................................................................................................................................................................................................
Chaar Sangeetika
चार संगीतिका
अमृतवृक्ष
व्याध
पारिजातक
वासवदत्ता
ग.दि. माडगूळकर
by G. D. Madgulkar
................................................................................................................................................................................................
Superb.
Superb.
Fourth one reminds one of a poem by Tagore. Perhaps Madgulkar was inspired by his work or for some reason both independently thought of this theme.
................................................................................................................................................................................................
................................................................................................................................................................................................
................................................................................................................................................................................................
................................................................................................................................................................................................
"पहिल्या तीन संगीतिका पुणे नभोवाणी केंद्रावरून पूर्वीच ध्वनिक्षेपित झालेल्या आहेत. ‘वासवदत्ता’ ही संगीतिका ‘नवचित्र’च्या ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ या रौप्यपदक विजेत्या बोलपटात योजिलेली आहे.
"या चार संगीतिकांपैकी तीन संगीतिकांचे संगीत-दिग्दर्शन श्री. सुधीर फडके यांनी केलेले होते.
"‘अमृतवृक्ष’चे संगीत-दिग्दर्शन माझे मित्र प्रा. पु.ल. देशपांडे यांनी केले होते. श्री. सुधीर फडके आणि प्रा. पु.ल. देशपांडे या दोघा मित्रांनी माझ्या नीरस शब्दांना संगीताचा गोडवा सदैवच दिलेला आहे. माझ्या संगीतिकांच्या लोकप्रियतेत त्या दोघांचा मजहून मोठा वाटा आहे. त्यांचे माझे सौहार्द आभार-प्रदर्शनाच्या पलीकडचे आहे.
"यापैकी तीन संगीतिका ध्वनिक्षेपित केल्याविषयी पुणे नभोवाणीच्या अधिकार्यांचे आभार मानणे तर सर्वथैव उचितच आहे.
"प्रकाशक पंडित अनंत कुलकर्णी यांनीच या प्रकाशनाची कल्पना काढली. त्यांच्या पदरी निराशा येणार नाही, इतपत बळ या संगीतिकांत आहे, असे मात्र मला प्रामाणिकपणे वाटते.
कार्तिक शुद्ध पौर्णिमा,
शके 1878 11,
पुणे-मुंबई मार्ग, पुणे 3
- ग. दि. माडगूळकर
................................................................................................................................................................................................
................................................................................................

"पती... कशाचा सुटला सांग सुवास?
पत्नी... काय सांगू मी कपाळ माझे
अजून पापण्यांवर का ओझे
प्रथम दिवस हा नववर्षाचा,
भर आला सुमनांस
पती... कुठली सुमने, कुठल्या वेली
गिचमिड वस्ती, नगर बकाली
रूपधूलि तू काय लाविलीस
नवीन निजवदनास कशाचा
सुटला सांग सुवास?
पत्नी... इतका कसला त्यात अचंबा
मोहर आला त्या कडुनिंबा
वाऱ्यावरती वाहत येतो
कडवा मधुर सुवास!
या वृक्षाते आज पूजिती
फुले पालवी सकल सेविती
अर्थ यातला असेल ठाऊक
तुमच्या कविहृदयास
तारामंडित नील नभासम
प्रसन्न दिसतो दुरुनी हा द्रुम
कटुता का मग निसर्ग देतो या मंगल वृक्षास?
पती... कडुनिंब का कडू जाहला ते मजसी ठावे
शिष्ये, गृहिणी, पुराण त्याचे सावध ऐकावे"
"वेदपूर्व ही कथा लाडके, वेदपूर्व ते जग
जेव्हा होती खगास वाणी, सपंख होते नग
दक्षप्रजापती चंद्रा अर्पी सत्तावीस कन्या
अश्विनी, भरणी, मघा, रोहिणी इत्यादी धन्या
नक्षत्रे त्या, कुणी वर्णावे त्यांच्या गुणरूपा
मदनसख्या त्या अवघ्या होत्या केवळ अनुुरूपा
अमृतकर तो चंद्र, तयाच्या करांत देता कर
स्वर्गसुखाचा पडला पाऊस दक्षकन्यकांवर
वेदाहूनही परी पुरातन सत्य असे काते
अतिसौख्याच्या उदरी अचानक दु:ख जन्म घेते
विहार करिता दक्षसुतांसह सौख्ये गगनांगणी
आवडती अति झाली चंद्रा एकच ती रोहिणी"
"चंद्र... तर मी घेऊन जोग रोहिणी, जातो कैलासा सुमनास्तव मी वरिली शाखा मोत्यासाठी वरिला शिंपा शुक्तमालिका कंठी घालू, आग्रह हा कैसा? जातो कैलासा पत्नीधर्म संभाळ पाळ वा भगिनीधर्माते
तुझ्यावाचुनी अन्य सखी या नाही चंद्राते"
अश्विनी... इथे हा हिरवा वृक्ष कसा?
किती दिसांनी दिसले हिरवे, चाखीन मी तद्रसा
कडूकडू लागते पान किती
दक्ष... निज नाथाते विचार, तो तर सर्वौंषधीचा पती — चंद्र... माझे अश्रू येथे गळले ते धरणीने प्रेमे गिळले
असह्य होता वृक्षरूप हे होऊन सळसळले
मम वेड्यांच्या पापाकरिता
येई अकारण याते कटुता
वृक्षराज हा वाढविलासे माझ्या अश्रूंनी
दिव्यौषधिसम सद्गुण असती या पानोपानी
या वृक्षाने मम दु:खाची केली मज छाया
या वृक्षाचा कणाही जगावर जाईल ना वाया
दक्ष... तथास्तु!
रोहिणी... कडूपणांतून गोड निपजले जीवनात नाथा
तू या वृक्षाच्या पानी का मग ठेवितसा कटुता? नक्षत्रांगना... आम्ही साऱ्या देऊ याते आमुचे तेज:कण फुले होऊनी फुलवितील ते याचे कटुजीवन
सुगंधित या येतील सुमने, आम्रमंजिरीसवे
वनस्पतींना वृक्षराज हा होवो लेणे नवे
दक्ष... दिव्यौषधीचा देव देई ज्या उपकारार्थी वर
वृक्षराज तो कल्पतरू या ठरेल पृथ्वीवर
नक्षत्रांगणा... तथास्तु तथास्तु.....
पती... सत्य घडे ते आज, तेधवा बदला जे दक्ष
कडुनिंबक या पृथ्वीवरती सखी अमृत वृक्ष
हाच दिवस तो ज्या दिवशी त्या झाला वरलाभ
म्हणून पूजिती आणि भक्षिती आजच कडुनिंब
तैसे हे कडुनिंबक पुराण, तुवा ऐकिले आदरे बैसोन याचिया श्रवणे करोन, आयुरारोग्या लाभसी"
February 02, 2022.
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................

February 02, 2022 - February 02, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
व्याध
................................................................................................................................................................................................
"त्या नादाच्या अनुरोधावर
पुढे चाललो थोडा भरभर
शिखर मनोहर दिसले अवचित माझ्या डोळ्यासी (संगीतासह रुद्रध्वनी नजीक आल्याचे भासमान होते.) बन वेलींचे दाट दाटले
(डहाळ्यांची कडकड, पक्ष्यांचे साद, रुद्र साद.) शिवमंदिरसे आत वाटले
मंडुकसे स्वर काढून ब्राह्मण म्हणती मंत्रांसी
ओतीत होते धार शिवावर
मी न थांबलो तेथे पळभर
ढळू लागला दिवस म्हणून मी लागे मार्गासी"
एक याम सरली रजनी
आली जलपाना हरिणी
(श्वापद पाण्याशी आल्याचा आवाज)
बाण लाविला, धनू ओढिले
मानव वाणी काढून भीता हरिणी मज बोले"
"हरिणी : (अधिक आर्त स्वरांत)
आवर रे धनुष्यबाण
मातेसंगे नकोस घेऊ बाळांचेही प्राण!
दिले वचन मी जर ना पाळीन
सात पिढ्यांची पुण्ये जाळीन
मरणानंतर नरकी लोळीन
लेकुरवाळा असशील तूही, शब्द एवढा मान..."
"व्याध : परतून गेली सर्व सावजे, अरुणोदय झाला
सुवर्ण तेजासंगे राणी आम्रगंध आला
दिसू लागली सरोवरावर फुलती कमलफुले
तळी पाहता शिवलिंगावर जमली बिल्बदले
चाळा म्हणुनी रात्रभरी मी बिल्वदले खुडिली
तळी शिवावर पडली सारी, शिवपूजा घडली
रातभरी मज उपास घडला त्या तरुच्या माथी
पुनश्च आली एक कुरंगी, धनू उसळे हाती
बाण लाविला, धनु ओढिले
मानववाणी करुनि कुरंगी ती मजसी बोले."
"व्याध : वृक्षावरुनी खाली आलो, पाहुनी सूर्योदया
कसली येती परत सावजे, कसली ती मृगया
दुडदुड आली तोच समोरून मृगबाळे चार
मृग तो आला, तीन मृगी त्या, अवघा परिवार"
"व्याध : (परत निवेदन) थक्कच झालो पाहुनी मी तो जिवंत प्रेम लळा
प्रेमीजनांची पारध करणे छंद किती हा खुळा
अश्रापांची नकोच पारध विचार ये ध्यानी
तोच जाहला डमरुनाद; ये मधु मंगलवाणी"
"श्रीशंकर : बिल्वदलांनी पूजिलेस मज, जपले नाम तुवा उपोषणासह जागरणासह, शिकला मंत्र नवा
सर्वांभूती स्वत:स बघणे हेची शिवदर्शन
जीवदान तू दिले मृगांना हेची शिवपूजन
दयादान हे तुझे पारध्या, पडले सत्पात्री
कृष्णपक्षींची चतुर्दशी ही ठरली शिवरात्री
सार्थक झाले तव जन्माचे बैस व्योमयानी
‘व्याधतारका’ म्हणुनी बघतील जन तूते गगनी
मृगराजा हा, तीन कुरंगी, ही बाळे सान
नीलकाशी चमकत राहतील मृगतारा म्हणून"
"व्याध : सांगू नये ते सांगितले मी प्रश्न तुम्ही केल्या— असाच झाला ‘मुनी वाल्मीकी’ दग्धपाप वाल्ह्या
तारका: कथा नव्हे ही तुम्ही घातला अमृत रस श्रवणी
या सत्याने सुंदर झाली व्याधासह धरणी"
February 02, 2022.
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
February 02, 2022 - February 02, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................................................................................................................
पारिजातक
................................................................................................................................................................................................
"निवेदक : ‘चंद्रावरती बसून चालले हरिण कुठे हे तरी? चांदण्यात का धुंद दरवळे नाभीतील कस्तुरी!’
असे काहीसे वदला वारा हलत्या लहरींवरी
सागर सरुनी तोच दिसे त्या नगर द्वारकापुरी
त्या सोन्याच्या नगरामाजी सोन्याचे चांदणे
रानफुलांनी बहरून गेली उद्याने, उपवने
विसावला वारा, फिटले डोळ्यांचे पारणे
गवाक्षांतुनी साद लुटी तो, नृत्याची पैजणे"
"सत्यभामा : पहाट आली, उद्यानातून मंदिरी ये गारवा जळते मी, हा जळे दिवा!
वचन देऊनी नाही आले, रातभरी मी रडून जागले,
सुकली वेणी, सुकला मरवा....
युद्धावीन हो रणी पराजित,
रुद्धमनोरथ, निराश मन्मथ
आणा चंदन, उरी सारवा....
ज्योत फिकटली, हो अरुणोदय,
पुरुषप्रणय हा केवळ अभिनय
स्रीहृदयाची त्यास न परवा....
शृंगाराचा लाथाडुनी घट
गोकुळातला गेला खट नट
स्मृती तरी गं माझी हरवा......
निवेदक : चिडून भामिनी फेकू लागली दूर अलंकारा
झोप लागली गाढ; परंतु इकडे शार्ङ्गधरा!"
"नारद : नारायण—! नारायण—!
सांगा देवा, कसा चालला प्रापंचिक खेळ?
वैदर्भीचा सवतीसंगे बसला का मेळ?
एक आणली पळवून आपण, दुसरी पडली गळा एकमेकींना आहे ना पण परस्परांचा लळा?"
"श्रीकृष्ण : सुगंध सुटला आहे कसला तुमच्या आगमनाने? नारद : विसरलोच मी, (पारिजातकाची फुले श्रीकृष्णास देतात) तुमच्यासाठी आणली ही सुमने
रुक्मिणी : इथली दिसती फुले पण किती गंध वसे तरी त्यांत!
नारद : फूल हे दुर्मीळ या जगतात!
श्रीकृष्ण : तुम्ही मिळविले हे मग कोठून?
नारद : श्रीचरणास्तव स्वर्गातून ही भेट असे आणिली देवेंद्राने स्वकरे मग जी वायन म्हणुनी दिली
(उठता उठता) येतो देवा, सहज निघालो होतो सागरतीर्था चरणदर्शनासाठी उतरलो क्षण जाता जाता
नारायण— नारायण
श्रीकृष्ण : (नारदांना निरोप दिल्यावर, रुक्मिणीस)
ही स्वर्गातील फुले माळ तू मस्तकात राणी
लाडके वैदर्भी रुक्मिणी
स्वर्गीय पुष्पे शिरी माळता दिसशील इंद्राणी
लाडके वैदर्भी रुक्मिणी
(फुले तिच्या वेणीत घालतात)"
"प्रद्युम्न : आई गं, आले गरुड विमान
आले माझे तात, पाहा गं प्रकाशातले अस्मान
नगरजनांचा सांघिक नाद: जय जय कृष्ण द्वारकापती आणिला स्वर्ग मेदिनीप्रति!
देवेंद्राचा करून पराभव
लढून आणले फुलते वैभव
दरवळे सौरभ त्याचा किती
जय जय कृष्ण द्वारकापती"
"निवेदक : वृक्ष वाढला, बहरा आला, फूल फूल हिरकणी फुले तयाची गळू लागली सवतीच्या अंगणी
उदास झाली, मनात चिडली खुळी सत्यभामा,
मना पुशी, जो प्रश्न पुसावा स्पष्ट घनश्यामा!
सत्यभामा : बहरला वृक्ष इथे दारी
फुले का पडती शेजारी?
माझ्यावरती त्यांची प्रीती
पट्टराणी जन तिजसी म्हणती
दु:ख हे भरल्या संसारी!
फुले का पडती शेजारी?
असेल का हे नाटक यांचे
मज वेडीला फसवायचे
कपट का करिती चक्रधारी?
फुले का पडती शेजारी ?
का वाराही जगासारखा
तिचाच झाला पाठीराखा
वाहतो दौलत तिज सारी
फुले का पडती शेजारी?"
"रुक्मिणी : संकट कसले त्यात महर्षी, आपणही ब्राह्मण ! ब्राह्मणास या देई भामिनी, नाथांचे वायन !
नारद : नारायण, नारायण
रुक्मिणी : दान पतीचे होता आपण जाऊ त्यांच्यासवे
कष्टी झालीस उगा काय तू आवर गे आसवे
नारद : घेऊन जाईल श्रीकृष्णाला पण तुम्हा कुठे नेवू? सहस्रावधी सेना तुमची सांग कुठे ठेवू?
सदा प्रवासी कृष्णभक्त मी नको मला हें दान
एक सुचवितो उपाय याला हवा तरी द्या मान
श्रीकृष्णाची तुला करून द्या तितुके सोने मला
‘पुण्यक’ क्रत मग पूर्ण जाहले पुण्य लाभू दे तुला"
"निवेदक : सरला सारा कोष संपले अवघे भांडार
सरले साऱ्या सुवासिनीचे स्वर्ण अलंकार
तुला होईना श्रीकृष्णाची; सत्यभामिनी रडे
कृष्ण नारदा बघुनी हसती, नारद कृष्णाकडे
सत्यभामा : काय करू देवा आता तुला होईना
रेसभर पारडे हे वरि जाईना
रुक्मिणी : ऐक ईश्वरा, ठेव तूच या पतिक्रतेचा मान!
तुला होऊ दे! शुद्ध प्रीतीचे हे तुळशीचे पान
(रुक्मिणीच्या तुलसीपत्राने तुला यशस्वी होते.)"
February 02, 2022.
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
February 02, 2022 - February 02, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
वासवदत्ता
................................................................................................................................................................................................
This one reminds one of a poem by Tagore. Perhaps Madgulkar was inspired by his work or for some reason both independently thought of this theme.
"उपगुप्त : तुझ्या प्रीतीची दिव्य आर्तता जाणुनिया दयिते! एकच देतो वचन तुला मी सखी वासवदत्ते!
खरीच जेव्हा पडेल माझी तुजसी आवश्यकता
क्षणी त्याच मी अचूक येईन कुणी ना बोलाविना !"
February 02, 2022.
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
February 02, 2022 - February 02, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................................................................................................................
चार संगीतिका
अमृतवृक्ष
व्याध
पारिजातक
वासवदत्ता
ग.दि. माडगूळकर
................................................................................................February 02, 2022 - February 02, 2022.
Purchased January 03, 2022.
Kindle Edition
Published by
Saket Prakashan
ASIN:- B088P3P1QK
................................................................................................चार संगीतिका ग.दि. माडगूळकर
☐ सर्व हक्क सुरक्षित २०२०
☐ श्रीधर माडगूळकर,
‘पंचवटी’ ११ मुंबई – पुणे रस्ता,
पुणे – ४११००३
☐ प्रकाशक साकेत बाबा भांड,
साकेत प्रकाशन प्रा. लि.,
115, म. गांधीनगर,
स्टेशन रोड, औरंगाबाद - 431 005,
फोन- (0240)2332692/95.
www.saketpublication.com info@saketpublication.com •
(Marathi Edition)
Kindle Edition
पुणे कार्यालय साकेत प्रकाशन प्रा. लि.,
ऑफिस नं. 02, ‘ए’ विंग, पहिला मजला,
धनलक्ष्मी कॉम्प्लेक्स, 373 शनिवार पेठ,
कन्या शाळेसमोर, कागद गल्ली, पुणे -411 030
फोन- (020) 24436692
Marathi Edition
(Author)
Format: Kindle Edition
ASIN : B088P3P1QK
Publisher : Saket Prakashan Pvt. Ltd
(14 May 2020)
Language : Marathi
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4524086521