Thursday, January 13, 2022

Thorli Paati (थोरली पाती, कथा ग. दि. माडगूळकर), by G.D. Madgulkar.

................................................................................................

Thorli Paati
थोरली पाती 
कथा 
ग. दि. माडगूळकर
by G.D. Madgulkar
................................................................................................
................................................................................................

Many of these stories are familiar from other collections of works of the author, one realises as one reads - and probably so because thus is a choice collection out of his works, compiled by those that have a connoisseurs' discrimination, selecting choicest of the gems. 
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
Table of Contents 

माझे म्हणणे... 

प्रस्तावना... 

1. माणूस अखेर माणूस आहे... 
2. अतर्क्य 
3. चोळी 
4. मोती 
5. नेम्या 
6. वीज 
7. औंधाचा राजा 
8. मद्यालयाची वाट 
9. वय 
10. काशीयात्रा 
11. काळजी 
12. रामा बालिष्टर 
13. गावरान शेंग 
14. वसुली 
15. नागूदेव 
16. तुपाचा नंदादीप 
17. शेवटचा दिवस गोड व्हावा 
18. अधांतरी 
19. सिनेमातला माणूस 
20. वेडा पारिजात 
21. उबळ 
22. माझा यवन मित्र 
23. मुकी कहाणी 
24. पंतांची किन्हई 
25. अरे, दिवा लावा कोणी तरी

Reviews 

"एका घरात अनेक लेखक जन्माला आल्याने पुष्कळदा मोठे गमतीदार घोटाळे उडतात. माझा धाकटा भाऊ, चि. व्यंकटेश याने काही वर्षांपूर्वी ‘नवभारत’ दैनिकाच्या एका विशेषांकाला एक कथा पाठविली होती; ती प्रसिद्ध झाली ठीक माझ्या नावावर. तेव्हापासून त्याने व्यं. दि. माडगूळकर असे नाव लिहायचे बंद केले. तो व्यंकटेश माडगूळकर असे लिहू लागला. 

"व्यंकटेश भारत शासनाच्या आकाशवाणीवर काम करतो. त्या विभागाच्या मंत्र्यांनीच एकदा त्याला विचारले, ‘काय माडगूळकर, ‘गीतरामायणा’नंतर काय घेतले आहे लिहायला?’ 

"मला तर अनेकांनी अनेकदा सांगितले ‘तुमची ‘माणदेशी माणसे’ अप्रतिम आहेत !’ 

"असे घोटाळे चालू असतानाच कुणीतरी आमचा दोघांचा उल्लेख, थोरली पाती, धाकटी पाती अशा शब्दांनी केला. धाकट्या भावाच्या, साहित्य क्षेत्रातील थोर कर्तृत्वाने माझे वयाचे थोरलेपण साहित्यातही रूढ होऊन बसले. ‘थोरली पाती’ या शीर्षकाच्या जन्मकथेचे मूळ असे आहे. 

"माझे गद्य लिखाण अलीकडे बरेच लोकप्रिय झाले. कुलकर्णी ग्रंथागाराने प्रकाशित केलेले माझे कथासंग्रह फार झपाट्याने खपले. ‘कृष्णाची करंगळी’ आणि ‘मंतरलेले दिवस’ या दोन पुस्तकांवर बऱ्या च समीक्षकांनी संतोषजनक लिहिले. हा संग्रह प्रकाशित करणे त्यामुळेच आवश्यक वाटले. 

"‘थोरल्या पाती’तील साहित्याची निवड माझे परममित्र श्री. पु. भा. भावे यांनी केली. मराठी लघुकथा क्षेत्रातील त्यांचे आजचे स्थान एकमेवाद्वितीय असेच आहे. मी स्वत: भाव्यांच्या प्रतिभेचा भक्त आहे. भावे, जसे थोर साहित्यकार आहेत तसेच मर्मज्ञ रसिक आहेत. त्यांनी माझ्या साहित्यातील ‘चांगले’ निवडले व इतकी मनमोकळी प्रस्तावना लिहून दिली हे मी माझे भाग्य समजतो. 

"भाव्यांच्या आणि माझ्या स्नेहविश्वात आभारांसारखे अनावश्यक उपचार संभवत नाहीत. त्यांचे प्रोत्साहन मी फार महत्त्वाचे मानतो इतकेच. 

"- ग. दि. माडगूळकर 
"‘पंचवटी’ 
"11, पुणे-मुंबई महामार्ग, 
"पुणे 3."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................

August 15, 2021 - August 15, 2021, 2021

"श्री. ग. दि. माडगूळकरांची कुठली कथा मला प्रथम आवडली? मला स्पष्ट आठवते त्यांची ‘सिनेमातला माणूस’ ही कथा मला प्रथम आवडली. त्यांच्या ‘लपलेला ओघ’ ह्या पहिल्याच कथासंग्रहात ही गोष्ट समाविष्ट केलेली आहे. ही गोष्ट मी वाचली आणि मनाशी खूणगाठ बांधली की ह्या लेखकाकडून उत्तम गोष्टींची अपेक्षा करावयास चिंता नाही. उत्तम कथालेखकाला आवश्यक असे अनेक गुण या लेखकाचे ठायी आहेत. ह्या लेखकाची लेखणी सूक्ष्म आहे, उत्कट होऊ शकते, सखोल आहे, रसाळ आहे. ह्या लेखकापाशी स्वत:ची अशी एक भाषाशैली आहे. 

"माडगूळ संस्थानच्या धाकट्या पातीने कथाक्षेत्रात गाजविलेला मोठा पराक्रम मी पाहिला होता. आता प्रत्यक्ष ‘थोरली पातीच’ कथालेखनाच्या रंगणात उतरत होती. ह्या पातीकडूनच थोर कर्तृत्वाची अपेक्षा मी करीत होतो. ‘सिनेमातला माणूस’ आणि ‘वीज’ने माझ्या मनात ही अपेक्षा उत्पन्न केली होती. आणि ही अपेक्षा करीत असतानाच काही शंकाही माझ्या मनात दबा धरून बसल्या होत्या. ‘लपलेला ओघ’मधील एकूण आठ कथांपैकी वर निर्देशिलेल्या केवळ दोनच कथा मला आवडल्या होत्या. उरलेल्या सहा कथा आवडल्या नव्हत्या. त्या कथांत आणि माडगूळकरांच्या कथालेखनात मला अनेक दोष दिसत होते. माडगूळकरांचे प्रमाण चुकते आहे. तंत्र चुकते आहे, म्हणून परिणामही चुकतो आहे, चांगले कथाबीज वाया जाते आहे, असे मला वाटत होते. वस्तुत: कवी माडगूळकरांचे शब्द अगदी फुलांच्या रांगोळीप्रमाणे पडतात पण त्यांच्या गद्यलेखनात शब्दांची निवडही चुकत आहे; असे मला वाटत होते. विलक्षण शब्दकळा अंगी असणाऱ्या माडगूळकरांसारख्या लेखकाकडून चुकीचा शब्द पडतो कसा, ह्याचे मला गूढ वाटे. खेदही वाटत होता. हा खेद मी माडगूळकरांपाशी व्यक्त केला होता. माझे मत मी त्यांना सांगितले होते. मी काही कुणी सर्वज्ञ मनुष्य नाही; पण माझे मत ऐकून माडगूळकर क्षणभर विचारक्रांत झाले व मग एकदम उसळून म्हणाले, ‘ठीक आहे, एक दिवस मी तुमच्याकडून चांगले म्हणवून घेईन.’ माडगूळकरांना चांगले वाईट म्हणण्या-इतकी श्रेष्ठता माझ्या ठिकाणी आहे किंवा काय याविषयी मी बराच साशंक आहे; पण त्या एका वाक्याने माझ्या लक्षात आले की, काही चांगले करण्याची ओढ व ईर्षा ह्या माणसाचे ठिकाणी आहे. आपले आहे ते सारे चांगलेच आहे असे हा बोलपट क्षेत्रातील यशस्वी माणूस मानत नाही. माडगूळकर प्रसंगी किती चांगले लिहू शकतात ते ‘सिनेमातल्या माणसा’ने मला दाखविलेच होते. त्याच आणि त्यापेक्षाही मोठ्या कथांची वाट मी माडगूळकरांकडूनच पाहत होतो.

"ह्या गोष्टीला आज सरासरी बारा वर्षे झाली. ‘कृष्णाची करंगळी’ हा उत्तमोत्तम गोष्टींनी सजलेला माडगूळकरांचा कथासंग्रह प्रकाशात आला. तो संग्रह मी कुठेही न थांबता अथपासून इतिपर्यंत पुण्यात वाचून काढला आणि तडक पंचवटीवर जाऊन माडगूळकरांना सांगितले, “बुवा, हा तुमचा कथासंग्रह फार सुंदर आहे. कुठल्याही उत्तम गोष्टीला तोड देतील इतक्या चांगल्या गोष्टी तुम्ही लिहिल्या आहेत.” 

"त्यावर नटवर्य माडगूळकर मान वाकवून म्हणाले, “स्वामी ! शेवटी माझी तपश्चर्या पूर्ण झाली. मी चांगला कथालेखक झालो.” 

"चांगल्या वाइटाची मूल्ये ओळखणाऱ्या या ईर्षावान माणसाने खरोखर संस्मरणीय गोष्टी लिहून दाखविल्या होत्या.“माडगूळकर नुसते पद्यलेखक आहेत की कवी” हा वाद चालू असतानाच माडगूळकरांच्या बहुरंगी प्रतिभावृक्षावर आणखी एक फूल उमलले होते. ते फूल सुगंधी व सुरंगी कथालेखनाचे होते. उत्तम कवी, उत्तम नट, उत्तम नकलाकार व उत्तम वक्ता असलेला हा कलाकार उत्तम कथाकारही बनला होता. अनेक व्यापांतून वेळ काढून कौतुकास्पद निष्ठेने त्यांनी कथालेखन केले. मोठ्या संख्येने व मोठ्या गुणाने कथालेखन केले. माडगूळकरांचा मोठेपणा कशात आहे? झटकन माडगूळकरांच्या ‘मंतरलेल्या दिवसांत’ला एक मथळा मला आठवतो, ‘अरे, दिवा लावा कोणी तरी...’ मृत्यूच्या अंधेऱ्या पार्श्वभूमीवर शब्दांची पणती फिरते. मृत्यूशय्येवर पडलेल्या एका वृद्धाची सावली बोलकी होते. ती सावली म्हणते, ‘अरे, दिवा लावा कोणी तरी...’ अनंतात विलीन होऊन जाण्यापूर्वी या भूतलावर त्या वृद्धाने उच्चारलेले हे शेवटचे शब्द आहेत. मृत्यूच्या काळोख्या गुहेत प्रवेश करण्यापूर्वी हा वृद्ध जणू एवढ्या अनोख्या वाटचालीसाठी प्रकाश मागत आहे. तो क्षीण स्वरात म्हणत आहे, ‘अरे, दिवा लावा कोणी तरी...’ 

"या चटका देणाऱ्या शब्दांपासूनच मराठीतल्या एका संस्मरणीय शब्दचित्राचा प्रारंभ होतो. हे शब्दचित्र आत्मकथनपर आहे आणि दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही असे मी पाहिले आहे. मर्मावर आघात झाल्याप्रमाणे माणसाने किंकाळी फोडावी, विश्वरूपदर्शन झाल्याप्रमाणे त्याने चकित व्हावे, स्तब्ध व्हावे, अंतर्मुख व्हावे, अशा शक्तीचे हे शब्दचित्र आहे आणि हे विलक्षण अर्थगंभीर चित्र लेखकाने अगदी मोजक्या फटकाऱ्यांत उभे केले आहे. लांबीने हे पुरती साडेपाच पृष्ठे देखील भरत नाही. विषय म्हणाल तर तसा साधा आहे. प्रेम आणि मरण ह्यांनी लेखकांना नेहमीच मोठा आधार दिलेला आहे. पैकी हा प्रसंग मरणाचा आहे. कथानायकाचे वडील मृत्युशय्येवर पडले आहेत, उशापायथ्याशी मुले-माणसे आहेत, गीतापाठ चालू आहे."

" ... वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते. माडगूळकरांपाशी ही दुर्मीळ दृष्टी आहे. ते नुसते आकाशाकडे पाहत नाहीत तर ‘आकाशतत्त्वाकडे’ पाहतात. ह्या तात्विक दृष्टीनेच त्यांना ‘अरे दिवा लावा कोणीतरी’सारखी आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले. ह्याच जातीत बसतील अशा कथा त्यांनी लिहिल्या आहेत. ‘अतर्क्य’ व ‘अधांतरी’ ह्या अशा कथा आहेत. ‘अधांतरी’ची कथा कल्पना अशीच साधी आहे. आणि ह्या साध्या विषयातून त्यांनी असाच मोठा आशय सुचविला आहे. ... "

" ... नागूदेवाचे हे पात्र सामान्यांतले नव्हे. भिक्षुक म्हणजे तो लोभी, लोचट, संकुचित व लुब्रा दाखवावयाचा अशी एक पद्धत आहे. पण नागूदेव हा त्या जातीतला नव्हे. तो तत्त्वासाठी प्राण देणाऱ्या धर्मसूर्यांच्या परंपरेतला मावळता किरण आहे. तो कर्मठ असूनही उदार आहे, प्रेमळ आहे. सुमाचा अक्षम्य अपराध पोटात घालण्याइतका नागूदेव उदार होऊ शकतो; पण नागूदेवासारख्या सत्त्वस्थ ब्राह्मणाच्या सहवासात राहिल्यावरही सुमाचे पाऊल ढळते! तो वात्सल्याने तिचा मुका घेतो. आणि ती बावरते. त्यालाही मग वाटते की आपले चुकले. सूचना फार सूक्ष्म आहेत; पण असे वाटते की, येथूनच तर नियतीची वाटचाल सुरू झाली नसेल? प्रथम निरुपायाने व मग स्वेच्छेने त्या सिंधी डॉक्टरची भक्ष्य बनलेली अजाण सुमन त्या पितृतुल्य चुंबनानंतर तर चळली नसेल? देणाऱ्याने ज्या शुद्ध भावाने जे दिले ते तितक्याच शुद्ध भावाने घेण्याची घेणाऱ्याचीही पात्रता पाहिजे. अगदी अजाणताच सर्वनाशाची एखादी कळ नागूदेवाच्या हातूनच तर दाबली गेली नसेल! आणि ह्या शंकेने माणसाचे मन कापून उठते. वात्सल्याने विरघळलेला कडवा नागूदेव ह्या चुकलेल्या पोरीचे पाप पोटात घालतो. ‘सूर्यपुत्र’ म्हणून तिचे मूल मांडीवर खेळवितो. निपुत्रिक नागूदेवाचा पोलादी कडवेपणा दोन कोवळ्या मुठींनी पार वाकविला आहे. आणि तरीही एखाद्याने ह्या बाटग्या मुलीशी लग्न लावावे ही गोष्ट नागूदेवाला असह्य वाटते. फार सहन करणारा, पाप पोटात घालणारा कर्मठ नागूदेव, इथे मोडून पडतो. ह्या जगात त्याच्यासाठी जागा उरली नाही. सुमाला व तिच्या मुलाला नागूदेवापासून हिरावून बोहोल्यावर त्या कुमारी मातेला उभी करावयास प्रत्यक्ष तिचा जन्मदाता निघाला. इथे नागूदेवाचा धीर संपतो. तो विठ्ठल चरणी विलीन होतो."

" ... हिरव्या रानांतून खळाळत येणाऱ्या निवळशंख निर्झराप्रमाणे माडगूळकरांच्या भाषेचे रूप आहे. इतकी पारदर्शक व स्वच्छ भाषा आज वाचावयास मिळणेही कठीण झाले आहे. ह्याला अपवाद एक धाकट्या पातीचा आठवतो. व एक सौ. वसुंधरा पटवर्धन ह्यांचा आठवतो. असेच आणखी काही अगदी थोडे लेखक असतील की ज्यांना आपल्या माय मराठीच्या शुद्ध स्वरूपाची ओळख आहे."

"‘सुखदेवाची चांदणी पदराखाली निळी पणती घेऊन हळू हळू आभाळात आली’ असे लिहितो कोण? फुटके, तुटके, मोडक्या इंग्रेजीने डागाळलेले बाटगे मराठी लिहिणारेच फार! माडगूळकर इंग्रेजी चांगले बोलतात व वाचतातही; पण घ्यावयाचे तेवढे चांगले ते घ्यावयाचे तेथून अवश्य उचलतात. पण आपला मूळ मराठी शिक्का मात्र मोडणार नाहीत. इंग्रेजीवर घासून त्याला नवा उजाळा देतील. स्वत्व सोडणार नाहीत. परंपरा तोडणार नाहीत. इंग्रेजी पाहिजे तेवढे पचवितील; पण इंग्रेजीला स्वभाषा पचवू देणार नाहीत. कॉपर्ड, बेट्स; जेम्स जॉईस् वाचतील, पण परंपरा ज्ञानेश, मुक्तेश्वर, मुकुंदरायापासून रामजोशी, होनाजी, चिपळूणकर, गडकऱ्यांची राखतील. संत शाहिरांपासून अनेक पूर्वस्मृतींनी मशागत करून ठेवलेल्या भूमीचा संस्कार घेऊनच माडगूळकरांची शब्दकळा फुललेली आहे. शब्द म्हणजे सर्वस्व नव्हे, हे खरे. नुसत्या उत्तमोत्तम शब्दांची चेतनाशून्य उतरंड रचल्याने चांगली कथा निर्माण होत नाही, हेही खरे आहे. परंतु शब्दकळांची अमर्याद हेटाळणी करणाऱ्या अतिवास्तववाद्यांना उलटून असेही विचारता येईल की, शब्दच संपले म्हणजे ललित साहित्याचा सारा संसार संपत नाही का! कथेला ज्याप्रमाणे रसाची व परिणामाची एकात्मकता पाहिजे, तिला पात्रे पाहिजेत, प्रसंग पाहिजेत, रचनेचे काही एक तंत्र पाहिजे, वातावरण पाहिजे, त्याचप्रमाणे तिला शब्दही पाहिजेत. त्या त्या कथेच्या स्वभावाला आवश्यक असे शब्द पाहिजेत. ... "

" ... चार सामान्य मराठी लेखकांपेक्षा माडगूळकरांच्या अनुभवांचे विश्व अधिक मोठे आहे. माणदेशातल्या धूळ मातीपासून, धुंद रजत सृष्टीपर्यंत आयुष्याचे अनेक प्रकार त्यांनी पाहिले आहेत व त्यांविषयी लिहिले आहे. लेखकाचा एक व्यवसाय असा आहे की, जेथे कुठलाही अनुभव वाया म्हणून जात नाही. मग तो अनुभव नर्काचा असे वा स्वर्गाचा असो. नर्कतुल्य दारिद्र्य माडगूळकरांनी पाहिले तेही लेखक म्हणून त्यांच्या कामी आले व चांगले संपन्न आयुष्य आज ते भोगत आहेत; तेही त्यांच्या कामी येत आहे. त्यांच्या कथांत वा व्यक्तिचित्रांत प्रादेशिकतेचे बंधन नाही. ... "

" ... कथाप्रांताच्या पोकळीत धूर फिरत आहे, पाचोळा उडत आहे. अशा अवस्थेत माडगूळकरांची कथा पुन्हा वर येत आहे. कथावाङ्मयाचा वाचकवर्ग सारखा वाढत असता चांगल्या वाइटाची जाण असणाऱ्या गुणी लेखकाने ललित साहित्यातील उत्तमत्वाचा ध्वज उभा ठेवणे आज फार आवश्यक आहे. वस्तुत: जुने आणि नवे, ह्यापेक्षाही उत्तम आणि अधम, भव्य आणि क्षुद्र, सरस आणि नीरस हाच भेद अधिक महत्त्वाचा आहे. जे सरस व उत्तम आहे; ते कधी जुने होत नाही. अशा सरस कथा माडगूळकरांनी लिहिल्या आहेत. त्यांच्याइतके सकस कथालेखन एक सौ. वसुंधरा पटवर्धन ह्यांचा अपवाद वजा जाता, आज क्वचितच कुणी करीत असेल. अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री. माडगूळकर चालवीत आहेत. घटनाप्रधान कथा, मनोविश्लेषणात्मक कथा-व्यक्तिचित्रे, प्रेमकथा, भूतकथा, साऱ्याच आपापल्या परीने चांगल्या असू शकतात. मराठी लघुकथेचा संसार संपन्न करावयास त्या साऱ्यांचीच आवश्यकता आहे. माडगूळकरांच्या कथासाहित्यातून विविध प्रकारच्या पंचवीस कथा येथे मी निवडल्या आहेत. ह्या सर्व कथा अर्थात एकाच तोडीच्या किंवा जातीच्या नाहीत. आजही माडगूळकरांची जमलेली कथा आणि न जमलेली कथा ह्यांच्या गुणांत पडू नये तितके अंतर पडते. त्यांच्यासारख्या लेखकाने अगदी झोपेत लिहूनसुद्धा एक किमान मान सांभाळावयास पाहिजे; ते सांभाळले जात नाही. जेथे मूळ कल्पना चांगली पण (माझ्या मते) हे भान सुटले, त्या कथा मी वगळल्या आहेत. एरवी ‘मुकी कहाणी’सारख्या प्रेमकथेपासून ‘रामा बालिष्टर’सारख्या चुटक्यापर्यंत अनेक ढंगाच्या व जातीच्या, आपापल्या परीने चांगल्या कथा वेचण्याची-वैशिष्ट्याची दृष्टी ठेवली आहे. ह्या कथांच्या वाचनाने मला अमूप आनंद दिलेला आहे. तोच आनंद मिळविण्यासाठी वाचकांनी आता ह्या थोरल्या पातीचे पान उलटावे. 

"- पु. भा. भावे"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 13, 2022 - January 13, 2022. 

" ... काटवनातला तो वड अजून रडतो आहे - अजून पाझरतो आहे. गावकरी म्हणतात, वारकऱ्याच्या मरणाचं दु:ख त्या झाडाच्या बुंध्यातून झरत आहे. वड कुणासाठी रडतो आहे ते कोण सांगणार?"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 12, 2022 - January 12, 2022

"कोण बोलले कुणास ठाऊक? शब्द मात्र मी स्पष्ट ऐकले. सर्वांगावर घाम डंवरला. ते चित्रच बोलले असले पाहिजे."

" ... तो तिला घेऊन कधी कुठे जात नसे; पण त्याचे मित्र सपत्नीक त्याच्याकडे येत असत. खानापानाचे कार्यक्रम अधूनमधून होत असत."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 12, 2022 - January 12, 2022
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
4. मोती 
................................................................................................
................................................................................................

"‘माझ्या बापाची ही तेजस्वी आठवणही हे महाराज लोकांच्या स्वाधीन करणार? यांना स्वत:च्या संपत्तीबद्दल आस्था नाही. इमानी हत्तीचे दात यांना पृथ्वीमोलाचा ऐवज वाटला पाहिजे. ते कुणाला तरी तो स्वत:च्या लहरीसाठी अर्पण करणारे! आणि तोही कुणाला? ज्याचा आमच्याशी काही संबंध नाही अशा एका गोऱ्या माणसाला! माझ्या बापाच्या दातांची ती वस्तू तो उद्या आपल्या देशाला घेऊन जाईल. मग इथे त्याच्या सेवेचं स्मारक काय राहणार? याच्याजवळ काय दुसऱ्या वस्तू नव्हत्या त्याला द्यायला?’"
................................................................................................

"वेडा मोती मेला! 

"पण आश्चर्याची गोष्ट ही की, मरता मरता त्याने तो ताजमहाल मात्र नदीत फेकला होता! 

"वेडा मोती मेला! 

"त्याच्या बापाच्या दातांचा ताजमहाल मात्र त्याने आपल्या मरणापूर्वी अथांग जलदेवीच्या हवाली केला! 

"दुसऱ्या दिवशी खासगी कारभाऱ्यांनी चांदची चौकशी केली. 

"त्याचा कुठेच पत्ता लागला नाही!"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 11, 2022 - January , 2022

"नेम्या माझ्या नात्यातला नाही. गावातला नाही. तो जातीने चतुर्थ जैन. ... "

"कधी तो किर्लोस्करवाडी ते पुणे रेल्वे स्स्त्यावरील स्टेशनांची नामावळीच पाठ म्हणायचा तर कधी ‘दादा दे ना मला अलविंदाशव’ असली एखादी जाहिरातही म्हणून दाखवायचा. वर्तमानपत्रातले उतारेच्या उतारे तोंडपाठ म्हणायचा."

"नेमिनाथाचे लग्न झाले. त्याला पत्नी अतिशय चांगली मिळाली. सत्त्वशील शेतकरी जैन घराण्यातली. चार इंग्रजी बुके शिकलेली. ती वर्षभर आमच्याच घरी होती. धाकट्या जावेने वागावे तशीच ती माझ्या पत्नीशी वागली. आता त्याने बिर्‍हाड केले आहे. माझ्याच बंगल्याच्या औट हौसमध्ये तो राहतो. 

"स्वत:चा मुळीच विचार न करणारा, वेताळासारखा आज इथे आणि उद्या तिथे भटकणारा नेमिनाथ आता स्थिरावला आहे. त्याला अपत्य झाले आहे. माझ्याच मुलांतून ते खेळत असते. बागडत असते. वयाची उणी पुरी तीस वर्षे माझ्या सावलीत वाढलेला नेम्या आता स्वत: सांसारिक झाला आहे. अजूनही त्याची सेवावृत्ती कायम आहे. माझे काही दुखले खुपले की त्याला काम सुचत नाही. त्याची चूल वेगळी आहे, घर वेगळे नाही. रोज सकाळी तो आपल्या बिर्‍हाडात जागा होतो. प्रथम माझ्या बंगल्यात येतो. व्हरांड्यात दोन पायांवर उकिडवा बसून सकाळची वर्तमानपत्रे चाळतो. स्नान उरकले की, आमच्या स्वयंपाकघरात येतो. बाजारातून काय आणायचे, काय नाही ते माझ्या पत्नीला विचारतो. सायकलीवर टांग टाकून मंडईत जातो. मंडई करून आला की, त्याच सायकलीवरून माझ्या, माँटेसरीत शिकणाऱ्या छोट्या मुलीला शाळेत पोचवतो. माझी कामे विचारून घेतो आणि मग आपल्या संसाराच्या सेवेला लागतो."

"नेम्याचे माझे नाते वेगळे आहे. 

"त्या नात्याला नाव नाही. दगडाला देवत्व देणारे संत आणि माणसासारखाच मातीच्या पोटी जन्मलेला दगड, यांच्यातील नात्याला नाव काय ? 

"नेम्याचे आणि माझे तसलेच काही निनावी नाते आहे. 

"तसा तो माझ्या नात्याचा नाही. गोत्यातला नाही - काहीच नाही."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 11, 2022 - January , 2022
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
6. वीज 
................................................................................................
................................................................................................

"“हे असं कसं केलं गं यानं, गीता ?” पाटलांनी विचारले. 

"रडून-रडून डोळे सुजलेली गीता कपाळावर हात मारून अपराधी आवाजात बोलली, “देवाची करणी !”"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 12, 2022 - January 12, 2022
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
7. औंधाचा राजा 
................................................................................................
................................................................................................

" ... त्याचा वेष साधाच होता; पण त्या साधेपणातही राजैश्वर्याची ऐट होती. डोक्याला लाल भडक ब्राह्मणी पगडी, तिच्यावर डौलदार तुरा. अंगात बाराबंदीचा पायघोळ रेशमी अंगरखा, पायात चुणीदार तुमान. बुटापुरताच त्याच्या वेषावर इंग्रजी पोषाखाचा संस्कार होता, एरवी सारा थाट अस्सल मर्‍हाटी. बघणाऱ्याला वाटावे की, राजपुरुष नुकताच पालखीतून उतरला असावा. ... "

"माध्यमिक शिक्षणासाठी मी औंधास, प्रत्यक्ष राजाच्या राजधानीत आलो. राजधानीचा गावही राजाला शोभेसाच होता. लहानसा पण टुमदार. त्या एवढ्याशा गावात हायस्कूल होते. ‘त्र्यंबक कला भुवन’ नावाची एक औद्योगिक शिक्षण संस्था होती. अनंत मनोहर जोशी यांच्यासारखे तपस्वी गायक राजाने जवळ केले होते. त्यांच्याकरवी तो गायन कलेचे विद्यादान करीत होता. राजा स्वत: तर, चित्रकलेचा छांदिष्ट म्हणविण्याइतका प्रेमी होता. औंध संस्थानातील शाळांतून, चित्रकलेचे शिक्षण सक्तीचे होते. राजा कलाप्रेमी होता तसाच धर्मनिष्ठही होता. कीर्तन या उपदेशकांच्या परंपरागत संस्थेवर त्याची प्रगाढ श्रद्धा होती. कीर्तनकाराच्या शिक्षणाची सोयही राजधानीच्या गावी होती. महाराष्ट्रीय थोर थोर कीर्तनकार राजाने पदरी बाळगले होते. त्याचा राजवाडा साधाच होता. लक्ष्मीपेक्षा सरस्वतीचाच संचार त्या प्रासादात आधिक्याने होत होता. राजवाड्याच्या दर्शनी अंगणात सहा ऋतूंचे प्रतीकात्मक पुतळे उभे होते. तर पिछाडीच्या बाजूला मूर्तिकारांनी आपला कारखाना ठेवला होता. माडीवरील एका दालनात अजंठ्यातील चित्रकृतींच्या प्रतिकृती जश्याच्या तश्या चितारल्या होत्या; त्या दालनाचे नावच होते अजंठा हॉल. राजवाड्यातला चित्रसंग्रह खरोखरच अवर्णनीय होता. राजाच्या निद्रागारात पूर्ण नलोपाख्यान तसबिरींच्या रूपाने लटकत होते; तर एखादे दालन गजगौरीच्या चित्रकथेने सुशोभित झाले होते. भारतातील सर्व नामांकित चित्रकारांच्या कलाकृती त्या राजवाड्यात होत्या. भिवा सुताराच्या रामपंचायतनापासून, कोट्याळकरांच्या तांडवनृत्यापर्यंत वेगवेगळ्या कलाकृती दालनादालनांतून लटकविलेल्या होत्या. राजा तसा विद्याविभूषित होता. डेक्कन कॉलेजात त्याचे शिक्षण झाले होते. बी.ए.ची उपाधी त्याने मिळवली होती. पुस्तक संग्रहाइतकाच त्याचा वाद्यसंग्रह त्याच्या चोखंदळपणाची साक्ष देत होता. साऱ्याच कलांना त्याच्या लेखी आदराचे स्थान होते. राजाचे कलाप्रेम हे त्याच्या ऐषआरामाचे द्योतक नव्हते. कलावंताच्या जबाबदारीची त्याला जाण होती. मोठमोठे शास्त्रीय गायक कर्‍हाड देवीपुढे कीर्तनाला उभे राहत होते. कलेचे हात संस्कृतिवर्धनासाठी राबत होते. राजाची देवावर निष्ठा होती. धर्मावर श्रद्धा होती. गीर्वाण भाषेतील साहित्यावर तो जणू लुब्ध होता. त्याच्या ह्या सर्व आवडी-निवडी त्याच्या निवासस्थानात साकारलेल्या दिसत होत्या."

" ... भूत आणि वर्तमानापेक्षा भविष्याबद्दल तो अधिक जागरूक होता. विद्यार्थ्यांच्यासाठी त्याने अनेक सोयी केल्या होत्या. प्राथमिक शिक्षणाला कुठेच शुल्क नव्हते. माध्यमिक शिक्षणाची फी होती केवळ दोन आणे. औंधात तर विद्यार्थ्यांच्यासाठी फ्री बोर्डिंग होते. अत्यंत अल्प भाड्याची वसतिगृहे होती. त्या वसतिगृहांतील खोलीचे भाडेदेखील केवळ सहा आणे मासिक. मी पंचवटी नावाच्या वसतिगृहात राहत होतो. फ्री बोर्डिंगातील अन्नावर निर्वाह चालला होता. जगदंबेच्या नैवेद्याइतकेच राजाचे लक्ष विद्यार्थ्यांसाठी शिजवल्या गेलेल्या अन्नाकडे असे. विद्यार्थ्यांसाठी त्याने सर्व सुखसोयी तर केल्या होत्याच; पण त्यांच्यावर कसलाही कुसंस्कार घडू नये याचीही काळजी त्याने कटाक्षाने घेतली होती. औंध गावात कुठेही एक कपभर चहा विकत मिळत नव्हता. एकही सिनेमागृह नव्हते. कधीमधी राजाच एखादा सिनेमा विद्यार्थ्यांना दाखवी. तो कार्यक्रम जगदंबेच्या देवळात व्हायचा. परदेशात छोटे-छोटे शास्त्रविषयक बोलपट निर्माण होत असत. राजा ते मागवून घेई आणि राजकुटुंबीय मुलांबरोबर सर्व शाळकरी मुलांना दाखवी. कधी कधी राजा दूरच्या प्रवासाला जाई. त्या प्रवासाचे चलत्चित्रपट तयार करवी आणि तेही जगदंबेच्या मंदिरात आम्हांला दाखवी. चलत्चित्रपटाची सर्व साधनसामग्री तेवढ्यासाठी त्याने खरेदी केली होती. चित्रपट घेणारे कारागीर पदरी बाळगले होते."

"बेचाळीसच्या लढ्यात सातारच्या क्रांतिकारकांना आसरा मिळाला तो औंध संस्थानातच. त्याला इंग्रजांचे राज्य कधीच आवडत नव्हते. त्याची निष्ठा होती छत्रपती शिवाजी महाराजांवर. तो स्वत: कीर्तन करी, त्या कीर्तनाची सर्व कथानके त्याने शिवचरित्रावरून गुंफली होती. स्वावलंबनाचा उपदेश तर तो आपल्या प्रजाजनांना सदैवच करीत असे. बलोपासना हा तर त्याच्या प्रगाढ निष्ठेचा विषय होता. त्याने आयुष्यभर कधीही परदेशी कपडा वापरला नाही. परदेशी वस्तू वापरली नाही. परदेशी वस्तूविरुद्ध तो एका सभेत बोलत असताना त्याच्याच - शिक्षणाने सुजाण झालेल्या - एका नागरिकाने त्याला खडसावून विचारले होते - ‘मग महाराज, मोटर कशी वापरता?’ अमोघ वक्तृत्वाबद्दल प्रसिद्ध असलेल्या राजाची जीभ त्या प्रसंगी चाचरली होती. त्याचे डोळे गहिवरले होते. साद गहिवरला होता. त्या प्रजाजनाला त्याने उत्तर दिले होते... “माझ्या संस्थानचा मुलूख इतस्तत: पसरलेला आहे. एक तालुका सोलापूरजवळ तर दुसरा विजापूर हद्दीत. वेगवान वाहन नसेल तर माझ्या संस्थानच्या प्रत्येक खेड्यात जाणे मला अशक्य होईल. पुन: पुन्हा माझ्या प्रजाजनांची गाठ पडणार नाही. नाइलाजाने मी हे परदेशी वाहन वापरत आहे. यंत्रे आणि औषधे या बाबतींत आपण दुबळे आहोत. त्या बाबतीतही हा देश स्वावलंबी झाल्याचे पाहण्यास परमेश्वराने आम्हांला आयुष्य द्यावे.”"

"परवा, ‘दो आँखे बारह हाथ’ या मी लिहिलेल्या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले. त्या चित्रपटाची कथा मला औंध संस्थानच्या परिसरात सुचली होती. औंधच्या राजानेच तो अद्भुत प्रयोग करून पाहिला होता. ‘मॉरिस फ्रीडमन’ नावाच्या एका पोलिश तरुणाच्या सूचनेवरून गुन्हेगारांना उघड्या वस्तीत ठेवण्याचा प्रयोग औंधकरांनी केला होता. ती संस्था अल्पशेष अवस्थेत अजून आहे. माझ्या गावाजवळच आहे. तिथल्या खुनी कैद्यांनी मला सांगितले होते, ‘बेड्या काढताना राजाने आम्हांला जगदंबेसमोर नेऊन, शपथा घेववल्या होत्या!’ माझ्या या चित्रपटात, या देवाच्याच धाकाचा उपयोग केला होता. माझ्या उद्योगाला राजाचे साहाय्य अशा तऱ्हेने झाले. राजाच्या हयातीनंतर झाले. 

:‘दो आँखे बारह हाथ’च्या यशाचे अभिनंदन करणारे एक पत्र मला आले. ते औंधाच्या राजाचे थोरले चिरंजीव बॅ. अप्पासाहेब पंत यांनी सिक्कीमहून लिहिले होते. त्यांनी लिहिले होते... 

:‘-तुझे अभिनंदन करू की कौतक! गुन्हेगारांना माणुसकीने वागविण्याचा हा प्रयोग माझ्याच एका मित्राच्या सांगण्यावरून बाबांनी केला होता. आज बाबा असते तर...’ 

:पुढची अक्षरे मला वाचवेनात. कितीतरी वेळ डोळे नुसते गळतच राहिले."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 12, 2022 - January 12, 2022
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
8. मद्यालयाची वाट 
................................................................................................
................................................................................................

" ... जिथं जिथं भरोसा ठेवला तिथं तिथं धोका वाट्याला आला. मी काय करू ? मी परवडत नाही तरीही एक गोष्ट करीत राहतो - दारू पितो. दारू पितो. सारं पुसत नाही हिनं. पण पुसटतं - फिक्कं पडतं म्हणून पितो... मी दारुड्या नाही. दारुड्या नाही.”"

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 12, 2022 - January 12, 2022
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
9. वय 
................................................................................................
................................................................................................

"आपल्या चुलत सासऱ्याच्या बकासुरीपणाची गोष्ट रामाच्या सुनेने खुलवून खुलवून सगळ्यांना सांगितली. दुपारच्या जेवणासाठी तो वाड्यावर आला नाही, त्याचे जेवण घेऊन मळ्यातल्या वस्तीकडे कोणीही गेले नाही; हे मात्र तिला आठवलेदेखील नाही."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 12, 2022 - January 12, 2022. 

"“माझ्या दैवी काशी नाही, गंगा नाही. मी पापिणी आहे. काशीच्या वाटेवर पाप पाहिले. दिगंबर... दिगंबर... आणि... प्रयागा...!”

"ते तृप्त झाले होते. त्यांची काळजी मिटली होती. देवाच्या काळजीने काळवंडलेल्या त्या माणसाची मुद्रा आज देवासारखी दिसत होती."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 12, 2022 - January 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
12. रामा बालिष्टर 
................................................................................................
................................................................................................

"अण्णा पुढे होत म्हणाला, “काय रे रामा, आमच्या गोविंदाला काय सांगितलंस?” 

"रामा निर्लज्जपणानं हसला आणि म्हणाला, “उगं एक चुटका सांगितला. म्हनलं बगू आपल्याला जमतंय का त्येंच्यागत. पर आमची गोष्ट छोपणार कोण?” 

"अण्णाच्या मागे उभा राहून तो रामा बालिष्टरला कोपरापासून हात जोडले."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 12, 2022 - January 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
13. गावरान शेंग 
................................................................................................
................................................................................................

"कमळीला पैसे मिळाले होते. तिला आनंद झाला होता, पण त्या आनंदाला कसली तरी कळ दुखवीत होती. ती कसली कळ होती ते कमळीला कळत नव्हते. मुळीच कळत नव्हते. आपण कितीही धावलो तरी पडणार नाही असे मात्र तिला वाटत होते. तिला कसला तरी आधार मिळाला होता. नोटा मुठीत दाबून ती घराच्या दिशेने धावल्यासारखी चालत होती. शहरातल्या अंधारावर दिवे डोळे मिचकावीत होते."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 12, 2022 - January 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
14. वसुली 
................................................................................................
................................................................................................

" ... दादा गडबोल्याची खोडकी मोडली याचा आनंद महादूच्या मरणाच्या दु:खापेक्षा फारच अधिक होता. कुणी दादाच्या जुलमाच्या कहाण्या सांगत होते. महादू दादाच्या घरी किती कप “च्या” प्यायचा, त्याचा हिशेब सांगत होते. बस्स, हीच चर्चा चालली होती. गोष्ट अशी होती. दादा गडबोल्याकडनं महादू बकूनं साडेतीनशे रुपये व्याजी काढले होते आणि त्यांतली एक कवडीदेखील दादाला न देता तो पुटकन गेला होता. ... "

"महादु बकू मेला तरी दादाचा पैसा बुडला नाही. त्यानं पाचशे रुपये जमा करून घेतले. आता द्यानू धनगराला पुढं करून महादूनं बुडवलेली रक्कम वर्गणी करून दादाला परत करण्याचा विचार एक म्हातारा धनगर पुन: पुन: उकरून काढतो आहे. कोणीही धनगर अजून त्याला स्पष्ट नकार देत नाही. दादा त्या विषयात मुळीच लक्ष घालीत नाही. ग्रामविकास योजनेत “पिंपळगावला” एक वाचनालय मिळावं, असा दादाचा प्रयत्न चालू आहे; तो स्वत: या योजनेला आपले 101 रुपये देणार आहे आणि वाचनालयाला “महादू बकू”चं नाव द्यावं, अशी त्याची गंभीर सूचना आहे."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 12, 2022 - January 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
15. नागूदेव 
................................................................................................
................................................................................................

" ... नमस्कारासाठी भूमीवर पसरलेले शरीर परत उभे राहिले नाही. ते लाकडाच्या ओंढ्यासारखे निश्चल झाले."

" ... गणपतीपुढचा नंदादीप क्षीण झाला असल्याची त्याला शंका येते. दुकानाच्या मालासाठी आणलेले साजूक तूपच तो समईत ओततो. मुळाशी काजळीने काळवंडलेली वात तुपामुळे उजळपणे तेवत राहते. त्या वातीचा उजेड मामांच्या तैलचित्राला उजळीत राहतो."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 12, 2022 - January 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
17. शेवटचा दिवस गोड व्हावा 
................................................................................................
................................................................................................

"तात्याची इच्छा अशी पुरी झाली. त्यांना मंत्राग्नी मिळाला, कुणी म्हणतात चितेवर ठेवल्यावर तात्यांच्या प्रेताने हालचाल केली म्हणून. खरे खोटे देव जाणे. तात्यांना कुत्र्याचे मरण आले नाही. त्यांचा देह अग्निदेवतेने शुद्ध केला. शेवटचा दिवस गोड झाला."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 12, 2022 - January 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
18. अधांतरी 
................................................................................................
................................................................................................

"“माझी एक मुलगी आहे. लहानशी चार वर्षांची. मोठी गोड आहे. कॉन्व्हेंटमध्ये जाते ती. तिचं गाणं आहे हे. आज सकाळी, सकाळीच मला तिची आठवण झाली. तिचं गाणं आठवलं. तिचे हावभाव आठवले आणि...” त्यांचे डोळे पुन: पाणावले. तेवढ्यात कॉफी आली. मराठ्यांनीच कॉफी ओतली. त्या मद्रासी कॉफीचे काळे करंद घुटके घेता घेता आम्ही बोलू लागलो."

"कुणाच्या भाषेला नावे ठेवू नयेत, पण तीन-चार दिवसांतच मला त्या धसमुसळ्या तमीळ स्वराचा कंटाळा आला होता. तिथल्या अन्नाचे आणि माझे तर मुळीच जमत नव्हते. सांभारसादं, तैर-सादं आणि रस-सादम्. घनपाठ्यांच्या म्हणण्यासारखीच ती एकाच भाताची बेचव नावे माझ्या पोटाच्या कानठळ्या बसवीत होते. मराठे गेली तीन वर्षे तिथे राहत होती. त्यांनी तिथल्या आचाऱ्यांना कसे फितवले होते कोण जाणे, त्यांच्यासाठी ते ‘बाँबे मील’ तयार करीत होते. ते साडेनऊला परत येत. एकटेच जेवत."

"तार वाचली आणि ते कपाट धरून मटकन खुर्चीत बसले. 

"माझा हात थांबला. 

"“काय झालं? कुठली तार?” 

"त्यांनी तारेचा कागद माझ्या हाती दिला. मी अधीरपणे वाचली. 

"“मीना बसखाली सापडली. अत्यवस्थ, लवकर या. 

"- सुलभा”"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 12, 2022 - January 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
19. सिनेमातला माणूस 
................................................................................................
................................................................................................

"“काशीनाथ-” 

"मी थांबलो. 

"“अन्नाची भ्रांत झाली आहे. कर्जे फार झालीत. तुझ्याकडे येणार होतो मागायला. पण मन धजेना - म्हटलं, हिला पाठवावी. हिला दिले असतेस तू...!” 

"मी मागे वळून पाहिले. त्याची बायको हसली. तीसुद्धा पान खायला शिकली असावी... आणि... 

"“हिला दिले असतेस तू... हो... तू सिनेमातला माणूस... तेव्हा...” 

"त्याने आपल्या दोन्ही हातांत कसल्या तरी अदृश्य ओझ्याची चाळवाचाळव केली. बोटे दुमडली... विलक्षण दृष्टीने माझ्याकडे पाहिले... आणि तो हसला. छे:ऽ! भयंकर... असह्य... मला क्षणही थांबवले नाही... दारिद्य्राने एवढा अध:पात होतो ? - होत असेलही. मागे वळून न पाहता मी तिथून निसटलो. आणखीन एक क्षण थांबलो असतो तर मला भोवळ आली असती."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 12, 2022 - January 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
20. वेडा पारिजात 
................................................................................................
................................................................................................

"तात्या मागच्या व्हरांड्यातील चौपायीवर बसले होते. एकटक कुठेतरी पाहत होते. कशालासा मी मागीलदारी गेलो. त्यांची दृष्टी स्थिरावल्याचे पाहून मी विचारले, 

"“काय बघता हो तात्या?” 

"“वेडंच आहे बेट!” तात्या हसल्यागत करून म्हणाले. “कोण ?” 

"“ते पारिजातकाचं रोपटं.” 

"“पारिजातकाचं रोप वेडं आहे?” 

"“तर काय? आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवलं आहे हे त्याला कळलंच नाही. तिथेही वाढीला लागलंय! बघ कसं फुललंय! जाणतं झाड असं वाढत नाही. हे वेडंच आहे वेडं!”"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 12, 2022 - January 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
21. उबळ 
................................................................................................
................................................................................................

" ... ‘पेपर्स’ काय म्हणतात?" 

"“एक त्या ‘लुकिंग ग्लास’नं तेवढ वाईट लिहिलंय!” 

"“तो मद्रासी अय्या? त्याला काय कळतंय माती! जाहिरात बंद करा लेकाची. आपोआप येतोय सरळ! 

"गुजराथी निर्माता परत गेला आणि फूल धरावे, इतक्या हळुवारपणे तो चेक चिमटीत धरून नानासाहेब आत वळले. 

"“केशव, आज दुपारी हा चेक बँक ऑफ इंडियात भर आणि येता येता गोडबोले कॉन्ट्रॅक्टरना सांग मी बोलावलंय म्हणून. मागच्या गच्चीवर माडी बांधून टाकू!”"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 12, 2022 - January 12, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
22. माझा यवन मित्र 
................................................................................................
................................................................................................

" ... मी लिहीन ती कथा त्यानेच दिग्दर्शित करावी असे ठरले होते. त्याने मला काही ‘कथाबीजे’ थोडक्यात सांगण्याची विनंती केली. संस्कृत शब्दांच्या कुबड्या घेऊन माझी लंगडी रसवंती हिंदीच्या मैदानात नाचू लागली. त्या यवनोत्तमाच्या मुद्रेवर रसिकासारखे भाव उमटू लागले, तेव्हा मला आश्चर्य वाटले! मी सांगितलेली कथाबीजे अर्थातच ज्वारी-बाजरी जातीतली होती. त्यांची पैदास खास मराठी पद्धतीची होती. त्यांची चव त्याला कळाली हे काही केल्या मला खरे वाटेना! न राहवून, मी त्याला तसे बोलून दाखवले. तो थोडासा हसला. एकच वाक्य बोलला- “प्रभातका ग्यानेश्वर देखकर मैं फूट फूटकर रोया था!”

"नक़वीचे आणि माझे दोघांचेही नशीब घोड्याच्या अवलादीचे ठरले! सहा-सात महिने गेले तरी आमचे चित्र सुरू झाले नाही. नक़वी मला आणि त्या कथेला घेऊन अनेक निर्मात्यांना भेटला; पण कुठेच पान चिकटले नाही. निराशेच्या प्रसंगीही त्यांची विनोदबुद्धी जागृत असे. केलेले सारे काम वाया जाणार आहे, याची जाण येऊनदेखील तो मला म्हणाला, “एक मुस्लिमांतला सय्यद दुसरा हिंदूंतील ब्राह्मण या दोन पवित्र महात्म्यांनी निर्माण केलेली ही कलाकृती पापी सिनेमावाल्यांना पचणार कशी?” 

"त्याच्या या अद्भुत कार्यकारण निदानाने माझ्या उदासीनतेच्या चेहऱ्यावरही थोडे स्मित झळकल्यावाचून राहिले नाही. मलाही नक़वीसारखी अवघड वेळी विनोद करण्याची बुद्धी झाली. नक़वीच्या घरच्या एका नोकराची नक़वीच्या हातगुणांवर फार श्रद्धा होती. नक़वी ‘सय्यद’ असल्यामुळे त्याच्या केवळ हस्तस्पर्शाने देखील रोग बरे होतात, असा त्या नोकराचा विश्वास होता. त्या गोष्टीची आठवण येऊन मी नक़वीला म्हणालो, “काही केल्याने ताकाला तूर लागत नाही - सय्यद अब हमारे सरपर हात रखो!” 

"माझ्याइतक्याच शांतपणे नक़वी उत्तरला, “ब्राह्मण, अब हमारे सरपर पैर रखो!”"

"माझ्या घरापुढील बागेत गीतेचे तत्त्वज्ञान आस्थेवाईकपणे ऐकून घेणारा नक़वी, मला फुले आणून देणारा नक़वी, कोल्हापूरच्या अंबाबाईला हात जोडणारा नक़वी, शिवाजीच्या चरित्राने भारून गेलेला नक़वी, माझ्या मुलांची दृष्ट काढायला सांगणारा नकवी, पाकिस्तानात पळून जाईल? त्रिवार अशक्य! नुकतीच कोठल्यातरी वृत्तपत्रात मी बातमी वाचली : नज्म नक़वी यांनी दिग्दर्शित केलेला व लिहिलेला ‘कुँवारी बेवा’ बोलपट कराची येथे प्रकाशित झाला. 

"ही ‘कुँवारी बेवा’ म्हणजे माझी ‘सफेद झूट’च याबद्दल मला शंका राहिली नाही. पण नक़वी? तो मला कळलाच नाही. की थोड्या काळात तो फार बदलून गेला? काय झाले काय? हिंदु-मुसलमान या दोन्ही धर्मातील महान तत्त्वांवर सारखाच फिदा असणारा, हिंदी-मराठीतील काव्यांचे सारख्याच रसज्ञतेने रसग्रहण करणारा समतोल मनाचा रसिक एकाएकी बदलला कसा? त्याला लागलेले सत्प्रवृत्तीचे व्यसन सुटले कसे? माझ्या बैठकीत तासन् तास बसून सद्विचार पिणारा, पाजणारा तो मानवतावादी माणूस गेला कुठे ?"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 12, 2022 - January , 2022

"एकदम सोसाट्याचा वारा यावा तशी एक लोकलगाडी मुंबईच्या बाजूने दणाणत आली. गोपीला ते कळले नाही. किशीला ते उमगले नाही. डोळ्याचे पाते लवते ना लवते एवढ्यात लोकलच्या मस्तकाने गोपीच्या शरीराला हुंदाडा मारला. किशी जोरात किंचाळली. गाडी त्याच गतीने पुढे निघून गेली. एका सुकुमार तरुण देहाचे छिन्नविच्छिन्न तुकडे झाले. ऊन ऊन रक्ताच्या शिंतोड्यांनी थंडगार लोखंड भिजून निघाले. चाळीतल्या लोकांना गोपीनाथाविषयी फारशी माहिती नव्हती. तो पंजाबी होता की युक्तप्रांतीय हेही त्यांना नेमके माहीत नव्हते. मुरली त्याला फक्त नावाने ओळखत होता. त्याचे मरण दृष्टीने पाहिल्यामुळे आपल्या बहिणीने अंथरूण धरले, एवढेच त्याला कळले. त्यापेक्षा अधिक कुणाला आणि काहीच कळले नाही. मुरलीची तरणीताठी बहीण त्या आजारात गेली तेव्हा विमनस्क झालेला मुरली हताशपणाने म्हणाला, 

"‘त्या खेड्यातल्या पाखराला मुंबई मानवली नाही.’ किशी-गोपीनाथची मुकी प्रेमकहाणी मुकीच राहिली. 

"चाळीतल्या भिंतींना आणि खिडक्यांना सारे माहीत आहे, पण त्यांनाही वाचा नाही."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 13, 2022 - January 13, 2022

"1935 साली माझ्या वडिलांची बदली या गावी झाली. मी औंधाला शिकायला होतो. आमच्या घरची बाकीची सारी माणसे खेड्यावर होती. वडील एकटेच किन्हईला गेले होते. तेथून त्यांचे मला पत्र आले. औंधाहून किन्हई जवळ आहे. सुट्टी पडली तर इकडे ये. 

"मी सुट्टी पडण्याची वाट बघितली नाही. सुट्टी काढली आणि किन्हईला निघालो. रहिमतपूर, कोरेगाव आणि सातारा रोड, फक्त तीन स्टेशनांचा प्रवास; पण मी रात्रीच्या गाडीनं निघालो."

"चांदण्या मोजीत अंगणात झोपण्याचा परिपाठ मला लहानपणापासून पडला होता. घोंगडीला पाठ लागल्याबरोबर मला गाढ झोप लागली. 

"जागा झालो तो कुणी तरी हलवून जागे केले म्हणून. मला हलवून जागे करणारा तो माझ्या अर्थातच ओळखीचा नव्हता. त्याच्या हलविण्याने आणि हाका मारण्याने मी जागा झालो. “कुठं जाणार?” मला जागविणाऱ्याने, मी जागा झाल्यावर मला विचारले.

"“किन्हई,” मी म्हणालो. 

"“मग चला तर, मी निघालोय,” तो म्हणाला. 

"“मी चालत जाणार आहे...!” मी खरे ते सांगितले. 

"“अन् मला कुठं पायशिक्कल दिलंय सरकारनं. चला. जाऊ बोलत. तांबडं मावळलंय !!”"

"बोलता बोलता मी आणि आबा नांदगिरी गावात आलो. इकडची गावे आमच्या माणदेशातील गावांसारखी उघडी बोडकी नव्हती. गोंडेदार हिरव्या कुंच्या घालून बसलेल्या, गौरीपुढच्या बाळांसारखी ती लोभस होती. 

"डाव्या बाजूला असलेल्या एका डेरेदार डोंगराकडे हात करीत आबा म्हणाला, “ह्यो बघ नांदगिरीचा किल्ला; तुझ्या बुकात आला असंल !!” बुकातला नांदगिरी किल्ला माझ्या मुळीच ध्यानात राहिला नव्हता. आबानं अनाहूतपणे माहिती सांगितली ती मात्र मी लक्षात ठेवली. 

"“वर एक मोठं टाकं आहे, त्यात विंचवागत गार पाणी बारमहा भरलेलं असतं. टाक्याच्या आत अंधार असतो. त्या अंधारातनं पाणी कापीत आत गेल्यावर एक दत्ताची मूर्त लागते. मोठं जागृत स्थान आहे !!”"

"किन्हई गावाच्या आसपास हिरवी रुखावळ इतकी दाटली होती की, गावात आले तरी गाव आला आहे असे वाटले नाही. एक सुंदर बगिचा आणि त्याच्या मध्यभागी टुमदार कौलारू बंगली लागली तेव्हा मी आबाला विचारले, 

"“आबा हे काय?” 

"“लायब्री बंगला!” आबा म्हणाला. 

"“एवढे मोठे आहे गाव - लायब्ररी असण्याएवढे?” 

"“पूर्वी पंत सरकार गावात र्‍हात होत तवाच्या बागा-इमारती ह्या. आता काय नाही,” आबाने उत्तर दिले."

" ... औंधकर संस्थानिक त्या गावात पूर्वी वस्ती करीत होते. आता ते येथे नाहीत. गाव आणि नाव तेवढे राहिले, “पंताची किन्हई” इतके मी जाणले.

"त्या गावात आल्यावर तर मला कुठल्या तरी बागेत आल्यासारखे वाटले. गावच्या गल्ल्या, अन्य खेड्यांतील गल्ल्यांसारख्या निरुंदच होत्या; पण त्या प्रत्येक गल्लीतून पवित्र असा सुगंध येत होता. ते गौडबंगाल मला काही केल्या कळेना. त्या सुगंधाने मी अगदी भारावून गेलो. पोलीसठाण्याजवळ आल्यावर आबा थांबला आणि मला उद्देशून म्हणाला, “हे पोलीसठाणं. हवालदार असतील त्यांना इचार. ते नेतील तुला बापाकडे !”"

" ... एका गल्लीच्या कोपऱ्यावर आलेल्या त्या षट्‌कोणी इमारतीकडे जाताना माझ्या पायांचा वेग मंदावला. गावातली प्रत्येक गल्ली सुगंधाने भारलेली आणि पोलीस ठाण्याची इमारत षट्‌कोणी, मंगळुरी कौलांची. मला माहीत नव्हते की, या रांगड्या महाराष्ट्रात कुठे असली अद्भुत खेडी आहेत."

"वाड्याकडे जायला म्हणून वळलो. पुन्हा सुगंधाचा एवढा जोरदार झोत आला की, मी त्या सुगंधाने गुदमरलो. आता मात्र माझ्याने राहवेना. मी त्या पोलीस हवालदाराला विचारले, 

"“एवढा सुगंध कसला येतो आहे हो या गावात?” 

"“या गावात उदबत्त्यांचे वीस-पंचवीस कारखाने आहेत,” पोलिस हवालदार म्हणाले. 

"केवढा भाग्यवान गाव. गावात उद्योग आहे तो देखील सुगंध निर्माण करण्याचा. कातडी कमावण्याचा धंदा एखाद्या गावाच्या नशिबी आला तर गाव दुर्गंधीने कोंदून जायचा. किन्हईचे तसे नव्हते. तिथे अष्टौप्रहर सुगंध दरवळला होता."

" ... वाड्यात आणखी कुणी नव्हते. वडिलांनी मला सारी इमारत फिरून दाखविली. मागचा पुढचा चौक, माडीवरची दालने, त्या दालनांतील नामांकित चित्रकारांच्या हातच्या तसबिरी, भिंतीतील चोरखोल्या. राजवाडाच होता तो. त्याच्या नुसत्या दर्शनाने माझा जीव सुखावला. वाड्याच्या समोरच्या प्रांगणातील निशिगंधाची बाग पाहून तर मी वेडाच झालो. निशिगंधाचे एक फूल मिळाले तरी मी उल्हसित होत असे. मग इथे तर पुरा बगिचाच निशिगंधाच्या फुलांनी लहडलेला होता! असल्या वाड्यात न राहता औंधचे राजे त्या औंधाला का राहतात तेच मला कळेना.

"वाड्याच्या मागच्या दरवाजात आल्यावर तर मला आणखी सुंदर दृश्य दिसले. तो वाडा नदीकाठावर वसलेला होता. वाड्याच्या पिछाडीला लागून नदीचा घाट होता. घाटावर मोठमोठे वटवृक्ष होते. त्या वडांच्या गाढ सावलीत एक टुमदार मंदिर होते. त्या मंदिराच्या कोरीव दगडाच्या पायऱ्या नदीच्या निवळशंख धारेपर्यंत पोचलेल्या होत्या. 

"“दादा, हे मंदिर कशाचे ?” मी वडिलांना विचारले. 

"“एकवीरेश्वर!” ते म्हणाले. 

"त्या देवाचे नाव देखील मला आवडले. एकवीरेश्वराचे मंदिर, पलीकडे नदी आणि नदीच्या पलीकडे परत गाव. नदीची धार गावांच्या मधून गेलेली. पैलतीरावर आणखी संपन्न बाग डंवरलेली. त्याच्या पलीकडे गावची प्रमुख बाजारपेठ आणि त्याच्या पलीकडे औंधकर संस्थानिकांची कुलस्वामिनी - तिचे मंदिर, तेही एका छोटेखानी टेकडीवर. दगडी बांधणीचे, त्याला तळापासून वरपर्यंत पायऱ्या. 

"वडिलांनी गावची रचना सांगितली आणि मी अगदी त्या गावाच्या प्रेमात पडलो. त्या गावातून नुसते भटकत राहावे असे मला वाटू लागले."

" ... किन्हईतली संध्याकाळ तर मी जन्मात विसरणार नाही. थंडगार वाऱ्याच्या झुळका, निवळ निळ्या आकाशात परतणाऱ्या पाखरांची भिरी, वडाच्या मायेवरील चिमण्यांचा गोड गोंधळ, चहू दिशांनी येणारा आल्हाददायक सुगंध, गायीगुरांच्या हंबरण्याचे आवाज, एकवीरेश्वराच्या देवळातील घंटांचे मंजूळ नाद आणि कुठून तरी ऐकू येत असलेली एका विलक्षण पद्धतीने, गद्यप्राय शैलीने गायली जाणारी मोरोपंत कवीची केकावली-"

"ती केकावली गाणारी व्यक्ती कवी मोरोपंतांच्या रक्ताची होती. ते त्या महाकवीचेच वंशज होते. रामकृष्ण दत्तात्रय पंत पराडकर. पंतांनी या टुमदार खेड्यातच कायम वास्तव्य केले होते. गावातील एकवीरेश्वराचे देऊळ, औंधकर संस्थानिकांनी त्यांना दिले होते. त्या देवळात त्यांनी आपला ‘सुगंधशाळा’ नावाचा उदबत्त्यांचा कारखाना चालविला होता."

" ... मंदिरात आणि धर्मकार्यात वापरल्या जाणाऱ्या उदबत्त्यांची निर्मिती करणारा पंत पराडकरांचा कारखाना, केवळ अस्पृश्य लोकांकडून चालविला जात होता. उदबत्त्यांची कृती पंत पराडकरांना कुणा सिद्धपुरुषाकडून मिळाली होती. पंतांचा एक तरुण भाचा, कुरळ्या दाढी मिशांचे जंगल घेऊन त्या कारखान्यात काम करीत होता; पण त्यांचे वेड होते योगसाधना. पंतांनी आपल्या अपत्यांची नावे मोठी काव्यात्म ठेवली होती. त्यांच्या मुलींची नावे होती : आर्या आणि केकावली. पंतांनी सारे पंतवाङ्मय प्रकाशित केले होते. लोकसंग्रह नावाचा कारखानाही पूर्वी चालविला होता. टिळककालीन राजकारणाशी त्यांचा संबंध होता. त्यांच्याजवळ वीर सावरकरांच्या प्रक्षिप्त ग्रंथांच्या प्रती जपून ठेवलेल्या होत्या."

" ... वाड्यात एक लिमये मास्तर राहत होते. त्यांचा मुलगा गोरेगावाला गवळ्याचा धंदा करीत होता. जातीने कोकणस्थ ब्राह्मण असून त्या मुलाने असा स्वतंत्र व्यवसाय आरंभला होता. तो दर महिन्याला बापाकडे पैसे पाठवीत होता आणि लिमये मास्तर जुन्या राजवाड्यातील जागा खरेदी करून त्यावर दुमजली घर बांधणार होते. 

"जुन्या राजवाड्यात कुणी डॉक्टर पाटणकर राहत होते. त्यांनाही औंधकर पंतांनी आश्रय दिला होता. आयुर्वेद विषयीचा त्या माणसाचा गाढा व्यासंग होता. ‘सुवर्णराजवंगेश्वर’ ही त्यांची औषधी देशभर प्रसिद्ध होती. 

"नदीकाठावरच्या एका वाड्यात एक कुटुंब राहत होते. त्यांची मुले अत्यंत हुशार होती. थोरला मुलगा अण्णा, पराडकरांच्या सुगंधशाळेत व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. तो म्हणे उत्तम नट होता. गावात नाटके बसविण्याची त्याला फार हौस होती."

" ... ती मंडळी औंधकर सरकारांच्या आश्रयाने तिथे आली होती. औंधकर औंधाला निघून गेले होते आणि आश्रितांनी वाड्यात कायमचा तळ ठोकला होता. या पठ्ठ्याने या गावात नवीन आलेल्या माझ्या वडिलांनादेखील नवे नाव ठेवले होते : खुडखुडदास! 

"राजवाड्याशेजारी एक पडका वाडा होता. तो म्हणे विमाप्रसिद्ध चिरमुल्यांचा होता. मोटरवाले गरवारे या किन्हईचेच होते. औंधकर संस्थानिकांचा मूळ पूर्वज या किन्हई गावचाच कुलकर्णी होता.

"किन्हईपासून दोन मैलांवर एक बलभीमवाडी होती. ते स्थळ अत्यंत रम्य होते. तिथे पूर्वी एक साधू राहत होता. त्या साधूच्या प्रसादाने औंधकरांच्या घराण्यातील कोणा पुरुषाला औंधाधिपती होता आले होते. तो पुरुष राजघराण्यात दत्तक गेला होता."

" ... किन्हईच्या मुक्कामात मी अभ्यासाच्या पुस्तकांना हातही लावला नाही. सकाळी लवकर उठावे, राजवाड्याच्या स्नानगृहातील दगडी चौरंगावर बसून राजा गोपीचंदासारखे मनमुराद सुखस्नान करावे, नदीचा प्रवाह ओलांडून पैलाड जावे, एखाद्या कोकरागत उड्या मारीत साखरगडनिवासिनीची टेकडी चढावी. त्या टेकडीवरील डोंगरी फुले कविता गात गात गोळा करावी. ती देवीच्या मूर्तीवर वाहावी. वहिवाटदाराचा मुलगा आल्याचे पाहून तिथल्या पुजाऱ्याने आगतस्वागत करावे, चांदीच्या वाटीतून बेसनाचा रसरशीत लाडू प्रसाद म्हणून पुढे करावा. मग रमतगमत टेकडीच्या खाली उतरावे. उतरताना राम गणेशांच्या, बालकवींच्या कविता तोंडपाठ म्हणाव्यात. घरी आल्यावर मनसोक्त न्याहारी करावी आणि दिवाणखान्यात जाऊन त्या राजेशाही बैठकीवर लोळत पुन: वाचनास प्रारंभ करावा - असा माझा क्रम चालला होता."

"मी गावाबाहेरच्या शिवमंदिरातही संध्याकाळच्या वेळी जाऊ लागलो. हे शिवमंदिर तर योग्यांना समाधिस्थान आणि कवींना प्रतिभास्थान वाटावे इतके शांत आणि रम्य होते. त्याची बांधणी हेमाडपंती पद्धतीची, काळ्या दगडांची होती. हे मंदिरही नदीकाठीच होते. पंत पराडकरांना ‘वनस्पतिजन्य शुद्ध धूपाची’ विद्या देणारे त्यांचे सिद्ध गुरू हयात असताना याच मंदिरात नांदत होते. या मंदिरात गेल्यावर गोपाळ तासच्या तास शीर्षासन करून उलटा उभा राही. आणि मी मंदिराच्या कठड्यावर बसून नव्यानेच पाठ झालेल्या आर्या केकावलीतील चरण गुणगुणत राही - 

"“श्रीरामा तू स्वामी जगाचा, असशी माझ्या शिरावरी जागा आम्हांस तुझ्या पायावाचून निर्भय नसे दुजी जागा” 

"सूर्यास्ताच्या समयीं त्या निवांत जागी त्या ओळींना काही वेगळा अर्थ यायचा. आकाशाच्या लाल कडा धिरे धिरे अंधारून जात. पूर्ण झांजड पडे. ब्रह्मचारी गोपाळ त्या शिवमंदिराच्या गाभाऱ्यातील नंदादीप प्रज्वलित करी. नंदादीपाच्या प्रकाशात उजळलेल्या चंदनचर्चित शिवपिंडीला प्रणाम करून आम्ही दोघे परतत असू. कोरडी वाळू, ओली वाळू, खडबडीत खडक, निसरडे खडक, गुडघाभर पाणी, घोटाभर पाणी यांतून प्रवास करीत नदीच्या पात्रापात्रानेच आम्ही घरी येत असू."

" ... औंधाहून एका मित्राचे पत्र आले. त्याने लिहिले होते- 

"‘पुढच्या वर्षापासून करीक्यूलम् बदलत असल्यामुळे तू या वर्षी परीक्षेस बसावे हे चांगले.’ 

"ते पत्र ही पडत्या फळाची आज्ञा मानून मी एका रात्री गाडीने परत औंधला निघून गेलो. किन्हईत राहण्याची माझी फार इच्छा होती. त्या गावात जन्मभर राहायला मिळाले असते तरी मी राहिलो असतो; पण ते घडले नाही. मला पुन्हा कधीच जाता आले नाही. आजतागायत जाता आले नाही.

"तो सुगंधित गाव, तिथला राजवाडा, तिथल्या बागा, तिथली माणसं, तो एकवीरेश्वराचा घाट, टेकडीवर सोने उधळणारी सकाळ, बुक्कागुलालात न्हालेली संध्याकाळ, डोहाच्या पाण्यात विझवलेली जळती दुपार, त्या निष्पाप ग्रामकन्यकांचे वेडे कटाक्ष-सारे सारे काही मला आठवते. पुन: पुन्हां आठवते. पण कोण जाणे आता किन्हई तशी राहिली असेल की नाही! पंत पराडकर हृदयक्रिया बंद पडून वारल्याचे मी नुकतेच कुठेतरी वाचले. त्यांची सुगंधशाळा आता किन्हईत कुठून असणार?"

" ... गावाबाहेरच्या त्या शिवमंदिरात आता नंदादीप लागला असेल की नाही? कोण जाणे! पुष्कळ काळ निघून गेला आहे. बावीस-तेवीस वर्षे निघून गेली आहेत. ... माझ्या लेखनाच्या दिवाणखान्यात कधी कधी माझ्या मुली तीन-तीन पुष्पपात्रे सजवून ठेवतात. उदबत्त्यांची झाडे चेतवून ठेवतात. त्या सर्वांचा एकत्रित सुगंध मला बधिर करून टाकतो. माझे मलाच वाटू लागते, माझ्या कपाळावर कुरळे केस उडू लागले आहेत. माझी बेडौल अंगलट पुन: गोटीदार झाली आहे. खादीची खाकी हापपॅन्ट आणि पोलो कॉलरचा पोपटी सदरा मी ल्यायलो आहे. माझ्या एका हातात एक खादीचीच पिशवी आहे. डाव्या खांद्यावर एक घोंगडी आहे. घाईघाईने मी एम.एस.एम. रेल्वेच्या रहिमतपूर स्टेशनवर येतो आहे. तिसऱ्या वर्गाच्या डब्यात चढतो आहे. कुणीतरी प्रवासी विचारतो आहे कुठं जाणार? - मी उत्तरतो - ‘किन्हई !’ 

"“किन्हई घोणकी?” 

"“अंहं. पंतांची किन्हई !”"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 13, 2022 - January 13, 2022
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
25. अरे, दिवा लावा कोणी तरी
................................................................................................
................................................................................................

"“अरे, दिवा लावा कुणी तरी-” 

"अंथरुणावर पडून तळमळणारे माझे वडील क्षीण आवाजात म्हणाले. आई त्यांच्या उशाशी बसली होती. दोन्ही चुलते पायगती बसले होते. माझी सारी भावंडे आसपासच होती. सारीजणे सचिंत अवस्थेत येणाऱ्या प्रसंगाची वाट पाहत होती. बाहेर सोप्यावर गावातली कैक प्रतिष्ठित माणसे थांबलेली होती. वडिलांचे म्हणणे कुणीच ऐकले नाही. दिवा लावण्याची इच्छा त्यांनी बेशुद्धपणातच व्यक्त केली, अशी सर्वांची कल्पना. मी उठलो आणि समई लावली. दिवेलागणीला अजून अवकाश होता. सरत्या सूर्याचे किरण त्या खोलीतही रेंगाळत होते. मला काय वाटले कोण जाणे, तोंडपाठ असलेला गीतेचा एक अध्याय, मी खालच्या आवाजात म्हणण्यास आरंभ केला. माझ्या पाठाचे ‘कृष्णार्पण’ होईतो सारा देखावा तटस्थ राहिला. वडिलांनी काही हालचाली केल्या. आईने त्यांच्या पायांवरचे पांघरूण सरळ केले, इतकेच. 

"“श्रीकृष्णार्पणमस्तु” 

"माझ्या तोंडातून पाठाचा पूर्णविराम बाहेर पडला आणि समोरच्या आकाशात सूर्यास्त झाला. वडिलांचे सर्वांग एकदम थरारल्यासारखे झाले. कुणी तरी भेदरल्या आवाजात मला हाक मारली - ‘अण्णा-’ 

"मी त्वरेने वडिलांच्या उशाशी गेलो. त्यांचे मस्तक माझ्या मांडीवर घेतले. त्यांना काही तरी बोलावयाचे होते; पण ते बोलू शकत नव्हते. कुणी तरी संध्येची भरलेली पळी माझ्या हाती दिली. वडिलांच्या उघड्या ओठांत मी गंगाजळ घातले. ते तीर्थ परत फिरले. त्यांच्या हनुवटीवर ओघळले. मान लटकी पडली. शरीर निश्चेष्ट झाले."

"पौषातली थंडी, चतुर्दशीचे चांदणे, साऱ्या गावाची सहानुभूती, भावंडांची रडारड, यांतले काही काही मला समजले नाही. एखाद्या निर्जीव यंत्रासारखाच मी अंत्ययात्रेच्या अग्रभागी राहिलो. यंत्राच्या हातांनीच जन्मदात्याच्या शरीराला मी मंत्राग्नी दिला. अपरात्री क्षौर करवून घेतले. विहिरीच्या बर्फतुल्य पाण्यात स्नान केले. सारे केले; पण जणू काहीच केले नाही. मी बधिर झालो होतो. चेतनाहीन झालो होतो. मनाचा मुका पाठ मात्र अखंड चालू होता, ‘पुनरपि जननम्, पुनरपि मरणम्.’"

" ... वडिलांच्या खोलीत दिवा लागला होता. तो विझू नये म्हणून त्यावर शिप्तर झाकले होते. जाताना ते म्हणाले होते, ‘कुणी तरी दिवा लावा’ तो आता लागला होता. मला भडभडून आले. तोंडांतून हुंदका बाहेर पडला नाही; पण डोळ्यांतून ओघळ सुरू झाले. वडील गेले. आपण निराधार झालो."

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 13, 2022 - January 13, 2022
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................

June 1966 - 

January 11, 2022 - January 13, 2022

Purchased September 26, 2021. 

Kindle Edition, 357 pages

Published September 28th 2018

ASIN:- B07HSTKCP1
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

थोरली पाती कथा ग. दि. माडगूळकर ☐ प्रकाशन क्रमांक – 1558 
☐ प्रकाशक साकेत बाबा भांड, 
साकेत प्रकाशन प्रा. लि., 
115, म. गांधीनगर, 
स्टेशन रोड, औरंगाबाद - 431 005, 
फोन- (0240)2332692/95. 
www.saketpublication.com info@saketpublication.com 

☐ पुणे कार्यालय साकेत प्रकाशन प्रा. लि., 
ऑफिस नं. 02, ‘ए’ विंग, 
पहिला मजला, धनलक्ष्मी कॉम्प्लेक्स, 
373 शनिवार पेठ, कन्या शाळेसमोर, 
कागद गल्ली, पुणे -411 030 
फोन- (020) 24436692