................................................................................................

Zopala
झोपाळा
वपु काळे
V. P. KALE

Good.

अनुक्रम

अमिताभ–चिंटूचे चार दिवस
श्रोता
किस्सा कुर्सीका
माया
एक मोती चिमणीचा
ऐकावे जनाचे
श्रीमंत रघुनाथराव पेशवे
एक क्षण भाळण्याचा

REVIEW

1. झोपाळा

"शहा म्हणाला, ‘‘तुम्हाला माहीत नाही, जुहूच्या बंगल्यात मृदुलाने प्रत्येक खोलीत लहान-मोठे झोपाळे बांधले आहेत. डनलॉपच्या गाद्यांसकट.’’"
................................................................................................
"त्याच्या रुबाबाकडे पाहतानाच मनात विचार आला–
"‘अशी जसवंतीबेन भेटावीच लागते, त्याशिवाय जुहूच्या बंगल्यातले झोपाळे विसरता येत नाहीत.’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................

September 10, 2022 - September 10, 2022.

2. अमिताभ–चिंटूचे चार दिवस
................................................................................................
................................................................................................
"सुकन्या म्हणाली, ‘‘बापू, लेखकाने स्टोरी तशी लिहिली ह्यात अमिताभची काय चूक? तुम्ही त्याच्या कामाबद्दल बोला.’’
"रत्नाकर म्हणाला, ‘‘मी लेखक आहे. माझं पहिलं लक्ष स्टोरीकडे असतं. आपल्या मनात कोणताही जुना चित्रपट रेंगाळतो तो त्याच्या स्टोरीमुळे. म्हणूनच कथा लॉजिकल हवी. जेवायला गेल्यानंतर स्वयंपाकच चांगला व्हायला हवा. वाढपी कसा स्मार्ट होता पण...’’"
................................................................................................
"‘‘उद्या आपल्या घरी चिंटूचं मारामारीचं शूटिंग आहे. बापू, परवानगी द्याल?’’
"गालावर हात ठेवत रत्नाकर म्हणाला,
"‘‘जरूर! अजून एकतीस दात शाबूत आहेत.’’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 10, 2022 - September 10, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
3. श्रोता

"‘‘तुम्हाला कुरळ्या केसांचे, फेल्टच्या बाहेर आलेले जे झुपके दिसतात, ते झुपके टोपीलाच आतल्या बाजूने चिकटवलेले आहेत.’’
"‘‘म्हणजे...’’
"‘‘He is completely bald.’’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 10, 2022 - September 10, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
4. किस्सा कुर्सीका

"राज्यात—म्हणजेच—त्या नगरात लोकशाही होती. लोकशाही असल्यामुळे मी हे काम करणार नाही हे सांगायचा लोकांना अधिकार मिळालेला होता. ठराविक वेळेतच महत्त्वाची कामं झाली पाह्यजेत असलं जाचक बंधन कुणावरही नव्हतं. जे काम उद्यावर ढकलता येतं, ते आज करायची सक्ती कुणावर नव्हती. आपल्या कर्तव्याची कुणालाही जाणीव नसली तरी स्वत:च्या हक्काची जाणीव मात्र प्रत्येकाला होती. म्हणूनच कोणतंही महत्त्वाचं काम नाकारण्याचा हक्क प्रत्येक जागरूक नागरिक बजावीत होता."
................................................................................................
"भगवान शंकरपार्वतीने वेष पालटून नगरात चक्कर टाकली. त्यांना वाईट वाटलं. ब्राह्मणाने जातीबरोबर माणुसकी पण सोडली होती."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 10, 2022 - September 11, 2022.

5. माया

"‘‘अमेरिकेतच हे प्रकार घडू शकतात.’’"
................................................................................................
"‘‘थोडक्यात म्हणजे तिने सकाळपासून थापा मारायला सुरुवात करावी, असंच ना?’’"
................................................................................................
"‘‘संध्याकाळी मी कामावरून येईन तेव्हा गॅलरीत उभं असावं. माझ्या वियोगाने तिचा चेहरा मलूल...’’
"‘‘म्लान म्हण.’’
"‘‘दोन ग्लास बिअर झाल्यावर जोडाक्षरं येत नाहीत. कारण ‘म’ला ‘ल’ की ‘ल’ला ‘म’...’’
"‘‘आगे बढो!’’"
................................................................................................
"पण अरुणचं वाक्य पुरं होत नाही. पार्टीतला एक कुणीतरी एकाएकी हुंदका देतो.
"‘‘का बाबा, तुला काय झालं?’’
"‘‘ह्या अरुणच्या अपेक्षा ऐकून माझ्या बालमनावर वाईट परिणाम होतोय.’’
"‘‘मग तोपर्यंत तू आणखी बिअर घे.’’
"‘‘तरी माझ्या मनाला ते लागून राहील.’’
"‘‘का?’’
"‘‘आपल्यापैकी कुणाच्याही घरी असं कधी घडेल? बायका इतक्या समरसून, कायम तरुण राहतील का?’’
"‘‘अरे, म्हणूनच अरुणचा कल्पनाविलास वारंवार ऐकायचा.’’
"‘‘नको, नको!’’
"‘‘अरे पण का?’’ ‘
"‘मघाशी सांगितलं मी. अरुण सांगतो त्यातल्या पन्नास टक्के गमतीसुद्धा कधी घडणार नाहीत.’’"
................................................................................................
"‘‘आई, तू एवढ्यात कशी परत आलीस?’’
"‘‘एवढ्यात म्हणजे? बहीण झाली म्हणून काय झालं? तुम्हाला दोघांना इथं टाकून मी तिकडे मजा करीत राहू काय? आठ दिवस रजा पुष्कळ झाली.’’"
................................................................................................
"‘‘अरे राजा, बाथरूममध्ये दोन मोठाले पंख पडलेले होते. चित्रातल्या परीला दाखवतात तसे पंख! आता बोल?’’"
................................................................................................
"‘‘स्वर्गातली परी प्रसन्न झाली हे खरं. एखाद्या राजपुत्राच्या घरी न जाता, इनवर्ड-आऊटवर्ड करणार्या माझ्यासारख्याच्या घरात आली, पण डिट्टो माझ्या बायकोचंच रूप घेऊन आली– काय फायदा?’’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 11, 2022 - September 11, 2022.

6. एक मोती चिमणीचा

"लॉकेटमधला चमकणारा मोती पाहून इतर चिमण्या चकित झाल्या.
"‘‘तू कावळ्याकडून मोती मिळवलास कसा?’’
"चिमणी गंभीर होत म्हणाली,
"‘‘आमचे हे म्हणतात ते बरोबर आहे. जगाचा कारभार दोनच शक्तींवर चालतो. माणूस काय किंवा पक्षी काय, सगळ्यांना तेच तत्त्व उपयोगी पडतं.’’
"‘‘कोणतं पण?’’
"‘‘तुमच्याजवळ एक तर दुसर्यावर जबरदस्त उपकार करता येतील अशी ताकद हवी. ती नसेल तर दुसरी शक्ती हवी. ती म्हणजे, तितकाच जबरदस्त उपद्रव देता येईल अशी एखादी गोष्ट हवी. त्याशिवाय तुमची कामं होत नाहीत.’’
"गळ्यातल्या लॉकेटकडे चिमणीनं स्वत:वरच खूष होऊन पाह्यलं.
"आता फक्त पटवर्धनीण बाईप्रमाणे बांगड्या आणि कुड्या केलं की झालं!"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 11, 2022 - September 11, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
7. ऐकावे जनाचे

"मी बारीक झालो नाही तर? ही प्रत्येकाची त्याची वैयक्तिक चिंता वाटायला लागली आणि मग ‘फक्त पालेभाज्या खा’ इथपासून ‘खरं तर दोन महिने काहीच खाऊ नका’ इथपर्यंत मी खूपजणांची बोलणी खाल्ली."
................................................................................................
"एकानं सांगितलं, ‘‘वाट्टेल तेवढं खा पण चिक्कार चाला.’’"
................................................................................................
"जे स्वत: आयुष्यात कधी पहाटे उठले नव्हते त्या सर्वांनी फिरण्यासाठी पहाटेसारखी वेळ नाही असं सांगितलं.
"तर जागरणं कशाशी खातात हे ज्यांच्या गावी नाही अशांनी सांगितलं, ‘‘झोपण्यापूर्वी दोन मैल चालून या, मग कशी झोप लागते बघा.’’"
................................................................................................
"‘‘आता माझंच पाहा ना. मला पहाटे उठून फिरायला जावंसं वाटत नाही का? खरोखर पाच मैल चालत आलो तर चार घास जास्त नाही का खायला मिळणार?’’
"‘‘मग?’’
"‘‘मग काय, रोज वाटतं, पहाटे उठावं, फिरायला जावं. पण संयम! फिरावंसं वाटतं ना? मग नाही फिरणार! एक वेळ उपास करावा असं वाटतं ना? नाही करणार! ड्रिंक्स सोडाविशी वाटतात ना? मग नाही सोडणार! मनावर असा ताबा हवा.’’"
................................................................................................
"‘‘मी तुमचं काहीही करत नाही. उलट खाणं-पिणं, मजा करणं ह्या तुमच्या कलंदर वृत्तीला पोषक असंच मी बोलतोय. तुम्हाला काहीही होत नाही. शरीराची टेन्डसीच तशी आहे असं कुणीही विचारलं तर सांगायचं. आता अप्पा दिघे पाहा.’’
"‘‘त्यांचं नवल आहे मात्र.’’
"‘‘नवल म्हणजे! शरीर सुदाम्यासारखं, वर्षो न वर्षं तसंच आहे आणि आहार म्हणाल तर तुमच्या डबल आहे. खरा भाग्यवान आहे.’’
"मी विचारलं, ‘‘भाग्यवान म्हणजे?’’ ‘
"‘जबरदस्त आहार. सडकून जेवतो पण शरीर सुदाम्यासारखं. ह्याला टेन्डसी म्हणतात.’’
"‘‘पण त्यांना एकाएकी काय झालं?’’
"‘‘हार्ट ट्रबल म्हणतात.’’
"‘‘अरे, एवढ्या सडपातळ, खुटखुटीत माणसाला हार्टट्रबल!’’
"‘‘तेच म्हटलं. टू प्लस टू असं माणसाबद्दल गणित मांडण्यात अर्थ नाही. आता मलाही डाएटिंग करा म्हणून सांगतात.’’
"‘‘मग तू काय करतोस?’’
"‘‘डाएटिंग करा असं डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे मी डॉक्टर बदलतो.’’"
................................................................................................
"मी स्वत: तर आंबा कुल्फी खाल्लीच पण उरलेली घरातल्या मंडळींसाठीसुद्धा बांधून घेतली.
"घरातल्या मंडळींनी कुल्फीवर ताव मारला.
"कुल्फीमुळे माझा वजन कमी करायचा विचार कुठल्या कुठे दूर पळाला.
"जगात खाण्यासारखा दुसरा आनंद नाही. पंचपक्वान्नापासून पाणीपुरी, पाव-भाजीपर्यंत जे निरनिराळे शोध लागत गेले, ते खाणार्या माणसांमुळे. डाएटिंग करणार्यांमुळे नाही."
................................................................................................
"पंधरा दिवसांनी घरी परतलो आणि सोळाव्या दिवशी बघतो तर दारात कुल्फीवाला!
"‘‘का वं सायेब, धा-बारा दिस झालं आला नाय ना? तुमची लई वाट पगितली.’’
"मी त्याला बोंबलू नकोस म्हणून खूण केली. तोपर्यंत घरातील मंडळी बाहेर आली.
"कुल्फीवाला रिकामी भांडी घेऊन परतला.
"अण्णासाहेब, रत्नपारखी, अरुण नातू ही सगळी मंडळी माझ्याच घरी जमू लागली.
"कुल्फीवाला येत राह्यला.
"वरच्या आणि खालच्या मजल्यावरची माणसं पण आलटून पालटून हातात बशा, भांडी घेऊन येऊ लागली.
................................................................................................
"महिन्या-दोन महिन्यांनंतर मी सहज कुल्फीवाल्याला विचारलं,
"‘‘तू राहतोस कुठं रे?’’
"‘‘नवी वाडी हाय त्येच्या पल्याड.’’
"‘‘बापरे! खूप लांबून येतोस.’’
"‘‘आणि तेही आमच्यासाठी!’’
"‘‘हा वैनिबाय, वाइच तुमच्यासाठी, वाइच पोटापाण्यासाठी अन् वाइच माज्यासाठी.’’
‘‘माझ्यासाठी म्हणजे?’’ ‘‘आता तुम्हास्नी काय सांगावं सायेब... म्या ह्यो धंदा करतो... तळ्यापाशी. एका जागेवर राहून धंदा करत हुतो. माजं वजन लई वाढलं हुतं. पोट तर सायेब तुमच्यावानी झालं हुतं. आता इतपावेतो चालाया लागतं. ब्येस व्यायाम हुतो पगा. आता वाडीतली समदी म्हनत्यात की माझं प्वाट लई कमी झालंया. कारभारीन पन लई मजेत हाय आता. चालन्यापरीस व्यायाम नाय पगा.’’ बोलता बोलता त्याने कुल्फीची बशी माझ्या हातात दिली.
................................................................................................
"अण्णासाहेब म्हणाले, ‘‘मूळ तत्त्व अबाधित राहतं. चालतं कोण ह्याला महत्त्व नाही. पण चालण्यानं वजन कमी होतं हे खरं की नाही?’’
"मला बोलता आलं नाही. तोंडात कुल्फी होती.
"आणि नसती तरी मी गप्प बसलो असतो. कारण कुणाचं ऐकायचं हे मला समजलं होतं."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 11, 2022 - September 11, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
8. श्रीमंत रघुनाथराव पेशवे
................................................................................................
................................................................................................
"पण त्या ऑफिसरला श्रीमंतांचा आवेश पाहून वाक्य अर्ध्यावर सोडावं लागलं. श्रीमंत म्हणाले, ‘‘थोरल्या बाजीराव महाराजांना निजामाने त्या काळात कितीतरी परगणे देऊ केले होते. पण त्यांचे इमान होते शाहू महाराजांशी. आम्ही त्याच घराण्याचे नाव लावीत आहोत. आम्हास वेतनाचा मोह नाही. आम्हास वेतनाची गरजही नाही, एवढे गजाननाने दिले आहे. गरज पडेल तिथे उडी घ्यायची हे घराण्याने शिकवले. नगरपालिकेत आम्ही आल्याशिवाय, तिला कुणी तारणार नाही, म्हणून आम्ही आलो. सेवा करायची संधी दिलीत तर काहीतरी कार्य करून दाखवू ह्या उमेदीने...’’"
................................................................................................
"‘‘आमच्या आसनाचा बंदोबस्त आपण केला असेलच.’’ मस्टरवर सही करताच श्रीमंतांनी चौकशी केली.
"‘‘दुपारपर्यंत करतो.’’ उत्तर मिळालं. ‘
"‘तोपर्यंत आम्ही काय करावे?’’
"ह्या प्रश्नाला काही उत्तर नव्हतं. नेहमीचं कारण सांगत ओ. एस. म्हणाले, ‘‘पोस्ट सँक्शन झाली आहे. फर्निचर सँक्शन व्हायचं आहे.’’
"श्रीमंतांनी विचारलं, ‘‘आम्हीच आमची व्यवस्था करून घ्यावी काय?’’
"‘‘उत्तमच!’’ परस्पर काम होतंय म्हटल्यावर ओ. एस. खूष झाले.
"श्रीमंत तातडीने बाहेर पडले.
"दोन तासानं हातातलं काम टाकून पाहत राहावं असा प्रकार घडला. पाच फूट बाय पाच फूट असा एक काश्मिरी गालिचाचा तुकडा एका नोकराने जमिनीवर पसरला. त्याच्यावर मखमलीचा, गोंडे सोडलेला लोड ठेवण्यात आला. एक उतरतं टेबल, छान तासून ठेवलेले बोरू, शाईची बाटली आणि शाई सुकवण्यासाठी वाळू.
"बैठकीची व्यवस्था करून भराभरा माणसं निघून गेली आणि मग श्रीमंत आसनस्थ झाले. मीटिंग संपवून आलेल्या इंजिनिअरसाहेबांना आपल्या खात्यात एवढी गर्दी का, हे समजेचना. पाहतात तो श्रीमंतांच्या बैठकीपासून, त्यांना पाहायला रांग."
................................................................................................
"श्रीमंतांनी खात्यात बस्तान बसवलं. जाता-येता त्यांचा होणारा सलाम-मुजरा हळूहळू साहेबांच्या पण अंगवळणी पडला. इतकंच नव्हे तर त्यांच्यावाचून साहेबांचं पान हलेनासं झालं. जातायेता साहेबांना श्रीमंतांची गरज पडू लागली.
"अर्थात ह्याला आणखी एक कारण होतं. श्रीमंतांना बोलावणं पाठवलं की ते नेहमी जाग्यावर सापडत. ‘आत्ता इथंच होते’ किंवा ‘एवढ्यात कँटिनला गेले’ असली उत्तरं साहेबांना कधीच ऐकावी लागली नाहीत. एक तर श्रीमंतांनी स्वत: कँटिनमध्ये जाणं हे त्यांच्या दर्जाला साजेसं नव्हतं आणि त्याहीपेक्षा वेळेचा हा असा अपव्यय त्यांना मंजूर नव्हता.
"श्रीमंतांवर मर्जी बसल्यावर एकदा केव्हातरी साहेब म्हणाले, ‘‘तुम्ही कधीही जागा सोडत नाही, हे फार क्रेडिटेबल आहे.’’
"श्रीमंत म्हणाले, ‘‘सरकारांनी चाकराचे जे कर्तव्य आहे ते त्याने नीट बजावल्याबद्दल मुळीच कौतुक करू नये. इथे आम्हास प्रत्येक मिनिटाचे वेतन दिले जाते. आम्ही जाग्यावरच असायला हवे.’’"
................................................................................................
"‘‘साध्या चहापाण्यात किती वेळ जातो ह्याची कुणाला कल्पना आहे का?’’
"श्रीमंत म्हणाले, ‘‘ह्याच विवंचनेने एकदा आम्हास ग्रासले होते. आम्ही तेव्हा एक हिशोबही करून ठेवला होता. महाराजांनी परवानगी दिली तर आम्ही तो इथे पेश करू.’’
"‘‘जरूर.’’
"‘‘महाराज, आम्ही एकदा असा विचार केला की, एका सेवकाने पंधरा मिनिटे चहा पिण्यात घालवली; फक्त एक दिवस. महापालिकेत ऐंशी हजार सेवक आहेत. प्रत्येकाची पंधरा मिनिटे धरल्यास, महाराज, एका दिवसात बारा लक्ष मिनिटे चहा पिण्यात जातात. मिनिटांचे वीस हजार तास होतात. आम्ही पुढे आठ तासांचा दिवस धरला. तेव्हा महाराज, त्याचे पंचवीसशे दिवस झाले. पंचवीसशे दिवस म्हणजे सहा वर्षे पूर्ण होतात. वर काही दिवस उरतात. ह्याचा अर्थ महाराज, नगरपालिका सहा वर्षे सगळ्यांना फुकट पगार देते. त्याऐवजी तिला सेवकांकडून काहीही मिळत नाही.’’
"साहेबांनी विचारलं, ‘‘हे फक्त एकच दिवस, पंधरा मिनिटं चहात गेली असं धरलं तर...’’"
................................................................................................
"श्रीमंत मान वाकवून म्हणाले, ‘‘स्वकर्तव्याची जाणीव ज्या देशातल्या नागरिकांना झालेली आहे तोच देश लोकशाहीसाठी लायक आहे. कर्तव्य कशाशी खातात हे ज्यांना कळत नाही तिथे लोकशाही राबवली म्हणजे राज्ययंत्रणा खिळखिळीच होणार.’’"
................................................................................................
"मुकादमाने सगळ्यांकडे पाह्यलं आणि श्रीमंतांकडे हात करीत तो कमिशनरना म्हणाला, ‘‘साहेब, ह्यो हितं उबा हाय तो द्येवमानूस हाय. माजी काय बी तक्रार नाई. म्या चूक केलीसा. ह्या साहेबानं डोळं उघाडलं माजं. कानाला खडा लावला पगा. आता हातानं वंगाळ काम न्हाई व्हायचं. अन् साहेब, त्ये कंत्राटदाराचं पगा जरा. माणूस लई बेरकी हाय्. त्येच्यावर ध्यान ठिवाया हवं. पेशवे साहेबाला सांगा.’’"
................................................................................................
"‘‘सरकार, आपल्या सेवेत रुजू होऊन एक साल पुरे व्हायचे आहे. पण महाराज आकलन होणार नाही असे दिसते, असे ऐकू येते. इथे हाच रिवाज आहे, हे पाहून मन विषण्ण झाले. आम्ही सध्या ज्या बांधकामावर देखरेख करीत आहोत तेच उदाहरण घ्या. महाराज, ते काम बावन्न लाखांचे आहे. कंत्राटदाराने त्या कामासाठी त्याची किंमत केवळ चव्वेचाळीस लाख सांगितली. बावन्न लाखांचे काम त्याला चव्वेचाळीस लाखाला कसे परवडते हा विचार कुणीच केला नाही का? आमच्या पूर्वजांनी, कोणतीही आधुनिक यंत्रसामग्री हातात नसताना, भले भले दुर्ग बांधले, तटबंदी बांधल्या, धर्मशाळा उभ्या केल्या. देवालयांची रचना केली. त्या इमारती आज दोन शतकानंतर डौलात उभ्या आहेत. त्यांचा चिरा निखळला नाही. महाराज, स्पष्ट बोलतो, माफी असावी. महापालिकेने गेल्या वर्षी बांधलेल्या इमारती पहिल्या पावसात धो धो गळतात. बाजारात दहा पैशाचे लिंबू नऊ पैशाला मिळत नाही आणि इथे बावन्न लाखाची इमारत चव्वेचाळीस लाखात मिळते. ह्याचा अर्थ हुजूर, आठ लाखाची बेइमानी आपणच मान्य केली आहे. फटके कंत्राटदाराला मारायला हवेत. महाराज, आमचा दिल फाटून जातो. आम्ही मुकादमाला मारले.’’"
................................................................................................
"मेयर आणि कमिशनर ह्यांच्या मोटारीजवळच्या खांबाला तो कुर्रेबाज, तुकतुकीत कांतीचा घोडा आता कुणाला दिसत नाही.
"पुढे दिसणार नाही.
"तरी जाणारे, येणारे थबकतात."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 11, 2022 - September 11, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
9. एक क्षण भाळण्याचा
................................................................................................
................................................................................................
"मी नंदाशी वाद घातला खरा. पण नंदा गेली हे मला समजलं त्या क्षणी मी धाय मोकलून रडलो.
"इतर नवलानं बघत होते आणि मी चक्क रडत होतो.
"का? कसा? सांगता येत नाही."
................................................................................................
"ढग दाटून आले की मोर पिसारा फुलवून नाचतात. नंदा तशीच. ढग भरून आले की ती पिसार्यासारखी फुलायची. हेच नव्हे तर मी पण तिच्याकडे बघत असे.
"चकित होऊन, भारावून.
"स्त्री असून माझी नजरबंदी व्हायची. मग ह्यांची काय कथा?"
................................................................................................
" ... मी तिला पाह्यलं आणि मनाशी म्हणाले, माझी जर अशी अवस्था होते, हिला पाहून, तर मग ह्यांचं काय झालं असेल!
"जे सगळ्या पुरुषांचं होतं किंवा जे प्रत्येक पुरुषाचं होतं तेच माझं झालं."
................................................................................................
"‘‘मुळातच तुला ह्या वयात एकांताची ओढ का वाटली, हेच कोडं आहे.’’
"‘‘हा एकांत लादला गेला. तुला बोलले होते की नाही हे मला माहीत नाही. जस्टिस अक्कलकोटकरांची मी मुलगी.’’"
................................................................................................
"‘‘मी तशी एकटी नव्हते. मला अंगाखांद्यावर वाढवणारी तानी होती, आजही आहे. स्वयंपाकाला बाई होती. गडी होता आणि पपांची हजारो पुस्तकं होती. आईची पैशाची हाव पाहून पपांनी सगळे पैसे माझ्या नावावर केले होते. कमतरता कशाचीच नव्हती. पपांचं अस्तित्व तर सतत मला त्या वास्तूत जाणवत होतं. पुस्तकं तर माणसाला खूपच साथ देतात. घरात वकिलीची पुस्तकं पडली होती म्हणून मी वकिली करायची नसताना बी.ए., एल.एल.बी. झाले.’’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 11, 2022 - September 11, 2022. .

Zopala झोपाळा (Marathi)
वपु काळे
V. P. KALE
................................................
................................................
September 10, 2022 - September 12, 2022.
Purchased September 10, 2022.
Publisher: MEHTA PUBLISHING HOUSE
(1 January 1970)
Language: Marathi
ASIN:- B01MQIDG0Y