................................................................................................

चकाटया : द. मा. मिरासदार / विनोदी कथासंग्रह
Chakatya
(Marathi)
by D.M. MIRASDAR.
................................................................................................
................................................................................................
Pure feast of laughter here.
And yet, there are portraits of humanity that reduce one to speechless tears, too.
Surprisingly author can do lovely, evocative portrayals of nature too, and not extraordinary scenes at thst bit everyday, known things and their beauty very familiar, brought forth in words.
Surprisingly because it's assumed that poetic portrayals of beauty of nature aren't in harmony with humor, much less the laughter of myriad hues that Mirasdar brings.
................................................................................................
................................................................................................
अनुक्रम

शिवाजीचे हस्ताक्षर
प्रलय
बाबा
फोटो
स्वभाव
पोलीस-तपास
रंग देण्याचा प्रकार
नवा रस्ता
अभ्यास
शायडी
पठाण
बाबांचा अभ्यास
गफलत

REVIEW

"‘‘हा एक नंबरचा गाढव आहे.’’ मास्तर त्याच्याकडे बोट दाखवून गंभीरपणे म्हणाले, ‘‘यानं गध्यानं काय लिहिलंय पाहा – ‘शिवाजीचा जन्म रायगडावर झाला. तो लहानपणी हुशार होता. त्याने घराला स्वराज्याचे तोरण बांधले. पुण्यात तो शनिवारवाड्यात राहत असे –’’
"हे वर्णन ऐकून सगळ्या वर्गात मोठा हशा झाला. ही: ही: करून आम्ही हसू लागलो. साठे लेकाचा अगदी बावळट आहे. त्याला काही म्हणजे काही कळत नाही."
"‘‘अकलेच्या कांद्या, शिवाजी शनिवारवाड्यात राहत होता का?’’
"‘‘न...नाही.’’ साठे घाबरून ओरडला.
"‘‘मग कुठे राहत होता? मी काय सांगितलं होतं?’’ ‘
"‘ज-जि-जिजामाता बागेत. वसंत टॉकीजजवळ.’’"
" ... मास्तर प्रत्येकाने लिहिलेला मजकूर वाचून दाखवू लागले आणि त्याला झोडपू लागले. एकाने हुमायून हा बाबराचा बाप असून, बाबराने त्याला देशोधडीला लावले व स्वत: राक्षसतागडीशी लढाई करून दिल्लीची गादी बळकावली, असे ठामपणे म्हटले होते. त्याबद्दल त्याला चांगलाच चोप बसला. इतका की, पुन्हा आपण अशा रीतीने दिल्लीची गादी कधीही बळकावणार नाही, असे त्याने रडतच कबूल केले. दुसर्या एकाने लिहिले होते की, शेरशहाने फुटपट्टीने जमीन मोजली आणि घोड्यांना डाग दिले. मास्तरांनी त्याला फुटपट्टीने बडविले. कुणी नूरजहान ही जहांगीरची सख्खी आई असल्याचे शपथपूर्वक लिहिले होते. कुणी, शहाजहानला ठार मारून औरंगजेबाने आपल्या बापाच्या वधाचा सूड घेतला असे म्हटले होते. या सगळ्यांना मास्तरांनी चांगलेच बडवून काढले. कोणाचे कान पिरगळले. कोणाला फुटपट्टीने ठोकले, तर कोणाच्या पाठीत धपके घालून चोपले आणि मगच सगळ्यांना पेपर दिले.
"वर्गात सगळीकडे रडारड झाली."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................

June 26, 2022 - June 26, 2022.

"शिवाने पुरवलेली ही माहिती ऐकून सगळ्यांना निश्चितपणे वाटले की, ही बातमी खरी ठरण्याचा संभव आहे. म्हणूनच गणामास्तरने आपल्याला त्याचा सुगावादेखील लागू दिला नाही. आणखी आठ दिवसांनी हे जग पाण्यात बुडणार हे नक्की. अगदी पार बुडणार. कशाचा मागमूससुद्धा राहणार नाही. आता आपले आयुष्य फक्त आठ दिवस. आठ दिवस तरी कुठले? बातमी छापून दोन दिवस तरी झाले असतील. पाच-सहा दिवस तरी राहिले आहेत की नाहीत, कोण जाणे."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
June 30, 2022 - June 30, 2022.

"‘‘कसली गोष्ट बाबा? भुताची?’’
"‘‘हॅट्!’’ बाबा सिनेमातल्या दुष्ट माणसासारखे तोंड करून म्हणाले, ‘‘भुताची गोष्ट काय घेऊन बसलाहेस? अरे, एकदा आमच्या खोलीत वाघ शिरला होता वाघ –’’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
June 30, 2022 - June 30, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
फोटो
................................................................................................
................................................................................................
"ऊन आता उतरलं होतं. दुपारभर चढलेला ताव कमी झाला होता आणि पिवळसर सोनेरी उजेड झाडांच्या फांद्यांवर झगमगत होता. सूर्य मावळतीकडे कलला होता. मधूनमधून गार वाऱ्याची झुळुक येत होती. झाडांच्या बारीक फांद्या, पाने जिथल्या तिथे हलत होती. उनाच्या सणक्याने निपचित पडलेले व्यवहार आता थोडेथोडे सुरू होत होते. कुठेकुठे माणसे बाहेर पडत होती आणि इतका वेळ अगदी शांत असलेले वातावरण अधूनमधून डहुळले जात होते."
" ... इतका वेळ रिकाम्या असलेल्या झाडावर आता पाखरांचे थवे येत होते आणि त्यांची कुलकुल चालू होती. त्या शांत वेळेला त्यांचा आवाज स्पष्ट कळत होता. नेहमीपेक्षा मोठा वाटत होता."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
June 30, 2022 - June 30, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
स्वभाव
................................................................................................
................................................................................................
" ... शांताबाईचा मला भारी राग आला बाई. खरे असेल नाहीतर खोटे, पण हे नवऱ्याजवळ बोलायचे काही नडले होते का? रिकाम्या चौकशा कशाला हव्यात आपल्याला नाही का? अन् मी म्हणते, केल्या – आपल्या आपल्याशीच ठेवाव्यात की! पण नाही. सतराजणांशी बोलून बोभाटा करतील. गावभर डांगोरा पिटतील.
"मला नाही आवडत असले काही!
"स्वभावाला आपले औषध नाही म्हणून गप्प बसायचे झाले. पण चांगला नव्हे हा स्वभाव!
"मी असा विचार करीत होते. तेवढ्यात बाहेर गडबड ऐकू आली. टांगा वाजल्यासारखा वाटला. गच्चीत जाऊन बघते तर द्वारकाबाई गावाहून आलेल्या. चांगल्या पंधरा दिवसांनी आलेल्या. त्यांना काय माहीत असणार कोण सिंधुताई अन् कसली भानगड!
"मग मला बाई राहवेना. तशीच उठले आणि लगबगीने त्यांच्याकडे गेले."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
June 30, 2022 - June 30, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
पोलीस-तपास
................................................................................................
................................................................................................
"पाटलाने त्या वाटेचे असे काही भयानक वर्णन केले की, आता मात्र नारायणाच्या डोळ्यांसमोर भरदिवसा काजवे चमकले. त्याचे पाऊल पुढे पडेचना. गर्रकन मागे वळून तो परत ओसरीवर बसला. थकलेल्या सुरात बोलला, ‘‘पाटील, आता नाही गेलो तर नाही का चालायचं?’’
"हे ऐकल्यावर पाटलाच्या तोंडावर एकदम हुशारी आली. त्याचे डोळे चमकले. गपकन खाली बैठक मारून तो खासगी सुरात म्हणाला, ‘‘अहो आत्ताच कशाला? आजाबात न्हाई गेलं तरीसुदिक चालतंय.’’
"‘‘आं? आन् मग वर्दी रिपोर्ट?’’
"‘‘त्ये काय बगाय यील. मी करीन येवस्था.’’
"‘‘म्हणजे?’’
"‘‘अवो, हितंच बसून करायची चौकशी समदी. सुखाचा जीव का दु:खात घालाय लागलाय? लिहा तुमी. समदी चौकशी केली, काय पत्त्या लागत न्हाई. समदे आसंच करतेत की!’’
"‘‘आन् सही तुमची?’’
"‘‘करतो की मी!’’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
June 30, 2022 - June 30, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
रंग देण्याचा प्रकार
................................................................................................
................................................................................................
"स्टूलावर चढून त्याने रंग द्यायला सुरुवात केली. स्टूलाखाली उभा राहून मी बादली धरली. निम्मीअधिक भिंत रंगवून झाल्यावर त्याच्या लक्षात आलं, की आपण बुटके आहोत आणि त्यामुळे अगदी वरपर्यंत आपला हात पोचत नाही. तेव्हा त्याने नम्रपणे मला सुचविले की, कामाची आता अदलाबदल करावी. म्हणजे त्याने बादली धरावी आणि मी रंग द्यावा. अर्थात तो गडी येईपर्यंतच! पुढे ते दोघे रीतसर काम करतीलच. बादली धरून धरून माझ्याही हाताला रग लागू लागली होती. त्यामुळे ही त्याची सूचना मी मोठ्या आनंदाने मान्य केली. स्टूलावर चढून काम सुरू केले. भराभरा सबंध खोली रंगवून झाली. एक हात झाला. गडी परत येईपर्यंत स्वयंपाकघराचेही काम पूर्ण केले. इतका वेळ त्याने बादली तरी धरली होती. पण दुसऱ्याच्या स्वयंपाकघरात येणे ही गोष्ट त्याला फार संकोचाची वाटल्यामुळे तो बाहेरच विडी ओढीत थांबला व मी आणि बायकोने रंग दिला. दोन्ही ठिकाणचा पहिला हात पूर्ण झाला.
"हुश्श करून मी बाहेर आलो. बघतो तर पेंटरसाहेबांचा पत्ता नाही. त्यांच्याऐवजी गडी दारात उभा. ... "
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
June 30, 2022 - June 30, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
नवा रस्ता
................................................................................................
................................................................................................
"साहेबाला एकाचं हे बोलणं पटलं आणि कुणालाही पटण्यासारखंच ते बोलणं होतं. होय, लाच खाणं वेगळं आणि भेट म्हणून दिलेलं खिशात ठेवणं वेगळं. लाच खाणे आणि तीही सरकारी नोकराने ही हरामाची गोष्ट. ती कधीही करू नये. पण भेट म्हणून एखाद्या माणसाने दिले आपले काही प्रेमाने, तर ते घ्यायला काय हरकत आहे? तिथे नाही कसं म्हणता येईल? घ्यावंच लागतं माणसाला. काम करा नाही तर न करा. त्याचा याच्याशी काय संबंध? आता प्रेमाने दिलेली भेट घेतल्यावर आपणही प्रेमानं त्याचं काम करावं हे निराळं."
"एका गप्प बसून ऐकत राहिला. पांडाने त्याला पुढे काहीतरी विचारलं, पण त्याचं तिकडे लक्षच राहिलं नाही. तो आपला मनाशी विचार करीत राहिला. तीन दिवसांपूर्वी साहेब आपल्या रानात आला. शंभर रुपये घेऊन गेला. रस्ता खोडतो म्हणाला. आता कालच्याला त्याने पांडाच्या रानातनं रस्ता काढला. पन्नास रुपये घेऊन तोही खोडून टाकला. दोन गावाला दोन रस्ते एकदम कुठले निघाले? आणि त्याने गपचिप खलास कसे केले? का दर गावाला साहेब हा खेळ करतो?"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
June 30, 2022 - June 30, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
अभ्यास
................................................................................................
................................................................................................
"इकडे मुलांनी सातव्या धड्यातील पाच-सात ओळी वाचल्या. मग त्यांचे धड्यातील लक्ष उडाले. मास्तरांच्याकडे अधूनमधून बघत काहीजण एकमेकांशी कुजबुजू लागले. कुणी पुस्तकातील चित्राभोवती नक्षी काढली. कुणी बाईला आकडेबाज मिशा चढवल्या. तर साहेबाला गंध लावून त्याचे शुद्धीकरण केले. काहीजणांनी मधल्या सुट्टीतील कार्यक्रमाची रुपरेषा आखली. एकदोघांनी खिडकीतून वाकून बाहेरच्या वातावरणाचे सूक्ष्म निरीक्षण केले. मग एकाने पाठीमागे पाय सारून दुसऱ्याच्या पायाला गुदगुल्या केल्या. दुसऱ्याने एकदम दचकून हात झाडले. त्याबरोबर समोरची दौत सांडली. शाईचा ओघळ एकदम वाहत गेला आणि शेजारच्या मुलाच्या चड्डीवर मोठा डाग पडला. त्याने दुसऱ्याला धपाटा घातला. दुसरा त्याला चावला आणि मग तेथे जोराचे भांडण पेटले. हां, हां म्हणता दहा-पाच मुले भोवती जमली. वर्गात पुन्हा गोंगाट झाला. मास्तरांनी प्रस्थापित केलेली शांतता आणि सुव्यवस्था एकदम कोसळली.
"हे सगळं होईपर्यंत मास्तरांचे वर्तमानपत्राचे वाचन पूर्णपणे आटोपले होते. अग्रलेख आणि महत्त्वाच्या बातम्या वाचून झाल्याच होत्या, पण सिनेमाच्या जाहिरातीही पाहून झाल्या होत्या. आता मास्तरांचे पत्रलेखन चालले होते. मायना घालून निम्माशिम्मा मजकूर लिहून झाला होता... ‘‘मुलगी पसंत असल्यास ऐपतीप्रमाणे खर्च करू. अगदीच मुलगी आणि नारळ असे होणार नाही. तथापि, अजून चार मुली उजवायच्या आहेत हे लक्षात घेऊन....’’
"एवढ्यात वर्गातील गोंगाट त्यांच्या कानात शिरला. रडणे-ओरडणे, भांडणे ऐकू आली आणि त्यांच्या तंद्रीचा भंग झाला. पत्र तसेच ठेवून त्यांनी चष्म्यावरून एकदा वर्गाकडे पाहिले. काय झाले असावे याचा अदमास घेतला. मग मोठा आवाज काढून ते ओरडले ... "
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
June 30, 2022 - June 30, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
शायडी
................................................................................................
................................................................................................
"‘‘येडं खुळं म्हटलं की हुरळले लगीच. तुमाला म्हाईत हाये? सद्याच्याला जिकडं-तिकडं शायडी हिंडत आसत्यात.’’"
"तो वेडा मोठमोठ्यांदा ओरडून ओरडून दमला. एकसारखा कण्हूकुथू लागला. त्याच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. तिथून निसटण्याचा प्रयत्न करीत तो केविलवाणे रडू लागला.
"बाबू एकसारखा त्याच्या पाठीत दणका घालीत म्हणाला,
"‘‘म्हण व्हय. म्हंजे आत्ता सोडतो. हायेस का न्हाईस शायडी तू? बोल, म्हण व्हय.’’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
June 30, 2022 - June 30, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
पठाण
................................................................................................
................................................................................................
This story reminds one of a film (by Sai Paranjape?), with slight twist in the encounter at end.
"‘‘फार छंदिष्ट आहे ती.’’ उजव्या बाहीनं नाक पुसून तो पुढे म्हणाला, ‘‘रहस्यमय पुस्तकं वाचण्याचं तिला वेड आहे. चार आणे माला काय, आठ आणे माला काय, विचारू नकोस. स्टंट सिनेमा एक सोडत नाही. राजकपूर तिचा अगदी आवडता नट आहे –’’
"‘‘बरं मग?’’ ‘
"‘मग म्हणून काय विचारतोस? तसा पराक्रम कर म्हणाली. कुणाला तरी चार ठोसे लगाव. कुणाला तरी दरीखाली फेक –’’
"‘‘तू काय केलंस?’’
"‘‘मी फक्त त्याच्यासारख्या मिशा ठेवल्या.’’"
When did Raj Kapoor ever do stunts in his youth, or fight on screen? It's only perhaps in his last two films as performer on screen, one about 1971 war and another where he's portraying a lawyer turned detective, that there was any semblance of such a role in his career; and there, taking into account his age and girth et al, he played it half comically,
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
June 30, 2022 - June 30, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
बाबांचा अभ्यास
................................................................................................
................................................................................................
"‘‘हं! सांगा मिस्टर, ढग कसे होतात?’’
"मागे केव्हातरी वाचलं होतं, वर्गातही गुरुजींनी सांगितलं होतं. पण आत्ता काही केल्या आठवेना! कसे होतात बुवा ढग? आधी उन्हाळ्यात काहीतरी होतं, मग आभाळात काहीतरी होतं, मग ढग तयार होतात, असे काही काही आहे खरं, पण काही केल्या मला आठवेना. अगदी गोंधळ उडून गेला.
"बाबा रागावून म्हणाले – ‘‘अरे सांग ना मूर्खा! पहिल्याच प्रश्नापाशी ही बोंब! मग पुढे काय, दिसतंच आहे.’’
"आठवून, आठवून तोंड वेडंवाकडं करीत मी म्हणालो –
"‘‘ढग आभाळात असतात.’’
"‘‘शाबास! बरोबर आहे! – पुढे?’’
"‘‘ते आधी तयार होतात. मग त्यांची वाफ होते.’’
"‘‘करेक्ट! पुढे?’’
"‘‘पुढे ही वाफ समुद्रात जाते. मग पाऊस पडतो.’’
"‘‘अरे! येतंय की तुला! बरं, पुढचा प्रश्न, पाऊस कसा पडतो? अरेच्या, पुन्हा तोच प्रश्न कसा आला बुवा?’’ बाबांनी आश्चर्य व्यक्त केले. ‘‘थांब हा, बघतो पुस्तकात – काय भानगड आहे ती!’’
"‘‘पण त्याचं उत्तर निराळं आहे बाबा.’’ मी उत्साहाने म्हणालो, ‘‘पान तीनवर बघा.’’
"बाबांनी पान तीन काढले. मग ते म्हणाले, ‘‘हं! बरोबर आहे! आहे इथं! मी वाचून दाखवितो, नीट ऐक लक्ष देऊन! ढग अत्यंत हलके असतात. म्हणून ते वाऱ्याबरोबर दुसरीकडे जातात. वाटेत डोंगर किंवा पर्वत यांना ते अडतात. त्याबरोबर ते वरवर जातात.’’
"एवढे बोलून बाबांनी पान उलटले. मग ते पुढे वाचू लागले –
"‘‘पौर्णिमेस त्याचा आकार पूर्णपणे गोल होतो. मग पुन्हा तो कमी कमी होत होत अमावास्येला त्याचा लोप होतो समजलं का तुला मध्या? तुझ्यासाठीच चाललंय आमचं हे! आम्हाला शिकायचं नाही आता! आमचं सगळं पूर्वीच झालंय.’’"
"‘‘बरं, ते जाऊ दे! तुला पंचांग माहीत आहे ना पंचांग? मग झालं तर! त्यात ग्रहणं दिलेली असतात सगळी.’’
"‘‘पण हे ग्रहण होतं कसं?’’
"‘‘होतं कसं? हा प्रश्न आहे? ग्रहणं ही होणारच! पंचांगवाल्यांनी तारखा ठरविलेल्या असतात. त्या दिवशी ग्रहण बरोबर होतं!’’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
June 30, 2022 - June 30, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
गफलत
................................................................................................
................................................................................................
"‘‘पयला त्याचा बेत आसणार की, दरवाजा सरळ उघडावा आन् चालू लागावं. पण बाई वराडली तसं फिसकटलं त्याचं ते.’’
"‘‘आसंल बाबा.’’
"‘‘मग गडी धुम् पळाला त्यो हिकडंच आला. ह्ये न्हवं का गवात मुडापलंय हितं. मघाशी बगितलं न्हाई का?’’
"‘‘बगितलं, बगितलं. अगदी खरं.’’
"लोकांनी माना डोलावल्या. कान टवकारून ते रंगाचे बोलणे ऐकत राहिले. त्याच्याकडे आदराने पाहात राहिले.
"मग रंगाने भिंतीतल्या बारीक फटी एक-दोन दाखविल्या. त्यात पायाचा अंगठा-बिंगठा बसवून वर चढता येणं कसं शक्य आहे हेही सांगितलं. लोकांनी पुन्हा माना डोलविल्या. मग त्यांना रंगाचे बोलणे पटतच गेले.
"‘‘मग?’’
"‘‘मग काय? गडी लागला आसल वर चढायला गडबडीनं. तेवढ्यात बाई पुन्हा बोंबलली आसंल. झालं. आधीच घाबरलेला त्यो – बाई बोंबलल्यावर हादरालाच. घेतली त्यानं तशीच वर उडी –’’
"‘‘व्हय-व्हय, फुडं?’’
"‘‘आता फुडं काय ऱ्हायलं आनखीन’’ असं म्हणून रंगाने एक मोठी जांभई पुन्हा एकदा दिली. झोपेने आता त्याला चांगलंच घेरलं. नकळत त्याचे डोळे मिटले. मोठ्या कष्टाने ते उघडून तो म्हणाला,
"‘‘घाबरलेला गडी. त्याच्या काखंतला डबा निसटून पडला ह्या अंगाला आन्’’
"– आणि पेंगता पेंगता तो पुढे म्हणाला....
"‘‘– आन् मी पडलो बाहेरच्या अंगाला.’’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
June 30, 2022 - June 30, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
June 26, 2022 - June 30, 2022.
Purchased June 24, 2022.
Chakatya (Marathi)
Marathi Edition
by D.M. MIRASDAR
(Author)
Publisher: MEHTA PUBLISHING HOUSE
(1 January 1977)
Language: Marathi
Kindle Edition
Marathi Edition
Format: Kindle Edition
ASIN:- B01N9J8T8G
................................................
................................................
द. मा. मिरासदार
१२६०, अक्षय सहनिवास,
तुळशीबागवाले कॉलनी,
सहकारनगर नं.२, पुणे - ४११००९.
© सुनेत्रा मंकणी
प्रकाशक : सुनील अनिल मेहता,
मेहता पब्लिशिंग हाऊस,
१९४१, सदाशिव पेठ,
माडीवाले कॉलनी, पुणे ४११०३०.
०२०-२४४७६९२४
................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4807692139