Monday, January 24, 2022

UMBARATHA, by Vyankatesh Madgulkar.

................................................................................................

The first story in the collection gives the title of the collection. 

In more than one sense, it sets the tone for the collection, although it's not clear until one has read through several - it's about men who seek to, but don't quite manage to, beyond looks and thoughts, transgress the limits of decency, not quite in action - from a small thief in a large town, to a goon ruling roost in a small village to the famous writer himself in the capital, this theme runs through the collection like a thread that connects mist of the stories. 

There are others, such as the village taking away the well. 
................................................................................................
................................................................................................
अनुक्रम 

१. उंबरठा 
२. गोडे पाणी 
३. जुपी 
४. गृहस्थ 
५. घरापाठीमागची लोभा 
६. कोऱ्या कागदांची कहाणी 
७. नाही, नाही! 
८. होटेल रावी 
९. दुबळा

It's a startling story, not because it crosses any borders of decency in any way, but because it's about a middle class gentleman seeing a young woman - a stranger - from as far away as a bus that stops outside her home, every time he's on the bus, for years - and being able to see in her heart, just from the stance of her standing in her doorway. 

Without a finger lifted, without any more closeness than thus observation, somehow this knowing of his about her status and heart seems far too intimate, until one reflects that most people generally do know about others in their society. 
................................................................................................
................................................................................................

................................................

December 24, 2021 - December 24, 2021. 

"दोन दिवसांतच विहीर पाण्याने भरली. ते निवळशंख पाणी बघून लोक घागरी घेऊन धावले. 

"संदीपान म्हणाला, “थांबा रं! नाना, पयलं पानी तुझ्या मुखात पडू दे. मग गाव पील म्हनं!” 

"ही गोष्ट नानाने ऐकली आणि तांब्या भरून पाणी वर आणले. तो नीट खाली बसला आणि नारळाचे पाणी प्यावे, तसा त्याने तांब्या तोंडाला लावला. 

"चार घोट पिऊन होताच नानाच्या म्हाताऱ्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद उमटला. पुन्हापुन्हा त्याने दोन-दोन घोट घेतले. 

"लोक मोठ्या डोळ्यांनी बघत होते. नाना काहीतरी विशेष सांगणार आहे असे त्याच्या तोंडावरून दिसत होते; पण तो गुळमट साखरपाण्याचे घुटके घेत असल्यासारखा वाटत होता आणि तो काय बोलतो, ते ऐकण्यासाठी लोक पुढेपुढे येऊन उभे राहत होते. 

"शेवटी नानाने तांब्या खाली ठेवला आणि हात जोडून म्हटले, “पांडुरंगाची किरपा झाली लेकानू, पाणी गोड की रं, हाय हिरीचं!” 

"– आणि सर्वांच्या तोंडून आश्चर्योद्गार बाहेर पडले! गुऱ्हाळावर रसासाठी उडावी तशी गर्दी अद्याप नीट न बांधलेल्या त्या विहिरीभोवती उडाली!"
................................................................................................

"मग म्हाताऱ्या येताळानानाने मारुतीच्या पायरीला हात लावला आणि तो म्हणाला, “मी खोटं सांगत अशीन, तर माजी जीभ झडंल. ह्यो हनुमंत माजं वाटुळं करील. हिरीचं पानी म्यां पेलेलं हाय, आन् ते खारं न्हाई, गोडं हाय!” 

"यावर काही वेळ स्तब्धता पसरली आणि मग एकाएकी वाणी जोराने बोलू लागला, “मग लेकानू, तुमच्यावर फिर्याद केली पायजेल. दुसऱ्याची जागा दांडगाव्यानं घेऊन त्यात हीर काढली तुमी. ही काय मोगलाई हाय, व्हय रं? तुम्ही चढ झाला गावाला.” 

"गणा म्हणाला, “सरकार, आमी जागा विचारून घेतलीया. इचारा पाटलास्नी!” 

"इतका वेळ येदू बकू गप्प होता. तो उंच आवाजात म्हणाला, “अरं, पर मी कोन जागा देनारा? जागेचा मालक धुळ्याला आन् मी इथं जागा देतो कशी? का मलाबी अक्कल न्हाय, व्हय रं?” 

"“पर पाटील, तुमी म्हनाला –” 

"“अरं पाटील लाख म्हनाला, तुमास्नी अब्रू नसावी का? ती पोरं परदेशी झाली, म्हणून त्येंची जागा बळकवावी का तुमी? आन् गावात त्येंचं कुनी न्हाईच का – आं? अरं, काय न्याय-अन्याय? निव्वळ मनगटशाही झाली की रं, ही तुमा लोकांची!”"
................................................................................................

"चार-दोन दिवसांतच गावकरी जमून निकाल लागला. जे व्हायचे तेच झाले. केल्या कष्टांबद्दल पन्नासभर रुपये महारांच्या हाती ठेवून गोड्या पाण्याची विहीर आपल्या ताब्यात घेतली. 

"आता तक्क्याची विहीर गावकऱ्यांनी नीट बांधून घेतली आहे आणि तिला दोन रहाट लावले आहेत. गावातल्या मराठ्यांच्या, वाण्यांच्या, बामणांच्या बाया विहिरीवरून पाणी नेतात. महारवाड्याच्या बाजूने काटेरी तार लावून गावकऱ्यांनी विहीर आपल्या हद्दीत घेतली आहे. ओढ्यातून वाट पाडली आहे. त्या तारेपलीकडे उभ्या राहून महारणी कधीकधी गयावया करीत असतात, “ताई, मला योक हंडा वाढा हो! काकी, मला एक घागर वाढा हो!” 

"पण या ओरडीकडे कुणी विशेष लक्ष देत नाही. फारच चिकाटी लावली म्हणजे एखादी बाई घागर शेंदून ती महारणीच्या हंड्यात ओतते आणि मग अनेक महारणी गलका करून हंडे पुढे करू लागतात. 

"गावातल्या बायका चिडून म्हणतात, “यांच्यावर उपकार करायचीसुद्धा सोय नाही. काय तरी गं बाईमानसं?” 

"असे चालले आहे."
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 23, 2021 - January 23, 2022. 

"पण मार खाऊनही आरडाओरडा न करणाऱ्या चोरट्या बायांसारख्या त्या कोंबड्या गुपचूप राहिल्या. एरवी त्यांनी केवढा गलका केला असता; पण आता त्या घशातल्या घशातच कुरकुरल्या. माना आखडून उगीच उभ्या राहिल्या. पण नामूच्या बायकोचा खरा राग होता कोंबड्यावर. तिनं पखाडाला धरून कोंबडा दर्रशिरी बाहेर ओढला आणि त्याला धपका घालून ती म्हणाली, “तुला पटकी आली! दिवस उजडून वर आला आन् तुजी दातखीळ, रं का बसलीय? वरड की!” 

"त्यावर कोंबडा हळू आवाजात कुरकुरला आणि चोच वासून मालकिणीकडे पाहू लागला. नामूच्या बायकोने लुगड्याचा बोळा फेकावा तसं त्याला अंगणात फेकलं. पडल्या जागी तो धडपडला आणि एरवी एखाद्या मिलिटरीतल्या हवालदारासारखा रुबाबदार दिसणारा तो कोंबडा आज शाळामास्तरासारखा जागच्या जागी गप्प उभा राहिला."
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 23, 2021 - January 23, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................
 
................................................................................................
................................................................................................
४. गृहस्थ 
................................................................................................
................................................................................................

" ... केवळ एखाद्या बेडकापासून दूर सरावे, तशी ती यदुनाथपासून दूर सरली होती. तिने नापसंती व्यक्त केली नव्हती, नाक मुरडले नव्हते, असुंदर असे काही शब्दसुद्धा उच्चारले नव्हते. केवळ ती दूर बसली होती आणि त्यासरशी भान सुटलेला यदुनाथ खाडकन भानावर आला होता."
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 23, 2021 - January 23, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................
 
................................................................................................
................................................................................................
५. घरापाठीमागची लोभा 
................................................................................................
................................................................................................

"दिवस बुडाला. पार अंधार झाला. चिटचिट झिरंगट येऊ लागले. लोभाची छत्री उघडून नामूने माझ्या माथ्यावर धरली. “नामू, आता पुन्हा या बाजूला यायचं नाही.” 

"“तसं नका करू. पकुड्‌र्या बक्कळ हायेत ह्या बाजूला. आज डाव चुकला, पर उद्या कायम मिळतील.” 

"“ते काही का असेना, पुन्हा या बाजूला येणं नाही.” 

"रामोश्याला काही कळले नाही. पण मी कळूनसवरून बोललो होतो."
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 23, 2021 - January 23, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................
 
................................................................................................
................................................................................................
६. कोऱ्या कागदांची कहाणी 
................................................................................................
................................................................................................

"विमलने खिडकीचा पडदा बाजूला केला. पहाटेची सुरेख झुळूक आत आली. कोंबडे आरवत होते. पाखरे जागी होत होती. 

माझ्या शेजारी येऊन विमलने माझ्या केसांवरून हात फिरवला आणि बेबीला म्हणावे तशी ती म्हणाली, “चला, तुम्ही झोपा बघू आता. ठकूबाई, माळी, राघू हे सगळं दिवसा बघू. आठला बसलाय टेबलाशी. पाच वाजले आता. चला.”"
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 23, 2021 - January 23, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................
 
................................................................................................
................................................................................................
७. नाही, नाही

"संध्याकाळ टळून गेली होती. पुणे शहरातले दिवे केव्हाच लागले होते. हवेमध्ये गारठा होता. वरचेवर पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे डांबरी रस्ते ओले झाले होते. रस्त्याकाठच्या दिव्यांची प्रतिबिंबे ओल्या रस्त्यांवर सरपटत होती. शहराच्या अगदी एकीकडे असलेला लांबच लांब रस्ता अगदी निर्मनुष्य होता. मोटार जात नव्हती, सायकल जात नव्हती. पावसाने गारठलेले म्हातारे वड दोन्ही तर्फेने उभे होते आणि एकाकी रस्ता शहराच्या बाहेरच्या असलेल्या तुरळक वस्तीकडे जात होता. डाव्या-उजव्या बाजूस क्वचित उजेड दिसत होता. क्वचित बंगला दिसत होता. 

"या अशा एकाकी रस्त्याने एक मध्यम वयाची बाई चालली होती आणि तिच्यापासून बऱ्याच मागे असा चालत राहून नाता तिचा पाठलाग करीत होता."
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 23, 2021 - January 23, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................
 
................................................................................................
................................................................................................
८. होटेल रावी 
................................................................................................
................................................................................................

"सकाळी नऊ वाजता मी पटेलनगर विभागात गेलो. गाडीचा आवाज ऐकताच रमेशचंदर धावत खाली आले आणि मोठ्या अदबीने त्यांनी मला वर नेले. बाकीचे लोक अगोदरच आले होते. 

"त्या सर्वांनी उठून माझे स्वागत केले. रमेशचंदरजींनी माझी प्रत्येकाशी ओळख करून दिली आणि मी थक्क झालो! 

"रावीमधली गुलाबी साडी माझ्यापुढे उभी होती आणि रमेशचंदर ओळख करून देत होते – 

"“तुसी व्यंकटेश माडगूळकर होराँनु मिलो. ओ मराठी साहित्य दे बडे वड्डे कहाणी लेखक है।” 

"बाई म्हणाल्या, “हांजी, येणा दा ना ते बडा सुन्या ए!”
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 23, 2021 - January 23, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
९. दुबळा
................................................................................................
................................................................................................

"दोन्ही हात पुढे करून म्हातारी घरभर त्या दोघांना शोधू लागली. हंबरडे फोडत, धडपडून आपटत, रडत ती नामाला ‘मारू नकोस, मारू नकोस,’ म्हणत होती आणि नामा काही ऐकत नव्हता. पवित्रा नवऱ्याला चुकविण्यासाठी धावत होती. नामा पवित्राला धरण्यासाठी धावत होता आणि भांडण सोडविण्यासाठी त्या दोघांना म्हातारी शोधत होती."
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 23, 2021 - January 24, 2022. 

UMBARATHA by VYANKATESH MADGULKAR 
................................................
................................................

December 24, 2021 - January 24, 2022. 

Purchased January 01, 2022. 

Paperback, Fifth Edition- 
Reprint, 112 pages
Published 2013 
by मेहता पब्लिशिंग हाऊस 
(first published 1960)
Original Title UMBARATHA

ASIN:- B01N61HZYM
................................................
................................................

ISBN13:- 9788184983555
Edition Language Marathi

ASIN:- B01N61HZYM
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................
 उंबरठा / कथासंग्रह व्यंकटेश माडगूळकर © 
ज्ञानदा नाईक मराठी पुस्तक प्रकाशनाचे हक्क 
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे. 
प्रकाशक सुनील अनिल मेहता, 
मेहता पब्लिशिंग हाऊस, 
१९४१, सदाशिव पेठ, 
माडीवाले कॉलनी, पुणे – ३०.
................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4499412555