Saturday, September 10, 2022

Goshta Hatatli Hoti (Marathi) by V.P. KALE (Author)

................................................................................................

Goshta Hatatli Hoti (Marathi) 
by V.P. KALE  (Author)  

Excellent,  for most part. 

Strangely enough, an author renowned and appreciated for his understanding of human nature makes the usual mistake that most males do, due chiefly to a male ego on par with that of a racist that prevents clear thinking. 

Racists assume, not only that their - unproven and baseless - assumptions regarding beauty are not only true but therefore held universally; what's worse, they assume a superiority of not just looks but of every other sort, and hold that a proof is provided thereof via physical conquest of others, by chiefly butchering. 

This isn't conscious thought, but is of the level that matches early puberty in normal human male. Most adults do know that they do not deteriorate in areas other than physical as age advances, but they fail spectacularly to apply this to gaps of race, gender, or other superficial areas. 

And in assuming that young women dress or wish to look good only if males look at them, author makes the same stupid mistake. 

Anyone with slightest experience or knowledge knows better. Males rarely know what a woman wears, much less other details. What they also don't know is that women may wish to please a husband, but rarely care about generic male attention, much less relate their dressing to this attention. 

As for scientific observation, research shows that most males react to presence of a female exactly in the same way regardless of every other factor but age; that difference of age brings about a reaction only slightly lesser. 

Women, however, do notice other women - in detail - and while that provides a negative feedback in the sense that most women do try avoiding criticism from other women, chief motivations for a woman to pay attention to herself and to wish to look well is exactly identical with those of blossoming of a flower. No more, no less. 

It might seem poetic when poets compare women to flowers and male attention to that of butterflies and other similar agents flitting amongst flowers for honey and saffron, but it's deep wisdom of a perception not quantifiable. 
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
अनुक्रम 

संन्याशाचं बारसं… 
अतिवास्तववादी कथा 
सस्पेण 
गोष्ट हातातली होती! 
हायर लेव्हल 
बॅग 
मामा 
अशी बायको असा बॉस! 
ओळख 
ती आणि तिची सवत 
हेवा 
सावधान 
स्पीडब्रेकर 
अंदर की बात

REVIEW 

"“माणसामाणसातल्या भिंती आपल्यापेक्षा पक्क्या बांधणीच्या.” 

"“अहंकाराच्या विटांवर नम्रतेचं, निगर्वीपणाचं प्लॅस्टर. पक्कं बांधकाम. आपल्याला अहंकार नाही ह्याचाच अहंकार. तो दर्शविण्यासाठी बारशासारखे सोहळे. चर्चा अंगावरच्या शालू, पैठण्यांची आणि दागदागिन्यांची.” 

"“हे ह्या खोलीत. बाहेर काय चाललंय?” 

"“पुरुषांची ड्रिंक पार्टी. त्याची तयारी चालू आहे. सगळ्या समारंभाची व्हिडिओ फिल्म काढणार आहेत. पाळण्यातला जीव मुक्त आहे. डोळे मिटून तो जीव समाधीत गेलाय. आता एकेका फॅमिलीकडून, मैत्रिणींकडून बाळंतविडे येतील.”
................................................................................................

"“बाईसाहेब, तुमच्या बंधुराजांनी वाट लावली बघा सगळ्या हॉलची.” 

"“काय झालं?” 

"“सेलोटेपमुळे भिंतींचा रंग जातोय. खपल्या निघताहेत. प्लॅस्टिक इमल्शन रंग लावला होता. आता बोलवा तुमच्या भाऊरायांना. बाहेरची खोली रंगवायचा खर्च टाक, म्हणावं.”"
................................................................................................

"“झक् मारली आणि बाप झालो.” 

"“मी अबॉर्शनबद्दल विषय काढला होता.” 

"“ते आमच्या मातोश्रींना घाबरून.” 

"“माझं घाबरणं उगीच नव्हतं. दिवस गेल्याचं कळल्यावर त्यांनी माझ्याशी अबोला धरला होता, आठ दिवस.” 

"“पण आता आईच चोवीस तास नातवाला मांडीवर घेऊन बसते, ते तुला दिसत नाही. अ‍ॅम आय राइट? ह्याला आजीपण म्हणतात. समझी?” 

"“मी समजून आहे. त्या आजी झाल्या, तुम्हालाच अजून बाप होता येत नाही, याचं नवल वाटतं. आम्ही बायका बऱ्या. मूल जन्माला येताच बाईची आई होते.”
................................................................................................

"“आचार्य अत्र्यांनी म्हटलंय ते उगीच नाही. स्त्री ही क्षणाची पत्नी तर अनंत काळाची माता असते.” 

"“अत्रेही शेवटी एक पुरुष. ते जर जन्मानं स्त्री असते तर त्यांनी लिहिलं असतं,‘पुरुष एका त्या क्षणापुरता प्रेमानं अगं अगं करणारा एक प्रियकर आणि गरज भागताच अरेरावी करणारा एक सैतान असतो.”"
................................................................................................

"“आत्ता लहान आहे म्हणून. मोठेपणी काय करील सांगता येईल?” 

"“आपल्याच देखरेखीखाली ते जास्तीत जास्त वाढणार आहे.” 

"“त्याच्यादेखत ह्यांची भांडणं होणार का?” 

"“भांडणासाठी वेगळा फ्लॅट घ्यायचा काय?”"
................................................................................................

"“तो माझा प्रांत नाही असं म्हणणाऱ्या रघुवीरनं भांडण हा माझा प्रांत नाही, असं का म्हणू नये?” 

"“पश्चिमेने फार चांगला प्रश्न विचारला. उत्तरेकडे काही उत्तर आहे का?” 

"“दक्षिणे, माझं नावच फक्त उत्तर आहे, पण माझ्याजवळ एकही उत्तर नाही. आपल्या चौघीत पूर्व खरोखरच अपूर्व आहे.”"
................................................................................................

"“पुन्हा सांगते, पाळण्यातल्या संन्याशाकडे पाहा. त्या एवढ्याशा जीवाचा चेहरा बघा. कोणताही भाव नाही. सोहळे किंवा संघर्ष करा, त्याचं कुणाशीच नातं नाही. हे आनंदरूप; कारण अजून बुद्धीचा समावेश झालेला नाही. बुद्धी आली की संपलं. सुख संपलं.”"
................................................................................................

"“नाही म्हणण्यात मोठा आनंद असतो. नकार दिला म्हणजे मग व्यक्तीच्या अस्तित्वाला अर्थ येतो. जो प्रत्येक गोष्टीला ‘हो’ म्हणतो, त्याच्या होकाराला कालांतरानं अर्थ उरत नाही. अशा व्यक्तीला नेहमी गृहीत धरलं जातं. तरीसुद्धा ज्याच्या जीवनाची इमारत नकारावर उभी आहे तो नास्तिक. पण त्यातही गंमत आहे. जो कायम नकार देतो, त्याला दुसऱ्यानं दिलेला नकार चालत नाही. त्या एवढ्याशा जीवाला मारहाण करून बाहेर नेणं, ह्यात काय अर्थ होता?”"
................................................................................................

"“दक्षिणे, पाहिलंस त्या एवढ्याशा जीवाला किती मार खावा लागला. अगं, ती पश्चिम तर रडतेय.” 

"“काय झालं ग?” 

"“आज हे अजाण मूल पहिल्यांदा खोटं बोलायला शिकलं, तेही घरातच. स्वत:च्याच वडिलांकडून.” 

"“या ठिकाणी काय करायला हवं होतं, असं तुझं मत आहे.” 

"पश्चिम म्हणाली, “मी काय सांगणार? आपल्या सगळ्यांची उत्तरं पूर्वेकडे आहेत. माझ्या डोळ्यांतून पाणी का आलं, तेवढंच फक्त मी सांगू शकेन. ओंकारचा जीव केवढासा. काही दिवसांपूर्वी या घरात एक प्रवचनाची कॅसेट लावली होती. दक्षिणे, तुला आठवतं.”"
................................................................................................

"पूर्व म्हणाली,“रघुवीरने पहिल्यांदा जेव्हा ओंकारला ‘मी घरात नाही’ असं सांगायला लावलं आणि ओंकारने त्याप्रमाणे उत्तर दिलं. त्यानंतर रघुवीरने ओंकारला सांगायला हवं होतं, ‘हे दत्तूकाका आहेत ना फार छान आहेत. तुला ते आवडतात. मलाही आवडतात; पण आज ते लगेच मला भेटायला आले असते. आज माझं डोकं खूप दुखतंय म्हणून मी तुला खोटं सांगायला सांगितलं.’ पुन्हा जर फोन आला तर प्रत्येक वेळी असं करायचं नाही.”"
................................................................................................

"“पप्पा, मी सहावीत गेलो.” 

"“म्हणजे आता पेढ्यांचा खर्च.”"
................................................................................................

"“जाऊ दे, तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. दुसऱ्या माणसाशी चार सरळ शब्द बोलायची ज्याला इच्छा होत नाही, त्या माणसाने लग्नच करू नये.” 

"“म्हणशील तेव्हा घटस्फोट देतो. वीस हजार रुपयांपर्यंत पोटगीही देतो. आय कॅन इझिली अ‍ॅफोर्ड दॅट मच अमाउंट पर मन्थ.”"
................................................................................................

"“नुसता पैसा फेकून संसारात सगळ्या गोष्टी होत नाहीत.” 

"“मी तुला एकदा उत्तर दिलं. मला जायला जमणार नाही.” 

"“कमीत कमी चिरंजीवांना ‘खोटं का बोललास,’ हे विचाराल का?” 

"“कशाला डोक्याला ताप. जास्तीत जास्त काय होईल, मॅट्रिकला एक वर्ष उशिराने पास होईल. त्याने काही फारसं बिघडत नाही.”"
................................................................................................

"“या रघूला नेमकं काय हवंय?” 

"“याचा विचार करता करता प्रत्यक्ष रघुवीरचा बाप वैतागला होता. मरताना त्याने श्यामाला सांगितलं, “अत्यंत विचित्र स्वभावाच्या नवऱ्याशी तुझं लग्न झालं आहे. त्याच्याशी संवाद होत नसतो. तो किती इल्लॉजिकल बोलतो हे तुला प्रत्येक प्रसंगी समजेल. संसाराची जबाबदारी तुलाच उचलावी लागणार आहे. ओंकारची आईही तूच आणि बापही तूच.’ तुम्ही ऐकलंत ना सगळ्यांनी?”"
................................................................................................

"“रघूचा तऱ्हेवाईक स्वभाव श्यामाने किती वर्षं सोसायचा? आणि असं वागून रघू तरी नेमकं काय मिळवतो. श्यामाने खरं तर बंड करून उठलं पाहिजे.” 

"“ती या वृत्तीतली नाही. सगळं सहन करणारी आहे. ही खात्री झाल्यावरच रघुवीरने कसं वागायचं हे ठरवलं.” 

"“पण यात आनंद कुठला?” 

"“दुसऱ्याला पीडा देणं हाच आनंद. त्याला सॅडिस्ट म्हणतात. श्यामाने न बोलता नवऱ्याची अडवणूक केलेली आहे. नवऱ्याचा स्वभाव समजल्यावर तिने दुसरं बाळंतपण होऊ दिलं नाही.” 

"तोंडावर हात ठेवत पश्चिम म्हणाली,“बापरे, या एका विषयावरून, रात्री सगळे झोपल्यावर श्यामा आणि रघू यांच्यातल्या शाद्बिक मारामाऱ्या आपण किती महिने ऐकल्या?” 

"“त्या रात्रींची आठवणंच काढू नकोस. त्या दोघांनाही झोप नाही आणि याशिवाय आपल्या चौघींनाही जागरण.”"
................................................................................................

"“श्यामाबाई, दहा हजार रुपयांची रक्कम साध्या प्रिन्सिपॉलला वाटते तेवढी लहान नाही. रक्कम हातात ठेवल्याबरोबर म्हणाले,‘तुमचा मुलगा उद्यापासून सहावीत बसेल’.” 

"“पप्पा, तुम्ही आमच्या सरांना दहा हजार रुपये दिलेत.” 

"“होय बेटा! तुझ्यासाठी मी काहीही करीन. फक्त हे कुठेही बोलायचं नाही.” 

"“तुम्ही ही वाईट प्रथा पाडत आहात. अशाने ओंकार कधीच अभ्यास करणार नाही.” 

"“बाईसाहेब, प्रथा अगोदरच पडलेली आहे. लाखो रुपयांचे व्यवहार चालतात. वर्तमानपत्रात रोज एक भ्रष्टाचाराची बातमी असते. आपण त्या मानाने थोडंसं उदक सोडलं इतकंच. चिरंजिवांचं एक वर्ष वाचलं याला काहीच किंमत नाही का?”"
................................................................................................

"“दक्षिणे, काय वाटलं हे सगळं पाहून?” 

"“माझी तर वाचाच बसली आहे. ओंकारने आज आणलेली ही कितवी मुलगी?” 

"पश्चिम म्हणाली,“चवथी. यालाच, जमाना पुढे गेला आहे असं म्हणतात.” 

"“या मुलांची लग्नं होतील. तेव्हा यांना नेमकं काय वाटेल?” 

"पूर्व म्हणाली,“ठराविक सुखं ठराविक वयातच घेतल्याने त्याची लज्जत वाढते; पण या टेलिव्हिजनने एक पिढी वाया घालवली आहे. रक्तपात, हिंसाचार, पोलीस डिपार्टमेंटची नाचक्की आणि शरीराचं नागडंउघडं प्रदर्शन, या सगळ्यांची स्पर्धा चालू आहे आणि घरातील सगळी माणसं चवीनं हे चित्रपट पाहतात.” 

"पश्चिम म्हणाली,“ आपल्या चौघींमध्ये मी भाग्यवान आहे. टीव्हीची माझ्याकडे पाठ आहे म्हणून. अर्थात संवादावरून काय ते कळतंच. गाणं तर एकही आवडत नाही. पूर्वीचं अभिजात संगीत कुठे आणि आजचा धांगडधिंगा कुठे? हे आनंद-मिलिंद, नदीम-श्रवण, अन्नु मलिक या मंडळींना संगीत दिग्दर्शक का म्हणायचं?”"
................................................................................................

"पूर्वीचे दिवस आठवून उत्तर म्हणाली,“रघू लहान होता तेव्हा रघूचे वडील आणि त्यांची मित्रमंडळी जमत असत. त्या वेळेला जुनी गाजलेली गाणी, नाट्य, साहित्य, कधी कधी राजकारण, अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असत. काहीतरी वेगळं ऐकायला मिळाल्याचा आनंद वाटायचा. आता रघूच्या पाट्‌र्या म्हणजे फक्त दारू आणि धिंगाणा. काही दिवसांनी ओंकार प्यायला लागला तर मला नवल वाटणार नाही.” 

"“उत्तरे, तू बोललीस तो शब्द न् शब्द खरा ठरला. ओंकार किती पिऊन आला पाहिलंस. त्याच्या आईवडिलांना कधी कळेल कोणास ठाऊक?” 

"“का ग, तू का रडतेस?” 

"पश्चिम म्हणाली,“ आपल्यासमोर तो लहानाचा मोठा झाला. आपला जास्तीत जास्त सहवास या मुलाला मिळाला. आई आपल्या नादात आणि बाप पैशाच्या मागे. मुलाकडे लक्ष द्यायला दोघांना सवड होती कुठे? तो बिघडतोय हे समजल्यावर त्याच्याशी गोडीगुलाबीने वागायला हवं होतं; पण मुळातच मुलगा बिघडलेला आहे, हे त्यांना अजून नीटपणे समजलेलंच नाही.”"
................................................................................................

"“शेवटी हे घडायला हवंच होतं का?” उत्तर. 

"“दक्षिणे, वीस वर्षांचा पोरगा रोज झिंगून पडत होता. आई नुसता आक्रोश करीत होती आणि बाप बेफिकीर होता. अशा संसाराचं अजून वेगळं काय होणार?” 

"“ओंकार पंचविशी गाठायच्या आत गेला. पण आयुष्यातली सगळी मौजमजा करून गेला.” 

"“डॉक्टर आले होते, ते नेमकं काय बोलले हे कळलं नाही.” 

"पूर्व म्हणाली, “मी सांगते, सीरॉसीस आॅफ लीव्हर म्हणजे माणसाची लीव्हर निकामी होणे.” असं म्हणून पूर्वेने एक दीर्घ श्वास सोडला."
................................................................................................

"गंभीर चेहरा करत पूर्व म्हणाली “नियती एक महान आत्मा या पृथ्वीवर पाठवते. आयुष्य नावाची बहुमोल चीज माणसांना बहाल करते. या सगळ्याचा आस्वाद घेण्याऐवजी माणसंच माणसांची वैरी कशी होतात, ते आपण पाहत आलो. नियती महान आत्मा पृथ्वीतलावर पाठवते आणि परत नेताना एक क्षुद्र जीव परत नेते, असा आतबट्ट्याचा खेळ नियती किती वर्षं खेळणार आहे?”"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................

September 09, 2022 - September 09, 2022. 

"—वासूनानांकडे इंदिराकाकी गेल्या तर तिथं भलताच गोंधळ झालेला. वासूनानांच्या बायकोनं, द्वारकाबाईंनी कमालच केली होती. स्टोव्हमध्ये भरण्यासाठी त्यांनी रॉकेलची बाटली जवळ घेतली होती. तेवढ्यात त्यांच्या सूनबाईनं त्यांना पिण्यासाठी पाणी आणून दिलं. द्वारकाबाईंनी चुकून रॉकेलची बाटली तोंडाला लावली आणि तांब्या भरून पाणी स्टोव्हमध्ये ओतलं.”"
................................................................................................

"“डॉक्टरांच्या खोलीत बसलेला पेशंट बेशुद्ध पडला. शेवटी डॉक्टरांच्या घरातल्या माणसांनी आणखीन् एका डॉक्टरांना बोलावून आणलं. त्या डॉक्टरांनी इतर लोकांच्या मदतीनं त्या पेशंटला उचलून तपासणीच्या खोलीत नेलं. तर तिथे आपले डॉ. पानसे!— इंदिराकाकी तिथं पोहोचल्या तेव्हा हीच धामधूम चालली होती.”"
................................................................................................

"गोडबोलीणबाई म्हणाल्या,‘चला मी पण बाहेर पडते. आपण दोघी नवऱ्यांना शोधू या. आलेच मी पातळ बदलून.’ 

"—गोडबोलीणबाईंनी कपाट उघडलं तो काय? — कप्प्यात अंग दुमडून बसलेले गोडबोले. गोडबोलीणबाईंनी सहज आरामखुर्चीकडे पाहिलं तर भाजीची पिशवी आणि सदरा खुर्चीवर!— त्यांना लगेच तो घोटाळा समजला. त्या मग इंदिराकाकींना म्हणाल्या,‘पाहा हो तुम्हीसुद्धा नीट. काका घरीच कुठेतरी असतील.’— त्याबरोबर कपाळावर हात मारून घेत इंदिराकाकी म्हणाल्या,

"‘अग्गोबाई, आत्ता आलं लक्षात. सकाळी गुढी उंच बांधण्यासाठी ह्यांनी माझ्याकडे स्टूल मागितलं तेव्हा मी घरात आले ती आलेच. स्टूल दिलंच नाही मी त्यांना.’

"“—असं म्हणून इंदिराकाकी पळत पळत घरी आल्या. पाहतात तो, दोन्ही हात उंच करून हातात गुढी धरून काका सकाळपासून जे उभे आहेत ते आहेतच. इंदिराकाकींनी धमाल केली की नाही?”"
................................................................................................

"—त्याच झटक्यात आम्ही ती कथा लिहून काढली; पण संपादकाकडून ती साभार परत आली. 

"—आम्ही ते पुडकं सोडलं, आणि काय सांगू? ‘तुमची कथा वाचता आली नाही’— असं संपादकानं का कळवलं, ह्याचा उलगडा झाला. 

"वाचकहो, आम्ही पाठवलेले गोष्टीचे कागद संपूर्ण कोरे होते. 

"—दोस्तानं सांगितलेल्या हकीकती ऐकून आमचं डोकंदेखील उलट-सुलट झालं होतं. फाऊंटन पेन तोंडात धरून आम्ही सगळी कथा सिगारेटने लिहिण्याचा प्रयत्न केला होता."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 09, 2022 - September 09, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
सस्पेण 
................................................................................................
................................................................................................

"“एका महिन्यानं भागेल ना?” 

"“नक्कीच. चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही. हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. तुमच्याबरोबर मोरे पण आहे. तेव्हा महिन्याच्या आतच सगळं आटपून टाकू.”"
................................................................................................

"‘प्रकृती जरा बरी नाही?’ —असं सांगून पहिले चार दिवस दंडवते कुटुंबाने निभावून नेले. दुसऱ्या बाईचा नवरा कामावर वेळेवर जातो की नाही ह्याकडे इतरांचं किती लक्ष असतं, ह्याचा अनुभव यायला लागला. तापानंतर अशक्तपणा येतोच, तेव्हा नंतरचे चार दिवस विश्रांती म्हणून घरी — हे कारण सांगायला पुरलं. त्यानंतर हवापालट ओघानंच आली; पण रजा घेऊनही बाहेरगावी का जात नाही? ह्यासारखा प्रश्नांना उत्तरं देण्याचा कंटाळा आला. खरंच, जगात माणसांच्या दोनच जाती. 

"एक प्रश्न विचारणाऱ्यांची, दुसरी उत्तर देणाऱ्यांची जात. आॅफिसात तरी दुसरं काय चालतं? — रिपोर्टस्, मिनिटस्, मेमोज्, चार्जशीट्स, इन्क्वायरी…"
................................................................................................

"महिना लोटला. 

"अजून सगळे शांत होते. 

"दंडवते पुन्हा आॅफिसात गेले. 

"साहेब भेटले. 

"“फाईल माझ्याकडून कधीच गेली. आता सगळं त्यांच्या हातात आहे.” 

"“साहेब, माझी रजा संपली आज.” 

"“इतकंच ना?—वाढवून मागा — मी रेंकमेंड करतो.” 

"“आता शिल्लकच नाही.” 

"“फुल पे नसेल. हाफ पे आहे की नाही?” 

"“साहेब, हाफ पे म्हणजे…” 

"“त्याला आता काय करणार?— ही कलॅमिटी आहे; असं म्हणायचं आणि तोंड द्यायचं. O.K.?”"
................................................................................................

"“चिडू नका, वाटलं तर कबूल करू नका, पण चिडू नका. अहो, एवढं गोडाऊन हाताशी असताना कुणी शुद्ध आहोत, असं हातात विस्तव घेऊन सांगितलं तरी कोण विश्वास ठेवील?” 

"“मिस्टर…” 

"“आणि तसे नसाल तर गाढव आहात.” 

"दंडवत्यांची सहनशक्ती संपली. मागचापुढचा विचार न करता त्यांनी सरळ त्या अनाहूत भावाच्या तोंडात भडकावून दिली. त्याचा चष्मा कुठच्याकुठे जाऊन पडला. 

"गॅलरीत माणसं जमली. भांडण मिटवलं गेलं. दंडवत्यांच्या कुटुंबाने यजमानांना आत घेऊन दार लावून घेतलं. तेवढ्यात कुणाचं तरी वाक्य बाणासारखं काळजात घुसलंच. 

"“अहो, खरं बोललं की माणसाचं रक्त तापायचंच्.” 

"—दार उघडून दंडवते पुन्हा बाहेर येणार होते. कुटुंबाने सावरलं."
................................................................................................

"“सायेब. जुनी रीत हाय. जाळ्यामंदी एकच कबुतर गावला का नाय, की पार त्याचा इस्कोट झालाच बगा. पन् शंबर कबुतरं गावली की जाळ्यासंगट उडतात बगा.” 

"“शंभर?—” 

"“म्हंजी बोलायची रीत झाली. कवा कमी भरत्याल कवा जास्त.”"
................................................................................................

"“मला आता इतर कबुतरांची नावं सांग” 

"“खूळ का काय सायेब?”— असं म्हणत मोरे उठलाच. 

"“मोरे, तसा जाऊ नकोस. मला इतरांची नावं सांगा.” 

"“सायेब, लोकशाही हाय. दुसऱ्या कबुतरांची नावं विचारायची नसत्यात्.” 

"—मोरे दरवाजापर्यंत गेला. 

"“चहा ठेवलाय् ना—”कुटुंब बोललं. 

"“चहा घ्येतो… पन् त्ये नावाचं इसरायचं.”"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 09, 2022 - September 09, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
गोष्ट हातातली होती! 
................................................................................................
................................................................................................

"“अग, काय व्हायचंय जास्तीत जास्त? त्यांनी हुंडा मागितलाय्.’ 

"“किती?” 

"“फक्त पाच हजार. प्लस मानपान.” मामा मध्येच म्हणाला. 

"“अस्सं”—मी म्हणाले."
................................................................................................

"“अग पण असं त्यात बिघडलं काय? लग्न म्हटलं की, असा खर्च ठेवलेलाच. आपण साडेतीन-चारपर्यंत तयारी ठेवलेलीच आहे. त्यांची मागणी थोडी जास्त आहे. ती पुरी करणं काही तेवढं अशक्य नाही.” — दादा समजावू लागले. 

"“मलाच पसंत नाही पण ते. एवढा अवाढव्य खर्च करून हे लग्न झालं, तर मला ती गोष्ट लागून राहील. माझं कशातही लक्ष लागायचं नाही. त्यांना कळवून टाका, हे जमायचं नाही.”"
................................................................................................

"“तुम्हाला माहीत असेलच, की पुढची बोलणी…” 

"माझे वाक्य अर्ध्यावरच तोडीत ते भर्रकन् म्हणाले, 

"“थांबा हं जरा. ह्या असल्या विषयावर बोलताना मध्ये फोन नको. मी एक वाजता तुमच्या आॅफिसात येत आहे. तुम्ही खाली येऊन थांबा.”"
................................................................................................

"“माफ करा, मला ह्यात अर्थ वाटत नाही. पैशाच्या व्यवहारात चढउतार करायला ही खरेदीविक्रीची बाब नाही एखाद्या वस्तूच्या! ज्या घरात मी त्या घराची लक्ष्मी म्हणून प्रवेश करणार, त्या घरात मी संपूर्ण आनंद घेऊन गेले पाहिजे; आणि त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला माझं स्वागत करताना समाधान लाभलं पाहिजे. तुमची मागणी वाजवी आहे, की गैरवाजवी हे पाहण्याचं कारण नाही. तुमची अपेक्षा समजली. तेव्हा ह्या ऋणानुबंधांत कोणीतरी एक असंतुष्ट राहाणार, हेच मला प्रशस्त वाटत नाही. संसारमंदिराच्या मार्गाची माझी कल्पना फार वेगळी आहे. तो मार्ग काट्याकुट्यांचा चालेल, पण फसवा नको.”"
................................................................................................

"जरा वेळाने शांत होत शारदा म्हणाली,“सांगू राधा? मला तू मूर्ख नाही ना म्हणणार? सांगते मग. मला वाटतंय्, ह्या लग्नात मी चांगला पाचसहा हजार हुंहा मोजायला हवा होता. माझी आई कर्जबाजारी होऊन, खंगून खंगून मेली असती तरी चाललं असतं. पदोपदी ह्यांची उपकाराची बोलणी तरी ऐकावी लागली नसती. सतत त्यागाच्या आणि स्वत: काय करू शकतो ह्याची मानखंडना करणारी ह्यांची बोलणी तरी थांबली असती. त्यांनी मला आता विकत घेतली आहे. पाच हजार टिकल्या जवळ असत्या, तर मग मी त्यांना विकत घेतलं असतं. त्यांचा आवाज याबाबतीत तरी गप्प केला असता. जन्मभर हा गुलामीचा संसार चालवायचा आणि त्यांचीच विचारसरणी घेऊन जन्माला येणाऱ्या पोरांचं संगोपन करायचं…”"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 09, 2022 - September 09, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
हायर लेव्हल 
................................................................................................
................................................................................................

Strangely enough, an author renowned and appreciated for his understanding of human nature makes the usual mistake that most males do, due chiefly to a male ego on par with that of a racist that prevents clear thinking. 

Racists assume, not only that their - unproven and baseless - assumptions regarding beauty are not only true but therefore held universally; what's worse, thry assume a superiority of not just looks but of every other sort, and hold that a proof is provided thereof via physical conquest of others, by chiefly butchering. 

This isn't conscious thought, but is of the level thst matches early puberty in normal human male. Mist adults do know that they do not deteriorate in areas other than physical as age advances, but they fail spectacularly to apply this to gaps of race, gender, or other superficial areas. 

And in assuming that young women dress or wish to look good only if males look at them, author makes the same stupid mistake. 

Anyone with slightest experience or knowledge knows better. Males rarely know what a woman wears, much less other details. 

As for scientific observation, research shows that most males react to presence of a female exactly in the same way regardless of every other factor but age; that difference of age brings about a reaction only slightly lesser. 

Women notice other women in detail, and while that provides a negative feedback in the sense that most women do try avoiding criticism from other women, chief motivations for a woman to pay attention to herself and to wish to look well is exactly identical with those of blossoming of a flower. No more, no less. 

It might seem poetic when poets compare women to flowers and male attention to that of butterflies and other similar agents flitting amongst flowers for honey and saffron, but it's deep wisdom of a perception not quantifiable. 
................................................................................................

"“आता प्रत्यक्ष घडलंय् हे बघत असतानाही तुम्हाला शक्याशक्यतेचा प्रश्न पडलाय्?” 

"“तसं नाही हो मी म्हणत. पण, पोलीस लोकांना खरा मवाली कोण, खोटा कोण—हे कळत नाही?” — मी सात्त्विक संतापानं विचारलं. 

"“पोलीसलोक काय दिलेल्या हुकमाचे बंदे. ते कशाला जास्त विचार करताहेत? गावाची नीतीमत्ता फार बिघडली आहे; संस्कृती नावालाही राहिलेली नाही—अशी फार ओरड व्हायला लागली, तेव्हा गावच्या पोलीस-पाटलांनी निर्बंध वाढवले. रस्त्यात स्त्री-पुरुषांनी एकमेकांशी बोलायचं नाही, एकमेकांकडे पाहायचं नाही. फक्त बहीणभाऊ व दोन मुलं झालेल्या नवराबायकोनीच बरोबर बाहेर पडायचं, असले काहीतरी नियम काढलेत. गावातल्या कॉलेज-स्टुडन्टस्वर फारच परिणाम झालाय् त्याचा आणि ह्या सर्वांवर कळस म्हणजे चंद्रशेखरना झालेली अटक.”"
................................................................................................

"“पोरं पोरींकडे बघत नाहीत.” 

"“म्हणून काय झालं?” 

"“वा, तीच तर महत्त्वाची बाब. पोरांनी पाहिलं नाही तर पोरी कशाला नट्टापट्टा करतील?”"
................................................................................................

"“तुम्ही पोलीसपाटलांना का भेटत नाहीत?” 

"“मी?” 

"“म्हणजे तुम्ही एकटे नाही हो, सगळ्या व्यापाऱ्यांनी मिळून भेटायचं.” 

"“आणि काय सांगायचं? पोरांना पोरींकडे पाहू दे म्हणून?”"
................................................................................................

"“हरीभाऊ, आहात काय? बातमी ऐकलीत ना?” सदू दुकानात येत म्हणाला. 

"“नाही. कसली बातमी?” 

"“आपल्या गावात फॅशन शो — फॅशन परेड — होणार आहे.”"
................................................................................................

"“हे तर काहीच नाही. गावातल्या सगळ्या महिलांचा मेळावा भरवून त्यांच्यातर्फे नाटक बसविण्याची पण एक योजना आहे. त्याशिवाय फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, सायकल रेस—भव्य कार्यक्रम आहेत. एक सप्ताहच साजरा होणार. तुमचा भाव आता वाढणार. स्नो, पावडर, लिपस्टिक, सगळा स्टॉक आतां काउंटरवरच ठेवा काढून.”"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 09, 2022 - September 09, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
बॅग 
................................................................................................
................................................................................................

"“आज तुमचीच बॅग आणलीत ना?” 

"“आॅफकोर्स, रोज रोज ती चूक कशी काय होईल?” — माधवनं रुबाबात उत्तर दिलं आणि बॅग उलटी केली. आणि पुन्हा जेव्हा नोटांच्या पुडक्यांऐवजी पिट्टूची नाना तऱ्हेची खेळणीच त्यातून बाहेर पडली तेव्हा तोंड कुठं लपवावं, असा माधवला प्रश्न पडला."
................................................................................................

"—माधव बॅग घेऊन ताड्ताड् निघाला. आता दुकानात जायला उशीर होणार होता. तसं त्याला कोणी काही बोलणार नव्हतं. कारण रात्री कितीही वाजले तरी हिशोब पुरे झाल्याशिवाय त्याला दुकान सोडता येत नसे. सगळा हिशोब पुरा करायचा, कॅश मोजायची, ती बॅगेत भरायची. मालक मग त्याला त्यांच्या मोटारीतून घरापर्यंत सोडायचे. दुसऱ्या दिवशी बँकेत कॅश जमा करायची व दुकानावर जायचं हा नित्यनेम. काही दिवसांपूर्वी दुकानाच्या ह्या कामासाठी माधवनं नवी बॅग घेतली आणि ती बॅग पाहूनच पिट्टूनं तशीच बॅग मिळवण्यासाठी आकाशपाताळ एक केलं होतं. माधवीनं पिट्टूची बाजू घेतली आणि अगदी माधवच्या बॅगेसारखीच दुसरी बॅग घरात आली. त्यानंतर हे अदलाबदलीचे घोटाळे सुरू झाले. पहिल्यांदा झालेली नजरचूक होती; पण आज पिट्टूने हा घोटाळा मुद्दाम केला होता. केवळ तकदीर म्हणून माधवीनं बॅग तपासली होती व नीट ठेवली होती, नाहीतर चार-पाच हजारांना फटका होता. बँकेत कॅश भरण्याची काहीतरी निराळी व्यवस्था करावी म्हणून माधवनं मालकांना एकदोनदा सांगितलं होतं. पण त्यातल्या त्यात हाच मार्ग मालकांना बरा वाटला होता."
................................................................................................

"“तू आज पण बॅग बदलली होतीस?” 

"पिट्टूनं भीत भीत ‘हो’ म्हटलं. त्यासरशी पिट्टूला उचलून घेत माधव गरगरा स्वत:भोवती फिरत राहिला. माधवी पण पिट्टूच्या खेळण्याकडे धावत गेली. तिथली बॅग तिनं आणली आणि खरोखरच, थरथरत्या हातानं बॅग उघडून पाहतात तो, बॅग नोटांनी गच्च भरलेली!"
................................................................................................

"“मुद्देमाल तपासून घ्या. इकडची काडी तिकडे झालेली नाही.” 

"माधवने कचरत कचरत बॅग उघडली. पहातो तो ती नोटांनी गच्च भरलेली. कांबळे फुशारकीनं म्हणाले, 

"“मोजून घ्या. बरोबर सहा हजार रुपये आहेत स्टेटमेंट दिल्याप्रमाणे!”"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 09, 2022 - September 09, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
मामा 
................................................................................................
................................................................................................

"बापटांनी डोळे मिचकावताना गोपाळनं पाहिलं आणि मग त्यानं दोन-तीन मिनिटात फॅन गणपुलेंच्या टेबलावर आणून ठेवला. गणपुलेंनी पुन्हा एकवार बापटांचे आभार मानले. बापट जाग्यावर येऊन बसले; आणि बाकीचे लोक जोगळेकरची वाट पहात बसले. जोगळेकर रजेवर असल्याची बापटांनी थाप मारली होती. जोगळेकर नंबर एकचा तापट प्राणी होता. त्याला बाकीचे लोक, ‘नॉट टूबी लूज शंटेड’चा डबा म्हणत. आपल्या टेबलावरचा फॅन हलवलेला पाहून त्याची व गणपुलेची पहिल्याच दिवशी जुंपेल, ह्यात संदेह नव्हता. 

"पण, बापटांचा हा पहिलाच पेच कुचकामी ठरला, कारण त्या दिवशी जोगळेकर खरोखरच आला नाही.
................................................................................................

"दुसऱ्या दिवशी योगायोग असा की सर्वांच्या अगोदर जोगळेकरच आॅफिसात आला. पंख्याची जागा बदलेली पाहून तो थबकून उभा राहिला. ‘हे धाडस कुणाचं?’ त्यानं स्वत:लाच प्रश्न केला. मग त्यानं टेबलाकडे नीट पाहिलं. ‘अरे हो, ह्या जाग्यावर कोणी तरी नवीन असामी आलेली असणार. पुढचा सगळा डाव त्याच्या लक्षात आला. ‘ठीक आहे.’ एवढं बोलून तो गप्प बसला. 

"आॅफिस सुरू झालं. जोगळेकर शांतपणे काम करत राहिला आणि मग जोगळेकर आणखीन गणपुले हे दोघं सोडून बाकी सर्व अस्वस्थ झाले. जोगळेकरची आणखीन् गणपुलेंची जुंपायला हवी होती आणि जोगळेकर मात्र शांत होता. अर्धा पाऊण तास गेला आणि मग गणपुलेनं गोपाळला हाक मारली. 

"“काल फॅन कुणाचा आणलास?” गोपळनं नुसती खूण केली. गणपुलेनं तो फॅन पुन्हा पहिल्या जाग्यावर ठेवायला गोपाळला सांगितलं. 

"तो दिवस तसाच गेला."
................................................................................................

"दुसऱ्या दिवशी गणपुले आॅफिसात येताच त्याच्या टेबलवर टाईप करून ठेवलेला एक कागद त्याला दिसला. आॅफिसातल्या एकूण एक कारकुनांना कामावर येण्यासाठी युनिफॉर्म वापरावा लागेल व त्यासाठी खाकी गॅबर्डीन-दोन पँटस् आणि दोन कोटांना पुरेल इतकं कापड प्रत्येकानं विकत घ्यावं, कंपनीचा शिंपी मापं घ्यायला येईल आणि शिलाईचा खर्च आॅफिस करील, अशा अर्थाचं ते सर्क्युलर होतं. शेवटी साहेबांची ऐटबाज सही होती. 

"—ही एक खास युक्ती साठेची होती; त्याच्या तल्लख मेंदूतून निघालेली! —सर्वांनी त्या कागदावर सह्या करण्याचं नाटक केलं; आणि मग चर्चा सुरू झाली. ‘आता खर्च आला,’ ‘आपण काय हमाल आहोत का?’ — अशा तऱ्हेची कुरबूर सुरू झाली. ‘आपण सरळ ह्या पद्धतीविरुद्ध रिप्रेझेन्टेशन करणार’ — अशी बंडाची भाषा काहींनी सुरू केली; पण दुपारी जेव्हा एका हातात सगळ्यांच्या नावाची यादी आणि एका हातात टेप घेऊन एक गृहस्थ आला, तेव्हा नावाप्रमाणे सर्वांनी आपली मापं दिली. ‘लवकरात लवकर कापडं घेऊन या’ — असं सांगून टेलर निघून गेला. 

"दुसऱ्या दिवशी सुमारे दहा ते बारा वारांचं भलं मोठं पुडकं घेऊन गणपुले आॅफिसात आला. त्याच्याभोवती सर्वांनी कडं गेलं. भावाची चौकशी झाली. कापडाचे क्वालिटी पारखून झाली, कोणत्या दुकानातून खरेदी केली, ह्याची विचारणा झाली. ‘आपणही त्याच दुकानातून कापड घेणार’ अशी आश्वासनं न मागता देण्यात आली आणि मग जो तो जाग्यावर गेला. त्यानंतर कापडाचा विषय निघाला नाही आणि मापं घेऊन गेलेला शिंपी पण कधी परत आला नाही."

"गणपुलेनं शिंप्याची अधूनमधून चौकशी चालू ठेवली होती. 
................................................................................................

"त्यानंतर निघाला ट्रिपचा विषय! सगळ्यांनी चर्चेत हिरीरीनं भाग घेतला. तीन ते चार दिवस ट्रीपवर चर्चा करण्यात गेले. कुठं जायचं?— हाच वादविवाद आख्खा दिवस चालला होता. ‘नॅशनल पार्क’ सर्वानुमते नक्की करण्यात आलं. मग प्रत्येकानं काय काय आणायचं, ह्याची चर्चा झाली. 

"गणपुलेनं बत्तीसजणांना पुरेल एवढा ब्रिटानिया पाव आणि लोणी आणायचं ठरलं. 

"ठरलेल्या दिवशी दोन प्रचंड आकाराच्या पिशव्या — पिशव्या कसल्या, पोतीच म्हणायला हवीत — घेऊन गणपुले नॅशनल पार्कमध्ये हजर झाला. तत्पूर्वी त्याने सगळ्यांची स्टेशनवर वाट पाहिली; पण तिथं कोणी भेटलं नाही, तेव्हा चुकामूक झाली असेल अशी समजूत करून घेत तो नॅशनल पार्कपर्यंत गेला. आणि सर्वांची वाट पाहून पाहून परतला."
................................................................................................

"पार्टीला सुरुवात होण्यापूर्वी गणपुलेनं छोटसं भाषण केलं. तो म्हणाला, 

"“मित्रहो, तुम्ही सर्वजण आलात, आनंद वाटला. मी आता ओळख करून देतो. ही माझी सौ. मालती, ही छोकरी पुष्पा आणि मुलगा निशीकांत! — माझं लग्न होऊन बरोब्बर आजच दहा वर्षं झाली. हा आजचा दहावा वाढदिवस. — मी कोल्हापूरलाच असतो. तिथं माझा स्वत:चा छापखाना आहे. मुंबईत काही दिवस इतर व्यवसायाच्या कामासाठी आलो होतो. गंमत म्हणून नोकरी केली. तुमचे सर्वांचे साहेब हे माझे सख्खे मामा. आॅफिसातल्या तुमच्या एकेक लीला माझ्या कानावर होत्याच. त्याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला. आता जास्त काय सांगू? खुलासा तुमच्यासाठी करतो, माझ्यासाठी नाही. खाकी गॅबर्डीनचं कापड मला छापखान्यात नेहमी लागतं. लग्नपत्रिका मी छापखान्यातूनच मागवल्या होत्या. ट्रिपसाठी नेलेले पंधरा रुपयांचे पाव मी तिथ हॉटेलवाल्याला विकून टाकले आणि त्या दिवशी माझे मामा — म्हणजेच तुमचे साहेब — आणि आम्ही सर्व, तिथं दिवसभर होतो. तुमच्या ह्या काहीशा क्रूर चेष्टामस्करीवर मी संतापलो होतो, सगळं माहीत असूनही; पण त्या दिवशी अंबरनाथपर्यंत प्रवास केला. पहिल्या वर्गाचा दंड भरला. तुमच्यासारख्या लोकांचं हे जीवन मी जवळून पाहिलं. ह्या ओढग्रस्त जीवनात प्रत्येकजण किती पिचलेला आहे, हे जाणलं. तेव्हा काही ना काही करमणूक, तीही विनामूल्य—प्रत्येकाला कशी हवी असते, ह्याचा मला प्रत्यय आला. असा कुणाला ‘मामा’ करता आला तर तो प्रत्येकाला हवा असतो. असा ‘मामा’ बनलेला किंवा बनवलेला गृहस्थ हा सगळ्यांचा दिलासा असतो, विश्रांतिस्थान असतं; पण त्या विश्रांतिस्थानाची पण काही किंमत असते. तोही एक जीव असतो; तो जीव ह्या सर्व प्रकरणात विटून जाणार नाही हे पाहणं, ही जबाबदारी तुमची आहे. असो. तुमचे सर्वांचे मी आभार मानतो. आणि काही दिवस मला आॅफिसात काम करू दिल्याबद्दल मी माझ्याच मामांचे आभार मानतो."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 09, 2022 - September 09, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
अशी बायको असा बॉस! 
................................................................................................
................................................................................................

"मारणाऱ्याचा हात धरता येतो पण बघत राहणाऱ्या लोकांचे डोळे थोडेच झाकता येतात? मंदाला जर बुरखा घ्यायला लावला तर लोक माझ्याकडे कोणत्या नजरेनं पहातील — हे सांगणे नलगे! थोडक्यात काय, सुंदर बायको म्हणजे जळती काडी! 

"आता ह्यावर ‘रामबाण’ उपाय आहे. मी मंदाला म्हणतो, ‘आपण मोटारीतून जाऊ या.’ 

"त्यावर ती ताडकन् म्हणते— 

"‘मी नाही यायची मोटारीतून!’ 

"चांगली बावीस हजाराची मोटार सेवेला तत्पर असते; पण मंदाला रस्त्यावरून आट्यापाट्या खेळत जायला आवडतं. आहे ना मजा? 

"तुम्हीच सांगा बरं — काय बिघडलं आता मोटार दिराची असली म्हणून? 

"आमचा दादा सालस आहे. ह्यावर मंदाचं — माझं दुमत आहे असं नाही, पण तरी ती म्हणते, ‘भावजींच्या मोटारीतून जायचं ना? मग नकोच.’"
................................................................................................

"पण हेच माझं सौख्य बायकोला बघवत नाही. तिचा एकच लकडा! मी नोकरी करावी. 

"वास्तविक आम्हाला काय कमी आहे? चौदा खोल्यांची ही इमारत. त्यातल्या सहा खोल्यांचा ब्लॉक फक्त मंदाचा व माझा! (—तोंडाला पाणी सुटलं की नाही?) आमच्या दादाला गलेलठ्ठ पगाराची नोकरी आहे. महिना पगार फक्त तीन हजार रुपये (बिच्चारा.) —प्लस्—वापरायला मोटार. ह्या वैभवाबरोबरच दादाची व वहिनींची असलेली माझ्यावरची माया. नोकरीसाठी मी अर्ज खरडला तर वहिनींनी तो फाडून टाकावा. तर ती बातमी कानावर जाताच, माफी मागितल्याशिवाय दादानं अबोला सोडू नये अशी परिस्थिती."
................................................................................................

"तसा काही मी अगदी रिकामटेकडा नव्हतो. मस्तपैकी एम. ए.पर्यंत शिकलो होतो. खरं तर मंदानं मला पी. एच्. डी. होऊ द्यायचं. पण अभ्यासाचं नाव काढलं की म्हणायची, ‘उगीच का जीवाला ताप करून घ्यायचा? आपल्याला काय कमी आहे?—’ आणि गायन-वाचन, हिंडणं-फिरणं-गप्पा-मस्करी ह्यात दिवस जायला लागले की, ‘नोकरी करा’ —म्हणायचं! 

"इंटरव्ह्यूच्या दिवशी मी टांगच मारणार होतो. पण मंदा कसली खवट! तिनं मला मोटारीतून— (आता भावजींची मोटार चालली बरं का तिला!)— आॅफिसात नेऊन उभं केलं. ते आॅफिस पाहून मला वाटलं - कोकणच्या बोटीच्या तिकिटांचं ते आॅफिस आहे की काय! पण मग कळलं ही प्रचंड रांग इंटरव्ह्यूसाठी होती. मोटारीतून आपण गोंडस हात बाहेर काढून मंदानं ‘बेस्ट आॅफ लक’ म्हणत मला निरोप दिला. आणि बाकीची रांगेतली माणसं ‘आला वशिल्याचा घोडा मोटारीतून’ अशा अर्थानं माझ्याकडे नि अंगावरच्या सुटाच्या कापडाकडे पहात राहिले."
................................................................................................

"बरोबर आणलेली कादंबरी जवळजवळ संपत आली पण रांग संपण्याचंच काय, पण रेसभर पुढे सरकण्याचंही चिन्ह दिसेना. कंटाळून पुस्तक मिटलं आणि इकडे तिकडे पहात राहिलो. पाच-पाच मिनिटांच्या अंतरानं तीन-चार जांभयादेखील देऊन झाल्या. माझी अवस्था पाहून शेजारचा गृहस्थ म्हणतो— (त्याच्या शेजारच्या गृहस्थाला) ‘पहिलटकरीण दिसत्यात.’—आजुबाजूला खसखस पिकली. ... अशा एवढ्या सामान्य पण काहीशा अगतिक लोकांशी वैर करण्यात अर्थ नव्हता. म्हणूनच ‘पहिलटकरीण’ ह्या शब्दाला बुजून न जाता मीही मनापासून हसलो आणि त्या गृहस्थाकडे वळून म्हणालो, “— तुमचा अंदाज बरोबर आहे. तुमची कितवी खेप?” 

"माझा हा खिलाडूपणा अनपेक्षित होता. क्षणभर शेजारचा ‘महात्मा’ चपापला. पण लवकरच स्वत:ला सावरीत तो शेजारच्या गृहस्थाला म्हणाला, 

"“वाशा, आपली ही कितवी खेप रे?”— त्यावर वाशा म्हणतो, “मी जेव्हा दिल्लीला होतो, तेव्हा तू ६८व्या वेळा अर्ज टाकणार होतास.”"
................................................................................................

"“आमच्या होऊ घातलेल्या सासऱ्यांनी परवाच ठणकावलं—‘ही नोकरी मिळाली नाही तर माझ्या पोरीच्या प्रेमावर पाणी सोडा.” 

"तेवढ्यात वाशा म्हणाला, “बेट्या, तुझं फक्त लग्नच होणार नाही; पण माझ्या डोळ्यासमोर माझ्या भावाची करियर आहे. त्याचं सगळं शिक्षण माझ्या नोकरीवरच अवलंबून आहे.” 

"तेवढ्यात लाईनीतला तिसरा गृहस्थ म्हणाला, “माझ्या वडिलांनी प्राण काढून ठेवलेत कानात. परवा तर आम्ही आशाच सोडली होती. पाच दिवस बेशुद्ध होते. सहाव्या दिवशी शुद्धीवर आले व म्हणाले, ‘तुला नोकरी लागल्याचं ऐकल्याशिवाय मरणार नाही मी नक्कीच!—’ 

"— त्यांच्या ह्या कथा ऐकून मला गरगरायला लागलं. नोकरी! नोकरी!!"

"केवढा हा भयंकर प्रकार! फट् म्हणता ब्रह्महत्त्या व्हायची. आपला नंबर लागायचा आणि मग आपण एवढ्या लोकांचे शिव्याशाप घ्यायचे. तेही जरुरी नसताना!"
................................................................................................

"“तुमचे ब्रदर मला फोनवरून हेच सांगत होते. तुम्ही नोकरी करावी हे त्यांना पसंत नाही.” 

"मी अभावितपणे बोलून गेलो, “हो.” 

"“अरे, मग कशाला—तसदी घेतलीत?” साहेबानं विचारलं. 

"“अं–अं–माझ्या बायकोला वाटतं मी आॅफिसला जावं—” 

"“आणि काय करावं?” 

"“दमावं—आणि तिनं माझी काळजी करावी.” 

"मी मग बोलत सुटलो. साहेब हसत राहिले. मी बोलत होतो नि ते ऐकत राहिले. शेवटी ते म्हणाले, “तुम्ही असं करा. माझी पलीकडे खोली आहे. तिथं १०।। च्या ठोक्याला यायचं, ५।। ला जायचं. पी. डी. एच्.चा अभ्यास करायचा. आराम करायचा. बँक हॉलिडेला—रविवारीदेखील वाटलं तर जादा कामाच्या सबबीखाली इथं येऊन बसायचं. तुमच्या बायकोला काळजी करायला हवीय ना? करू दे काळजी. आॅफिसच्या कामाचा अतिरेक झाला की तीच तुम्हाला सांगेल, ‘एवढ्या उलट्या काळजाचा साहेब आहे तर लाथ मारा. एक तारखेला भावाकडून पैसे घ्यायचे आणि पगार म्हणून द्यायचा बायकोच्या हातात! कसं काय?”"
................................................................................................

"“पण साहेब…” 

"“पण बीण काही नाही. जा आत्ताच! त्या आतल्या खोलीत.”"

"“मला आॅफिसातले लोक त्रास देतात.” राधा म्हणाली. 

"“म्हणजे काय करतात?” 

"“मागे लागतात.—” राधा म्हणाली. 

"—लोणकरांनी चमकून राधेकडे पाहिलं. मग त्यांची नजर शांत झाली. क्षणार्धात त्यांनी अनेक गोष्टी टिपल्या. राधेची आकर्षक केशभूषा स्पर्धेत पहिलं बक्षीस पटकावील अशी होती. ह्याही वयात, म्हणजे चाळिशीच्या जवळ येऊनही किंवा चाळिशी उलटलेली असेलही — असं असूनही, चेहरा जून वाटत नव्हता. कांती अजून नितळ होती. ओठ पातळ होते. डोळ्यातला खेळकर भाव, सोळा वर्षांच्या पोरीला लाजवेल असा खट्याळ होता. लो कट्चा ब्लाऊज, कोणालाही वेडापिसा करील एवढा टंच होता. पारदर्शक साडीनं देहाचा झाकलेला भागही झाकून न झाकल्यासारखा होता. भल्याभल्यांनादेखील मागं वळून बघायला लावील असा एकूण फॉर्म राधेला होता. आणि तो ह्या वयात टिकून राहिला होता. आणि आपण अजून इतरांना घायाळ करू शकतो असा गर्विष्ठ भाव राधेच्या नजरेतून सहजगत्या दिसत होता."
................................................................................................

"“पपा, त्या बाईसाठी तुम्ही काहीही करू नये असं मला वाटतं.” —

"लोणकरांना धक्का बसला. विचारण्यात अर्थ नव्हता तरी त्यांनी विचारलं, 

"“का?” 

"“नाही पपा, मला कारणं विचारू नका. मला ते सांगता येणार नाही. जे पटकन वाटलं ते मी सांगितलं. माझं हे म्हणणं तुम्ही ऐका असं म्हणत नाही; पण प…ण…नाही पपा, मी आणखी काही नाही बोलू शकत.”"
................................................................................................

"“थांब राधा. आता अशी भावनाविवश नको होऊस. मी खूप विचार केला ह्यावर. भूतकाळ आठव. माझा मोह तुला वाटल्यावर तू स्वत:च्या आईवडिलांच्या मायेचे बंधन एका रात्रीत तोडलेस. ज्यांनी तुला हाताखांद्यावर खेळवली, तुझ्या डोळ्यात पाणी पाहून ज्यांना जेवण गेलं नाही, असे तुझे आईवडील; पण माझ्या प्राप्तीसाठी तू तुझे घर मायापाशासकट सोडलंस. जन्माचा ऋणानुबंध एका रात्रीत तोडलास, होय ना?” 

"— राधेनं मान हलवली. 

"“तोच विचार मी केला. ज्या वेळी मी असं बलवत्तर मोहाचं स्थान तुझ्या मनात निर्माण करू शकलो, त्याच क्षणी तू माझी झालीस. ते वातावरण मी घरात कायम टिकवू शकलो नाही. आईबापांच्या प्रेमाचा, वात्सल्याचा तुला माझ्यामुळे विसर पडला, तोच प्रसंग परत घडला. तसंच जबरदस्त मोहाचं स्थान पुन्हा आयुष्यात निर्माण झालं, तेव्हा तुला माझं प्रेम, मीनाचं प्रेम ह्याचा विसर पडू शकला. ह्याचा अर्थच हा, की आपण जे एकत्र आलो ते निसर्गाच्या हाकेला ‘ओ’ देण्यासाठी. क्षणिक शारीरिक सौख्यासाठी. आपण देहाच्या मोहाने, सौंदर्याच्या अभिलाषेनं, देहाच्या सौख्यासाठी एकत्र आलो. आपली मनं एक नव्हती. विचार एक नव्हते. ह्याचा उलगडा मला काल झाला. म्हणून आता तुझ्याबद्दल राग पण नाही, लोभ पण नाही, कोणतीच भावना प्रकर्षानं नाही. तेव्हा आॅफिसर म्हणून जे काही करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करीन. बट् आय् कॅनॉट प्रॉमिस यू.”"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 09, 2022 - September 09, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
ती आणि तिची सवत 
................................................................................................
................................................................................................

"“तिचं नाव मी तुला सांगते, ती माझी सवत आहे. माझ्यावर जळते. तिचं नाव ईर्षा!”"

"“तुम्हाला एवढं झालं काय?” 

"प्रश्नासरशी मधुकरच्या डोळ्यात पाणी आलं. माधवी तर त्याच्या खांद्यावर डोकं टेकून रडूच लागली. न बोलता मधुकरनं अंक पुढं टाकला. लाठीहल्ला-अश्रूधूर आणि गोळीबाराच्या भयानक बातम्या त्यात छापल्या होत्या. गोळीबारात कामी आलेल्या लोकांची हुतात्म्यांची यादी होती आणि पंचेचाळिसावा हुतात्मा म्हणून भाऊकाकांचं नाव ठळक जागी छापलं होतं."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 09, 2022 - September 09, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
सावधान 
................................................................................................
................................................................................................

"“—ह्या गोष्टीमागे भावना नाहीत असा मला आरोप करायचा नाही. पण अलिकडे भावनेचं अधिष्ठान नष्ट होत चाललं आहे. त्याला व्यवहाराचं स्वरूप प्राप्त होत आहे. पहिल्याच भेटीत मला मुलगी पसंत होती; पण तुमचा व्यवहार फिसकटला असता तर माझ्या मनाची कुणी पर्वा केली नसती. मला सांगा, मग भावना कुठे राहिल्या? 

"“मला पैसा नको. तो मी स्वत:च्या हिंमतीवर मिळवीन. त्यासाठी मला दादांनी शिक्षण दिलंय, मानसिक धैर्य प्राप्त होण्यासाठी मुलीलाही शिक्षण मिळालंय. ती मला साथ देईल असा मला आत्मविश्वास वाटतो. माझा स्वभाव न कळल्याने ती पहा कशी गांगरून गेली आहे. ये, सुरेखा, पुढे ये. आपण सगळ्यांना नमस्कार करू, नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा.”"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 09, 2022 - September 09, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
स्पीडब्रेकर 
................................................................................................
................................................................................................

"एकच लग्न करून मी कितीतरी जणींशी संसार केलेत, असं सुषमाने वाटायला लावलंय."

"“तुम्ही एक गोष्ट मार्क केलीत का आत्तापर्यंत?” 

"“कोणती?” 

"“ह्यांची ही भांडणं नेमकी अमावस्या आणि पौर्णिमेला होतात.”"
................................................................................................

"“आईपासून दूर राहण्यापेक्षा मी मरण पत्करीन. आई म्हणजे माझं सर्वस्व आहे. दुसरं काहीही करायला सांगा पण हे एवढंच सांगू नका. मोहिनी बरी नाही झाली तरी चालेल; पण आई इथंच राहाणार. आणि बाकी सगळं आबादीआबाद आहे हो घरात. हल्ली थोडीशी मोहिनीतसुद्धा सुधारणा आहे!—पूर्वी हे प्रकार रोजचे व्हायचे घरात. हल्ली फक्त अमावस्या-पौर्णिमेला होतात. त्याशिवाय पूर्वी मोहिनी काय वाटेल ते प्रकार करायची अंगात आल्यावर. हल्ली हल्ली फक्त बेसुमार खात राहते. डबेच्या डबे फस्त करते. असेल नसेल तेवढं दूध ती फस्त करते. बाकी तिचा काही त्रास नाही. मला आणि आईला वाटतंय की काही दिवसांनी हे एवढंही व्हायचं नाही.”"
................................................................................................

"मोहिनीच्या घरातून आरडाओरडा ऐकू यायला लागल्यावर मी विजयच्या ब्लॉकचा दरवाजा ठोठावला. हातात वेताची छडी घेण्याचा माझा विचार होता; पण उगीच ‘शो’ नको म्हणून मी नुसताच गेलो. विजयनी दार उघडलं. विजयच्या आईंनी माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं. मला ती बाई का, कुणास ठाऊक आवडली नाही."
................................................................................................

"“अगोदर हे सगळं असं का हे तर मला सांगा.” मी म्हणालो. 

"“ती बाहेर बया बसली आहे ना तिलाच विचारा. तीच अंगात आल्याप्रमाणे माझ्याशी वागायला लागली, तेव्हा मला हा अघोरी उपाय सुचला.” 

"“म्हणजे?” 

"“म्हणजे काय? ती भयंकर छळते मला; आणि ह्यांचा त्यावर विश्वास नाही. एरव्ही दृष्ट लागेल एवढं त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. पण ‘आई’ म्हटलं की स्वारी पुढं बोलू देत नाही. त्याचाच फायदा ती सटवी घेते.” 

"“पण का?” 

"“आमचं एकमेकांवरचं प्रेमच तिला सहन होत नाही. तिच्या नवऱ्यानं तिचे हाल केले म्हणे. म्हणून मलाही ह्यांनी असंच वागवावं ही तिची इच्छा. तसं होत नाही, म्हणून ती मला छळते.”"
................................................................................................

"“अजब आहे, पण हाल करतात म्हणजे नेमकं काय करतात?” 

"“मला चक्क उपाशी ठेवतात. हे कामावर गेले की स्वयंपाकघराला कुलूप लावतात. इथल्या ह्या दूधदुभत्याच्या कपाटाला पण कुलूप असतं. अंगात आल्यावर मी ते एकदा फोडलं होतं. तेव्हापासून पौर्णिमा-अमावस्येला कुलूप काढून ठेवतात. कमीतकमी कुलूपाचा खर्च नको म्हणून. स्वत:च्याच घरात मला हे जगावेगळं वागावं लागतं, ह्याला निव्वळ ‘हे’ जबाबदार आहेत. ‘आईवाक्यं प्रमाणम् ’ असला प्रकार आहे. मग महिन्यातून मी दोनदा व्यवस्थित खाऊन- पिऊन घेते.’ “आयडिया चांगली आहे.”—मी हसून म्हणालो."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 09, 2022 - September 09, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
V.P. KALE
Goshta Hatatli Hoti (Marathi) 
by V.P. KALE (Author)  
................................................
................................................
September 09, 2002 - September 10, 2002. 
Purchased September 09, 2002.  

Publisher:- MEHTA PUBLISHING HOUSE 
(1 January 2004)
Language‏:- ‎Marathi
Format: Kindle Edition
Kindle Edition
Marathi Edition

ASIN:- B01NCNAFTI
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4974961249