................................................................................................

Kali_Aai (Marathi)
काळी आई ।
कथासंग्रह व्यंकटेश माडगूळकर
by Vyankatesh Madgulkar.
................................................................................................
................................................................................................
One recalls reading the story that the collection is titled after, so long ago - summer of 1966. We were just finished with our school year, in our hometown, and waiting to be collected to be transported back to the capital where we had lived until a year ago and were going to live again, next.
This story was part of the matriculation curriculum and so was in the book that a cousin of a friend, in town for her matriculation examination, had with her - or at least that's the vague memory as to how I came to read it then.
And it wasn't difficult to comprehend the story, even without any of the life experience shared with the central character - that was the beauty of it. I recall reading its critique too, in the textbook, and not quite agreeing that the story ought to hsve been cut short at the old man refusing to sell. It felt right just as it was.
As one reads this collection, one realises that more than one of these sketches is equally heartbreaking in its own way.
................................................................................................
Throughout the book, there's a problem with a typo that could have been corrected easily enough, but wasn't, and it's unclear why the editors, printers era didn't bother when preparing the kindle version. Was it an attitude of superiority looking down on India and her languages and scripts? Words involving a long i, such as
बाई
are left looking ugly due to this neglect if that's all it is.
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
अनुक्रम
१. सर्व्हिस मोटार
२. या दत्तारामचे झाले काय?
३. काळी आई
४. लेले मास्तर
५. गुणा आई
६. नामा सुढाळाचे सुख-दु:ख
७. धार
८. बळीची गोष्ट
९. अनुभव
१०. खेळ
११. दरवेशी
१२. माझं गुणी जनावर
१३. गोकुळा
१४. कमळी

"इजाप्पाची ही ठाम समजूत होती – ‘सुगीच्या दिवसांत कुठूनतरी माकडवाले येतात, खेळ करून दाखवतात आणि ज्वारी उकळून परगावी चालते होतात. किस्ताक कसून डोंबारी येतात, चार आडव्यातिडव्या उड्या मारतात आणि शेर-मापट्यासाठी पदर पसरतात. काशीकापडे येतात, चित्रे दाखवितात आणि जुनेपाने कपडे बळकावितात. ही जशी हुन्नरी माणसे स्वत:चे कसब दाखवून, लोकांनी निढळाचा घाम गाळून पिकविलेले धान्यधुन्य लुटून नेतात; तसाच हा मोटारवाला काही नवा खेळ करून लोकांना नागवणार."
"जसजसे दिवस जाऊ लागले तसतशी बैलगाडी, घोेडा या वाहनांसारखीच मोटारही लोकांच्या परिचयाची झाली, तेव्हा कुणी बाजाराच्या निमित्ताने मोटारची हवा चाखू लागले. कामकाजासाठी तालुक्याचे हेलपाटे पायी मारण्यापेक्षा मोटारला चार आणे टाकून जाणे त्यांना बरे वाटू लागले. असे होता-होता बायाबापड्यादेखील संकोच सोडून मोटारीत बसू लागल्या. दुधाच्या घागरी, लोण्याची पातेली, भाजीपाला घेऊन तालुक्याच्या गावी विकण्याची चटक त्यांना लागली. जाणे-येणे सुलभ झाल्यामुळे गावची हरएक चीज – धान्यधुन्य, कांदे, वांगी, लिंबे, पेरू गावात ठरेनासे झाले. पैसा करण्याचा नाद लोकांना फार लागला. पोरांच्या तोंडचे दूध काढून बाया हॉटेलवाल्यांना विकू लागल्या. त्यामुळे पोरे मिलमिशी झाली. त्यांच्या शरीराची वाढ पूर्वीच्या जोमाने होईना. घरी चटणी-भाकर खाऊन मळेवाले आपले ‘माळवे’ बाजारात धाडू लागल्यामुळे बयतेदारांना चार ओल्या मिरच्या मिळणेही मुश्कील झाले! मापटे-चिपटे ज्वारी बाजारात नेली की, रुपया मिळू लागला तेव्हा उमदे शेतकरीही चिक्कू झाले. कुणाच्या नडी-अडचणीला पायली-दोन पायली धान्य घालणे त्यांच्या जिवावर येऊ लागले. भीड मोडावी कशी, म्हणून ते मग खोटेनाटे बोलत. घरात बळद भरले असले, तरी ‘नाही’ म्हणून मान हलवीत. हे ध्यानी येऊन गरजू चिडे आणि मनाशी म्हणे, ‘बरे आहे सयाजी, मी बघून घेईन!’"
"ती बया बाहेरून निरनिराळी माणसे गावात आणून सोडू लागली. हा कोण? खणविक्या आला, पाठीशी बोचके घेऊन घरोघर ओरडू लागला, कापडाचे नवे-नवे नमुने दाखवून बाया-बापड्यांची त्याने नजरबंदी केली आणि खिसाभर गल्ला घेऊन संध्याकाळची मोटार गाठली! तो कोण? मद्राशी मोतीविक्या आला, खोटेनाटे मोती त्याने खपविले, नवरा-बायकोत भांडणे लावून दिली आणि कानातली बाळी हलवीत तोही पुढच्या गावी निघून गेला. आणखी एक फळविक्या आला, एक ज्योतिषी आला, नाटकवाले आले, तमासगीर आले – अहो, जे येऊ नये ते आले. कधी आले नव्हते, त्यांना ही अवघड वाट मोटारीने सवघड करून दिली आणि दुधाच्या कासंडीत मिठाचा खडा पडावा तसे झाले. ... "
"ड्रायव्हर, किन्नर आणि उतारू यांच्याबरोबर हळूहळू गावातले उपरे लोकही चहा पिण्यासाठी कुंभाराच्या घरी जमू लागले. तास-तास रिकामटेकडे विषय चघळीत बसू लागले. चहाबरोबर शेव-भजीसारखे खाद्यपदार्थ आणि विडीकाडी हेही भोजाने आपल्या हॉटेलात ठेवले. त्याच्या हॉटेलाची विक्री चांगली होऊ लागली. सकाळ-संध्याकाळ त्याच्या घरातून गिऱ्हाईक हलेना.
"आणि मग बिचाऱ्या इजाप्पाच्या सुनेला लोकांच्या नजरेस न पडता घरात वावरणे मुश्कील झाले. या बजबजपुरीचा सराव झाल्यामुळे तिची लाज आखडली. कधी नवरा बाहेर गेला आणि गिऱ्हाईक आले, तर ती चहा बनवून देऊ लागली. हा व्यवहार घडता-घडता चार शब्दांची देवघेवही करणे क्रमप्राप्त झाले. इतर धंद्यांप्रमाणे याही धंद्यात नवऱ्याला बरोबरीने मदत केली पाहिजे, या जाणिवेने ती माऊली हळूहळू हरेक गोष्ट करू लागली. कुंभाराची सून परक्या माणसांना लाजेनाशी झाली. अगदी नकळत, हळूहळू बदलू लागली. त्या धंद्याला लागणारी निर्भीडता, कोडगेपणा, मोकळेपणा आणि मग किंचित फाजीलपणा हे सगळे तिच्यात येऊ लागले आणि जसजसे हे येऊ लागले, तसतशी हॉटेलची लोकप्रियता वाढू लागली. केवळ चहा पिण्याचे हॉटेल हे स्वरूप न राहता कुंभाराचे घर म्हणजे फाजील लोकांचे बसण्याचे ठिकाण झाले आणि तरीही म्हातारा इजाप्पा कुंभार आपल्या लेकाला चकार शब्दाने बोलला नाही. संतापापोटी आलेला त्याचा हा निश्चय अधिकच उग्र बनत चालला."
"आता गावची कळा पार बदलून गेली आहे. मोटार वाहतूक नियमित चालू आहे. भोजा कुंभाराचे हॉटेल मोडले आहे. गाव सोडून तो शहरात जगायला जाण्याच्या तयारीत लागला आहे आणि लिंबाच्या सावलीत बसून गाडगी-मडकी घडवणारा, अष्टौप्रहर उद्योगात असणारा इजाप्पा कुंभार सख्या ड्रायव्हरचा जीव घेतल्यामुळे फासावर गेला आहे.
"इजाप्पा, वेड्या, प्रचंड वेगाने येणाऱ्या या यंत्राला थोपविण्यासाठी तू तुझी टीचभर काया फुका इरेला घातलीस!"
................................................................................................
.................................................................................................

................................................

August 22, 2021 - January 04, 2022.

"आणि दत्ताराम खाली बघत हे सारे ऐकून घेई, तशी ती बाई अधिक चिडे. त्या भल्यामोठ्या वाड्याचे सारे दरवाजे लावून घेई आणि हातात सापडेल त्याने – पळीने, उलथण्याने, धुणे वाळत घालायच्या काठीने – त्याला मारू लागे. सापडेल त्या जागी ती त्याला मारीत सुटे. हाडावर आवाज होई. तिच्या हातातल्या बांगड्या फुटत. दत्तारामचे कोपर फुटून रक्तबंबाळ होई; पण तो कधी वाडाभर सैरावैरा धावतसुद्धा नसे. वेदनांनी कळवळून तो ओरडे, तोसुद्धा बारीक आवाजात; मांजराची पोरे ओरडावीत, तसा.
"शेवटी माई थके. तिच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागत. दत्तारामला ढकलून देऊन ती जमिनीवर कोसळे आणि हुंदके देत म्हणे, “तुला मारूनसुद्धा उपयोग नाही रे! मारणाराला फुकट श्रम! दत्ताराम, दत्तारामऽऽ माझ्या किती आशा होत्या, किती उड्या होत्या… साऱ्या मातीत घातल्यास, मातीत घातल्यास!”
"आणि पडल्या जागेवरून उठण्याचेही धाडस न करता तो बारीक आवाजात रडत राही. आईकडे न बघता, कोपरांनी डोके दाबून मांजरासारखा बारीक आवाज काढीत राही."
"बेचाळीसची चळवळ अचानक सुरू झाली आणि रोज सनसनाटी बातम्या येऊ लागल्या. आज इथे गोळीबार झाला, उद्या तिथे पोलिसांचे मुडदे पाडले, कुठे स्टेशन जाळले, कुठे शाळा जाळली, सगळीकडे पेटले, तेव्हा आमच्या गावीही ठिणगी पडली. हरताळ, सभा, मिरवणुकी धडाक्याने होऊ लागल्या. कुणी तुरुंगात गेले, कुणी फरारी झाले. शिकण्यासाठी पुण्याला, सांगलीला गेलेली मुले शाळा-कॉलेजे बंद झाली म्हणून गावी आली."
................................................................................................
.................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
January 04, 2022 - January 04, 2022

" ... सुदामाचा पोरगा मगरूरीने बोलला, “अरे, कुणासाठी राखतो आहेस जमीन आता? कुठं दहा पोरंबाळं खायची आहेत तुझी? मरायला टेकलास आणि कशाला तुला ही आशा?”
"“अरे, होय होय, मरायला टेकलो म्हणून का मी कृतघ्न होऊ? मरायला टेकलास म्हणून का तू आई दुसऱ्याला विकशील? अरे, मी कसाई नाही. मी माझी जमीन विकणार नाही. गुरंढोरं विकणार नाही. जमीन पडून राहील. माझी जनावरं माझ्या दावणीला मरतील. तू जा, चालता हो!”
"आणि अप्पांनी धाडकन कवाड लावून घेतले.
"आकाशात ढग भरभरून आले आहेत. पावसाने वारा घातला आहे. गार वारा रस्त्यावरची धूळमाती, केरकचरा चौफेर उधळून लावतो आहे. झाडांचे शेंडे गदगदून हलत आहेत.
"आला… आला… पहिला पाऊस आला! टपोऱ्या थेंबांनी जमिनीवर तिरकस उड्या घेतल्या. धुळीवर त्यांचा टपटप आवाज झाला. काळे-करडे ठिपके उठले. मातीचा खमंग सुगंध दरवळला.
"अंग आखडून आईशेजारी उभे राहिले अप्पांचे वासरू बावरले. कान उभारून इकडे-तिकडे बघू लागले. फेंगड्या पायांनी दौडत गेले. पावसातून पळत ओसरीवर चढले आणि अप्पांच्या पाशी जाऊन उभे राहिले.
"अंगाभोवती घोंगडी लपेटून बसलेले अप्पा वरुणाची ही कृपा भरल्या डोळ्यांनी बघत होते. ते त्या वासराला जवळ घेऊन म्हणाले, “पाऊस आला! बेटा, आता आळशासारखं बसून भागणार नाही. कामाला लागलं पाहिजे!”
................................................................................................
.................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
April 1966,
January 05, 2022 - January 05, 2022.

"धोंड्या-दगडांतून वाहणारा प्रवाह लेले मास्तरांनी बांध घालून अडविला आणि त्याला वळण दिले. तो मुरमाडीत जाऊन न आटता सारखा खळाळत राहावा, अशी व्यवस्था केली.
"रोज पाच मैलांची पायपीट करून मला शाळेत यावे लागे. जेव्हा हे मास्तरांच्या ध्यानी आले, तेव्हा त्यांनी मला आपल्या घरीच ठेवून घेतले. वर्षाकाठी लागणारे धान्य देऊन मी मास्तरांच्या घरीच राहू लागलो आणि मग हळूहळू त्या घरातील प्रत्येक माणूस माझ्या चांगले परिचयाचे झाले. त्यांचे आत-बाहेर मला समजू लागले."
"जाताना जेव्हा मी त्यांच्या भोवती-भोवती घोटाळत राहिलो, ‘मास्तर, हे बांधू का? ते ठेवू का?’ असे विचारीत राहिलो, तेव्हा मास्तर मला म्हणाले, “बरं आहे व्यंकोबा. आम्ही आता चाललो. मागं एकवार मी तुला बोललो होतो की, मी हिशेब लिहितो, तो तुला कळणार नाही; पण आता तो तुला कळेल. हे चोपडं घेऊन जा. ते वाच आणि तुझ्यापाशीच ठेवून घे!”
"आणि ते चोपडे, आयुष्याचा तो जमाखर्च माझ्याकडे देऊन माझे भले मास्तर गाव सोडून निघून गेले.
"माझे शिक्षण तिथेच संपले!"
................................................................................................
.................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
January 05, 2022 - January 05, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
५. गुणा आई
................................................................................................
................................................................................................
"एखाद्या पोक्त बहिणीने आपल्या भावाच्या बायकोचे करावेत, तसे गुणा आईने माझ्या खऱ्या आईचे लाड केले. तिची हौसमौज केली. आपल्या सवतीला इतके करणारी ही खरोखरीच कोणी अलौकिक बाई आहे, असे गावकऱ्यांना आणि माझ्या आई-बापांनाही पटले. आता ते गुणा आईला फार मान देऊ लागले. तिला भिऊ लागले. काही महत्त्वाच्या गोष्टी तिच्या सल्ल्याशिवाय होईनाशा झाल्या ... "
................................................................................................
.................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
January 05, 2022 - January 05, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
६. नामा सुढाळाचे सुख-दु:ख
................................................................................................
................................................................................................
"काळ्या रानातून पोपटी कोंब उभे राहिले. ऊन खाऊ लागले. हलकेच त्यांच्या अंगाशी लपलेली पाने सुटी झाली. वाऱ्याच्या झुळकीबरोबर पाती हलू लागली. कोंब झपाट्याने वाढू लागले. सारे शिवार हिरवेगार दिसू लागले. बघता-बघता काल पेरलेल्या बियांची दोन-दोन विती रोपे डुलू लागली. शेतकरी म्हणू लागले, “एक भीजपाऊस पाहिजे. शिवारातून एकवार पाणी खेळलं पाहिजे. मग हे पीक त्यावर गुडघ्या-मांड्याला येईल.”
"आणि आशाळभूतपणे ते आभाळाकडे बघू लागले.
"मग एके दिवशी दुपारी ऊन तावताव तावले. माणसांच्या अंगाची काहिली झाली. टवटवीत कोंब या सणाक्याने कोमेजले. तिसऱ्या प्रहराच्या सुमारास पांढऱ्या स्वच्छ आभाळात राखी रंगाचा एक ढग कुठूनसा आला आणि बघता-बघता आभाळ झाकोळून आले. झोंबरा वारा सुटला. गर्द काळ्या-निळ्या ढगांवर वीज चमकारे मारू लागली आणि पाऊस कोसळू लागला. झाडेझुडपे आणि रानातली कोवळी ताटे खाली माना घालून तो मारा सोशीत राहिली.
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
.................................................................................................
................................................
................................................
January 05, 2022 - January 05, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
७. धार
................................................................................................
................................................................................................
"अलीकडे तिने रोज फिरायला जाण्याचा आपला आग्रह विचारपूर्वक सोडून दिला होता. गेले चार दिवस तिने श्री. भिड्यांना हवी ती स्वस्थता दिली होती आणि तीसुद्धा न चिडता, चेहऱ्यावर एवढीसुद्धा नाराजी न दाखविता. त्यांना आवडत होते, म्हणून ती सभ्य, पोक्तपणे वागत होती आणि तशा वागण्यामुळे श्री. भिडे समाधानी होते, हे तिला कळत होते.
"दुपारच्या वेळी शालिनी अशी बसून राहिली होती. एप्रिलमधल्या उन्हाने सारे वातावरण मरगळून गेले होते. चोहीकडे शांतता होती आणि तिचा भंग करणारी एक हाक एकाएकी उठली, “धाऽऽर… चाकू-कात्रीला धाऽऽर…”
"ही हाक शांततेला कापीत गेली. उगीच बसून राहिलेल्या शालिनीचे अंग शहारले."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
.................................................................................................
................................................
................................................
January 05, 2022 - January 05, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
८. बळीची गोष्ट
................................................................................................
................................................................................................
" ... शेवटी मध्यान रात्रीला संभूची संबंधित मंडळी परत आली आणि काळोख्या रात्री चिता धडधडू लागली, तेव्हा ती बाई तिथं आली आणि चितेभोवती पाकोळीसारखी फिरू लागली. काही का म्हणा ना, पण तिचा जीव खरा त्या पोरावर!"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
.................................................................................................
................................................
................................................
January 05, 2022 - January 05, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
९. अनुभव
................................................................................................
................................................................................................
"मी म्हणालो, “इच्छा असली, खरंच पश्चात्ताप झाला, तर बदलेल. वाल्या कोळ्याचा वाल्मीकी नाही का झाला?”"

"कसे सुरेख ऊन पडले होते! आभाळ निळे झुळझुळीत दिसत होते. वारा अगदी शांत होता. सूर्य वर-वर चढत होता. डोंगरावरून खाली धावणारे पाणी मंजूळ आवाज करीत होते. गवताच्या पात्यांवर चमकणारे बारीक थेंब एकाएकी नाहीसे होऊ लागले होते. ओलीचिंब झालेली झाडे सुकत चालली होती. खोडे, दगडगोटे कोरडे होत होते. पाऊस बिलकूल थांबला होता."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
.................................................................................................
................................................
................................................
January 05, 2022 - January 05, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
११. दरवेशी
................................................................................................
................................................................................................
"त्याची ही दशा बघून पुष्कळांनी सांगितले, “नब्या, गाढवीच्या! अस्वल काढून टाक, नाहीतर पाय खोडून उपाशी मरशील!”
"पण तो हटवादी दरवेशी म्हणाला, “मेलो तर अगोदर मी मरेन आणि मग माझं अस्वल. मालक, जसं तुमचं खोंड, तसं मला हे अस्वल. या जनावरावर माझा फार जीव आहे.”
"“अरे होय; पण सुरी सोन्याची झाली, म्हणून कुणी काळजात खुपसून घेर्इल का? भल्याभल्यांनी जनावरं काढली आणि तू या अस्वलासाठी रोज शेर-अडीसरीचा खर्च करतोस.”
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
.................................................................................................
................................................
................................................
January 05, 2022 - January 05, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
१२. माझं गुणी जनावर
................................................................................................
................................................................................................
"माझ्या बहुगुणी जनावराची जुनी खोड अद्यापही गेलेली नाही. अद्यापही ते रात्री आपल्या धन्याकडे पळून जातं. मग माझा सासरा त्याला पोचवण्यासाठी त्याच्यावर बसून माझ्या घरी येतो. चार दिवस राहतो. मुलीच्या आर्इला तिला बघायची आहे, असं सांगून माझ्या बायकोला त्याच घोड्यावर बसवून गावी जातो. चार-सहा महिने पोरांबरोबर झट्या घेत मला काढावे लागतात आणि मग घोडं अन् मुलगी पोचवायला म्हणून सासरा येतो. निरोप घेऊन परत जाऊ लागतो, तेव्हा त्याची प्रेमळ मुलगी म्हणते, “पायी जाऊ नका. घोडं न्या. गड्याकडून धाडा, म्हणजे झालं!”
"आणि तो ते ऐकतो. घोडं घेऊन जातो. चार-सहा महिने त्याचा आणि घोड्याचा पत्ता नसतो. मग केव्हा तरी सणावाराच्या अगोदर तो अचानक येतो, घोड्यावर बसून येतो आणि हलक्या शब्दांत मला म्हणतो, “मुलीला पंचमीसाठी न्यावी म्हणतो; धाडता का?”
"असं चाललं आहे!"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
.................................................................................................
................................................
................................................
January 05, 2022 - January 05, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
१३. गोकुळा
................................................................................................
................................................................................................
"“अरे, सोबतीला बरा आहे हा पठाण, म्हणून मी नेहमी बाजारहाटाला तिच्या सोबतीनं जात होतो. नडी-अडीला तिच्या घरचे चार-आठ पायली जोंधळे मिळतात, म्हणून मी आपला लागून होतो तिला.”
"“बरं, मग?”
"“परवा चक्क तिनं मला विचारलंन रे!”"
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
January 05, 2022 - January 05, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
१४. कमळी
................................................................................................
................................................................................................
"“घरी कुणाला माझ्याविषयी काही वाटत नाही बघ. आता वाटतं, उगीच आले दिवाळीला इकडे; त्यांनी बोलावलं नसताना. राहिले असते तिकडेच, तर बरं. आता पुन्हा नाही कधी येणार!”
"“आईसुद्धा माया करीत नाही तुझी?” मी विचारी.
"“कुण्णी नाही. सारी हिडीसफिडीस करतात.” आणि डोळ्यांतून पाणी येईल, या भीतीनं कमळी लगेच निघून जाई."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
.................................................................................................
................................................
................................................
January 05, 2022 - January 07, 2022.

by Vyankatesh Madgulkar
................................................
................................................
August 22, 2021 - January 07, 2022
Purchased August 22, 2021.
Kindle Edition, 132 pages
Published by
MEHTA PUBLISHING HOUSE
ASIN:- B01NBLVPXL
................................................
................................................
Purchased August 22, 2021.
Kindle Edition, 132 pages
Published by
MEHTA PUBLISHING HOUSE
ASINB01NBLVPXL
................................................................................................
................................................................................................
KALI AAI
by VYANKATESH MADGULKAR
काळी आई । कथासंग्रह व्यंकटेश माडगूळकर
© ज्ञानदा नार्इक
मराठी पुस्तक प्रकाशनाचे हक्क
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे.
प्रकाशक सुनील अनिल मेहता,
मेहता पब्लिशिंग हाऊस,
१९४१, सदाशिव पेठ,
माडीवाले कॉलनी, पुणे – ४११०३०.
अनुक्रम
१. सर्व्हिस मोटार
२. या दत्तारामचे झाले काय?
३. काळी आई
४. लेले मास्तर
५. गुणा आई
६. नामा सुढाळाचे सुख-दु:ख
७. धार
८. बळीची गोष्ट
९. अनुभव
१०. खेळ
११. दरवेशी
१२. माझं गुणी जनावर
१३. गोकुळा
१४. कमळी
Publisher: MEHTA PUBLISHING HOUSE
(1 January 1982)
Language: Marathi
ASIN: B01NBLVPXL
................................................................................................
.................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4452961486