी आपल्या बबडीला स्थळ व पोराला प्रेक्षणीय स्थळ दाखवायला येतात. कुणी मुंबईच्या अगर कोल्हापूरच्या वाटेवर विश्रांती म्हणून उतरलेले असतात. ‘म्हटलं बरेच दिवस गाठ नाही. समाचार घेऊन जावं’ हा प्रेमळ मंत्र सगळ्यांच्या मुखी असतो. जेवणाखाण्याचा प्रश्न नसतोच. यजमानापेक्षा पाहुण्यांचाच हात जोरात चालावा यात काही आश्चर्य नाही. ‘काय तुमच्या पुण्याची हवा! छे! जरा हिंडून फिरून आलं की, कडकडून भूक लागते बघा!’ असा अभिप्राय मान डोलवीत व्यक्त होतो आणि आपल्यालाही पुण्याची हवा इतकी चांगली असल्याबद्दल पश्चात्ताप होतो, पण आपल्या पश्चात्तापाबद्दल उपयोग काहीच नसतो. ‘चला पर्वतीवर. पोरांना जरा पर्वती दाखवून आणू.’ असा आपल्याला आग्रह होतो. त्या प्रकारात वेळ आपला जातो आणि भूक पाहुण्यांना लागते. आज सारसबाग, उद्या शनिवारवाडा असे करीत करीत आठवडा हा हा म्हणता खलास होतो आणि पुण्यात इतकी प्रेक्षणीय स्थळं असावीत याचा आपल्याला संताप येऊ लागतो. ... "

This was definitely written not before 1966 June. 

................................................

August 21, 2022 - August 21, 2022. 

अनुक्रम 

झटपट मंत्री व्हा! अर्थात मंत्र्यांसाठी शिक्षण-शिबिर  
माझी व्याख्यानयात्रा  
बापूजींचा आवाज  
माकडांची म्युनिसिपालिटी  
दोन बैलांची सुरस गोष्ट  
माझे माहेर : पंढरपूर  
‘देव आहे काय?’- काही देवांच्या मुलाखती  
पशूंची निषेध सभा- राष्ट्रीय प्राणी ‘सिंह?' छे!  
भारतीय चांद्रयानाचे भ्रमण  
गणपतीची जनतेला विनंती  
यांचाही खून झाला असता!  
बँक राष्ट्रीयीकरण- एक दुखवट्याची सभा!  
मर्‍हाटी मने उचंबळून टाकणारी पंढरीची यात्रा  
राजकीय स्वयंपाकघरातील नवे रुचकर पदार्थ  
पानिपतचे चौथे युद्ध  
माश्यामारी  
एका काँग्रेस कमिटीतील गणेशोत्सव  
‘एप्रिल फूल’चा एक नवा आविष्कार  
पुण्यातील उन्हाळा  
जातीय दंगली : काही विचार  
गणेशोत्सवाविषयी थोडेसे  
लढाईची खुमखुमी  
जीवन : एक क्रीडांगण

REVIEW 

"आमच्या गावात आत्तापर्यंत अनेक शिबिरे आणि वर्ग झाले होते आणि सगळे यशस्वी रीतीने पारही पडले होते. ‘लेखकांचा कारखाना’ तर महिनाभर चालला होता. पोहण्याचे उन्हाळी वर्ग दोन महिने चालले होते. बायकांचा पोहण्याचा वर्ग तर आणखीही काही दिवस चालू ठेवावा अशी बर्‍याच लोकांची मागणी होती. (पण प्रत्यक्षात फक्त पोहणे न शिकलेल्या लठ्ठ बायकाच त्यासाठी उरल्यामुळे तो वर्ग पुढे बंद पडला. ते असो.) हजार पाकक्रियांचाही क्लास कित्येक दिवस घमघमत होता, पण मंत्र्यांसाठी उन्हाळी शिबिर किंवा शिक्षण-वर्ग ही कल्पना नवीन होती. आमचे गाव हे थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे या शिबिरासाठी आमच्या गावाची मुद्दाम निवड करण्यात आली असे समजले. ज्याला मंत्री होण्याची इच्छा असेल किंवा शक्यता असेल त्या मंडळींकडून अर्ज मागविण्यात आले होते व त्यांपैकी काही निवडक लोकांनाच प्रशिक्षण का काय ते देण्यात येणार आहे, अशीही माहिती कळली. सरकारने जर ही गंगा आपल्या दाराशी आणली आहे तर तिचा लाभ न घेणे बावळटपणाचे ठरले असते, म्हणून गावातील अनेकांनी अर्ज केले. त्यात तीन-चार मास्तर, दोन वकील व एक सरकारी नोकरही होता, पण त्या सर्वांचे अर्ज नामंजूर झाले. व्यवसाय या सदरात मी ‘बेकार’ असा शेरा लिहिल्यामुळे माझी निवड मात्र झाली. याशिवाय गावातील दोन पैलवान आणि मंडईतील बागवान गुलाबभाई जमालभाई यांचीही निवड करण्यात आली होती. आय.ए.एस.ची परीक्षा झाल्यावर यशस्वी उमेदवारांना नोकरी ही मिळतेच. त्याप्रमाणे या शिबिरातील शिक्षण पूर्ण झाल्यावर मंत्र्याची नोकरी हमखास मिळणार अशी सर्वत्र बोलवा होती. त्यामुळे आम्ही सर्वजण अतिशय खुशीत होतो."
................................................................................................

"उद्घाटनाचा कार्यक्रम अशा रीतीने उत्साहवर्धक वातावरणात संपल्यावर शिबिराचे खरे कामकाज सुरू झाले. या दैनंदिन कार्यक्रमाचे स्वरूप थोडक्यात असे होते- 

"सकाळी ८ ते १० प्रातर्विधी, स्नान व न्याहारी. नंतर वर्तमानपत्रे व त्यातील फोटो पाहणे. 

"१० ते १२ व्याख्यान 

"१२ ते ४ भोजन, विश्रांती व झोप 

"दुपारी ४ ते ८ प्रात्यक्षिके, व्यायाम, चर्चा व परिसंवाद 

"रात्री ८ ते १० फक्त भोजन 

"१० ते १ करमणुकीचे कार्यक्रम"
................................................................................................

"‘प्रात्यक्षिके आणि व्यायाम’ हा कार्यक्रम तर व्याख्यानापेक्षाही मनोरंजक होता. मंत्र्याने भाषणे कशी द्यावीत याचे एकदा प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. पायाभरणी, भूमिपूजन, उद्घाटन, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, शिक्षण संस्थेस भेट, लहान मुलांना उपदेश, जाहीर सभा या सर्वच प्रसंगी एकच भाषण, पण निरनिराळ्या तर्‍हेने कसे करता येते याचे प्रात्यक्षिक पाहून सारेजण खूश झाले. सभेत उभे कसे राहावे, नमस्कार करताना दोन्ही हात खुबीदारपणे कोपरापासून कसे जुळवावेत, मुद्रेवर हसण्याचा आविर्भाव कशा प्रकारे करावा याचीही प्रात्यक्षिके झाली. मुद्रेवर अखंड हास्य कसे ठेवावे, हे शिकविण्यासाठी मुद्दाम एका नाटक कंपनीतले दिग्दर्शक बोलाविलेले होते. त्यांनी आठ दिवस रोज एक तास याप्रमाणे आम्हाला स्मितहास्याची संथा दिली."
................................................................................................

"‘‘पहिली गोष्ट म्हणजे त्याला ताबडतोब पळविणे आणि अज्ञात ठिकाणी ठेवणे. त्याच्या बायकोने पोलिसांत तक्रार करून पोलीस प्रत्यक्ष चौकशी करेपर्यंत मधे पुष्कळ वेळ जातो. या वेळात पैसा, धाकदपटशा या दोन शस्त्रांनी त्याचे हृदयपरिवर्तन घडवून आणायचे. अगदीच उपाय न चालल्यास त्यालाच मंत्री करण्याचे आश्वासन दिले म्हणजे झाले! हा उपाय बहुतेक लागू पडतो.’’ 

"‘‘आपले सरकार टिकविण्यासाठी काय करावे?’’ 

"‘‘त्यासाठी मुख्य मंत्री खंबीर पाहिजे. त्याने कधीही राजीनामा म्हणून देता उपयोगी नाही. ‘आमचे बहुमत कायमच आहे’ हा ठेका त्याने सतत ठेवला पाहिजे. आपले चार आमदार फुटले असे वाटले तरी त्याने गडबडून जाता कामा नये. याचवेळी विरोधी पक्षाचे सहा आमदार आम्हाला येऊन मिळालेले आहेत असे त्याने ताबडतोब जाहीर केले पाहिजे.’’ 

"‘‘इतके करून पराभव झाला तर?’’ 

"‘‘होता कामा नये. मुख्य म्हणजे विधानसभेची बैठक त्याने लवकर बोलावता उपयोगी नाही. भरली तरी ताबडतोब आरडाओरडा करून त्या गडबडीत विरोधाचा ठराव नापास झाल्याचे जाहीर करता आले पाहिजे. ही अर्थातच अवघड गोष्ट आहे, पण निष्ठेने साधना केल्यास या गोष्टी हळूहळू जमू लागतात. त्यासाठी सभापती आपल्या बाजूचा असल्यास उत्तम.’’ 

"‘‘तरीपण अविश्वासाचा ठराव–’’ 

"‘‘जर मंजूर झाला तरी त्यानं राज्यपालांना भेटून ठरावाच्या कायदेशीरपणाबद्दल शंका व्यक्त करावी. मुख्य म्हणजे हा ठराव संमत झाला तर विधानसभा विसर्जित करून नव्या निवडणुका घेण्याचा सल्ला आपण राज्यपालांना देणार आहोत असे जाहीर करून टाकावे. त्यामुळे बरीच कच्ची पात्रे दबकतात. त्याचा उपयोग होतो.’’ 

"अशा चर्चा खूपच रंगतदार झाल्या. जेवणाच्या कार्यक्रमाच्या वेळीसुद्धा या चर्चा चालत. मोठ्या डिनर-पार्टीच्या वेळी खाता-खाता कसे उद्बोधक भाषण करावे याचाही एक वस्तुपाठच आम्हाला प्रत्यक्ष देण्यात आला."
................................................................................................

" ... निवडणुका आता जवळच आल्या आहेत. बहादुरीचे घोडामैदान अगदी नजीकच आहे. या निवडणुकीत उभे राहून कोणकोणते उमेदवार मंत्री होतात ते आता पाहायचे. ट्रेंड माणसाची गरज दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पुष्कळांना या सुवर्णसंधीचा फायदा मिळेल, ह्या एकमेव आशेवर ट्रेंड मंडळी वाट पाहत आहेत."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 21, 2022 - August 21, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
माझी व्याख्यानयात्रा  
................................................................................................
................................................................................................

" ... एरवी पोटापाण्याच्या धांदलीत किंवा आपल्याच तंद्रीत हा ‘माणूस’ दिवसेंदिवस भेटतच नाही. भेटतात ते नेहमीचे मित्र, व्यवसायातले सहकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील लब्धप्रतिष्ठित मंडळी. त्यांना काही मी (चांगल्या अर्थाने) ‘माणूस’ समजत नाही. खरी माणसे आपणहून घरी क्वचित येतात, पण रेल्वेत, बसच्या धक्काबुक्कीत, जत्रेत, व्याख्यानाच्या ठिकाणी हे प्राणी कळपाकळपाने भेटतात आणि कसे अगदी बरे वाटते! खेड्यापाड्यातून तर यांची वस्ती बहुत. म्हणून खेड्यात जायला मी उत्सुक असतो. मग ते गाव आडवळणी, अगदी गाडीवाटेवरचे असले तर आणखी उत्तम. अशा ठिकाणी तर कोरी करकरीत, निर्मळ, नव्या ब्रँडची ताजीताजी कुरकुरीत माणसे भेटतात. फार मजा वाटते. मराठवाड्यातून अजून अशी गावे शिल्लक आहेत. त्या ठिकाणी जायला रेल्वे आणि मोटार या गोष्टी तर सोडाच, पण पावसाळ्यात बैलगाडीही उपयोगी पडत नाही. पुरुष-दीड पुरुष उंचीचा चिखल सगळीकडे झाल्यावर बैलगाडी तरी कशाला जाईल? अशा ठिकाणी घोडे हेच एकमेव साधन. अशा एका नामांकित पाटलाच्या घोड्यावर बसून मी त्या गावी व्याख्यानाला गेलो आहे. विनोदावर अनेकांनी अनेक व्याख्याने आतापर्यंत दिली असतील, पण घोड्यावर बसून विनोदावर व्याख्यान द्यायला जाणारा वक्ता मीच बहुधा पहिला असेन!"
................................................................................................

" ... सभोवार सगळा काळामिट्ट अंधार. आवतीभोवती देखावाच काय, पण ज्यावर मी बसलो होतो ते घोडेही अखेर दिसेनासे झाले आणि आपण अगदी ‘असाहाय्य, अबला’ वगैरे आहोत असे मला वाटू लागले. मधले खड्डे, टेकाडे, बांध, ताली, ओढे यांचे वर्णन करीत बसत नाही. असा दोन तास प्रवास करून गावाच्या जवळपास आल्यावर जो प्रकार घडला तो खरा अद्भुत! गावाजवळच्या ओढ्याच्या उतारावरून घोडे चालू लागले. तसा ओढा किंवा त्याचा उतार मला दिसत नव्हताच. फक्त घोडे फारच वाकले त्यावरून उतार लागला असावा असा मी तर्क केला इतकेच. त्या उतारावर नेमकी घोड्याच्या पोटाखाली बांधलेली खोगीरगाठ एकदम सुटली आणि खोगीर आणि मी एकदम खाली आलो. खोगीर अंधारात कुठेतरी जवळपास पडले आणि मी मात्र एका मातीच्या उंचवट्यावर दोन-तीन कोलांट्या खाऊन धडपडलो. ‘अरे अरे अरे...’ असा काहीतरी आरडाओरडा केला. त्यामुळे पुढे चालणार्‍या पोराला काहीतरी दगाफटका झाल्याचा संशय आला. सामान ठेवून पळत पळत तो मागे आला. त्याने माझी चौकशी केलीच नाही. आधी घोडे कुठे गेले ते घाबर्‍या-घाबर्‍या पाहिले. त्याचेही खरे होते. मी कुठे पळून जाणे शक्यच नव्हते. घोडे पळून गेले म्हणजे पंचाईत. घोडे जागच्याजागी उभे आहे हे पाहिल्यावर त्याच्या जिवात जीव आला. ... "
................................................................................................

"गावात पोहोचल्यावर तिथले स्थानिक गुरुजी भेटले. व्याख्यानमालेचे ते कार्यवाह होते. त्यांना मी सर्व कथा गंभीरपणे सांगितली तेव्हा ते हसून म्हणाले, ‘‘वा वा! विनोदी भाषणाला पार्श्वभूमी पण विनोदी झाली! झकास!’’

"त्या दिवशी व्याख्यान रात्री होते. व्याख्यानाला सुरुवात करतानाच मी म्हटले, ‘‘आजचं माझं भाषण विनोदावर आहे. त्या भाषणाला पार्श्वभूमी विनोदी झाली असं तुमच्या कार्यवाहांचं मत आहे. माझाही काही मतभेद नाही, पण ही पार्श्वभूमी मघापासून ठणकते आहे एवढीच काय ती तक्रार आहे!...’’"
................................................................................................

"विद्यापीठाच्या बहि:शाल व्याख्यानांसाठी हिंडत असताना आलेले हे अनुभव. या व्याख्यानांचा महत्त्वाचा विशेष म्हणजे श्रोते हा प्रकार जवळजवळ अदृश्यच असतो. अगदी ठार खेडे असले म्हणजे माणसे जमतात. कारण त्यांना दुसरा काहीच उद्योग नसतो आणि कुठेतरी जमायचे हे असतेच! व्याख्यान नसते तरी ही मंडळी कुठेतरी जमलीच असती, पण थोडे मोठे गाव असले की, श्रोत्यांना पाय फुटतात. व्याख्यान ह्या प्रकाराकडे कुणी फिरकत नाही. कार्यकर्त्यांना मोठ्या मुश्किलीने पाच-पन्नास मंडळी धरून आणावी लागतात. त्यात दहा-पाच पोरे आणि चार-दोन कान गेलेले म्हातारे असतात. तरणीताठी, धडधाकट श्रोतेमंडळी एकूण दुर्लभच! चुकून असलेच तर पहिल्या पंधरा-वीस मिनिटांच्या भाषणानंतर एकेकजण गडप होतो. शेवटी पुन्हा म्हातारेकोतारे आणि पोरेच राहतात. श्रोत्यांना बोलावण्याची ही क्रिया वक्ता मोटारीतून खाली स्टँडवर उतरला की सुरू होते. कार्यकर्त्यांबरोबर आपण मुक्कामाला घराकडे जात असतानाच तो रस्त्यात भेटलेल्या माणसाला आणि दुकानदाराला ओरडून सांगतो, ‘‘पाहुणे आलेले आहेत हं. व्याख्यानाला न विसरता या. येणार ना?’’... त्या माणसाचे आपल्याकडे लक्ष असले तर तो सभ्यपणे सांगतो, ‘‘वा वा! अवश्य! तुम्ही व्हा पुढे, आलोच थोड्या वेळात.’’ पण दुकानदार हा प्राणी जरा गाफील असतो. गिर्‍हाईक नावाच्या परमपूज्य दैवताच्या सेवेत तो गुंतलेला असल्यामुळे त्याचे आपल्याकडे लक्ष नसते. एकदा माझ्यासमोरच कार्यकर्त्याने दुकानदाराला आरोळी मारून बोलावले, ‘‘चला भगवानराव! येणार ना व्याख्यानाला?’’ त्याबरोबर भगवानराव शेंगदाण्याची पुडी बांधीत बांधीत तुच्छतेने म्हणाले, ‘‘हॅ:! अरे काय उद्योग नाही का तुम्हाला अन् त्या व्याख्यान देणार्‍याला?... जेव्हा बघावं तेव्हा आपलं व्याख्यान. आपल्याला नाही जमायचं हं. आधीच सांगून ठेवतो.’’ एकदा एका म्हातारबुवांना आवाहन केल्यावर ते रस्त्यातच कार्यकर्त्यांना म्हणाले, ‘‘आता बंद करा तुमची ही व्याख्यानं. तुमच्या त्या व्याख्यानं देणार्‍यांना म्हणावं, यानं काय पोट भरणार आहे आमचं? पोट भरायची काही विद्या असली तर सांगा. उगीच फालतू गोष्टी नको आहेत म्हणावं.’’"
................................................................................................

"असे सगळे असले तरी मी व्याख्यानासाठी पुन्हा जाणारच. रेल्वे, मोटार, बैलगाडी, घोडे... जे वाहन मिळेल त्या वाहनाने जाणारच. परवा नाही का ट्रॅक्टरमध्ये बसून चार मैल आत असलेल्या खेड्यात गेलो होतो? मराठवाड्याच्या काही भागांत अजून उंटावरून वाहतूक चालू आहे. पावसाळ्यात तर उंटाशिवाय अजूनही दुसरे साधन नाही. कितीतरी दिवस मनाशी घोकतो आहे– सगळी वाहने झाली, पण उंट तेवढा राहिला. एकदा उंटावर बसून व्याख्यानासाठी गेले पाहिजे. ‘उंटावरचा शहाणा’ हा शब्दप्रयोग आपल्याला केव्हातरी एकदा खरा करून दाखवला पाहिजे!"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 21, 2022 - August 21, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
बापूजींचा आवाज  
................................................................................................
................................................................................................

"हे गांधींच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. महात्मा गांधींचा गौरव करण्यासाठी सरकारने अनेक कार्यक्रम चालू केले आहेत. नभोवाणीवर शुक्रवारी होणारे कार्यक्रम आपल्याला (न ऐकून) ठाऊकच आहेत. बापूजींचे चित्र नोटांवर छापल्यामुळे श्रीमंतांपासून गोरगरिबांपर्यंत बापूंची प्रतिमा नेऊन पोहोचवली आहे. व्याख्याने, चर्चा, परिसंवाद यांचा तर पाऊस पडतो आहे.

"सरकारने आणखी एक सोय केलेली तुम्हाला ठाऊक आहे काय? नव्या दिल्लीत बापूजींचा आवाज ऐकू येईल अशी एक खास व्यवस्था झाली आहे. तुम्ही एक विशिष्ट क्रमांक फोनवर फिरविलात की, गांधींच्या भाषणाची रेकॉर्ड तुम्हाला ऐकू येते. केव्हाही हा फोन-नंबर फिरविलात की, बापूंचे भाषण ऐकू येण्याची उत्तम सरकारी सोय अशा रीतीने झालेली आहे."

And then Mirasdar takes off, with a conversation between a minister - and Gandhi at the other end. 
................................................................................................

"बापूजी रागावलेले दिसत होते. बाटलीवाला साहेबांना एकदम घाम फुटला. कुठून ही दुर्बुद्धी झाली आणि आपण हा फोन केला असे त्यांना झाले. गांधीजी मरण पावले आहेत याबद्दल त्यांची खात्री होती. आता इतक्या वर्षांनी ते कसे काय उपटले हे त्यांना कळेना. सहज गंमत म्हणून आपण काहीतरी करायला गेलो अन् ही नसती बिलामत अंगावर ओढून घेतली, असे त्यांना वाटू लागले. त्यांच्या पोटात एकदम गोळाच उठला. 

"‘‘बापूजी, तुम्ही जिवंत कसे?’’ त्यांनी चाचरत चाचरत विचारले, ‘‘का तुम्ही स्वर्गातून बोलता आहात?’’ 

"‘‘इतके दिवस होतो मी स्वर्गात. कंटाळा आला. म्हटलं, काय काय चाललंय देशात पाहून यावं. म्हणून मुद्दाम आलो. ... "
................................................................................................

Western authors often refer to hypocrisy of modern era of last few centuries with an assertion about what the king of Jews would encounter on his coming; from non-recognition, almost always assumed, to further disappointments and much worse, various scenarios have been portrayed by different authors. 

Mirasdar replaces him with Gandhi, here. 

But not without mentioning him explicitly, and in a wry turn of humour that has the stymied man returned from heaven exclaim about now having comprehended why his philosophy was a failure in Maharashtra. 
................................................................................................

"‘‘एक कडवं म्हणून दाखवू? फारच उत्कृष्ट आहे.’’ 

"‘‘नको नको–’’ त्या टोकाहून घाबरल्यासारखा आवाज आला. 

"‘‘नको काय बापूजी? पुन्हा असा योग यायचा नाही. ऐकाच तुम्ही.’’ 

"तिकडून काहीच आवाज आला नाही. तोच मूक होकार आहे, असे समजून टोणगे गुरुजींनी आपल्या दणदणीत आवाजात कविता म्हणण्यास सुरुवात केली. 

"हे दु:ख कशाने मापू! 
"बापू, तुज कोठे छापू?। 

"जगि सत्य अहिंसेचा । 
"हा एकचि पालनवाला । 
"त्या थोर येशू ख्रिस्ताचा । 
"हा दुसरा बापचि झाला । 

"संदेश शांती-प्रेमाचा । 
"चालला देत जनतेला । 

"तो जानेवारी महिना 
"तारीख तीसची दैना 
"आकांत जगी माईना  
"सर्वांग लागले कापू । 
"बापू, तुज कोठे छापू?।

"कविता संपल्यावर गुरुजी उत्साहाने म्हणाले, ‘‘बापूजी, कशी काय वाटली कविता?’’ 

"बराच वेळ काही उत्तरच आले नाही. गुरुजींनी पुन्हा पुन्हा प्रश्न विचारला. तेव्हा एकदम भानावर आलेला मनुष्य जसा खडबडून जागा होऊन बोलतो तसा आवाज आला. 

"‘‘अं?... उत्तम आहे! माझं तत्त्वज्ञान महाराष्ट्रात का रुजलं नाही याचं एक कारण मला आज समजलं. धन्यवाद!’’
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 21, 2022 - August 21, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
माकडांची म्युनिसिपालिटी  
................................................................................................
................................................................................................

"आगगाडीबरोबर प्रवास करीत करीत मल्लप्पा एका लांब शहरात जाऊन पोहोचला. तिथे त्याने खूपच धमाल उडवून दिली. तो रोज एका इमारतीच्या उंच छपरावर चढून गोंधळ घाली. एकदा आपल्या गोंधळापेक्षाही मोठा गोंधळ खाली इमारतीत चाललेला पाहून त्याला आश्चर्य वाटले. छपराचे एक कौल उचकटून त्याने खाली डोकावून पाहिले, तो एका मोठ्या सभागृहात पन्नास-साठ माणसे खुर्चीवर बसून आरडाओरडा करीत होती. काही वेळाने त्यांच्यापैकी तिघाचौघांनी खुर्चीवरून टणटण उड्या मारल्या. काहींनी आपल्या खुर्च्या उचलून दुसर्‍यांच्या टाळक्यात घातल्या. काही जणांनी हाताच्या मुठी वळवून वेडावाकडा नाच केला. असा प्रकार तिथं बराच वेळ चालला होता."
................................................................................................

"‘‘पुढं काय? काही माकडांनी निवडणुकीला उभं राहायचं, बाकीच्यांनी आपली मतं त्याला द्यायची.’’ 

"‘‘मत म्हणजे? पेरू की जांभळं? अन् सगळी मतं घेऊन ते एकटं खाणार की काय? हे नाही बाबा चालायचं हां.’’ 

"माकडांचा हा मूर्खपणा पाहून मल्लप्पा अगदी चिडून गेला. त्याने धमकी देऊन सगळ्यांना प्रथम शांत बसविले. मग हळूहळू निवडणूक, मतदान, लोकांचे प्रतिनिधी, कारभार इत्यादी गोष्टींसंबंधी सविस्तर माहिती समजावून दिली. माकडांना ही माहिती मोठी अद्भुत वाटली. आजपर्यंत त्यांनी आपापसांत अनेक मारामार्‍या केल्या होत्या, पण इतका पद्धतशीर मनोरंजक खेळ आपण यापूर्वी कधीच पाहिला नाही असे वृद्ध माकडांनी शपथेवर सांगितले. सगळ्यांना ही नवी मारामारीची कल्पना अत्यंत पसंत पडली. आपल्या या माकडांच्या राज्यातही म्युनिसिपालटी सुरू करायची असे शेवटी एकमताने ठरले."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 21, 2022 - August 21, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
दोन बैलांची सुरस गोष्ट  
................................................................................................
................................................................................................

One has to wonder if this was written before or after the president was Giri instead of Reddy. 
................................................................................................

"एका गावात एक खिलारी बैलजोडी होती. अक्कडबाज शिंगे, थोराड अंग आणि झुपकेदार शेपट्या यामुळे ही बैलजोडी गावात अंजिक्य झाली होती. एका बैलाचे नाव होते ‘शिंडक्या.’ तो जरा वयस्कर होता. दुसरा वळू त्या मानानं जरा तरणा होता. त्याचे नाव ‘इंडक्या.’ शिंडक्या-इंडक्याची ही जोडी महाधूर्त होती. त्यांचे आपसांत मुळीच बरे नव्हते, पण ‘एकी हेच बळ’ हे सूत्र त्यांना पाठ होते. रानात मालकाच्या शेतात काम करताना दोघांचे कामापेक्षा चरण्याचे काम चाले. सुगीच्या दिवसांत तर कामापेक्षा खाण्याचीच चटक त्यांना लागलेली होती, पण आपण दोघे मिळून खातो आहोत म्हणूनच आपल्याला पोटभर खायला मिळते हे त्या दोघांच्याही मनात पक्के रुजलेले होते.

"शेतात नाना प्रकारची पिके होती. गवत होते. पाणी होते. आसपासची जनावरे आशाळभूतपणाने भोवती गोळा होऊन बघत उभी राहत, पण शेतात घुसण्याचे धैर्य कोणाला होत नसे. कुणी तसा प्रयत्न केलाच तर शिंडक्या-इंडक्या दोघेही मिळून त्याच्यावर तुटून पडत. मग त्याला जिवाच्या भीतीने धूम पळावे लागे.
................................................................................................

"एके दिवशी काय गंमत झाली बरे का, एक कोल्हा आणि एक गाढव यांची गाठभेट शहराच्या मरीआईच्या देवळापाशी झाली. दोघेही मरीआईचे भक्त. म्हणजे एका पार्टीतलेच म्हणाना. फक्त कोल्हा हा जास्त लुच्चा म्हणून त्याला ‘डावा भक्त’ म्हणत. गाढव हा जास्ती मूर्ख असल्यामुळे त्याला ‘उजवा भक्त’ म्हणत. इतकाच काय तो फरक. बाकी बदमाशी, द्रोह, स्वार्थ इत्यादी महान गुण उभयतांत सारखेच होते. तर सांगायची गोष्ट अशी की, दोघांची गाठ पडली आणि गप्पा सुरू झाल्या. शेतातला माल आपल्याला खायला मिळत नाही, याबद्दल दोघांनीही खंत व्यक्त केली. याबाबत काही उपाययोजना करावी यावरही बोलणे निघाले.
................................................................................................

"‘‘उपाय तूच शोधून काढ. तू कोल्हा आहेस. धूर्तपणा आणि बदमाषी हा तुझ्या पार्टीचा परंपरागत वारसा आहे. काय वाट्टेल ते कर, पण या दोघांत फस्कलास फूट पाड.’’ 

"‘‘समजा फूट पडली तरी त्याचा फायदा घ्यायला सिंह कुठं आहे? मग या टोणग्यांना मारणार कोण?... आपली काही ती ताकद नाही,’’ कोल्ह्यानं शंका काढली. थोडा वेळ विचार केला. नंतर तो म्हणाला, ‘‘तथापि मला एक युक्ती सुचली आहे–’’ 

"‘‘ती कोणती? दोघांनाही लाथांचा प्रसाद द्यायचा आहे का? हा पहा मी तयार आहे–’’ गाढव पाठीमागचे दोन्ही खूर हवेत उंच उडवून म्हणाले. थोडीशी धूळ उडालीही."
................................................................................................

"चरता-चरता बैलजोडीतला इंडक्या शेताच्या बांधाकडे एकटाच आला होता. कोल्हा लुटुलुटु चालत त्याच्याकडे गेला. कुर्निसात करून म्हणाला, ‘‘काय इंडकेसाहेब, आज बांधाकडे चरत आलात? शिंडक्या तुम्हाला पोटभर खायला मिळू देत नाही म्हणतात ते खरंच आहे म्हणायचं!’’ 

"इंडक्याचे कोल्ह्याच्या शहाणपणाबद्दल बरे मत होते. रानातल्या गोरगरीब प्राण्यांचा त्याला कळवळा आहे, असेही त्याला वाटत होते. तरी पण कोल्ह्याचे हे बोलणे ऐकून तो डाफरला–"
................................................................................................

"‘‘खरी एकी म्हणजे काय?’’ 

"कोल्ह्याने या शंकेचे खुलासेवार उत्तर दिले. आपल्या पार्टीचा असला तरी त्याच्याशी बेकीने वागून त्याची जिरवण्यासाठी दुसर्‍याची मदत घेणे यालाच ‘खरी एकी’ म्हणतात असे त्याने सांगितले. शिंडक्या पक्का धूर्त. तेव्हा त्याला हाणून पाडण्यासाठी गाढव, कोल्हा, लांडगा इत्यादी समान विचारांच्या प्राण्यांशी संगनमत करणे हीच खर्‍या अर्थाने एकी म्हणता येईल, असे त्याचे मत पडले. एका विचाराच्या प्राण्यांचे ध्रुवीकरण होणे कसे आवश्यक आहे, याची त्याने बरीच तात्त्विक चर्चा केली."
................................................................................................

" ... इंडक्या बिथरला. आधीच त्याचे डोके हलके होते. डोक्यापेक्षा शिंगांचाच भाग मोठा होता. त्यातून ही चिथावणी. मग काय विचारता महाराज!... कोल्ह्याच्या प्रत्येक बोलण्याला तो शिंगे हलवू लागला. लांब नाकाच्या कोल्होबाने मग हळूच शिंडक्याला कसे खायला जास्त लागते आणि म्हातारा झाला असूनही त्याचा हावरेपणा कसा गेलेला नाही, याचे रसभरीत वर्णन ऐकवले. मालकाचा डोळा चुकवून आपण सगळेच थोडे थोडे खाऊ या, हा मुद्दा इंडक्याला पटला. याच्या भरीला रानातल्या उपाशी प्राण्यांचे हृदयद्रावक वर्णन. मग काय, इंडक्याच्या (भरलेल्या) पोटाला एकदम पीळ पडला. डरकाळी फोडून तो म्हणाला, ‘‘असं काय! मग आता दाखवतोच हिसका त्या शिंडक्याला. म्हातारा झाला तरी साल्याला खायची इच्छा अजून आहेच अं! थांब, ओढ्याकाठच्या लुसलुशीत गवताचा एरिया तुझ्याकडून काढूनच घेतो. काय करतोस बघू.’’ 

"कोल्ह्याचे आणि गाढवाचे काम झाले!"
................................................................................................

"एकीसाठी शिंडक्या आपणहून गोठ्यात जाऊन बसला. अशा रीतीने एकीचाच शेवटी विजय झाला. इंडक्या आता रानात एकटाच फिरतो. वाटेल ते खातो. कोल्हा, गाढव, लांडगा सगळे त्याच्या मागून हिंडत-हिंडत पोटभर चरतात. सगळे चैन करतात. 

"हल्ली ऊस कडाकडा फोडताना कोल्हा डोळे मिचकावून गाढवाला म्हणतो– ‘‘शिंडक्या मरायलाच टेकला आहे. फिफ्टी पर्सेंट काम झालंच आहे. चार दिवस इंडक्याला चरू दे पोटभर. मग मात्र आपण सिंहाला बोलावू. तो चुटकीसरशी याचा निकाल लावील. मग सबंध रान आपल्यासाठी मोकळं! हां: हां:!’’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 21, 2022 - August 21, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
माझे माहेर : पंढरपूर  
................................................................................................
................................................................................................

Mirasdar describes what amounts to an equivalent for Maharashtra of what's Kashi for all of India.
................................................................................................

"मुंबई-मद्रास रेल्वेमार्गावर, सोलापूर जिल्ह्यात कुर्डुवाडी नावाचे स्टेशन आहे. या स्टेशनावर उतरून आपण बाहेरच्या बाजूला आलो की, इवल्याशा रुळांवर उभी असलेली एक छोटीशी गाडी दृष्टीस पडते. काड्याच्या पेटीसारखे तिचे डबे पाहिले म्हणजे या डब्यात आपल्याला आत शिरता येईल की नाही याची धास्ती वाटते, पण तेवढ्यात ‘पुंडलिक वरदा हाऽरि विठ्ठल’चा गजर ऐकू येतो. आपण निरखून पाहतो. मग ध्यानात येते की, डब्यात माणसे प्रत्यक्ष बसलेली आहेत आणि त्यांच्या तोंडूनच हे सुस्वर ध्वनी उमटत आहेत. आता आत बसायला हरकत नाही अशी आपली खात्री होते. आत जाऊन बसलो तरी गाडी लवकर सुरूच होत नाही. ओव्हरलोड झाल्यामुळे गाडी ढकलावी लागणार की काय, अशी दाट शंका येऊ लागते, पण तेवढ्यात गाडी हलते. खरोखरीच हलू लागते. मग दोन-अडीच तासांत बत्तीस मैलांचे लांबलचक अंतर तोडून गाडी चंद्रभागेवरील विलिंग्डन पुलावर येते. या ठिकाणी आल्यावर एक प्रदीर्घ शीळ वाजवण्याचा या गाडीचा रिवाज आहे. ती शीळ ऐकू आली की, आपण दचकतो. खिडकीबाहेर बावरून इकडेतिकडे पाहू लागतो. चंद्राकार वळण घेतलेली चंद्रभागा नदी दृष्टीस पडते. तिच्या काठचे मोठे ‘वाळवंट’ दिसू लागते. दुरून देवालयाची शिखरे सकाळच्या सोनेरी उन्हात चमकताना दृष्टीस पडतात. गाव नजरेस पडू लागते आणि हां हां म्हणता पंढरपूरच येते. हेच ते पंढरपूर बरे! युगे अठ्ठावीस कर कटीवर ठेवून आपल्या भक्तांना भवसागर कमरेइतकाच खोल आहे असे सांगणारा विठोबा जिथे उभा आहे, तीच ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेली दिव्य नगरी!"
................................................................................................

"विठोबा हा या गावाचा आधार. त्याच्या देवळाभोवती जुने पंढरपूर वसलेले आहे. वर्षामागून वर्षे गेली. पारतंत्र्य आले आणि गेले. जगात केवढे तरी बदल झाले. आठ वर्षांचा मी अडतीस वर्षांचा झालो, पण हे जुने पंढरपूर अजून आहे तसेच आहे. या जुन्या पंढरपुरात फक्त घरे आहेत. रस्ते नाहीत. दोन घरांच्या मधल्या रिकाम्या जागेलाच ‘रस्ता’ अशी इथे संज्ञा आहे. यालाच सरळ भाषेत ‘बोळ’ असे नाव आहे. पंढरपुराला हा बोळांचा चक्रव्यूह ज्याने आपल्या डोळ्यांनी पाहिला नसेल तो माणूस खरोखरीच अभागी. फूट-दीड फूट रुंदीपासून पाच फुटांपर्यंत आणि पाच फूट लांबीपासून शंभर-दोनशे फुटांपर्यंत या बोळांची लांबी-रुंदी आहे. या बोळात एकदा माणूस घुसला की, कुठून कुठे निघेल हे नक्की सांगणे अशक्य. जवळचा माणूस या बोळात अडकला की, संध्याकाळपर्यंत तो घरी पोहोचला तरी पुष्कळ. जिथे बोळ संपलेला आहे असे वाटावे तिथे नक्की पुढे जाण्यासाठी वाट आणि पुढे वाट आहे म्हणून जावे तो कुठल्या तरी घराच्या पाठीमागच्या न्हाणीघरात त्याचा शेवट, हा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. राजसूय यज्ञाच्या वेळी मयासुराने मायानगरी निर्माण केली होती, अशी महाभारतात आख्यायिका आहे. पाणी आहे असे वाटावे तिथे जमीन असावी आणि जमीन आहे म्हणून पुढे पाय टाकावा तर तो पाण्यात पडावा, अशी त्याची अद्भुत रचना होती म्हणून सांगतात. त्यापासून स्फूर्ती घेऊनच या बोळांची रचना झाली असावी. हा आपला अंदाज. कदाचित इथली रचना पाहून मयासुराला मयनगरीची कल्पना सुचली असेल! नक्की कोणी सांगावे? अजूनही हे वैभव पंढरीत दृष्टीस पडते आणि गावाला ‘म्युनिसिपालिटी’ असल्यामुळे ते अनंत काळपर्यंत टिकून राहील यात शंका वाटत नाही."
................................................................................................

"पंढरपूर गावात इतर गावांप्रमाणेच अठरापगड जातीची वस्ती आहे. मुसलमान आहे, रेल्वेमुळे थोडेफार ख्रिश्चन आहेत. आता सिंधी आले आहेत, पण गावाचा तोंडवळा ब्राह्मणी आहे. बडवे, उत्पात, सेवाधारी, यजमानकृत्य करणारे, पेन्शनर यांची दाटी असल्यामुळे ब्राह्मण वस्ती भरपूर. त्यामुळे गावाचा चेहरामोहराही ब्राह्मणी असावा यात नवल नाही. पाटील हा प्राणी सामान्यत: मराठा; पण पंढरपूरचा पाटीलही ब्राह्मणच. त्यामुळे सोवळे-ओवळे, नैवेद्य, पीतांबर, कद, श्रावणी, स्नानसंध्या इत्यादी गोष्टींची अजून चलती आहे. चित्पावन, कर्‍हाडे हा प्रकार बेताबेताचा. देशस्थ समाज भरपूर. त्यामुळे देशस्थ-कोकणस्थ हा संकुचित वाद आमच्या गावी फारसा नाही. येथे मारामार्‍या सगळ्या ‘ऋग्वेदी श्रेष्ठ की यजुर्वेदी?’ यासंबंधीच्या. श्राद्ध, पक्ष, पारणे, जेवणावळी हे प्रकार नित्याचे. बुंदीचा लाडू, जिलेबी, पुरणपोळी याचे येथे कोणाला कौतुक नाही. पूर्वी समृद्धी होती. त्यावेळी तर अजब मामला होता. रोज कुणीतरी दाता भेटे आणि तो ब्राह्मणभोजन घाली. देवळात मोठमोठ्या पंक्ती झडत, बुंदीचे लाडू एकमेकाला फेकून मारण्याचे प्रकार हमेशा चालत. धिप्पाड, दैत्यासारखे दिसणारे ब्राह्मण आता तुरळकच, पण पाच-पन्नास वर्षांपूर्वीची पिढी कशी असेल याची अजून कल्पना येते.
................................................................................................

"आषाढी-कार्तिकी या दोन मुख्य यात्रा. त्याखालोखाल चैत्री आणि माघी. शिवाय चतुर्मास आहे, अधिक महिना आहे. संक्रांत, पाडवा आहे. दिवाळीच्या दिवसांतल्या टेंपररी वार्‍या आहेत. सगळे गाव या यात्रेवर जगणारे. एरवी सगळीकडे शुकशुकाट. निवांत कारभार. सकाळी नऊ-साडेनऊच्या पुढे दुकाने उघडतात. फळ्या-फळ्यांवरून चकाट्या पिटण्याचा उत्साहवर्धक कार्यक्रम ठायीठायी दृष्टीस पडतो. कुणालाच कसलीही गडबड, धांदल नसते. ‘निवांत’ हा परवलीचा शब्द. फळीवर बसलेला एकजण जाणार्‍याला विचारतो, ‘‘काय देवा, कसं काय?’’ 

"त्यावर तो हसतमुखाने म्हणतो– 

"‘‘निवांत... तुम्ही?’’ 

"‘‘आम्ही पण निवांत.’’ 

"‘‘मग झकास!’’"
................................................................................................

"संध्याकाळी वाळवंटात बसलो म्हणजे अजूनही जुन्या आठवणी येतात. लहानपणी आम्ही पोरेसोरे तालमीत बसून नारळ, कवठात दारू कुचत बसायचो. दिवाळीच्या आधी कित्येक दिवस हे काम चाले. मग लढाई पाहायला जी मजा वाटत असे ती काही निराळीच. उंच ठिकाणी, घाटावर बसून लढाई पाहण्यापेक्षा तालीमबाज मंडळींच्या समवेत आघाडीवर उभे राहून लढाई पाहण्यात काय ‘थ्रिल’ होते म्हणता!... एकदा तर फारच मजा झाली. या लढाईच्या दिवसांत आम्ही दोघे-चौघे मित्र वाळवंटात गप्पा मारीत बसलो होतो. हळूहळू अंधार झाला. चांगला काळोख पडला. गप्पा अशा रंगलेल्या की, किती वाजले हे कळलेच नाही. हळूहळू माणसे जमल्याचे लक्षात आले, पण आम्हाला त्याचे भानच राहिले नव्हते आणि एकदम लढाई सुरू झाली. आम्ही दोन्ही बाजूच्या बरोबर मध्यावर बसलेलो. सगळीकडून कवठ, नारळ पेटल्याबरोबर दचकलो. ते अग्निबाण भराभर अंगावर येऊ लागले आणि आमची पळता भुई थोडी झाली!
................................................................................................

"कुणाला खरे वाटेल की नाही कोण जाणे, पण आमचे गाव म्हणजे एक आदर्श तीर्थक्षेत्र आहे. इथे घरांपेक्षा मठ अधिक. शहाण्या लोकांपेक्षा वेडे अधिक. (आणि सुवासिनींपेक्षा सोवळ्या बाया अधिक असाही बोभाटा आहे.) गावाच्या लोकांपेक्षा परगावचे अधिक, असे हे चमत्कारिक गाव आहे. गाव नव्हेच, एक प्रचंड कोडे. लहानसे शहर म्हणण्यापेक्षा मोठे खेडे असे वाटणारे हे गाव खरोखरीच एक मोठे कोडे आहे. उभे-आडवे एक मोठे पसरलेले कोडेच! मला तरी दुसरा शब्दच सुचत नाही. सगळ्या महाराष्ट्रातल्या महाराज मंडळींचे, संस्थानाधिपतींचे मठ आणि वाडे यांचीच संख्या इथे अधिक आहे. या मठांतून, वाड्यांतून त्या-त्या भागातले लोक वर्षानुवर्षे राहतात. चतुर्मासात सगळ्या महाराजांचा मुक्काम परिवारासह इथे असतो. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण... सगळीकडून ही मंडळी येतात. यात्रेत तर हे मठ ‘हाऊसफुल्ल’ असतात. त्यामुळे सच्च्या पंढरपूरकराला मायबोली मराठीच्या सगळ्या छटा उपजत ठाऊक आहेत. कुणी कोणत्याही बोलीत बोलले तरी पंढपूरकराला ती उमगली नाही असे कधी होणारच नाही. इथली दुकानदार मंडळी त्या-त्या बोलीत गिर्‍हाइकाशी सहज बोलतील. इतकेच नव्हे तर उच्चारावरून हा बोल परभणीचा का धुळ्याचा, नगरचा का नागपूर-वर्ध्याचा हे बरोबर ओळखतील. मायबोलीच्या सगळ्या छटांचे इथे कायमचे संमेलन भरलेले दिसेल आणि संयुक्त महाराष्ट्राचे व्यापक दर्शन सहजगत्या घडून जाईल. या वातावरणाचा नकळत फायदा मला कितीतरी झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, सातारा, कोल्हापूर यावरचे प्रादेशिक वाङ्मय मी सहज वाचू शकतो. त्यातले संवाद योग्य अर्थासह, उच्चारासह बोलून दाखवू शकतो. एखाददुसरा शब्द सोडला तर मला ते दुर्बोध कधीच वाटले नाही. माझ्या गावचे माझ्यावर हे अनंत उपकार आहेत.
................................................................................................

"आमचे गाव तसे दरिद्रीच आहे. या दारिद्र्याचे सोंग करणारेही आहेत. स्वत: कमावून खाण्यापेक्षा कुणी दाता भेटतो का इकडे बहुतेकांचे लक्ष आणि क्षेत्र असल्यामुळे दाते भेटतातही. रोज कुणी ना कुणी नवा माणूस येतो. पैसे वाटतो, दाने देतो, जेवणावळी घालतो. कालमानाने हे सगळे खूपच कमी झाले आहे, पण अजूनही त्यांच्या खाणाखुणा दिसतातच. कुणी कितीही रिकामटेकडा आणि निरुद्योगी असो, त्याला जेवायला मिळण्याची पंचाईत पडत नाही. निदान ब्राह्मणांना तरी नाही. त्यामुळे अशा रिकामटेकड्या आळशी लोकांची संख्या भरपूर. काही मंडळी पाळतीवरच असतात. मंडईत सकाळच्या वेळी पान-तंबाखू खात, विड्या ओढीत तळ ठोकायचा. केळीची पाने, पत्रावळी कोण घेतो इकडे लक्ष. तसे गिर्‍हाईक दिसले की, चाललेच हे त्याच्या मागोमाग. एकदा घर पाहून ठेवायचे. मग दुपारी बारा वाजता बरोबर त्या घरात हजर. अंगणात उभे राहून दोन्ही हात जोडून नम्रतेने सांगायचे, 

"‘‘दुपारची वेळ आहे, ब्राह्मण उपाशी आहे. जेवायची सोय झाली तर बरं होईल.’’ की काम झालेच म्हणून समजा! घरातला यजमान चरफडेल, आदळआपट करील; पण त्याला जेवायला घातल्याशिवाय राहणार नाही. असा एकंदरीत प्रकार असल्यामुळे रिकामटेकडी मंडळी नेमकी इथे गोळा होतात. आसपासच्या भागातले वेडे इथे कायमचे येऊन राहतात. ते येतात म्हणण्यापेक्षा त्यांचे नातेवाईक त्यांना इथे आणून सोडतात, हेच जास्त बरोबर. ‘क्षेत्राच्या ठिकाणी सगळे जगतात’ या विश्वासाने हा उद्योग चालतो. त्यामुळे दर आठ-पंधरा दिवसांनी पंढरपुरात नवा वेडा दिसायचाच. मला चांगले आठवते, लहानपणी तो आमचा एक नित्याचा धंदा असे. नवा वेडा दिसला रे दिसला की, त्याच्या पाठीमागे लागायचे. हातात धोंडा घेऊन चिडून आमच्या अंगावर धावून येईपर्यंत त्याचा पिच्छा पुरवायचा. पोरांचा घोळकाच्या घोळका मागे लागायचा. अशाने एखाद्याचे डोके थोडेसे फिरलेले असेल तर सबंध फिरून जायचे.., पण पोरांना त्याचे काय? या वेड्यांतही तर्‍हातर्‍हा असत. एक स्वारी दिगंबर अवस्थेतच पाच-पंचवीस वर्षे हिंडत होती. या एवढ्या अवधीत चुकून एकही शब्द त्याने कधी उच्चारला नाही. तसा तो अगदी निरूपद्रवी होता. लोक त्याला महाराज म्हणत आणि पायाही पडत. खाण्यापिण्याची पंचाईत त्याला कधीच पडली नाही. दुसरे एक रत्न वारकरी होते. तोंडाने ‘विठ्ठल विठ्ठल’ करीत खांद्यावर पताका घेऊन प्रदक्षिणेच्या रस्त्यावर सारखे पळत सुटलेले असायचे. तिसरी स्वारी यमकावर यमके जुळवून कविता बडबडत हिंडत असे. एक ब्राह्मणाची बाई खुशाल रस्त्यात कुणालाही अडवायची आणि त्याला पैसे मागायची. दिले तर ठीक, नाहीतर ही आदिमाया कोणता प्रसंग आणेल याची सगळ्यांना भीती वाटायची. भर रस्त्यात ती कुणाचा हात धरील किंवा लडिवाळपणे मिठी मारील याचा नेम नसे. यमी नावाची एक पोरगी लहानपणापासून वेडी होती. डोक्याचे केस फिस्कारलेले आणि अंगात एक पायघोळ फ्रॉक अशा अवतारात ती हिंडत-फिरत असे. चार-दोन वर्षांनी ती गरोदर असल्याचे ध्यानात येई. ते दृश्य पाहिले की, त्या लहान वयातही आम्हाला कसल्या तरी अनामिक विचाराने घृणा येई. काही उद्योग नसला की, असे एक-दोन वेडे हाताशी धरून त्यांच्याशी प्रेमळ सुखसंवाद करीत बसणे हा या गावातल्या मंडळींचा नेहमीचा आवडता उद्योग."
................................................................................................

" ... कितीतरी लहानमोठी माणसे काळाच्या पडद्याआड गेली. त्यांच्या आठवणींनी मन अस्वस्थ होते. गाव आहे तसेच आहे; पण पुष्कळ बदलले आहे. जुने चेहरे वरचेवर कमी दिसाताहेत. नवी आपल्याला न ओळखणारी तोंडे वाढताहेत. अरेतुरे म्हणणारी माणसे कमी होऊ लागली आहेत, अहोजाहोचे प्रमाण वाढले आहे. गाव आहे तसेच आहे, पण पुष्कळ बदललेले आहे. दिवसेंदिवस माझ्यापासून दूर जाते आहे, पण तरीही माझी तिकडची ओढ काही कमी होत नाही. अजूनही मी जातोच बरे का! कुणी मला ओळखो न ओळखो, मी आपल्या गावी जातो. सगळीकडे हिंडतो. उदासीनतेचे विलक्षण दुखरे सुख अनुभवतो. कदाचित माझ्या या गावात आणखीही बदल होतील. होईनात! मी पंढरपूरला नियमाने जातच राहणार, कारण कितीही झाले तरी ते माझे विरंगुळ्याचे ठिकाण आहे. माझे माहेर आहे!"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 21, 2022 - August 21, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
‘देव आहे काय?’- काही देवांच्या मुलाखती  
................................................................................................
................................................................................................

Mirasdar wrote this as a witty commentary on the then current state of affairs as understood by most. 

One would have wished it were better written, avoiding inappropriate terms. 

But then Mirasdar had no clue about how true certain parts were. Especially when he speaks of an aspect or form of the Mother Goddess - well, She wasn't the then PM as Mirasdar sarcastically says, but She certainly was the power helping Divine Victory in 1971; the then PM, in fact, didn't use the power given by Divine Mother for the purpose, not to the extent given and intended by the Divine Mother, falling short due to earthly considerations. 
................................................................................................

"परवा आपल्या लोकसभेत ‘ईश्वर’ आहे की नाही, यावर एक फार उद्बोधक चर्चा झाली. सभासदांनी ईश्वराला स्मरून शपथ घ्यायची असते, पण ईश्वर आहे किंवा नाही हेच जर नक्की नाही, तर त्याची शपथ कशी घ्यायची? नसलेल्या नवर्‍याच्या नावाने मंगळसूत्र बांधण्याचाच हा प्रकार! संयुक्त समाजवादी पक्षाचे एक विद्वान सभासद शिवचंद झा यांनी हा ‘पॉर्इंट’ बरोबर उकरून काढला. (समाजवादी मंडळी उकरा-उकरीत एकूण फार तरबेज. असो.) देव ही चीज अस्तित्वातच नसल्यामुळे हे शब्द गाळून टाकावेत, अशी त्यांनी मागणी केली. शेवटी मतदान होऊन अखेर देवाच्या बाजूने बहुसंख्य सभासदांनी मतदान केल्यामुळे देवाची स्वारी थोडक्यात बचावली, पण या सर्व प्रकारामुळे स्वर्गात फारच खळबळ उडाली. अनेक देव अस्वस्थ झाले. या निमित्ताने आम्ही त्यांच्या ज्या मुलाखती घेतल्या, त्याचाच वृत्तांत थोडक्यात पुढे दिला आहे."
................................................................................................

"‘‘आमचं अस्तित्व आहे की नाही हा प्रश्नच उपस्थित होऊ शकत नाही. गेली लाखो वर्षे आम्ही आहोत आणि पुढंही राहणार आहोत, तरी पण तुम्हा मानवांच्या समाधानासाठी आम्ही थोडा पुरावा देतो. आम्ही नसतो तर या तुमच्या जगात केवळ पापंच घडत राहिली असती. मधूनमधून पुण्यकृत्यं होतात, साधुसंत जन्माला येतात, ते का? साधुसंतांचा छळ होतो, चोरांचं फावतं, लुच्च्या आणि स्वार्थी माणसांचे राज्य होते आणि अखेरीस त्यांचा बीमोड होतो तो कसा? आम्ही आहोत म्हणूनच ना? परवाचीच गोष्ट घ्या. या इंडिकेटवाल्यांनी सगळी काँग्रेस घशात घातली. हातातल्या सत्तेचा कसाही उपयोग केला, पण फत्तेसिंग गायकवाड फुटून त्यांचे थोबाड थोडेतरी फुटलेच की नाही? आता बड्याबड्या पुढार्‍यांची गोष्ट घ्या. सगळे लुच्चे बघता-बघता इंडिकेटवादी झाले. लवकरच त्यांनाही त्यांच्या कृत्याचं फळ मिळेल. ज्याअर्थी या जगात लबाडांना शिक्षा होते, त्याअर्थी आम्ही आहोत! कारण आम्ही म्हणजेच सत्य आणि मूर्तिमंत न्याय.’’  

"‘‘पण भगवान कम्युनिस्ट भार्इंचं काय? ते लोक तर तुम्हाला ओळखत नाहीत.’’ आम्ही नम्रपणे शंका विचारली. 

"‘‘आम्ही झोपलो होतो तेव्हा ही जात हळूच जगात सरकली. ती आम्हाला मानीत नाही, याचं आम्हाला मुळीच आश्चर्य वाटत नाही. पूर्वीचा इतिहास हाच आहे. मागे असुर लोकांनी अशीच अंदाधुंदी माजवली होती. सध्या तो डांग्यासुर फार मातला आहे ना? त्याचे बंगालमधले भाईबंदही उन्मत्त झाले आहेत. लवकरच आम्ही त्यांचा नि:पात करून टाकू. अरे, तो आमचा नेहमीचाच धंदा आहे. तू बिलकूल काळजी करू नकोस.’’"

" ... लक्ष्मीदेवीने आम्हाला इशारा केला. मग आम्ही उठून कैलासावर भगवान शंकराच्या भेटीस गेलो. ... "
................................................................................................

" ... ‘‘हा कोण झा झा? आम्हाला अस्तित्वच नाही असं म्हणणारा हा कोण हरामखोर?’’"

" ... अर्जुनानं जसं खांडववन जाळलं तसं एखादं वन आहे का शिल्लक?’’ 

"‘‘ ‘काँग्रेसवन’ नावाचं एक वन आहे खरं,’’ आम्ही विचार करून सांगितले, ‘‘काँग्रेस-गवत नावाचं गवतही फार माजलंय देशात. सगळ्या पिकांचा नाश चालवलाय त्यानं, पण ते आपण जाळण्याची गरज नाही.’’  

"‘‘का बरं?’’ 

"‘‘ते आधीच पेटलेलं आहे. दोन झाडं एकमेकांवर आदळून आपोआप अग्री उत्पन्न झाला आणि सबंध काँग्रेसवन जळू लागलं आहे. चांगलाच भडका उडालेला आहे. लवकर हे वन खलास होईल!’’ 

"‘‘भली खोड मोडली गुलामांची!’’ शंकर खूश होऊन म्हणाले, ‘‘तरी या चोरांचा आमच्यावर विश्वास नाही अं? पापाला प्रायश्चित्त मिळालं याचाच अर्थ देव आहे! हा अर्थ नाही का शिरत यांच्या टाळक्यात?’’ 

"महादेवाच्या या म्हणण्याला मान तुकवून आम्ही त्यांचा निरोप घेतला. ... "
................................................................................................

" ... शेजारीच नंदीमहाराज खिन्न होऊन बसले होते. आम्ही कारण विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘‘बाईकडं जावं की बुवाकडे जावं याच्या मी विचारात आहे. दोघंही मला फार गळ घालताहेत. तुम्ही आमचेच असं म्हणताहेत. मला तर काहीच कळेनासं झालंय! तुम्हीच सांगा मी कुणाकडं जाऊ?’’

"प्रत्येक प्रश्नावर आपल्याजवळ उत्तर आहेच अशा नेहमीच्या आत्मविश्वासाने आम्ही म्हटले, ‘‘आपल्याच जातीची मंडळी ज्या ठिकाणी जास्ती, तिथं जाणं उत्तम.’’ 

"‘‘तो विचारही माझ्या मनात आला होता, पण दोन्हीकडं मला सारखीच संख्या दिसते आहे. म्हणून तर पंचाईत.’’ 

"‘‘मग असं करता येईल!’’ आमच्या डोक्यात एकदम एक नवीन कल्पना स्फुरली. ‘‘भूतपिशाच्च, वेताळ-खेताळ ही मंडळी ज्या ठिकाणी असणार, तिथं महादेवाचं स्थान असणारच. अन् महादेव तिथं नंदी. असा मेळावा कुठं भरेल असं वाटतं?’’ 

"‘‘सध्या नवी दिल्लीत भरलेलाच आहे.’’ नंदीने मान डोलावली, ‘‘आत्ता शिंगाखाली थोडा प्रकाश पडला. मी बार्इंच्याकडे जाईन मग. थँक्स्!’’"
................................................................................................

"मोरयाबाप्पा नुकतेच मोदक खाऊन पोटावरून हात फिरवीत विश्रांती घेत पडले होते. देवी सरस्वती वीणा वाजवून त्यांचे मनोरंजन करत होती. आम्ही प्रश्न विचारल्याबरोबर दोघेही नवरा-बायको संतप्त झाले. सोंड उजव्या बाजूला वळवून गजानन महाराज म्हणाले, ‘‘या संयुक्त समाजवाद्यांना काही उद्योगधंदा आहे की नाही? स्वत:चे अध्यक्ष यांना नीट सांभाळता येत नाहीत. लागलेत देवाच्या उठाठेवी करायला?’’  

"वीणा बंद करून सरस्वती म्हणाली, ‘‘आमच्यापर्यंत पोहोचायला खूप अवकाश आहे म्हणावं. आधी आपल्या पक्षाला अस्तित्व आहे की नाही याची चौकशी करा. मग आमची. आता एकजूट केलीय म्हणे–’’ 

"‘‘जाऊ दे गं,’’ गणपतीने आपला वरदहस्त तिच्याकडे वळवून म्हटले, ‘‘त्यांच्या नादाला शहाण्यानं लागूच नये. त्यांचा पक्ष तसा आहे. एकेक विद्वानशिरोमणी काय काय मुक्ताफळं उधळताहेत ते पाहत राहावं नुसतं. एकापेक्षा एक विदूषक आहेत त्यांच्यात! त्यांचं काय बोलणं एवढं मनावर घ्यायचं? मीच त्यांना बुद्धी दिलेली नाही तर त्याला ते बिचारे काय करतील?’’

"इतका वेळ आम्ही गप्पच होतो. त्या उभयतांचे हे बोलणे ऐकल्यावर आम्ही म्हटले, ‘‘पण त्यांच्यातील काही मंडळींना थोडासा राष्ट्रवादाचा वगैरे नाद आहे, पण हे भाई लोक तर निव्वळ ... त्यांना कशाचंच सोयरसुतक नाही. ते तुम्हाला शिव्याही देतात. इकडे कामगारांत सत्यनारायणही करतात. तुमच्या उत्सवात ‘लाल बावटेकी जय’चा कार्यक्रम करतात. फार जोरात आहेत गणपती महाराज ते लोक सध्या.’’ 

"‘‘अरे, पापी अन् असुरी माणसं पहिल्यांदा जोरातच असतात!’’ वक्रतुंड महाराज सोंड हलवून बोलले, ‘‘त्यांनी केलेली पापं असह्य झाली म्हणजे मग आम्हाला अवतार घ्यावा लागतो. त्यांचं काम ते इमानेइतबारे बजावताहेत. हिरण्यकश्यपू असाच देवाला मानीत नव्हता. खांबातून नरिंसह प्रकट झाल्यावर त्याची बोबडी वळली. तुम्ही लोक जनतेला सांगा, नरिंसह अवतार धारण करा म्हणून. आत्ता खलास होतील!’’"
................................................................................................

"‘‘चंडिकादेवी सध्या तुमच्या हिंदुस्थानातच आहेत. त्या तुमच्या देशाच्या सध्या पंतप्रधान झाल्याची बातमी इकडं आली आहे.’’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 21, 2022 - August 21, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
पशूंची निषेध सभा- राष्ट्रीय प्राणी ‘सिंह?' छे!  
................................................................................................
................................................................................................

At some point, it was suggested to Government of India that Bengal tiger, not the Indian lion as it was until then, should be designated  the national animal. This was fine to save tigers, thought being that lions number had been decimated beyond possibility of recovery, due to hunting by British during the colonial era. 

Those of us genuinely fond of lions didn't quite approve when we came to know of the switch. 

Was this piece written at that time? 

One would expect so, but it seems it was written when decision to designate lion the national animal. 
................................................................................................

"कोल्होबा म्हणाले, ‘‘मित्रहो, काय हे? प्रसंग कोणता आणि आपण कसे वागत आहोत?’’ 

"‘‘कोणता प्रसंग?’’ पुन्हा रेड्याने पृच्छा केली. 

"आता मात्र कोल्होबा संतापले. आरडाओरडा करीत त्यांनी बराच वेळ बडबड केली. मग सगळ्या जनावरांना कळले की, खरोखरीच मामला सिरीयस आहे. भारताचा राष्ट्रीय पशू म्हणून सिंहाची निवड झाली असल्याची भयंकर बातमी नुकतीच आली आहे. त्यामुळे अनेकांवर अन्याय झाला आहे. झालेल्या घटनेचा कडाडून निषेध आणि पुढील चळवळीची दिशा यासाठी ही सभा बोलावण्यात आलेली आहे."
................................................................................................

"हे ऐकल्यावर इतका वेळ झाडाच्या फांदीवर बसलेले माकड टुणदिशी उडी मारून उभे राहिले आणि बोलले, ‘‘मला वाटतं भारताचा राष्ट्रीय पशू म्हणून सिंहाची निवड होणं, ही अगदी अयोग्य गोष्ट आहे. माझी निवड शेळी आहे. शेळी बापूजींची कित्ती लाडकी होती, हे काय सांगायला पाहिजे! बापूजींमुळे शेळीला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीपण मिळाली आहे. शिवाय हे गांधी जन्मशताब्दीचं वर्ष आहे–’’ 

"‘‘करेक्ट!...’’ गाढव आनंदाने ओरडले. 

"‘‘तसं पाहिलं तर भारताचं धोरणही शेळपटच आहे. त्याही दृष्टीने शेळीची निवड अगदी योग्य. उत्कृष्ट!’’"
................................................................................................

" ... बैलोबा हुंकार करीत उठले. इतका वेळ ते मातीत शिंगे खुपसून मघाचा राग शांत करण्याचा प्रयत्न करीत होते. ते खवळून म्हणाले, ‘‘मूर्खांनो, तुम्हाला काही अक्कल आहे की नाही?’’ 

"‘‘बैल सोडून सर्वांना अक्कल असते...’’ ससा म्हणाला. मग टुणदिशी उडी मारून तो लांब पळाला. 

"बैलाने पुन्हा नाक फेंदारले. 

"‘‘या देशात माझ्याइतकी किंमत दुसर्‍या कुणाला आहे? आज राज्य कुणाचं चालू आहे? बैलजोडीचं. ही बैलजोडी खूण काढून घ्या अन् बघा काँग्रेस फार दिवस निवडून येते का ते! प्रत्येक प्रांतात आमचं राज्य आहे. अगदी रक्ताचं नातं म्हटलं तरी चालेल.’’"
................................................................................................

" ... कोल्होबा अस्वस्थ झाले. खरं म्हणजे भारताचा राष्ट्रीय पशू होण्याची योग्यता आपलीच आहे असे त्याला मनापासून वाटत होते. पंचतंत्राच्या काळापासून आपली ख्याती. इसापाने आंतरराष्ट्रीय कीर्तीला पोहोचवलेला प्राणी. आपली कुणाला आठवणही होऊ नये, याची त्याला खंत वाटली. आज देशातले सर्व लोक, पुढारी कोल्ह्याच्या धूर्तपणाने वागून स्वत:चा फायदा करून घेत आहेत. स्वार्थ आणि लुच्चेपणा यांची परंपरा देशाच्या कानाकोपर्‍यांत चालू आहे. तरी आपले नाव कुणाला आठवू नये म्हणजे काय? आपण आकाराने लहान म्हणून कुणाच्या डोळ्यांत भरत नाही, दुसरे काय? ‘‘साला फिगर मार खाती आपली!’’ तो पुटपुटला. आपले स्वत:चे जर जमले नाही, तर ‘कॉम्प्रमाईज कॅन्डिडेट’ म्हणून वाघोबाचे नाव पुढे करायचे असे त्याने ठरवून टाकले होते. वाघोबाने नुसती डरकाळी फोडली तर बाकीचे प्राणी ‘वॉक आऊट’ करतील याची त्याला खात्री होती. आता त्याचे नाव सुचविलेच पाहिजे."
................................................................................................

" ... वाघोबा खवळले. इतका वेळ ते शोक करीत मान खाली घालून स्वस्थ बसले होते, पण जो तो आपलंच प्यादं पुढं सरकावण्याची खटपट करीत आहे, हे बघितल्यावर त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी एक प्रचंड डरकाळी फोडली. त्याबरोबर सगळे प्राणी थरथर कापू लागले. 

"‘‘मूर्ख प्राण्यांनो,’’ वाघ संतापून म्हणाला, ‘‘मी इथं असताना तुम्ही स्वत:ची नावं सुचवता? शरम नाही वाटत? अरे, माझं सौंदर्य काय, ताकद काय, ऐट काय?... त्या लेकाच्या सिंहात असं काय आहे? नुसत्या दाढीमिशा अन् केस यामुळे तो उगीचच भाव खातोय. सगळी बुवाबाजी आहे.’’"
................................................................................................

"शेवटी वाघ बोलणार हे समजल्यावर बर्‍याच प्राण्यांना पुढं काय घडणार याची कल्पना आली होती आणि म्हणूनच हत्तीसारखा धीरगंभीर प्राणीसुद्धा स्वस्थ बसून होता. सर्वांनीच वाघाचे नाव पसंत असल्यासारखे दाखविले, पण वाघ तेवढ्यावर संतुष्ट नव्हता...

" ...पण एवढ्यात एक विलक्षण प्रकार घडला. एखादा प्रचंड ढग गडगडावा तसा भयंकर आवाज आला. काळीज थरकापून टाकणारी गर्जना ऐकू आली. ही सिंहगर्जना आहे हे सर्वांनी क्षणात ओळखले. मग काय विचारता! एकदम धावाधाव झाली. विलक्षण वेगाने एकेक पळाले. पाठीमागे नुसता धुराळा उडाला आणि क्षणार्धात तेथे कुणीही राहिले नाही.

" ...एकटा वाघ तेवढा कानाने सावट घेत आणि तीक्ष्ण दृष्टीने इकडेतिकडे बघत पवित्र्यात उभा राहिला. 

"पुन्हा एकदा प्रचंड गर्जना झाली आणि जवळच्या झाडीतून एखाद्या तीरासारखा वनराज मृगेन्द्र त्या ठिकाणी येऊन दाखल झाला. त्याबरोबर वाघाने अत्यंत आनंदी मुद्रा धारण केली. मग आपला उजवा पंजा पुढे करून तो म्हणाला, ‘‘काँग्रेच्युलेशन्स सिंहजी! आपल्या निवडीनं फार फार आनंद झाला!... जे आमच्या सगळ्यांच्या मनात होतं तेच झालं! छान, फार छान! अभिनंदन!’’ "
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 21, 2022 - August 21, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
भारतीय चांद्रयानाचे भ्रमण  
................................................................................................
................................................................................................

This makes one's expectations rise, expectations of something hilarious. 
................................................................................................

"‘अपोलो-११’च्या साहाय्याने तीन अमेरिकन वीर अंतराळात गेले आणि परत आले. चंद्रावर माणसाचे पहिले पाऊल पडले. फार मोठा अद्भुत पराक्रम अमेरिकेने करून दाखवला. याच वेळी रशियाने आपले ‘ल्यूना’ नावाचे यान चंद्रावर स्वारी करण्यासाठी पाठवले होते. हे यान निर्मनुष्य होते, पण अमेरिकन वीरांनी चंद्रावर कोणकोणते उद्योग केले हे सगळे या ‘ल्यूना’ने टिपून घेतले म्हणतात. साहजिकच आहे. जागतिक स्पर्धेत आपले राष्ट्र पुढे असावे अशी इच्छा असेल तर, अशा गोष्टी कराव्याच लागतात.
................................................................................................

"आपला देशही काही कमी आहे म्हणता काय? मुळीच नाही. आपल्या सरकारनेही असेच यान याच वेळी चंद्रावर गुपचूप पाठवले होते, हे तुम्हाला माहीत आहे काय? तुमचा विश्वास बसणार नाही, पण गोष्ट खरी आहे. आपल्या दिल्लीच्या सरकारने खरोखरीच एक गुप्त यान ‘अपोलो-११’ आणि ‘ल्यूना’ यांच्या पाठोपाठ पाठवून दिले होते. इतकेच नव्हे तर त्यात माणसेही होती. ही आपली माणसेही चंद्रावर उतरून, माती वगैरे खणून त्यांच्या पाठोपाठ परत पण आली, पण आपली गुप्तता एवढी विलक्षण की, जगात कुणालाही भारताच्या या अंतराळातल्या भ्रमणाचा पत्ता लागला नाही! केवळ आम्ही म्हणूनच या ‘गुप्त’ माहितीचा पत्ता लावला. 

"वाचकांच्या सोयीसाठी ही माहिती आम्ही येथे थोडक्यात प्रसिद्ध करीत आहोत. मात्र ही माहिती टॉप सिक्रेट आहे हे लक्षात ठेवून त्यांनी ती कोणालाही सांगू नये, अशी विनंती आहे.
................................................................................................

"म्हणजे गंमत अशी झाली की, आपले यान चंद्राकडे सोडायचे अगदी ऐन वेळी ठरले. त्यासंबंधीची योजना गेली दहा वर्षे सरकारच्या दप्तरात होती, पण तिच्यावर केवळ विचारविनिमय चालू होता. चंद्रासंबंधी काही आंतरराष्ट्रीय संकेत आहेत काय आणि अशा मोहिमेमुळे वैश्विक शांतीचा भंग होणार नाही ना, याची गुप्त चौकशी चालू आहे, असे जाहीर उत्तर एका मंत्र्याने कुठल्याशा परिषदेत दिले होते. दरवर्षी या विषयासाठी काही रक्कमही अर्थसंकल्पात दाखवण्यात येत होती. ती खर्च झाल्याचे आढळले, तेव्हा पुन्हा चौकशी सुरू झाली. ... सांगण्याचा मुद्दा असा की, या घोळात बरीच वर्षे गेली. ‘अपोलो-११’ निघालेसुद्धा. मग मात्र आमचे सरकार खाडकन जागे झाले. ताबडतोब एक चांद्रयान तयार करून तिघा-चौघांना तिकडे पाठवून द्या, असा हुकूम सुटला. तेव्हा धावपळ सुरू झाली. अखेर हिमालयाच्या एका उंच शिखरावरून एक अग्निबाण घाईघाईने सोडण्यात आला. 
................................................................................................

"या यानातून कुणाला चंद्राकडे पाठवावे, असाही एक वाद निर्माण झाला होता. प्रत्येक भाषेचा एक असे चौदा वीर– यानात दाटीवाटी करून का होईना– पाठवावेत असे एका शास्त्रज्ञाचे मत पडले. तेवढीच राष्ट्रीय एकात्मता साधेल, असे तो म्हणाला. एवढ्यात तेलंगणाचा मनुष्य वेगळा पाहिजे असे एकाने जाहीर केले. म्हणजे एकूण ही संख्या पंधरावर गेली. इतकी माणसे यानात बसू शकणार नाहीत हे ध्यानात आल्यावर चिठ्ठ्या टाकून माणसे निवडण्याची कल्पना निघाली. चिठ्ठ्या म्हटल्यावर अनेकजण मंत्र्यांच्या चिठ्ठ्या आणण्यासाठी धावले. बरीच पळापळ झाली. गोंधळही उडाला. (एका मराठी मंत्र्याने प्रत्येकाला चिठ्ठी दिली आणि पुन्हा शास्त्रज्ञांना निराळी चिठ्ठी पाठवून ‘काय पाहिजे ते करा’ म्हणून कळवले. त्यामुळे आणखीनच गोंधळ उडाला.) शेवटी एका शास्त्रज्ञाने युक्ती काढली. चंद्रावर जाणारे यान परत येईलच असे नाही, कदाचित तेथेच मरण येण्याची शक्यता आहे, ही गोष्ट त्याने ठासून सांगितली. त्याचा इष्ट तो परिणाम होऊन सगळी नावे पटापट बाद झाली. एकही वीर चंद्रावर जाण्यासाठी तयार होईना. पुन्हा पेच निर्माण झाला. कुठलीही चार माणसे ताबडतोब पाठवा, असे तातडीचे फर्मान आले. तेव्हा मात्र शास्त्रज्ञांनी वेळ घालवला नाही. त्यांनी पुण्याचा एक मराठी मनुष्य, अमृतसरचे एक सरदारजी आणि अलिगढचा एक राष्ट्रीय मुसलमान यांची ताबडतोब निवड करून त्यांना यानात बळेबळेच चढवले. ट्रेनिंग द्यायला वेळ नव्हताच. त्यासंबंधी एक सरकारी अधिकारी प्रेमळपणानं म्हणाला... 

"‘‘सध्या तुम्ही चंद्रावर जाऊन परत तर या! म्हणजे तुमचा टी.ए.डी.ए. तुम्हाला क्लेम करता येईल. ट्रेनिंगचं आपण मागनं बघू.’’ 

"टी.ए.डी.ए. हे प्रकरण कुणाच्या डोक्यातही नव्हते. दोन लाख मैलांचे किती बिल होईल, हे ध्यानात आल्यावर पुण्याचा मराठी अंतराळवीर ताबडतोब यानात शिरला आणि त्याने अंतराळवीराचा पोशाख अंगावर चढवलासुद्धा. ... "
................................................................................................

" ... तेवढ्यात एका मुख्यमंत्र्याचा तातडीचा निरोप आला की, आपण या कार्यक्रमास जातीने उपस्थित राहू व त्याचे उद्घाटन करू. त्यामुळे कार्यक्रमाची वेळ बदलावी लागली, कारण हे मुख्यमंत्री नऊऐवजी दहा वाजता आले. उशिराबद्दल दिलगिरी व्यक्त करून ते म्हणाले, 

"‘‘चंद्रासंबंधी मला लहानपणापासून प्रेम. ‘चांदोबा’ नावाचे शास्त्रीय मासिक मी तेव्हापासून वाचत असे. सूर्य पूर्वेला उगवतो, तर चंद्र पश्चिमेला उगवतो हे असे का, याबद्दलचे मानवाचे कुतूहल सनातन आहे. चंद्रावरील स्वारीने याचा शोध लागेल, असा मला विश्वास वाटतो. शास्त्रज्ञ आणि अंतराळवीर यांना एकच गोष्ट या प्रसंगी मला निक्षून सांगितली पाहिजे. ती ही की, चंद्र हा ‘सेक्युलर’ आहे. तेथे विशिष्ट धर्माचे राज्य नाही. अशा राज्यात जाण्याची संधी काँग्रेसमुळे तुम्हाला मिळत आहे, हे ध्यानात ठेवा. निवडणुकीच्या वेळी काँग्रेसला विसरू नका. चंद्रावर जर पैसा आणि सोने, रत्नेमाणके सापडली तर ती आपल्या देशाला हवी आहेत. वाटल्यास ती कर्ज म्हणून घेण्यासही आम्ही तयार आहोत. असो, तुम्ही परत आला तर तो महात्मा गांधींचा विजय आहे, हे ध्यानात ठेवा.’’
................................................................................................

"चंद्रावर उतरण्याची वेळ भारतीय वेळेनुसार सकाळी आठ वाजता ठरलेली होती, पण सकाळचे आठ वाजून गेले तरी चंद्रावर उतरल्याचा संदेश अंतराळवीरांकडून आला नाही, हे पाहून शास्त्रज्ञ अस्वस्थ झाले. केंद्रीय मंत्रालयातूनही निरोपामागून निरोप आले– ‘‘आपले अंतराळवीर अजून का उतरले नाहीत? प्लीज, एक्सप्लेन इन रायटिंग.’’ तेव्हा सगळेच शास्त्रज्ञ घाबरले. आता आपल्या नोकरीवर गदा येते की काय, असे त्यांना वाटू लागले. त्यांच्यापैकी दोन शास्त्रज्ञ पर्मनंट होते. त्यामुळे ते कशातच लक्ष घालीत नव्हते. काही सेमीपर्मनंट होते. ते थोडे पुढेपुढे करीत होते. बरेचसे गेली दहा वर्षे टेंपररी पोस्टवर होते. त्यामुळे त्यांना फारच भीती वाटू लागली. पुन्हा एकदा चांद्रयानाशी संपर्क साधून त्यांच्यापैकी एकाने पृच्छा केली– 

"‘‘अरे बाबा! आता उतरा ना खाली! कशाची वाट पाहत आहात?’’ 

"पुणेरी तात्या म्हणाला, ‘‘अजून माझी अंघोळ झालेली नाही. अंघोळ केल्याशिवाय बाहेर पडायचं म्हणजे कसंसंच वाटतं. भिकारदास मारुतीला मी रोज जातो, पण स्नान आटोपून.’’ 

"‘‘बरं बरं. आटपा लवकर. बाकीचे दोघेही तयारी आहेत ना?’’ 

"‘‘हम सब तय्यार है.’’ सरदारजी मधेच तोंड खुपसून म्हणाले, ‘‘सायंटिस्टसाहेब आज ‘पूनमकी रात’ है क्या?’’ 

"‘‘क्यो?’’ 

"‘‘हमे पुरा राऊंड चाँद दिखाई देता है. इसलिये पुछा.’’"
................................................................................................

"खाली उतरल्यावर पुणेकर वीराने जी माहिती सांगितली, ती ऐकून शास्त्रज्ञांना बरेच आश्चर्य वाटले. चंद्रावरच्या रस्त्यावर सगळीकडे खळगे आणि चिखल आहे. त्यावरून जवळपास म्युनिसिपालिटीचे ऑफिस असावे असा त्याचा तर्क होता. एका मोठ्या ग्रहावरून खूप प्रकाश येत होता आणि उष्णतामान खूपच वाढलेले होते. हा ग्रह बहुधा सूर्य असावा असे सरदारजींचे म्हणणे होते, तर तो ‘खरा चंद्र’ असावा असा मियांचा तर्क होता. काही खड्ड्यांच्या जवळपास ‘काम चालू रस्ता बंद’ अशा पाट्याही लांबून दिसल्याचे तात्या म्हणाला. त्यावरून त्या खड्ड्यात नक्कीच काही माणसे पाय घसरून पडली असावीत, असेही त्याला वाटत होते. चंद्रावरची माती व खडक खणून काढायला अवघड असल्यामुळे सुरुंग लावून खडक फोडू का अशीही पृच्छा करण्यात आली, पण शास्त्रज्ञांनी त्या गोष्टीला मनाई केली. ... तात्याने मात्र पिशव्या भरभरून माती गोळा केली– ‘‘पांढरट रंगाची शाडूसारखी माती आहे ही! गणपती करायला फर्स्टक्लास. जाहिरात करायची पेपरमध्ये की, खास चंद्रावरची माती आणून तयार केलेले गणपती! शिवाय ब्राह्मणाच्या हातचं जानवं. काय खपतील हो गणपती! दहा-दहा रुपयांच्या खाली नाही देणार आपण. हां–’’ 

"‘‘या मातीचे गणपती? शाबास!’’ एका शास्त्रज्ञाच्या अंगावर काटाच आला. 

"‘‘राहिलं. निदान पोळ्याच्या दिवशी बैल होतील. त्याला तर हरकत नाही ना?’’"
................................................................................................

"अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांना मात्र हे माहीतच नाही. मध्यंतरी ‘अपोलो-११’ वरून चमत्कारिक आवाज ऐकू आले आणि कुणीतरी खदाखदा हसताहेत, असा त्यांना जो भास झाला, त्याचे गूढ त्यांना कधीच कळणे शक्य नाही. 

"कारण हा आवाज आमच्या वीरांच्या घोरण्याचाच होता!"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 21, 2022 - August 21, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
गणपतीची जनतेला विनंती  
................................................................................................
................................................................................................

"सेक्रेटरी, 

"ढगेवाडी गणेशोत्सव मंडळ, 

"सालाबादप्रमाणे आम्ही भक्तांना दर्शन देण्यासाठी गणेशचतुर्थीस आपल्याकडे येऊन दहा दिवस मुक्काम करणार आहोत. सालाबादप्रमाणे आपण यंदाही सेक्रेटरी झाल्याचे ऐकले म्हणूनच हे पत्र. गेल्या वर्षी आपण जी वर्गणी गोळा केली, तिचा हिशेब अद्यापि तुम्ही दिलेला नाही. जो दिला, तो खोटा आहे असे तुमच्या घरातील उंदराने मला सांगितले आहे. दरवर्षी आपण हे धंदे करता आणि तेही माझ्या नावावर याचे मला दु:ख होते. ‘श्रींची पूजा व प्रसाद’ या नावाखाली आपण रोज किती पैसे दाबता, हे मला चांगले ठाऊक आहे, कारण चमचाभर खिरापतीपलीकडे मला तर कधीच काही दिसले नाही. या खेपेला असा काही प्रकार केलात तर तुमचीच पाद्यपूजा करून तुम्हाला महाप्रसाद देण्याची माझी इच्छा आहे. रात्र रात्र जागरणे, संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत रेकॉर्ड्स लावून आसपासच्या लोकांची झोप उडविणे, पोरीबाळींशी टारगट गप्पा मारीत बसणे याही गोष्टी तुम्ही यंदा टाळाल तर बरे होईल. तुमच्या रेकॉर्ड्सच्या मार्‍यांनी माझ्यासारख्या मंगलमूर्तीच्या मनातही तुमच्याबद्दल अमंगल विचार येतात. मग बिचार्‍या शेजार्‍यापाजार्‍यांच्या मनात काय काय येऊन जात असेल! महिलांना ‘हळदीकुंकू’ आणि पुरुषांना ‘पानसुपारी’ या आकर्षक कार्यक्रमाच्या वेळी तुम्ही व इतर सर्व स्वयंसेवकांनी सभ्यपणे वागणे अत्यंत आवश्यक आहे. पुरुष मंडळींना पानसुपारी मिळाली की नाही याकडे दुर्लक्ष करून बायकांच्या हळदीकुंकवाबाबतच काही मंडळी जास्त उत्साह दाखवतात असे मला दिसून आले आहे. काही व्हालंटिअर्सनी तर स्वत:च काही पोरींना हळदीकुंकू देण्याचा प्रयत्न केला हे मी समक्ष या माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. तरी अशा गोष्टी यंदा टाळाल आणि माझा उत्सव सभ्यतेने आणि प्रामाणिकपणाने पार पाडाल अशी आशा आहे. 

"आपला 

"मंगलमूर्ती मोरया"
................................................................................................

"देशभक्त आप्पाजी टोणगे यांसा, 

"सप्रेम जय हिंद, गेल्यावर्षी ‘गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा लोकांनी आक्रोश केला होता, पण तरीही यंदा यावे की नाही याचा मी गंभीरपणे विचार करीत होतो. एकदा तर न येण्याचा विचार पक्का झाला होता. आपली भयानक व्याख्याने हेच त्याचे एकमेव कारण होय!"

"यंदाही आपण हाच सपाटा चालू ठेवल्यास पुढच्या वर्षी यावे की न यावे, याचा मला खरोखरीच गंभीरपणे विचार करावा लागेल. 

"आपला 

"गणपतीबाप्पा"
................................................................................................

"भावगीतगायक ‘नका गडे’ यांसा,

"नका गडे बँकाकडे पुन्हा पुन्हा पाहू 
"राष्ट्रीयीकरण झाले बाई, खूश आता होऊ! 

"हे नवेच भावगीत तुम्ही यंदाच्या उत्सवात म्हणणार आहात असे ऐकले. बँकेच्या राष्ट्रीयीकरणावर भावगीत आणि तेही तुम्ही म्हणणार या कल्पनेनेच माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकत आहेत. असली आचरट गाणी, बायकी समरगीते, मूर्ख प्रेमगीते आणि हंबरडागीते यांच्या मार्‍याने मी हैराण होऊन गेलो आहे. यंदा ही गाणी एकदम बंद झाली पाहिजेत. नाहीतर चाऊमाऊच्या ऐवजी मी तुम्हा मंडळींनाच खाऊन टाकण्यास कमी करणार नाही. ‘भावगीत’ हा शब्द कानावर पडला तरी मला हल्ली मळमळल्यासारखे वाटते. मोदकावर वासना जात नाही. डोके तापते. माझा इशारा जाताजाताना केलेला नसून येतायेताना केलेला आहे, हे नीट ध्यानी ठेवा. नाहीतर ‘विघ्नहर्ता’ हे नाव मला बदलून घेणे भाग पडेल. 

"आपला 

"लंबोदर वक्रतुंड"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 21, 2022 - August 21, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
यांचाही खून झाला असता!  
................................................................................................
................................................................................................

"डाव्या कम्युनिस्टांचे बंगालमधील पुढारी ज्योती बसू पाटण्याला गेले असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या; पण सुदैवाने ते बचावले हे वृत्त सर्वांना ठाऊकच आहे. लोकशाही राज्यात बंदुकीला स्थान नाही हे तत्त्व सर्वांनाच मान्य असल्यामुळे कोणीही या घटनेचा निषेध करील यात शंकाच नाही ... "

He certainly survived, to go on to be the longest in power as a CM of any state so far, 1977-2000. 
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 21, 2022 - August 21, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
बँक राष्ट्रीयीकरण- एक दुखवट्याची सभा!  
................................................................................................
................................................................................................

It's unclear when he wrote this, but it's a grieving piece about death of nationalisation of banks. 
................................................................................................

"पुढचे वक्ते भाई तोताराम हे होते. ते डावखोरे असल्यामुळे डाव्या कम्युनिस्ट पार्टीचे सभासद असावेत असा बर्‍याच लोकांचा समज होता, पण आपण उजवे कम्युनिस्ट आहोत असे त्यांनी आपल्या भाषणात ठणकावून सांगितले. उजवी कम्युनिस्ट पार्टी, तिचे कार्य, गोरगरिबांची उपासमार, कामगारांचा लढा, भांडवलदारांचा कट या मुद्द्यांवर ते बराच वेळ बोलले. शेवटच्या एक-दोन मिनिटांत बँकेचे राष्ट्रीयीकरण खलास झाल्याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त करून आपले भाषण संपविले. त्यांचे भाषण चालू असताना त्यांनी बरोबर आणलेल्या पार्टीतल्या काही माणसांनी चार-दोन वेळा टाळ्या वाजविल्या व एक-दोन ‘नही नही, कभी नही’ अशा घोषणाही केल्या. काही श्रोत्यांनी काय ‘कभी नही’ अशी पृच्छा केली तेव्हा बरीच बाचाबाची झाली व शेवटी त्या श्रोत्यांना सभागृहातून हाकलून देण्यात आले."
................................................................................................

"गंगुताई पुढे म्हणाल्या, ‘‘ही टाळी वाजविण्याची वेळ नाही (टाळ्या). मला इतिहासातील एक प्रसंग आठवतो. रायगडावर शेलारमामा मरून पडला, उदयभानू पळू लागला. तेव्हा तानाजी मोठ्या त्वेषानं उदयभानूला म्हणाल्या, ‘भ्याडांनो, पळता कोठे? तुमचा बाप या ठिकाणी मरून पडला असताना आता पळून कोठे जातोस?’ त्याबरोबर उदयभानू त्वेषानं मागे फिरला. त्याने मोठं जोराचं युद्ध केलं. तानाजी मरण पावला, पण पन्हाळा किल्ला जिंकला. आपणही हीच गोष्ट या प्रसंगी केली पाहिजे. (टाळ्या) बँकेचे राष्ट्रीयीकरण गेले तर गेले. बँका तर अजून गेल्या नाहीत ना? मग झाले तर! (हशा) कवी वसंत चावट यांच्या शब्दातच सांगायचे झाले तर मी असे म्हणेन, ‘प्रत्येक बँके बने किल्ला’ (टाळ्या) ‘चौदा बँका गर्जत उठल्या’ अशी नवी घोषणा आपण करू या! (टाळ्या)’’"

It was Torana, not Panhala. 
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 21, 2022 - August 21, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
मर्‍हाटी मने उचंबळून टाकणारी पंढरीची यात्रा  
................................................................................................
................................................................................................

Mirasdar changes completely when he writes about his beloved Pandharpur. 

Who knew, judging from his Jawaibapu, that he could write like this! 
................................................................................................

"आषाढ महिन्याइतका धांदलीचा महिना पंढरपूरला दुसरा कुठलाच नसतो. प्रत्येक गावाचे वैशिष्ट्य असे काहीतरी ठरलेले असते. वैशाख आणि मार्गशीर्ष महिने जसे पुण्याचे तसा आषाढ महिना हा खास पंढरपूरचाच. उन्हाळा नुकताच संपून मृगाचा धुवांधार पाऊस एक-दोनदा पडून गेलेला असतो. अधूनमधून सारखी भुरभुर चालू असते. आसपास जरा कुठे हिरवेगार आढळू लागते आणि एकंदरीत सगळीकडे मोठी प्रसन्नता दाटलेली असते, पण ही प्रसन्नता पंढरपूरला एकंदरीत जास्त प्रमाणात आढळते. याचे कारण एकच- आषाढी यात्रा. लाखांच्या संख्येने विठूरायाच्या दर्शनासाठी लोटणारी, माणसांचा समुद्र निर्माण करणारी, ... ही ‘सुजला-सुफला’ आषाढी वारी!"
................................................................................................

" ... दुकानदार मंडळी दुकाने झटकू लागतात. शिल्लक असलेला माल घासायला-पुसायला सुरुवात होते. या दिवसांत तांब्या-भांड्याचे दुकानदार पाहावेत, एखाद्या सुगृहिणीप्रमाणे राख, लिंबू, चिंच घेऊन भांडी घाशीत मंडळी फळ्यांवरून बसलेली आढळतात. दुकानात माल कमी आहे ही गोष्ट या वेळी ध्यानात येऊ लागते आणि मग खरेदीसाठी मुंबई-पुण्याच्या वार्‍या सुरू होतात. पोस्टाने, रेल्वेने, मोटारने समक्ष असे मालाचे ढीगच्या ढीग येऊन पडू लागतात. दुकान गच्च भरून जाते. मांडणी, आरास हा प्रकार दुकानदारीला आवश्यक असल्याची जाणीव होऊ लागते आणि जिकडेतिकडे लखलखाट दिसू लागतो. दिवस-रात्र माणसे कामात गुंतलेली आढळतात. रात्ररात्र जागून अंगडी, टोपडी, झबली शिवली जातात. भांडी घासली जातात. घोंगडी झटकली जातात आणि नवे तंबोरे, तबले, मृदंग यांचे आवाज कान किटेस्तोवर ऐकू येतात. कुंकू-बुक्क्यांची पोती आणि चुरमुरे-बत्तासे यांच्या कारखान्यांना युद्धकाळातल्या फॅक्टरींची गती प्राप्त होते. थोडक्यात सांगायचे म्हणजे, पुंडलिकाच्या कृपाप्रसादाने विटेवर उभ्या राहिलेल्या ‘सुंदर ते ध्यान’ अशा विठोबाचे श्रीक्षेत्र पंढरपूर गाढ निद्रेतून जागे होते आणि प्रभातकाळच्या पाखराप्रमाणे कुलकुल-कुलकुल आवाज करू लागते."
................................................................................................

"पण पंढरपूरला काय चालले आहे याची बाहेरच्या भक्तमंडळींना दादही नसते. पंढरपूरकरांचे पोट भरण्याची जबाबदारी आपल्यावर आहे याची त्यांना कल्पना नसते. पंढरीनाथाच्या समचरणावर आपले डोके टेकवण्यासाठी आणि ज्या केशवासी नामदेवाने भावे ओवाळले त्या केशवाचे रुपडे डोळे भरून पाहण्यासाठी त्यांची ओढ असते. आषाढ महिना लागला की, त्यांची पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी तडफड-तडफड होऊ लागते. ... अवघड प्रपंचातून बाहेर निसटणे हे एक कोडेच असते, पण ते दरवर्षीचे असते आणि त्यातून बाहेर पडण्याचा त्याचा निर्धार अभंग असतो. पहिल्यापहिल्यांदा त्याचे मन द्विधा होतेही; पण अमका गेला, तमका निघाला, अमुक दिंडी पुढे गेली, अशा बातम्या रोज कानावर येऊन आदळू लागतात. मग एक दिवस तो जिवाचा धडा करतो आणि बरोबरीच्या चार-चौघांसमवेत निघतोच. थांबत नाही. घरात अडचण नसली आणि गुदस्ता रानाला उतार चांगला पडलेला असला तर मग पोरेठोरे, बाया-माणसे, सगळा बारदाना घेऊनच गडी निघतो. वर्‍हाड, खानदेश, मोगलाई, कोकण, कर्नाटक सगळीकडून भरभरून गाड्या वाहू लागतात आणि जसजसा आषाढ महिना पुढे जाईल तसतसा माणसांचा हा समुद्र अधिकच उचंबळत राहतो. रस्ते मोटारी, गाड्यांनी दुथडी भरून वाहू लागतात आणि अखेरीस शहर पंढरपूर अष्टमी-नवमीलाच असंख्य माणसांनी गजबजून जाते.
................................................................................................

"भक्तजनांची अशी तारांबळ उडालेली असतानाच इकडे आळंदी-देहूहून ज्ञानोबा-तुकारामांच्या पालख्या पुण्याला येऊन दाखल झालेल्या असतात. एकादशीला हा सोहळा पुण्याहून हलतो आणि दिवाघाट, सासवड या मार्गाने पंढरपूरकडे मार्गस्थ होतो. पुढे दोन वाटा फुटतात. ज्ञानोबांची पालखी एका मार्गाने जाते आणि तुकोबाची पालखी दुसर्‍या मार्गाने निघते, पण या दोन्ही संतांच्या पालख्या म्हणजे आषाढी यात्रेचे मोठे वैभव असते. गावोगावचा निवडक, निष्ठावान वारकरी तेव्हा या पालख्यांच्या पताकांखाली गोळा झालेला असतो. पायी चालत पंढरीला जायचे; रेल्वेने वा मोटारीने आरामात जाणे म्हणजे खरी यात्रा नव्हेच, अशी त्यांची पक्की समजूत असते, म्हणून लांबून-लांबून लोक पायी चालण्यासाठी आळंदी-देहूला येतात. ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करीत, जोरजोराने टाळ वाजवीत, पताका नाचवीत आणि स्वत: नाचत पंढरपूरची वाट धरायची, असा मानस धरूनच ते आलेले असतात. रात्री कुठल्या तरी गावी मुक्काम करावा आणि दिवसभर हरिनामाचा आठव करीत पंढरपूरच्या दिशेने झपाट्याने जावे, हा त्यांचा नित्यक्रमच. जेवणाखाणाची व्यवस्था कुणी केलेली नसते, कारण गावोगाव मंडळी आपली वाट पाहत थांबलेली आहेत हे त्यांना माहीत असते. मुक्कामाचा गाव आला की, गावातले नेमाचे वारकरी हातात पताका तोलीत आणि तोंडाने देवाचा जयघोष करीत त्यांच्यात सामील होतात आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत पालखीबरोबर आलेल्या मंडळींपैकी गरज असेल त्यांना त्यांना सगळे गाव जेवायला नेते. पालखीच्या वेळी पन्नास वारकरी जेवू घालायचे, पंचवीस घालायचे, दहा घालायचे असा गावात वर्षानुवर्षे चालत आलेला रिवाजच असतो. काही गावांतून तर मुक्तदार असलेला भंडाराच होतो. सबंध गावाच्या वतीने जेवण. लागेल तेवढे आणि लागेल तितक्यांना. कुठे लाडू, कुठे खीर-पोळी, तर कुठे साधासुधा झुणका-भाकरीचा बेत, पण उपाशी कुणी राहत नाही, एवढे खरे. पायी चालत आपल्या दर्शनाला येणार्‍या भक्ताची सोय व्हावी म्हणून पंढरीनाथाने आपल्या कृपेचे छत्र सतत त्यांच्यावर धरलेले दिसते!
................................................................................................

"मुक्काम जसजसा जवळ येत जातो तसतशी मंडळींची संख्या सहस्रासहस्रांनी वाढत जाते. गावोगावच्या दिंड्या वाटेवर भजन करीत पालख्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. आत्ता येईल, मग येईल, पालख्यांना आज का बरे उशीर झाला?– अशा कुजबुजी सुरू होतात. तोंडाने भजन चाललेलेच असते. हाताने टाळ वाजत असतात. पाय नाचत असतात. पताका डुलत असते, परंतु अंतरीची ओढ सगळी पालख्यांकडे लागलेली असते, पण त्यांना फार वेळ तिष्ठावे लागत नाही. लांबून शिंग-तुतार्‍यांचा आवाज ऐकू येतो. ज्ञानोबांचा अबलख घोडा मोठ्या ऐटीने तालात पावले टाकीत पुढे येत असलेला दिसतो. ‘बन बांबूंचे भगवे’ लांबूनच डोळ्यांना जाणवू लागते आणि ग्यानबातुकारामांचा जयघोष कानावर पडून कान तृप्त होऊन जातात. डोळ्यांचे पारणे फिटते. सबंध अंगावर रोमांच उभे राहतात आणि मग तितक्याच उत्साहाने ‘ग्यानबा तुकाराम’ हा जयघोष टाळांच्या आणि मृदंगाच्या तालावर घुमवीत ही दिंडी धावत तिकडे सामोरी जाते आणि अखेरीला त्या प्रचंड लोंढ्यात बघताबघता विलीन होऊन जाते. 

"हा प्रकार गावोगाव. पालख्या आल्या रे आल्या की, सबंध गाव दर्शनाला लोटतो. ज्ञानोबा-तुकारामाच्या पायावर लहान लेकरे ठेवण्यासाठी लेकुरवाळ्यांची एकच घाई होते आणि पंढरीनाथाच्या भेटीला जाता येत नाही म्हणून म्हातारेकोतारे गहिवरून स्फुंदत पादुकांना मिठी मारून त्या ओल्या करतात!"
................................................................................................

"उगमापासून निघालेली नदी वाटेतले ओढे, नाले, नद्या, गटारे, नागझर्‍या सगळ्यांनाच आपल्या पोटात घेत आणि मोठी होत होत, आपले पात्र रुंदावत शेवटी समुद्रात विलीन होऊन जाते. देहू-आळंदीहून निघालेल्या या पालख्याही अशाच ठिकठिकाणी दिंड्या बरोबर घेत; हौसे, गवसे, नवसे यांना सामावून घेत अखेर वाखरीजवळ येऊन पोहोचतात. तेव्हा खरोखर डोळ्यांना माणसांचा समुद्र दिसू लागतो. तोपर्यंत म्हणजे आषाढ शुद्ध नवमीला ठिकठिकाणची संतमंडळी पंढरपूरच्या अलीकडच्या या शेवटच्या मुक्कामाला-वाखरीला येऊन बरोबर त्याच वेळी दाखल होतात. सासवडहून सोपानदेव येतात. नाशिक भागाकडून निवृत्तिनाथ येतात. मोगलाईकडून मुक्ताबाई येते. मंगळवेढ्याहून रामदासस्वामी येतात आणि खुद्द पंढरपूरहून देवाच्या लाडक्या नामदेवाची पालखी या संतांच्या मेळ्यांना आलिंगण्यासाठी येते. हे सगळे ठळक संत, पण बाकीचेही बारीकसारीक संत आपल्या आपल्या गावाहून मिरवीत मिरवीत शे-दोनशे पताका बरोबर वागवीत वाखरी मुक्कामी डेरेदाखल होतात.
................................................................................................

" ... आषाढ महिना असल्यामुळे वाळवंट बहुधा पाण्याने भरलेले असते. भक्तांची ही दाटी पाहून चंद्रभागेलाही मनातून भरते येते की काय कोण जाणे! पण यात्रेच्या वेळी नेमकी ती आपले दोन्ही बाहू पसरून धावत घाटापर्यंत येते आणि तसल्या दाटीवाटीत लोकांना गढूळ पाण्याने स्नान करण्याचे पुण्य प्राप्त करून घ्यावे लागते."
................................................................................................

" ... प्रदक्षिणेच्या रस्त्यावरून देवाला प्रदक्षिणा घालण्याचे काम निष्ठेने चाललेले असते. एकादशीला सगळ्या पालख्याही देवाला प्रदक्षिणा घालतात. त्यांचे दर्शन घ्यायला झुंबड उडते. दिंड्या आणि भजनी ताफे यांचा जल्लोष तर दिवसभर चालूच असतो. शिंगा-तुतार्‍यांचे आवाज, टाळमृदंगाचे नाद आणि हरिनामाचा गजर याखेरीज काहीच ऐकू येत नाही. खरेच ऐकू येत नाही, कारण हा आवाज इतक्या प्रचंड प्रमाणावर निघत असतो की, कानात ओरडून सांगितले तरच काही दुसरे ऐकू येते. या दिवशी तरी पंढरपूरचा व्यवहार सगळा हाताच्या खुणांनी चालतो.  

"नदीवरचे स्नान, प्रदक्षिणा, विठोबाचे दर्शन, दिंड्यांतले भजन आणि कोठे कोठे चालू असलेले कीर्तन एवढेच एकादशीच्या दिवशी खरे. बाकीच्या गोष्टी निदान तेवढ्या दिवसापुरत्या तरी खोट्या. तिथे एक दिवस तरी तुम्हाला जगात याच गोष्टीचे फक्त अस्तित्व खरे वाटेल!"
................................................................................................

" ... खरोखरच यजमानकृत्य करणारी पंढरपूरकर पंडेमंडळी या आठ दिवसांत रात्रीची सुद्धा झोपत नाहीत. दिवसरात्र ते येणार्‍या आणि आलेल्या मंडळींच्या व्यवस्थेत चूर झालेले असतात आणि झोपायचे म्हटले तरी ते झोपू शकत नाहीत, कारण झोपायला आवश्यक असणारी चार-पाच फूट लांबीची जागाही त्यांच्या घरात उरलेली नसते. आलेल्या लोकांना उतरायला जागा देणे, त्यांना जेवू घालणे आणि देवदर्शन घडवणे, इतकी त्यांची जबाबदारी असते. ती इतकी मोठी असते की, या जबाबदारीतून त्यांना पंधरा दिवस तरी मोकळे होता येत नाही आणि जेव्हा ते मोकळे होतात तेव्हा त्यांच्या कमरेचे टाके ढिलेच झालेले असतात. इतके की पुढची कार्तिकी वारी आठ-पंधरा दिवसांवर येईपर्यंत परमेश्वराप्रमाणेच सर्वजण महानिद्रेत मग्न होऊन राहतात. पुढे सबंध चतुर्मासभर सगळे गाव झोपाळू डोळ्यांनी वावरत असते!"
................................................................................................

"कुंकू-बुक्का, डाळे-चुरमुरे-बत्तासे, तुळशीच्या माळा, गोपीचंदन, सहाणखोड, विठोबा-रखुमाईचे फोटो आणि दगड मूर्ती, हरिपाठ, नामदेवाचे लग्न, साखर्‍यांची ज्ञानेश्वरी- असली पुस्तके, टाळ, तबले, मृदंग या आणि अशा प्रकारच्या वस्तू यांची खरेदी-विक्री या काळात बेसुमार होते. क्षेत्राच्या गावाहून काहीतरी प्रसाद आपल्या गावाला न्यायचा ही भावना त्याच्या पाठीमागे प्रबळ. बाकी मग इतर धंदे जोरात चाललेले असतातच. हॉटेल दणकून चालतात. भांडीकुंडी विकली जातात. जिवाला लावून-लावून कापडचोपड घेतले जाते. एकंदरीत कुठल्याही जत्रेचे बाकीचे बारकावे इथेही आढळतात आणि आढळणारच! पण या व्यवहारामुळे गावचे लोक बहुभाषिक आहेत (कॉस्मॉपॉलिटन मात्र नव्हे!) मराठी भाषा बोलणारेच, पण नाना मुलखांतले लोक येत असल्यामुळे भाषेच्या सगळ्या छटा इथे दुकानदाराला माहीत असतात. अमके गिर्‍हाईक वर्‍हाडकडचे आहे हे ओळखण्यात विशेष बहादुरी नाही, पण हा पावणा अकोला-बुलढाण जिल्ह्यातला, का नागपूर-भंडार्‍याकडचा, उस्मानाबादचा का बीडकडचा, हा तर्क इथे सांगितला जातो आणि तो बहुधा बरोबर असतो.
................................................................................................

"पौर्णिमा झाली म्हणजे खरा निष्ठावान वारकरी हलतो. ‘गोपाळकाला गोड झाला, गोपाळांनी गोड केला’ असे म्हणत म्हणत तो पडशी बांधू लागतो. आता चालत जायचे नाही. गाडीने, मोटारीने, मिळेल त्या वाहनाने. अगदीच दरिद्री असले तर पुन्हा बापडे निघाले चालत. पालख्याही परत निघतात, पण आता ते वैभव नसते, थाट नसतो, डामडौल नसतो. अंगावर रोमांच उभा करणारे, मन धुंद करणारे जयघोष नसतात. पताकांचे बन नसते. टाळकर्‍यांचा, दिंड्यांचा ताफा नसतो. काहीच नसते. आता सगळे संपलेले असते. पालखीवाले दहावीस लोक तेवढे ठायीठायी उरलेले असतात. ते पालखीही उचलतात आणि परत मुक्कामाकडे चालू लागतात. लगबगीने, पण शांतपणे जाताना कोणाला त्यांची दादही नसते."
................................................................................................

"...अशी ही यात्रा एके दिवशी संपते. रस्ते हळूहळू पुन्हा निर्मनुष्य होऊ लागतात आणि पंढरपूरकरांनाच सबंध आठ-दहा दिवसांनंतर पुन्हा एकदा एकमेकांची तोंडे दिसू लागतात. मग सुखदु:खाच्या गोष्टी होतात. ... हळूहळू व्यवहार थंडावतात. मंडळी झोपू लागतात. फळ्यांवरून चकाट्या पिटीत बसू लागतात. दुकाने सावकाश, लहरीप्रमाणे उघडली जाऊ लागतात आणि हळूहळू हे नमुनेदार गाव पुन्हा एकदा मोठ्ठी जांभई आणि आळस देऊन सुरेख झोपी जाते."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 21, 2022 - August 21, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
राजकीय स्वयंपाकघरातील नवे रुचकर पदार्थ  
................................................................................................
................................................................................................

"स्वत:च्या पक्षाचा चिवडा 

"आपला पक्ष घ्यावा, त्यातील कार्यकर्त्यांत बौद्धिक मारामारी घडवून आणावी. दोन्ही बाजूस चारदोन-चारदोन कार्यकर्ते असले तरी पुरे. सोयीसाठी त्यांना डावे-उजवे हे नाव द्यावे. अध्यक्ष, कार्यवाह इत्यादी जागांसाठी भांडणे होतील अशी व्यवस्था करावी. ताबडतोब आपल्या पक्षाचा चिवडा तयार होतो. या चिवड्यात सत्तेसाठी नव्याने प्रवेश केलेले बेदाणे, आरामखुर्चीत बसून नुसतीच चर्चा करणारे काजू, दुसर्‍याला फटाफट बोलून ठसका लागणार्‍या मिरच्या घालाव्यात. मग हा चिवडा खाण्यास फारच खमंग लागतो. या चिवड्याचे वैशिष्ट्य हे आहे की, चिवड्याबरोबर तो तयार करणाराही संपतो. खाणारे फार स्तुती करतात."
................................................................................................

"सर्व पक्षांचे कडबोळे

" ... सगळ्या विरोधी पक्षांचे पीठ एकत्र करून मळावे. ते वरचेवर एकजीव झाले तरी पुरे. फार मळूच नये. या पिठात संयुक्त जाहीरनामा, जनतेचे दडपण इत्यादी तिखटमीठ टाकावे. सत्तेच्या तेलात तळले की, छान कडबोळी तयार होतात. ... "
................................................................................................

"पार्टीची चटणी

" ... प्रांतभेद, भाषाभेद यांच्या जाळ्यावर सगळे दाणे भाजून घ्यावेत. एवढ्यानेही भागले नाही आणि दाणे कच्चेच राहिले आहेत असे वाटले तर चीन, रशिया, पाकिस्तान यांना पाठिंबा देणारी वक्तव्ये करावीत. सगळीकडे आग पेटवावी. या आगीत निवडक दाणेच काय सबंध पार्टीच चांगली भाजून निघते आणि लोक या पार्टीचे कूट करून चटणी उडवतात. ही चटणी एका पार्टीची फक्त एकदाच होऊ शकते. प्रयोग करून पाहावे."
................................................................................................

"जनतेचा खिमा

"जिल्हा परिषद, सहकारी सोसायट्या, सहकारी बँका यात घुसावे. जमेल तेवढा पैसा उकळावा. वाटेल तशी आश्वासने तोंड भरून द्यावीत. विश्वासाने जे जे मान खांद्यावर टाकतील त्यांचे गळे धडाधडा चिरावेत. नोकर्‍या लावण्यासाठी, बदली करण्यासाठी प्रत्येकाकडून कमिशन घ्यावे. मदत म्हणून मिळणार्‍या प्रत्येक वस्तूत आपला हिस्सा ठेवावा. गोरगरिबांना जातीची शपथ घालावी. गुंडांना पैसा वाटावा. असे काही वर्षे केल्यास ताबडतोब तेथील जनतेचा खिमा होतो. ... "
................................................................................................

"पुढार्‍याचे पाठीचे धिरडे 

"हाच खिमा बिघडल्यास हा पदार्थ तयार होतो. लोकांना या खिम्याची आधीच कल्पना आली तर ते खवळतात. तो करणार्‍या पुढार्‍याला धरतात आणि बडव बडव बडवतात. इतके की, त्याच्या पाठीचे झकास धिरडे होते. हाही पदार्थ तसा खाण्यास बरा आहे. मात्र जरा त्रासाचा आहे. केव्हातरी दहा-वीस वर्षांतून एकदा करण्यास हरकत नाही. मोठ्या पाठीच्या पुढार्‍याचे धिरडेही मोठे होते व ते पुष्कळ दिवस टिकते."
................................................................................................

"शिक्षणसंस्थेचे खोबरे

"एखादी शिक्षणसंस्था काढावी. तिच्या अध्यक्षपदी आणि संचालक मंडळात गावातले पुढारी घ्यावेत. रिकामटेकडे, गुंड ही मंडळी घेता आली तर उत्तमच, पण निदान चेअरमन आणि सेक्रेटरी तरी राजकीय पुढारी असावेत. हेडमास्तर किंवा प्रिन्सि्पपॉलच्या जागेवर आपल्या जातीतला शक्य तितका नालायक मनुष्य आणून बसवावा. शाळेतले शिक्षक किंवा कॉलेजातले प्रोफेसरदेखील शक्य तो जात बघूनच घ्यावेत. मुलांची फी, इमारत फंड, सरकारी ग्रँट यातून मिळालेले पैसे निवडणुकीच्या कामासाठी वापरावेत. शिक्षक, प्राध्यापक, मुले यांना आपल्या पक्षाच्या निवडणुकीच्या वेळी प्रचारासाठी भरपूर राबवावे. मग शिक्षणसंस्था काही दिवस बंद राहिली तरी चालेल! पुढार्‍यांची, टोळभैरवांची सगळी नापास कार्टी दरवर्षी नेमाने वर चढवावीत."
................................................................................................

"सबंध देशाचे वांगे सबंध 

"भरली वांगी आपल्या परिचयाची आहेतच. त्याची चव किती खमंग असते. असेच वांगे संपूर्ण देशाचेही करता येते. काय करावे, बहुसंख्य समाज घ्यावा आणि त्याची चांगली कणीक तिंबावी. त्याला एकसारखी नावे ठेवावीत. ... देशातील लढाऊ वृत्ती चांगलीच खच्ची करावी. कुठेही कुणी प्रतिकाराचा शब्द उच्चारणार नाही अशी दक्षता घ्यावी. सरकारी कारभारात रेमेडोके मंत्री आणावेत. जिकडेतिकडे अनास्था, बेपर्वाई, बेजबाबदारपणा या गुणांचा विकास करावा. लाचलुचपतीस रान मोकळे सोडावे. वशिलेबाजीची फोडणी टाकावी. देशापेक्षा पक्ष मोठा, पक्षात आपला गट महत्त्वाचा आणि त्यातही आपण श्रेष्ठ ही भावना पद्धतशीरपणे जोपासावी. शत्रूने हल्ला केल्यास मुकाट्याने शरण जाऊन रदबदली करावी. तडजोडीसाठी आपल्या देशाची भूमी खुशाल दान म्हणून देऊन टाकण्याची सवय अंगी बाणवावी. खर्चाला कसलाही ताळमेळ ठेवू नये. वेळ आलीच तर आपल्या चलनाचे अवमूल्यन करून आर्थिक क्षेत्रात बोंबाबोंब उडवून द्यावी. मुख्य म्हणजे तज्ज्ञ, माहीतगार या प्राण्यांना तुच्छ लेखावे. त्यांचा सल्ला ऐकू नये. असे पंधरा-वीस वर्षे केल्यास संपूर्ण देशाचे वांगे आपोआप होते. याची चव आपली आपल्याला घेता येत नाही, पण परदेशी लोकांना नेहमीच असली वांगी आवडतात. मात्र सत्तेवर असलेल्या पक्षालाच देशाचे असे संपूर्ण वांगे करता येईल."
................................................................................................

" ... या बाबतीतील आपले अनुभव आम्हास कळविल्यास आणखी काही असेच खमंग व रुचकर पदार्थ कसे बनवावेत हे आम्ही प्रात्यक्षिकासह सांगू. त्यासाठी राजकीय पुढार्‍यांचे एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी शिबिर भरविण्याचाही आमचा इरादा आहे."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 21, 2022 - August 21, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
पानिपतचे चौथे युद्ध  
................................................................................................
................................................................................................

This must have been written, and published, soon after March 1971. 

Most of us remember 1971 very differently. Events that led to Bangladesh began already in 1970 with the horrendous floods that drowned over a hundred thousand in East Bengal- known within Bengal, before partition, as 'Jal Bangla', literally, 'water Bengal'. 

Everything he describes - wasn't that in 1969? Wikipedia mentions V. V. Giri as President of India from 1969 on, and that was the key fight that broke the party into O and I factions, with the latter winning, hence the President then was Giri. 
................................................................................................

It's rather cute that Mirasdar thought teaching would continue exactly as he'd known - human teachers and all. 

He hadn't taken computers into account, and internet was far into future, probably, when he wrote this. 
................................................................................................

What's less forgivable is that he sketches out previous history exactly as taught by invaders since a millennium and a half ago, instead of history known to India (and deliberately labeled myth by invaders). 

Or did he not realise about Panipat, also called Thanesar (Sthaneshwar), being the site of Kurukshetra, the setting of the great War of Mahabharata?
................................................................................................

"गुरुजी : पुंडू, तू गप्प बैस. मी काय सांगतो ते प्रथम ऐक. पानिपतच्या तीन लढाया तुम्हाला ठाऊकच आहेत. पहिली लढाई कुणाकुणात झाली? ... "

"बंड्या : बाबर आणि दिल्लीचा बादशहा इब्राहिमखान लोदी. 

"गुरुजी : छान! अगदी बरोबर सांगितलंस. आता बाळ्या, तू सांग दुसरी लढाई कुणाकुणात झाली? 

"बाळ्या : दोन शत्रूंत झाली ना? मला माहीत आहे. 

"गुरुजी : गद्ध्या, पण त्या शत्रूंची नावं काय? 

"खंडू : मी सांगतो गुरुजी. दिल्लीचा बादशहा अकबर आणि हिंदूंचा सेनापती हिमू. 

"गुरुजी : अगदी बरोबर आहे. बरं, तिसरी लढाई?"

"बाळ्या : अगदी सोपं आहे. इतिहासाच्या पुस्तकात ती नावं दिलेलीच आहेत. 

"गुरुजी : शहाणा आहेस! बैस खाली. कोण सांगतो? 

"खंडू : मला माहीत आहे सर. मराठे आणि मुसलमान यांच्यात झाली. बरोबर आहे ना? द्या टाळी– 

"गुरुजी : ही घे! (टाळी देतात) विद्यार्थ्यांनी टाळी मागितली तर ती शिक्षकांनी ताबडतोब द्यावी असा शिक्षण खात्याचा नवीन नियम आहे. असो. १७६१मध्ये ही तिसरी लढाई झाली. काबूलचा बादशहा अब्दाली आणि मराठे यांच्यात. या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला आणि त्यांचं फार मोठं नुकसान झालं. एक लाख तरणी माणसं मेली."
................................................................................................

"गुरुजी : (रागावून) तेच सांगतो आहे. तुला काही दम आहे की नाही? ही गोष्ट इसवी सन १९७१ मधली आहे. ... "

"प्रजेमध्ये काही असंतुष्ट लोक होते. त्यांना राणी आवडत नव्हती. ते लोकांना सांगू लागले, ही राणी लबाड आहे. ती तुमच्या डोळ्यात धूळ फेकते आहे. अशा लोकांनी एकजूट केली. आपापल्या सैन्याची जमवाजमव केली. पैसा, दारूगोळा सगळं जमवलं अन् एकदम राणीविरुद्ध बंड पुकारलं. जिकडेतिकडे धामधूम उडवून दिली. 

"बाळ्या : सर, या बंडाचा म्होरक्या कोण होता? 

"गुरुजी : निरनिराळे सरदार होते. त्यात अटलबिहारी वाजपेयी म्हणून मुख्य सेनापती होता. त्याचं स्वत:चं सैन्य चांगलं लढाऊ होतं. हा सेनापती हुशार आणि कर्तबगार होता. त्यानं इतर असंतुष्ट सरदारांना हाताशी धरलं. मद्रदेशाधिपती कामराज, गुर्जरवीर मोरारजी, कन्नडवीर निजलिंगप्पा, श्रेष्ठी नवल टाटा, मुंबापुरीचा सेनापती बाळ ठाकरे. एकापेक्षा एक पराक्रमी आणि अनुभवी वीर एकत्र आले. त्यांनी राजधानीवर चाल केली. बंडाचा बावटा उभारला. ही गोष्ट १९७१ सालातली आहे बरे."

Naval Tata? 

The events described are from 1969; the key contention that split the party was about V. V. Giri vs Neelam Sanjeeva Reddy, and Giri became president of India in 1969, after congress (I) won. 
................................................................................................

"गुरुजी : पुढं काय? १९७१च्या जानेवारी महिन्यात या बंडाला तोंड फुटलं. राणीनंही युद्धाची जय्यत तयारी केली. दोन महिने उभयपक्षी युद्धाची सिद्धता आणि किरकोळ गोळागोळी चालू होती. अखेर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात युद्धाला तोंड लागलं. देशात जिकडेतिकडे लढाई सुरू झाली. सगळीकडे प्रचंड धूळ उठली. वर्तमानपत्राचे तोफखाने आग ओकू लागले. कोणाचं कोणाला दिसेनासं झालं. हाणाहाणी, कापाकापी, गोळागोळी यांना ऊत आला. अखेर अखेर तर हातघाईची लढाई सुरू झाली. रायबरेली भागात तर राणी स्वत: हत्यार घेऊन शत्रूवर चाल करून गेली. प्रचंड गदारोळ उडाला. अशी ही धुमश्चक्री सतत दहा दिवस चालू होती. अखेर मार्च १०ला ही लढाई संपली आणि राणीचा प्रचंड विजय झाला."
................................................................................................

"बाळ्या : छे: छे:! फारच भयानक युद्ध हे! बंडखोर सरदारांचं पुढं काय झालं गुरुजी? त्यासंबंधी काही माहिती सापडते का इतिहासात? 

"गुरुजी : सगळी माहिती मिळत नाही, पण जी आहे ती सांगतो. कन्नडवीर एकजात ठार झाले. त्यांचा सरदार निजलिंगप्पा स्वत: रणांगणात नव्हता म्हणूनच बचावला. गुर्जरवीर मोरारजी यानं स्वत: लढाई जिंकली, पण त्याचे खूपच सैनिक या लढाईत कामास आले. मद्रदेशाधिपती कामराज सुरक्षित राहिला, पण त्याचं राज्य राणीनं जिंकलं. आपल्या मांडलिकाला दिलं आणि या राजाला तिने वनवास भोगायला लावला. त्यानं खूप शर्थीनं युद्ध केलं. त्याचं खूप नुकसान झालं, पण त्यांच्या सैनिकांनी राणीच्या सैन्याचीही खूप हानी केली, पण राणीच्या अफाट सामर्थ्यापुढं त्याचंही काही चाललं नाही. या वीरांचा खुद्द राजधानीतही खूप दबदबा होता. राणीनं तो पार नाहीसा करून राजधानी पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतली. राणी पुन्हा निरंकुशपणे राज्य करू लागली."
................................................................................................

Quoted from Wikipedia:- 

"On 12 November 1969, the Prime Minister of India Indira Gandhi was expelled from the Congress party for violating the party discipline. The party finally split with Indira Gandhi setting up a rival organization, which came to be known as Congress (R). In the All India Congress Committee, 446 of its 705 members walked over to Indira's side.[10] The Indian National Congress (Organisation) was also occasionally informally referred to as the Syndicate and the Indira faction by "Indicate". K Kamaraj and later Morarji Desai were the leaders of the INC(O).

"INC(O) led governments in Bihar under Bhola Paswan Shastri, Karnataka under Veerendra Patil, and in Gujarat under Hitendra K Desai. It was also a part of the Janata Morcha that ruled Gujarat under Babubhai J. Patel from 1975–1976 during the emergency era.

"The split can in some ways be seen as a left-wing/right-wing division. Indira wanted to use a populist agenda in order to mobilize popular support for the party. The regional party elites, who formed the INC(O), stood for a more right-wing agenda, and distrusted Soviet help.

"In the 1971 general election, the INC(O) won about 10% of the vote and 16 Lok Sabha seats, against 44% of the vote and 352 seats for Indira's Congress. In March 1977, the party fought the post-Emergency election under the banner of Janata Party."

Mirasdar must be referring to the general election of 1971, rather than the party split, as war. 

"The Janata Party alliance inflicted crushing defeat to Indira's Congress Party. Nevertheless, the total vote share of Congress (O) in 1977 was almost halved from 1971 and they lost three seats.[citation needed]. Later the same year, INC(O) formally merged with the Bharatiya Lok Dal, Bharatiya Jan Sangh, Socialist Party of India, Swatantra Party and others to form the Janata Party. Congress (O)'s leader Morarji Desai served as the fourth Prime Minister of India from 1977 to 1979 which was India's first non-Congress government.[11]"

So he must have written this piece before the results of 1977 election were out. 
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 21, 2022 - August 21, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
माश्यामारी  
................................................................................................
................................................................................................

"पश्चिम पाकिस्तानात भावलनगर या गावचा चित्तथरारक वृत्तांत कळला की नाही? फार ऐकण्यासारखा आहे. या भावलनगरात माश्या मारण्याची मोहीम काढण्यात आली. मासे नव्हेत, माश्या! आणि ही मोहीम अगदी युद्धपातळीवरून चालू झाली. दिसेल ती माश्यी मेलीच पाहिजे असा निर्धार या पाठीमागे होता. या जिद्दीने माश्या मारण्यात आल्या आणि नंतर त्या एकत्र करण्यात आल्या. त्यांचे वजन आठ मण भरले. ही माहिती सांगोवांगीही नव्हे. पाकिस्तानचे राज्यमंत्री महंमद यासीन यांनीच सांगितली आहे. अशीच मोहीम कम्युनिस्ट चीननेही क्रांती होऊन राजसत्ता हाती आल्याबरोबर पहिल्याच वर्षी हाती घेतली होती म्हणतात."

Seriously?
................................................................................................

"नवी दिल्ली : मक्षिकानाशाच्या मोहिमेची तयारी जोरात चालू आहे. परवाच या मोहिमेचे बोधचिन्ह पसंत करण्यात आले. एक माणूस गादीवर झोपला आहे आणि त्याने पाळलेले माकड त्याच्या उशाशी बसले आहे. त्या माणसाच्या नाकावर बसलेली माश्यी मारण्यासाठी माकडाने जवळच ठेवलेली तलवार हातात घेऊन उगारलेली आहे– ‘यांचे अनुकरण करा’– म्हणजे माणूस मेला तरी हरकत नाही, पण माश्यी सुटता कामा नये या जिद्दीने ही मोहीम चालू ठेवा. पसंत केलेले हे चित्र आता देशभर सर्वत्र लावण्यात येईल आणि खेड्यापाड्यांपर्यंत त्याचा प्रसार होईल असे दिसते. मात्र या माकडाचा तोंडवळा कोणत्या पुढार्‍याप्रमाणे असावा याविषयी निवड समितीत मतभेद झाले आहेत. झोपलेल्या माणसाचा तोंडवळा आणि माकडाचा चेहरा अशी दोन तोंडे दोघांना देऊन ही भांडणे बहुधा मिटविण्यात येतील असे वाटले. बोधचिन्हाप्रमाणे या मोहिमेचे बोधवाक्यही पसंत करण्यात आले आहे. तेही देशाच्या कानाकोपर्‍यांत, विजेच्या खांबाखांबांवर, झाडांवर, देवळा-देवळांवर लिहिले जाईल. ‘प्रथम प्रहारे मक्षिकाघात:’ हे वाक्य सर्व दृष्टीने योग्य ठरविण्यात आले आहे. तामिळनाडूमध्ये मात्र संस्कृत वाक्य न लिहिता ‘प्रथम चेळुवरुइंडुवण्णूवरु’ असले काहीतरी वाक्यच लिहिले जाईल असे म्हणतात. असो!"
................................................................................................

" ... आपल्या ह्या राज्यातून पुढच्या सालाला निदान एक कोटी मेलेल्या माश्यांची निर्यात दिल्लीला केली पायजे. आपल्या जिल्ह्याचं वैशिष्ट आपन कायम राखलं पाहिजे. सुशिक्षित मानसं ह्यात उदाशीन आहेत ही गोष्ट बराबर न्हाई. त्यांनी पण ह्यात भाग घेतला पायजे...’’"
................................................................................................

"फुगेवाडी, दि... मक्षिकानाशाच्या मोहिमेसाठी येथे आलेल्या दहा हजार रुपयांची अफरातफर झाली असून, त्यामुळे गावात फारच खळबळ उडाली आहे.

"याबाबतीत तपास केल्यावर असे समजले की, येथील ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडे ही रक्कम आलेली होती. त्यांच्या आदेशानुसार लोकांनी बर्‍याच माश्या मारून त्यांच्या स्वाधीन केल्या. विरोधी गटाच्या म्हणण्यानुसार ही संख्या २,५५,७३२ इतकी आहे. त्यापैकी पहिला एक लाख मारलेल्या माश्यांचा हप्ता मुंबईला पाठवून दिल्याची पावती आहे. बाकीच्या माश्यांचे काय झाले याचा मात्र काहीच शोध लागत नाही. सरपंच आणि ग्रामसेवक यांनीच या माश्या गडप केल्या असा त्यांचा आरोप आहे. गावोगाव हेच प्रकार चालले असून, माश्या फक्त कागदोपत्री मरत आहेत आणि खर्‍या माश्या गावात तशाच बेगुमानपणे हिंडत आहेत अशीही गावकर्‍यांची तक्रार आहे. यात आश्चर्याची गोष्ट अशी की, चारच महिन्यांपूर्वी ‘निर्मक्षिका ग्राम’ म्हणून या गावाचा गौरव करून तेथे आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गौरव समारंभ झाला होता. याउलट यंदाइतक्या माश्या आपण गेल्या चाळीस वर्षांत कधी पाहिल्या नव्हत्या असे गावातील वृद्ध लोक जीव तोडून सांगत आहेत. या प्रकाराची पोलीस चौकशी सुरू झाली आहे."
................................................................................................

"विधानसभेत प्रश्नोत्तरे

"प्रश्न : सरकारी सचिवालयात आणि विधानसभेच्या आवारातही अजून माश्या घोंघावत आहेत ही गोष्ट खरी आहे काय? 

"उत्तर : सार्वजनिक हिताच्या दृष्टीने ही माहिती सांगणे इष्ट होणार नाही."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 21, 2022 - August 21, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
एका काँग्रेस कमिटीतील गणेशोत्सव  
................................................................................................
................................................................................................

"आमच्या टगेवाडीतील काँग्रेस कमिटी यंदा गणेशोत्सव साजरा करणार आहे, ही बातमी धक्का देणारी होती. टगेवाडी काँग्रेसचे अध्यक्ष सोकाजीराव टगे यांनी बातमी जाहीर केली तेव्हा गावात बरीच खळबळ माजली. निधर्मी काँग्रेसने गणपतीला एवढा मान देणे हे योग्य नाही असे काहींचे मत पडले. त्यामुळे अल्पसंख्य जमातीच्या भावना भरमसाट दुखावतील आणि राष्ट्रीय एकात्मता एकदम खलास होईल, अशीही भीती काहीजणांनी व्यक्त केली. काँग्रेस कमिटीत जाणे हे खुद्द गणपतीला तरी मान्य होईल की नाही याची धास्ती होतीच. लोकांच्या शंकाकुशंकांना ऊत आल्यामुळे शेवटी सोकाजीराव टगे यांनी एक पत्रक काढून खुलासा केला– 

"‘‘...गजाननाचे मस्तक हत्तीचे आणि शरीर माणसाचे असल्यामुळे हा निधर्मी देव आहे, हे सांगावयास नको. त्यातून तो सगळ्यांची पापे पोटात घालतो, असे परवाच आम्ही ऐकले. त्या दृष्टीने काँग्रेस कमिटीत गणपतीचा उत्सव केल्यास जनतेची सर्व पापे जळून भस्म होतील, अशी खात्री पटल्यामुळे आम्ही हा उत्सव साजरा करणार आहोत. सध्या काँग्रेसला फार वाईट दिवस आले आहेत. या संकटातून वाचण्यासाठी विघ्नहर्त्या देवाला बोलावणेच योग्य, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या थोर परंपरेला धरूनच हा उत्सव साजरा होईल. त्यास कुणीही धार्मिक अर्थ चिकटवू नये. सर्वांनी उत्साहाने वर्गणी द्यावी...’’"
................................................................................................

"गणेशाची मूर्ती खास नव्या दिल्लीहून तयार करून आणलेली होती. गणेशचतुर्थीला या मूर्तीची थाटाची मिरवणूक काढून गणपतीला सन्मानपूर्वक काँग्रेस कमिटीच्या हापिसापर्यंत नेण्यात आले. मिरवणुकीत प्रत्येक काँग्रेसवाला हातात बैलजोडी घेऊन सामील झाला होता. पांढरेशुभ्र बैल आणि मध्ये क्रियाशील काँग्रेसवाला अशी एकच दाटी झाल्यामुळे ही मिरवणूक गणपतीची की पोळ्याची असाही संशय निर्माण झाला. (काही वृद्ध मंडळींना तर ही केवळ बैलांचीच मिरवणूक आहे असेही वाटले! मधला बिनशिंगाचा काँग्रेसवाला त्यांना दिसलाच नाही. असो.) गणपतीची मूर्ती सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी होती. पांढराशुभ्र खादीचा कुडता आणि पायघोळ धोतर. डोक्याला कोचदार पांढरी टोपी, पुढे आलेले पोट. यामुळे गणपती हा खराखुरा काँग्रेसवाला शेटजीच दिसत होता. दोन बाजूला दोन भांडखोर बैल आणि दोघांचीही शिंगे दोन हातांनी धरून त्यांना समजावणारा उभा गणपती, हे ध्यान आजपर्यंत कोणीही पाहिलेले नव्हते. गणपतीच्या राहिलेल्या दोन्ही हातांपैकी एका हातात पैशाची थैली आणि दुसर्‍या हातात निवडणुकीचे तिकीट होते. त्यामुळे सगळी मंडळी अत्यंत भाविकतेने त्याला पुन्हा पुन्हा नमस्कार करीत होती. या गणपतीचे मुख्य वाहन सरकारी जीप पाठीमागे उभी होती आणि मंत्रिपदाचा मुकुट त्याने मस्तकावर धारण केलेला होता. मिरवणुकीत हिंदूंचा गुलाल आणि मुसलमानांच्या रेवड्या वरचेवर उधळण्यात येत होत्या."
................................................................................................

"नंतरच्या आठ दिवसांत अनेक कार्यक्रम झाले. त्यात काही शैक्षणिक तर काही सांस्कृतिक म्हणजे करमणुकीचे होते. शैक्षणिक कार्यक्रमांत व्याख्यान, परिसंवाद, चर्चा इ. गोष्टी होत्या. ‘शिक्षण म्हणजे काय व ते कशाशी खातात’ या विषयावर सुप्रसिद्ध काँग्रेसवाले मगनभाई छगनभाई यांनी व्याख्यान दिले. हे भाषण त्यांच्या सेक्रेटरीनेच लिहून दिले होते व ते मगनभार्इंना स्वत: नीटसे वाचता न आल्यामुळे जमलेल्या श्रोत्यांपैकीच एकाने एकाआड एक ओळ गाळीत वाचून दाखवले. त्यामुळे ते फारच रंगले. परिसंवादही असाच रंगला. ‘काँग्रेसवाल्यांनी किती पैसे खावेत?’ हा परिसंवादाचा विषय इंटरेस्टिंग होता. अनेकांनी अनेक प्रकारची मते मांडून आपापले दृष्टिकोन सांगितले. पैसे हे खाण्यासाठी असतात व ते खाल्लेच पाहिजेत या मुद्द्यावर सर्व वक्त्यांचे एकमत झाले, पण कुठे, केव्हा व कसे याबाबत मात्र प्रत्येकाने भिन्न मतपत्रिका (अर्थात तोंडी) जोडली. प्रत्येक वक्त्याने आपापले अनुभवाचे बोल सांगितले, हे या भाषणाचे वैशिष्ट्य होते. नव्या रक्ताच्या तरुण काँग्रेसवाल्यांना या परिसंवादापासून बरीच स्फूर्ती मिळाली असावी, असे त्यांच्या प्रसन्न मुद्रेवरून दिसते."
................................................................................................

" ... टगेवाडीत जवळजवळ एकही मुसलमान नव्हता. तरीसुद्धा त्यांच्या भावना दुखावतील म्हणून विसर्जनाची मिरवणूक रद्द करण्यात आली आणि श्रींचे विसर्जन गुपचूप करण्यात आले. सवयीमुळे प्रसाद खाण्याचा कार्यक्रम मात्र अजूनही काही दिवस चालूच राहणार आहे!"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 21, 2022 - August 22, 2022. 

"नवे वर्ष एकच, पण ते निरनिराळ्या वेळी सुरू होते. एक जानेवारीला आपल्या ओळखीचे व्यावहारिक वर्ष (पण खरे ख्रिश्चन वर्ष) सुरू होते. एकतीस मार्च संपतो आणि नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले, असे शहाणे लोक म्हणू लागतात. नंतर ‘नेमेचि येतो...’ या न्यायाने पाडवा येतो. वर्षप्रतिपदेला आपले नवे वर्ष सुरू होते. आपले वर्ष असे म्हणायचे इतकेच! प्रत्यक्षात कोणता शक किंवा संवत सुरू झाला आहे, कोणता संपला आहे हे आपल्याला नक्की सांगता येत नाही. केव्हातरी हिजरी सन लागतो. ‘पार्सी न्यू ईयर’ अशी पाटीही कॅलेंडर चाळताना आढळते. दिवाळीच्या पाडव्यापासून आपलीच आणखी एक कालगणना चालू होते. (बहुधा तो ‘विक्रम संवत’ असावा.) एकूण काय सबंध वर्षभर नवीन वर्ष आपले एकसारखे सुरू होत असते.
................................................................................................

"दुसर्‍या दिवशी येणार्‍या बातम्या ठराविक असतात. अमुकअमुक ठिकाणी अमक्याचे गाणे आहे अशी पाटी लागली होती. लोक त्यावेळी तेथे गेले आणि ‘आपणाला कोणीतरी बनवले’ हे त्यांच्या ध्यानात आले किंवा ‘अमक्या आमदाराला पंतप्रधानांचा फोन आला म्हणून तो घाईघाईने धावत गेला आणि आपल्याला कोणीतरी ‘एप्रिल फूल’ केल्याचे त्याच्या लक्षात आले’ वगैरे. या ठराविक बातम्या वर्षानुवर्षे वाचून मला अगदी कंटाळा आला आहे. आता या पद्धतीत काहीतरी बदल व्हावयास पाहिजे की नाही? लोकांना मूर्ख ठरविणे किंवा ‘एप्रिल फूल’ करणे हे ध्येय मलाही मान्य आहे, पण ते करताना आपणाला कितीतरी नव्या गोष्टी करता येतील. उदाहरणार्थ, समजा आपल्याला खालील बातमी वाचावयास मिळाली तर?"
................................................................................................

"शिक्षणाधिकार्‍यांना बनविले 

"भंपकपूर, दि... येथे परवा दि. १ एप्रिलला फारच खळबळजनक गोष्ट घडून आली. येथील एका माध्यमिक शाळेस जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांनी अचानक भेट दिली तेव्हा बरीचशी मुले शाळेत, विशेषत: वर्गावर्गात शिस्तीत बसलेली आढळून आली. कोठेही कसलाही गोंगाट होत नव्हता किंवा एकही कारटे आरडाओरडा करीत नव्हते. मुख्य म्हणजे प्रत्येक वर्गात शिक्षकाची मूर्ती दिसत होती व काही अभ्यास चालू असल्याचेही कानांवर पडत होते. शिक्षणाधिकार्‍यांना सर्वांत आश्चर्य वाटले ते हे की, शिक्षक हे अभ्यासाचा विषय शिकवीत होते आणि मुलांना तो विषय समजत होता. हा काय प्रकार आहे हे त्यांना बराच वेळ समजेना. शेवटी आज एक एप्रिल आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली व आपल्याला या शाळेने ‘एप्रिल फूल’ केले आहे हे त्यांनी ओळखले. तसे ते मनातून खजीलही झाले असतील. तथापि त्यांनी वरवर तसे काही न दाखवता शाळेची धावती तपासणी केली व नंतर त्यांनी शिक्षकांची एक सभा घेतली. या सभेत त्यांनी शिक्षण व्यवसायाचे पावित्र्य, ध्येयवाद, भावी आधारस्तंभ कसे तयार करावयाचे यासंबंधी काहीही विवेचन केले नाही. उलट शिक्षकांच्या अडी-अडचणी, सोयी-गैरसोयी याबद्दल फारच आस्थेने चौकशी केली. त्यामुळे सर्वच शिक्षकांना फार मोठा धक्का बसला. हा काय प्रकार आहे हे त्यांच्या लक्षात येईना. शेवटी तर एका धूर्त व चाणाक्ष शिक्षकाने हाही ‘एप्रिल फूल’चाच प्रकार आहे हे सर्वांच्या निदर्शनास आणून दिल्यावर खुलासा झाला. ‘एप्रिल फूल’च्या या अभिनव प्रकारामुळे गावात फारच खळबळ माजली असून, जिकडेतिकडे तोच एक चर्चेचा विषय झाला आहे."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 22, 2022 - August 22, 2022. 

" ... मला तरी उन्हाळा आला की, पहिली जाणीव रसाची गुर्‍हाळे पाहून येते. ‘देशबंधूंनो विचार करा, चहापेक्षा रस बरा’ असे मार्मिक काव्य वाचल्यावर ग्रीष्म ऋतूला प्रारंभ झाल्याचे लक्षात येते. गारपणा येण्यासाठी रसात बर्फाचा उपयोग करतात. हळूहळू या बर्फाचे प्रमाण वाढत जाते. तसातसा उन्हाळा ऐन भरात आहे हे सतत मनावर ठसत राहते. काही गुर्‍हाळांत तर रसापेक्षा बर्फच विकतात अशी माझी कल्पना आहे. रसाच्या चरकाखाली काही ठिकाणी हा बर्फ ठेवलेला असतो. त्यामुळे रस आणि पाणी याचे प्रमाण सारखे होते. नंतर निम्मा ग्लास पुन्हा पांढर्‍या खड्यांनी भरतात. असला बर्फयुक्त रस पिऊन माझ्या एका अस्सल पुणेकर मित्राचे ऊस या वस्तूबद्दल फारच प्रतिकूल मत झाले होते. काहीतरी अत्यंत बेचव आणि पाणचट रस असलेली वनस्पती इतकीच त्याची उसाबद्दल कल्पना होती. अशा उसातून गोड साखर कशी तयार करीत असतील ही त्याची नेहमीची शंका. साखर कारखान्याबद्दल म्हणूनच त्याला फार कौतुक वाटे. एकदा गावाकडचा ऐनजिनसी रस त्याला पाजला तेव्हा त्याला फारच आश्चर्य वाटले. ‘हा रस इतका का गोड लागतो?’ असा भाबडा प्रश्न त्याने मला विचारला आणि रसाची मूळची चव अशी असते हे समजल्यावर चिकट झालेले तोंड त्याने बराच वेळ उघडलेच नाही. अशी ही बर्फाची गुर्‍हाळे! गार पाणी पाजून काहीतरी गोड सेवन केल्याचा आनंद देणारी!"
................................................................................................

" ... माझ्या एका मित्राचे विद्वान चिरंजीव तर या सुमारास आपल्याला यंदा अभ्यासासाठी कोणकोणती पुस्तके आहेत याची चौकशी जरा कुठे करू लागतात. मग एकदम गाईडे विकत घेतात. मूळची पुस्तके वाचायला त्यांना वेळ मिळत नाहीच. शेवटी त्याच्या वडिलांना एकदा कळवळून सांगावे लागले, ‘‘बाळा, नेमलेली पुस्तके एकेकदा तरी वाचून काढ रे. म्हणजे गाईड वाचीत असताना तुला काहीच अडचण येणार नाही!’’"
................................................................................................

" ... ऐन परीक्षेच्या आधी वडिलांचे कळवळून पत्र आले, ‘‘अभ्यास चांगला करावा. निदान सेकंड क्लासमध्ये यावं अशी आमची इच्छा आहे.’’ परीक्षा सुरू झाली आणि स्वारी आजारी पडली. इतकी आजारी की शेवटी परीक्षा-बिरीक्षा संपल्यावर आम्ही एक-दोघांनी त्याला बरोबर घेऊन रेल्वेचा प्रवास करून घरी पोहोचवले. वाटेत त्रास होऊ नये म्हणून थर्डचे तिकीट न काढता सेकंडचे काढून बर्थवर झोपण्याची वगैरे सर्व व्यवस्था केली. घरी पोहोचल्यावर वडील आंबट चेहर्‍याने म्हणाले, ‘‘सेकंडनं आलात ना?’’ आम्ही मान हलविली तेव्हा ते म्हणाले, ‘‘चिरंजीवांचं आधीच पत्र आलं होतं. काय लिहिलं होतं माहीत आहे? मी निदान सेकंड क्लासमध्ये यावं अशी तुमची इच्छा होती. ती शिरसावंद्य मानून त्याप्रमाणं उद्या सेकंडक्लासमधून येत आहे!’’ विशी-बाविशीतल्या वयात जीवनातील कोणत्याही गोष्टीकडे निर्भयपणे पाहण्याचा हा दृष्टिकोन उत्कृष्ट असला तरी पालकाला तो बराच महाग पडतो. शाळेच्या वयात ही दृष्टी नसते."
................................................................................................

"पण उन्हाळा सुरू झाल्याची खरी जाणीव ‘पाहुणा’ या प्रकारामुळे जितकी होते तितकी क्वचितच इतर गोष्टीमुळे होत असेल. पुणे हे मध्यवर्ती शहर वधू-वरांची फार मोठी उतारपेठ असल्यामुळे या दिवसांत पाहुण्यांच्या धाडीच्या धाडी कोसळतात. ढेकूण आणि पाहुणा यांनी प्रत्येक घर भरून जाते. नातेवाईक, इष्टमित्र, सोबती, परिचित, अपरिचित– सगळ्यांनाच कुणा ना कुणाची तरी प्रेमळ आठवण होते आणि मंडळींची एंट्री हळूहळू होऊ लागते. एक पाहुणा जातो न जातो तोच दुसरा दारात पिशवी घेऊन हजर. इतकेच नव्हे तर एक घरात असेपर्यंत दुसरा अवतीर्ण होतो. त्यांच्या आनंदी मुद्रेने आणि किलबिलाटाने घराचे अगदी गोकुळ होऊन जाते. पोराबाळांसहित आलेला एखादा सधेनू व सवत्स पाहुणा असेल तर मग प्रश्नच नाही. कुणी आपल्या बबडीला स्थळ व पोराला प्रेक्षणीय स्थळ दाखवायला येतात. कुणी मुंबईच्या अगर कोल्हापूरच्या वाटेवर विश्रांती म्हणून उतरलेले असतात. ‘म्हटलं बरेच दिवस गाठ नाही. समाचार घेऊन जावं’ हा प्रेमळ मंत्र सगळ्यांच्या मुखी असतो. जेवणाखाण्याचा प्रश्न नसतोच. यजमानापेक्षा पाहुण्यांचाच हात जोरात चालावा यात काही आश्चर्य नाही. ‘काय तुमच्या पुण्याची हवा! छे! जरा हिंडून फिरून आलं की, कडकडून भूक लागते बघा!’ असा अभिप्राय मान डोलवीत व्यक्त होतो आणि आपल्यालाही पुण्याची हवा इतकी चांगली असल्याबद्दल पश्चात्ताप होतो, पण आपल्या पश्चात्तापाबद्दल उपयोग काहीच नसतो. ‘चला पर्वतीवर. पोरांना जरा पर्वती दाखवून आणू.’ असा आपल्याला आग्रह होतो. त्या प्रकारात वेळ आपला जातो आणि भूक पाहुण्यांना लागते. आज सारसबाग, उद्या शनिवारवाडा असे करीत करीत आठवडा हा हा म्हणता खलास होतो आणि पुण्यात इतकी प्रेक्षणीय स्थळं असावीत याचा आपल्याला संताप येऊ लागतो. ... "

This was definitely written not before 1966 June. 
................................................................................................

" ... याच सुमारास रेल्वे आणि एस.टी. ही पाहुण्यांना फितूर होते. आठ-आठ दिवसांची रिझर्व्हेशन संपली आहेत ही माहिती पाहुणा मोठ्या आनंदी मुद्रेने आपल्याला सांगतो आणि आपले तोंड खेटर मारल्यासारखे होते. आमच्या एका मित्राचे एक पाहुणे तर फारच नामांकित निघाले. रिझर्व्हेशन्स मिळत नाहीत हे पाहिल्यावर ते संतापाने म्हणाले, ‘‘बस बस! या रिझर्व्हेशनच्या मागे शहाण्याने कध्धी लागू नये. मी तर आता साफ ठरवलंय–’’  

"मित्राला मोठी आशा वाटली. आता हे पाहुणे पायीच चालत जायचं म्हणतात की काय या विचाराने त्याला गुदगुल्या होऊ लागल्या, पण चेहरा गंभीर ठेवून त्याने आशाळभूतपणे विचारले, ‘‘काय, काय ठरवलंय तुम्ही बाबूकाका?’’"

"‘‘ही गर्दी संपेपर्यंत आता त्या दिशेला फिरकायचं म्हणून नाही. जाऊ सावकाश आपण गावी. इतके दिवस राहिलो. आता आणखी आठ-पंधरा दिवसांनी काही मी मरत नाही.’’"
................................................................................................

"‘‘पण बाबूकाका, बायकामुलं तिकडं मिरजेला अन् तुम्ही इकडं. त्यांना तुमची सारखी आठवण येत असेल नाही?’’  

"बाबूकाका एकदम आठवल्यासारखे करून म्हणाले, ‘‘होय की, तेही खरंच–’’ 

"‘‘मग?’’ मित्राच्या मुद्रेवर पुन्हा टवटवी आली. 

"‘‘आता असं करतो–’’ बाबूकाका विचार करून म्हणाले, ‘‘तुम्ही म्हणालात ते अगदी खरं. पोरांना सारखी माझी आठवण येत असणार. आजच्या आज त्यांना पत्र टाकतो अन् इकडंच बोलावून घेतो म्हणजे झालं!’’ 

"आमच्या या मित्राचे पुढे काय झाले ते मी सांगितलेच पाहिजे काय?"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 22, 2022 - August 22, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
जातीय दंगली : काही विचार  
................................................................................................
................................................................................................

" ... हे सगळे नेहमीचेच आहे. पहिल्यांदा ‘जातीय’ नावाखाली मोडणार्‍या दंगली कुठल्या तरी गावात होतात. एक जमात दुसर्‍या जमातीवर हल्ला चढविते. काही पूजास्थाने, प्रार्थनास्थाने यांच्यावर दगडफेक होते. क्वचित त्यांची जाळपोळही होते. या दोन जमाती कोणत्या आणि कुणी कुणावर हल्ला केला हे वृत्तपत्रात लवकर प्रसिद्ध होतच नाही, कारण तसे झाले तर या दंगलीचे लोण दुसरीकडेही पसरेल अशी सरकारला भीती वाटते. म्हणून बातम्या मोघम देण्यात येतात. आपण वाचकांनी ‘गाळलेले शब्द भरा’ हे कोडे सोडवताना जी बुद्धी वापरतो, तीच येथे वापरावयाची असते. यात फारसे डोके खाजवावे लागत नाही. शिवजयंतीच्या मिरवणुकीवर हल्ला असे म्हटल्यावर ही मंडळी कोण हे ध्यानात येतेच. ‘पूजास्थान’, ‘प्रार्थनास्थान’ या शब्दामागचेही रहस्य उलगडू लागते. अगदी सोपे आहे. सरकारलाही समाधान वाटते की, बातम्यांचा भडकपणा आपण टाळला आणि वस्तुस्थिती ताबडतोब समजल्यामुळे आपणालाही समाधानाचा ढेकर येतो. येऊन जाऊन कोणत्या जमातीची किती माणसे मेली, किती घायाळ झाली, किती कुटुंबे गाव सोडून गेली आणि जळालेल्या दुकानांची संख्या किती हे समजायला मात्र थोडा वेळ लागतो, पण चाणाक्ष वाचकाला तेही अदमासाने ताडता यायला हरकत नाही. पाकिस्तान रेडिओ एकसारखा ठणाणा करू लागला की, पाणी मुरते आहे हे ओळखावेच, पण पंतप्रधानांपासून सर्व सत्ताधारी पक्ष हादरला असेल, तर मग खूणगाठ बांधायला हरकत नाही की, या प्रकारात अल्पसंख्य नावाच्या गरीब जमातीचेच जास्ती नुकसान झाले असावे. त्यांनी भराभरा निषेध प्रकट केले आणि पत्रके काढली की, या जमातीने बराच चोप खाल्ला असावा असे पक्के समजण्यास हरकत नाही. पंतप्रधानांनी आणि वरच्या बड्यांनी त्या भागात पायधूळ झाडली आणि (मुख्य म्हणजे) सरकारच्या लाडक्या मुसलमान मंत्र्यांनी दंगलग्रस्तांची जातीने विचारपूस केली, असे वृत्त प्रसिद्ध झाले की, मग खात्रीच पटते. याउलट एखाद्या गावी दंगल होऊनही वरच्या लोकांनी त्याची फारशी दखल घेतली नाही तर मग हिंदूंनी मार खाल्ला असे समजण्यास मुळीच हरकत नाही. नुकसानभरपाई मिळण्यास ताबडतोब सुरुवात झाली नाही तर मग वरील अंदाज अगदी पक्का!"
................................................................................................

" ... दंग्याच्या बाबतीत नेहमीच एक गोष्ट घडते. (निदान पुढारी मंडळी तसे सांगतात) ती ही की, अशा दंगलीत निरपराध माणसे मारली जातात आणि गुंड नेमके सुटतात. गोष्ट बहुधा खरीच असली पाहिजे! ... गुंड लोक हे तर बोलून-चालून गुंड. ते निसटणारच, कारण निसटण्याची कला त्यांना सफाईदारपणे येत असते. हे जर खरे असेल तर सामुदायिक दंडाची कल्पना स्वीकारली पाहिजे. हा दंड सरकारने बसविला तर कोणीच कुरकुर करण्याचे कारण नाही, कारण तो निरपराध लोकांवर मुळीच बसणार नाही. निरपराध लोक मारले गेलेले असतात. दंड हा या दंगलीतून निसटलेल्या लोकांवरच बसवायचा ना? मग निसटलेले लोक हे पक्के गुंड असे एकदा ठरल्यावर त्यांना दंड करावयाचा नाही तर कुणाला करावयाचा? किंबहुना केवळ दंडावर या चोरांचे भागणार म्हणजे गुन्ह्याच्या मानाने फारच कमी शिक्षा म्हटली पाहिजे. मला तर वाटते की, सरकारने हा दंड बसवावाच आणि जिवंत राहिलेल्या माणसांनी तो बिनतक्रार देऊन टाकावा. उगीच कटकट करू नये!"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 22, 2022 - August 22, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
गणेशोत्सवाविषयी थोडेसे  
................................................................................................
................................................................................................

" ... लोकमान्य टिळकांनी समाजात जागृती करावी म्हणून ही प्रथा पाडली असे शहाणे लोक सांगतात, पण आता ही जागृती भलतीच झाली आहे. आता कार्यक्रमासाठी मंडपात गोळा झालेले लोक झोपतात आणि आसपासच्या घरातले लोक मात्र रात्रभर जागे राहतात, असा अनुभव येतो. या कार्यक्रमाचा आता ठराविक साचा बनलेला आहे. नारळी पौर्णिमा उलटते न उलटते तोच गल्लीतली उत्साही मंडळी घरी हेलपाटे घालू लागतात. ती वर्गणी चुकविणे आपल्याला कधीच शक्य होत नाही. पैसे देऊन दहा दिवस हा ताप आपण का सहन करावयाचा, असा घोर प्रश्न आपण त्यांना विचारू शकत नाही. एकाच गणपतीची वर्गणी द्यावी लागली तर तुम्ही नशीबवान. बहुधा दुसरा एखादा जवळपासचा ताफा येतो आणि तोही हात पसरतो. ‘आम्हीही गणपती बसवायचा ठरवलाय. उत्साही माणसं आहेत. तुम्ही नाही दिलंत तर मग कोण देणार? तरूण माणसांना उत्तेजन द्यायलाच पाहिजे. यंदा कार्यक्रम चांगले करायचे ठरवलंय आम्ही!’ या शब्दांनी तुमच्या मोठेपणाला आवाहन केले जाते! तुम्ही नाही म्हणणे शक्यच नसते. त्यातल्या त्यात एखाद-दुसर्‍या रुपयात हे प्रकरण मिटविण्यासाठी तुमची चुळबुळ चाललेली असते, पण त्यापाठोपाठ लहान मुलांचा तांडा येतो. ‘आम्ही मुलामुलांनी गणपती बसवायचा ठरवलाय!’ इथून त्यांच्या नाटकाला सुरुवात होते. त्यांचे बोलणे इतके लाघवी असते की, तुम्ही नकारघंटा वाजवू शकत नाही. एकदा वर्गणी मिळाल्यानंतर मात्र ही मंडळी जी बेपत्ता होतात ती पुढच्याच वर्षी भेटतात. उत्सवाच्या मंडपात त्यांचे दर्शन झाले तर गणेशाच्या दर्शनापेक्षाही अधिक आनंद! कार्यक्रमाची छापील पत्रिका तुमच्या घरात पडली तर मग तुम्ही फारच भाग्यवान!"
................................................................................................

" ... मग कार्यक्रमाची गर्दी उसळते. सकाळ-संध्याकाळी श्रींची आरती आणि प्रसाद असतो. मुख्यत: कार्यकर्ते आणि लहान बालके यांच्यासाठी असतो. कार्यक्रमाला प्रतिष्ठितपणा असावा म्हणून या कार्यक्रमाला एखाद्या विद्वान वक्त्याचे भारदस्त भाषण टाकलेले असते. हा विद्वान वक्ता निर्ढावलेला नसेल तर खूप तयारी करून येतो, पण ते ऐकण्याची जनतेची इच्छा मात्र अजिबात दिसत नाही. ही जनता अशा कार्यक्रमाच्या वेळी नेमकी कोठे गडप होते हे काही कळत नाही. नाही म्हणायला घरी झोप येत नाही म्हणून दहा-पाच वृद्ध मंडळी, चार-दोन भोळसट बाया, दहा-पंधरा पोरे एवढा लवाजमा ‘श्रोते’ या नावाखाली तेथे गोळा झालेला असतो. पोरांना कसलाच उद्योग नसल्यामुळे व उत्सवाच्या नावाखाली रात्र-रात्र उनाडक्या करायला मिळत असल्यामुळे त्यांचा संच हजर असतो, पण भाषण सुरू झाल्यानंतर दहा मिनिटांनी त्यांचा त्यातील ‘इंटरेस्ट’ खलास होतो. मग त्यांचा विद्वान वक्त्यांच्या देखत हुतूतू, लपंडाव असा जो खेळ सुरू होतो तो मोठा पाहण्यासारखा असतो. काही वेळेस हा खेळ इतका तल्लीनतेने खेळला जातो की, आपण भाषण करायला आलो आहोत की, खेळाचे पंच म्हणून आलो आहोत याची पाहुण्याला पंचाईत पडते. पेन्शनर मंडळी खांब, भिंत धरून बसलेली असल्यामुळे त्यांचे डोळे मिटलेले राहणे अगदी स्वाभाविक असते. अर्थात त्यामुळे ही मंडळी एकाग्रचित्ताने भाषण ऐकत आहेत असेही पाहुण्याला वाटते व त्याचे समाधान होते. स्वयंसेवक मंडळींत तरुण मुले व मुली असतात. त्यांच्यापैकी एखाद-दुसरी गणपतीच्या कृपेने बर्‍यापैकी असली तर स्वयंसेवक तरुण वर्ग सर्वच्या सर्व हजर असतो. ती कार्यकर्ती निघून गेल्यावर तोही अदृश्य होतो. उत्सवाचे चिटणीस आता कॉफीपानाची व्यवस्था बघत असतात. त्यामुळे कार्यक्रमाला एकदा सुरुवात करून दिल्यावर मग ‘आपले कर्तव्य आपण बजावले’ या आनंदात ते आतच असतात. व्याख्यानाच्या शेवटी शेवटी तर गणपती धरून दहा-बारा मंडळी मंडपात राहिली तरी पुष्कळ झाले अशी अवस्था असते. तरीही वक्त्याचा वेळ हा अमूल्यच असतो. त्याने ज्ञानदानाचे पवित्र कर्तव्य बजावलेले असते आणि म्हणून त्याचे दणदणीत सुरात आभार मानले जातात."
................................................................................................

" ... एके काळी भावगीत गायक हा कौतुकाचा विषय होता. त्याचे नाजूक स्वरातील बायकी दळण ऐकणे सबंध उत्सवातले एक मोठे आकर्षण असे. मधूनमधून चिठ्ठ्या-चपाट्या, फर्माईश, गीताचे नाव सांगितल्यावर मिळणार्‍या टाळ्या... हा सगळाच प्रकार गायकाचे मनोधैर्य वाढविणारा ठरत असे. तरुण मंडळींची गर्दी अर्थातच अशा कार्यक्रमाला ठरलेली. हाच तो कार्यक्रम नेत्रकटाक्ष टाकण्याचा, वाह्यात मल्लीनाथी करण्याचा, जमल्यास लगट करण्याचा आणि जमल्यास जमविण्याचाच! हा कार्यक्रम पार पडला आणि कुजबुज करावी असे काहीच घडले नाही म्हणजे कसे चमत्कारिक वाटते! पुढे महिना-दीड महिना गल्लीतल्या मंडळींना चकाट्या पिटायला विषय याच वेळी मिळतो. ... "
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 22, 2022 - August 22, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
लढाईची खुमखुमी  
................................................................................................
................................................................................................

"गेल्या दोन-तीन पिढ्यांत लढाई अशी कधी झालीच नव्हती. सर्वत्र शांतता होती. कोठेही दोन राष्ट्रांमध्ये वैर उत्पन्न झाले आणि त्यामुळे युद्ध झाले हा प्रकार पाच-पन्नास वर्षांत कधी घडलेला नव्हता. म्हणून एकदा लढाई व्हावी असे राजाला फार वाटत होते. सैनिकांच्या वीरगर्जना, तलवारींचा खणखणाट, तोफांचा गडगडाट, भाल्यांचा चमचमाट या गोष्टी डोळ्यांनी पहाव्या आणि धन्य व्हावे अशी त्यांच्या मनात इच्छा उत्पन्न झाली होती; पण तसे काही घडेल असे दिसेना तेव्हा त्यांनी आपल्या प्रधानांना बोलावले व त्यांचा सल्ला विचारला. 

"मुख्य प्रधान गंभीरपणे म्हणाले, ‘‘महाराज, लढाई सुरू करायची असेल, तर ती परराज्याशी करावी लागते. दुसरी गोष्ट त्यासाठी काहीतरी भांडणाचं निमित्त काढावं लागतं. सध्या तसं काही निमित्त मला तरी दिसत नाही.’’

"महाराज म्हणाले, ‘‘निमित्त नसलं तर काढा. आपण नुसता निरोप पाठवला आणि ‘चल, ये लढाईला’ असं नुसतं म्हटलं तर चालणार नाही का?’’"
................................................................................................

"राजेसाहेबांचे मेव्हणे त्यांच्याच कृपेने प्रधानमंडळात होते. ते डोके खाजवीत म्हणाले, ‘‘कारण काढायला कितीसा वेळ? परवाच माझा एक मित्र सांगत होता की, ह्या आपल्या पलीकडच्या राज्यातले लोक फारच आळशी आहेत. सकाळी लवकर कोणी उठत नाही. आपण त्यांना याबद्दल जाब विचारू.’’ 

"‘‘काय म्हणून विचारायचं?’’ 

"‘‘का नाही उठत लवकर? असं विचारायचं. लवकर उठा नाहीतर लढाईला तयार व्हा असा दम भरायचा अन् लगेच सैन्य सरहद्दीकडे न्यायचं.’’"
................................................................................................

" ... सगळे सैन्य दोन्ही राज्याच्या सीमेवर जाऊन पोहोचले. सीमेपाशी न थांबता लगेच युद्ध सुरू करण्याचा राजाचा विचार होता, पण शूत्रच्या प्रदेशात कुणीच सैनिक दिसेनात. शिवाय त्यांचे उत्तर येईपर्यंत आपण थांबावे हे बरे, असे मुख्य प्रधानांनी सुचविल्यामुळे राजाने आपला बेत रद्द केला."
................................................................................................

"आठ-दहा दिवसांतच त्या शेजारच्या राजाचे उत्तर घेऊन सांडणीस्वार आला. राजाने ताबडतोब सगळ्यांची बैठक बोलावली. पत्र वाचायला सांगितले. मुख्य प्रधानांनी पत्र वाचायला प्रारंभ केला. 

"‘‘...तुमचे म्हणणे पूर्णपणे बरोबर आहे. आमच्या राज्यातील लोक पूर्णपणे आळशी आहेत आणि ते सकाळीही लवकर उठत नाहीत. तुमचे पत्र आल्याबरोबर आम्ही सगळीकडे जाहीर केले की, आळस सोडा आणि सकाळी उठण्यास तयार व्हा. कळविण्यास आनंद होतो की, त्याप्रमाणे लोक हल्ली लवकर उठू वगैरे लागले आहेत. त्यांनी आळस तर अजिबात टाकून दिला आहे. तेव्हा या प्रकरणी युद्ध करण्याची काहीही गरज राहिलेली नाही. बहुत काय लिहिणे!...’’"
................................................................................................

"सैनिकांनी पुन्हा एकदा तलवारी चिंचेने घासून काढल्या. लिंबू-राख घासून तोफा चकचकीत केल्या. महाराज आणि प्रधानमंडळ स्वत: सरहद्दीवर येऊन दाखल झाले. आता शत्रूचे उत्तर आले रे आले की, शस्त्रांचा खणखणाट सुरू करायचा.  

"चार-सहा दिवसांनी शेजारच्या राजाचा दूत घोड्यावरून दौडतदौडत आला. त्याने दिलेले पत्र मुख्य प्रधानांनी वाचायला सुरुवात केली– 

"‘‘...तुम्ही लिहिता त्याप्रमाणे सरहद्दीवरचे सर्व अरण्य तुमच्या मालकीचे आहे की काय, याविषयी आम्ही जुने कागदपत्र चाळून संपूर्ण शोध केला. कळविण्यास आनंद वाटतो की, हे अरण्य संपूर्णपणे तुमचेच आहे, असे आमच्या दृष्टोत्पत्तीस आले. तरी हे अरण्य आणि त्या जवळपासची खेडी यांचा आपण कृपा करून ताबडतोब ताबा घ्यावा. दहा-पाच झाडे कमी-जास्त असल्यास दुसरीकडील कोठलीही घेऊन भरती करावी. मात्र या अरण्यात दलदल फार माजली असून डास-मच्छरही विपुल आहेत. तेथील खेडेगावांतून रोगराईची साथही जोरात पसरली असल्याचे आमच्या कानावर आले आहे. तरी ताबा घेताना कृपा करून आपल्या सैनिकांना योग्य ती काळजी घेण्याबाबत सूचना द्याव्यात. हे अरण्य आमच्या राज्यात कसे आले याबद्दल चौकशी करीत असून, या हलगर्जीपणाबद्दल बेजबाबदार अधिकार्‍यांना कडक शिक्षा करण्याचे आम्ही ठरवले आहे...’’"
................................................................................................

"‘‘म्हणजे त्याचं असं आहे– ते म्हणाले, की आमची काही भांडायची इच्छा नाही. लढाईला तयार व्हा म्हणून तुमचं म्हणणं असेल तर आम्ही लढाईला तयार होऊ, पण इतक्यात आम्हाला काही लढता येणार नाही–’’  

"‘‘कारण?’’ 

"‘‘कारण लढाई कसली असते ते आम्हाला नीटसं ठाऊक नाही. ठाऊक नसताना लढाई करणं बरं नाही. तुमचा अपमान केल्यासारखे ते होईल. तेव्हा आम्ही लढाईचं शिक्षण वगैरे घ्यायला सुरुवात केली आहे. ते शिक्षण पूर्ण झालं म्हणजे मग मी तसा निरोप पाठवतो.’’ 

"‘‘अस्सं?...’’ महाराज थोडे विचारात पडले, ‘‘बरं, पण किती दिवस लागतील हे शिक्षण घ्यायला हे काही सांगितलं का त्यांनी?’’ 

"‘‘होय महाराज.’’ 

"‘‘किती दिवस?’’ 

"‘‘पंधरा ते वीस वर्षं.’’"
................................................................................................

" ... ‘‘हे असं चालणार नाही. कळवा त्यांना. ताबडतोब पत्र पाठवा. म्हणावं लढाईचं शिक्षण ताबडतोब घ्या. नाहीतर... युद्धाला तयार व्हा!’’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 22, 2022 - August 22, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
जीवन : एक क्रीडांगण
................................................................................................
................................................................................................

" ... गोट्या, लगोर्‍या, हुतुतू, झाडावरचे खेळ, मलखांब (थोडीशी तालीमसुद्धा) हे सगळे खेळ बाद होत गेले. विटीदांडू खेळताना ‘राज्यपाणी’च्या खेळात चार-पाच वेळा तरी विट्टी डोळ्याजवळच्या भागाला लागून मोठ्या खोका पडल्या. दर वेळी डोळा थोडक्यात बचावल्याबद्दल आई देवाचे आभार मानी आणि मला शिव्या घाली. तेव्हापासून विटीदांडू संपलाच! मलखांब खेळताना उलटे फिरल्यावर पाय मलखांबाला घट्ट धरून ठेवायचे असतात हे एकदा विसरलोच आणि खाली आपटून तोंड फुटले, तेव्हापासून तोही नाद सुटला. हुतुतू बर्‍यापैकी खेळता येत होता आणि मी ‘टीम’मधला ‘जंपर’ म्हणूनही प्रसिद्ध होतो, पण या खेळात अंगात बरीच रग लागते. ती नसल्यामुळे मी माघार घेतली."
................................................................................................

"पुढच्या शाळकरी वयात क्रिकेट खेळून पाहिला, पण समोरून भरधाव येणारा चेंडू पाहिल्यावर माझे डोळेच फिरत आणि हातापायांची जागच्याजागीच जलद हालचाल सुरू होई. एक-दोनदा या चेंडूने गुडघ्याच्या नडगीवरच निर्दयी हल्ला केल्यामुळे मला क्रिकेटची फारच दहशत बसली. या परदेशी खेळावर मी ताबडतोब बहिष्कार घातला. पुढे खेळ हा प्रकार जवळजवळ संपलाच."
................................................................................................

" ... पोटापुरती मिळकत, लहानसे घर, एक बायको, एक-दोन पोरेबाळे, थोडीशी समाजकार्याची हौस, थोडीशी कलेची उपासना, चार-दोन जवळचे मित्र, भरपूर गप्पागोष्टी आणि आनंद-दु:खाचा सोशिकपणे स्वीकार. बस्स! आयुष्य असे सरळ व साधे असावे. असे जीवन जगण्यासाठी लागणारा आनंद गप्पागोष्टींच्या खेळातून मिळतो. माफक महत्त्वाकांक्षा असली म्हणजे हा खेळ जमतोही छान! त्या दृष्टीने जीवन हे क्रीडांगणच आहे असे कुणी म्हटले तरी चालेल. क्रीडांगणाऐवजी ‘गप्पांगण’ हा शब्द कुणी सुचवला तरी आपली हरकत नाही!"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 22, 2022 - August 22, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
सरमिसळ : द. मा. मिरासदार / विनोदी कथासंग्रह 
Sarmisal (Marathi) 
Marathi Edition  by D.M. MIRASDAR  (Author)  
................................................
................................................
August 11, 2022 - August 22, 2022. 
Purchased August 01, 2022

Format: Kindle Edition
Kindle Edition
Publisher‏:- ‎MEHTA PUBLISHING HOUSE 
(25 May 1905)
Language:-‎ Marathi

ASIN:- B01N7JTUEO
................................................
................................................

द. मा. मिरासदार 
१२६०, अक्षय सहनिवास, 
तुळशीबागवाले कॉलनी, 
सहकारनगर नं.२, पुणे - ४११ ००९

© सुनेत्रा मंकणी 
प्रकाशक : सुनील अनिल मेहता, 
मेहता पब्लिशिंग हाऊस, १९४१, सदाशिव पेठ, 
माडीवाले कॉलनी, पुणे – ४११०३०.
................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4914260798