Friday, August 13, 2021

NAVRA MHANAVA AAPLA by V. P. KALE नवरा म्हणावा आपला : वपु काळे / कथासंग्रह

................................................................................................
................................................................................................
नवरा म्हणावा आपला : वपु काळे / कथासंग्रह
NAVRA MHANAVA AAPLA by V. P. KALE 
................................................................................................
................................................................................................

To begin with, bought out of a need to travel to world of one's own language, there was an unexpected thrill of coming across name of someone known decades ago, however distantly. 

श्री. गजाननराव वाटवे, सुधीर फडके, 
हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे, यशवंत देव 
यांच्या कारकिर्दीनंतर 
अभिजात संगीत म्हणजे काय, 
त्या युगाचा प्रारंभ 
श्रीधर फडके यांनी केला. 
ही आवृत्ती श्रीधरला –वपु

And then the introduction, by someone who knew the author long and well, made one realise one might have read, in one's younger years, this author's work in magazines one read in quantities, hardly ever noticing names. 

And the introduction is quite right, this author tickles, while writing of a familiar world - that of middle class family. 
................................................................................................

अनुक्रम 

घरोघरी  
नवरा म्हणावा आपला  
धुंडण्यात मजा आहे  
श्रावणी सोमवार  
आठ त्रिक चोवीस  
भित्यापाठी  
किल्ली  
दोनच!  
तूर्तदान-महापुण्य 
वह कौन थी?  
घास  
प्रमाद 
 मी दिवाळी-अंक घेतो!
................................................................................................

घरोघरी

"... जीव टाकून प्रत्येक गोष्ट करणाऱ्या माणसाचं असंच असतं. जीव टाकण्याची त्याची वृत्तीच ती. मग करायची असलेली गोष्ट कितपत योग्यतेची आहे त्याचा विचार त्यांना शिवत नाही. हातात घेतील ते काम सुबक, नीटनेटकं आणि म्हणूनच सतेज. त्यामुळं या अशा माणसांना येणारा कंटाळादेखील सामान्य नसतो. त्यांची आसक्ती जेवढी तीव्र तेवढीच तीव्र विरक्तीही. अरुणा त्याच जातीतली!"
................................................................................................

Shraavanie Somwaar 

श्रावणी सोमवार  

"“मुंबईत सगळ्या भाज्या बारमास मिळतात. मी तर कालच मिरच्या पाहिल्या.” 

"“असतील, पण त्या खऱ्या; भोपळी नाहीत. त्या फार तिखट असतात. त्यांची भाजी व्हायची नाही.” 

"“होईल होईल; त्या तिखट असोत वा खट असोत, आज मिरच्यांची भाजी हवी म्हणजे हवी.” 

"मला हवं ते केल्याशिवाय मी राहत नाही, हा अनुभव गीताला फारसा नवीन नाही. अर्थात, तशी कधी तिनं कुरकुर केली नाही. फार गरीब आहे पोरगी! स्वयंपाक तर असा मारू करते की पूछो मत! तिच्या हातच्या भाज्या खाव्यात आणि त्यांची चव जिभेच्या टोकावर ठेवून ऑफिसात यावं. 

"आमची आई स्वयंपाक बेफाटच करते. लग्नापूर्वी मी तिला नेहमी म्हणायचो, “जिभेचे चोचले पुरवून पुरवून तू सोकावून ठेवलंस आम्हाला. लग्नानंतर एखादी बया पडेल गळ्यात. जिरेल आमची. ती समोर ठेवील ते ‘पूर्णब्रह्म’ म्हणून रोज ‘यज्ञकर्म’ उरकावं लागेलं. कुणी सांगावं, एखाद्या दिवशी ‘वदनी कवळ’ घेताना कवळीच यायची हातात!” 

"पण नाही. जेवणापूर्वी रोज न चुकता केलेला ‘रघुवीर समर्थांचा’ जयजयकार सार्थकी लागला होता आणि गीतासारखी ‘चविष्ट’ (स्वयंपाक करणारी) ‘अन्नपूर्णा’ घरात आली होती! गादीची सूत्रं उगीच नाही आमच्या मातुःश्रींनी गीताच्या हातात दिली! 

"गीताचं हे पाककौशल्य आमच्या मित्रवर्गानंपण एकमुखानं मानलं होतं. त्यातल्या अनेकंनी लग्नानंतर त्यांच्या बायकांना गीताच्या हाताखाली काही दिवस स्वयंपाक शिकण्यासाठी पाठवण्याचा संकल्प सोडला होता!-- अर्थात, अद्यापि एकाची बायको शिकायला आलेली नव्हती हा भाग अलाहिदा! लग्नानंतर नवी नवलाई, हनीमून वगैरे वगैरे धबडग्यात बायकोनं केलेला बिनसाखरेचा चहाही गोड लागतो आणि काही दिवसांनी ती बनवत असलेल्या स्वयंपाकाची सवय जडून जाते. असो!"
................................................................................................

"भित्यापाठी 

"काही काही घरांत काही काही वैशिष्ट्यं असतात. काही काही घरातली तमाम मंडळी तापट. आमचा मन्या अशा लोकांना ‘Not to be loose shunted’चे डबे म्हणतो. केव्हा तडकतील नेम नाही. 

"काही काही घरांत सगळीच हुशार. प्रत्येक जण निर्माण झालेली पदवी केवळ आपल्याचसाठी या जाणिवेनं शिकलेला. अगदी सात वर्षांचं पोरटंदेखील सबंध रामरक्षा घडाघडा म्हणून दाखवून कुठं तरी बक्षीस उपटणार! बाकी अशी वैशिष्ट्यांची यादी देण्यात वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. स्वतःच्या घरातलं वैशिष्ट्य सांगून मुद्द्यावर यावं, हे बरं! 

"आमच्या घराचं वैशिष्ट्य म्हणजे ‘चर्चा’. प्रत्येक गोष्टीवर! चर्चेची सूत्रचालक ‘आई’
................................................................................................

Key

किल्ली

"आज पुष्कळ दिवसांनी फिरायला बाहेर पडलो होतो. अगदी सहकुटुंब सहपरिवार!– ‘सहपरिवार’– हा शब्द स्वतःच मोठा आहे. त्यामुळं तुमचा गैरसमज होणं अगदी शक्य आहे; पण तसं नाही. आम्हाला फक्त एकच (अजून तरी!) मुलगा आहे. नाव विजय! नाव ठेवण्यात तशी आमची जरा गफलतच झाली आहे. त्याचं नाव ‘झुंजार’– ‘छोटू’ किंवा ‘धनंजय’– अशा चालीचं हवं होतं. (मात्र अगदीच ‘काळा पहाड’ नाही, बरं का!) तुम्ही यावर कारण विचारणार. साहजिकच आहे. ते ओघानंच आलं. पण मला वाटतं– मी ‘झुंजार’ नाव ठेवावंसं वाटतं म्हणालो– यात सगळं नाही का आलं? घरातली यच्चयावत काचेची भांडी म्हणजे त्याच्या दृष्टीनं ‘यवन’. त्यामुळं काठ न तुटलेली एकही बशी घरात नाही आणि एकाही कपाला कान नाही. आम्हा उभयतांचा, लग्न झाल्याबरोबरच्या काळात- जेवढी असेल नसेल तेवढी अक्कल गहाण ठेवलेली असते (त्या काळाचं प्रतीक म्हणून–) काढवलेला (हसऱ्या चेहऱ्याचा, फोटोग्राफरच्या सूचनेसह) एक फोटो आहे. त्यालाही आता काच नाही. –एकंदरीत मामला लक्षात आला असेल. मघाशी मी गफलतीनं एकच मुलगा असं म्हणालो– पण दहा मुलांचा ऐवज भरून काढणारा हा झुंजार- चुकलो, विजय- त्याची माता व मी, असे कधी नव्हे ते फिरायला निघालो. बाहेर जाण्याचे कपडे घालण्याच्या सुमारास अनेक गोष्टींचा शोध लागला : विजयच्या सदऱ्याचं एकही बटण जाग्यावर नव्हतं. माझ्या दाढीच्या ब्लेडनं त्यानं ती कापून टाकलेली चक्क दिसत होती. त्यानं प्रामाणिकपणं खुलासाही केला. तो त्या वेळी शिवाजी झाला होता आणि त्यानं कोंढाणा जिंकल्यावर केलेली ती कत्तल होती. मला दोन गोष्टींचा तेव्हा खेद वाटला. एक तर सदऱ्याची बटणं नाहीशी झाली होती व दुसरं म्हणजे कोंढाणा सर करायला त्यानं तानाजीऐवजी शिवाजी महाराजांनाच पाठवलं होतं. एवढ्यावर तो थांबला तर ठीक, पण पुढं तो धडधडीतपणं म्हणाला, शिवाजीनंच किल्ला घेतला. तानाजी म्हणाला, “मी कामावर जाणार नाही. परवा नमूताईचं लग्न होतं, तेव्हा तुम्ही नाही का ऑफिसला दांडी मारलीत?–” 

"आहे काही अपील? 

"त्यानंतर दोन बुटांतल्या नाड्यांतली एक नाडी, कमरेचा पट्टा या सर्वांचा शोध! या सर्व संशोधनात दीड तास खर्ची घातला, तेव्हा सहकुटुंब सहपरिवार आम्ही बाहेर पडलो."
................................................................................................

वह कौन थी?  

Hmmm!
................................................................................................

मी दिवाळी-अंक घेतो!

Oh, so familiar! 
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................

August 12, 2021 - August 13, 2021

Purchased August 07, 2021. 

Paperback, 10th Edition, 100 pages 

Published 2 by Mehta Publishing House 

Original Title Navra Mhanava Aapla 

ASIN:- B01N7JTUZW
................................................
................................................

ISBN8177668940 

(ISBN13: 9788177668940)