Saturday, January 22, 2022

Ek_Ekar एक एकर | कथासंग्रह व्यंकटेश माडगूळकर (Marathi), by Vyankatesh Madgulkar.

................................................................................................

EK EKAR 
एक एकर
कथासंग्रह व्यंकटेश माडगूळकर 
by VYANKATESH MADGULKAR 
................................................................................................
................................................................................................

One may get the impression from the sample that this is a beautiful tale of beautiful trees planted by the author. It is, partly. Rest is about all sorts of stuff he encounters at his farmhouse and in forest, from insects to tigers. 
................................................................................................
................................................................................................
अनुक्रम 

१. एक एकर 
२. वनविद्या 
३. रानातली रेखाटनं 
४. अन्नासाठी दाही दिशा 
५. शंभर वर्षे वयाचं मासिक 
६. गोष्ट – मैत्रीची आणि वैराची 
७. अतिथी अभ्यागत

"पावसाळ्यात नाना वनस्पती दिसतात. काही झुडपे, काही गवते, काही वेली यांना इवली-इवली फुले येतात. त्यात जांभळा आणि निळा रंग असलेली जास्त असतात. या रानटी वनस्पतीची पाने फुले चितारायची ठरवली, तर माझे एक मोठ्ठे स्केच बुक सहज भरेल. काही तणांना लहान फळे येतात. निळी, तांबडी, जांभळी आणि यावर नाना आकाराची, नाना रंगाची फुलपाखरे भिरभिरतात. काही लहान, काही मोठी. काही रंगीत, काही साधी. 

"माझी जमीन भारी नाही, मुरमाड आहे. सत्तर पेरूच्या झाडांना अति ताण खपत नाही. पाने गळून जाईतो ताण उन्हाळ्यात द्यावा लागतो. मृगाचा पाऊस झाला की, छान पोपटी पालवी फुटू लागते आणि पुढे स्वच्छ पांढरी फुलेच फुले पेरूवर दिसू लागतात. पेरूचे फूल फार मनोहर असते. ते भल्या सकाळी पाहताच आपल्या वृत्तीही उमलून नाही आल्या तर नवलच. पांढऱ्या मोहरांनी फुललेले शेवगे, सुगंधी मंजिऱ्यांनी लवलेले आंबे, लालचुटूक फुलांनी नहालेली डाळिंबाची झाडे, मोहरलेली जांभळाची झाडे, ‘नेक्टर’ चाखत भिरभिरणारी फुलचोखी पाखरे, हे वैभव चित्रात कसे बरे सापडेल? आणि शब्दात तरी सापडेल का? आम्रमंजिरीचा सुगंध कसा दुसऱ्यापर्यंत पोहोचवावा?

"धायरीच्या या एका एकरात झाडेझुडपे आणि वृक्ष किती, आणि कोणते आहेत याची मी सहज एकवार शिरगणती केली. इथे निवडक रायवळ आणि कलमी अशी आंब्याची एकोणतीस झाडे आहेत. पेरू सत्तर आहेत. गणेश डाळिंबे बारा आहेत. सीताफळे चाळीस. दहा केळी. जांभूळ चार. या पैकी एक लेंडी जांभूळ, दोन मोठी आणि एकाला अद्याप फळ धरायचे आहे. बांबूची बेटं चार. दोन हिरवी, दोन पिवळी. आवळे दोन, एक टपोरी गावठी बोर, एक चिकू, चार अंजिरं, सहा शेवगे, सहा कागदी लिंबू, तुती आठ, एक गुलमोहर, एक केशिया, एक उंबर, तीन बाभळी, एक रबर ट्री, दोन चिंचा, एक नारळ, एक फणस."

"निंबाचं झाड खरं तर रानात पाहिजे. कबीर म्हणतो, ‘तरुवर, सरोवर आणि संत हे परमार्थासाठीच देहधारणा करतात.’ कडुनिंब श्रेष्ठ असा तरुवर आहे. घरात मूल जन्माला आलं की, निंबाचा डहाळा माजघराच्या चौकटीला अडकवतात. वर्षप्रतिपदेला निंबाच्या कोवळ्या पानाचा प्रसाद खातात तो काही उगीच नाही. जिवंत आहे तोवर तो औषधी आहे आणि तोडला गेला की, तो धाब्याच्या घराला तुळर्इ होतो. पण आंब्यासारखं फळझाड वाचवण्यासाठी मी निंब तोडला. 

"कशी कोण जाणे; पण एक जांभूळही दोन आंब्यांच्या मधोमध आली होती आणि राक्षशिणीसारखी वाढून तिनंही आंब्यांना धाकात ठेवलं होतं. ही जांभूळही मला काढावी लागली. 

"घराजवळ एक सुबाभूळही ताडमाड वाढली होती. उन्हाळ्यात तिच्या शेंगाचे खुळखुळे फुटून बियांचा सडा खाली पडे आणि पावसाळ्यात अही-मही रावणाच्या रक्तथेंबातून राक्षस जन्माला येत तशी असंख्य रोपं जन्म घेत. थोडं वाढलं की, हे रोप आपलं मूळ पार शेषाच्या टाळूपर्यंत नेत. त्यामुळे ते उपटता उपटत नाही. शिवाय या सुबाभुळीच्या उशा-पायथ्याशी दोन चांगल्या टपोऱ्या जांभळी होत्या. उन्हाळ्यात तांबडाभडक होऊन रानाची शोभा मखमली करणारा गुलमोहर होता. ही तिन्हीही झाडं सुबाभळीनं धाकात ठेवली होती. त्यांना डोकी वर काढायची सोय नव्हती. म्हणून ही सुबाभळही मी काढली, आणि उंबराच्या फांद्यांवरही हत्यार चालवण्याचं पाप मला करावं लागलं. कारण त्यानंही चांगल्या अशा शेंदरी आंब्याला पाण्याच्या पाटात दाबलं होतं. 

"एका कडुनिंबानं एका अंगाला असलेली पेरूची झाडं आणि दुसऱ्या अंगाला असलेली गणेश डाळिंबाची झाडं यांच्यावर सावली टाकली होती आणि फांद्यांना विजेच्या तारांच्या वर चढवलं होतं. म्हणून तोही मला काढावा लागला. 

"प्रत्येक झाड हे आकर्षक असं एक वास्तुशिल्पच असतं. शिवाय ते सतत हलत, वाढत, फळत, फुलत असतं. प्रत्येकाचं रूप, ढब वेगळी असते. साधं बाभळीचं झाड घ्या. ते जेव्हा हिरवंकंच झालेलं असतं आणि त्यांच्यावर पिवळी रंजन फुलं असतात तेव्हा काळ्या खोडावरच, हिरव्या पर्णसंभारात काळ्या फांद्या पसरलेलं हे झाड किती सुरेख दिसतं!"

"एकरातल्या झाडांपैकी काहींची सुरेख जलरंगात मला पोर्ट्रेटस् करायची आहेत. एकमेकींना खेटून उभ्या अशा फार्महाउसच्या कोपऱ्यावरच्या दोघी घनगर्द जांभळी. मधल्या पट्टीतल्या बांधावरचं मोठी-मोठी लिंब देणारं बसकं, अंगानं भरलेलं कागदी लिंबाचं झाड. पार खाली पिवळ्या बांबू बेटापाशी असलेली शेलाटी आवळी. पाण्याच्या टाकीमागं पाण्याच्या पाटाच्या कडेला असलेला शेंदऱ्या आंबा. ऐन पेरूच्या गर्दीत मान उंचावून उभा असलेला अंजिर. तो तिसऱ्या पट्टीतला ‘धायरी’ हापूस आणि सगळ्या लहान आंब्यांच्या ओळीत अकाली प्रौढ दिसणारा तोतापुरी. 

"माणसानं आपल्या आयुष्यात केलेल्या कोणत्याही बऱ्यावाईट कृत्यापेक्षा त्यानं लावलेले वृक्ष जास्त काळ टिकतात."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................

December 24, 2021 - January 03, 2022 
- January 13, 2022 - January 22, 2022. 

"हरिण नरात मारामारी होते, ती तू मोठा की मी मोठा ह्यासाठी. कारण जो बळाने उजवा त्याच्याकडे माद्या धावतात. पुष्ट, जोमदार नरांकडूनच पुढची पिढी जन्माला यावी असा निसर्गाचा नियम आहे. हद्दी आखायच्या आणि राखायच्या त्या खाणं मिळावं म्हणून. सगळी धडपड असते ती ह्या धोधाट जीवनप्रवाहात टिकून राहण्यासाठी. 

"वन्य प्राणीजीवनाचे निरीक्षण करण्यासाठी हौशी लोक जंगलात जातात, हिंडतात आणि काही दिसलं नाही म्हणून सांगत परत येतात. जंगलात जायचे तर काही पथ्ये पाळावी लागतात. 

"सकाळी लवकर किंवा संध्याकाळीच जंगलात प्राणी दृष्टीला पडतो. उन्हात आणि पावसात कोणी खाद्य शोधण्यासाठी बाहेर पडत नाही. 

"आपण घोळक्याने, बोलत रस्त्यावरून गेलो तर आपल्याला भर अभयारण्यातही काही दिसणार नाही. फक्त दोघांनीच, जंगलातील वाटांनी आवाज न करता जावं. 

"जंगली जनावरांना असतो तसाच वास माणसांनाही असतो. आणि त्याच्या डोळ्यातून, चालण्यातून, हावभावातून एक प्रकारचा गर्व दिसत असतो. मला भूतकाळ आठवतो. भविष्यकाळ जाणता येतो. मी हत्यार वापरू शकतो असा गर्व वाहणारा माणूस दिसला रे दिसला की जंगलातले प्राणी त्याच्यापासून दूर जातात. जंगलातून जाताना, गपकन् खाली बसणं, दणदण पळणं, वाकून डोकावून पाहणं, रोखून पाहणं हे टाळणं बरं. मनुष्य असलो तरी आपणही प्राणीच आहोत ह्या भावनेनं, गर्व टाकून देऊन, आपण जर, सावकाश असे, वाटा तुडवीत राहिलो तर जंगलातील प्राणी आपणाला दिसतील."

"वारुळाभोवती चितुराची पिल्लं चरतात. त्यांना वाळवी खायला आवडते. वाळवी आपल्या पिलावळीसाठी वारुळात एकप्रकारची अळिंबे वाढवते. ते खाद्य लुबाडण्यासाठी ढिगभर श्रम करण्यास अस्वल तयार असते. शनिवारी टेकडीवरच्या मारुतीपुढे नारळ फोडून खोबऱ्याचा लहानसा तुकडा ठेवतात हे माहीत झाल्यावर तेवढा तुकडा मिळवण्यासाठी उंच टेकडी चढून उतरणाऱ्या अस्वलांचे उदाहरण एम. कृष्णनने आपल्या पुस्तकात दिले आहे."

"जॉर्ज शेल्लर नावाचा अभ्यासक एकोणीसशे चौसष्ट साली कान्हा अभयारण्यात वाघाचा अभ्यास करण्यासाठी वर्ष, दीडवर्षं राहिला होता. रानातल्या सगळ्या वाघांना तो ओळखत असे. वाघाच्या डोळ्यावरच्या काळ्या ठिपक्यात वेगळेपणा असतो. त्यावरून प्रत्येक वाघ वेगळा ओळखता येतो असं शेल्लर लिहितो. 

"कान्हा जंगलातील एका झऱ्यावर वाघीण आणि तिची पिल्लं पाण्यावर येत. शेल्लरने पासष्ठ सालच्या ‘लाइफ’ साप्ताहिकात वाघावर लेख लिहिले होते. त्यात घालण्यासाठी फोटो हवेत म्हणून कोणी फोटोग्राफर लाइफने पाठवला. 

"वाघीण आणि तिची दोन पिल्लं ज्या झऱ्यावर पाणी पिण्यासाठी येत, त्या झऱ्याशेजारी कापडी लपण उभारून शेल्लर आणि फोटोग्राफर बसले. हळूहळू, एक एक दिवसानी त्यांनी लपण आणि झरा ह्यातील अंतर कमी करत आणले. शेवटच्या दिवशी लपणात बसल्यावर शेल्लर कॅमेरा वागवण्याच्या ओझेवाल्या माणसाला म्हणाला, “आता वाघ येईपर्यंत आम्ही इथं बसतो. तू मात्र बोलत बोलत परत जा. म्हणजे वाघिणीला वाटेल की आलेली माणसं परत गेली.” 

"यावर फोटोग्राफर म्हणाला, “एकच गेला. दोघं इथंच आहेत, हे तिला नाही का कळणार?” 

"यावर हा थोर अभ्यासक म्हणाला, “नाही. वाघाला वजाबाकी येत नाही.”
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................

-January 22, 2022 - January 22, 2022. 

"रानात रेखाटनं करायची इतर हत्तीवर बसून हिंडावं, पाहिजे तिथं हत्ती उभा करावा आणि रेखाटन करावं. बैलगाडीलाही पक्षी किंवा प्राणी बुजत नाहीत. जीप गाडीत पुढच्या, ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसूनही रेखाटनं करता येतात."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................

-January 22, 2022 - January 22, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................
४. अन्नासाठी दाही दिशा 
................................................................................................
................................................................................................

"देवीदास कवीनं आपल्या प्रार्थना शतकात म्हटलं आहे – 

"‘अन्नासाठी दाही दिशा 
"आम्हा फिरविशी जगदीशा’"

"अन्नासाठी अस्वल हा प्राणी कठोर परिश्रम करणारा आहे. त्याच्या खाण्यात आजूबाजूला उपलब्ध असणारे खाद्यपदार्थ असतात. जांभळं, बोरं, आंबा, बेलफळं, मोहाची फुलं, बहावा झाडाच्या शेंगा, मध, वाळवीसारखे कीटक, ऊस हे अस्वलाचं खाणं आहे. निरीक्षक सांगतात की, अस्वलाचं खाणं काय-काय असतं हे आपल्याला सांगोपांग माहीत नसतंच. 

"एका हजार-दीड हजार फूट उंचीच्या टेकडीवर मारुतीचं देऊळ होतं. शनिवारी लोक ह्या अवघड टेकडीवर भक्तिभावानं जात. नारळ फोडत, देवीला गोडेतेल घालत. एका अस्वलाला हे माहीत झालं. ते अवघड पायवाट चालून वर जात असे. तेल घातलेली मारुतीची मूर्ती चाटत असे आणि भक्तांनी देवासमोर ठेवलेला खोबऱ्याचा तुकडा खाऊन परत येत असे. पसाभर गोडेतेल आणि एका आमटीलासुद्धा पुरणार नाही एवढा ओल्या खोबऱ्याचा तुकडा खाण्यासाठी दमछाक करणारी टेकडी चढून कोण जाईल?"

"आमच्या एका मित्रानं पुण्यापासून चाळीस-पंचेचाळीस मैलावर आठ एकर जमीन घेऊन शेती सुरू केली. द्राक्षबाग लावली. त्याच्या बागेत द्राक्षाचे घोस दिसू लागले. आणि उत्तम द्राक्षघोस नाहीसे होऊ लागले. शेलके-शेलके घोस कोण कसे नाहीसे करते याचा शोध घेण्यासाठी हा मित्र एकदा पाळतीवर राहिला आणि सकाळी आश्चर्यचकित झाला. एक मुंगशीण आणि तिची तीन पोरं द्राक्षं बागेतील शेलके घोस खाताना त्यानं पाहिलं. 

"ह्याच मित्राने काही सुपारीची झाडं लावली होती. त्या झाडावरच्या सुपाऱ्याही कोणी खात होतं. पुन्हा त्या पाळतीवर राहिला, तर एक घोरपड झाडावर चढली आणि कच्च्या सुपाऱ्या ओरबाडू लागली. 

"सुपारीचं व्यसन माणसं करतात. घोरपडीलाही ते लागलं हे विलक्षण आहे! रोजचं खाणं दुर्मीळ झालं म्हणूनच हे प्राणी दुसरी खाणी शोधू लागले असावेत."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................

-January 22, 2022 - January 22, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................
५. शंभर वर्षे वयाचं मासिक 
................................................................................................
................................................................................................

"अठराशे अठरामध्ये स्टॅनफोर्ड राफेल्स नावाच्या संशोधकाला सुमात्राच्या जंगलात एक फूल दिसलं. त्यानं लिहिलं आहे की, ह्या फुलाचं समग्र वर्णन कसं करावं? हे जगातलं विलक्षण फूल एक यार्डापेक्षा जास्तीच असं रुंदीला आहे. त्याचं वजन पंधरा पौंड आहे. हे जंगलातलं बांडगूळ आहे. द्राक्षवेलीच्या जातीतल्या वेलीच्या मुळातून हे बाहेर पडतं. कोबीच्या गड्ड्यासारखी दिसणारी कळी सालातून बाहेर पडते. कळीचं फूल व्हायला काही महिने लागतात. फूल उमलतं आणि चार दिवसांनी सुकून जातं. ह्या फुलाच्या शोधासाठी नॅशनल जिआॅग्राफिक सोसायटीच्या मदतीनं विल्यम मेजर पश्चिम सुमात्राच्या जंगलात, शंभर मैलांच्या परिघात हिंडला. एके दिवशी दिवसभराच्या परिश्रमाचं फळ त्याला मिळालं. उमललेलं फूल दिसलं. ह्याची रुंदी साडेसत्तावीस इंच होती. पण पुढे दिसलेलं फूल छत्तीस इंच रुंदीचं होतं. ह्या दुर्मीळ फुलाचं स्थानिक भाषतेलं नाव ‘बनग पटम’ आहे. बनग म्हणजे फूल. पटम हा संस्कृत ‘पद्म’ पासून आला असावा."

"हेन्री मूरसारखा शिल्पकार आपल्या शिल्पाकृती प्लॅस्टर आॅफ पॅरिसमध्ये साकार करतो आणि त्या कराराला पाठवतो. तिथले कारागीर ह्या संगमरवरी करतात. 

"असं जर आहे तर मग, खरा शिल्पकार कोण, मूर का कराराचे कारागीर?"

"कराराच्या एका मोठ्या चौकात दरवर्षी शिल्पकारांची यात्रा भरते. इथं शिल्पकारांचा आणि शिळांचा संवाद होतो. शिल्पकार म्हणून स्वत:चं असं स्थान कोरण्याची जिद्द बाळगून सुमारे तीस-एक शिल्पकार छिन्नीनं कपच्या उडवतात. ही स्पर्धा असते. प्रत्येक स्पर्धकाला चौदा दिवसांचा अवधी मिळतो. ह्या काळात त्यानं मास्टरपीस घडवावा."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................

-January 22, 2022 - January 22, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................
६. गोष्ट – मैत्रीची आणि वैराची 
................................................................................................
................................................................................................

"मग अंधारातून नि:शब्द पायपीट, डाव्या-उजव्या बाजूला वळणं, चढ-उतार, दगड-वाळू. 

"मग दुरून बैलांच्या गळ्यातल्या चंगाळ्याचा आवाज. 

"अंधारात काही दिसत नसताना डावी-उजवीकडे कितीदा वळलो, हे नेमकं ध्यानात ठेवून गेल्या जागी परत येणाऱ्या या विलक्षण हुशार रामोशाबरोबर माणदेशच्या कुरणातून, काटवनातून, ओढ्याकाठानं, तळ्या-तलावाच्या, ताली-बंधाऱ्याच्या काठाकाठानं केलेली पायपीट कशी विसरेन?"

"हा बापू, वाघाच्या शिकारीसाठी सिंहगडच्या दऱ्याखोऱ्यात बसलेला, जखमी बिबट्यानं ओरबाडलेला तो निधड्या छातीचा बाबू, घोटवड्याचा तो गोविंदा कातकरी, तो वाल्मी फासेपारधी, तो उसन वैदू, डोईच्या पटक्याचा शेमला आभाळात ताठ उभा राहील, अशा वेगानं सशामागोमाग माळावरनं धावणारा, तुमावानी मला कधी बंदुकीचं लायसन मिळंल का, असं विचारणारा, कऱ्हाडजवळच्या सुर्ली गावचा तो मांग यांनी वनविद्या किती परीनं मला दिली. त्यांचे ऋण मी कसे फेडणार? 

"कर्नाटकातल्या कोंडणकेरीच्या जंगलात सोमल्या लमाणी भेटला. तिथं दहा दिवस आम्हा शिकारी मित्रांचा फॉरेस्ट बंगल्यात मुक्काम होता. सोमल्या छान गोष्टी सांगायचा. पक्षी, प्राणी ही त्याच्या गोष्टीतली पात्रं असायची. त्याची भाषा मला यायची नाहीच, पण त्यानं सांगितलेली गोष्ट सांगता येईल."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................

-January 22, 2022 - January 22, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................
७. अतिथी अभ्यागत
................................................................................................
................................................................................................

"परसात आलेला कोंबडा पुरा वाढलेला, गावठी वाणाचा होता. तांबडा, पिवळा आणि शेपटीला निळी, हिरवी पंखे असलेला. सहा फूट उंचीच्या कुंपणावरून आत यायचं म्हणजे उडूनच यावं लागणार. माझ्या कुंपणाच्या पलीकडे बंगलाच होता. डाव्या-उजव्या बाजूलाही बंगलेच होते. त्यापैकी कोणी कोंबड्या पाळलेल्या नव्हत्या. मग हा आला कुठून, आणि कुणाचा? पलीकडेच कालवा होता. त्याच्या काठानं काही जुन्यापान्या वस्त्या होत्या. फिरायला जाताना मी ह्यातल्या एका वस्तीपुढे कोंबड्या हिंडताना पाहिल्या होत्या. बोक्यानं, कुत्र्यानं ताणल्यामुळे सैरावैरा धावत हा दूत अनोळखी आवारात शिरला असण्याची शक्यता होती. कुणीतरी धुंडत, तोंडानं माहितीचा आवाज काढत संध्याकाळपर्यंत येईलच असा मी अंदाज बांधला."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................

-January 22, 2022 - January 22, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
December 24, 2021 - January 03, 2022 
- January 13, 2022 - January 22, 2022. 

Purchased January 01, 2022. 

Kindle Edition, 107 pages
Published by 
MEHTA PUBLISHING HOUSE
ASIN:- B01N6QAJFU
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
एक एकर | 
कथासंग्रह व्यंकटेश माडगूळकर 

© ज्ञानदा नाईक 

मराठी पुस्तक प्रकाशनाचे हक्क 
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे. 

प्रकाशक सुनील अनिल मेहता, 
मेहता पब्लिशिंग हाऊस, 
१९४१, सदाशिव पेठ, माडीवाले कॉलनी, 
पुणे – ३०.
................................................
................................................

December 24, 2021 - January 22, 2022. 
Purchased January 01, 2022. 
Kindle Edition, 107 pages
Published by 
MEHTA PUBLISHING HOUSE
ASIN:- B01N6QAJFU

ASIN: B01N6QAJFU