................................................................................................

BAJAR, by Vyankatesh Madgulkar.
................................................................................................
................................................................................................
The author's portrayal of villages, poor, and humanity generally, is what comes through most.
................................................................................................
................................................................................................
१. पिंजरा
२. शमसू मुलाण्याला हरण सापडते
३. गावगाडा
४. दुष्काळ
५. परका
६. पकुर्ड्या ७.
अहमद शाबाजी
८. देना मांग
९. गोष्ट
१०. आळ!
११. भेळ ओली-सुकी
१२. धनाजी
१३. बाजार"

I don't know why this seems more familiar than having read recently, but it does. About a man who, for some reason, which he wouldn't explain, wished no longer to work. How he turned from an integral part of community to an object of curiosity, on par with a zoo inhabitant.
................................................................................................
................................................................................................
२. शमसू मुलाण्याला हरण सापडते
About a deer found by a villager, and how it almost led to riots.
................................................................................................
................................................................................................
३. गावगाडा
About a poor worker in a village, beaten up because he's sent by his boss to deal with the money owed.
................................................................................................
................................................................................................
४. दुष्काळ
Very touching.
................................................................................................
................................................................................................
५. परका
Heartbreaking story of a camel straying into a small village, injured, and finding neither shade nor food, despite all the eagerness of the villagers.
"वाडीच्या चोहो अंगाला असलेले माळरान ह्या दिवसांत हिरवेगार होते. पाण्याची डबकी जागोजागी साठतात. बेडक्या ओरडू लागतात. वाडीपासून लांब असलेल्या ओहोळाचा आवाज घरात ऐकायला येतो."
"आषाढाच्या महिन्यात आमच्या वाडीवरचे आभाळ सदोदित भरलेले असते. मावळतीकडून वारा सारखा भरारत राहतो. पावसाने काठोकाठ भरलेल्या ढगांचे कळप हाकून वाडीवर आणतो. जोगावलेल्या मेंढरांच्या कळपासारखा ढगांचा कळप वार्याच्या भीतीने सारखा दौडत राहतो. कधीकधी रानात मेंढरे बसावीत तसा हा कळप वाडीवर बसतो. चांगला पाऊस गळतो. वाडीतल्या पंचवीसभर झोपड्या भिजून चिंब होतात. गढूळ पाण्याचे पाट वाहतात. म्हातार्याकोतार्यांना हीव भरते. जनावरे अंगे आखडून गप्प उभी राहतात. आम्हाला मात्र पावसाची मजा वाटते.
"आमची वाडी थोडी खोलात आहे. अगदी जवळ आल्याशिवाय परक्या माणसाला वाडी दिसतच नाही.
"आषाढाच्या महिन्यात चुकारीचा उंट वाडीला आला, तेव्हा त्यालासुद्धा वाडी लांबून दिसली नसेल. त्याने वाडी बघण्याअगोदर आम्हीच त्याला बघितला.
"उभे वारे सुटले होते. आभाळात ढग पळत होते. अधूनमधून पावसाची भुरूभुरूसर येत होती. शाळेला सुट्टी होती. दुपारचं जेवून आम्ही उगवतीला टेकावर गेलो होतो आणि सूरफाटी खेळत होतो. एवढ्यात लांबून येणारा उंट आम्हाला दिसला."
"मेंढरांना, शेरडांना, कोंबड्यांना, कुत्र्यांना आडोसा होता. माणसांना आडोसा होता, पण उंटाला नव्हता. कारण तो सर्वांत जास्त मोठा, उंच होता. अचानक बाहेरून परका आलेला होता.
"आम्ही हवालदिल झालो. मला वाटले की, उंटाला घडी करून घरात घ्यावे आणि कुणाला न सांगता पांघरुणात झोपवावे.
"बापडा उंट पावसात भिज-भिज भिजला. ह्या झोपडीत तोंड घाल, त्या छपरात शिरून बघ असे त्याने वारंवार केले आणि शेवटी रागाने खुळा होऊन तो गावाबाहेर पडला. आम्ही सगळे मागे गेलो."
................................................................................................
................................................................................................
६. पकुर्ड्या
Touching story about a hunter visiting his village, and despite trying hard, unable to hunt the wild birds an old, dying neighbour asked him to bring.
"पकुर्ड्या हा शिकार्यांचा आवडता पक्षी आहे. कबुतराच्या आकाराचा, पिवळसर, फिक्कट किरमिजी रंगाचा. काळे ठिपके, पट्टे असलेला. आखूड पायांमुळे ह्याला झाडावर बसताच येत नाही. जमिनीवरचाच पक्षी आहे हा; विशेषतः माळरानावरचा. तांबडट जमिनीवर आठ-बारांचा थवा बसला, तरी बिलकूल पत्ता लागत नाही. पावलांचा आवाज आला की, पकुर्ड्या जमिनीशी मुरून बसतात. त्यांच्या एवढ्या-एवढ्या माना तेवढ्या उभ्या दिसतात. भल्याभल्यांना मुरलेल्या पकुर्ड्या दिसत नाहीत. डोळे तयारच पाहिजेत."
................................................................................................
................................................................................................
७. अहमद शाबाजी
He was a freedom fighter.
" ... ज्या माणसाला वैषयिक सुख, संपत्ती, आराम, बढती अगर स्तुती यांची गरज भासत नाही आणि मनाला योग्य वाटेल तेच जो करतो, अशा माणसाशी सत्ताधार्यांनी फार जपून असावे. कारण तो फार जहाल आणि संत्रस्त करणारा शत्रू असतो, हे शासनाला माहीत होते."
" ... माझे वडील बंधू ग. दि. माडगूळकर तेव्हा हंस पिक्चर्समध्ये नोकरी करीत होते. त्यांनाही आम्ही भावंडे अण्णा म्हणूनच संबोधतो. त्यांच्याकडे मी राहत होतो. राहत म्हणजे जेवणाखाण्यापुरता राहत होतो. ... "
" ... हस्ते-परहस्ते अहमद शाबाजी मुल्ला कसे निसटले, हे मला कळले.
"मी पोलिसाशी बोलत असताना त्यांनी पाठभिंतीची खिडकी सावकाश उघडून तिच्यातून पलीकडे पंचगंगेच्या काठी उडी घेतली होती आणि पात्रातून एखादा कोळी जावा तसे कागदपत्रांचे गाठोडे पाठीशी टाकून ते पार शलिनी स्टुडिओच्या बाजूला गेले होते. त्याच रात्री त्यांनी कोल्हापूर सोडले आणि आता कुठेतरी अज्ञात ठिकाणी सुखरूप होते!
"मी एकवार असा सुटलो. पुन्हाही एकवार सापडलो आणि पळालो ते थेट माडगूळला गेलो. माझ्या सहकार्यांपैकी सोळा जण पकडले गेले. त्यांना फार मारझोड झाली. खटले चालले. कुणाला सात, तर कुणाला पाच वर्षे अशी सश्रम कारावासाची शिक्षा झाली. खरेच, सार्या संघटनेचा धुव्वा उडाला."
................................................................................................
................................................................................................
८. देना मांग
About a poor villager, expert hunter, who couldn't afford a gun.
"फोटोची निगेटिव्ह दिसावी तसा देना दिसला. रंगानं सुरेख काळा. अंगानं पहिलवानासारखा बांधेसूद, उंचापुरा आणि अंगावर पांढरीधोट कापडं घातलेला. फिक्कट गुलाबी रंगाचा फेटा त्यानं एका कलावर असा सुरेख बांधला होता. अंगात पांढराधोट मलमली अंगरखा होता. खाली पांढरं धोतर होतं आणि पायात जाड वहाणा होत्या. नाकीडोळी नीटस असा देना पांढरे स्वच्छ दात काढून हसला आणि त्याने मला रामराम घातला. एखाद्या ग्रामीण सिनेमात हीरो शोभावा, असा देना बघताच मी खूश झालो."
................................................................................................
................................................................................................
९. गोष्ट
Madgulkar's bedtime story for son - calf, forest, tiger, and honey. Delightful
................................................................................................
................................................................................................
१०. आळ!
"आबानानांनी विचारलं, ‘‘बोवा, काही इटाळ नव्हता, तर ही अदावत आपण अंगावर का घेतली? आम्हाला का खेटरलं न्हाई? ह्या बयेला का खेटरलं न्हाई?’’
"बोवा म्हणाले, ‘‘मला करुणा आली! मी नाही म्हणालो असतो, तर ह्या माऊलीची तुम्ही काय दशा केली असती! तिची किती विटंबना झाली असती!’’
"‘‘बोवा, धन्य तुमची!’’
"बोवा हात जोडून बोलले, ‘‘ह्या लेकराची आता सोय करा! त्याला पदराखाली घ्या!’’
"लोक म्हणाले, ‘‘घेऊ. आम्ही पत्करलं तिचं. ती सगळ्या गावाची लेक आहे. लेक म्हणून तिला साडी-चोळी करू.’’
"बोवा म्हणाले, ‘‘बरं आहे. मला आता घटकाभर निवान्त बसू द्या.’’
"लोक हळूहळू पांगले. आबानाना जानकाला धरून घेऊन गेले. जानका गेली. लोक गेले. ओढ्याचं पाणी तेवढं खळखळ वाजत राहिलं. बोवांनी डोळे मिटले. थंड मनाने ते एकटे बसून राहिले. पुढ्यात चिमण्या नाचू लागल्या. कणदाणे टिपू लागल्या."
................................................................................................
................................................................................................
११. भेळ ओली-सुकी
"आई-बापावेगळ्या शामूवर गल्लीतील बाया फार माया करीत. गल्लीत आलेल्या धीट गुणी वानरावर करावी, तशी. सणासुदीला त्याला जेवू घालत."
................................................................................................
................................................................................................
१२. धनाजी
"कुणाच्याही हातून न खाणारा जहागीर धनाजी समोर बसून दहा वाक्यं बोलला की, भाकरी खाई. कधी भाकरी, सणादिवशी पोळी, कधी गव्हाची रोटी."
"धनाजीचा जहागीर बैल मरून गेला.
"धनाजी त्या दिवशी परगावी गेला नाही तो नाहीच. त्या मातीला जाण्याऐवजी जहागीरच्या मातीला तो राहिला.
"ही सगळी हकिगत गावाला माहीत होती, मला माहीत होती आणि आता म्हातारपणी धनाजी वेगळा राहू लागला होता. त्याला कोणी नव्हतं.
"माझा निरोप घेऊन तो निघून गेल्यावर बसलेल्या माणसांपाशी मी चौकशी केली, तर कळलं की, अलीकडं पोराचं आणि बापाचं पटत नव्हतं. पोरगा वारंवार भांडण उकरून काढू लागला, तेव्हा धनाजी सगळं त्याच्या हवाली करून दूर आपल्या शेतात झोपडी घालून राहू लागला.
"त्याला आता वर्षा-दीड वर्षां झालं होतं. चार नातवंडांपैकी दोन त्यानं आपल्या जवळ ठेवून घेतली होती. तीही जाऊन- येऊनच होती. एरवी गुरं-ढोरं, शेरडं-करडं सोडली, तर त्या उजाड रानात धनाजीला जवळचं कोणी नव्हतं. मनातनं तो कष्टी असला पाहिजे, पण कुणापाशी बोलत नव्हता. सुख सांगावं दुसर्याला, दुःख ठेवावं आपल्या मनात.
"हे सगळं ऐकून मला वाटलं, उद्या जेव्हा ह्याची वेळ येईल, तेव्हा ह्याला मांडी द्यायला कोण पुढे होईल?"
................................................................................................
................................................................................................
१३. बाजार"
"ती कोंबडीवाली आणि ती फिरकीवाली दोघीही आता एका बाकड्यावर शेजारी शेजारी बसल्या होत्या. गाडी सुटून स्थिरस्थावर झाल्यावर कोंबडीवालीने कमरेची पिशवी काढली आणि दहा रुपयांची नोट सासुरवाशिणीला दिली. तिने ती खुशीने घेतली. सासुरवाशिणीच्या कानात आता कुड्या होत्या आणि फिरक्याही होत्या. दोघी एकाच गावच्या असल्यासारख्या हसत-बोलत होत्या."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................

August 15, 2021 - August 17, 2021.
Published by MEHTA PUBLISHING HOUSE
Kindle Edition, 108 pages
Author(s):Vyankatesh Madgulkar
ASIN:- B01N99IP1Y
................................................
................................................
Paperback, Fifth Edition- Reprint, 104 pages
Published May 2013
by मेहता पब्लिशिंग हाऊस
Original Title BAJAR
ISBN:- 139788184983692