................................................................................................

Bai Bayko Calender (Marathi)
बाई, बायको, कॅलेंडर
by वपु काळे
V.P. KALE.

This collection seems so familiar, as one reads some of the stories one can recall what comes next.
One must have read them somewhere in late 1960.
The Story about a snake feared loose is quite Thurberesque.
................................................................................................
"चिपळ्याच्या म्हणजे गजा चिपळूणकर.
"होय. शुद्ध विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या घराण्यातला हा पुरुष! ... "
Really? There was someone of that name in that clan?
"आमच्या ह्या रमाकांत चौबळनं शिवली टाईट पँट. टाईट पँटचा विषय आमच्या कंपूत निघताच, चौबळानं, तसलीच पँट शिवायचा आपला मनसुबा जाहीर केला. मी त्याला लगेच प्रश्न विचारला, ‘तू पँट जेव्हा चढवशील तेव्हा काही प्रॉब्लेम नाही. पण पँट काढताना तुला रोज, प्रत्येक वेळी शिंपी कसा भेटणार?’
"‘का?’
"‘कारण गुडघ्याखाली पँट ओढायला दुसरा माणूस लागतो किंवा उसवून काढायला शिंपी लागतो.’
"‘चल, चल, इडली नको फेकूस.’ चौबळ म्हणाला."
This phrase, or it's root, took decades to comprehend - it was copying (or rather, desification) of 'fake', and since that word literally means 'throw' in Marathi, it was modified to 'idli fake', literally throwing idli.
When - late 1960s to early 1970s - this was used, mostly by collegiates of urban Western Maharashtra, it seemed silly to those who used each language with its own idioms and purity, and weren't amused when people mixed languages. That good many do so now,seems more akin to adulterated than natural, much less fashionable, as thought by the incompetent.
Authors of that era did use that language as 'current' for flavourful of the time.
"काय साली आमची पिढी. तो शेले का कुणी जर्मन (का फ्रेंच?) कवी शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचला होता असं सांगतात. त्या संस्कृतच्या खांद्यावर उभी राहिलेली मराठी मायबोली, पण आमच्या पिढीनं त्या या भाषेचं काय करायचं ठरवलं आहे, काही कळत नाही. आता एखादी गोष्ट खोटी वाटली तर जास्तीत जास्त ‘थापा मारू नकोस’– असं आपण म्हणतो. त्यानंतर ‘बंडल फेकू नकोस’– हे आम्ही पचनी पाडलं. तेवढ्यात ‘फिरकी घेऊ नकोस’– हे सहन करावं लागलं. आता हा चौबळ नवीनच काहीतरी प्रचारात आणतोय. हॅ!"

"‘तरी बरं नाही दिसत.’
"‘त्याला आता आम्ही बायकांनी काय करायचं? सभ्य, सुशिक्षित म्हणवणारे लोक समाजात असे वागतात, तेव्हा ज्या बायकांत थोडी हिंमत असेल, त्यांनीच अशा माणसांची जिरवली पाहिजे. ‘मांडीवर बस’ म्हणणारे दु:शासन समाजात अजून चालत आलेत, पण त्या मांडीला रक्तस्नान घालणारे भीम उरलेले नाहीत तेव्हा आम्ही काय करावं?’
"समोरचा म्हातारा गप्प बसला."

"तेवढ्यात आई म्हणाली, ‘वन्सं, तुम्ही पलंगावर बसा. तो जर आलाच इकडे, तर तुम्हाला पटकन् उठता येणार नाही.’
"आत्याबाई त्यातल्या त्यात चपळाईनं उठल्या. पण पलंगावर न बसता त्या डायनिंग टेबलावर बसल्या. पलंगापेक्षा टेबल उंच होतं म्हणून ते जास्त सुरक्षित वाटलं त्यांना! आत्याबाईंना टेबलावर बसवायला मदत म्हणून दादा पुढे गेले आणि तीच संधी साधून दादाही तिच्याजवळ, टेबलावरच बसले. दादा शेजारी बसताच आत्याबाई म्हणाली,
"‘अरे, त्या पोरांना आधी जवळ घे.’
"आम्ही उड्या मारून टेबलावर बसलो."

"तेवढ्यात फोन घणघणू लागला. मावशीची चुळबुळ सुरू झाली. पण तिला जाण्याचा धीर होत नव्हता. आता आम्ही सहाजण डायनिंग टेबलावर, पाय वर घेऊन बसलो होतो आणि विनूदादा तर माळ्यावर बसला होता. तिकडे रेडिओ कोकलत होता. फोनची घंटा वाजत होती. आणि पाण्याची बादली अजून वहात होती. पॅसेजभर पाणीच पाणी होऊन ते आता दाराच्या फटीतून बाहेर पडलं होतं.
"‘आपलं मांजर कुठं तडफडलंय् देव जाणे!’ आत्या म्हणाली."

Wasn't this story - मीच तुमची वहिदा - originally titled using name of Sharmila, not Waheeda? When and why was that changed, if one's memory isnt playing tricks?
................................................................................................
................................................................................................
" ... भटजीने, आपल्या तुळतुळीत केलेल्या डोक्यावरून,शेंडी कुरवाळत, समोर बसलेल्या रूबाबदार, टेरिलीन सुटाबुटातल्या, एम् .डी. एफ्.आर.सी.एस्. फिजिशियनला सांगितलं की, ‘बाबा रे, तुझा माझा व्यवसाय एकाच जातीचा आहे.’– तर काय वाटेल? सांगा काय वाटेल?– तुम्ही सांगणार नाही. तुम्ही म्हणाल की असं होईलच कसं? पण तसं घडलं म्हणून तर हा लहानसा किस्सा सांगायची पाळी आली!"
Four surgeons open a clinic, with not even a G.P.?
Or did author just use the F.R.C.S. because he'd heard of it, without any idea what the letters stood for even together?

एन्ट्री tells of an episode of a performance of a play that was also recounted by Jayawant Dalvi in his book on Konkan, Zaire Pravasi Ghadiche, far more effectively.
Perhaps it was an occurrence not unique, and happened more than once, in different settings?
Still, wasn't Kale aware of work by Dalvi?
................................................................................................
पेन सलामत तो –
Superb, original!

अनुक्रम

बाई, बायको, कॅलेंडर / १
पांढरा हत्ती तोही लोकांचा / ८
टाईट पँट / २० पैज + धाडस = ब्याद / २९
प्रिमियर / ३७
नऊवारी, सातवारी, पाचवारी, टक्केवारी / ४८
आयत्या ब्लॉकवर नागोबा / ५५
हेअर स्टाइल / ६३
वकील साहेब, सल्ला द्या / ७०
मीच तुमची वहिदा / ७६
हम पंछी / ८९
एन्ट्री / ९९
पेन सलामत तो – / १०३
दात है तो बात है / ११७
करंजी / १२४

REVIEW

"नवीन वर्ष सुरू होऊन अवघे चारच महिने झाले होते. चारच महिन्यांपूर्वी नव्या वर्षाची कॅलेंडर्स घराघरातून झळकली होती. म्हाताऱ्याकोताऱ्यांनी घरात आलेल्या कॅलेंडर्सच्या तारखा नीट पाहिल्या. त्या तारखांच्या चौकोनांतून पौर्णिमा, चतुर्थ्या ह्यांची नोंद आहे की नाही ह्याची पहाणी केली. गृहदक्ष गृहिणींनी, दुधाचे रतीब मांडण्याइतपत तारखांचे चौकोन मोठे आहेत की नाहीत हे तपासलं. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी, रविवारला जोडून तांबड्या तारखा कोणत्या महिन्यात जास्त आहेत ह्याचा प्रथम शोध घेऊन, त्यानुसार दांड्या मारण्याचं नवं कॅलेंडर आखलं. आणि मी? चिमणकडे ते नवं कॅलेंडर आलेलं पहाताच सर्द झालो. कॅलेंडर म्हणण्यापेक्षा त्या चित्रावर! हातात ट्रॅन्झिस्टर घेऊन उभी राहिलेली ती युवती पाहाताच मी म्हणालो, ‘बस् बस् चिमण, आपण रोज तुझ्या घरी एक चक्कर टाकणारच; आणि माझा तो त्रास तुला चुकावा असं वाटत असेल तर हे कॅलेंडर मला देऊन टाक.’"
"चिमणची बायको बाहेर येत म्हणाली,
"‘बाई सोडा हो भावजी, तिची साडी बघा आधी. दोन हजार रुपये मोजले तरी अशी साडी हिंदुस्थानात मिळायची नाही.’"
................................................................................................
"चिमण त्या कॅलेंडरमधल्या बाईलाच घेऊन माझ्या घरी आला होता. होय. तीच बाई. तिच्यासारखी दिसणारी दुसरी बाई नव्हे. वहिनी म्हणाल्या होत्या तेच दोन हजार रुपयेवालं पातळ नेसून, तीच बाई आली होती. मी थंड पाण्याची धार डोक्यावर धरली किंवा बादलीत बुडी मारली किंवा दोन्ही गोष्टी केल्या तरी ती बाई तीच होती ह्या वस्तुस्थितीत फरक होणार नव्हता."
................................................................................................
"‘अरे, इथं पाणी पिऊनच निघालात की त्या दिवशी?’
"‘दोस्त, बाई ती बाईच. लग्नाची असो नाही तर कॅलेंडरवरची असो, तिला जरा बऱ्यापैकी हॉटेल दिसलं की तहान लागतेच. मग काय– गेलो आणि घोटाळा झाला! हॉटेलच्या दारातच मेव्हणे! नको तिथं आडवं येणं हा मेव्हणे-मंडळींचा धर्मच! तिला पाहून ते जरासे दचकलेच. कारण कॅलेंडर पळवण्याची भाषा त्यांनी पण अनेक वेळा बोलून दाखवली होती. मग काय? पुण्यापर्यंत बातमी पोचायला काय वेळ लागतो! अगदी पी.टी.आय. ची बातमी! बाईसाहेब एकदम हजर. त्याही केव्हा? तर पहाटे साडेपाचच्या सुमाराला!’"
................................................................................................
"‘अरे का काय? कपाटात ती दोन हजार रुपयेवाली साडी तशीच होती.’
"‘असं कसं?’
"‘कसं म्हणजे? मी त्या बाईला सौ. चं घरातलं जुनं पातळ नेसण्यासाठी दिलं होतं. बायको अचानक आल्यावर ती गडबडीनं कॅलेंडरमध्ये जाऊन बसली ती त्याच जुन्या पातळासकट.’ चिमणनं खुलासा केला."
................................................................................................
"‘बरं मग माझ्याकडे हे कॅलेंडर मध्येच कशाला आणलंस् ?’
"‘मुद्दाम आणलं– आठ दिवस ठेव सांभाळून.’
"‘अरे पण का?’
"‘कारण, मी चाललोय आठ दिवस फिरतीवर– आॅफिसच्या कामासाठी! आणि म्हणूनच कॅलेंडर तुझ्या घरी ठेव. बायकोला मी बरोबर नेणार नाही. ती इथंच राहायची आहे. आणि– आणि…हे सुटाचं कापड कितीही भारी असलं, दुर्मिळ असलं; ही स्कूटरही कितीही आकर्षक असली तरी मला ती नकोय. कारण आपल्या संस्कृतीपेक्षा ह्या गोष्टी मोठ्या नाहीत. तुझं मत काय?’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................

September 02, 2022 - September 02, 2022.

"साहेबांनी गाडी गॅरेजमधून बाहेर काढली आणि लगेच स्वत:च्या गॅरेजमधे ठेवलीही. त्यांची ती गाडी चालविण्याची पद्धत पाहून दिनकरला सर्कसमधे ‘मोटार-जम्प’ करून दाखवणारा माणूस जशी गाडी चालवतो त्याची आठवण झाली. गुरख्याने गॅरेजला कुलूप लावून किल्ली साहेबांकडे दिली. साहेबांनी ती दिनकरपुढे केली."
................................................................................................
"‘बिलकूल सही, अरे क्या गाडी थी पांडे की. सब पार्ट इम्पोर्टेड! शॉक अॅबसॉर्बर्स तो एकदम न्यू. ग्रॅण्ड न्यू. सिर्फ दो-चार स्क्रॅचेस थे गाडीके उपर. मोझेसने सब पार्ट निकाल दिया और अपने गाडीको बिठा दिया.’
"‘अरे साला चारसोबीस है, बुलाव जरा उनको!’
"कादरनं ‘मोझेस-मोझेस’ म्हणून हाका मारल्या, आणि दिनकरचं साहेबाला लांड्या खाकी चड्डीत व काळ्या मिचकूट गंजिफ्रॉकमध्ये पहाण्याचं स्वप्न पुरं झालं."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 02, 2022 - September 02, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
टाईट पँट / २०
................................................................................................
................................................................................................
"चिपळ्याच्या म्हणजे गजा चिपळूणकर.
"होय. शुद्ध विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या घराण्यातला हा पुरुष! ... "
Really? There was someone of that name in that clan?
................................................................................................
"आमच्या ह्या रमाकांत चौबळनं शिवली टाईट पँट. टाईट पँटचा विषय आमच्या कंपूत निघताच, चौबळानं, तसलीच पँट शिवायचा आपला मनसुबा जाहीर केला. मी त्याला लगेच प्रश्न विचारला, ‘तू पँट जेव्हा चढवशील तेव्हा काही प्रॉब्लेम नाही. पण पँट काढताना तुला रोज, प्रत्येक वेळी शिंपी कसा भेटणार?’
"‘का?’
"‘कारण गुडघ्याखाली पँट ओढायला दुसरा माणूस लागतो किंवा उसवून काढायला शिंपी लागतो.’
"‘चल, चल, इडली नको फेकूस.’ चौबळ म्हणाला."
This phrase, or it's root, took decades to comprehend - it was copying (or rather, desification) of 'fake', and since that word literally means 'throw' in Marathi, it was modified to 'idli fake', literally throwing idli.
When - late 1960s to early 1970s - this was used, mostly by collegiates of urban Western Maharashtra, it seemed silly to those who used each language with its own idioms and purity, and weren't amused when people mixed languages. That good many do so now,seems more akin to adulterated than natural, much less fashionable, as thought by the incompetent.
Authors of that era did use that language as 'current' for flavourful of the time.
................................................................................................
"काय साली आमची पिढी. तो शेले का कुणी जर्मन (का फ्रेंच?) कवी शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचला होता असं सांगतात. त्या संस्कृतच्या खांद्यावर उभी राहिलेली मराठी मायबोली, पण आमच्या पिढीनं त्या या भाषेचं काय करायचं ठरवलं आहे, काही कळत नाही. आता एखादी गोष्ट खोटी वाटली तर जास्तीत जास्त ‘थापा मारू नकोस’– असं आपण म्हणतो. त्यानंतर ‘बंडल फेकू नकोस’– हे आम्ही पचनी पाडलं. तेवढ्यात ‘फिरकी घेऊ नकोस’– हे सहन करावं लागलं. आता हा चौबळ नवीनच काहीतरी प्रचारात आणतोय. हॅ!"
................................................................................................
"त्यानंतर हॉटेलात फारसं कुणी नाही ना, ह्याची मी खात्री करून घेतली. पानसे टॅक्सीसाठी धावला. हॉटेलात बसलेलं शेवटचं गिऱ्हाईक ‘टिप’ देऊन निघून गेलं. वेटर्स राहिले. पण त्यांना ‘जा’ कसं म्हणणार? आणि केवळ, केवळ, त्या दादासाहेबांसाठी मी मोहिनीला उचलून घेतली. वाटली तेवढी हलकी नव्हती. थँक गॉड, टॅक्सीपर्यंतचं अंतर फार नव्हतं. व्यायाम करणं म्हणजे ‘वेळेचा अपव्यय’ हे तेवढं खरं नाही.
"त्यानंतर दोनच दिवसांनी पानसेनं दोन फोटो माझ्यासमोर टाकले. एक दादांच्या अॅक्सिडेंटचा होता आणि दुसरा–
"दुसरा होता, मी मोहिनीला उचलून घेतलं तो.
"चौबळचं माथं बिथरायला निराळं काही हवं होतं का? मोहिनी प्रथम जाम वैतागली. पण तिचा ‘बाप’ जिथं आपल्या फेव्हरमध्ये, तिथं काय चालणार तिचं? अॅक्सिडेंटच्या फोटोमुळे त्यांना भरपाई मिळाली. आता, मी घरजावई झालो म्हणून साले मित्र छळतात. पण छळू देत.
"त्या साल्यांना कधी कुणाचं चांगलं बघवलंय का?"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 02, 2022 - September 03, 2022.

पैज + धाडस = ब्याद / २९
................................................................................................
................................................................................................
"–हातात हात मिळवले गेले आणि गाडी हलली. लाटकर, पेठे, निगुडकर, कुमठेकर आणि वैशंपायन सर्वांनी पन्नास-पन्नास रुपये काढून सदावर्तेजवळ दिले."
................................................................................................
"आणि सदावर्तेच्या पुढच्या उत्तरासाठी त्या पांडवांनी आणि समोरच्या अनोळखी सहप्रवाशांनी पण श्वास आवरून धरले. सर्वांकडे अर्थपूर्ण नजर टाकीत सदावर्तेनं मांडीवर हात मारून दाखवला आणि मनातल्या मनात ‘रामनामाचा’ जप करायला सुरुवात केली आणि काय घडणार हे कळायच्या आतच ती पंजाबी मुलगी ‘थँक्स’ म्हणाली आणि एखाद्या पुरुषाप्रमाणे तिने सराईतपणे खिडकीतून उडी मारली. खिडकीतून डब्यात प्रवेश करताना जो काही काल अपरिहार्यपणे जाणार होता, तेवढ्या काळात सदावर्तेनं सगळ्यांकडे धास्तावलेल्या नजरेनं पाहिलं. पण कुणीही त्याला सावरण्याच्या मन:स्थितीत राहिलेलं नव्हतं. कारण त्या तरुणीच्या अकल्पित कृतीनं सगळेच गोंधळात पडले होते.
"खिडकीतून डब्यात प्रवेश करून तिनं उभं रहायला जागा मिळवली. हातातली छोटी सूटकेस त्यावेळेपर्यंत प्लॅटफॉर्मवरच्या एका माणसानं हातात धरली होती. सदावर्तेला अजून उर्ध्व लागलेला होता. ती बाई एकटी नव्हती. म्हणजे कोणत्याही घटकेला ती बरोबर आलेल्या माणसाकडे तक्रार करू शकणार होती. तेवढ्यात प्लॅटफॉर्मवर उभ्या राहिलेल्या माणसानं तिला शुद्ध मराठीत विचारलं.
"‘सरू, तू ह्या गर्दीतून कशी जाणार?’
"‘अरे माझी बसायची सोय झाली आहे. काळजी करू नकोस–’
"आणि तेवढ्यात गाडी हलली."
................................................................................................
"‘तरी बरं नाही दिसत.’
"‘त्याला आता आम्ही बायकांनी काय करायचं? सभ्य, सुशिक्षित म्हणवणारे लोक समाजात असे वागतात, तेव्हा ज्या बायकांत थोडी हिंमत असेल, त्यांनीच अशा माणसांची जिरवली पाहिजे. ‘मांडीवर बस’ म्हणणारे दु:शासन समाजात अजून चालत आलेत, पण त्या मांडीला रक्तस्नान घालणारे भीम उरलेले नाहीत तेव्हा आम्ही काय करावं?’
"समोरचा म्हातारा गप्प बसला."
................................................................................................
" ... सदावर्तेचं पाऊल घरात पडताच सदावर्तेच्या बायकोने, सरोजने व सदावर्तेने एकमेकांना टाळ्या दिल्या.
"‘आता मला साडी हवी.’
"‘वहिनी, पहिला माझा नंबर हं. मी नाटक किती चोख वठवलं हे पहायला तू हवीच होतीस. एकच खूण सांगते. कर्जतला तुझे वडील आले होते… अगं त्यांनीही मला ओळखलं नाही. तेव्हा आधी मला पातळ.’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 03, 2022 - September 03, 2022.

" ... वेळप्रसंगी आपली बायको पण किती नाजूक आवाजात बोलू शकते, ठेवणीतलं हसू शकते त्याचा आपल्याला शोध लागतो. फॉयरमधल्या मोठ्या आरशात, आपल्याला आपलं पोट फारसं सुटलं नसल्याचा साक्षात्कार होतो. आपल्याही बायकोकडे चार माणसं हळूच बघत असताना आपल्याला आढळतात. आपला चॉईस तेवढा वाईट नाही ह्याचा डौल वाटतो. आपली बायको चारचौघांत चांगलं बोलत असते. आपण त्याला हरकत घेत नाही. आपण त्या दिवशी एकदम ‘सोशल’ झालेलो असतो."
................................................................................................
"वाडेकर त्याच्या ‘वहिदाला’ घेऊन गेला. घरात राजाचा आणि पिट्टूचा प्रिमियर रंगात आला होता आणि आम्ही ‘बाल्कनीत’ उभं राहून तो पहात होतो."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 03, 2022 - September 03, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
नऊवारी, सातवारी, पाचवारी, टक्केवारी / ४८
................................................................................................
................................................................................................
" ... सुदर्शन मराठेचा जन्मच ह्या असल्या उपद्व्यापासाठी! मॅट्रिक होईपर्यंत ह्या बाळाचं आणि त्याच्या आईवडिलांचं दैव एकंदरीत बरं होतं. सगळे शुभाशुभ ग्रह मार्गी होते, पण नंतरच्या महाविद्यालयीन शिक्षणात ‘स्टॅटिस्टिक्स’ नावाचा ‘राहू’ सुदर्शनच्या पत्रिकेत उपटला आणि ‘सुदर्शन मराठे’ एकाएकी वक्री झाला. त्याला मग जळी-स्थळी-काष्ठी पाषाणी स्टॅटिस्टिक्स दिसत राहिलं. त्या एका विषयाखेरीज त्याच्या डोक्यात व तोंडात दुसरा विषय नव्हता. ते स्वत:चं वेड पुरं करून घेण्यासाठी त्या पठ्ठ्यानं कॉलेज सोडलं. मी त्याला हटकलं तेव्हा खिशातून लहानशी चोपडी काढत तो म्हणाला,
"‘बारा टक्के लोक कॉलेज सेकंड इयरला सोडतात. अठरा टक्के लोक हाच विषय घेऊन थर्ड इयरला विचार बदलतात. उरलेल्या लोकांत वीस टक्के लोक स्टॅटिस्टिक्स घेऊन बी.ए. होतात, पण नंतरच्या आयुष्यात आपण हा विषय घेतला होता हेही विसरून जातात.’
"‘बरं, पण आता तू काय करणार आहेस?’ मी विचारलं.
"‘स्टॅटिस्टिक्स.’ तो गंभीर होऊन म्हणाला. पुढं खोलात जाऊन विचारण्याचा मला धीर झाला नाही. कारण तो परत काही आकडेवारी तोंडावर फेकेल ही धास्ती होती."
................................................................................................
"‘अरे, पण ह्या असल्या आकडेवारीचा उपयोग तरी काय?’
"‘उपयोग?’ त्यानं एवढंच बोलून माझ्या प्रश्नातली तुच्छता मला दर्शविण्याचा प्रयत्न केला, पण नंतर माझा प्रश्न उपेक्षणीय नाही असं वाटून तो पुढे म्हणाला, ‘उपयोग आज ना उद्या होईल. हे असलं कार्य मी ह्या शतकासाठी नाहीच करत. आणखीन पाचशे वर्षांनी जेव्हा आजचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा माझ्या ह्या आकडेवारीचा निश्चित, एखाद्या इतिहाससंशोधकाला उपयोग होईल. लवकरच मी माझ्या आजवरच्या कार्याचा कोश प्रसिद्ध करणार आहे. त्यात हे सगळं येईल.’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 03, 2022 - September 03, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
आयत्या ब्लॉकवर नागोबा / ५५
................................................................................................
................................................................................................
"तेवढ्यात आई म्हणाली, ‘वन्सं, तुम्ही पलंगावर बसा. तो जर आलाच इकडे, तर तुम्हाला पटकन् उठता येणार नाही.’
"आत्याबाई त्यातल्या त्यात चपळाईनं उठल्या. पण पलंगावर न बसता त्या डायनिंग टेबलावर बसल्या. पलंगापेक्षा टेबल उंच होतं म्हणून ते जास्त सुरक्षित वाटलं त्यांना! आत्याबाईंना टेबलावर बसवायला मदत म्हणून दादा पुढे गेले आणि तीच संधी साधून दादाही तिच्याजवळ, टेबलावरच बसले. दादा शेजारी बसताच आत्याबाई म्हणाली,
"‘अरे, त्या पोरांना आधी जवळ घे.’
"आम्ही उड्या मारून टेबलावर बसलो."
................................................................................................
"तेवढ्यात फोन घणघणू लागला. मावशीची चुळबुळ सुरू झाली. पण तिला जाण्याचा धीर होत नव्हता. आता आम्ही सहाजण डायनिंग टेबलावर, पाय वर घेऊन बसलो होतो आणि विनूदादा तर माळ्यावर बसला होता. तिकडे रेडिओ कोकलत होता. फोनची घंटा वाजत होती. आणि पाण्याची बादली अजून वहात होती. पॅसेजभर पाणीच पाणी होऊन ते आता दाराच्या फटीतून बाहेर पडलं होतं.
"‘आपलं मांजर कुठं तडफडलंय् देव जाणे!’ आत्या म्हणाली."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 03, 2022 - September 03, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
हेअर स्टाइल / ६३
................................................................................................
................................................................................................
"‘बाईंना संध्याकाळी रिसेप्शनला जायचं आहे. तेवढ्यासाठी आजवर कोणीही केली नसेल अशी हेअर-स्टाइल करायची आहे. ह्यावेळेला कॅमेऱ्याचा अख्खा रोल हिच्यासाठी खर्च झाला पाहिजे.’
"सौ. डोळे वटारीत आत गेली आणि आशा म्हणाली,
"‘ते माझ्याकडे लागलं.’"
................................................................................................
"–तिचा तो हेअरस्टाइलचा प्रकार डाव्या बाजूने मधाच्या पोळ्यासारखा दिसत होता. उजव्या बाजूने मानेवर आवाळू आल्यासारखा वाटत होता. वरच्या बाजूने जंगलातल्या साळूसारखा दिसत होता, आणि त्या सर्व जंजाळातून एका बाजूला सोडलेलं वेणीचं शेपूट, वारुळातून बाहेर राहिलेल्या सापाच्या शेपटीसारखं दिसत होतं. त्या दोघी गेल्या आणि मी परमेश्वराची प्रार्थना केली–
"‘देवा, आज पानसुपारीला येणाऱ्या लोकांना वाचव.’"
................................................................................................
"–‘भगिनींनो, एवढा वेळ आपण ही नव्या धर्तीची केशरचना कशी करायची, केव्हा करायची, ह्याचा विचार केला. ही केशरचना, सोडवायची कशी हाही एक अभ्यासाचा विषय आहे. त्याची एक खास रीत आहे. त्याचा विचार आपण आता पुढच्या महिन्याच्या अंकात करू. नमस्ते.’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 03, 2022 - September 03, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
वकील साहेब, सल्ला द्या / ७०
................................................................................................
................................................................................................
"‘ती काहीच करीत नव्हती. तिची ह्या दुकानातून त्या दुकानात, खरेदी चालली होती. घासाघीस चालली होती. मी ते वरून पहात होतो. स्वत:शी विचार करीत होतो तो हा की, त्या बाईला आपल्या नवऱ्याच्या हातातली पिशवी किंवा ते मूल घेण्याची बुद्धी केव्हा होते, तेवढंच पहायचं. आणि विजा, परहॅप्स यू विल नॉट बिलीव्ह, पण ह्या वेगानं आणि ह्याच पद्धतीनं तिची खरेदी पाऊण तास चालली होती. माझे केवळ नुसते उभे राहून पाय दुखायला लागले, मग त्या गृहस्थाची अवस्था काय झाली असेल?
"–सुमारे पाऊण तासानंतर त्या महामायेनं नवऱ्याच्या हातातली पिशवी घेतली. त्या क्षणी मला त्या बाईचा छोटासा सत्कार करावासा वाटला. मी नुसता तेवढ्या विचारावर थांबलो असतो तर फार काही घडलं नसतं.
"पण अक्षरश: मला राहावेना. मी वेगानं रस्त्यावर गेलो. समोरच्या फुलवाल्याकडून हार घेतला आणि त्या बाईच्या गळ्यात नेऊन घातला."
................................................................................................
"‘मी मग खाली उतरलो. मुसंडी मारून त्या घोळक्यात शिरलो. त्या मुलाला कडेवर घेतलं, आणि काय केलं असेल?’
"‘त्या बाईची कानउघाडणी करून तिला दिलंस?’
"‘नो नो, मग खटला नसता झाला. मी त्या मुलाला घेऊन सरळ घरी आलो. त्याला गॅलरीतल्या गॅलरीत खेळवत बसलो. दूध पाजलं, खेळणी दिली, आणि एकीकडे त्या बाईच्या हालचाली पहात राह्यलो. तुझा पुन्हा विश्वास बसायचा नाही, पण मैत्रिणीच्या नादात आणि निरनिराळ्या साड्या पहाण्याच्या कैफात, त्या महामायेला तिच्या मुलाची तासभर आठवण झाली नाही. तिने तीन तीन दुकानं बदलली. मी सगळी गंमत पहात होतो. मैत्रिणी जेव्हा गेल्या तेव्हा ती भानावर आली. आणि मग मूल शोधू लागली. पुन्हा पुन्हा सगळ्या दुकानातून डोकावत हिंडू लागली. मग तिचा धीर खचला. चेहरा उतरला. ती रडायच्या बेताला आली. आता तिच्याभोवती बघे जमले. चौकशी सुरू झाली. लोकांच्या प्रश्नावळीने ती बेजार झाल्याचं मला इथून कळत होतं. निष्पाप मुलाला होणारा मन:स्ताप मी वाचवला होता आणि तिला ते शासन देण्यात काहीच गुन्हा नव्हता. त्या मुलालाही मी तो गोंधळ कडेवर घेऊन दाखवत होतो. इतक्यात कसं कुणास ठाऊक, त्या बाईचं माझ्याकडे लक्ष गेलं. रस्त्यावरून बेहोषीनं ओरडली. चार-पाच लोकांना आणि एका पोलिसाला घेऊन ती वर आली. वस्तुत: तिच्या मुलाला मी तासभर मस्तपैकी खेळवलं होतं. ते मूलही त्याच्या आईकडे, माझ्याकडून जाम जाईना. तरीही, मूल पळवण्याचा आरोप झालाच. काय करू?’"
................................................................................................
"‘आॅल राईट, आता तिसरा आरोप सांग.’
"‘तिसरा त्या मानानं किरकोळ आहे. आमच्या ह्या समोरच्या रस्त्यावर एक ठराविक कॉलेज स्टुडंट्सचा घोळका, रस्ता अडवून उभा राहतो. मोटारी येतात, जातात, पण ह्यांचा घोळका तसाच गप्पा छाटीत उभा असतो. मोटारवाले केव्हा केव्हा हॉर्न वाजवून थकतात. पण ती मुलं जागची हालत नाहीत. ट्रीपला निघाली तर भल्या पहाटे रस्त्यावरून असभ्य भाषा मोठमोठ्यांदा बोलत जातात. हे मला जेव्हा असह्य झालं तेव्हा मी एके दिवशी एक बादली गार पाणी भरून बदाबदा त्यांच्या अंगावर ओतलं. त्यातून भांडण, शेवटी पोलिसचौकी.’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 03, 2022 - September 03, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
मीच तुमची वहिदा / ७६
................................................................................................
................................................................................................
Wasn't this story originally titled using name of Sharmila, not Waheeda? When and why was that changed, if one's memory isnt playing tricks?
................................................................................................
"पाटोळ्यांच्या, जवळजवळ मोडीत काढलेल्या चाळीसमोर वहिदा रहमानची भली मोठी इम्पाला वळवता वळवता माणिकजीला घाम फुटला.
"गाडी थांबताच अप-टू-डेट युनिफॉर्ममधली दोन माणसं खाली उतरली. मुलांनी उत्साहानं त्यांना वर आणलं.
"एअरइंडियाच्या महाराजाप्रमाणे त्या दोघांनी रमाकांतला कमरेत वाकून नमस्कार केला. रमानं तत्परतेनं तो वह्यांचा गठ्ठा त्यापैकी एकाच्या हातात दिला. रमाकांत निघाला तेव्हा आख्खी चाळ गॅलरीत जमली होती. वाघमारे मनात जळफळत होते. दोन वर्षांपूर्वी त्यांना हॉस्पिटलमधून, स्ट्रेचरवर टाकून आणावं लागलं होतं तेव्हा देखील लोकांनी एवढी गर्दी केली नव्हती. टेचात वळण घेऊन इम्पाला नजरेआड झाली."
................................................................................................
"‘चाळीतल्या मुलांनी वहिदा रहेमानच्या आॅटोग्राफसाठी वह्या दिल्या होत्या. तुम्ही चित्रकार आहात. त्यांच्या सहीसारख्या सह्या..’
"‘अहो, पण मी त्यांची सही पाह्यली पण नाही.’
"‘इथं फोटोच्या आल्बमवर सही आहे ना बाईंची. सहीसारखी सही पाहा. पोरांची समजूत पटली की झालं!’
"‘आॅल राईट, लेट अस् ट्राय!’
"चित्रकारानं बैठक मारली आणि हा हा म्हणता वह्यांचा गठ्ठा संपवला."
................................................................................................
"नेहमीच्या पिठलंभातावर रमाकांत आडवा पडून हात मारू लागला, तेव्हा रमा फक्त स्वत:शी हसली. दिवसभराची भूक बोलत होती ही."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 03, 2022 - September 03, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
हम पंछी / ८९
................................................................................................
................................................................................................
" ... भटजीने, आपल्या तुळतुळीत केलेल्या डोक्यावरून,शेंडी कुरवाळत, समोर बसलेल्या रूबाबदार, टेरिलीन सुटाबुटातल्या, एम् .डी. एफ्.आर.सी.एस्. फिजिशियनला सांगितलं की, ‘बाबा रे, तुझा माझा व्यवसाय एकाच जातीचा आहे.’– तर काय वाटेल? सांगा काय वाटेल?– तुम्ही सांगणार नाही. तुम्ही म्हणाल की असं होईलच कसं? पण तसं घडलं म्हणून तर हा लहानसा किस्सा सांगायची पाळी आली!"
Four surgeons open a clinic, with not even a G.P.?
Or did author just use the F.R.C.S. because he'd heard of it, without any idea what the letters stood for even together?
................................................................................................
"इतर सर्व विषयांत जेमतेम काठावर पास होणारा सद्या, मॅट्रिकपर्यंत जिंकून होता संस्कृत-मराठीत. शंभरापैकी अठ्याण्णव-नव्व्याण्णव मार्क असायचे त्याला संस्कृतमधे. मॅट्रिकला कसा कुणास ठाऊक, तो कच्चा असून गचकला नाही, शंकरशेट स्कॉलरशिप घेऊन गेला."
................................................................................................
"‘आमच्या तीर्थरूपांनी सांगितले ते योग्यच होते बरे! ते म्हणाले, ‘सदोबा कॉलेजात पाच सहा वर्षं वाया घालवाल, कदाचित डॉक्टर व्हालही. पण ध्यानात ठेवा, दगदग फार. सगळी ऐपत असून, वेळेवर घास पोटात जायचा नाही. अरे बाबा, जेवणासाठी जंगजंग पछाडायचं, आणि शेवटी जेवणाचे हाल करायचे हे काही खरं नाही.’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 03, 2022 - September 03, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
एन्ट्री / ९९
................................................................................................
................................................................................................
This story tells of an episode of a performance of a play that was also recounted by Jayawant Dalvi in his book on Konkan, Zaire Pravasi Ghadiche, far more effectively.
Perhaps it was an occurrence not unique, and happened more than once, in different settings?
Still, wasn't Kale aware of work by Dalvi?
................................................................................................
"– यानंतर पंधरा ते वीस मिनिटं शंकरराव व बाबुराव यांची झटापट चालायची. शंकररावांच्या तुळतुळीत टक्कल पडलेल्या टाळक्याला कृष्णाचा भरगच्च केसांचा टोप बसवायचा म्हणजे एक दिव्य असायचं. त्या कामात पंधरा-वीस मिनिटं हा हा म्हणता जायची. शंकररावांचा टोप बसवून होतो न होतो तोच दु:शासनाचं काम करणारे वामनराव, मिशी लावून घेण्याकरिता बाबुरावांसमोर हजर व्हायचे. वामनरावांना मिशी डकवली की विनायक नावाचा पोरगेलासा गृहस्थ बुचडा व गंगावन लावून घेण्यासाठी हजर व्हायचा. मग मात्र बाबुरावांची एकच धावपळ उडायची. ‘द्रौपदी वस्त्रहरण’ या नाटकाचे बासष्ट प्रयोग झाले. तरीही आगाऊ मेकअप्चं वेळापत्रक पन्नासदा ठरवून देखील लोकांना दाढी, मिशा, बुचडे, वेण्या, गंगावने लावता लावता बाबुरावांच्या टाळक्यावरचे केस कमी व्हायचे. द्रौपदीचं काम करणाऱ्या विनायकाला, गंगावन बांधता बांधता प्रत्येक वेळी ते म्हणायचे, ‘हे काही खरं नाही विनायकराव. जेनो काम तेनो थाय! बायकांनी बायकांची कामे करायला हवीत.’
"विनायक म्हणायचा, ‘आणि मग ते वस्त्रहरण कसं काय साधायचं?’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 03, 2022 - September 03, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
पेन सलामत तो – / १०३
................................................................................................
................................................................................................
Superb, original!
................................................................................................
"‘पाहातोस काय असा? तुझी काळजी वाटते म्हणाले ते उगीच नाही. वर्तमानपत्राच्या बॉर्डरवर तू लिहून ठेवलं होतंस, ‘मागणी घालण्यापेक्षा धडाधड आवडणाऱ्या पोरी पळवून न्याव्यात. पोरीच्या बापाला तोंड देण्यापेक्षा पोलिसाला तोंड देणं सोपं!’ तू गेलास आणि अण्णा वरचेवर मला विचारीत राहिले, ‘ह्या गृहस्थाचं तुझ्यावर खरं प्रेम आहे का? ह्याचं लक्षण तर मला ठीक दिसत नाही.’"
................................................................................................
"श्यामला तो कागद घेऊन निघून गेली. तेव्हा अवीच्या लक्षात आलं, की विचारांच्या तंद्रीत आपण त्याच कागदावर लिहून ठेवलंय. इंगळी डसल्याप्रमाणे तो ताडकन उभा राहिला. तेवढ्यात शिपाई बोलवायला आलाच.
"भीत भीत अवीने खोलीत प्रवेश केला. श्यामला गालातल्या गालात हसत होती.
"‘हे हँडराइटिंग तुमचं ना? नॉनसेन्स. सकाळी एका कागदावर लिहिलंत, पोरीचा बाप तिच्याइतकाच खुसखुशीत असतो, काय हे! I know your habits! सकाळचं वाक्य मी खोडलं. पण अशी मीच सारखी तुमची वाक्यं खोेडू लागलो, तर मला दुसरी कामंच करायला नकोत.’"
................................................................................................
"धावती बस सोडून अवीने उडी मारली. त्याच्या पाठोपाठ मोहित्यांनी पण उडी मारल्यावर हा गृहस्थ आपला नक्की पाठलाग करतो आहे याची अवीला खात्री पटली. पोस्टातून बाहेर पडल्यापासून एक गृहस्थ मागे येतो आहे अशी अवीची भावना झाली होती. एकदोन ठिकाणी अवी मग उगीचच थांबला होता. मधूनच एकदम पळत होता. तो माणूस पाठोपाठ येतच होता. अवीने पकडलेली बस त्यानेही पकडली होती. आणि आता धावत्या बसमधून त्याने उडी मारल्यावर, पाठलागावर असलेल्या इसमानेही उडी मारली होती!"
................................................................................................
"अवीच्या घरी अवी एकटाच रहात होता. मोहित्यांनी त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा असंख्या चिठ्ठ्याचपाट्या त्यांना सापडल्या. त्या चिठ्ठ्यांचा मेळ घालणं म्हणजे इतिहाससंशोधन करण्यासारखे होते. हायड्रोजन बॉम्ब हिंदुस्थानात केव्हा तयार होईल?– सुभाषचंद्र आणि हिटलर जिवंत असतील काय?– सी. आय्. डी. जात नष्ट व्हायला पाहिजे! एक ना दोन अनेक प्रकार होते."
................................................................................................
"सगळे बाहेर पडले. जाताना मधुवंतीने अवीला खेचतच नेले. बांदिवडेकरांकडे भीतभीत पहात मोहित्यांनी अवीने लिहून ठेवलेला मजकूर वाचला,
"‘लाच घेतल्याशिवाय बांदिवडेकर सोडणार नाहीत.’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 03, 2022 - September 03, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
दात है तो बात है / ११७
................................................................................................
................................................................................................
"त्या टारगट कंपूला कोण ओळखत नव्हतं? सगळेच ओळखत होते!– आख्खं कॉलेज. आॅफिसात बॉयपासून बॉसपर्यंत सर्व! एवढंच नव्हे, तर तो कंपू ज्या ठरलेल्या लोकलमधून प्रवास करीत असे, त्या गाडीतले सहप्रवासीदेखील त्यांना ओळखून होते. थोडक्यात म्हणजे ही ‘टारगट कंपनी’ सगळ्यांना माहीत होती. प्रत्येकाच्या आडनावचं पहिलं अक्षर, घेऊन ‘टारगट’ हा शब्द तयार झालेला होता. आणि तो शब्दप्रयोग टाकळकर, रणदिवे, गद्रे, टकले– सगळ्यांनाच बिनशर्त मंजूर होता.
"ह्या चौकडीचे सगळे कार्यक्रम एका वेळेला होत असत. सकाळी कॉलेज, दुपारी नोकरी, संध्याकाळी पाच-पस्तीसची गाडी, ह्या गोष्टी बरोबर करणं म्हणजे अगदी टॅक्सीवाल्यानं टॅक्सी चालू करण्यापूर्वी ‘मिटरफ्लॅग’ फिरवण्याइतकं आवश्यक आणि सहज ठरलेलं होतं. ह्या व्यतिरिक्त त्यांचे नेहमीचे कार्यक्रमही सांघिक स्वरुपात व्हायचे! ‘न्यू आराम’ मधे एकटा टाकळकर कधी भजी खाताना दिसायचा नाही, त्याचप्रमाणे शनिवारी दुपारी ‘मेट्रो’च्या लाइनीत एकटा गद्रे उभा राहील, अशी पैज कुणी जिंकणं शक्य नव्हतं."
................................................................................................
"चौघेजण चार-पंचवीसची गाडी सोडून सव्वा चारच्या गाडीला धावले. पुढच्या फर्स्टच्या डब्यात ती मुलगी शिरलेली चौघांनीही धावता धावता पाहिली. ते सगळे तो पुढचा डबा पकडीपकडीतो गाडी हलली."
................................................................................................
"‘मलाही थोडी पारख आहे. मनुष्यस्वभावाची.’ ती मुलगी हसत उत्तरली. ‘चारपाच कॉलेज स्टुडंट्स एकत्र जमले तर ते काय महागाईबद्दल बोलतील?– तेही डब्यात एकच मुलगी असताना? शेजारच्या मुलीला आपलं बाष्कळ बोलणं, स्वत:ला भारी वाटणारे, पण वस्तुत: फालतू असलेले विनोद– जास्तीत जास्त कसे ऐकू जातील, अशी त्यांची धडपड चालते. एकमेकांच्या अॅक्टिव्हिटिज् मग मोठ्यांदा चर्चिल्या जातात. एकजण दुसऱ्याच्या नाटकातल्या पडलेल्या भूमिकेचं कौतुक करतो, तर दुसरा तिसऱ्याच्या क्रिकेटमधल्या न काढलेल्या सेंचुरीची वाहवा करतो. त्या वेळचं त्यांचं टीमवर्क वाखाणण्यासारखं असतं! आणि ह्याच्याउलट आत्ता तुमच्यापैकी प्रत्येकजण मला तुमचं बोलणं कसं ऐकू येणार नाही ह्याचीच दखल घेत होता. तेव्हा ते बोलणं माझ्या पुढं आलेल्या दाताबद्दलच असणार यात शंका कसली?’"
................................................................................................
"स्टेशन आलं होतं. तिच्या अद्भुत खुलाशानं चौघेही टारगट मूक बनले. गद्रेकडे पाहून ती मुलगी पुढं म्हणाली,
"‘तुमच्या काकांना मी ओळखते. त्यांना माझा नमस्कार सांगा. दाताचं हे संरक्षण त्यांनीच मला दिलंय्!’
"–असं म्हणून उतरता उतरता त्या मुलीनं ओठाबाहेर डोकावणारा तो नकली दात त्या चौकडीला हातात काढून दाखवला, आणि त्या चौघांचे बत्तीस चोक एकशेअठ्ठावीस घशांत गेलेले दात बघायला बिलकूल न थांबता ती तडक तिथून निघून गेली!"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 03, 2022 - September 03, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
करंजी / १२४
................................................................................................
................................................................................................
" ... करंजी ह्या प्रकाराबद्दल माझी ही मतं माहीत असूनही मी पानावर बसलो तेव्हा तिनं दोन करंज्या पानावर टाकल्या."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 03, 2022 - September 03, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
Bai Bayko Calender (Marathi)
बाई, बायको, कॅलेंडर
by वपु काळे
V.P. KALE.
................................................
................................................
September 02, 2022 - September 03, 2022.
Purchased September 02, 2022.
Publisher:- MEHTA PUBLISHING HOUSE
(1 January 1971)
Language::- Marathi
Format: Kindle Edition
Kindle Edition
Marathi Edition
ASIN:- B01MQXN643
................................................
................................................
बाई, बायको, कॅलेंडर
वपु काळे
................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4961609626