................................................................................................

डोहातील सावल्या
DOHATIL SAVLYA
कथासंग्रह व्यंकटेश माडगूळकर
by VYANKATESH MADGULKAR.
................................................................................................
................................................................................................
These stories by the author are a tad different from his usua oeuvre of village life with extra dose of realism that makes one realise that the usual gamourisation is false - here, there's all sorts of glamour, without letting reality get out of touch!
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
अनुक्रम
१. मोर बघायला कोरेगावला
२. जत्रेच्या रात्री
३. करिअप्पानंतर मीच
४. प्रदर्शन
५. पर्जन्यात् अन्नसंभव:...
६. पिकासोचे घुबड
७. कबुतरे
८. बाबा रामोश्याची कहाणी
९. जना
१०. एक होते टिळेकर – त्यांच्यासंबंधी
११. डोहातील सावल्या
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
"१. मोर बघायला कोरेगावला"
................................................................................................
................................................................................................
"ओढा कोरडाच होता. पात्रात शिंदीची खुरटी झुडपे होती. दोन्ही काठांना झाडी होती, त्या पलीकडे शेते होती. कुठं चिंचेची डेरेदार झाडे, कुठं उंच भव्य पिंपळ, कुठं भोकर, कुठं उंबर, कुठं बांधावर चंदन.
"दोन्ही काठांवरच्या शेतमळ्यांतून उसाचे फड होते. लोंब्याला आलेली वरई होती. शेंगा भरलेला मूग होता. हायब्रीड ज्वारी होती.
"पिकाचा सुगंध सकाळच्या थंड हवेत भरून राहिला होता."
................................................................................................
"वरईचे शेत वार्याच्या झुळकीने हलत होते. नाजूक पाती हलत होती. केशरी लोंब्या हिंदकळत होत्या. ओढ्याचा काठ धरून बांधाबांधाने हलकेच मी चाललो होतो.
"पलीकडे, शेताच्या मधे लहानसं बाभळीचे झुडूप होते. त्याच्या आडोशाने आमचा सावट घेत उभा असलेला कोरेगावचा पहिला रानमोर मला दिसला.
"आपला लांब पिसारा तोलून, गर्द निळी मान उंचावून ऐटबाजपणे तो उभा होता. तो डोईवरचा तुरा, ते मखमली-झगमगते रंग, तो चित्रमयी आकार, वळसे, वेलांट्या, अर्धचंद्र, गडद ठिपके.
"यापेक्षा अधिक ऐटबाज, अधिक रंगीत, अधिक चपळ आणि सावध असा दुसरा पक्षी निदान या जगात तरी नाही."
................................................................................................
"जगात फक्त दोन जातींचे मोर आहेत. एक भारतीय मोर (Pavo Cristatus) आणि हिरवा जावा मोर (Pavo Muticus). हिरवे मोर ब्रह्मदेश, थायलंड, मलाया, जावा इकडे आहेत. मात्र सुमात्रा, बोर्निओत नाहीत. भारतीय मोरापेक्षा हिरवा मोर जास्ती मोठा आणि जास्ती सुंदर असतो. त्याच्या डोक्यावरचा तुरा गर्द हिरव्या रंगाच्या पिसांचा असतो. पिसाराही प्रामुख्याने चमकदार हिरव्या रंगाचाच असतो. ‘जोराचा पाऊस होऊन गेल्यावर मोरांचे सुंदर पंख गळू लागतात. कोरेगावच्या मोरांचे पंख दसर्यानंतर गळायला सुरुवात होते’, असे गावकरी म्हणाले. दसरा ते चंपाषष्ठीपर्यंत पंख गळतात. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात पिसारा अगदी कमी दिसू लागतो.
"वयाच्या दुसर्या वर्षापासून नर मोरांना पिसारा दिसू लागतो आणि सहा वर्षांपर्यंत तो वाढत राहतो.
"पिसारा हे त्याचे सर्वांगात सुंदर अंग. लावण्यवतीने रूप जपावे तसा मोर पिसारा जपतो. शंभर ते दीडशे पिसं यात असतात.
"‘जानेवारी ते ऑक्टोबर या काळात लांडोर्या फळतात. अंडी घालतात, पोरं जन्मतात’, असे ग्रंथ सांगतात. या काळात मोरांच्या केका सारख्या उठत असतात. ‘आभाळात गडद निळे जलद भरूनि आले की, मोरांची कामवासना उद्दीपित होते’, असे डॉ. देशमुखांनी सांगितले. अशा वेळी मोर आपला मनोहर पिसारा एखाद्या पंखाप्रमाणे उघडतो. या उघड्या पंखाला आधार मिळतो तो मोराच्या शेपटीच्या ताठ पंखाचा. म्हणजे पिसारा हे काही मोराचे शेपूट नव्हे, ते वेगळे देणेच आहे. हा पिसारा उघडला म्हणजे झगमगाट होतो. हिरवा, जांभळा, निळा, किरमिजी अशा रंगांची उधळण होते. मोर पिसार्याचा उघडलेला पंखा वरचेवर पुढं झुकवतो. पुनःपुन्हा रंग झगमगतात. रेशमी वस्त्रांची सळसळ ऐकू येते, तसा पंखाचा आवाज येत राहतो. भोवती लांडोर्या जमा होतात. त्यातली एखादी वाफेवर असते, ती जवळ येते. लागलीच मोर तिला झडपतो.
"रानातला मोर फार सावध असतो. मला दिसलेला मोर काही क्षण एका जागी होता. लगोलग वरईच्या धाटांचा आडोसा घेत-घेत तो बांध ओलांडून हायब्रीड ज्वारीच्या रानात उतरला आणि दिसेनासा झाला.
................................................................................................
"बोलता-बोलता समोर लक्ष गेले. मोकळ्या रानातून मोर चालला होता. त्या पाठोपाठ उसाच्या कडेला एक लांडोर दिसली. ओढ्याच्या पात्रात शिंदीच्या जाळकटीला आणखी एक दिसला. थोडा वेळ होता, तरी सहा-सात मोर बघायला मिळाले."
"ओढ्याच्या दोन्हीही काठांना मोरांच्या नाचायच्या जागा होत्या. कोणी गुराखी मुलं, कोणी रानातल्या बायका आवर्जून सांगत होत्या, ‘‘रोज ह्या हितं सकाळचा नाचतो बघा. असा वढ्यातून येतो आन् हितं नाचतो.’’"
"पण, आता हा सप्टेंबर महिना होता. एव्हाना माद्यांनी अंडीसुद्धा घातली असतील. मोर कशासाठी आता नाचणार? बघायला आलेल्या प्रेक्षकांनाही आपल्या पिसार्याची शोभा दाखवायला हे काही प्राणिसंग्रहालयातील मोर नव्हते. मोराने मला असे दोन वेळा चकित केले होते. एकदा म्हैसूरच्या प्राणिसंग्रहालयात मोराने पिसारा उघडला आणि मला दाखवला. अगदी परवा-परवा, सप्टेंबरमध्ये त्रिवेंद्रमच्या प्राणिसंग्रहालयातही हाच अनुभव आला. लोकांची झुंबड पिंजर्याभोवती पडताच मोराने पिसारा उघडला आणि जवळजवळ दीड मिनिट तो फिरून सर्वांना दाखवला. नाचताना मागे झाडाचा बुंधा, ओढ्याची दरड, वारूळ अशी काही तरी पार्श्वभूमी म्हणून मोर घेतो, असे दिसते. घराच्या छपरावर आणि झाडांच्या फांदीवरही मोराने पिसारा उघडल्याचे बघितल्याची नोंद काही निरीक्षकांनी केली आहे."
................................................................................................
"आज किती मोर आहेत याची चौकशी केली, तेव्हा बर्याच जणांकडून अदमास कळला. एकूण चाळीस ते पन्नास पाखरे असावीत.
"संध्याकाळी पुन्हा रानात आलो.
"वरई-मुगाच्या शेतातून लाजर्या मोरांचे दर्शन पुनपुःन्हा होत होते. नाचणारा मोर मात्र आढळला नाही."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................

December 25, 2021 - January 01, 2022

"आमच्या गावच्या आसपास दहा-वीस कोसांच्या आत बरीच देवस्थाने होती. आटपाडीला उत्तरेश्वर होता. खरसुडीला सिद्धनाथ होता. करगणीला श्रीराम होता. या सर्वांच्या नावाने तुफान जत्रा भरत. कुठे कार्तिकी पौर्णिमेला, कुठे पौषी पौर्णिमेला, तर कुठे माघी अमावस्येला. हौशे, नवशे, गवशे अशा अठरापगड जातीच्या माणसांची जत्रेच्या ठिकाणी मर्कण्ड पडे. हौशे हौस फेडून घ्यायला येत, नवशे नवस फेडायला येत आणि गवशे काही गवसेल या आशेने जमत. माणसांची एवढी प्रचंड गर्दी जमते म्हटल्यावर नाना लहान- मोठे व्यापारीही गोळा होत. हलवाई, भडभुंजे, मणेरी, तांबोळी, सणगर, वाणी, घिसाडी, तांबट, बुरूड, मांग या सर्वांचीही गर्दी होई. हारीने पाले उभी राहत, राहुट्या पडत, दुकाने मांडली जात. कुठे रसाची गुर्हाळे लागत, कुठे जुगारी पट मांडून बसत, कुठे हॉटेलची रांग बसे, तर कुठे कापड आळी उभी राही.
"जनावरांचा बाजार फार मोठा भरे. खिलारी खोंडे, गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, घोडी घेऊन लांबलांबचे लोक येत.
"आमच्या गावाचेही लोक जत्रेला निघत. कुणी देवाला, कुणी बैलजोडी घ्यायला, तर कुणी खोंड विकायला. मग मुद्दाम जत्रेच्या निमित्ताने जरीचे फेटे बासनातून निघत. बैलांच्या शिंगांना पितळी शेंब्या घातल्या जात, गाडीवर नवा तट्ट्या बसे. घरचीच गाडी जातेय म्हटल्यावर आयाबायांनाही हुरूप येई. शिंगांना गोंडे आणि गळ्यात चंगाळ्या बांधलेल्या खिलारी बैलजोड्या, तट्ट्याच्या गाड्यांना जुंपून चांगल्या दहा-वीस गाड्या निघत. आत कबिला असल्यामुळे ह्या गाड्यांना पडदे असत. गाड्यांच्या मागे नव्या कासर्याला बांधलेली विक्रीची जनावरे असत. भल्या सकाळी गाड्यांची रांगच्या रांग खरसुडीच्या वाटेला लागे."
"गावच्या गाड्यांचा तळ कुठे तरी एकत्र पडे. तिथेच सोडलेल्या गाडीच्या आडोशाला दाटीवाटीने आम्हीही आपल्या पिशव्या टाकत असू. उघड्या वार्यावर, खाली वैरण आणि अंगावर चादर असे घोळामेळाने झोपत असू. झोपेची आणि अंथरुणा-पांघरुणाची काळजी करायला रात्रच अपुरी असे. कारण जत्रेला बहर येई तो दिवस मावळल्यानंतरच. कावळ्यांची काव-काव, गुरांचे हंबरणे, घंटांचा आवाज, लोकांची गवगव, धुरोळा, चिपाडाच्या धुराचे आणि तव्यावरल्या भाकरीचे वास उसळले जात असतानाच, पश्चिम दिशा लालेलाल होऊन दिवसाचा देव डोंगराआड बुडे आणि आभाळात चांदण्या चमकारे मारू लागत.
"पाला-दुकानांतून, हॉटेल-खानावळीतून दणक्याने फोनो वाजत. गॅसबत्त्या, कंदील, पलिते, शेकोट्या जिकडे-तिकडे पेटलेल्या दिसत आणि पटांगणातून वाळवंटात तमाशाचे फड उभे राहत. आमची रात्र तमाशा बघण्यात जाई. तशी इतरही करमणूक असे. कुठे भेदिकांचा फड रंगलेला असे. कुठे चार धनगर मंडळी एकत्र जमून ढोलाच्या तालावर धनगरी ओव्या म्हणत असत, पण सगळी गर्दी तमाशाच्या दिशेनेच सरके."
................................................................................................
"सकाळी हॉटेले पुन्हा गजबजत. ‘पेशल च्या, भज्जी गर्म, शिरा, जिलाबीऽऽ’ अशा पोरांच्या आरोळ्या उठत. जत्रा हलू-बोलू लागे.
"असा धडाका सात-आठ दिवस चाले. कनवटीचे पैसे आणि बांधून आणलेल्या बाजरीच्या भाकरीचे तुकडे उडत. हळूहळू जत्रा फुटू लागे. नदी- नाल्यांना आलेला पूर ओसरावा तशी गर्दी ओसरे. पाले-राहुट्या गुंडाळल्या जात, गाड्यांचे तळ मोकळे होत. दुकाने, हॉटेले उठून जात.
"परत निघालेल्या बैलगाड्यांची बावखाडे पकडून आम्ही गावाकडची वाट धरीत असू. जत्रेच्या आठवणी बराच काळ मनात रेंगाळत. जत्रेच्या आणि जत्रेच्यारात्रीच्या–"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
January 01, 2022 - January 02, 2022

"दुपारी साडेचारच्या सुमाराला मी ब्रिस्बेनच्या विमानतळावर गेलो; तेव्हा आभाळ कुंद झाले होते, झिरीमिरी पाऊस पडत होता.
"सिडनीहून उतारू घेऊन विमान आले, त्याच्या पाठोपाठ मेलबोर्नहून दुसरे आले. दोन्हीही विमानांतून उतारू उतरू लागले आणि इकडे, आपल्या माणसांना घ्यायला स्त्री-पुरुषांचा रंगीबेरंगी मेळावा कठड्याशी लागून वाट बघत होता. वार्याने फुलांचा ताटवा हलावा तसा तो हलू लागला. गोरे-गोरे हात वर झाले, चिमुकले रुमाल फडफडले, लाल चुंबने हवेत उडवली गेली. सिडनी-मेलबोर्नहून आलेले उतारू, खाली माना करून कपडे सावरत पावसातून येऊ लागले तशी हवाई पर्यांची धांदल उडाली. छत्र्या घेऊन त्या उतारूंना आडव्या केल्या. आपल्या छत्रीत घेऊन विमानतळाकडे येऊ लागल्या."
................................................................................................
"तेवढ्यात केर्न्सला जाणार्या उतारूंसाठी पुकारा झाला. पावसातून भिजत मी विमानात चढलो आणि उतार्या जागी जाऊन बसलो. बाहेर पाऊस पडतच होता. गोल खिडकीच्या काचेवर पाण्याचे थेंब चिकटून राहिले होते.
"विमानाने वेग घेतल्यावर काचेवरचे थेंब मासे होऊन सुळकन दुसर्या टोकाशी गेले. काळे ढग मागे टाकून लवकरच विमान स्वच्छ हवेत आले. छान कोवळे ऊन पडले होते आणि खाली आलेल्या पांढर्याफेक ढगांच्या ढिगार्यावरून आम्ही केर्न्सच्या दिशेने चाललो होतो.
"हवाई पर्यांनी मद्याचे पेले फिरवले, तेव्हा खाली सागराचे निळेभोर पाणी होते. नाना सोंगे घेऊन ढग उभे होते. संध्याकाळ होत होती. काचेला नाक लावून मी मावळतीचे रंग पाहत होतो. मन कसे फुलून आले होते... कसे प्रसन्न वाटत होते! हा प्रवास कधीच संपू नये आणि हे रंग कधीच नाहीसे होऊ नयेत, असे वाटत होते. पण सुरेख संध्याकाळ फार लवकर नाहीशी झाली."
................................................................................................
"मग गिल्बर्टनी मला विचारले, ‘‘तुला डॉनसिंगला भेटायचे आहे का? मी घेऊन जाईन त्याच्याकडे. तो तुझ्या देशातला आहे. चार पैसे बाळगून आहे. चांगला शेतकरी आहे.’’
"मी म्हणालो, ‘‘जाऊ या.’’
"लगेच साहेबाने डॉनसिंगला फोन केला आणि वीस-एक मिनिटांनी आम्ही डॉनसिंगच्या मळ्यावर पोहोचलो.
"हा डॉन म्हणजे पंजाबी ग्यान होता. ऑस्ट्रेलियात मला भेटलेला पहिला हिंदी माणूस. शंभर वर्षांपूर्वी त्याचा बाप इकडे उसाची लागवड करणारा शेतमजूर म्हणून आला, तेव्हा आजची ‘व्हाईट ऑस्ट्रेलिया पॉलिसी’ नव्हती. काळ्या माणसांना तेव्हा ऑस्ट्रेलियात येऊ दिले जात असे आणि राहू दिले जात असे.
"डॉनने आमचे छान आगतस्वागत केले, खाऊ-पिऊ घातले... बोलता-बोलता तो मध्येच म्हणाला, ‘‘साब, हिंदुस्थानी आती है?’’
"मी म्हणालो, ‘‘जरूर! क्यूँ नहीं? यह तो अपनी राष्ट्रभाषा है, ग्यानसिंग!’’ डॉनचा चेहरा एकदम उजळला. तो म्हणाला, ‘‘मला तिकडचे कोणी आले की, फार आनंद होतो. पण हे साहेब पाहुण्याला अगदी थोडा वेळ घेऊन येतात. घंटा-दोन घंट्याने भूक भागत नाही. चार दिवस माझ्या घरी राहिले पाहिजे.’’
"मग त्याने मला आपली ‘गन्ने की खेती’ दाखवली. शंभर एकर रान, अद्ययावत यंत्रसामग्री – सगळे टापटीप होते. रानातले घर म्हणजे सुरेख बंगला होता. फोन, फ्रीज असल्या सगळ्या सुखसोई होत्या, गाड्या होत्या.
"बंगल्यापुढचे ‘इमली’चे झाड त्याने मला कौतुकाने दाखवले. पन्नाशीच्या पुढे गेलेल्या डॉनने बहुधा ऑस्ट्रेलियन बाईशी लग्न केले असावे. बाई दिसल्या नाहीत, पण डॉनचा पोरगा होता. तो पुरा ऑस्ट्रेलियन वाटत होता. ग्यानसिंगचे दोन भाचे काही वर्षांपूर्वी भारतातून आले होते. आम्हा दोघांना हिंदीतून बोलताना पाहून त्या पोरांना मजा वाटत होती. काही न बोलता ते आपले हसर्या चेहर्याने नुसते ऐकत होते.
"शेवटी डॉन म्हणाला, ‘‘साब, आपण लोक इंग्रजांसाठी लढाईवर गेलो, त्यांच्या शत्रूला आपला शत्रू मानून छातीवर गोळ्या झेलल्या. पण आमच्या ह्या सच्चाईचा काय फायदा? तर ही व्हाईट ऑस्ट्रेलिया पॉलिसी! ‘हमे जहर जैसी लगती है।’ इथं कामाला माणसं मिळत नाहीत म्हणून, हे माझे भाचे शेतकामासाठी देशाकडनं आणले. ते आता वयात आले. त्यांची लग्नं करावी म्हटलं, तर त्यांच्या बायका इकडं आणायला इथलं सरकार परवानगी देत नाही.’’
"डॉन मधूनच माझ्याशी हिंदीतून बोले आणि एरवी मजेशीर हेल असलेल्या फाकड्या इंग्रजीतून बोले. दोन्हीही साहेब ऐकत होते, पुष्कळ वादविवाद झाला.
"गिल्बर्टसाहेब म्हणाला, ‘‘डॉन, व्हाईट ऑस्ट्रेलियन पॉलिसीचा अर्थ आम्ही काळ्या लोकांना दूर ठेवू इच्छितो, असा नाही बाबा. आम्हाला काळे-गोरे हा झगडा या देशात नको, म्हणून आम्ही आपले सांभाळून आहोत, इतकेच. तू इतके दिवस इथे आहेस. तुला कोणी कधी काळा म्हणून कमी मानले आहे का? नाही ना? मग?’’
"पण ग्यानसिंगला काही पटले नाही. त्याचे भाचे वयात आलेले असून मोकळे राहिलेत, याचा अर्थ काय?
"मग आम्ही डॉनसिंगचा निरोप घेऊन निघालो. बाहेर पडल्यावर गिल्बर्टसाहेब म्हणाला, ‘‘डॉन इंडियन कसला? तो आता ऑस्ट्रेलियनच झाला आहे. त्याला शेतकर्यांत, समाजात फार मान आहे. फार उमदा शेतकरी आहे!’’"
................................................................................................
"आथरटन टेबललँडवरुन दिवसभर आम्ही काहीबाही पाहत हिंडलो. आंब्याच्या झाडांना कैर्या दिसल्या, एके ठिकाणी मिरचीचे भले उंच एकच झाड दिसले. मी गुपचूप मूठभर मिरच्या तोडून खिशात ठेवल्या. तोंड फार अळणी झाले होते. हॉटेलात जेवायला जाताना मिरच्या घेऊन जावे आणि जीभ पोळवावी, हा हिशेब. (केलेल्या सबंध मुक्कामात हे तिखट मला पुरले.)"
"निळ्याभोर दर्यातून ग्रीन आयलंडकडे लाँच जाऊ लागली, तेव्हा चाक मारणारा नाकेला कप्तान माझ्याकडे बघून म्हणाला, ‘‘यू आर सेकंड इंडियन दॅट आय एम कॅरिंग इन धिस लाँच टू ग्रीन आयलंड!’’
"मी विचारले, ‘‘अॅम आय? मे आय नो प्लीज हू वॉज द फर्स्ट फॉर्च्यनेट वन?’’
"कप्तान बोलला, ‘‘जनरल करिअप्पा.’’
"मी सावरुन बसलो.
"कप्तान पुढे म्हणाला, ‘‘आय रेकन, ही इज ए मायटी मॅन.’’
"मी भिवया चढवून आणि मान झुकवून म्हणालो, ‘‘माय वर्ड –’’"
"मऊ वाळूत पाय रोवत हिंडलो, गार सावलीत उभा राहिलो, समुद्रावरचा खारा वारा हुंगला, गर्द झाडीतून भरारणारी पाखरे पाहिली. बॉबला चुकवून झाडीत शिरलो. थंड बुंध्याला विळखा घालून जागीच उभा राहिलो. उत्तम कविता वाचली, चित्रपटातला उत्तम प्रसंग पाहिला, कुणी लिहिलेला सुंदर प्रसंग वाचला की, डोळ्याला पाणी येते तसे झाले. समोर, क्षितिजापर्यंत पसरलेल्या सागराकडे बघत मी किती तरी वेळ उभा राहिलो.
"बेटाच्या एका अंगाला पाण्यातला बराच भाग उघडा पडला होता. पाऊल बुडेल एवढ्या पाण्यातून हिंडून मी आणि बॉबने नाजूक प्रवाळ झेले गोळा केले. विविध आकारांचे प्रवाळ सापडत होते, एकापेक्षा दुसरे अधिक सुंदर. शिंपल्या वेचणार्या पोरांसारखी आमची धांदल उडाली."
"बेटावर ऑब्झर्वेटरीपर्यंत आलेला छोटासा लाकडी पूल पार करून गेल्यावर, पाण्याने झाकलेली लहानशी लाकडी खोली होती. या खोलीत शिरून आम्ही तीस-एक पायर्या उतरून पाण्याखाली सोळा फूट गेलो. खाली सत्तर टन वजनाची पोलादी चेंबर होती आणि तिला दोन्ही अंगांना मिळून बावीस गोल खिडक्या होत्या. खिडकीच्या जाड काचेला नाक लावून पाहिले की, पाण्यातले अद्भुत जीवन दिसत होते. प्रवाळाच्या बागा, नाना रंगांचे, नाना जातीचे मासे, समुद्रमुळे, लहानशा मुलाला आत बसवून न्हाऊ घालता येईल एवढ्या प्रचंड शिंपा!
"निळ्या पाण्यात रंगांची उधळण होती, रंगीबेरंगी प्रकारचे झेले डोलत होते. प्रचंड शिंपल्यांची तोंडे हलत होती. सारडीनसारख्या माशांच्या झुंडीच्या झुंडी येत होत्या आणि जात होत्या. अंगावर लाल पट्टे असलेले विदूषक जसे प्रवाळातून सावकाश हिंडत होते! किती रंगांचे, किती आकारांचे, किती जातींचे प्रवाळ होते.
"पुष्कळशा खिडक्यांतून तार्यांच्या आकाराचे ‘CORAL POLYPS’ दिसत होते. पाण्याच्या झुळुकांबरोबर ते धुगधुगत होते. आपल्या डोळ्यांना न दिसणारे अन्न गोळा करीत होते. या लहान जीवांनीच म्हणे सबंध क्वीन्स लँडच्या सागरकिनार्यावर बाराशे मैल लांबीचा ‘ग्रेट बॅरिअर रीफ’ हा प्रवाळखडक निर्माण केला."
"पाव टन वजनाचे आणि चार-सहा फूट लांबीचे शिंपले तोंडे उघडत होते, मिटत होते. एवढे महाकाय शिंपले जगात इतरत्र कुठेही सापडत नाहीत. समुद्रतळाशी जाणार्या माणसाला हे शिंपले पकडतात, गिळून टाकतात असा प्रवाद आहे. पण तसे प्रत्यक्ष घडल्याचे उदाहरण नाही.
"तास-दीड तास रेंगाळून मी त्या बावीस खिडक्यांतून सागराचे ते वैभव पाहिले आणि थक्क होऊन वर आलो.
"ही पोलादी खोली पाण्यात बुडवावी आणि शास्त्रज्ञांबरोबर पोराबाळांनीसुद्धा निसर्गाचे हे कवतिक बघावे, ही कल्पना मुळात VINCE VLASOFF आणि LIOYAD GRIGG या दोघा शिकार्यांची होती. एक इंजिनिअर होता, तर दुसरा शिकारी होता. पण दोघेही नादी आणि कल्पक होते. या दोघांनी ही कल्पना लोकांपुढे मांडल्यावर त्यांना कोणी खुळ्यात काढले नाही. बरं, यांनीही नुसत्याच वावड्या उडवत काळ काढला नाही. ते कामाला लागले आणि लोकांकडून त्यांना सगळी मदत मिळाली. आपल्याला या कामात अपयश आले तर काय होईल, अशी भीती ऑस्ट्रेलियात कुणाला वाटत नसावी.
"एखाद्याने प्रयत्न केला आणि त्यात त्याला अपयश आले, तर तिकडे लोक म्हणतात, ‘Well, good on him, he had a go.’
"पंचवीस फूट लांब, आठ फूट रुंद आणि सात फूट उंच असे हे भांडे समुद्रात बुडवायची कल्पना ह्या दोघा बहाद्दरांनी बारा महिन्यांत अमलात आणली. केर्न्सला बांधलेले हे धूड समुद्रातून सात मैल आत कसे नेले आणि कसे बुडवले, हरी जाणे!....
"ते सुंदर बेट सोडून मी पुन्हा लाँचवर चढलो आणि केर्न्सच्या दिशेने निघालो तेव्हा सागर थोडाफार खवळला होता, प्रचंड लाटा उठत होत्या. खार्या पाण्याचे सपकारे आत येऊन अंग भिजवीत होते. आमच्यापैकी कोणीच बोलत नव्हते. बॉब पाय पसरून गप्प बसला होता, कप्तान चाक मारीत होता. त्याचा मदतनीसही गप्प बसला होता. मग मीही गोगलगाईसारखा हळूच आकसलो आणि आपल्या कवचात शिरलो.
"चार दिवसांचा मुक्काम संपवून मी केर्न्सहून लाँगरीचला जाण्यासाठी निघालो, तेव्हा बॉबने आपल्याजवळचा, ओपेलच्या खाणीतला एक सुरेख दगड मला दिला. काळपट, निळसर अशा या जाड दगडावर इंद्रधनुष्यासारखे नाना रंग असलेला ओपेलचा थर होता.
"बॉब म्हणाला, ‘‘केर्न्समधल्या मुक्कामाची आठवण हा रंगीत खडा तुला देईल!’’
"माझ्या लिहिण्याच्या टेबलावर हा दगड मी आता ठेवून दिला आहे."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
January 02, 2022 - January 02, 2022

४. "प्रदर्शन"

"हौसेने उत्तम बंगले बांधणार्या ह्या शहर पुण्यातील घरमालकांना आपल्या हॉलमध्ये दोन-चार चित्रे जरी लावावी वाटली तरी पुरे. अशी प्रदर्शने सालोसाल भरतील.
"मी सहज बोलून गेलो, ‘‘ते खिंडीतील लाल रस्त्याचे चित्र मला फार आवडलंय; पण ते विकले गेलंय!’’
"‘‘जाईना का, मी तुम्हाला पुन्हा करून देईन.’’
"ओशाळवाणे हसून मी म्हणालो, ‘‘हो, पण त्याची किंमत लेखकाला कशी परवडणार?’’
"चित्रकारांनी मनापासून विचारले, ‘‘तुमच्या एका उत्तम कथेला संपादक जेवढी किंमत देतात, तेवढी द्याल?’’
"‘‘अगदी आनंदाने!’’
"‘‘मग हे चित्र मी तुम्हाला दिले!’’
"चित्रकारांनी आपला उष्ण हात माझ्या हातात दिला. तो स्नेहपूर्ण स्पर्श होताच मला मनोमनी वाटले –
"लेखक होऊन आपण तशी, फार मोठी चूक केलेली नाही."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
January 02, 2022 - January 02, 2022
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
५. "पर्जन्यात् अन्नसंभवः..."
................................................................................................
................................................................................................
"‘वॉल्डन’ या आपल्या पुस्तकात थोरोने तक्रार केलेली आहे की, अमेरिकेत कृषिवलांना आपल्या व्यवसायाबद्दलचे पावित्र्य व्यक्त करता येईल असे सण, उत्सव नाहीत. आमच्याकडे किती तरी आहेत. नवान्न पौर्णिमा आहे, बेंदूर किंवा पोळा आहे. नवरात्रात घरात धान्य लावायचे आणि दसर्याच्या मिरवणुकीत त्याचे पोपटी तुरे फेट्यात खोचायचे. सोन्याबरोबर बाजरीची कणसे, लिंबूरही वाटायची. पेरणीआधी तिफण पूजायची. नव्या विहिरीला पाणी लागले की, त्याचीसुद्धा पूजा. काळीला आई म्हटल्यावर पूजा नाही, उत्सव नाही, असे कसे होईल!"
"माणूस हा देवपुत्र कसला, तो निसर्गपुत्रच. दुष्काळी मुलखातल्या लहानशा गावात बालपण गेले म्हणजे पावसाचा मोठेपणा जास्त कळतो.
"काळेनिळे ढग आकाशात जमून कसा गडगडाट होतो... वीजबाई कोसळू नये म्हणून मग घाईगडबडीने अंगणात पहारी टाकायच्या.
"धो-धो पाऊस कोसळला आणि रस्त्यारस्त्यांवर गढूळ तांबड्या पाण्याचे लोट वाहू लागले की –
"‘‘अगाबाबा, मायंदाळ पानी आदाळलं आज!’’ म्हणून ओढा बघायला धावायचे."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
January 02, 2022 - January 02, 2022
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
६. पिकासोचे घुबड
................................................................................................
................................................................................................
About a pet owl owned by Picasso, and much more - his turtledoves that laughed at his serious pronouncements, his femme fleur, ....
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
January 02, 2022 - January 02, 2022
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
७. कबुतरे
................................................................................................
................................................................................................
About a corrupt police officer during independence struggle who reneged on his side of the bargain.

About a dacoit being caught.

About a radio recording officer meeting a witch in a remote village.

About poverty of middle class.

About a man visiting his village and being divided between the young woman he meets - and the city life.
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
January 02, 2022 - January 03, 2022

December 25, 2021 - January 03, 2022
Kindle / ebook
Purchased December 24, 2021.
Published January 1, 2000
by Mehta Publishing house
Edition Language Marathi
ASIN:- B01N5H1JIQ
................................................
................................................
Paperback, 80 pages
Published February 200
by Mehta Publishing house
ISBN:- 139788184983715
Edition Language Marathi
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
डोहातील सावल्या /
कथासंग्रह व्यंकटेश माडगूळकर © ज्ञानदा नाईक
मराठी पुस्तक प्रकाशनाचे हक्क मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे.
प्रकाशक सुनील अनिल मेहता,
मेहता पब्लिशिंग हाऊस,
१९४१, सदाशिव पेठ, माडीवाले कॉलनी, पुणे – ३०.
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
डोहातील सावल्या /
कथासंग्रह व्यंकटेश माडगूळकर
© ज्ञानदा नाईक
मराठी पुस्तक प्रकाशनाचे हक्क
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे.
प्रकाशक सुनील अनिल मेहता,
मेहता पब्लिशिंग हाऊस, १९४१, सदाशिव पेठ, माडीवाले कॉलनी, पुणे – ३०.
Paperback, 80 pages
Published February 200 by Mehta Publishing house
ISBN13:- 9788184983715
Edition LanguageMarathi
................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4436774643