Tuesday, April 12, 2022

Sukhacha Shodh सुखाचा शोध वि. स. खांडेकर Vishnu Sakharam Khandekar.

................................................................................................

Sukhacha Shodh  
सुखाचा शोध
वि. स. खांडेकर
Vishnu Sakharam Khandekar
................................................................................................
................................................................................................

As one reads it, one wonders why one hasn't read more of this author. Answer comes without looking for it. 

He finds easy solutions in his prejudices, cheating himself and his readers of deeper, complex realities. 

In his introduction he justifies the portrait of the social working educated woman who's despised normal life when young, and married later without any concept of love. That justification goes on and on, perhaps because he was aware of how one sided, unfair it is, even if it may have been based in observation. 

The book was written for a film, eight or so decades ago, and perhaps prejudices like his still prevail, despite education of women being not only norm but just another of the several requirements, tacked on to all of the others. Exceptions usually are about daughters vs other women, but not always. 

And sometimes, it's hatred of the woman who's no less.
................................................................................................
................................................................................................
अनुक्रम 

आप्पा 
आनंद 
उषा 
आनंद 
उषा 
आनंद 
उषा 
चंचला 
आप्पा 
आनंद 
चंचला 
आनंद 
चंचला 
उषा 
आप्पा 
माणिक

REVIEW 

प्रास्ताविक

" ... ही कथा मुळात मी जी कल्पिली ती केवळ चित्रपटाकरिता! ‘देवता’ चित्रपटाबरोबर त्याची कादंबरी प्रकाशित होऊन ती लोकप्रिय झाल्यामुळे त्याच्या पाठोपाठ निघणाऱ्या या चित्रपटाचीही कादंबरी मी लिहावी अशी कल्पना पुढे आली. नेहमीप्रमाणे घाईतच– फार फार तर बारा-तेरा दिवसांत असेल– मी हे कादंबरीलेखन संपविले आणि ‘सुखाचा शोध’ या चित्रपटाच्या पाठोपाठ ही कादंबरी प्रकाशित झाली. त्यामुळे स्वतंत्र कादंबरी या दृष्टीने तिचा आणखी किती व कसा विकास होऊ शकतो हा विचार त्या वेळी माझ्या मनाला शिवलासुद्धा नाही. किंबहुना या कथेचा विषय बरेच दिवस माझ्या मनात घोळत असूनही मी माझ्या संकिल्पत कादंबऱ्यांत त्याची कधीच गणना केली नव्हती. 

"मध्यम वर्गातल्या स्त्रीचे दास्य आणि दु:ख दिग्दर्शित करणारा माझा ‘देवता’ बोलपट चित्रित होऊ लागला तेव्हा माझ्या मनाच्या अजबखान्यात कुठे तरी पडून राहिलेला हा विषय पुन: पुन्हा डोके वर काढू लागला. मी स्वत:शीच विचार करू लागलो.. कलावंतांचे मोठेपण जीवनाच्या सर्व बाजू सहृदयतेने चित्रित करण्याच्या कौशल्यात आहे. कलावंत हा नुसता चतुर वकील नाही, तो प्रामाणिक तत्त्वशोधक आहे. तो एकांगी प्रचारक नाही; सर्वस्पर्शी सत्यपूजक आहे. ‘Doll's House’ मध्ये ‘पुरुष आपल्या आवडत्या स्त्रीकरिता जो त्याग करू शकत नाही, तो लाखो बायकांनी आतापर्यंत आपल्या प्रिय पुरुषांकरता केला आहे’ असे नवऱ्याला बजावून घरातून निघून जाणारी नोरा चित्रित करणाऱ्या इब्सेननेच 'Lady from the Sea' मध्ये केवळ स्वप्नाळू स्मृतीमुळे रम्य वाटणाऱ्या पूर्वजीवनाकडे धाव घेणाऱ्या नायिकेचा भ्रमनिरास रंगवून आपले हरपलेले सुख आपल्या घरातच आहे हा साक्षात्कार तिला घडविला नाही काय? ... 

" ... दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे दुसरे अधिवेशन जमखंडी येथे १९४० साली माझ्या अध्यक्षतेखाली भरले होते. या संमेलनातल्या एका चर्चेत कै.आनंदीबाई किर्लोस्कर, सौ.मालतीबाई दांडेकर प्रभृती स्त्रियांनी ‘माणिक’च्या स्वभावचित्रचा उल्लेख करून वाङ्मयात सुशिक्षित स्त्रीला अन्याय होत आहे अशी तक्रारही मांडली होती. ... "

" ... चित्रपटात कृत्रिम नाट्याची (Melodrama) फार जरुरी असते, अशी आपल्याकडे निर्मात्यांची समजूत असल्यामुळे चित्रपटातल्या कथेत माणिक आत्महत्या करते असे दाखविले होते. पण कथेचा हा शेवट केवळ कलेच्याच नव्हे तर जीवनाच्याही दृष्टीने अस्वाभाविक होता. म्हणून कादंबरी लिहिताना मी माझ्या मूळच्या कल्पनेप्रमाणे माणिक रंगविली. या माणिकच्या डोळ्यांत चांगले चरचरीत अंजन पडलेले असते. पश्चात्तप्त मन:स्थितीत ती आत्मपरीक्षणाला उद्युक्त होते. ते करताना तिला पूर्णपणे कळून चुकते की, संसारातले सुख काव्याची थट्टा करण्यात नाही; आपल्या त्यागाने दुसऱ्याच्या जीवनात काव्य निर्माण करण्यात आहे. अंतर्मुख झाल्याबरोबर तिचा आत्मवंचक अहंकार गळून पडतो. तिच्या दृष्टीपुढले धुके पूर्णपणे लोप पावते. आता तिला पटते की, समाजसेवा हे प्रीतीचेच विशाल रूप आहे. ज्याला आपल्या घरावर प्रेम करता येत नाही, आपल्या माणसावर प्रेम करता येत नाही, त्याला समाजावरही प्रेम करता येणार नाही. अशी जाणीव झालेल्या माणिकचे पुढचे जीवन रंगविण्याची इच्छा गेली सात वर्षे माझ्या मनात वारंवार उद्भवली आहे. या नव्या माणिकची आनंदाची पत्नी झालेल्या उषेशी ज्या नाट्यपूर्ण घटनेमुळे पुन्हा गाठ पडते, तो प्रसंग माझ्या मनाच्या फलकावर कल्पनेच्या कुंचल्यामुळे मी अनेकवार रंगविला आहे. 

"पण... 

"आंब्याला येणाऱ्या साऱ्या मोहराची फळे होतातच असे नाही. लेखकाच्या मनात नृत्य करणाऱ्या अगणित कल्पनांचेही तसेच आहे."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................

April 11, 2022 - April 11, 2022. 

"पिकते तिथे विकत नाही म्हणतात, ते काही खोटे नाही. 

"माझी गेल्या नऊ वर्षांची तपश्चर्या यंदा फळाला आली. नुसत्या वसंत-व्याख्यानमालांची सोळा आमंत्रणे गळ्यात येऊन पडली. वडगाव-बुद्रुक, पिंपळगाव-खुर्द, कडबोडे, वसाड, फुरसुंगी, मोडलिंब... छे! साऱ्या गावांची नावेसुद्धा लक्षात राहत नाहीत! 

"या सोळा व्याख्यानांची तयारी म्हणजे काय लहानसहान काम आहे? सोळा विषय शोधून काढण्याकरिता संध्याकाळी डोके खाजवीत बसलो. ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’, ‘चरखा? छे, सुदर्शन!’, ‘केल्याने होत आहे रे’, ‘देव तेथेचि जाणावा’, हे चार मथळे कागदावर टिपले न् टिपले तोच... 

"माझी किंमत आमच्या घराला कळतीय् कुठे? आपल्या भाषणांची तयारी करण्याकरिता समाजसेवकाला निवांतपणा हवा असतो, हे या घरात कुणाच्याच लक्षात येत नाही. चांगला देशी कागद आणि शिऱ्याची शाई घेऊन बसावे, टिळक-गांधींच्या पुस्तकांची पाने चाळावीत, एखादे दणदणीत वाक्य डोक्यात यावे नि अगदी त्याच क्षणी आईने दारात येऊन म्हणावे, ‘आप्पा, माझा उपास आहे आज; जरा केळी घेऊन येतोस का?’ 

"असा राग येतो अशा वेळी! 

"पण... 

"जन्म देणाऱ्या आईला नाही कसे म्हणायचे? मुकाट्याने जाऊन केळी घेऊन यावे लागते. परत येऊन कामाला बसावे, तो सुचलेले वाक्य वाऱ्यावर कुठल्या कुठे नाहीसे झालेले असते! तासतासभर आढ्याकडे बघत बसले तरी ते काही परत येत नाही. माझ्या चिंतनात अडथळे आणून आपण समाजाचे किती नुकसान करीत आहो, याची आईला कुठून कल्पना असणार? तिने उपास करावेत, काकड्यांचा कायरस करावा, फार फार तर शिवलीलामृत वाचावे!"

"गेली नऊ वर्षे मी स्वत:चा संसार सोडून समाजाचा संसार केला, इतर बापांप्रमाणे पोरांना काऊचिऊच्या गोष्टी सांगत न बसता खेडोपाडी जाऊन गहन विषयांवर व्याख्याने दिली, आजारी बायकोने घरी राहायचा आग्रह केला तेव्हा ‘माझी मातृभूमी तुझ्याहूनही आजारी आहे’ असे तिला राखठोक उत्तर दिले! ती मेली त्याच्या दुसरे दिवशीचे व्याख्यानसुद्धा मी रद्द केले नाही. या तपस्येचे फळ मिळायची वेळ आता आली आहे. जिल्ह्यातला प्रमुख समाजसेवक म्हणून प्रत्येक वर्तमानपत्रात माझे नाव झळकू लागले आहे. शिडीच्या पहिल्या पायरीवरून मी कितीतरी वर आलो. अशीच धडपड केली तर म्युनिसिपालटीतच काय, कौन्सिलातसुद्धा आप्पाराव देशपांडे हे नाव गाजल्याशिवाय राहणार नाही. विश्वामित्रने साठ हजार वर्षे तपश्चर्या केली तरी त्याला इंद्रपद मिळाले नाही. पण या आप्पाराव देशपांड्याने अवघ्या नऊ वर्षांत..."
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 12, 2022 - April 12, 2022. 

"आईचा धीर सुटल्यासारखा झाला. आप्पा मिळवता झाला या आनंदात ती दिवस काढीत होती! पण तो यापुढे नोकरी करून चार पैसे मिळवील असे काही लक्षण दिसेना."

"आप्पा दोन-तीन दिवसांनी निघून गेला. यापुढे प्रपंच कसा चालायचा, माझे कॉलेजचे शिक्षण कसे पार पडायचे, कुठल्याच गोष्टीविषयी चकार शब्द बोलला नाही तो! 

"त्याचे हे वेड्यासारखे वागणे पाहून आईच्या डोळ्यांत आसवे उभी राहिली. एखाद्या लहान मुलासारखी ती स्फुंदूनस्फुंदून रडू लागली. मी तिला रडताना कधीच पाहिले नव्हते. तिच्या डोळ्यातले ते अश्रू... ते पाणी नव्हते. माझ्या हृदयाची आग आग केली त्या अश्रूंनी! 

"धर्मराजाचे का कुणाचे रक्त जमिनीवर पडले तर मोठा हाहा:कार होईल म्हणून फार जपत असत, अशी एक कथा लहानपणी मी वाचली होती, तिची आठवण झाली मला. आईचे अश्रू माझ्या दृष्टीने त्या रक्तापेक्षाही अधिक मोलाचे होते. हाताने ते पुशीत मी म्हटले, ‘असं काय करावं आई?’ 

"झंझावाताने उन्मळून पडणाऱ्या केळीप्रमाणे तिचे धैर्य समूळ नाहीसे झाले होते. वर्षानुवर्षे वादळातून ती संसाराची होडी वल्हवीत आली होती. तिचे हात दमून गेले होते. आता आप्पा आपली जागा घेईल, आयुष्यातल्या शेवटच्या चार घटका आपल्याला समुद्रावरल्या लाटांचे खेळ पाहात निवांत बसता येईल, अशी आशा तिने उराशी बाळगली होती! त्या आशेचा चक्काचूर झाल्यामुळे तिच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले असावे. 

"मी मनात निश्चय केला– आईच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू दिसणार नाहीत असे वागायचे! मग माझ्या आयुष्याचे काहीही होवो! आप्पा मातृभूमीच्या सेवेला लागला... ठीक आहे. मी आईची सेवा करणार, तिला सुख होईल अशाच मार्गाने जाणार."

"रत्नागिरीचे काम दोन दिवसांत संपले. लगेच मालवणला गेलो. मोठे सुंदर गाव आहे ते! मागे ज्यांना भेटलो होतो अशी तीन-चार कुळे तिथे मिळाली नि सृष्टिसौंदर्याचा आनंदही पदरात पडला. तिथून निघायच्या दिवशी संध्याकाळी किनाऱ्यावर कितीतरी वेळ फिरलो मी! एका बाजूला माडाची झाडे, दुसऱ्या बाजूला समुद्राच्या लाटा! मोठा सुंदर देखावा होता तो! नि संध्याकाळची शोभा तर..."
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 12, 2022 - April 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
उषा 
................................................................................................
................................................................................................

"मला वाटले... देवाने मला पाखरांच्या जन्माला का घातले नाही? देवाने मला खारीचा जन्म का दिला नाही! 

"किती तरी वेळ मी तशी बसले होते. रस्त्याने जाणाऱ्या गुरांच्या पावलांचा आवाज कानांवर पडला, तेव्हा मी डोळे उघडले. हडकुळ्या गार्इंचा एक मोठा तांडा होता तो! 

"मी पुढे जाऊन त्या गाई हाकणाराला विचारले, 

"‘कुठं चालल्यात या गाई?’ 

"‘म्हापशाला!’ 

"‘म्हापशाला? गोव्यात?’ 

"‘हं!’ 

"‘कशाला?’ 

"तो चिडून उत्तरला, ‘मरायला!’ 

"मला आठवले– दर आठवड्याला म्हापशाच्या खाटिकखान्याकरिता घाटावरून गुरे येतात! 

"मी मनात म्हटले... या गार्इंना कुठे जगायचा अधिकार आहे? मग आपणच जगण्याची धडपड करण्यात काय अर्थ आहे? जे काम आज करता येण्यासारखे असेल ते उद्यावर ढकलू नये, असे मी शाळेत शिकले होते. मरणाइतके चांगले काम जगात दुसरे कुठलेच नाही, असे मला वाटू लागले. मी मालवणच्या वाटेने चालू लागले."
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 12, 2022 - April 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
आनंद 
................................................................................................
................................................................................................

"मी उषेला घेऊन दारात पाऊल टाकले मात्र! धावत पुढे आलेला बाळ ओरडला... 

"‘आजी, आजी, आनंदकाका आले. बायकोला घेऊन आनंदकाका आले!’"

"उषा माझ्या आयुष्यात येताच या प्रवाहाचे तुषार घेऊन येणाऱ्या वायुलहरी माझ्या भोवताली स्वैरपणाने नाचू लागल्या. 

"काही केल्या मन पूर्वीसारखे स्थिर होईना. त्याचा तरी काय अपराध होता? आईसाठी आणि कुटुंबासाठी नऊ वर्षे मी त्याला तुरुंगात ठेवले होते. काम... नुसते काम... एकसारखे काम! दुसऱ्या गोष्टीची आठवणच करायची नाही अशी कडक शिस्त लावली होती मी मनाला! कॉलेजमध्ये असताना मला गाणे फार आवडे. टेनिस खेळावेसे वाटे. कविता करण्याचीही अधून मधून हुक्की येई. पण ज्या दिवशी मी विमाएजंट झालो त्या दिवशी जगातल्या काव्याचा आणि जीवनातल्या क्रीडेचा मी निरोप घेतला. काही माणसे देशासाठी तुरुंगात जातात! आपण कुटुंबासाठी तुरुंगात असल्यासारखे जीवन कंठायचे असे मी मनाशी ठरविले."
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 12, 2022 - April 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
उषा 
................................................................................................
................................................................................................

"माझे आनंद मुंबईला गेले आहेत. पुस्तके घेऊन अभ्यासाला बसले तरी मनात येते– आनंद यावेळी मुंबईत काय करत असतील? त्यांना उषेची आठवण होत असेल का? त्यांना काकडीचा कायरस फार आवडतो. ते ज्यांच्याकडे उतरले असतील तिथल्या बायकामाणसांच्या ध्यानात हे राहत असेल का? त्यांना फुलेसुद्धा फार आवडतात. पण बागेत कितीही फुले फुलली तरी ते आपल्या हाताने त्यांतले एक सुद्धा तोडून घेणार नाहीत! आज रात्री उशीवर फुले दिसली नाहीत की त्यांना उषेची आठवण होईल. नि मग... 

"पाखरांसारखे फुलांना जर उडता येत असते, तर बागेतल्या साऱ्या फुलांना मी मुंबईला जायला सांगितले असते."

"आप्पांनी पुढे लिहिले होते... 

"‘आता एक आनंदाची बातमी! आनंदाची बातमी कसली? आनंदाच्या बायकोलाच घेऊन येतोय् मी! मुलीचं नाव माणिक! चांगली बी.ए. आहे. सहा-सात वर्षे मास्तरीण होती. सभांत कशी फडाफड बोलते. समाजसेवेची फार हौस आहे तिला!’"
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 12, 2022 - April 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
आनंद 
................................................................................................
................................................................................................

"माणिक! 

"सारे जग माणिकमय झाले आहे असे लाजाहोमाच्या वेळी मला वाटले. 

"लग्नविधी संपता संपता उपाध्याय म्हणाले, ‘आता नक्षत्रदर्शनाला बाहेर चलायचं!’ 

"माणिककडे पाहून हसत हसत मी पुटपुटलो, ‘नक्षत्र पहायला बाहेर कशाला जायला हवं? आपण नाही बुवा हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागणार!’ 

"माणिकने मान मुरडून माझ्या या विनोदाचा निषेध केला."
................................................................................................

"जगाच्या दृष्टीने आईचे सोने झाले. पण मला मात्र घरात अंधार पसरलेला दिसू लागला. त्या अंधारात एकच तारका डोळ्यांना दिसे... उषा. पण तिच्यावर माझा काय हक्क होता? 

"आणि जिच्यावर माझा हक्क होता त्या माणिकला माझ्या हृदयाला केवढी जखम झाली आहे याची कल्पनाच नव्हती. आज पदवीधर स्त्रियांचे संमेलन आहे, उद्या भगिनीवर्गात चर्चा आहे, परवा शिशुसप्ताहात व्याख्यान आहे म्हणून ती घराबाहेर जात होती. माझ्या पिचणाऱ्या मनाला तिच्याकडून शब्दांचासुद्धा ओलावा मिळाला नाही. मी माझ्या खोलीत येरझारा घालून कसा तरी वेळ काढीत होतो. 

"कविता म्हणता म्हणता मिरा ‘स्वामी तिन्ही जगांचा! आईविना भिकारी’ या ओळी म्हणू लागली की एखाद्या लहान मुलाप्रमाणे माझ्या डोळ्यांत पाणी उभे राही. 

"मृत्यूपुढे मनुष्य लहान होतो हेच खरे! बाळने मला मिठी मारून ‘काका, आजी कुठं हो गेली?’ म्हणून विचारले की घट्ट मिठी मारून आपणही त्याला तोच प्रश्न विचारावा असे क्षणभर माझ्या मनात येई. बाळमनाची समजूत घालण्याकरिता ‘आजी देवाघरी गेली’ असे मी सांगितले की बाळ प्रश्न करी, ‘तिथं तिचे पाय कोण हो रगडील?’ 

"त्याचे असले प्रश्न ऐकले नि उषेचे मूक प्रेम पाहिले की माणिकच्या वागणुकीचा मला संताप येई. आईचा मृत्यू ही तिच्या दृष्टीने जगरहाटीतली एक साधी गोष्ट होती! 

"माणिकचे मन देवाने कशाचे घडविले हेच मला कळेना. जे माणूस आपल्या मनातले सुखाचे चांदणे फुलवीत नाही, दु:खांचा अंधार उजळीत नाही, त्या माणसाला मी आपल्या आयुष्याचा भागीदार केले होते! 

"अशा वेळी वाटे... माणिकने माझ्याशी लग्न केले तरी कशाला? थोरल्या बहिणीच्या घरी तिच्यावर अवलंबून राहून जन्म काढण्यापेक्षा आपले हक्काचे घर असावे, एवढाच तिचा लग्न करण्यातला हेतू होता की काय? पदवीधर झाल्यावर माणिकने तीन-चार वर्षे शिक्षिकेचे काम केले, समाजसेवेत भाग घेतला. या निमित्तानेच तर तिची नि आप्पाची ओळख झाली होती. मग ही सारी उच्च ध्येये सोडून तिने उशीरा लग्न केले ते कशासाठी? तिच्या माझ्याविषयीच्या उदासीनतेचा उगम कशात आहे? तिचा प्रेमभंग झाला असेल का? आणि त्या दु:खाचा विसर पडावा म्हणून तर तिने हे लग्न केले नसेल ना? 

"ऐन विशीत काल्पनिक ध्येयामागे धावून, तिशीत मिळेल त्या पुरुषाच्या गळ्यात माळ घालणाऱ्या... एखाद्या गरीब अबलेची सवत होण्यांतसुद्धा आनंद मानणाऱ्या... तीन-चार सुप्रसिद्ध सुशिक्षित स्त्रियांची मला आठवण झाली!"
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 12, 2022 - April 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
उषा 
................................................................................................
................................................................................................

"मी जड पावलांनी तीन-चार पायऱ्या उतरले. इतक्यात मागून कुणीतरी धावत आले. 

"माझा हात घट्ट धरून त्यांनी मला प्रश्न केला, ‘कुठं चाललीस?’ 

"ते आनंदच होते. 

"मी शांतपणे उत्तर दिले, ‘कुठंही, या घराच्या बाहेर कुठंही!’ 

"‘या घरात तुझं कुणीच नाही?’ 

"मी हसून म्हणाले, ‘आहे ना! ते सुखी व्हावं म्हणूनच मी हे घर सोडून जात आहे!’ 

"‘तुझ्यावाचून ते माणूस सुखी होईल?’ 

"माझे मन म्हणत होते... ‘आनंद, आनंद, कशाला हा प्रश्न विचारलात मला?’ 

"माझ्या जिभेने उत्तर दिले, ‘सुख दोनच माणसांच्या जगात असतं. या घरात माझं जे कुणी तरी आहे, त्याला आपलं माणूस मिळालं आहे. त्या दोघांमध्ये येऊन त्याला दु:खी करण्यापेक्षा...’

"बोर्डिंगातल्या एकांतात क्षणोक्षणी आर्इंचे ते शब्द मला आठवू लागले... ‘उषा, माझ्या आनंदला सांभाळ हं!’ 

"राहून राहून माझ्या मनात येई... आर्इंच्या या शब्दांचा काय बरे अर्थ असेल? 

"माणिकताई आनंदांचा संसार सुखाचा करणार नाहीत. आनंद दु:खी होतील. दु:खाने माणसाच्या मनाचा तोल जातो. आनंदांचा असा तोल गेला तर उषेने त्यांना सावरावे, असा आर्इंच्या त्या शब्दांचा अर्थ होता काय?"

"घरी गेले तो आजाराची शंका खरी ठरली. आनंद आजारी नव्हते. पण आदल्या दिवशी बाळला खूप ताप आला होता. बोर्डिंगात राहायला गेल्यापासून आनंद दिवसभर विम्याच्या कामाकरिता बाहेरच असत. बाळला ताप आला आहे हे ठाऊक असूनसुद्धा माणिकताई बाहेर गेल्या. आनंद घरी परत आले तेव्हा ताप एकशेचारपर्यंत चढून बाळ बेशुद्ध झाला होता. मिरा त्याच्यापाशी रडत बसली होती. माणिकताई परत आल्यावर आनंद त्यांना खूप खूप बोलले! त्यांनीही रागाने त्यांना उलट उत्तरे दिली."

"बाळचा ताप मलेरियाचाच होता. संध्याकाळी तो कमी झाला. ताप निघाल्यावर त्याने आनंदांना मिठी मारली. तेव्हा ते म्हणाले, ‘उद्यापासून तुला नि मिराला बोर्डिंगातच ठेवू या!’ 

"माझ्याबरोबर बोर्डिंगात राहायला मिळणार म्हणून बाळ आनंदाने टाळ्या पिटू लागला. मिरालाही खूप आनंद झाला. पण ती लगेच आनंदांच्याकडे वळून म्हणाली, ‘काका, तुम्ही एकटेच राहणार घरी?’ 

"त्यांनी हसत उत्तर दिले, ‘मलाही बोर्डिंगात ठेवून घेतात का पाहू या!’"
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 12, 2022 - April 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
चंचला 
................................................................................................
................................................................................................

" ... ‘माझ्याशी लग्न करायचे असेल तर माझ्या बंगल्यावर येत चला’, असे सांगितल्याबरोबर त्या दोघांची जी त्रोधा झाली... त्या संस्थानिकाला आपली म्हातारी आई आठवली... त्या शेठाला जातीची भीती वाटली! म्हणे ‘मोटार माग, जडजवाहीर माग, दुसरं काही माग. पण लग्नाची गोष्ट तेवढी काढू नकोस!’ 

"श्रीमंत नंदीबैलाची बायको होण्याइतकी चंचला काही दूधखुळी नाही म्हणावे."
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 12, 2022 - April 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
आप्पा 
................................................................................................
................................................................................................

"संमेलन लवकर करावे असे मी सुचविले तेव्हा एक गृहस्थ म्हणाले, ‘तुमच्या मातु:श्री नुकत्याच कैलासवासी झाल्यात. तेव्हा...’ 

"या म्हाताऱ्या माणसांना केव्हा मरायचे हे सुद्धा कळत नाही. चार महिन्यांपूर्वीच आईने आपले प्रस्थान ठेवले असते तर काय बिघडले असते? नाही तर आणखी चार महिने जगायचे होते! नको कोण म्हणत होते? पण आमच्या आईच्या अंगी एवढा पोच होता कुठे? 

"आई बोलूनचालून अशिक्षित. तिला काय बोल लावायचा? पण हा आनंद... आता लवकरच एल.एल.बी. होऊन वकिली करायला लागेल. त्याला तरी आपला थोरला भाऊ किती मोठा झाला आहे, याचा पत्ता कुठे आहे? ज्या दिवशी वर्तमानपत्रात आप्पाराव देशपांडे स्वागताध्यक्ष होणार असे छापून आले त्या दिवशी तो थंडपणाने मला म्हणाला, 

"‘आप्पा, हे वाचून फार आनंद झाला मला!’ 

"म्हणे आनंद झाला मला! त्याने आनंदाने नाचायला हवे होते, वेडे व्हायला हवे होते. मी त्याला म्हटले, ‘बच्चा आहेस तू अजून! तुझा आप्पा ही केवढी मोठी विभूति झाली आहे याची कल्पना नाही तुला. उद्या त्याचा पुतळा होईल, त्याचं चरित्र लिहिलं जाईल...’"
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 12, 2022 - April 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
आनंद 
................................................................................................
................................................................................................

"माणिकच्या मत्सरामुळे उषा बोर्डिंगात गेली, माणिकच्या बेजबाबदारपणामुळे बाळ आणि मिरा यांना बोर्डिंगात ठेवावे लागले. लहानसहान गोष्टीवरून वितंडवाद घालण्याच्या तिच्या सवयीमुळे घरात गोड शब्दालासुद्धा मी पारखा झालो. तिने त्या धनंजयाशी मोकळेपणाने वागावे नि माझ्याशी मात्र तुटकपणाचे वर्तन करावे याचे राहून राहून मला दु:ख होऊ लागले. चंचलेविषयी माझ्या मनात उत्पन्न झालेला मोह... अनेक दिवस उपाशी ठेवलेल्या मनुष्याने केलेली चोरी होती ती! 

"भुकेची वेळ झाली म्हणजे लहान मूल जसे रडू लागते, तशी माझ्या मनाची स्थिती झाली होती."
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 12, 2022 - April 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
चंचला 
................................................................................................
................................................................................................

"त्या शेठ-संस्थानिकांना शह देण्याकरिता चातुर्याची शिकस्त करून मी आनंदला पकडलं. त्याचा पुरा नक्षा उतरविण्याकरिता आज मी धनंजयाला जवळ केले आहे. चार महिन्यांनी अमेरिकेत गेल्यावर हा धनंजयही मागे पडेल."
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 12, 2022 - April 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
आनंद 
................................................................................................
................................................................................................

"इतके दिवस आयुष्य ही एका व्यक्तीची लढाई मानीत होतो मी! 

"ती साऱ्या समाजाची लढाई आहे हे आज मला पटले. हा विचार मनात आला तेव्हा कुठे माझा डोळा लागला. 

"दुसरे दिवशी मी या लोकांत काम करायला सुरुवात केली. लगेच माझ्या लक्षात एक महत्त्वाची गोष्ट आली... वकील म्हणून माझा या लोकांना पुष्कळ उपयोग होण्यासारखा होता. सामाजिक क्रांतीचे काम माझ्यासारख्या लक्षवधी लोकांचे आहे. त्याला हातभार लावता लावता गोरगरिबांना मदत करणे आणि त्यांची दु:खे हलकी करणे प्रत्येक धंद्यातल्या मनुष्याला शक्य आहे. शिक्षकाला त्यांना शिकविता येईल, डॉक्टराला त्यांना औषधे देता येतील, व्यापाऱ्याला कमी नफा घेऊन त्यांना माल देता येईल, वकिलाला त्यांची भांडणे मिटविता येतील..."
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 12, 2022 - April 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
चंचला 
................................................................................................
................................................................................................

"माझ्या डोळ्यांपुढे एकच प्रश्न नाचत होता, आनंदाचा सूड कसा घ्यायचा? 

"तीन-साडेतीन महिन्यांनी धनंजयाने ती संधी मला आणून दिली. तो वेडपट भय्या माणिकचे एक पत्र घेऊन त्याच्याकडे आला. धनंजयाने त्या पत्राला तोंडीच उत्तर दिले, ‘जगात तत्काळ जीव घेणारी पुष्कळ औषधे असतात असे माणिकला सांग!’"
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 12, 2022 - April 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
उषा 
................................................................................................
................................................................................................

"उषेने आनंदांना सोडून जायचे? आनंदांच्यापासून दूर राहून उषा सुखी होईल? जगात कुठेही तिला सेवा करता येईल! पण प्रेम? आता आनंदांशिवाय दुसऱ्या कुणावर ती कशी प्रेम करू शकेल?"
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 12, 2022 - April 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
आप्पा 
................................................................................................
................................................................................................

"मी अगदी गोंधळून गेलो. पहिल्यांदा ही बातमी खरीसुद्धा वाटेना मला. रात्रीचे नऊ वाजून गेले होते. तरी बँकेच्या मॅनेजराकडे गेलो. ‘धनंजयानं संमेलनाच्या खात्याची सर्व रक्कम बँकेतून काल काढली’, हे त्यानेही सांगितले."
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 12, 2022 - April 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
माणिक
................................................................................................
................................................................................................

"आक्काच्या अकारण मत्सराने मी मनात जळत होतेच. या आगीत तेल ओतले ते वर्तमानपत्रातल्या एका बातमीने! शाळेत असताना ज्यांचे आयुष्य मी आदर्श म्हणून माझ्या डोळ्यांपुढे ठेवले होते त्या हेडमास्तरीणबार्इंनी चाळीसाव्या वर्षी लग्न केले होते; नि तेही ज्याला पहिली बायको व तिच्यापासून झालेली चार मुले होती अशा एका मनुष्याबरोबर! 

"त्या बातमीने मला अगदी बेचैन केले. याच वेळी आप्पा मला भेटले, त्यांनी माझ्यापाशी लग्नाची गोष्ट काढली आणि तुम्हाला पाहताच मी लग्नाला होकार दिला. 

"मी लग्न केले ते मला हक्काचे घर असावे, सुखाने जगता यावे, मालकीण या नात्याने अधिकार गाजवायला मिळावा म्हणून! आनंद, रागावू नका. विमा-एजंटाशी लग्न करण्यात मी त्याच्यावर फार मोठे उपकार करीत आहे, अशा धुंदीत मी लग्नाला उभी राहिले."

"आनंद, तुमच्यापाशी दुसरे काही मागत नाही मी! एकच गोष्ट... उषेला मुलगी होईल, तेव्हा तिचे नाव माणिक ठेवाल का? 

"मला मुलगा झाला तर त्याचे नाव मी ठेवणार आहे, आहे का ठाऊक?... आनंद. 

"तुम्ही म्हणाल... मुलगी झाली तर? 

"तिचेही नाव माझ्यापाशी तयार आहे... उषा."
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 12, 2022 - April 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
April 11, 2022 - April 11, 2022. 
Purchased March 22, 2022. 
Sukhacha Shodh 
by V. S. KHANDEKAR
(Marathi) 
Kindle Edition
Marathi Edition  
Publisher‏: 
‎MEHTA PUBLISHING HOUSE 
(1 January 1941)
Language‏: Marathi
ASIN: - B01MS6TI43
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4662131277