Wednesday, February 2, 2022

Bolka Shankh बोलका शंख, कथा ग. दि. माडगूळकर by G.D. Madgulkar.

................................................................................................

Bolka Shankh
बोलका शंख 
कथा ग. दि. माडगूळकर
by G.D. Madgulkar
................................................................................................
................................................................................................

The first one reminds one of Thurber's most hilarious account of a night in his family, although neither storyline nor characters have anything in common. It's just the quality of normal situations gone out of hand unexpectedly. 

Further, there are more heart breaking ones than humorous, with rare exceptions. 
................................................................................................
................................................................................................
REVIEWS 

एक घर आपलंच आहे

"नवरामुलगा जाग्यावर नसल्यामुळे मथुरेची मंडळी ‘लताकुंजा’त स्थिरावली. एका मुलीच्या लग्नासाठी साती भगिनींनी मुंबईत मुक्काम ठोकण्याचे तसे काहीच प्रयोजन नव्हते; पण तसे विचारणे एकाही ठाणेकर कुलोत्पन्नाला साधले नाही. नवरीमुलगी जाग्यावर नसल्यामुळे देशमुखबंधूही लताकुंजात रोवले. धाकट्या भावाचे लग्न जमविण्यासाठी मोठ्याने थांबणे तर वाजवीच होते. शिवाय मोठ्या भावाचे सरकारी कामही अद्याप संपलले नव्हते. ब्रह्मे आणि मार्तंड हे बोलून चालून नवरात्रासाठीच आले होते. त्यांचा मुकाम पडला तो पडलाच. नऊ रात्री गेल्या; पण त्यांचे नवरात्र संपेना. 

"पत्नीबद्दल विलक्षण प्रेमभावना असूनही गोपाळराव अलीकडे लवकर हाफिसला जाऊ लागले आणि उशिरा परत येऊ लागले. बन्याने आपली सारी सहृदयता शिरू आणि अरू यांच्यावर केंद्रित केली. तो त्यांना रस्त्यात गाठू लागला आणि बाजारचे जेवू घालून मग घरी त्यांना नेऊ लागला. सुमित्राबाई चोवीस तास पाहुण्यांची सरबराई करू लागल्या. शीलाने मार्तंडाच्या भलेपणाबद्दल शंका घेतल्याने, मथुरावासी आणि सातारकर यांची पंगत एकत्र जेवेना. देशमुख आणि मथुरावासी यांच्यात मात्र काही तेढ नव्हती. ती दोन घराणी गुण्यागोविंदाने नांदू लागली. मधुमेहाच्या आहाराचे निमित्त करून सुमित्राबाई ब्रह्मे आणि मार्तंड यांना स्वतंत्र वाढू लागल्या. सारे सुरळीत बिनबोभाट चालू झाले."

"तीन-चार दिवसांनी पाहुणे तर गेले नाहीतच, फत राम आणि शीला मात्र पळून गेली. साऱ्या लताकुंजात कलकलाट सुरू झाला. सुमित्राबाईंना तोंड काढणे अशय झाले. शांताबाईंनी तर त्यांच्यावर इतके तोंडसुख घेतले की, जणू काही शीलाऐवजी त्याच पळून गेल्या होत्या. शांताबाईंच्या यजमानांनी गोपाळरावांना धरले, ‘नालायक माणसांना घरी थारा दिला तुम्ही. माझे सर्वस्व गेले. पोरगी उठून गेली. आता मी हे तोंड जगात कसे दाखवू!’"

"मुंबईचे घर आता गेल्यातच जमा होते; पण त्यातल्या त्यात गोपाळरावांना एक समाधान वाटले की, त्या सात कन्या, त्यांची मातापितरे, ब्रह्मभास्कर आणि मार्तंड - ते इन्स्पेटर यांपैकी कुणीही आता त्या जागेत राहत नव्हते."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................

February 02, 2022  - February 02, 2022.  

दोन मद्यालयाची वाट

" ... मी कुणाला ठार मारू? माझ्या दोन चिमण्या पोरांच्या आईला? मला जीवदान दिलं त्या दोस्ताला? मला या सवालाचा जबाब तेव्हा सापडला नाही. अजून सापडला नाही... मला स्वत:ला मरायचं नाही. माझी बायको, माझी लेकरं यांना मला सांभाळायचं आहे. त्या दोस्तावर हात टाकण्याची हिंमत मला होत नाही. कुणी दिलं नव्हतं, कुणी देणार नाही ते त्यानं मला दिलंय. जिथं जिथं भरोसा ठेवला तिथं तिथं धोका वाट्याला आला. मी काय करू? परवडत नाही तरीही एकच गोष्ट मी करीत राहतो -दारू पितो. ... "
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
February 02, 2022  - February 02, 2022.  
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
तीन सगुणा

"सगुणा दिसायला सुंदर होती असे नाही. पण तरुणपणात तिचे दर्शन बरे असावे इतके मात्र आजही ध्यानात येत होते. बघ्यांचा त्रास व्हावा असे तिचे वय राहिले नव्हते. तरी तिच्या चालण्यात जुनी भीती उरलेली होती. चालताना ती खाली बघून चाले आणि तेव्हा फार त्वरेने चाले. आमच्या बंगल्यापासून जवळजवळ दोन मैलांवर तिचे बिऱ्हाड होते. रोज सकाळी ती तेथून चालत येई. संध्याकाळी चालतच परत जाई. माझ्या पत्नीचे तिच्याशी वागणे मोलकरणीशी मालकिणीने वागावे तसे नसे. मोलकरणीपेक्षा ती तिची मैत्रीण होती असे म्हटले तरी वावगे होणार नाही. माझी पत्नी तिला सर्वतोपरी मदत करायची, तर उरलेसुरले अन्न रोज तिच्या पदरी पडायचेच; पण सणासुदीचे वाढणे थोडे वाढवूनच तिला मिळायचे. आमच्या पोरांबाळांचे जुने कपडे सगुणेच्या पोरांना पुरून उरत. 

"अवलियाला ‘भोग’ पोचविण्याची जबाबदारी माझ्या पत्नीने सगुणेवर सोपविली. सर्वांची जेवणे व्हावयाच्या आधी ती नैवेद्याचे वाढावे तसे एक पान वाढू लागली, ते सगुणेच्या स्वाधीन करू लागली. सगुणा ते पान घेऊन कुंपणाबाहेरच्या त्या अवलियाला पोचवू लागली. हा क्रम बरेच दिवस चालू राहिला."

""काय सांगितलं ग तुला सगुणेनं?” 

""हंऽ अंऽ” तिने नि:श्वास टाकला. थोडा वेळ ती गप्पच राहिली. मग हलकेच ती सांगू लागली. "अहो, तुम्ही माझ्यावर रागावून गेला होता ना एकदा! सातआठ दिवसांत तुमचं पत्र आलं नाही तेव्हा माझा धीर सुटला. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’. मी वेड्यासारखी वडाखालच्या त्या भिकाऱ्याकडे गेले. लोक म्हणतात. त्याला अदृष्ट दिसतं. मी त्याच्यापुढं गेले तेव्हा तो हसला आणि त्यानं हाताची चार बोटं हवेत नाचवली... बरोबर चार दिवसांनी तुम्ही परत आला. मला त्या अवलियाच्या शतीची खात्री पटली. मी नियम केला, त्याला दररोज ताजं जेवण द्यायचं. ते जेवण सगुणा द्यायची. पहिल्या दिवशी तिनं ते अवलियाला दिलं आणि दुसऱ्या दिवसापासून ती कुणा भलत्यालाच ते द्यायला लागली...” 

""तो कोण होता?” मी विचारले. 

""ते तिनं आज सांगितलं!” 

""कोण होता?” 

""तो तिचा नवरा होता.” 

""आज तिथं होता तो?” 

""तो नव्हे-” 

""मग?” 

""तिथं होता तो तिचा दुसरा नवरा आणि भीक मागायला येत होता तो पहिला नवरा.” 

""दोन लग्नं केली होती सगुणानं?” 

""हुं.” "कमाल आहे!” 

""कमाल कसली? पहिल्या नवऱ्याला दारूचं व्यसन होतं तिच्या. तो तिला मरेतो मारायचा.” 

""मग पुन: कशाला वाढत होती त्याला?” 

""बाई आहे ना ती! बायांची जात अशीच मूर्ख. तिनं दोन लग्नं केली होती तर खरी. मला तसं सांगण्याचा धीर मात्र तिला जन्मभर झाला नाही. गेली बिचारी!”
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
February 02, 2022  - February 02, 2022.  
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
चार ऋणानुबंध

""राजाचे काय झाले असेल ते मला सांगवत नाही. त्याने हातातली बॅग फेकून दिली. एखाद्या लहान मुलासारखा धावत तो माझ्या आईजवळ गेला आणि तिला मिठी मारून वेड्यासारखा रडू लागला. त्यापूर्वी तो माझ्या आईशी मोकळेपणाने कधी बोलला नव्हता. त्या दिवशी त्याने आपले सारे भाव तिच्याजवळ मोकळे केले. सुलभा जिवंत असताना तो तिच्याशी कधी बोलला नव्हता. ती गेल्यावर मात्र त्याने मोठमोठ्याने टाहो फोडला."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
February 02, 2022  - February 02, 2022.  
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
पाच बोलका शंख

"आपल्या घराण्यात एक युगप्रवर्तक साहित्यिक जन्माला आला आहे हे त्याच्या बापाला कळले नव्हते, आईला समजले नव्हते, की भावंडांना उमजले नव्हते. एका महान कथाकाराशी आपले जन्माचे नाते जडले आहे, हे सत्य दुर्दैवी सरितेच्याही ध्यानी आले नव्हते. एका श्रेष्ठ वाङ्मयकाराचे आपण भाग्यवान वंशज आहोत, याचा पत्ता त्याच्या प्रजेला लागला नव्हता. कधी काळी त्यांना तसा पत्ता लागेल, अशीही आशा मन्याला वाटत नव्हती."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
February 02, 2022  - February 02, 2022.  
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
सहा निर्वाण

" ... कालव्याची बोलवा उठली आणि मावळतीकडच्या तांबड्या रानात पाचशे कुदळी कामाला लागल्या. पांढऱ्या टोप्या घातलेल्या पुढाऱ्यांची ये-जा सुरू झाली. इतके सगळे झाले, तरी आरणगावचा गावगाडा अजून पहिल्याच धोपटवाटेने चालला होता. बावऱ्या वेसकर घराघरांतून हक्काची भाकरी मागत फिरत होता. बांधाबद्दलच्या भांडणाने कातावलेला कुळवाडी कायद्याची रेघ पुसण्यासाठी, आप्पाजीपंत कुलकर्ण्याच्याच दारात बसत होता. गावकराच्या घरात होऊ घातलेल्या मंगल समारंभाचे आवतण पहिल्यांदा जानू पाटलाच्या वाड्याकडेच जात होते. गावात पोलीस गेट आले तरी गावच्या नायकांनीं आपली रखवालदारी सोडली नव्हती. महारवाड्यातील आठी-सोळा महार कुळवाड्याच्या मळ्यातील सऱ्यावाकोऱ्या पाडीत होते. सुतार औताची कुणी बसवून देत होता. लोहार लोखंडी मोटा दुरुस्त करीत होता. गुरव घरोघरी बेल-पत्रावळी वाटीत होता. कुंभाराचे चाक गावासाठी फिरत होते. तुटकी वहाण सांधण्याचा मोबदला नव्या पैशांत मागण्याची हिम्मत व्हलाराला होत नव्हती. गावाच्या मध्यभागी बांधलेल्या कौलारू इमारतीवर ‘समाज-मंदिर’ अशी पाटी लटकली होती; पण गावकरी अजून तिला ‘चावडी’च म्हणत होते. विकास-योजनेचे अधिकारी आरणगावचा विकास पुरा झाल्याच्या समाधानात होते. आरणगाव मात्र होता तसाच होता."
................................................................................................

"उजाडता उजाडता तो दगडी कुसाजवळ आला आणि त्याच्या भाईबंदांनी त्याला घेरला. त्याच्या डोयावर काठ्यांचे प्रहार बसले. जीव मुठीत धरून तो तिथून निसटला. रानोमाळ धावत जगू पाटलाच्या पडळीवर आला - त्याला आठवत होतं, पाटलाची म्हातारी वैद्यकी जाणते. पडळाच्या अंगणात येऊन त्याने जोराने हाक मारली, "आई-” 

""कोण हाय?” म्हातारीचा आवाज आला. 

""मी बावऱ्या तराळ. मार बसलाय मला आई, दव्यासाठी आलोय.” 

""वर ये बाबा, मला दिसत न्हाई.” 

""मी वर कसा येऊ? मी म्हार हाय.” 

""आजाऱ्याला जात नसती, ये, वर ये,” पाटलाची म्हातारी ओरडून म्हणाली. 

"म्हातारीच्या त्या बोलण्याने बावऱ्याचा जीव थंडावला. जातीगोतीचे अंतर क्षणार्धात भरून आले. जन्मात पहिल्यांदा तो पाटलाची पडळ चढून वर जाणार, एवढ्यात त्याच्या काळजातून भयंकर कळ निघाली. पडळीच्या पायरीशीच तो मटकन खाली बसला. बसतो न बसतो इतयात तो खाली कोसळला. त्या जखमी महाराची सारी हालचाल बंद पडली. तुटकी घोंगडी जिथल्या तिथे टाकून त्याचा निर्मळ आत्मा निघून गेला. 

""आम्ही बावऱ्याच्या मुडद्याला शिवणार देखील नाही.” या महारवाड्याच्या निरोपाने गावातली शेलकी मंडळी बिथरली. हट्टाला पेटली. त्या जुनाट महाराचा देह पाटलाच्या अंगणातच गरम पाण्याने माळ-बुका ल्याला. त्याच्या शेवटच्या पालखीला आप्पाजीपंत कुलकर्णी, जानू पाटील, सीताराम पवार अशांनी खांदा दिला. आंधळी पाटलीण म्हणाली, "पुण्याई हुती बिचाऱ्याची.” बावऱ्याच्या अंत्ययात्रेपुढे भजनी मंडळी गात होती, ‘आम्ही जातो आमुच्या गावा| आमचा राम राम घ्यावा॥’ गावी जाणाऱ्या त्या पाहुण्याला निरोप देण्यासाठी सारा गाव जमला होता. त्याच्या यात्रेमागोमाग सारे गाव चालत होते. बुका-गुलाल उधळत होते. 

"दगडी कुसाच्या आत उभा राहून सारा महारवाडा तो सोहळा पाहत होता. त्या दृश्याने भारावून की काय न कळे, बावऱ्याचा लेक ओरडला, ‘बघा लेको, तुम्हाला जगून मिळवता आलं न्हाई त्ये माज्या म्हाताऱ्यानं मरून मिळवलं!’ कुणीतरी त्याच्या तोंडावर हात ठेवला. 

"सारा महारवाडा मुयाने बघत राहिला. बावऱ्याची अंत्ययात्रा पाहून त्यांचीही मने कळवळली होती."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
February 02, 2022  - February 02, 2022.  
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
सात मंत्र्यांचे पत्र
................................................................................................
................................................................................................

"तो गेला आणि मी विचार करीत राहिलो, ‘या माणसानं इतकी वर्षं शाळामास्तरकी केली म्हणजे केलं काय?’"

"सुगीच्या धांदलीनं पंडामास्तर आणि त्याच्या मंत्र्याचा कार्यक्रम ही गोष्ट मी साफ विसरलो. पंडाही वाडीकडे जाताना दिसला नाही. धान्याच्या राशी घरी आल्या. थोडी उसंत मिळाली. कसरीने खाल्लेली पुस्तके धुंडाळून मी वाचू लागलो. काळ्या वावरात घोंगडीवर पडून, कंदिलांच्या टिमटिमत्या प्रकाशात मी शरच्चंद्रांची एक कादंबरी वाचत होतो-"

""पण पोवाडा म्हणणार ते पोरं होतं कुठलं?” मी विचारलं. "दरवेशी आलाय् रं गावात. त्याचं पोर ते. सुगीचे दीस. सारं भिकारी गोळा हुत्यात ह्या वताला. दरवेश्याची पोरं पवाडं गात्यात. त्यांचा मुकाम गनपतीच्या ओरीत होता. मोट्टं पावनं दिसल्याबरोबर त्यांनी हानली डफावर थाप-” 

""अन् ती कसरत करणारी पोरं?” 

""सोन्या डोंबाऱ्याची. एकामागं एक सात कार्टी हाईत त्येला. दरवेश्याच्या पोरांच्या इसाळानं त्यांनीही दाखविल्या चार उड्या हानून. ती बी आल्याती पसाकुडता मागायला.” 

""म्हणजे तुमच्या शाळेतली मुलं?” 

""एक जाग्यावर न्हवतं! दरवेश्याच्या पोरांनी पवाडा म्हनला. सोन्या डोंबाऱ्याच्या पोरांनी कसरत केली. मंत्र्याला वाटलं, ही सारी पोरं साळंतलीच. एन्टीच्या तोंडाला बसला टाका, मंत्र्याम्होरं तोंड उघडायची काय हिंमत हाय त्याची? आम्हांला हानलेला जोडा, पयला त्येच्या थोबाडात बसणार. वरचा अधिकारी त्यो. कसं?”

"मला सारखे वाटत आहे की, पंडामास्तराने ही सारीच हकिगत बनवून सांगितली असावी. 

"ते पत्र मात्र नि:संशय खरे होते. ते इंग्रजीत होते आणि त्याच्या शिरोभागी राजचिन्ह होते. इतके मोठे कारस्थान करणे पंडामास्तरच्या शतीबाहेरचे आहे. आता, कारस्थान करून प्रशस्तिपत्र मिळविण्याची त्याला गरजही नाही. तो पेन्शनीला आला आहे!"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
February 02, 2022  - February 02, 2022.  
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
आठ नागूदेव

" ... देवळात चिटपाखरू नव्हते. नंदादीप तेवत होता. विठ्ठल-रखमाईच्या सुहास्य मूर्ती कर कटीवर ठेवून निश्चल उभ्या होत्या. त्यांच्यासमोर येऊन तो उभा राहिला. त्याची धाव थांबली. विठ्ठलाच्या डोळ्याशी दिठी भिडवून तो स्थिर उभा राहिला. बराच वेळ तसाच राहिला. मग त्याने डोळे मिटले. एकदम मोठ्याने ओरडला, 

"‘गतं पापं गतं दु:खं गतं दारिद्य्रमेव च 
"आगता सुखसंपत्ति: पुण्योऽहं तवदर्शनात्” 

"आणि त्याने विठ्ठल-रखुमाईंसमोर दंडवत नमस्कार घातला. नमस्कारासाठी भूमीवर पसरलेले शरीर परत उभे राहिले नाही. ते लाकडाच्या ओंड्यासारखे निश्चल झाले."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
February 02, 2022  - February 02, 2022.  
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................

February 02, 2022 - February 02, 2022. 

Purchased January 27, 2022. 

Kindle Edition, 161 pages
Published March 13th 2018 
by Saket Prakashan Pvt. Ltd
ASIN:- B07BFQZRRZ
................................................
................................................

Bolka Shankh 
(Marathi Edition) 
Kindle Edition

Marathi Edition  
by G. D. Madgulkar (Author)  
Format: Kindle Edition

ASIN ‏ : ‎ B07BFQZRRZ 
Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd 
(13 March 2018) 
Language ‏ : ‎ Marathi
................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4524044195