Friday, January 7, 2022

MANDESHI MANASA माणदेशी माणसं । व्यक्तिचित्रण व्यंकटेश माडगूळकर, by VYANKATESH MADGULKAR.

................................................................................................

MANDESHI MANASA 
by VYANKATESH MADGULKAR 
माणदेशी माणसं । 
व्यक्तिचित्रण व्यंकटेश माडगूळकर 
................................................................................................
................................................................................................

Began reading this in August 2021, but the very first story was so heartbreaking, one couldn't go on with the next - another book wouldn't quite wipe off the impression, the impact made by this one, and so it took months to begin reading this again - but only as one among a dozen or so, all simultaneously read! 

Many of the sketches are heartbreaking and some quite stymying, but what can be said about the whole collection is that it's portrayal of human nature at its best, worst, quickest, cruelest and everything else, completely. 

And to anyone who's lived mostly in towns, untouched by realities of rural lives of India, another very striking part is just how very contradictory the portrayal of India here is, to that one usually encounters in writings either of West or of leftist, and in mindset in the section of literati in India who are influenced more by them than by reality of India herself. 

Here, unlike the theories made up by those to abuse India, the humanity is at its most natural, most real. Castes exist, but only as a tapestry that isn't all a uniform dun hue. People are real, not only coexisting but interacting, and not necessarily along the diatribe lines of the anti-Indian propaganda blaring at India for over a millennium. Castes held lower aren't downtrodden, even if they pay regard to the higher as per Indian system. In helpless poverty, the two are on par often enough. Cheating, theft and murder are quite within capability of rural low caste poor, as are ethical realisation of their own reality. 
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
.................................................................................................
अनुक्रम 

१ धर्मा रामोशी  
२ झेल्या  
३ रामा मैलकुली  
४ नामा मास्तर  
५ मुलाण्याचा बकस  
६ बन्याबापू  
७ कोंडिबा गायकवाड  
८ शिदा चांभार  
९ शिवा माळी  
१० तांबोळ्याची खाला  
११ रघू कारकून  
१२ बाबाखान दरवेशी  
१३ गणा महार  
१४ माझा बाप  
१५ बिटाकाका  
१६ गणा भपट्या
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
.................................................................................................
धर्मा रामोशी  

"सांज व्हावी. ऊन-सावली परस्परांत मिसळून विसावावी. गुरं-वासरं रानातून घरी परतावीत. दिवसभर शेपट्या नाचवत, चिवचिवाट करत भिरभिरणाऱ्या चिमण्या वळचणीत शिराव्यात. घराघरांतून सांजवाती उजळाव्यात. अशा कातर वेळी धोतराचा सोगा खांद्यावर टाकून अंगणातल्या अंगणात शतपावली घालावी. कधी उघड्यावर टाकलेल्या खाटल्यावर पडून हळूहळू उजळणाऱ्या आभाळाकडे पाहावं. कधी तुळशीवृंदावनाच्या कट्ट्यावर बसावं, कधी हाताची घडी छातीशी दुमडून दरवाजात उभं राहावं आणि बाहेरल्या पायरीशी काठी वाजावी. आवाज यावा– 

"‘‘दळण आणा जी आक्काऽऽ’’ 

"धर्माची ही साद मी आज महिना-दीड महिना ऐकतो आहे आणि मनात कष्टी होतो आहे."

"धर्मा आता भलताच थकला आहे. कधी काळी खणखणीत-ठणठणीत असलेलं त्याचं शरीर आता विरल्या वस्त्राप्रमाणे जीर्ण झालं आहे. चालताना, उठताना, बसताना त्याला आता घडी-घडी काठीचा आधार घ्यावा लागतो. कानांना नीट ऐकू येत नाही. डोळ्यांना नीट दिसत नाही. गोरटेल्या रंगाचा, नीटस बांध्याचा हा इमानी रामोशी आता थोड्या दिवसांचा सोबती आहे. आयुष्यातले अखेरचे दिवस कसेबसे ढकलतो आहे. हे त्याला माहिती आहे; गावातल्या बहुतेक लोकांना माहिती आहे. नोकरी-धंद्यापायी परगावी राहणाऱ्या आणि वर्षातला एखाद-दुसरा महिना घरी येणाऱ्या माझ्यासारख्यालासुद्धा माहिती आहे; पण ते तीव्रतेनं जाणवलं अगदी अलीकडे! धर्माला अगदी जवळून न्याहाळलं अगदी काल-परवा."

"माझ्यासारख्या परिचित आणि गावच्या माणसापुढे यायला लाजायला बजा काही पाटला-देशमुखाची नव्हती. ‘थाळीभर भाजी आणि चतकोर भाकरी खाऊन धर्मा न्याहारी आटपतो की काय?’ 
"यानंतर एकदा सवडीनं मी धर्माकडे गेलो. सारी चौकशी केली आणि धर्मानंही मोकळ्या मनानं सारं सांगून टाकलं. कापऱ्या आवाजात तो म्हणाला, ‘‘घोडं थकलं आता धनी. कामधंदा हुईनासा झाला. चालता हात हुता तवर वला वाळला तुकडा मिळत हुता. आता काय! त्यात हे असं दिस आलं. वंगाळ वंगाळ! भल्याभल्यांना दोपारची भरांत पडलीया, मग आम्हा गरिबांचं काय? दोन सालं झाली, पाऊस नाही; पाणी नाही. दुष्काळ पडलाय आपल्या मुलकात. पाच चिपट्यांची धारण झालीया. का घ्याचं आन् का खायाचं? त्यात बजीला दाल्ल्यानं टाकलीया, तीबी घरी बसलीया!’’ ‘

"‘मग पोटापाण्याचं काय करतोस धर्मा?’’ ‘

"‘भागवतो कसंतरी कळणाकोंडा करून. कधी रताळं, कधी गाजरं उकडतो आन् खातो बापलेक. कालच्याला तुम्ही आला तवा पोरीनं तांदळीची भाजी आनली हुती रानातनं वटाभर. ती उकडून, मीठ घालून खाल्ली कोर-कोर भाकरीसंगं. बकऱ्यावानी पालापाचोळा खाऊन जगायचं आलं कपाळी. वंगाळ वंगाळ!’’ आतडं तोडून धर्मा बोलत होता. मला भारी वाईट वाटलं. एक वृद्ध रामोशी, ज्यानं माझ्या वाडवडिलांची सेवाचाकरी केली, तो पालेभाजी उकडून खातो आणि दुपारची वेळ भागवतो, हे मला ठाऊकही नसावं? ‘‘असं आहे, तर घरी नाही कधी आलास? बोलला नाहीस? माझ्याकडे राहिलं, आईकडे जाऊन कधी बोललास?’’ 

"धर्मानं खाली मान घातली. ‘

"‘न्हाई बोललो. किती जनांचं बगावं त्येंनी? आभाळ फाटलंया, कुठं म्हणून लागावं ठिगळ?’’

"आणि इतके दिवस बजा दळण नेण्यासाठी का येत नव्हती, आंबेचा शिसा देताना ती बाहेर का आली नव्हती याचं कारण मला कळलं! 

"बजाच्या अंगावर मी धर्माला दिलेलं धोतर होतं! लुगड्यासारखा तिनं त्याचा उपयोग केला होता."
................................................................................................
.................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................

August 22,  2021 - August 22,  2021.

झेल्या  

"पुढे-पुढे झेल्याची मला हरघडी मदत होऊ लागली. हातावर पाणी पडताच तो माझ्या खोलीवर येई. कधी लाकुडफाटा संपला की, ते ध्यानात यायचा अवकाश; बाहेर पडे आणि काटक्याकुटक्यांची मोळी डोक्यावर घेऊन येई. या कामात शाळेतली आणखी चार पोरं तो मदतीला घेई. खोली उखणली की, ती माझ्या नकळत सारवून घ्यावी. पाण्याची कळशी भरून ठेवावी. भांडी घासावीत. बाजार करावा. झेल्या पडेल ते काम करी. सकाळ-संध्याकाळ शेजारच्या वस्तीवरून दूध घेऊन यायचं कामही तो बिनचूक करी. प्रथम प्रथम मला संकोच वाटे. पण झेल्याचा माझ्यावर खराच जीव होता, तो या गोष्टी माझ्यावरील भक्तीखातर करतो, हे कळून आल्यावर तो वाटेनासा झाला. एवढं करून पुन्हा तो अभ्यासाकडेही लक्ष पुरवू लागला."
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 03, 2022 - January 06, 2022.

रामा मैलकुली  

‘‘थोडं खाल्लं की दादा. उलीसं ठेवलंया पोरापायी. असलं कुटलं मिळतंया आमास्नी? पोरगं खाईल दोन घास, म्हणून ठेवलं. आता त्या पोरावर समदी मदार ठेवलीया बघा. त्यो जवा कर्तासवर्ता हुईल, तवा जरा बरं दिस येत्याल. तवर हे असंच. त्येला चार सबूद कळन्यासाठी साळंतबी घालीन म्हंतूया. भनीचा दाल्ला खराचला तवा माझ्या गळी पडून ‘आता माजं कसं हुयाचं’ म्हणून रडाय लागली. तवा मी म्हणालो, बया, माझ्यापशी ऱ्हा. मला तरी आता कोन हाय?’’

‘‘तुमी म्हनाल रामजी, गड्या तू साळा शिकला न्हाईस. पन दादा, साळा शिकावी आन् पोटाला काय खावं जी? चार वर्सांचं झालं की, कुनाची गुरं राकुळी घेऊन त्येंच्या म्हागं रानोमाळ हिंडावं लागतं, तवा घरी भाकर मिळती. मग हे जमावं कसं?’’
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 06, 2022 - January 06, 2022.

नामा मास्तर  

"मी कट्ट्यावर बसलो. नामानं दप्तर उभ्या-उभ्याच खाली आपटलं आणि आपल्या बापाच्या गळ्यात पडून रडत-रडत सारं सांगितलं. विटकं पातळ नेसलेली त्याची आई आली आणि त्याला कुरवाळून समजावू लागली. 

"‘‘धाड बडवली त्या मास्तराची! लेकरंबाळं हैती का न्हायती त्येला? पेटू दे ती साळा. कुठं शिकून अम्मलदार हुयाचं हाय आपनास्नी? ऱ्हा तू आपला घरी.’’ 

"पण गंगारामाला ते पटलं नाही. तो म्हणाला, ‘‘येडी हायेस का? नगं रडूस नामा. अरं, साळंत जायाचं म्हंजे मार खायलाच होवा. त्याबगार लिवनं कुटलं? मी सांगतो मास्तराला, पुना मारू नकासा म्हनून. आरं, पोटाला चिमटा घिऊन, थोरामोठ्यांच्या हातापाया पडून मी तुला शिकविनार हाय. शेना करनार हाय. सातवी पास हो आन् तूबी हो असा मास्तर. माजं डोळं निवत्याल तुला खुर्चीवर बसल्याला बगून!’’
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 06, 2022 - January 06, 2022.
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
मुलाण्याचा बकस  

"आजूबाजूला सारा बोडका माळ आहे. पाच मैलांच्या प्रवासात तहान लागली, तर वाटेला कुठे पाणी मिळत नाही. झाडंसुद्धा सावलीला होतील अशी नाहीत. नेपती-बोरीची बारीकसारीक झुडपं आहेत. दुपारच्या वेळी निघालं म्हणजे सगळ्या वाटेत माणूस क्वचितच दृष्टीस पडतं. चुकून-माकून एखादा मेंढक्या आणि मुंड्या खाली घालून गवत खाणारी त्याची मेंढरं जवळपास दिसतात. एरवी सारा शुकशुकाट! भुतासारखं एकट्यालाच जावं लागतं. असं उन्हात तळत, फुफाटा तुडवीत मला नेहमी जावं-यावं लागे; पायी-पायीच. तेव्हा गावची शीव ओलांडली की, मी एखादा विचार डोक्यात घेई आणि त्या नादात पाऊल उचली. माझ्या कित्येक गोष्टींची कथानकं या प्रवासात मला सुचली आहेत. त्या तंद्रीत तीन-साडेतीन मैल संपून मुलाणकी केव्हा आली, हे कळायचंही नाही."
................................................................................................

"बघता-बघता बकस कष्टी झाला. म्हणाला, ‘‘एवढी राखण करतो, पण आपली चार हुरड्याच्या कणसावर सत्ता न्हाई. फुकटची चाकरी!’’ 

"त्याच्या अशा बोलण्यानं तो अर्धवट होता, यावरसुद्धा विश्वास बसत नसे. काढणी, मोडणी, मळणी या साऱ्या वेळी बकस होताच. जोंधळ्याची पोतीही त्यानं गाडीत भरून गावात पोचवली. बकस राबत होता. वेडसर म्हणून शहाणा चुलता त्याला राबवून घेत होता.
................................................................................................

‘"‘काय रे हे?’’ ‘

"‘चुलत्यानं डागलंय, खुरपी तापवून डाग दिल्यात. डागल्यावर येड लागलेलं मानूस बरं हुतं. मी काय वेडा हाय का? आं?’’ लहान मुलासारखा ओठ पुढे काढून बकस विचारत होता. 

:त्याचे डोळे डबडबले होते!"
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 06, 2022 - January 06, 2022.
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
बन्याबापू  

"एखाद्या आईची मुलाशी वागण्याची जी तऱ्हा, ती बापूंची गावातल्या माणसांशी वागण्याची. कोणी का असेना, बापू त्याला एकेरी हाकारतील. त्याचं वय, प्रतिष्ठा काहीही लक्षात न घेता त्याला एखादं काम सांगतील. मग तो गावातला कोणी का असेना. साठ वर्षांचा म्हातारा असला, तरी ‘‘अरे ए गोंदा, इकडे ये! त्या संभा पाटलाच्या बागेत जा आणि चांगली पिवळीजर्द लिंबं घेऊन ये चाळीस-पन्नास. बापूंनी मागितली आहेत म्हणावं!’’ आणि त्यांचा शब्द सहसा कोणी मोडतही नाही. गावातल्या लोकांना बापूंच्याएकी जिव्हाळा आहे. जुनं माणूस म्हणून सगळे त्यांना मानतात. 

"व्यवहारी जगात बापूंची किंमत ‘एक भंपक’ माणूस म्हणून होईल. त्यांचा चांगुलपणा वजा टाकूनच लोक बोलतील, ‘हं, या अशा उधळेपणानंच सारं गमावलं! आता चार जमिनी राहिल्या आहेत, त्याही पुरी-बासुंदीपायी फुंकून टाकतील आणि बसतील झालं!’ अशा शब्दांनीच त्यांची संभावना होईल. होईना बापडी! पण बापूंची दानत सुटणार नाही. अभिमान संपणार नाही. जवळचं सारं दुसऱ्याला वाटून टाकून निष्कांचन होऊनही बापू एके दिवशी समाधानानं हसतील, असं मला नेहमी वाटतं! 

"अगदी अलीकडे एक बातमी समजली आणि क्षणभर मी वेड्यासारखा गप्प उभा राहिलो. महात्माजींच्या वधानंतर झालेल्या प्रचंड जाळपोळीचं लोण माणदेशात पोचलं होतं आणि त्यात वाडीतला बन्याबापूंचा वाडा आतल्या साऱ्या वस्तूंसह पेटविला गेला होता. अंगावरील एका वस्त्रानिशी बापू, त्यांची सून आणि पुतण्या बाहेर पडले. स्वतःच्या डोळ्यांनी बापूंनी तो अवाढव्य वाडा राख झालेला पाहिला! काहीएक शिल्लक राहिलं नाही. 

"बघणाऱ्या इतर गावकऱ्यांची माथी तरकून गेली, मग बापूंचं काय झालं असेल? 

"इतर मराठे मंडळींनी स्वतःच्या घरी येऊन राहण्याबद्दल खूप आग्रह केला, पण बापू गेले नाहीत. ते तोंड भरून हसले आणि बोलले, ‘‘ठीक झालं! घुशी आणि ढेकूण भारी झाले होते वाड्यात!’’ 

"या विनोदानं गावकरी मंडळींना अधिकच अवघड वाटलं. आमच्या घरी नाही तर नाही, निदान मारुतीच्या देवळात राहा, आम्ही सर्व काही पुरवितो, म्हणून मंडळी काकुळती आली; पण बापू म्हणाले, ‘‘काही नको. मी आपला माझ्या रानात झोपडी बांधून राहतो. बन्याबापू कुणाचे उपकार घेणार नाहीत!’’ 

"आणि हल्ली बापू रानात झोपडी बांधून राहतात. बापूंच्या बरोबर साऱ्या वाडीची कळाही रानात निघून गेली आहे. जळत्या वाड्याच्या राखेत पोरंबाळं काही गावतं का म्हणून हिंडतात; कुत्री-गाढवं लोळतात! गोरगरीब ते बघतात आणि म्हणतात, ‘‘अगाई, वंगाळ वंगाळ झालं! असला तालेवार बामन, पन त्येच्यावर काय ह्यो परसंग आला!’’
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 06, 2022 - January 07, 2022.

कोंडिबा गायकवाड  

" ... कोंडिबा वाट बघत होता. बेसावध असताना संतूला दगा करण्याचा त्याचा डाव होता. 
""अखेर वेळ आली. उन्हाची गुरं राखायला गेलेला संतू गाफीलपणे फरशी उशाला घेऊन निंबाला सावलीत झोपला. गार वाऱ्यानं त्याचा डोळा लागला. कुठूनतरी ते कोंडिबानं पाहिलं. सावट होऊ न देता तो हळूहळू गेला आणि निंबाच्या खोडाआड लपून पाहू लागला."

"पाय न वाजविता जाऊन रानात पडलेला एक भलामोठा धोंडा घेऊन कोंडिबा आला. संतूच्या उशाशी येऊन उभा राहिला आणि ओठावर दात रोवून त्यानं भलामोठा श्वास घेतला आणि डोक्याच्यावर नेऊन तो धोंडा संतूच्या डोक्यात घातला. संतू जागच्या जागी ठार झाला."
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
January 07, 2022 - January 07, 2022.

शिदा चांभार  

"‘‘लेका शिद्या, बघ हे. माती घातलीस होय मधी?’’ 

"शिदा सहज उत्तरला, ‘‘माती हाय व्हय जी? करल हाय की!’’ 

"मी अगदी थंड झालो! ‘‘बोलतोस तोंड वर करून! करल आणि माती यात काय फरक रे?’’ ‘

"‘तसं कसं? करलात पानी जिरत न्हाई.’’ मुर्दाडपणानं शिदा बोलला, ‘‘का करावं जी? पोटापायी लबाडी करावी लागती! पोट मोटं वाईट हाय धनी!’’ 

"मध्यंतरी गांधीवधानंतर गावात जो गोंधळ झाला, जाळपोळ झाली, तेव्हा महारापोरांनी जळत्या घरातली मालमत्ता लुटली. त्यात शिदा आघाडीवर होता. रोज ज्यांच्याशी संबंध यायचा, त्या ब्राह्मणांच्या घरातली भांडीकुंडी, धान्यधुन्य त्यानं त्या धबडग्यात पळवलं. स्वतःला जाईना तेव्हा बायकोला आणि पोरांना हाक मारली आणि पळवलं! 

"त्यानंतर त्यानं मोठी चैन केली. चार-आठ आण्याचं रॉकेलचं मोकळं डबडं बाजूला टाकून मोठ्या हंड्यात पाणी तापवलं आणि ते पितळेच्या घंगाळात ओतून तांब्यानं अंगावर ओतून घेऊन अंघोळ केली! गव्हाच्या पोळ्या करून त्याच्या बायकोनं त्याला कल्हई केलेल्या ताटात जेवायला वाढलं. तांब्यातलं पाणी फुलपात्रात ओतून तो बामणावाणी ते प्यायला आणि रात्री एकावर एक दोन गाद्या घालून झोपला. मानेखाली त्यानं उश्या घेतल्या. 

"बायकोला पुनःपुन्हा तो म्हणाला, ‘‘अगं, धांदलीत चुकलंच गं! कापडाची एखादी टरंक आनाय होवी हुती! तुला नेसाय चांगलंचुंगलं मिळालं असतं!’’"

"मग पोलिसांनी त्याच्या खोपटाची झडती घेतली. गाद्या, उश्या आणि चार-दोन भांडी एवढाच माल निघाला. तेव्हा सगळी बामणं विलक्षण चवताळली, ‘‘शिद्या, माल एवढाच कसा? गव्हाची पोती कुठं आहेत? आणि भांडी? आमच्या घरातली अंथरुणं-पांघरुणं आणलीस, नाही का?’’ 

"त्यावर शिदा बोलला, ‘‘का बिघडलं जी आनली म्हनून? आगीत जळूनच गेली असती की! गहू आनलं, ते गेलं खाऊन. खायाचा जिन्नस कुटला ऱ्हातुया! ही चार भांडी हैती. चांभारानं शिवलेली चालत असली, तर न्या जा बापडी!’’"
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 07, 2022 - January 07, 2022.
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
शिवा माळी  

"‘‘दादा, तुमी रडत्याचं डोळं पुसताया; पन आता जल्मातनं उटलो! आपलं तोंड काळं झालं. आता कुठं भागानगरला जाईन, न्हाईतर इख खाऊन मरेन. ह्या मानदेशात आता शिवा काय ऱ्हानार न्हाई!’’ 

"शिवाच्या या बोलण्यानं त्याची समजूत कशी करावी, तेच समजेना. ‘‘छे! छे! वेडा काय!’’ एवढंच मी पुन्हा त्याला म्हणत होतो."
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 07, 2022 - January 07, 2022.
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
१० तांबोळ्याची खाला  
................................................................................................
................................................................................................

"वयानं झालेली ही बाई एखाद्या मधमाशीसारखी कष्टाळू होती. काही ना काही उद्योग सतत करणारी होती. घरीच ती दातवण तयार करी आणि विकी. आठवड्याच्या बाजारात कुंकू, हळद, बुक्का, दातवण, शेंगदाणे, फुटाणे, चुरमुरे असले जिन्नस पुड्यात घेऊन बसे. एवढंसं तिचं भांडवल. साऱ्यांची मिळून किंमत दहा-बारा रुपयांपेक्षा जास्त काही नसावी. ते भांडवल कधी कमी झालं नाही; वाढलंही नाही. बाजाराचा दिवस संपला की, हे सारे जिन्नस एका पाटीत घालून आणि दाराला कुलूप ठोकून खाला खेडीपाडी हिंडण्यासाठी बाहेर पडे. आसपास असलेली चार-पाच मैल अंतरावरली खेडी ती हिंडे. रात्र झाली, तर ओळखीनं कुणाच्यातरी घरी मुक्काम करी. खेड्यापाड्यात दुकानं कुठून असणार? त्यामुळे खालाची रुपया-चार रुपयांची विक्री होई."
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 07, 2022 - January 07, 2022.
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
११ रघू कारकून  
................................................................................................
................................................................................................

"रघूचं लग्नाचं वय उलटून गेलं. लोक विचारू लागले, ‘‘काय रघू, असे हातानं तुकडे भाजून आता किती दिवस खाणार? बायको आण सुरेखशी!’’ 

"रघू उत्तर देई, ‘‘काय करायची आहे आपल्यासारख्या गरिबाला बायको?’’ आणि हसे. त्याचं ते हसणं अगदी ठरलेलं. नेहमीचं. बघणाऱ्याला रडण्याहून जास्त बोचणारं. त्याचं सारं दैन्य, लाचारी, असहायता त्या हसण्यात दिसे."
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 07, 2022 - January 07, 2022.
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
१२ बाबाखान दरवेशी  
................................................................................................
................................................................................................

"‘‘हुजूर, बायको काय, एक मेली तरी दुसरी मिळेल; पण काल जर का रागाच्या तावात हाणलं असतं आणि वर्मी टोला लागून जनावर पटकन मेलं असतं, तर कुणाला विचारायचं होतं? शिकलं-सवरलेलं जनावर मिळणं कठीण. आणि ते हाय म्हणून जगतोय!’’"
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 07, 2022 - January 07, 2022.
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
१३ गणा महार  
................................................................................................
................................................................................................

"तमासगिरांच्या खासगी जीवनाविषयी मला मोठं कुतूहल. त्यासंबंधी विचारलं असताना गणानं उत्तर दिलं, ‘‘साहेब, आमा लोकांना तुमी बघावं तमाशाच्या थेटरात, बोर्डावर उभं राहिल्यावरच. त्याचं बाकीचं काय बघू नये. मिठाई खावी, पण मिठाईचा कारखाना कधी बघू नये!’’"
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 07, 2022 - January 07, 2022.
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
१४ माझा बाप  
................................................................................................
................................................................................................

"रा. रा. मास्तरसाहेब यांना, वाकडेवाडीहून नरसू बाबाजी तेली याचा राम राम. लिहिण्यास कारण की, चिठ्ठी मुलानं दिली. आपण काळजी करण्याचे कारण नाही. आता त्याचे अंग गरम लागत नाही. आपल्याला संशय आला, तो ताप नसावा. टोचण्याचे कारण नाही. 

"नरसू बाबाजी तेली."
................................................................................................

"श्री. नरसू बाबाजी तेली यांना, 

"स. न. वि. वि. 

"आपला काही गैरसमज झालेला दिसतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने लस टोचून घेणे आवश्यक आहे. मुलाचा शिक्षक या नात्याने मला त्याच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपण मुळीच हयगय न करता टोचून घ्यावे. कळावे. 

"आपला, 

"र. वि. देशपांडे, 

"वर्गशिक्षक."
................................................................................................

"रा. रा. देशपांडे मास्तरसाहेब यांना, 

"नरसू तेल्याचा राम राम. 

"लिहिण्यास कारण की, तुम्ही पुन्हा टोचण्यास लिहिले आहे. आपले रास्त आहे. शाळा चुकविण्यासाठी आपण आजारी आहोत, असे त्याने लबाड सांगितल्याचे दिसते. त्याबद्दल मी त्याला ठोकला आहें. पुन्हा तो काही बोलणार नाही. कळावे. 

"आपला, 

"नरसू बाबाजी तेली, 

"वाकडेवाडीकर."
................................................................................................

"स. न. वि. वि. 

"आपला गैरसमज झालेला दिसतो. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की, तुमचा मुलगा आता आजारी आहे. त्याने तशी बतावणीही माझ्यापाशी केली नाही, पण तालुक्यात देवीची साथ आहे. तिला आवर घालण्यासाठी टोचून घेणे आवश्यक आहे, म्हणून मी आग्रह धरला. माझ्या चिठ्ठ्या पुन्हा एकवार नीट वाचल्यात, तर ही गोष्ट तुमच्या नजरेस येईल. सरकारी दवाखान्यात मोफत टोचण्याची व्यवस्था आहे. फार त्रासही होणार नाही. मुलाचा शिक्षक या नात्याने मला ही खबदारी घेणे आवश्यक वाटले. आशा आहे की, झाला गैरसमज दूर होऊन आपण टोचून घेण्याची तजवीज कराल. कळावे. 

"आपला, 

"र. वि. देशपांडे."
................................................................................................

"राजमान्य राजश्री मास्तरसाहेब यांसी, 

"रामराम. 

"पत्र लिहिण्यास कारण की, माझा गैरसमज झालेला नाही. मी, माझा बाप, माझा आजा कोणीही टोचून घेतले नाही. आमच्यापैकी कुणीही साथीच्या रोगाने मेले नाही. सबब, माझा मुलगाही मरणार नाही. मी त्याचा बाप तो जास्त कसा जगेल हे बघीन. तुम्ही फक्त त्याला चार अक्षरे शिकवण्याचे करा. कळावे. 

"आपला, 

"नरसू तेली."
................................................................................................

"आणि भरभर चालून दमगीर झालेली माझी आई डोक्यावर तेलाची पाटी घेऊन माझ्या मागून आली. ती निश्चयाने म्हणाली, ‘‘चल, आपण दवाखान्यात जाऊन टोचून घेऊ. तू कळ सोसशील का?’’ 

"मी म्हणालो, ‘‘सोशीन, पण नानाला कळलं तर?’’ ‘‘त्यांच्यादेखत विव्हळू नकोस.’’ 

"‘‘नाही, पण तो सुजलेला हात बघील. टोचल्यावर हात सुजतो.’’ 

"‘‘त्यांच्यादेखत उघडा होऊ नकोस आणि एकदा टोचल्यावर काय करणार आहे तो? चल.’’ 

"चिठ्ठी फाडून टाकून आम्ही दवाखान्यात गेलो. मात्र टोचताना आईने डोळे पदराने झाकून घेतले. मी तोंड फिरवून कळ सोसली. 

"माझ्या बापाला मी टोचून घेतल्याचे कळले नाही. साथ संपली, तेव्हा तो फुशारकीने मला म्हणाला, ‘‘सांग तुझ्या मास्तरला! मी अजून जिवंत आहे म्हणून आणि म्हणावं, माझा बापही आहे. गाढव साले! देवाशपथ मी सांगतो पोरा, तुझा तो मास्तरच एके दिवशी साथीत पटकन मरेल!’’ 

"यावर माझ्याकडे बघून आई गालात हसली."
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 07, 2022 - January 07, 2022.
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
१५ बिटाकाका  
................................................................................................
................................................................................................

" ... या माणसापाशी एवढी माया कशी होती, असे वाटून स्वतःची शरम वाटते. आपण, आपली बायको, आपली पोरे यांपलीकडे आता आम्हाला कुणाविषयी काही वाटत नाही. सख्खे बहीण-भाऊसुद्धा परके वाटतात. वर्षानुवर्षे कुणी कुणाला मुद्दाम सवड काढून भेटत नाही. कधी प्रसंगांनी भेटले, तरी काय बोलावे याचा विचार पडतो. साडेसात रुपये पगार असताना तीन रुपयांचा कोट घेऊन शे-सव्वाशे मैलांची पायपीट आता मी माझ्या पुतण्यासाठी करीन का? 

"अंग वाढले तसा तोकडा झाला, जुना होऊन फाटला, तरी तो हिरवा कोट मी कित्येक दिवस वापरीत होतो. झोपतानासुद्धा तो माझ्या अंगात असे. काकांनी दिलेली ही ऊब पुढे मला जन्मभर पुरली आहे.:"
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 07, 2022 - January 07, 2022.
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
१६ गणा भपट्या
................................................................................................
................................................................................................

"‘‘कुकुडकुंभा हा पक्षी पाण्याशेजारी आणि वेळूच्या बेटात राहतो. तो बाहेर गेल्याचे बघून त्याच्या घरट्यात सालवृक्षाच्या काटक्या टाकाव्यात. त्या काटक्या कुकुडकुंभ्याची पिले चोचीने उचलून पाण्यात टाकतील. त्यातील जी काडी पाण्यावर तरेल, ती घरी आणावी. काडी ज्या वस्तूस लावाल, ती सोन्याची होईल!’’ 

"आजारीपणाने खंगलेला गणा म्हणाला, ‘‘अरं तिच्या बाइली! हेबी बरं हाय की! काडी लावली की सोनं! घर सोन्यानं भरंल. दहा-बारा सराफकट्टं आपल्या मालकीचं होतील.’’ 

"मग तो दारापाशी जाऊन म्हणाला, ‘‘दादा, कुकुडकुंभा पक्षी कसा दिसतो बरं?’’"
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 07, 2022 - January 07, 2022.
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................

August 22,  2021 - January 07,  2022.

Purchased August 22, 2021. 

Kindle Edition, 128 pages
Published January 1st 1949 
by MEHTA PUBLISHING HOUSE
Original Title Maandeshi Manse
ASIN:- B073P2RVJ1
................................................
................................................
https://www.goodreads.com/review/show/4454789536
https://www.goodreads.com/review/show/4454794075
................................................................................................
................................................................................................

© ज्ञानदा नाईक 
मराठी पुस्तक प्रकाशनाचे हक्क 
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे. 
प्रकाशक सुनील अनिल मेहता 
मेहता पब्लिशिंग हाऊस, 
१९४१, सदाशिव पेठ, 
माडीवाले कॉलनी, पुणे - ३०. 
फोन : ०२०-२४४७६९२४

................................................................................................
................................................................................................
Paperback, 124 pages
Published by Mehta Publishing House 
(first published 1949)
Original Title Maandeshi Manse
ISBN:- 8184983638 
(ISBN13:- 9788184983630)
................................................................................................
................................................................................................

Kindle Edition, 85 pages
Published June 20th 1905 by 
MEHTA PUBLISHING HOUSE
ASIN:- B0711B3GXS