Sunday, January 30, 2022

Jambhalache Divas जांभळाचे दिवस / कथासंग्रह व्यंकटेश माडगूळकर by Vyankatesh Madgulkar.

................................................................................................

JAMBHALACHE DIVAS 
जांभळाचे दिवस
कथासंग्रह व्यंकटेश माडगूळकर
by VYANKATESH MADGULKAR
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
अनुक्रम 

१. जांभळाचे दिवस 
२. पंच्याण्णव पौंडांची मुलगी  
३. उतारावर  
४. अनवाणी  
५. लोणी आणि विस्तू  
६. शाळातपासणी  
७. बाई  
८. बाजाराची वाट  
९. सकाळची पाहुणा  
१०. सायकल

"काही वेळाने चमन उठली आणि तिने धारेत जाऊन तोंड धुतले. हातपाय धुतले. बराच वेळ ती धारेत होती. मी वरून बघत होतो. मग हसर्‍या चेहर्‍याने ती जांभळीखाली आली आणि खांद्यावरचा पदर काढून म्हणाली, 

"‘‘मला टाका की – पदरातच हां!’’ 

"मी भराभरा घोस टाकले. चमनचा ओटा भरला. ती ओरडून म्हणाली, ‘‘पुरे आता, उतरा.’’ 

"‘‘ओटा भरला का?’’ 

"‘‘भरला; उतरा.’’ 

"मी खाली उतरलो. भुरे केस सावरीत चमन म्हणाली, ‘‘चला आता सावलीला.’’ 

"मग आम्ही गर्द सावलीला जाऊन समोरासमोर बसलो. आपल्या ओट्यातली रसाळ आणि काळी-काळी जांभळं वेचून चमन ती मला देत राहिली. 

"जांभळाचे दिवस फार लवकर संपले!"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................

January 28, 2022 - January 28, 2022. 

"सात-आठ दिवस तो असा वाट पाहत राहिला, बागेतून हिंडत राहिला; तरीही ती मुलगी दिसली नाही. त्याने वाट पाहण्याचे सोडून दिले, बागेत फिरायचे सोडून दिले. पुन्हा तो नेहमीप्रमाणे यंत्राशेजारच्या स्टूलावर गंभीर चेहर्‍याने बसून राहू लागला. पुन्हा पहिल्यासारखेच त्याचे दिवस उदास, कंटाळवाणे जाऊ लागले. खरं तर महादेवाचे वय हसण्या-खिदळण्याचे होते. ... "
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 28, 2022 - January 29, 2022. 

" ... किती तरी उंचावरून पडणार्‍या पावसाचं त्यांना काही वाटत नाही; परंतु एखादा धबधबा पाहून ती चकित होतात!’’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 29, 2022 - January 29, 2022. 

"पोस्टमनने बेबीच्या पायांकडे पाहिले. अपराधी होऊन वहाणा पायांत घातल्या. सलाम करून तो घाईने फाटकाबाहेर पडला. 

"खाली मान घालून हरी गेटाबाहेर पडला. कुबड्यांच्या आधाराने अजून बेबी उभी होती. पायात वहाणा घातलेला पोस्टमन कसा चालतो, ते ती बघत होती. पोस्टमन मनात म्हणत होता, ‘या लेकरानं मला अनवाण्याला वहाणा दिल्या; त्याला पाय नाहीत, ते कसे देणार मी? मनाला कितीही वाटलं, तरी तिच्यापाशी नाही, ते कुणी तिला देऊ शकत नाही.’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 29, 2022 - January 29, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
५. लोणी आणि विस्तू  
................................................................................................
................................................................................................

"दिवसभर तो पोस्टापाशी बसत होता. नाना मजकुराची कार्डे लिहीत होता. याची खुशाली त्याला कळवीत होता; ... "
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 29, 2022 - January , 2022. 

"बाळ्याने खळाखळा कंदील हलवून म्हटले, ‘‘उलीसं घाष्टेल, नाही तर समदं पानीच हाय कंदिलात. वर तरंगत व्हतं तेवढ्या घाष्टेलावर कंदील जळला. आता काय वढ्याचं पानीच की ह्ये!’’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 29, 2022 - January 29, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
७. बाई  
................................................................................................
................................................................................................

"बाईचे लग्न होऊन वर्ष-सहा महिने उलटले आहेत. मास्तरांचे नियमित येणे आता बंद झाले आहे. कधी ते येतात, कधी येत नाहीत. निम्मू कधी चौकशी करते, 

"‘‘बाई, आज मास्तर नाय आले?’’ बाई उत्तर देतात, 

"‘‘म्हातारं माणूस – आलं, आलं, नाही, नाही!’’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 29, 2022 - January 29, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
८. बाजाराची वाट  
................................................................................................
................................................................................................

"चंद्र पाझरत होता. चांदणे झिरमिरत होते. झाडेझुडे भिजत होती. बाजाराची वाट आता जवळजवळ संपली होती आणि उदनवाडी आली होती."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 29, 2022 - January 30, 2022. 

९. सकाळची पाहुणी  

" ... गुणा तिथे नव्हतीच!"

January 30, 2022 - January 30, 2022. 

"त्याला बघताच मास्तर मोकळेपणाने म्हणाले, ‘‘सायकल हरवली का रे रामू? हरकत नाही, हरवली तर. आहे काय त्यात! दुसरी घेऊ.’’ 

"आणि अप्पांचे हे शब्द ऐकताच रामूला रडण्याचा हुंदका आला. आपल्या हातून झालेल्या अपराधाने घाबरलेले ते पोर रडू लागले. 

"मास्तर त्याच्यापाशी गेले आणि त्याला जवळ घेऊन थोपटीत म्हणाले, ‘‘अरे, रडायचं काय त्यात? साठ रुपयांची बाब! पुढच्या पगाराला नवी कोरी सायकल घेऊ आपण – एकदम बेस्ट!’’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 30, 2022 - January 30, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................

January 28, 2022 - January 30, 2022. 

Purchased January 01, 2022. 

Kindle Edition, 116 pages
Published by 
MEHTA PUBLISHING HOUSE 
Published January 01, 1957. 
(first published 1957)
Original Title Jambhalache Divas

ASIN:- B01NCTQJ2Z
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4511651507
................................................................................................
................................................................................................

Friday, January 28, 2022

Vatevarlya Savlya वाटेवरल्या सावल्या by ग. दि. माडगूळकर G. D. Madgulkar.

................................................................................................
................................................................................................
Vatevarlya Savlya 
वाटेवरल्या सावल्या
by ग. दि. माडगूळकर 
G. D. Madgulkar
................................................................................................
................................................................................................

Reading memoirs of someone so well known in one's home literature and poetry of films, and coming across so many of other familiar names, is already thrilling enough. What forms the real cake under all that topping of glitter is the other familiar plethora of details of life, partly those everyone knows of such as world or national level events, some those that a good many of us are familiar with but with different details - a family of aspiring young struggling through poverty and more - and then, finally there's the special touch, via reading of same places, people and events in writings of two famous authors who were brothers, children of the same family quite far apart in age, so one gets a sense of having known of it and yet hearing new details. 
................................................................................................
................................................................................................
Table of Contents 

वाटेवरल्या सावल्या 

वाटेवरल्या सावल्या 

भूमिका येथवरी आहे ऐसा हा प्रकार 

कोपऱ्यावरचा दिलासा 

पहिला झोत 

पंधरा दुणे तीस! 

सुवर्णाक्षरांचा मान 

‘नवयुग’मधला लपंडाव 

पहिला पाळणा 

समाधी-लेख 

मौजेचे स्वप्न 

‘रामजोशी’ उत्तीर्ण! 

सावल्यांतली वाटचाल
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
वाटेवरल्या सावल्या 
................................................................................................
................................................................................................

Account of the same event by his younger brother, also an author, is very different, naturally - the two were very far apart in age, and thereby in their experiences, memories at al, of the same family. 

"त्या संध्याकाळी जेवायला म्हणून मास्तरांच्या घराकडून मी कुशंभटाच्या त्या घरी गेलो आणि जे भकास आणि बीभत्स दृश्य मी पाहिले ते या जन्मात विसरणार नाही. आई एका कोपऱ्यात उदास बसली होती. धाकटी दोन भावंडे घुबडे ओरडावीत तशी सारखी ‘भूक भूक’ करून रडत होती. मोठी मुस्कटून झोपली होती. उदासवाणा पाऊस पडत होता. घरात रकटी अस्ताव्यस्त पसरली होती. निजल्या ठिकाणी म्हाताऱ्या आजीचे प्राण गेले होते. तिच्या अंगावर धड सुडके नव्हते. शेवटपर्यंत आईने हजारदा सांगूनही वडील आपल्या आईला लाज राखायला पुरेसे वस्त्र देऊ शकले नव्हते. आता शेवटच्या वेळीही ते घरी नव्हते. कचेरीत होते. आई मला काहीच बोलली नाही. भिजतभिजत मी कचेरीत गेलो. वडिलांना बोलावून आणले. ते आले आणि आईसारखेच स्वस्थ बसून राहिले. वेड्या आजीसाठी आपण हंबरडा फोडावा असे मला शंभरदा वाटले; पण माझ्या तोंडातून रडूच बाहेर पडेना. काळोख झाल्यावर शेजाऱ्यापाजाऱ्यांना वर्दी लागली आणि माझी अर्धवट आजी अर्धनग्न अवस्थेतच शेवटच्या प्रवासाला गेली. 

"लोक म्हणाले, ‘‘सुटली बिचारी!’’"

Both equally pathetic, this one has a grimness mitigated in the other by details that fill out the story of the grandmother and the family, the shifting of the family, and so on. 
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 27, 2022 - January 27, 2022. 

Again, a tiny part here is familiar from writings of his younger brother and author, Vyankatesh Madgulkar. 

"एक अक्षरही न बोलता बाबूरावांनी आपल्या कोटाच्या खिशाला असलेले पेन माझ्यापुढे केले. ते पेन भारी किमतीचे होते. त्याचे टोपण सोन्याचे होते. मला पुढे केलेला हात मागेही घेता येईना. ते पेन मी घेतले आणि भारावल्यासारखा बाहेर पडलो. आपल्या खोलीत आल्यावर त्या पेनकडे मी न्याहाळून पाहिले. ‘आग्फा’ कंपनी आपल्या ग्राहक निर्मात्यांना भेट म्हणून पेन्स देत असे, त्यापैकी पेन असावे ते. ते होते फार सुंदर! मी कागदावर चालवून पाहू लागलो..... कागदावरची अक्षरे जणू निळ्या रेशमाने विणली गेली. लिहिता-लिहिता मी थांबलो. ‘या माणसाने माझ्यावर धरायला छत्र दिले; हाती लेखणी दिली. केव्हाचे ऋणानुबंध असतील त्यांचे आणि माझे? ते धनी — मी चाकर! यांना कारण काय माझ्यावर एवढी मेहरबानी करण्याचे?...’ मला उत्तर सापडले नाही. फक्त डोळ्यांच्या कडा पाणावल्या. घसा दाटल्यासारखा झाला. उगीचच औंधच्या राजेसाहेबांचे स्मरण झाले. वडिलांचा आठव आला. माझ्या जन्मगावाच्या मध्यावर असलेला उत्तुंग कडुनिंबाचा वृक्ष डोळ्यासमोर आला. त्या लिंबाखाली खेळता-खेळताच माझे शैशव बाल्याच्या पायऱ्या चढले होते. आता युवावस्थेतून प्रौढतेकडे जाताना माझ्या मस्तकी एका मानवी वृक्षाने छाया धरली होती. त्याची ख्याती कटुतेबद्दल होती; पण माझ्या डोळ्यांना त्याचा ज्योत्स्ना-धवल मोहर दिसत होता. मनात त्याचा धुंद सुगंध दाटला होता. मस्तकावर त्याच्याच छायेने शितळाई पसरली होती."

The familiar part is about the huge neem tree in his village that already seems a friendly, reassuring presence, such as that of elders, despite having only once read about it so far. 
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 27, 2022 - January 27, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
भूमिका 

"‘पंचारती’ चित्रपटातील गदिमांच्या एका अभंगात अशा पंक्ती आहेत : 

"‘गाव जागा झाला 
"आता उठा पांडुरंगा 
"उजळली उगवती 
"जथे पाखरांचे गाती 
"सकाळच्या कळशीत 
"आली चंद्रभागा...’"

"‘गुळाचा गणपती’मधील एका गीतात गदिमांनी सूचना केली आहे : 

"‘चला जाऊ द्या पुढे काफिला 
"अजुनी नाही मार्ग संपला 
"इथेच टाका तंबू! 
"जाता जाता जरा विसावा 
"एक रात्र थांबू 
"इथेच टाका तंबू’ 

"त्याप्रमाणे एखादा विसावा वाचकांनी या आत्मचरित्रात टाकायला हरकत नाही. प्रत्यक्ष ‘काफिला’ पुढे गेलेलाच आहे."

"— आनंद अंतरकर"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 27, 2022 - January 27, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
येथवरी आहे ऐसा हा प्रकार 
................................................................................................
................................................................................................

" ... जेवता-जेवता आईने एक गोष्ट सांगितली. मी तीन-चार वर्षांचा होतो, तेव्हा कुंडलचे कुणीतरी भास्करभट्ट नावाचे दशग्रंथी ब्राह्मण आमच्या घरी जेवायला आले होते. ते चित्राहुती घालताहेत एवढ्यात मी काहीतरी हट्ट घेतला म्हणून आईने मला मारले म्हणे. मी आत्रस्ताळेपणाने भोकाड पसरले आणि तो ब्राह्मण पानावरून उठून चालू लागला. आईने माझ्या एका चुलत चुलत्याकडून त्यांची पायधरणी केली. ब्राह्मण संतापला. 

"‘‘या मुलाला का मारलंस?’’ 

"‘‘हट्ट करतो फार!’’ आईने रडवेले होऊन सांगितले. 

"‘‘या मुलाला मारू नको. हा तुमचा कुणी पूर्वज तुमच्या पोटी आला आहे. हा तुमच्या घराण्याचं नाव त्रिखंडात नेणार आहे. याला मारणार नाही अशी शपथ घे, तर मी या घरी अन्नग्रहण करीन!’’ 

"‘‘शपथ कशी घेऊ? मूल आहे. कधीतरी हात उगारला जाईल; वचनाला बाध येईल. पण मी ध्यानात ठेवीन. आपण जाऊ नका!’’ 

"ब्राह्मण जेवला आणि मला आशीवार्र्द देऊन तो निघून गेला. या ब्राह्मणाचे हे अद्भुत भविष्य खरे होण्याची फारशी आशा नाही. पण त्या दिवसापासून आईने असे मला फारसे मारले नाही. बिटाकाका त्यावेळी नव्हता. त्याने मला खूप मारले; पण डोहातून तारलेही. ऋणानुबंधाचे लागेबांधे काय असतात, माणसाचे भूत काय असते आणि त्याचे वर्तमान कोण घडवतो, कोण जाणे. अज्ञात कुणाला वाचता आले आहे?"

"कुंडलला गरिबी फार जाणवू लागली होती, त्याचे कारणही हळूहळू मला कळले. अक्काच्या लग्नासाठी वडिलांनी संस्थानाच्या बँकेचे कर्ज काढले होते आणि त्यांच्या पगारातून दरमला सात रुपये हप्ता त्या कर्जाच्या फेडीकडे लावून दिला होता. म्हणजे वडिलांना आता केवळ आठ रुपये मासिक मिळत होते आणि त्यातून एवढा प्रपंच हाकायचा होता. दारिद्य्र येईल नाही तर काय होईल? गावात शेतजमिनी होत्या. घर होते. पण त्यांचे काहीही उत्पन्न कुंडलपर्यंत पोचत नसावे. कुंडलमधला काळ कठीण होता. आठ रुपयांत आईला आमची चिमणी तोंडे भरायची होती. आमची आयुष्ये वाढवायची होती. आम्हाला मोठे करायचे होते."

"मी गोरा माणूस तोपर्यंत पाहिला नव्हता. अन्यायाच्या गोष्टी मी वाचल्या होत्या. आम्ही सारखे या मंडळीच्या मागे हिंडू-फिरू लागलो. शाळेत आलेले नवे मुख्याध्यापक हिंदुसभावादी होते. त्यांना हे काहीच पटत नसे. ते चिरचिऱ्या आवाजात म्हणत, ‘‘अभ्यास करा लेको! हे भलते छंद तुमचे नव्हेत!’’ फेऱ्या काढण्यापलीकडे आम्ही संस्थानी मुलांनी काहीच केले नाही; पण ‘स्वराज्य झाले पाहिजे’ हा विचार मात्र नाना पाटील आणि यशवंतराव यांनी आमच्यावर निश्चित बिंबवला. त्यांच्याजवळ आम्ही खादी वापरण्याच्या शपथा घेतल्या. ते दोघे निघून गेले. दांडेकरांची मुले शहरात गेली आणि आमच्या प्रभातफेऱ्या थंडावल्या; पण या काळात मला मित्र पुष्कळ मिळाले. पाटील-पुणदीकरांकडून ऐकलेले कैक विचार मी त्यांना सांगू लागलो आणि त्यामुळे ते जणू माझे अनुयाची बनले. किर्लोस्करवाडी, कुंडल ही आमच्या गावापासून केवळ दोन मैल दूर. या गावांत वावरतानादेखील आम्हाला भीती वाटे. आम्ही जंगली मुले. तिथले वातावरण किती सुशिक्षित आणि सुंदर. तिथल्या बायका फिरायला जात आणि पोहत पण. तिथले रस्ते, घरे, सगळेच काही आम्हाला अद्भुत वाटे. लक्ष्मणराव किर्लोस्कर, शंकरराव किर्लोस्कर या व्यक्ती आम्हाला स्वप्नातल्या देवांसारख्या वाटत."

"माझे हस्ताक्षर चांगले होते. आम्ही येतील तसल्या गोष्टी लिहिल्या. मी कविता रचल्या आणि हस्तलिखित मासिक काढले. त्याचे कुणी म्हणाल तर कुणीदेखील कौतुक केले नाही; पण मी मात्र स्वत:च कोरून लिहिलेल्या ‘संपादक : गजानन कुलकर्णी’ या अक्षरांवर मनोमन खूश झालो होतो. माझ्या लेखनकामगिरीला ही अशी आधी संपादक होण्यापासून उलटीच सुरुवात झाली आहे. या मासिकाच्या निमित्ताने मी जे लिहू लागलो ते माझे ध्यान लिहिण्याकडेच लागले. माझ्या या लिहिण्याला आगापीछा काही नसे. मासिकातदेखील ‘सागरेश्वरची ट्रिप’, ‘गंगागिरीबुवाची गोष्ट’ आणि ‘बाबा माझी गांधीटोपी छान’ असाच साहित्यसंभार जमवलेला होता."

" ... आपण कारखानदार व्हावे असे मला वाटू लागले. 

"प्रथम प्रारंभ म्हणून मी आणि शेजारच्या मावशीच्या घरातील मुलांनी ‘बटिण्स कारखाना लि.’ नावाची कंपनी काढली. नारळाच्या कवटीपासून कोटाची बटणे आणि खारकाच्या बियांपासून त्याची हातोप्याची बटणे बनवायची, असे त्या कारखान्याचे धोरण होते. एकही बटन पुरे निर्माण न होता ती कंपनी विस्कटली, आणि एकादशीचा खजूर खेळायला नेल्याबद्दल मी आईच्या हातचे रपाटे खाल्ले. कारखाना मोडला."

"एकदा आम्ही असेच स्वातंत्र्याच्या चळवळीचे खेळ खेळत होतो. मी महात्मा गांधी झालो होतो आणि वसंत इंग्रज सरकार. त्याने तुरुंगाची शिक्षा दिली. हा तुरुंग म्हणजे एक मोठा चौकोनी हौद होता. मी त्यात बसलो. इंग्रज सरकारने हौदाचे तोंड बंद केले आणि ते आपल्या नोकरशाहीसह मावशींच्या हाकेवरून निघून गेले. इकडे महात्मा गांधी घामाने भिजले. तुरुंगातल्या धान्यावरच्या किड्यांनी त्यांचे अर्धे रक्त खाल्ले. तुरुंगवास असह्य झाल्यावर त्यांनी हौद वाजवण्यास सुरुवात केली. हौद उघडला आणि तुरुंगवासापेक्षाही कडक फटक्यांची शिक्षा इंग्रज सरकारला मिळाली. वसंताच्या चुलत्यांनी त्याला धरून ओल्या चिपाडाने झोडपला. ‘‘पोर मेलं असतं म्हणजे?’’ असे ते म्हणत आणि पुन्हा मारीत."

" ... मला रामायण, महाभारत, भागवत यातील कथा चांगल्या माहीत होत्या. त्या कथांनी आम्ही खेळत असू. पुराणातले सर्व प्रसंग आम्ही नाटकात वठवल्यासारखे वठवीत असू. कधी रामायणातला समुद्रतरणाचा प्रसंग. त्या वेळी समुद्र म्हणून तिथल्या ओढ्याच्या पाण्यातून सुळकी मारून मी पलीकडे जायचा. रामायणातील मारुती आणि भारतातला भीम ही भूमिका मला सदैव असे. आमच्या या खेळात गावातली चाळीस पोरे येऊ लागली. बाण, तलवारी वगैरे आयुधेही आम्ही पाळू लागलो. अर्थात ही सारी आयुधे स्वयंनिर्मित असत. या खेळात आमच्यांत एक स्त्रीही सामील झाली होती. ती चांगली पंधरा वर्षांची होती. आम्ही खेळवू तशी ती खेळायची. मारुतीच्या खांद्यावर बसणे, दु:शासनाकडून फरफटत ओढले जाणे, या कुठल्याही नाट्यप्रयोगास तिची हरकत नसे. कारण ती बिचारी वेडी होती. वेड्याला खेळात घेऊ नये इतके शहाणपण आम्हाला नव्हते.

"मावशींच्या केळ्याच्या बागेत आमचे हे रामायण-भारत अनेकदा घडून गेले, आणि यातूनच मला नाट्यलेखनाची उबळ आली. पुराण खेळून संपल्यावर आम्ही ऐतिहासिक खेळाला प्रारंभ केला. किर्लोस्करवाडीस काही नाटके मी पाहिली होती. मग इच्छेला येईल ते न बोलता आम्ही मळ्यातल्या खेळातली मी लिहिलेले संवाद बोलू लागलो. संस्थानचे शिक्षणखाते शालेय विद्यार्थ्यांचे ‘विनय’ नावाचे एक मासिक काढीत असे. त्यात गुपचूप हा संवाद मी पाठवून दिला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो छापून आला. मी तो अंक पंधरवडाभर जवळ बाळगला, ज्याला त्याला दाखवला; पण मावशी आणि आई यांच्याशिवाय माझे कुणीच कौतुक केले नाही! 

"आई मात्र म्हणाली, 

"‘‘श्रीधरस्वामीसारखा कवी होईल माझा अण्णा!’’ 

"माझी आई अशिक्षित खरी; पण सुशिक्षित स्त्रियांनी हेवा करावा अशी तिची जाज्वल्य रसिकता आहे. घरकाम करताना ती समर्थांची अष्टके म्हणे. सारवताना परिपाठाचा पाठ करी; तर जात्यावर दळताना भराभरा रचून कविता म्हणे. शाळेच्या लायब्ररीतून आणलेले एखादे पुस्तक मी तिला वाचवून दाखवी, तेव्हा ती लक्ष देऊन ऐके आणि अनेकदा त्या पुस्तकातील घटनांचे संदर्भ देई. 

"‘सुंदरी तर कुठली नि काय? सारा टेंभा माईसाहेबांचाच!’ 

"हे हरिभाऊंचे वाक्य ती कुठच्या कुठेतरी मौजेनी वापरी; आणि आपली आई शिकली असती तरी फार थोर विदुषी झाली असती, असे मला नेहमी वाटे. तिला लिहिता फारसे येत नसे. ती सांगे, ‘‘मी लिहायला शिकलेच नाही. फक्त वाचायला शिकले आहे.’’ हे कसे काय घडले असावे याचा उलगडा मला त्या वयात मुळीच होत नसे. 

"एकदा वृंदावनापुढे ‘राम’ लिहिताना मी आईला पकडले आणि म्हणालो 

"‘‘आएडे, येतंय गं तुला लिहायला!’’

"‘‘पण उजव्या हातानं नाही येत!’’ आई हसत म्हणाली. आई डावखोरी होती. डाव्या हाताने तिला लिहिता येत असे. लोक हसतील म्हणून ती सांगत असे, ‘मला लिहिता येत नाही’ म्हणून!"
................................................................................................

"मावशींच्या शेजारामुळे चार भिंतींच्या आड आमचे दारिद्य्र झाकले जात होते. पण एके दिवशी मावशींच्याकडे आईचा अपमान झाला. मावशींची एक भांडीवाली होती, ती आईचा हेवादावा करी. एका भांडी घासणाऱ्या बटकीने माझ्या आईसारख्या प्रतिष्ठित ब्राह्मण स्त्रीचा हेवा करावा हा प्रसंगच किती भयंकर आहे. त्याचे असे झाले, आई धाकट्या भावाला घेऊन मावशींच्याकडे बसायला गेली होती. 

"परसदारी त्या बोलत बसल्या होत्या. माझा भाऊ तेलउंबरीच्या झाडावर चढून फळे काढण्याच्या विचारात झाडाशी खटपट करीत होता. चढता-चढता तो पडला. 

"शेजारीच भांडी घाशीत असलेली ती मुर्दाड भांडीवाली मोठ्याने हसली नि ओरडली, 

"‘‘दिवा पडला... दिवा पडला!’’ 

"आईने धावत जाऊन त्याला सावरले आणि त्या बाईला खडसावून विचारले— ‘‘दिवा पडला म्हणजे काय?’’ 

"ती झटक्याने उठली आणि आईपुढे हात नाचवीत म्हणाली 

"‘‘माझ्या पोराच्या पोटी पडायचं ते तुझी पोरं इथं येऊन खातात. दुसऱ्याच्या भाकरीवर पोसावी लागतात तर इतकी पोरं होऊ कशाला दिलीस? त्यातलं एक मेलं म्हणून काय दिवा विझेल तुझ्या वंशाचा?’’ 

"‘‘श्रीराम!’’ आईने त्या बाईला काहीच उत्तर दिले नाही. तिने मूल उचलले आणि तरातरा घरी आली. त्या क्षणी मावशींनी त्या बाईला कामावरून काढून टाकली. मग तर गावभर माझ्या आईच्या कुचाळक्या करायला, निंदा करायला तिला एकच विषय की ‘बाईला पोरांचं लेंढार आहे; आणि घरात अन्न नाही.’

"मावशीचे उपकार परत घ्यायचे नाहीत म्हणून आईने ती जागा सोडली आणि आम्ही फरशीवरच्या कुशंभटांच्या बिऱ्हाडात राहिलो. ही जागा अगदी आडबाजूला होती. तिथे कुणी येत नव्हते आणि जात पण नव्हते. मावशी येत; पण आई मात्र आता त्यांच्या घरी हळदीकुंकवाला म्हणूनदेखील जाईनाशी झाली.
................................................................................................

"1932 साली कुंडलला एकाएकी प्लेगची साथ सुरू झाली. त्या एवढ्याशा गावात रोज पाचसहा स्मशानयात्रा निघू लागल्या. लोक रानात राह्यला जाऊ लागले. आम्हाला कुठले रान? रानात राह्यला जायचे तर परत माडगुळ्यास जाणे भाग होते. आईने तसे म्हणून पाहिले. पण दादा तिरसटपणाने म्हणाले, ‘‘हं ! गावी जा आणि प्लेगच्याऐवजी अन्नावाचून मर!’’ 

"इथले जगणे मरण्यासारखेच होते. दादा अत्यंत सज्जन गृहस्थ होते; पण आईला ते फार त्रास देत. संसारात बघत नसत. कदाचित नाइलाजाने ती विरक्ती त्यांना आली असेल.

"माझी आई कोंड्याचा मांडा करून वेळ साजरी करणारी बाई होती; पण मांडा करायला कोंडा तरी हवा ना! भाकरीला पीठ असले तर कालवणाला काही नसायचे. जोंधळ्याच्या पिठाचे पिठले करून आई वेळ मारून नेई. आत्ताआत्ता तिने मावशींकडे जाणे सोडले होते. 

"प्लेग आला तेव्हा आम्ही पाच भावंडे झालो होतो. धाकटी लीला नुकती चालतीबोलती झाली होती. वडिलांसारखाच मुलांनी आईला फार त्रास दिला. जिवतीच्या चित्रासारखी तिची सदैव ‘वेढलेली’ अवस्था असे. 

"एक पाळण्यात, एक मांडीवर, एक पाठीशी, तर एकदोघे अंगाभोवती. आई म्हणे, ‘‘हा देवाघरचा पानमळा आहे. मोठी झाली म्हणजे सुख लावतील!’’ आईचे मुलांवरील प्रेम वेडे होते. स्वत:ला प्लेग होईल ह्याची तिला धास्ती नव्हती. मुलांना झळ लागू नये म्हणून आपल्या प्राणांचे पांघरुण करण्याची तिची सिद्धता होती.

"आसपासची आळी मोकळी झाली, लोक रानोमाळ झोपड्या बांधून राहू लागले; पण दादा काहीच व्यवस्था करीनात. आईला राहूनराहून मावशींकडे जावेसे वाटे; पण त्या नीच भांड्यावाल्या बाईने केलेल्या अपमानाने ती मनस्वी दुखावली होती. ती सारखी डोळे भरत होती आणि देवाची करुणा भाकीत होती, 

"‘‘देवा, माझ्या बाळांना औक्ष दे...’’ 

"एका संध्याकाळी मावशीच आमच्या घरी आल्या आणि आईवर रागावल्या,— 

"‘‘एवढा परकेपणा वाटायला लागला तुम्हाला! त्या दळभद्य्रा भांडीवालीसाठी तुम्ही मला बोल लावणार! मला दूर लोटणार!....’’

"आईला गहिवर आला. मावशीचे डोळेही पाणावले. मावशींनी आपल्या झोपडीशेजारी आमची झोपडी बांधवली आणि बामणकीत राह्यला गेलो. मावशींच्या दयेची गंगा आमच्या झोपडीत झुळझुळू लागली. बाळपणाच्या साऱ्या आठवणींत, या रानातल्या वस्तीत मला फार सुख लागले."
................................................................................................

"शाळा त्यावेळी बंगल्यात भरत होती बंगल्यात म्हणजे बंगल्याच्या अंगणात. कुंडलगावाबाहेर पंतप्रतिनिधींचा एक छोटासा बंगला होता. वार्षिक भेटीसाठी ते आणि राजकुटुंबीय मंडळी तिथे येत. एरव्ही तो मोकळाच असे. त्या बंगल्याभोवती घनदाट आंबराई होती. या आंब्याच्या छायेतच प्लेगच्या दिवसांत आमची शाळा भरे. 

"हा बंगला आमच्या वस्तीपासून मैल-दीड मैल दूर. त्यामुळे जाताना ‘दशमी’ बरोबर घ्यावी लागे. पुष्कळ मुले डबे आणीत. माझी आई एका पांढऱ्या सोधण्यात भाकरी-पिठले देई. ते सर्वांसमोर सोडण्यात मला लाज वाटे. मी बंगल्याच्या मागे बसून एकटाच गुटुगुटू खाई. ही आंबराईतली शाळाही माझ्या अजून ध्यानात आहे. त्या झाडाखाली भरलेले वर्ग छान दिसत. तशी शाळा सारखी लाभती तर मी मोठा विद्वान पुरुष झालो असतो."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 27, 2022 - January , 2022. 

"आचार्य अत्र्यांनी सहानुभूती दाखवली नसती तर मला प्रवेशच मिळाला नसता. चित्रपट व्यवसायात आज मी जे भलेबुरे यश मिळवू शकलो त्याचा संभवच उरला नसता. मी औंध संस्थानात कुठेतरी मास्तर झालो असतो वा आमच्या घराण्यात परंपरेने चालत आलेले गावाचे कुलकर्णीपण करीत राहिलो असतो. अत्र्यांची-माझी मुळीच ओळख नव्हती. श्री. काळेमास्तरांनी मला दिले तसले ओळखपत्र आचार्य अत्र्यांच्या कैक मित्रांनी माझ्यासारख्या कैक उमेदवारांना दिले असेल. ते सर्व चित्रपटसृष्टीत आले का? नाही. माझ्यातला नाट्यगुण, अभिनयशक्तीकाहीच अत्र्यांनी पाहिले नव्हते. मग हे त्यांनी का केले? कदाचित या प्रश्नाचे उत्तर आचार्यांनाही आज देता येणार नाही; पण त्या वेळी मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने मला वाट दाखवलीयशाचा दरवाजा उघडून दिला. रखरखीत उन्हाशिवाय वायुमानच न संभवलेल्या बाळपणातून आयुष्याच्या मार्गाकडे वळताना अगदी कोपऱ्यावर मला दिलासा दिला तो अत्र्यांच्या अभावित सौजन्याने. ते सौजन्य मी कधीही विसरणार नाही कधीही विसरणार नाही!"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 27, 2022 - January 28, 2022. 

" ... नवागतांत क्वचित दिसणारे कसब माझ्यात आहे हे चाणाक्ष विनायकरावांनी गुपचूप हेरले. चारदोन संवाद असलेली कुठलीही भूमिका आली की, ते सहदिग्दर्शकांना सांगू लागले, ‘‘औंधकरांना रंगवा!’’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 28, 2022 - January 28, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
पंधरा दुणे तीस

" ... यापूर्वी ‘मनोहर’ मासिकात माझी एक कविता प्रसिद्ध झाली होती. तिच्या खाली मी माझे नाव ‘ग. दि. माडगूळकर’ असे लिहिले होते. माडगूळगावचे जे कोणी कुलकर्णीलोक बाहेर जाऊन मोठे झाले ते ग्रामनामालाच महत्त्व देत होते. मीही तीच परंपरा पुढे चालवली होती. 

"‘‘या.’’ व्हाऊचर माझ्यापुढे सारीत वामनराव म्हणाले. मी त्या कागदावर सही केली. ‘पैसा अदा करण्याचे कारण’ अशा छापील अक्षरांपुढे त्या कागदावर शाईने लिहिलेले होते ‘श्री. बाबूराव पेंढारकर यांच्या सांगण्यावरून.’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 28, 2022 - January 28, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
सुवर्णाक्षरांचा मान 
................................................................................................
................................................................................................

"बाबूरावांशी मी कधीच बोललो नव्हतो. त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी ऐकल्या मात्र होत्या. त्या साऱ्या दंतकथांचा मेळ त्यांच्या या छत्रदानाशी कुठेच बसत नव्हता. शाहुपुरीपर्यंत पोचेतोपर्यंत मी बाबूरावांच्या या कनवाळूपणाचाच विचार करीत राहिलो. त्यांना भेटून त्यांचे आभार मानावे असेही वाटले; पण त्यांची मुद्रा ध्यानात येताच तसे करणे धाष्टर्याचे होईल असे उगीचच मनात आले. 

"ती छत्री फारच सुंदर होती. तिचा काळा झगा चिवट रेशमाचा होता. दांडी मुलायम लाकडाची होती. मुठीवर हस्तिदंती नक्षी होती. बहुतेक स्वत: बाबूरावांना हवी असावी या कल्पनेने बझारमास्तरने तो ‘शेलका’ माल आणला होता. न बघताच बाबूरावांनी ती छत्री मला देऊन टाकायला सांगितले होते. इतकी सुंदर छत्री मी कधी वापरली नव्हती. खेड्यात असताना पाऊस आला तर गोणपाटी पोत्याची खोळ कुंचीसारखी पांघरून मी शाळेत जात होतो. त्या दिवसांची आठवण मी विसरलो नव्हतो. माझ्या बाल्यातल्या काही आठवणी विसरण्यासारख्या नव्हत्याच."

" ... ‘ब्रह्मचारी’, ‘ब्रँडीची बाटली’ आणि ‘देवता’ हे तीन चित्रपट निघून गेले. चांगले जोराने गाजले. ... वल्लभभाई पटेलांच्या सभेची दूरदृश्ये घेताना, वल्लभभाईंसारखे कपडे घालून त्यांच्याऐवजी मी चितारलो गेलो. त्याच चित्रपटात दारुडा शेतकरी बनून मी तिरंगी ध्वजाखाली उभा राहिलो. दिग्दर्शक विनायकांनी माझ्याकडून दारू सोडल्याची शपथ घेववली आणि पोलिसाचे कपडे घालून दारू-अड्डे तपासण्याचे काम करायलाही मला भाग पाडले. ... अत्रे-खांडेकरांच्या हस्तलिखितांच्या प्रती करण्याचे काम मला मिळत राहिले. विनायकरावांच्या सहकाऱ्यांनी ते निर्बुद्ध काम बिगारी म्हणूनच माझ्या अंगावर टाकले असेल; पण मला मात्र त्या कामातून लाभ झाला. ... "

"भाऊसाहेब खांडेकरांनी दिलेल्या त्या पन्नास रुपयांवर वडिलांच्या कर्जदारांना मी थोपवू शकलो. गरीब कारकुनाला कर्ज ते किती असणार? त्यातले निम्मेअधिक कर्ज मी चुकवू शकलो. बाकीच्या कर्जाची हमी घेऊ शकलो. देणेकऱ्यांचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसू शकला. वडील, आई आणि भावंडे सुखरूप खेड्यापर्यंत जाऊ शकली. निरोप घेताना मला पोटाशी धरून वडील गहिवरून म्हणाले 

"‘‘तुझ्या कमाईनं आज बापाची अब्रू वाचली!’’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 28, 2022 - January 28, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
नवयुग’मधला लपंडाव 

""‘लपंडाव’ चित्रपटासाठी काम करीत असताना माझे स्वत:चे गीत चित्रपटात गेले नाही; पण त्यामुळेच अत्र्यांच्या गीतलेखनातील एक वैशिष्ट्य मला काही शिकवून गेले. ​

"‘चल वेच फुले, वेच भराभर सारी गं ​
"ही, हीच वेळ सोनेरी’ 

"चित्रपटासाठी लिहायचे गीत इतके सोपे आणि एवढे प्रसादपूर्ण असावे लागते. माझ्या ‘नंदादीप’ कवितेतील ‘तिमिरगूढ गाभारा’ श्रोत्यांना दिसला नसता. त्याचे चित्रण करणे दिग्दर्शकालाही कठीण पडले असते. आपली गीते अत्र्यांच्या गीतांसारखी रसाळ झाली, चित्रणाच्या दृष्टीने सुलभ उतरली, तर आपण चित्रपटगीतकार होऊ, असा एक विश्वास त्या वेळीही माझ्या कानांवरून गुणगुणत निघून गेला.""
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 28, 2022 - January 28, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
पहिला पाळणा 
................................................................................................
................................................................................................

" ... राम फडक्याने माझ्याप्रमाणे पूर्वी मेळ्यासाठी चाली दिल्या होत्या. ग्रामोफोनसाठीही चाली दिल्या होत्या. संगीत-दिग्दर्शकाला योग्य दिसावे म्हणून त्यानेही आपले नाव बदलले होते. राम फडक्याऐवजी तो स्वत:ला सुधीर फडके म्हणवीत असे. त्याची चाल तेव्हा स्वीकारली गेली नाही; पण बालाजींनी केलेल्या चालीवर त्याच्या चालीची छाया निदान मला तरी स्पष्ट दिसत होती."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 28, 2022 - January 28, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
समाधी-लेख 
................................................................................................
................................................................................................

"युद्धकाळात चित्रपटनिर्मितीला विलक्षण बहर आला. वाटेल तसा चित्रपट आठवडेच्या आठवडे चालू लागला. नटांच्या मिळकतीचे आकडे भराभरा फुगत गेले. बाबूराव पेंढारकर निर्मिती सोडून हिंदी चित्रपटांचे करार स्वीकारू लागले. मुंबईचा धंदा जोरात फोफावला. भालजींनी तीन-चार हिंदी चित्रपट घोषित केले. पृथ्वीराज कपूर, शांता आपटे इत्यादी नामवंत कलावंत कोल्हापुरात येऊन पोचले. 

"नेमका याच वेळी मी मात्र सहकुटुंब उपासमारीच्या रस्त्याला लागलो. बायको रोज म्हणू लागली, ‘‘विनायकरावांची ‘प्रफुल्ल’ कंपनी इथे ‘शालिनी’त आहे. तुम्ही त्यांच्याकडे जा.’’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 28, 2022 - January 28, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
मौजेचे स्वप्न 
................................................................................................
................................................................................................

" ... श्री. भाऊसाहेब खांडेकर विनायकरावांसाठी ‘सुभद्रा’ कथानकावर काम करीत होते. विनायकरावांच्या सांगीवरून मी त्यांच्याकडे जाऊन बसत होतो. कु. लता मंगेशकर ही असामान्य बालगायिका त्या काळी ‘प्रफुल्ल’मध्ये होती- तिच्यासाठी एखादी भूमिका ‘सुभद्रे’त निर्माण झाली पाहिजे, असा विनायकरावांचा आग्रह होता. नुकत्याच होऊन गेलेल्या सॅन फ्रॅन्सिस्को येथील शांतिपरिषदेनेही विनायकरावांना भारले होते. शांतिपरिषद आणि लता मंगेशकर या दोघांना सुभद्रेच्या कथानकात जागा मिळवून देण्यासाठी खांडेकर प्रयत्न करीत होते. ‘सौभद्र’ या अजरामर मराठी नाटकाचे संविधानक वाङ्मयातील कुठल्याही ‘माध्यमा’तून सादर केले तरी यशस्वी होण्यासारखे होते. त्यात नवे काही भरण्याची सुतराम आवश्यकता नव्हती. निदान मला तरी तसे वाटत होते. खांडेकरांनाही तसेच वाटत असावे; पण विनायकरावांचा हट्ट पुरा करण्यासाठी ते द्वारकेत शांतिपरिषद भरवण्याच्या सिद्धतेला लागले होते. ‘‘हे प्रकरण या कथेत बसणं कठीण आहे भाऊसाहेब.’’ न राहवून मी एकवार लहान तोंडी मोठा घास घेतला. मला वाटले, खांडेकर माझ्या या सूचनेने भडकतील. ते भडकले नाहीत. सौम्यपणे म्हणाले, ‘‘हो. पण लतासाठी एखादी गाणारी भूमिका योजायची, तर असं काही करण्यावाचून गत्यंतर काय?’’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 28, 2022 - January 28, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
रामजोशी’ उत्तीर्ण

" ... कसे लिहावे याचा विचार करीतच वेळ घालवू लागलो. शेवटी बाबूरावच म्हणाले, ‘‘हे असं जमणार नाही. तुम्ही, मी, शांताराम तिघेही एकत्र बसून चर्चा करीत जाऊ. एकेक दृश्य कायम करीत जाऊ. मग तुम्ही लिहायला बसा.’’ नकार देण्याचे मला काहीच प्रयोजन नव्हते. 

"पुढे पंधरा दिवस आम्ही तिघे मिळून रोज चर्चेला बसू लागलो. वादविवाद चांगलेच रंगले. शेवटी तयार झालेली चित्रकथा माझ्या नाटकाच्या कथेपेक्षा फारच वेगळी तयार झाली. नाटकाची कथा व चित्रपटकथा या दोन्हींतून कोणती अधिक चांगली होती हे त्या वेळी मला सांगता आले नाही आणि आजही सांगता येणार नाही. रामजोशाच्या काळात स्त्रिया तमाशात मुळीच नाचत नसत. माझ्या नाटकातली बयाही नाचत नव्हती. फक्त तिच्या सहवासामुळे रामजोशाला स्फूर्ती लाभत होती. चित्रपटकथा तयार करताना कवित्व करणारा रामजोशी धोंडी शाहिराला मागे सारून स्वत: डफावर थाप देऊन गाऊ लागला. बयाही रामजोशाच्या खासगी रंगमहालातून बाहेर आली. नायक आणि नायिकादोघेही जाहीरपणे तमासगीर झाल्यावर त्यांच्या प्रथमभेटीचा प्रसंग रंगमंचावरच कल्पिणे अपरिहार्य झाले. दोघांतील सवाल-जबाबांचा प्रसंग मला मग सुचला. बया तमाशात नाचत होती हे एकवार गृहीत धरल्यावर पुढचे प्रसंगही नाटकातील प्रसंगांपेक्षा अगदी वेगळ्या घडणीचे घडले गेले. 

"प्रारंभीच श्री. केशवराव दात्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे नाटक उलटे जरी टाकले गेले नाही, तरी बदलले मात्र खूपच गेले. लेखकाच्या अभिजात स्वभावानुसार कथानकात झालेले हे बदल मला फारसे रुचले नाहीत; पण ही नापसंती मी कधीच बोलून दाखवली नाही. चित्रकथेचा आराखडा सुरुवातीपासून शेवटपर्यंत तसा अतूट तयार झाल्यावर शांतारामबापू मला म्हणाले, ‘‘आता तुम्ही ठरलेल्या दृश्यांनुसार संवाद तयार करून आणा.’’"

" ... संवादकथनाच्या भरात जागोजागची गीतेही मी योजू लागलो. काही ठिकाणी रामजोश्यांच्या लावण्या चपखल बसल्या; पण जिथे रामजोश्यांची स्वरचित लावणी नाही तेथे मी माझी स्वत:ची रचना बेमालूपणे सरकावून दिली. संवादांसारख्याच लावण्यांच्या ओळीच्या ओळीदेखील मी भराभरा तोंडाने सांगू लागे तेव्हा मधू अगदी थरारून जाई. बेहोशपणे मान डोलवताडोलवता त्याचे डोळे काठोकाठ भरून येत आणि माझा निर्मितीबद्दलचा आनंद दुणावे. 

"‘रामजोशी’ चित्रकथेचे हस्तलिखित संवादगीतांसह पुरे झाले आणि मी पुन्हा मुंबई गाठली. सारे हस्तलिखित शांतारामबापूंना वाचून दाखवले तेव्हा तेही प्रसन्न झाले. न राहवून ते शेवटी मला म्हणाले, ‘‘माडगूळकर, अशी शाबासकी मी सहसा कुणाला देत नाही. पण खरोखरीच तुमचे संवाद बहुतांशी निर्दोष झाले आहेत कुठं एखादं-दुसरं दृश्य इकडचं तिकडं करावं लागेल इतकंच.’’ शांतारामबापूंचे हे प्रशंसोद्गार नि:संशय उत्स्फूर्त होते. त्यांच्यासारख्या थोर दिग्दर्शकाने दिलेल्या या शाबासकीने माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही. 

"‘रामजोशी’ चित्रपट स्वत: शांतारामबापू घेणार नव्हते. त्यांचे त्या वेळचे सहकारी दिग्दर्शक कुमार चंद्रशेखर यांना ‘रामजोशी’च्या दिग्दर्शनाची संधी द्यावी असे त्यांच्या मनात होते. कथा सर्वस्वी तयार झाल्यावर मात्र त्यांचा विचार अचानकपणे बदलला. ‘रामजोशी’चे दिग्दर्शन कलामहर्षी बाबूराव पेंटरांनीच करावे असे ठरले. बाबूरावांच्यासारखा महर्षीपदाला पोचलेला कलाकार आपली कथा दिग्दर्शित करणार या वार्तेने मला आनंद तर झालाच; पण ज्यांनी ती कथा निवडली तेच त्या कथेचे दिग्दर्शन करणार या योगायोगाचाही अचंबा वाटल्यावाचून राहिला नाही. नव्यातील नव्या कथाकाराला जुन्यातील जुना दिग्दर्शक कुठल्याही पूर्वयोजनेवाचून लाभावा, हा योगायोगच नव्हे तर काय? चित्रपट महर्षी पेंटरांनी दिग्दर्शित करावा असे ठरले. संगीत-दिग्दर्शन वसंत देसायांच्या स्वाधीन झाले. वसंत देसाई हा माणूस तर प्रथम भेटीतच माझ्या प्रेमात पडला. कथानकासाठी निवडलेल्या रामजोशांच्या लावण्या आणि दृश्य साजरे करण्यासाठी मी घुसडलेले स्वरचित लिखाण यांच्यातील साम्यामुळे वसंतराव मलाही ‘कविराय’ म्हणून संबोधू लागले. रामजोशी आणि बया यांच्या सवालजबाबाला वसंतरावांनी मोठ्या परिश्रमपूर्वक चाली लावल्या. नायिकेच्या भूमिकेसाठी हंसा वाडकर या सुडौल अभिनेत्रीची निवड झाली. तिला नृत्य शिकवण्यासाठी एक प्रौढ तमासगीर बाईची योजना झाली. वादकांचा एक ताफाच्या ताफा नियुक्त करण्यात आला. लावण्यांच्या रंगेल स्वरांनी सारा स्टुडिओ दुमदुमू लागला. रामजोशीच्या भूमिकेसाठी शिलेदार या गायक-नटाची नियुक्ती झाली. ‘युद्धाच्या सावल्या’ या माझ्या पहिल्या नाटकात नायकाची भूमिका शिलेदारांनीच केली होती. माझ्या पहिल्या चित्रपटातील नायक होण्याचा योगही त्यांनाच यावा याची मला मोठी मौज वाटली.

"युद्धकाळातील सर्वस्वी बंद पडलेली मराठी चित्रनिर्मिती रामजोशी पुन्हा नव्याने सुरू करणार होता. रामजोशीची चरित्रकथा ही केवळ महाराष्ट्रालाच मानवण्यासारखी होती. ‘रामजोशी’ उभय भाषांत काढावा अशी कल्पना कुणाच्याच डोक्यात नव्हती. ‘रामजोशी’च्या संगीताचा गदारोळ स्टुडिओमध्ये चालू असताना रोशनलाल मल्होत्रा कशासाठी तरी सपत्नीक ‘राजकमल’मध्ये आले. सुरू होणाऱ्या चित्रपटाबद्दल चौकशी करताना ओघाओघाने शांतारामबापूंनी त्यांना ‘रामजोशी’ची कथा सांगितली. तो परभाषिक गृहस्थ अभावितपणे बोलून गेला : ‘‘कहानी बडी खूबसुरत है. उसको हिंदी में भी क्यों न बनाए आप?’’ 

"शांतारामबापूंच्या साहसी स्वभावाला एवढी सूचना भरपूर झाली. ‘रामजोशी’ची हिंदी आवृत्तीही काढण्याचा निर्णय त्यांनी घोषित करून टाकला. ‘रामजोशी’तील लावण्यांचे हिंदीकरण करण्यासाठी हिंदीतील प्रथितयश कवी नरेंद्र शर्मा यांची स्टुडिओत ये-जा सुरू झाली. हिंदी आणि मराठी अशा उभय भाषांत ‘रामजोशी’च्या निर्मितीला प्रारंभ झाला."

"चित्रपटगृह ज्वारीच्या पोत्यासारखे टिच्चून भरले होते. क्षणाक्षणाने कथेचा ओघ वेग घेत होता. प्रेक्षक तल्लीन होत होते. सवालजबाब सुरू झाले आणि प्रेक्षक चेकाळले. पडद्यावर खळाखळा पैसे फेकू लागले. टाळ्या-शिट्या मारू लागले. माझ्या पोटात कालवू लागले. कल्लोळ वाढला. इतक्यात खटकन मध्यंतर आले. मी उठलो. तो माझ्या पाठीत धबका बसला. कुणीतरी माझे कान जोराने पिळले. चित्रगृहात उजेड झाला. मी बावरून पाहिले. भाऊसाहेब पेशकरांनीच मला तो प्रसाद दिला. 

"‘‘ट्रिमेंडस सक्सेस! पैशाचा पाऊस पाडणार तुमचा ‘रामजोशी’.’’ 

"पाठीत धबका देणे आणि कान पिळणे हा भाऊसाहेबांच्या अभिनंदनाचा भाग होता. प्रेक्षकांच्या तोंडावर असीम खुशी दिसत होती. मग शांतारामबापूंच्या अस्वस्थतेचा अर्थ काय?"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 28, 2022 - January 28, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
सावल्यांतली वाटचाल
................................................................................................
................................................................................................

" ... ‘जय मल्हार’ झपाट्याने चालू झाला. मी मुंबईच्या कामात गुंतलो. ‘जय मल्हार’ ‘रामजोशी’च्या आधी प्रकाशित झाला. त्याचे प्रथम प्रकाशन नागपुरात झाले. नागपूरच्या जनतेला दक्षिणी ग्रामीण बोली उमजली नाही. तिकडे चित्रपट अयशस्वी झाला. तिथल्या वर्तमानपत्रांनी मात्र त्या चित्रपटाचा खूप गौरव केला. त्यातील लावण्यांनी प्रभावित होऊन एका नामवंत टीकाकाराने चित्रपटाच्या कल्पनेचे श्रेयदेखील माझ्याच पदरात टाकले. पुण्या-मुंबईला मात्र हा चित्रपट जोरात चालला. माझी गीते व भूमिकादोन्हीही लोकांना पसंत पडली. ‘जय मल्हार’च्या पाठोपाठ ‘रामजोशी’ आला. त्याने तर कहर केला.

"‘रामजोशी’ कोल्हापुरात प्रकाशित झाला, तेव्हा कोल्हापूरच्या वृत्तपत्रांनी फक्त ‘खास माडगूळकर अंक’ काढण्याचेच बाकी ठेवले. शाबासक्यांची सीमा केली त्यांनी. ‘रामजोशी’चे यश कोल्हापूरकरांनी माझ्या मंदिलावर लावले; पण पुण्या-मुबईस तसे झाले नाही. तिकडे सारा टेंभा शांतारामबापूंचा; त्यांच्या नट-नटींचा. लेखक कुठला नि कोण? काही पत्ता नाही."

"देशपांडे पती-पत्नी सुविद्य, राम चोखंदळ रसिक, फडके अवलिया संगीतकार आणि प्रगतीसाठी सदैव धडपडणारा माझ्यासारखा नवखा लेखक असा संच क्वचितच कुठे एकत्र आला. या चित्रपटात श्री. रामभाऊ ग्रामोपाध्ये यांनाही एक भूमिका आम्ही देववली. चित्रपटाच्या कामास प्रारंभ झाला. 

"अपुरी अर्थशक्ती व मध्यंतरी उद्भवलेला गांधीवधाचा प्रसंग या दोन संकटांनी खंडित होतहोत चित्रपट कसाबसा पुरा झाला. तांत्रिक बेडौलपण चित्रात राहून गेले खरे; रसाळतेच्या दृष्टीने हा चित्रपट अत्यंत गोड झाला. हीन लोकाभिरुचीच्या तृप्तीसाठी एक वाक्यही चित्रपटात योजण्यात आले नव्हते. प्रत्येक भूमिका सत्याइतकी वास्तव दिसत होती. प्रत्येक गीत अर्थपूर्ण होते, कर्णमधुर होते. 

"‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदेमातरम्’ या गीताला फिल्मी गीत कोण म्हणेल? चित्रपटाने आर्थिक यश मिळवले असो वा नसो, एका दिलाची उत्साही माणसे निष्ठेने एकत्र आली तर निर्मिती किती ‘अमोल’ होऊ शकते याचे तो चित्रपट म्हणजे मूर्तिमंत उदाहरण होते. 

"हा चित्रपट पुरा झाला आणि माझ्या पायाखालची वाट बदलली. खडे, काटे नाहीसे झाले. डोक्यावरचे ऊन शीतळले. सावल्यांचा शोध करण्याचे प्रयोजन उरले नाही. 

"इथून पुढचा प्रवास प्रगतीसाठीच सुरू झाला. अन्न आणि निवारा यांचा अभाव उरला नाही. 

"या चित्रपटाची जाहिरात लेखकाच्या नावाने प्राधान्य सादवीतच पत्रापत्रातून झळकली, ‘‘ 

"‘रामजोशी’च्या माडगूळकरांचा नवा बोलपट : ‘वंदे मातरम्’. ’’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 28, 2022 - January 28, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
वाटेवरल्या सावल्या
by ग. दि. माडगूळकर
................................................
................................................

January 27, 2022 - January 28, 2022. 

Purchased September 26, 2021. 

Kindle Edition
Published September 8th 2019

ASIN:- B07XNX4CPJ
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4510639329