Thursday, January 27, 2022

Goshti Gharakadil, by Vyankatesh Madgulkar.

................................................................................................

Goshti Gharakadil 
by Vyankatesh Madgulkar
................................................................................................
................................................................................................

If one begins reading this, and having begun it, moves on to another work or few more pieces of the autobiographical works of the author before returning, one may assume one knows a lot of the life of the author and his family, of his early years. Returning to thus is surprising. Yes, there are familiar parts, characters, places. But that's like traversing through another part of a familiar hometown. Not at all like reading about the same things, or meeting same people and reliving the same events. 

How an author manages to write newly when writing memories of his early years, is a wonder. 
................................................................................................
................................................................................................
अनुक्रम 

१ | जुन्या घराची आठवण |  
२ | आमचा पाव |  
३ | पाणी |  
४ | शाळा |  
५ | पार |  
६ | ओढा |  
७ | देऊळ |  
८ | दादा |  
९ | तात्या |  
१० | क |  
११ | माझे वडीलबंधू |  
१२ | आजीने पाहिलेला चोर |  
१३ | पाव्हणा |

Reviews 

" ... नानांनी लावलेले हे लिंबाचे रोपटे पुढे केवढेतरी मोठे झाले. उन्हाळ्यात त्याची सावली अंगणाचा बराचसा भाग व्यापून राही आणि तो मोहरला म्हणजे कसा सुरेख वास सगळ्या घरभर हिंडत राही! दुपारी सगळीकडे शांत असे आणि त्याच्या हिरव्या डहाळीवर बसून साळुंख्या मंजूळ बोलत. ... "

"नोकरीच्या गावी जाण्याची वेळ येई, तेव्हा मला फार वाईट वाटे. माझे हे घर, हे गाव सोडून कोठे दुसरीकडे वर्षानुवर्षे राहायचे, ही कल्पनाच मला रडू आणी. मागे राहणाऱ्या आजीपाशी राहण्याचा मी हट्ट घेऊन बसे; पण त्याला आईची तयारी नसे. कारण आजी वेडी होती. खरेतर ते तिला वेडी का म्हणत असत, हे मला कोडे होते. ती सगळे घरकाम व्यवस्थित करी. स्वयंपाकपाणी नीट करी. सारे काम आटोपल्यावर घरातल्या एखाद्या कोपऱ्यात बसून भाजी निवडता-निवडता काही निरर्थक बडबड करण्यापलीकडे तिच्या वेडाचा काहीच उपद्रव होत असलेला मला स्मरत नाही. आम्ही वर्ष-दोन वर्षे परगावी असलो तरी ती एकटी घरात राही. कशी राही, याचे आता मला नवल वाटते. गावाहून परत आलो की, मी तिच्या कुशीत शिरत असे. रात्री तिच्यापाशी झोपत असे. माझ्या प्रश्नांना उत्तरे देता-देता तिची ती निरर्थक बडबड चालूच असे."

"बाळपण संपले. चांगले कळू लागले. नोकरी करण्यासाठी, शिक्षणासाठी सगळे जण कुठे कुठे फुटले, तरी या वेड्यावाकड्या घराविषयीचे प्रेम कमी झाले नाही. वर्षातून एकदा आम्ही सारी भावंडे गावी एकत्र जमत असू. पसारा एवढा झालेला असे की, एवढे घरही गजबजून जाई. मग चांदण्या रात्री अंगणात लिंबाचा गार वारा घेत सर्वांनी बसावे, वडिलांनी रसाळ गोष्टी सांगाव्यात, सकाळी नव्या सोप्यात न्याहारी करीत बाळपण आठवावे, दुपारी बाजीनानांनी वाढविलेल्या लिंबावरच्या साळुंक्यांचे मंजूळ बोलणे ऐकत डुलकी घ्यावी, संध्याकाळी दिवस कलल्यावर माळवदावर चढून मावळतीचे झगमगते रंग पाहावेत.

"ती सांदाडी बालपणी होती, तशीच पुढेही होती. जिज्ञासा आणि भीती गेली, तरीही त्या काळच्या आठवणींमुळे ती प्रिय वाटे. पूर्वी मला मोठा वाटणारा सोपा आमची उंची वाढल्यामुळे आता बुटका वाटे. तरी तुळयांवरून त्या काळी खडूने लिहिलेली ती वचने वाचून कशा गुदगुल्या होत. आम्हा तिघाही भावंडांची अक्षरे तिथे होती. ‘अहिंसा परमो धर्म:’, ‘सत्यमेव जयते’, ‘यदा यदाहि धर्मस्य’ हा गीतेतील सगळा श्लोक असे कितीतरी बोधवाङ्मय आम्ही तिथे श्रद्धेने उतरून ठेवले होते. 

"रात्री अजूनही आई करुणाष्टके म्हणत जुन्या सोप्यात बसे. ती अंथरुणात पडल्या-पडल्या ऐकली की, ‘रघुपति मति माझी आपलीशी करावी’ असे म्हणत आपणही तिच्या शेजारी बसावे, असे वाटे.

"पहाटे उठून वडील जेव्हा ‘उठा उठा हो सकळीक’ अशी भूपाळी म्हणत, तेव्हा अंथरुणात पडण्याची लाज वाटून अंगण साफ करण्याचा हुरूप येई. तो सकाळचा सडा, ती जात्यावरची गाणी, ते पहाटेचे शेकणे या गोष्टींना काही आगळेच सौंदर्य येई. 

"त्या घरात असणे म्हणजे बाळपणात फिरून असणे, प्रत्येक वस्तूवर पडलेल्या आजोबांच्या छायेविषयी भीतियुक्त आदर बाळगणे, बाजीनानांचे पांढरे केस पाहणे, वेड्या आजीच्या कुशीत झोपणे!"

"त्यानंतर एका वर्षानेच गांधीवधाच्या दंगलीत मी पुण्याहून तिकडे गेलो, तेव्हा आमचे ते जुने घर पार जळून गेले होते. राखेचे ढीग पडले होते. खाली कोसळलेल्या तुळया अजून धुमसत होत्या. आगीने तडकलेल्या भिंती भकासपणे उभ्या होत्या. आजोबांची आठवण सांगणाऱ्या सगळ्या वस्तू जळून राख झाल्या होत्या आणि मी लावलेली, वडिलांनी वाढविलेली ती डेरेदार जास्वंदी करपून कोळ झाली होती."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................

November 14, 2021 - January 26, 2022. 

"आमच्या घराच्या दरवाजात उभे राहिले की, समोर थोडेसे अंगण आहे. या अंगणापलीकडे आडवा रस्ता आहे. रस्त्याला लागूनच एक कासाराचे आणि एक नसल्याचे अशी दोन घरे आहेत. या दोन घरांच्या मधल्या बोळकांडीतून पाहिले की, पाव दिसतो. नऊ एकरांची ही काळी-तांबडी धांदोटी आहे."

"या जुन्या आपट्याखाली येऊन मी जागा साफसूफ करीत असे आणि मुळीला उसे देऊन पानांकडे बघत-बघत झोपत असे. कडक ऊन असे, आसपास कुणीही नसे; पण आपट्याखाली मला करमत असे. 

"पावात अधेमध्येच अशा काही रुई होत्या. मारुतीच्या गळ्यात माळ घालण्यासाठी त्यांची पाने वरचेवर खुडली जात. गावाशेजारीच असल्यामुळे ती अगदी हाताशी असत. पावाच्या कडेला न्हाव्याचे, लव्हाराचे दुकान होते; परटाचेही होते. यांपैकी काही मंडळींना चिलीम वळण्यासाठी रुईचे पान लागे. घरातून उठून चार पावले आले की, तेही त्यांना मिळे. त्यामुळे या रुई वारंवार खुडल्या जात; पण लोकांनी खुडले म्हणून त्या काही संपत नसत. जाड आणि हिरवीगार पाने घेऊन त्या बारा महिने तेरा काळ पावात नांदत. त्यांच्या बोंडांशी माझे काम असे. ही कोयरीच्या आकाराची बोंडे वाळून उलगडत आणि त्यांच्यातून शुभ्र, रुपेरी म्हाताऱ्या हलकेच बाहेर येत. पऱ्या तरंगाव्यात, तशा त्या वाऱ्यावर तरंगत. थोडा वारा सुटला की, कोयरीबाहेर पडण्याची यांची धांदल होई. त्या शेकड्यांनी भराभरा बाहेर पडत. पावाची काळी जमीन खाली, वर निळे-निळे आकाश आणि मध्येच तरंगणाऱ्या रेशमी म्हाताऱ्या! त्यांना धरण्यासाठी मी आभाळाकडे बघत, हात पसरीत साऱ्या पावातून धावे."

"पहिले पाऊस होऊन गेले की, पावाच्या उजाड जमिनीत हिरवळ फुटे. हरळी, कुरडू, नागरमोथा अशा तऱ्हेची वनस्पती तिथे दिसू लागे. शेंदण्या, कडू इंद्रावणे, कडवंची यांचे वेल फुटू लागत. करडईसारखी दिसणारी पात्र्याची अनाहूत भाजी आणि काटे धरण्याअगोदर भाजीला योग्य असा सराटा माजू लागे. या सुमारास साऱ्या पावभर मी हिंडे आणि खिसाभर कडवंच्या, तर कधी ओटाभर पात्रा खुडून घरी आणी. 

"कडवंच्या हा प्रकार थोडाफार कारल्यासारखा असतो. आकाराने फार लहान, एवढेच; पण तव्यात केलेली त्याची भाजी फार फक्कड लागे. सराटा आणि पात्रा ह्याही भाज्या चवीच्या बाबतीत कुठल्याही पालेभाजीची बरोबरी करतील. फक्त त्या न लावता रानात उगवतात, म्हणून त्यांची किंमत नसते. जे विपुल असते, आयासाशिवाय वाढते; त्याला किंमत नसते, हे खरेच! 

"या भाज्या घेऊन मी घरी आलो म्हणजे बिटाकाका नेहमी म्हणे, ‘‘लेका, रामोश्यांच्या पोरांत हिंडून बरा गुण घेतलास. म्हारापोरांची ही भाजी तूच खुडून आणतोस!’’ 

"आईसुद्धा ही भाजी करायला नेहमी नाखूश असे. मी फारच भुणभुण लावली, तर कडवंच्या तव्यात परतीत असे; पण मग माझ्याखेरीज कोणी त्या कालवणाला हात लावीत नसे. सगळे संपविण्याची जबाबदारी माझ्यावर. त्यामुळे पुष्कळ वेळा मी अगदी रडकुंडीला येई. टाकावी तरी पंचाईत! 

"आई म्हणे, ‘‘एवढं तिखटमीठ घातलं आहे, ते काय वाया दवडायचं का? खा ती सगळी भाजी!’’ 

"मग पुष्कळदा मी असली भाजी आणून ती आमच्या वाड्यात राहणाऱ्या सुंद्रा माळेगावकरणीला देत असे. तिला त्याचे मोल होते. शिवाय तिच्याकडे जेवताना मला सगळी भाजी खाण्याची सक्ती होत नसे. हवी तेवढी खाऊन मी उठू शकत असे. त्यामुळे पावातली भाजी खुडण्याचा माझा मोह सुटला नाही आणि म्हणून इतर कोणी फिरकत नसे, अशा वेळी पावातले माझे हिंडणेही सुटले नाही. 

"पावातल्या वनस्पती आठवताना मला कितीतरी नावे आठवतात. जाड हिरव्या पानांचे लहान, पिवळसर फुले येणारे दगडीच्या पाल्याचे झाड पावात विपुल होते. माझ्या भिवईवर झालेली जखम हा दगडीचा पाला भरून बरी झाली आहे. काडेचिराईत ही वनस्पतीही पावात होती. आमच्या घरात कुणीही तापाने आजारी पडले की, काडेचिराइताचा कडू काढा त्याला घ्यावा लागे. गंधवेल-चांदवेल ही वनस्पतीही वर्षातून कधीमधी उपयोगी पडे. जनावरांना साप चावला म्हणजे गंधवेल-चांदवेलीच्या पानांचा रस त्याला पाजीत असत. जनावरांच्या दुसऱ्याही कित्येक रोगांना ही औषधी उपयोगी पडे. अ‍ॅस्प्रोप्रमाणे जनावरांच्या बाबतीत शेतकरी ती उपयोगात आणीत. याशिवाय काळमाशीचा गड्डा, आणखी एक प्रकारचा मोठा गड्डाही पावात मिळत असे. यांचे उपयोग कोणत्या आजारावर करीत, हे मला आता आठवत नाही. 

"याशिवाय औषधी उपयोगी नसलेल्याही काही वनस्पती होत्या. लहान फुग्यांप्रमाणे दिसणारी फुले येणाऱ्या ‘उन्हाळ्या’ पावात बारा महिने दिसत. आतील बी वाळल्यावर ‘उन्हाळी’चा फुगा खुळखुळ्यासारखा वाजे. याशिवाय ‘इचका’ही फार होता. इचक्याला मारणे कठीण असते. उपटून कुठंही टाकला, तरीही तो पडल्याजागी जीव धरतो. या त्याच्या चिवटपणामुळे गावातील टग्यांची उपमा त्याला नेहमी मिळे. ‘गावात टग्या आणि रानात इचका, तुडवून मारावा तेव्हा मरतो’ अशी म्हण आहे. इचका उपटल्यावर तो इकडे-तिकडे न टाकता पायवाटेवर टाकतात, म्हणजे जाणाऱ्या-येणाऱ्या गुरा-माणसांच्या पायांखाली तुडवला जाऊन तो मरतो. ज्वारीला खाणारा टाळफुलाही पावात पुष्कळ होता. 

"या सगळ्याच वनस्पतींचे काही विशिष्ट वास होते. ते मला सांगता येणार नाहीत; पण हे वास पावापासून दूर केले, तर पाव हा पाव राहणार नाही. 

"‘रोहिणी’ पडल्यावर पावात लागवड होई. लवकरच बाजरी-ज्वारीचे पीक गुडघ्या-मांड्यांपर्यंत येई. करडई, भुईमूग, तीळ असली गळिताची धान्ये; हरभरा, चवळी, मूग असली कडधान्ये उगवत. ती घाट्याला, शेंगेला येईपर्यंत वास्तविक रानात पोरांना जाण्याचे कारण नसे; परंतु मी जात असे. ज्वारीच्या पानांवर साखर पडे, ती ओरबाडून खाण्याकडे माझे लक्ष असे. खरेतर ही साखर म्हणजे एक प्रकारचा रोग असतो म्हणे; परंतु या रोगाची माझ्या जिभेवर साखर होई! आणि या गोष्टीला इतकी वर्षं झाली, तरी अद्याप मी धडधाकट आहे; तेव्हा त्या रोगाचा काही परिणाम माझ्यावर झाला आहे, असेही कुणाला म्हणता येणार नाही. मुगाला शेंगा आल्या, हरभऱ्याला घाटे धरले, म्हणजे तर पावातून पायच निघत नसे. खरेतर तेव्हा पाव खंडाने दिल्यामुळे त्याची मालकी दुसऱ्याकडे होती; परंतु हे माझ्या हिशेबीही नसे."

"परंतु तीनएक वर्षांच्या कालावधीनंतर मी जेव्हा पुन्हा पावात उभा राहिलो, तेव्हा खरोखरीच आमच्या कल्पनेतले नंदनवन तेथे साकार झालेले मला दिसले. 

"विहिरीच्या जवळ पाच खणांची एक सुरेख झोपडी तयार झाली होती. झोपडीला लागून छोटीशी बाग होती. पांढऱ्या, गुलाबी रंगाचे गुलाब फुलले होते. मांडवावर चढलेली जाई फुलांनी गजबजलेली होती. बटमोगरा, जास्वंदी, रातराणी, मधुमालती, कण्हेर, निशिगंध असली या गावात सर्वस्वी विलायती अशी फुलझाडे तिथे बघून मला स्वप्नात असल्यासारखे वाटू लागले; पण हे स्वप्न नव्हते, हे सत्यच होते. झोपडीच्या पुढे घेरदार अशी गुलमोहोराची तरणी झाडे होती. विहिरीच्या काठावर, धावेवरही तशी होती. गावापासून विहिरीपर्यंत जोमात आलेला जोंधळा दिसत होता. तऱ्हेतऱ्हेच्या भाज्या होत्या. विहिरीपासून पुढे हिरवीगार खपली होती. पेरूची, चिकूची झाडे होती. पावाचे रूपच पालटून गेले होते!"

"पिकाच्या नादानं आता नाना तऱ्हेची पाखरे पावात येत होती. चिमण्या, साळुंक्या, लाव्हऱ्या, चित्तूर, पकुर्ड्या आणि कांड्या करकोच्या येत होते. या पाखरांच्या आवाजाने रान कसे भरून जाई."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 26, 2022 - January 26, 2022. 

"माझ्या बालपणी माझ्या वडिलांची बदली एका गलिच्छ गावी झाली. दक्षिण महाराष्ट्रातील एका दरिद्री संस्थानातील हे गाव फार दरिद्री होते. ... "

"हे सगळे माझ्या आईने सहन केले असते; पण बायकांच्या दृष्टीने भयंकर म्हणजे त्या गावात पाणी नव्हते. तिथे विहिरी नव्हत्या. आड नव्हते. फक्त गावापासून दूरवर ओढा होता. गावातील पुरुषांचे दिवसातील महत्त्वाचे काम पाणी भरणे हे होते. सकाळ झाली की, मोठमोठ्या आकाराच्या लोखंडी घागरी खांद्यावर घेऊन लोक ओढ्यावर जात. झऱ्याशी पाळी लावीत आणि दहा-बारा खेपा घालून दिवसाचे पाणी भरून टाकीत. या दुर्दैवी गावातील रहिवाशांचा बराच वेळ आणि बरीच शक्ती केवळ पाणी भरण्यात खर्च होत असे. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र - जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते पाणी भरीत. धुणी धूत, अंघोळी करीत, भांडी घाशीत."

"आम्ही सारी भावंडे लहान होतो. फारच लहान होतो. वडील कचेरीत गेले की, घराला बाहेरून कडी घालून आई पाण्याला जाई. तेव्हा बहुधा आम्ही झोपलेले असू. क्वचित आमच्यापैकी कुणीतरी जागे होई आणि मग बंद दाराशी बसून आम्ही सर्व जण रडून गोंधळ करीत असू. मला थोडेफार कळत होते. स्वत: रडत-रडत मी माझ्या तान्ह्या भावंडाला समजावी. घरात एकच कल्लोळ होई. आसपास शेजार नव्हता. त्यामुळे कोणी येत-जात नसे. पुष्कळ वेळा तास-दोन तास असे रडून दाराशेजारीच, एकमेकांच्या गळ्यात गळे घालून आम्ही झोपी जात असू. 

"धुणे-पाणी आटोपून जेव्हा आई माघारी येई, तेव्हा दार उघडताच मांजराच्या पिलांप्रमाणे झोपलेली आपली पोरे तिला दिसत. ती रडून-रडून झोपी गेली आहेत, हे ती उमगून घेई आणि मग माझी आई फार कळवळे. आम्हाला जवळ घेऊन एकटीच रडत बसे. 

"होय, मला ते सारे नीट आठवते. भिंतीला लोणा चढलेल्या त्या अंधाऱ्या घरात आम्हाला पोटाशी धरून डोळे गाळणारी आई मला तश्शी डोळ्यांसमोर दिसते. कधीकधी तिची अर्धशिशी उठे. इंगळीने नांगी मारीत राहावे, तशा वेदना होत. तरीही विव्हळत, वरचेवर एक भिवई चिमटीने दाबत ती पाण्याच्या जड घागरी वाहत राही. घरात चुलीतल्या लाकडांचा धूर कोंदलेला असे. ओलीमुळे कुबटलेल्या अंथरुणात-पांघरुणात मी घुसमटून पडे आणि धडधडत्या छातीने बाहेरून लावलेली कडी केव्हा उघडते, त्याची वाट बघत राही. जसजसा दिवस डोक्यावर येई, तसतशा आईच्या वेदना वाढत. तशा स्थितीत तिला काही करणे अशक्य होई आणि मग पाणी भरणे टाकून ती जमिनीवर पडून विव्हळत राही, लोळत राही. ते मला बघवत नसे. तिच्या तोंडाशी तोंड नेऊन मी ‘आईऽऽ आई!’ करून हाका मारीत राही. भीतीने मला रडू येई आणि मग माझी मला पोटाशी घेऊन ती म्हणे, ‘‘अरे, मला काही झालं नाही. मी मरत नाही. कुणीतरी ठार मारल्याशिवाय मी अशी मरणार नाही!’’

"खरोखरीच तशा वाईट स्थितीतही माझी आई चांगली मजबूत होती. टिकाव धरून होती. आई-बापाघरी कमावलेले तिचे शरीर सारखे झगडत राहिले होते. गरिबीतही तिने आपला स्वाभिमान जागा ठेवला होता. धीर खचू दिला नव्हता. खरोखरीच ती फार धीराची बाई होती."

"एके दिवशी तोंडाला तोंड दिसत नव्हते अशा वेळी घागर घेऊन आई पाण्याच्या ओढ्यावर गेली. आसपास माणूस-काणूस नव्हते. झऱ्याशी गेली आणि बघते, तो माझे वडील अंगरख्याच्या बाह्या सारून झऱ्यावर घागरीत पाणी भरीत होते! 

"माझी आई आश्चर्याने थक्क झाली. तिने विचारले, ‘‘पाणी कुणासाठी नेता?’’ 

"वडील शांतपणे म्हणाले, ‘‘मामलेदारासाठी.’’"

"गावातील बायका येत होत्या, जात होत्या. काही वेळाने पट्टेवाल्यासहित मामलेदाराची बायको आली. झकपक पोशाख करून आली. बायकांची गर्दी बाजूला झाली. गाभाऱ्यात जाण्यासाठी मामलेदारीण तोऱ्याने आली. तिला बघताच माझी आई बसल्या जागेवरून उठली आणि त्वेषाने पुढे झाली. मामलेदारणीचा सोन्याच्या पाटल्या घातलेला हात तिने घट्ट धरला आणि दुसऱ्या हाताने तिच्या गालावर सणसणीत चपराक दिली! 

"मामलेदारीण कळवळली. माझ्या आईचा हात किती लागत होता, हे मला ठाऊक होते. 

"मग माझी आई गरजली, ‘‘जा, तुझ्या नवऱ्याला सांग की, तुम्ही ज्या कारकुनाला पाणी भरायला लावलंत, त्याच्या बायकोनं माझ्या थोबाडीत दिली आणि ध्यानात घे, पुन्हा जर कधी माझा नवरा पाणी भरताना मला दिसला, तर तुझा जीव घेईन, फाडून खाईन तुला! गरिबालाही मान असतो, अब्रू असते. अधिकाराच्या तोऱ्यात जाऊ नकोस. या जगात रावाचा रंक आणि रंकाचा राव व्हायला उशीर लागत नाही. जा!’’"

"घरी येताच मी आईच्या गळ्याला मिठी मारली आणि म्हटले, ‘‘तू मरू नकोस. मग आम्हाला आई कुठली?’’ 

"यावर माझ्या आईने मला जवळ घेतले आणि डोळ्यांतून पाणी काढून ती म्हणाली, ‘‘नाही रे बाळा, मला मरून कसं भागेल?’’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 26, 2022 - January 26, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
४ | शाळा |  
................................................................................................
................................................................................................

"मला पाचवे संपून सहावे लागताच एके दिवशी दादांनी माझे नाव या शाळेत घातले. अडीच आखणाची धाब्याची शाळा आतून चुन्याने रंगविली होती. दारे, खिडक्या, खांब डांबराने काळे केले होते. चारही भिंतींवर ठिकठिकाणी जाड पुष्टिपत्रांवर अडकविलेली जनावरांची रंगीत चित्रे होती. सशांची जोडी, घोडा आणि लहान शिंगरू, हत्ती, उंट या चित्रांबरोबरच पंचम जॉर्ज बादशहा आणि त्याची गोरीपान राणी यांच्या छातीइतक्याच काढलेल्या तसबिरीही होत्या. पगडीवर मोत्यांचा तुरा आणि मांडीवर आडवी ठेवलेली तलवार असा आमच्या राजेसाहेबांचा फोटोही होता. या तीन तसबिरी मास्तरांच्या डोक्यावर लावलेल्या होत्या. बाकी प्राण्यांची चित्रे उरलेल्या भिंतींवर होती. राजेसाहेबांच्या तसबिरीला नकली हार घातलेला होता. राजा-राणीच्या तसबिरीला काही घातले नव्हते. 

"चारही दिशांची छापील नावे भिंतींना अडकविलेली होती. ईशान्य, नैर्ऋत्य या दिशा मात्र दाखविलेल्या नव्हत्या. त्यामुळे त्या मला अजूनही सांगता येत नाहीत. औंध संस्थानचा आणि हिंदुस्थानचा नकाशा, भटजीतला ‘भ’ आणि अननसातील ‘अ’ असे लिहिलेल्या वर्णमालेचा तक्ता, सूर्यनमस्कारांचा सचित्र तक्ता आणि बालवीराने पाळावयाचे नियम असल्या वस्तूंनी भिंती चांगल्या सुशोभित केल्या होत्या. चिलटांना बसण्यासाठी आढ्याला शेराचा डहाळा टांगलेला होता; पण चिलटे त्याच्यावर न बसता मुलांच्या नाकांवरच बसत. 

"शाळेत घड्याळ नव्हते; पण शाळा सकाळी वेळेवर भरत असे, सुटत असे. दुपारी पुन्हा भरत असे आणि संध्याकाळी वेळेवर सुटतही असे. आमच्या मास्तरांना वेळ बरोबर कळे. आम्हा मुलांना कळत नसे. त्यामुळे गैरसोय होई. बरे, घंटा ऐकून जावे म्हटले, तर घंटासुद्धा कुणातरी मुलालाच लवकर जाऊन द्यावी लागे. त्यामुळे सकाळी उठल्या-उठल्या मुले पाटी-दप्तर घेऊन शाळेकडे पळत. बंद दाराकडे पाठ करून पायऱ्यांवर बसून राहत."

"सोनारमास्तर कविता शिकवीत : 

"‘रडवे माझे वदन बघोनी, भूक लागली हे जाणोनी 
"कोण उगे करी मज पाजोनी, ती माझी आई!’’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 26, 2022 - January 26, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
५ | पार |  
................................................................................................
................................................................................................

"देवळाच्या मधोमध उभे राहिले, म्हणजे समोर पार दिसतो. देवळापासून दोनशे-एक कदम टाकावे लागतात. पार चौरस आकाराचा आणि माणसाच्या डोक्याइतका उंच आहे; थोडा जास्तच असेल. वर चढून जायचे, तर पाच-सहा भल्या मोठ्या पायऱ्या चढाव्या लागतात. देवळाकडच्या अंगाने व पलीकडच्या अंगाने वर अशा पायऱ्या आहेत. पाराची घडण जुन्या वळणाची आणि दांडगेश्वर आहे. आणले तसेच दगड बसविलेले आहेत. त्यांना गवंड्याने छिन्नी लावलेली दिसत नाही. गावाची वस्ती सातशे आणि पार एवढा मोठा की, निम्मे गाव त्यावर मावावे. पाराच्या मधोमध भला मोठा निंब आहे. निंबाभोवती पार बांधला आहे की पार बांधून निंब लावला आहे, हे कळत नाही."

"पारावर बसणाऱ्याने संध्याकाळी बसावे. दिवस मावळू लागला, उन्हाला चांदण्याची मवागी आली म्हणजे घरातून उठावे आणि पाराच्या पायऱ्यांवर किंवा पाराच्या कडेवर पाय सोडून बसावे. थंड वाऱ्याच्या झुळका येत राहतात. कधी भिजलेल्या काळ्या मातीने, तर कधी ज्वारी-बाजरीच्या शेताने सुगंधित होऊन या झुळका येत असतात. उन्हाळ्यात नांगरट झाली आणि वळवाचा शिडकावा पडला म्हणजे वाऱ्याला नागरमोथ्याचा थंड सुवास असतो. पावसाळ्यात हाच वारा मातीच्या अत्तराचा फाया घेऊन येतो. हिवाळ्यात शेतांचा घमघमाट सुटतो. असा सुगंधी वारा हुंगीत पारावर बसावे. डोक्यावरच्या निंबावर चिमण्या-कावळ्यांचा गोंधळ चाललेला असतो. माण नदीकडून हदग्याच्या फुलांसारखे पांढरेधोट बगळे रांगेने उडत येऊन निंबावर बसत असतात. ... "
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 26, 2022 - January 26, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
६ | ओढा |  
................................................................................................
................................................................................................

"गावचा ओढा सोडला, तरी या एवढ्या काळात दुसऱ्या कुठल्याही ओढ्यात अंघोळ केल्याचे मला स्मरेना. इतकी वर्षे झाली होती, कावळ्याच्या डोळ्यासारख्या स्वच्छ धारेत मी कधी पडलोच नव्हतो. झुळुझुळु वाहणारी धार पाठी-पोटावरून खळाळत गेली नव्हती. चिंगळ्या माशांचे कळप अंगावरून खेळले नव्हते. वरून पाहिले असते, तर साधी वाळू; पण पाण्यात बुडून डोळे उघडले की, वाळूचे रंगीबेरंगी खडे कसे मोठ्या-मोठ्या माणिक-मोत्यांसारखे दिसत! ते धन कितीतरी दिवसांत मी पाहिलेच नव्हते. उन्हाची तिरीप धारेवर पडल्यावर धारेच्या मध्यभागी विणली जाणारी तिपेडी-चौपेडी पाण्याची वेणी कशी रुप्यासारखी चमकायची! खूप वेळ पाण्यात राहिल्यावर हातापायांचे तळवे कसे पांढरेस्वच्छ, फिक्कट गुलाबी दिसू लागायचे! बोटांच्या शेवटांना सुरकुत्या पडायच्या. धारेतून अंग बाहेर काढले की, अंगावर कसे रोमांच उभे राहायचे!"

"ओढ्याच्या काठावर दुतर्फा नाना जातींची झाडे होती. करंज, निरगुडी, बाभळी, तरवड अशा झाडा-फुलांनी ओढ्याचे दोन्ही काठ भरलेले असत. ऋतुपरत्वे ही झाडे फळाफुलांना येत. करंजाच्या झाडांना पांढरा स्वच्छ मोहोर येऊन सुवास सुटे. श्रावणमासात बाभळीची झाडे पिवळ्यारंजन फुलांनी गजबजून जात. निरगुडींना तुरे येत. तरवडाची झुडपे पिवळ्याजर्द गुच्छांनी गजबजून जात. नेपतीची तांबडी फुले दिसू लागत. नाना रंगांची फुलपाखरे ओढ्याच्या काठांनी सदैव झुलत राहत. मोगी-होले नेपतीतून घरटी बांधीत. निरगुडीच्या गचपणातून चित्तूर पक्षी शिळा घालीत हिंडत. निळ्या रंगाचे खंड्या पक्षी, पिवळ्या रंगाचे हळदुले पक्षी, लाजरे भारद्वाज, पांढऱ्या शुभ्र बळंक्या, हिरव्या रंगाचे मुके राघू... सगळ्या पाखरांची दुनिया ओढ्याकाठच्या या वृक्षराजींतच झुलत राही."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 26, 2022 - January 26, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
७ | देऊळ

About temple in his village. 

Author's memories of last year's of his father. 

Author writes about his uncle. 

१० | |  

About his art teacher. 

Author writes about his famous elder brother, G. D. Madgulkar. 

Must read account of his parents, grandmother and memories of home. This particular sketch competes with Thurber's tale of the night his brother kept everyone awake because he couldn't recall Patterson Elizabeth, two names of a town in NJ.
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 26, 2022 - January 26, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
१३ | पाव्हणा |
................................................................................................
................................................................................................

About a dog. 

Purchased December 24, 2021. 

Kindle Edition, 1990 pages
Published by MEHTA PUBLISHING HOUSE 
(first published August 15th 1990)
Original Title Goshti Gharakadil
ASIN:- B01NCN44AH
................................................
................................................
https://www.goodreads.com/review/show/4507152211