Tuesday, April 12, 2022

SANJVAT सांजवात: वि. स. खांडेकर / कथासंग्रह by V. S. KHANDEKAR.

................................................................................................

SANJVAT 
सांजवात
वि. स. खांडेकर 
/ कथासंग्रह 
by V. S. KHANDEKAR. 
................................................................................................
................................................................................................

Unlike his more familiar work with its middle class moralty and mindset attempting to take higher flight, this one is anguished product of the times, WWII with its disastrous effects on humanity. 

The title story is a class apart! 
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
दोन शब्द

" ... उखाळ्यापाखाळ्या काढणे आणि कोपरखळ्या मारणे यापलीकडे ज्यांच्या बुद्धीची गती जात नाही, असे टीकाकार संसाराप्रमाणे साहित्यातही असायचेच. त्यांचे उद्गार उद्बोधन नसले, तरी मनोरंजन निश्चित करु शकतात. हे लक्षात घेऊन मी या काळात मनात म्हणे, ‘खांडेकरांचे युग संपले, म्हणून मोठ्या आनंदाने ओरडून सांगणाऱ्या या महापंडितांच्या लक्षात एक गोष्ट मुळीच येत नाही; ती म्हणजे कुठलेही युग संपायला ते आधी सुरु व्हावं लागतं, काही काळ तरी त्या युगाची छाप भोवतालच्या जगावर पडावी लागते. माझा पराजय सूचित करण्याकरिता जे शब्द हे विद्वान लोक वापरीत आहेत, ते माझ्या विजयाचेही द्योतक होऊ शकतील, हे यांना कधी समजणार?’ 

"मात्र टीकाकारांचेच शब्द त्यांच्या गळ्यात बांधून युगप्रवर्तकाचा मान पदरात बांधून घेण्याची इच्छा मला पूर्वी कधी झाली नाही, आजही होत नाही. कोणत्याही क्षेत्रातला युगप्रवर्तक हा सूर्यासारखा असतो. पावसाळ्याच्या आरंभी पृथ्वीवर लुकलुकणाऱ्या काजव्यांपासून आकाशात चमचमणाऱ्या विजेपर्यंतची विविध तेजे मनुष्याला दर्शनीय वाटत असली, तरी त्यांची सूर्यप्रकाशाशी तुलना करण्याचा वेडेपणा कोण करील? जो टीकेचा आरसा मी इतरांपुढे धरतो, त्यात आपले प्रतिबिंब पाहण्याची सवय मला आहे. त्यामुळे गेल्या वीस-पंचवीस वर्षांत ज्या क्षेत्रात मी वाङ्मयसेवा करण्याचा प्रयत्न केला, त्यात माझे स्थान कुठे आहे, याची मला माझ्या टीकाकारांहूनही अधिक स्पष्ट जाणीव आहे. मराठी लघुकथा लेखकांच्या दुसऱ्या पिढीत दिवाकर कृष्ण, वरेरकर, फडके, य. गो. जोशी, बोकील, दौंडकर, कुमार रघवीर, कमळाबार्इ टिळक वगैरेंच्या बरोबरीने विकासाला हातभार लावण्याचा प्रयत्न मी केला आहे. त्या प्रयत्नांचे रसिकांनी पुरेपूर कौतुकही केले आहे. माझे कर्तृत्व एवढेच आहे. नोकराने धाडसाने शिकार करावी आणि मेलेल्या वाघाजवळ उभ्या असलेल्या संस्थानिकाचा शौर्याबद्दल गौरव व्हावा, ही प्रथा शिष्टसंमत असली, तरी मूर्खपणाची आहे. म्हणून कथालेखक या नात्याने मी खलास झालो, हे सांगण्याकरिता माझे विद्वान टीकाकार जेव्हा मला युगप्रवर्तकाचा मान देऊ लागतात तेव्हा माझे मलाच हसू येते. प्रतिभेच्या निस्तेजपणाविषयीची टीकाही मला अशीच गमतीदार वाटते. आज मोहकपणाने हसणाऱ्या कुठल्या फुलाचे उद्या निर्माल्य होत नाही? आज रस्त्याने आपल्याच तोऱ्यात चालणाऱ्या कुठल्या तरुणीच्या चेहऱ्यावर उद्या वार्धक्याच्या सुरकुत्या दिसणार नाहीत? मानवी बुद्धीही काही या सनातन नियमाला अपवाद नाही. कालचक्राचे बंधन तिलाही आहे. माझ्या मागच्या पिढीतले कोल्हटकर, खाडिलकर, वामनराव जोशी वगैरे साहित्यिक वाङ्मयक्षेत्रातले रथी महारथी होते. पण वयोमानानुसार त्यांच्या प्रतिभेचा प्रफुल्लपणा कमी होत गेला, पन्नाशीनंतर त्यांच्या लेखनगुणांना ओहोटी लागली, ही कालपरवा घडलेली ऐतिहासिक गोष्ट आहे. ... सनातन नियमाची कल्पना नसल्यामुळेच अवखळ लहान मुले म्हाताऱ्यांच्या दुर्बलतेला हसत असतात. याच बालिश दृष्टीचा आढळ आमच्या अनेक टीकाकारांच्या लिखाणातही होतो. वाङ्मयीन उदयास्ताकडे वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहण्याची, निरनिराळ्या कालखंडांची तुलना करुन त्यातून निघणारी कलाविषयक सत्ये स्वीकारण्याची आणि वैयक्तिक रसिकतेच्या दरीतून विशाल रसिकतेच्या आकाशात उड्डाण करण्याची त्यांना कुवतच नसते."

" ... शिरोड्याला ज्या एकाच वृत्तीने मी लघुकथा लिहिल्या होत्या, त्या कोल्हापुरात आल्यावर एक-दोन वर्षांतच मला दुर्लभ झाल्या. दक्षिण कोकणाच्या कोपऱ्यातल्या त्या खेड्यात समुद्रकाठी अथवा टेकडीवर चार घटका एकांतात घालविल्या, की लेखनातली सारी कोडी मला सुटत असत; पण कोल्हापुरात आल्यापासून माझे हे दोन मोठे नैसर्गिक मित्र मला पारखे झाले. चित्रकथेच्या कामात नाही म्हटले तरी किचकटपणा असतोच असतो. शिवाय बाजारावर दृष्टी ठेवून कथा लेखक लिहीत नसला, तरी चित्रनिर्मात्यांना ती दृष्टी ठेवणे आवश्यक असल्यामुळे त्यांच्याबरोबर त्यालाही बहिर्मुख व्हावे लागते. ... "

"कसोटीच्या काळात माणसाचे मुखवटे गळून पडतात, हेच खरे. युद्धकाळात तेच घडले. ते मुखवटे दूर झाल्यावर त्यांच्या आड लपलेली, मनुष्य म्हणून गौरविल्या जाणाऱ्या प्राण्याची जी हिंसक, भेसूर आणि भीषण स्वरुपे प्रगट होऊ लागली, ती पाहायची माझ्या मनाची तयारी नव्हती. विद्यार्थिदशेत मी पहिले महायुद्ध पाहिले होते; पण त्याची झळ हिंदुस्थानला तितकीशी न लागल्यामुळे असेल अथवा माझे ते पूर्ण स्वप्नाळूपणाचे वय असल्यामुळे असेल, मला या कटू सत्याची तेव्हा काडीमात्रही कल्पना आली नव्हती. पण दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ती फार तीव्रतेने आली. माणसाच्या मनाचे महारोग पूर्वीइतकेच अजूनही कायम आहेत, भौतिक संस्कृतीच्या जरतारी चिंध्यांनी त्यांच्या जखमा बांधल्या गेल्यामुळे ते फक्त जगाला दिसत नाहीत, याची मला तीव्र जाणीव झाली. जणू काही मी एखाद्या सुंदर स्वप्नातून जागा झालो. त्या स्वप्नात मी नंदनवनात होतो. आता माझ्याभोवती सहारा पसरला. आपल्या पिढीचे जग मानवी मूल्यांची प्रामाणिकपणाने पूजा करण्याचा प्रयत्न करीत आहे, हा माझा भ्रम या पाच वर्षांत प्रत्येक दिवशी येणाऱ्या नव्या नव्या अनुभवांनी नाहीसा होऊ लागला. या काळात मनुष्य या नावावर हक्क सांगणाऱ्या द्विपाद प्राण्याच्या अध:पाताचे सर्व नमुने मी पाहिले. ... "

" ... समाजात पदोपदी होणारा माणुसकीचा खून पाहून नेहमी माझ्या मनात येर्इ, आज आमच्यात एखादा झोला असता, तर त्याने ही भीषणता किती परिणामकारकतेने वर्णन करुन सांगितली असती. सामाजिक व्यवहारात तांडव नृत्य करु लागलेला उघडानागडा स्वार्थ पाहून मला वारंवार वाटे - आज मराठीत एखादा गोर्की अथवा अप्टन सिंक्लेअर हवा होता. .
. "

" ... मी अजून थोडा- फार अंधारातच चाचपडत आहे. पण तो काळोख पहाटेपूर्वीचा आहे, या नव्या जाणिवेने माझ्या मनाला पुन्हा एक प्रकारचा हुरुप वाटू लागला आहे. दूरवर कुठेतरी दिशा उजळल्यासारख्या दिसत आहेत. तो केवळ भास आहे, आत्मवंचक मानवी मनाचा चकवा आहे की, लवकरच अरुणोदय होऊन मला पूर्ण प्रकाश दिसणार आहे, हे मला आज सांगता येणार नाही. पण मधल्या पाच वर्षांत माझ्या मनाला जी एक प्रकारची विचित्र ग्लानी आली होती, ती आता ओसरु लागली आहे. माझ्या मनावरचा सामाजिक विषाचा अंमल कमी होत चालला आहे. सर्व समाजाला फरफटत आपल्याबरोबर ओढून नेणारा हा सामुदायिक अध:पात मी प्रथम पाहिला तेव्हा ती एक तात्पुरती आपत्ती आहे, असे मला वाटले होते. पण माझी ती समजूत हा स्वप्नाळूपणाचाच एक भाग ठरला. आपले आवडते माणूस असाध्य रोगाने आजारी असले, म्हणजे आपण त्याला एखाद्या बड्या डॉक्टरकडे घेऊन जातो. डॉक्टर त्याला तपासत असताना आपण मोठ्या आशाळभूतपणाने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहतो. ‘घाबरण्यासारखे काही नाही,’ असे हसत हसत ते म्हणतील आणि आपल्या छातीवरचा हिमालयाचा भार आपण क्षणार्धात दूर भिरकावून देऊ, अशी वेडी इच्छा आपल्या मनामध्ये एकसारखी पिंगा घालीत असते. याच हळव्या, दुबळ्या- हवे तर आंधळ्या म्हणा, मनोवृत्तीने मी युद्धकाळातल्या सामाजिक मनाच्या अध:पाताकडे पाहत होतो. पुढे युद्ध संपले. देश स्वतंत्र झाला. पण हा अध:पात मात्र थांबला नाही. आमची वाढलेली पापप्रवृत्ती रतिमात्र कमी झाली नाही. स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून आम्ही जी सामाजिक जागरुकता दर्शवायला पाहिजे होती, जी सार्वजनिक नीतीची चाड बाळगणे अवश्य होते, जी विशाल, विधायक दृष्टी आणि उत्कट प्रामाणिक वृत्ती दैनंदिन आयुष्यक्रमात व्यक्त करायला हवी होती, तिचा मागमूसही अजून आपल्यात आढळत नाही. ... "

" ... गांधीवादातले एक फार मोठे वैगुण्य मला नेहमी तीव्रतेने जाणवत आले आहे. ते म्हणजे वैयक्तिक नीतीच्या सर्व कल्पना जशाच्या तशा सामाजिक नीतीला लावणे हे होय. रवींद्रनाथांचे एक मोठे मार्मिक वाक्य आहे. ‘Man is Kind, but men are cruel.’ (मनुष्य हा दयाळू प्राणी आहे; पण मानवी समाज मात्र क्रूर आहे.) ही उक्ती हे केवळ एक सुंदर सुभाषित नाही. इतिहास, मानसशास्र आणि समाजशास्र यांच्या साक्षी तिच्यातून सूचित होणाऱ्या सत्याच्या बाजूलाच पडतील. पण गांधीजींच्या तत्त्वज्ञानात सत्याची उपेक्षा झाली. व्यक्ती व्यक्तीशी जितक्या सहृदयतेने वागते, तितका सद्‍भाव एका धर्माचा, एका राष्ट्राचा किंवा एका वर्गाचा घटक या नात्याने दुसऱ्या धर्मातल्या, राष्ट्रातल्या अथवा वर्गातल्या घटकाशी व्यवहार करताना ती प्रगट करु शकत नाही. व्यक्तिमनात कविमनाचा थोडाफार अंश असू शकतो. पण समुदायाचे मन हे मुख्यत: टीकाकाराचे मन असते. समूहाचे प्रेम जागृत करणे हे मोठे अवघड काम आहे. पण त्याच्या द्वेषाला किंवा सूडबुद्धीला सहज आवाहन करता येते. अहिंसा हे सुसंस्कृत मानवी जीवनातले एक महत्त्वाचे मूल्य असले, तरी व्यक्तिमन व समाजमन यातल्या अंतराकडे दुर्लक्ष करुन त्याचा पुरस्कार करणाऱ्याच्या वाट्याला शेवटी अपयश आल्यावाचून राहत नाही. ... "

"शाहुपुरी, कोल्हापूर 
१६-९-४८

 – वि. स. खांडेकर"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................

April 12, 2022 - April 12, 2022. 

अनुक्रमणिका 

१. तीन जगे! 
२. शिखर 
३. दोन मोसंबी 
४. शांती 
५. सोन्याची गाडी 
६. दोन भुते 
७. सांजवात 

REVIEWS 

"‘‘क्षमा कर मला सीताराम. गांधींनी तीन जगांचं एक जग केलं आहे, असे वाटून मी मघाशी तुला धीर दिला; पण - पण काय करु सीताराम, हातात बेड्या असणाऱ्या गुलामाला दुसऱ्या गुलामाच्या पायातल्या बेड्या तोडता येत नाहीत रे!’’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 12, 2022 - April 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
२. शिखर 
................................................................................................
................................................................................................

"त्याने उजवे पाऊल शिखरावर ठेवले तेव्हा त्याचे शरीर एखाद्या चोळामोळा झालेल्या फुलाप्रमाणे मलूल होऊन गेले होते. शिखरावरच्या त्या अप्सरेच्या मांडीवर मस्तक ठेवून विश्रांती घ्यावी म्हणून त्याने सभोवती पाहिले. त्या अरुंद शिखराभोवती जिकडे तिकडे खोल खोल दऱ्या पसरल्या होत्या. त्या दऱ्यांतून मृगजळाची एक भली मोठी नदी वाहत होती. त्या नदीत ती अप्सरा जलविहार करीत आहे असा भास त्याला झाला. त्याने तारस्वराने हाक मारली, ... "
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 12, 2022 - April 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
३. दोन मोसंबी 
................................................................................................
................................................................................................

"टेबलावरील कवितेचा कागद उचलून घेत कवी शांतपणाने म्हणाला, ‘‘बलिदान हे माझ्या या नव्या कवितेचे नाव आहे. निर्वासितांना हिंदुस्थानात घेऊन येणारी एक गाडी गुंडांनी मध्येच अडविली. त्या गाडीतून एक भाऊ दोघा सुंदर तरुण बहिणींना घेऊन येत होता. आपली अब्रू धोक्यात आहे, असे दिसताच त्या बहिणींना भावाला आपल्याला ठार मारायला सांगितले आणि त्याने…’’ 

"कवीने संपादकांकडे पाहिले. त्यांची मुद्रा गंभीर दिसत होती. सर्व धैर्य एकवटून तो म्हणाला, 

"‘‘मला पाच रुपये हवे आहेत. भाची आजारी आहे. तिच्यासाठी मोसंबी- ही कविता घ्या आणि…’’ 

"संपादक शांतपणे उत्तरले, 

"‘‘ही बातमी कधीच येऊन गेली आहे आमच्या पेपरमध्ये.’’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 12, 2022 - April 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
४. शांती 
................................................................................................
................................................................................................

" ... प्राणिमात्राने वैर विसरुन मित्र मित्र म्हणून राहावे, ही आपली प्रार्थना परमेश्वराने आज ऐकली, असा त्याला भास झाला. त्या दोन प्राण्यांच्या जवळच एक मुलगाही दिसत होता. सर्पिणीला घारीची भीती वाटत नाही, माणसाला सापाचे भय वाटत नाही आणि माणूस पाहून घार भयभीत होत नाही. किती सुंदर दृश्य! केवढा हा आपला विजय! आभाळाकडे डोळे लावून आणि भक्तिभावाने हात जोडून तो साधू उद्गारला, 

"‘‘प्रभो, धन्य धन्य आहे तुझी लीला!’’ 

"डोळे उघडून तो पुढे आला. एकदम त्याच्या दृष्टीला तीन प्रेते पडली. एक माणूस, एक घारीचे पिल्लू आणि एक सापाचे पिल्लू!"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 12, 2022 - April 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
५. सोन्याची गाडी 
................................................................................................
................................................................................................

" ... गेली सात वर्षे तो या गांधी टोपीवाल्यांना जवळून पाहत होता. या काळात दादासाहेब दोन वेळा तुरुंगात जाऊन आले. ते नुसते मोठे वकील राहिले नाहीत; बडे देशभक्तही झाले. पांढऱ्या टोप्या घालणारे व्यापारी, वकील, डॉक्टर यांच्या घरी चळवळीच्या निमित्ताने त्यांचे जाणे-येणे वाढले. पण या साऱ्या देशभक्तांपैकी कुणाच्याही घरी दुपारी दादासाहेब जेवायला राहिले तरी श्रीपतीला कधीच कुणी जेवायला घातले नव्हते."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 12, 2022 - April 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
६. दोन भुते 
................................................................................................
................................................................................................

"त्या निर्जन गावात आता फक्त ते एक पडके देऊळ उभे आहे. ... "

" ... समुद्रात मजेने पोहायला पडलेल्या माणसाला चंद्रग्रहणादिवशीच्या लाटांनी भराभर आत ओढून न्यावे, त्या लाटा नसून क्रूर काळाचे पाशच आहेत, अशी त्याची खात्री व्हावी. त्याने हताश होऊन पाण्यात एक-दोन गटांगळ्याही खाव्या आणि आपण आता समुद्राच्या तळाशी जातो, असे त्याला वाटते, तोच मासे धरायला आलेल्या एका कोळ्याची होडी त्याच्या हाताला लागावी अगदी तस्से झाले मला बंगल्यावरची ती पाटी पाहून! 

"होय! मी आणि माझी बायको माझ्या बालमित्राच्या घरी आलो होतो. 

"लाहोरहून पुण्यापर्यंत अगदी सुरक्षित आलो होतो. सुऱ्याचा वार न लागता, बंदुकीची गोळी न लागता, दिनकरच्या घरी येऊन पोहोचलो होतो - अब्रू न गमावता, प्राण न गमावता!"

" ... मिटलेल्या डोळ्यांपुढे लाहोरला पाहिलेली विलक्षण दृश्ये भराभर उभी राहू लागली… रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ होऊन पडलेला तो आठ वर्षांचा मुलगा! तो पाणी मागत होता; पण त्याच्यापाशी थांबून त्याच्या तोंडात पाणी घालण्याचे धैर्य काही केल्या मला आले नाही. वणव्यात सापडलेल्या पाखरांच्या घरट्यांप्रमाणे जळणारी ती घरे… त्या अक्राळविक्राळ ज्वाळा पाहून एकच कल्पना एकसारखी माझ्या मनात थैमान घालू लागली होती. ही घरे जळत नाहीत, हे माणुसकीचे सरण पेटले आहे."

" ... लाहोरहून पळ काढावा म्हणून धडपडत असताना चुकून मीच एकदा दंगेखोरांच्या तडाख्यात सापडलो होतो. प्रक्षुब्ध जमावाला शांत करण्याकरिता ‘‘महात्मा गांधी की जय!’’ म्हणून ओरडावे, असे त्यावेळी माझ्या मनात आले; पण ते शब्द काही केल्या माझ्या ओठांबाहेर फुटले नाहीत. गांधींच्या तत्त्वज्ञानाचा संपूर्ण पराभव मी माझ्या डोळ्यांनी पाहत होतो. त्यांनी निर्माण केलेली ती अहिंसेवरची अंधश्रद्धा…"

" ... माझा हात अगदी घट्ट धरुन आ म्हणाली, ‘‘दिनू, मी थोरातांच्या घरात पाऊल टाकलं, त्यावेळी अगदी परकरी पोर होते; पण पहिल्याच दिवशी मला अगदी मायेनं जवळ घेऊन सासूबा म्हणाल्या- मुली, तू ज्या कुळात आली आहेस, ते फार थोर आहे. त्याचं मोठेपण तू राखायला हवंस. रखेली होण्यापेक्षा मरण पुरवलं, म्हणून संभाजीनं पळवून नेलेल्या आपल्या कुळातल्या पोरीनं किल्ल्याच्या तटावरुन खाली दरीत उडी टाकून जीव दिला आहे. त्या सतीची आठवण म्हणून आपल्या कुळात संध्याकाळी तुळशीपाशी सांजवात ठेवण्याची चाल पडली आहे. दु:खात, संकटात, काळोखात तीच तुला वाट दाखवील.’’"

" ... ती शांतपणाने म्हणाली, ‘‘शिवू नकोस मला, दिनू!’’ 

"मी चकित होऊन तिच्याकडे पाहू लागलो. तिनं खोल आवाजात मला प्रश्न केला, 

"‘‘तू माफी मागणार आहेस?’’ 

"‘‘होय.’’ मी खाली मान घालून उत्तर दिलं. 

"ती काहीच बोलली नाही. 

"क्षणभरानं मी वर पाहिलं. तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या, मी सद्गदित स्वरानं तिला हाक मारली, ‘‘आ!’’ 

"ती कठोर स्वरानं उत्तरली, ‘‘दिनू, मी तुझी आ नाही. थोरातांच्या कुळात जन्माला येऊन माफी मागणाऱ्या दिवट्या पोराची आ म्हणवून घ्यायला मी तयार नाही. त्यापेक्षा देवानं मला एकच मुलगा दिला असता तर… पोरा, तू मराठ्याच्या रक्ताचा आहेस. मराठा मान कापून दे; पण मान वाकवणार नाही, हे तू कसं विसरलास? थोराताच्या कुळाचं मोठेपण, आपल्या जातीचं शील… पोरा, तुझ्या नखाला धक्का लागला तरी माझ्या काळजावर घाव पडत होता; पण तू असं तोंडाला काळं फासून घरात परत येण्यापेक्षा…’’ 

"ती थरथर कापू लागली. तिच्या तोंडातून शब्द बाहेर फुटेना. मूर्च्छा येऊन ती पडते की काय, असं मला वाटू लागलं. मी तिला धरण्याकरिता पुढं झालो; पण ती भिंतीचा आधार घेऊन उभी राहिली आणि बोलू लागली, ‘‘त्या माफीच्या अर्जावर सही करणार नाही, असं वचन द्यायचं असेल तरच मला हात लाव. नाहीतर-कशाला थोराताच्या कुळात जन्माला आलास, पोरा? शेपटी घालून पळत सुटणं हे कुत्र्याचं काम! सिंहाचा बच्चा…’’
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 12, 2022 - April 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 12, 2022 - April 12, 2022. 
Purchased March 22, 2022. 
................................................
................................................
Mehta Publishing House, 
1941, Madiwale Colony, 
Sadashiv Peth, Pune 411030
मराठी पुस्तक प्रकाशनाचे हक्क 
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे. 
प्रकाशक : सुनील अनिल मेहता, 
मेहता पब्लिशिंग हाऊस, 
१९४१, सदाशिव पेठ, 
माडीवाले कॉलनी, पुणे – ४११०३०.
................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4663417905