Friday, September 9, 2022

V.P. KALE Sanvadini (Marathi) by V.P. KALE.

................................................................................................

V.P. KALE
Sanvadini (Marathi) 
by V.P. KALE (Author)  

Title ought to be spelt, when transcribed in English, with m at the first nasal sound, instead of with the n selected by whoever did that, obviously illiterate as far as Indian languages go. 

Once again, publishers have made it impossible to quote title and other details, including name of author, in the language of the text.

It's unclear if the author uses this format as a novelty experiment, or were these scripts of radio plays sans everything but dialogues. 
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
अनुक्रम 

एका मिठीची कथा 
धरलं तर चावतं 
आज तरी भांडशील ना? 
आत्मनस्तु कामाय 
निरंजन, मला उत्तर हवंय 
उद्याचा दिवस

REVIEW 

"–पंपूनं पाह्यलं का ग?"
................................................................................................

"–परवा आपण जरा चढ्या आवाजात बोलत होतो तर नंतर गिरिजा मला विचारीत होती, ‘खडाष्टक’ का? मी म्हणालो, कोण म्हणतं? तर लगेच मला सांगते, की पंपूला विचारलं, आई-बाबा काय करताहेत, तर म्हणाला, भांडण! कळलं कशी आहे तुझी शेजारीण ते? आता असंच करील. पंपूला विचारील. पंपूनं जर मघाशी आपल्याला पाह्यलं असेल तर सांगेल– 

"–हरिदासाची कथा मूळपदावर आली का? नीट शांतपणे जेवा पाहू–"
................................................................................................

"–तुम्हाला नक्की वेड लागलं. त्याला काय विचारणार, की आम्ही एकमेकांना मिठी मारून उभे होतो ते तू पाह्यलंस का म्हणून? म्हणजे पाह्यलं नसलं तरी– 

"–चुकलो बाई चुकलो–"
................................................................................................

"–हो बाबा, आठवलं. सकाळी स्वयंपाकघरात... 

"–काय, काय– 

"–मी एकदम बाहेरून आलो तर एक उंदीर पळाला तिकडून–"
................................................................................................

"–मी फक्त सावधगिरी घेतोय. तूच बघ आता. पंपू शेजारी गेलाय. ते लोक मोठमोठ्यांदा हसताहेत– 

"–पंपू काहीतरी बोलला असेल– 

"–हेच संभाळायला हवं– 

"–माझ्या मनात येणाऱ्या शंका सहसा चुकत नाहीत."
................................................................................................

"–तुमचं म्हणणं पंपूपासून ह्या सगळ्या गोष्टी किंवा ह्या सगळ्या गोष्टींपासून पंपूला दूर ठेवायला हवा– 

"–प्रश्नच नाही. त्यात काय चूक आहे का?"
................................................................................................

"–तुम्हीच विचार करा. सिनेमाचंच उदाहरण घ्या. सिनेमापासून त्याला तुम्ही दूर ठेवाल, पण सिनेमांच्या त्या घाणेरड्या पोस्टर्सचं काय? बघवत नाहीत अशी हिडीस पोस्टर्स. ती तुम्ही थांबवू शकणार आहात का? घरी येणारी वर्तमानपत्रां. परवा पेपरमध्ये चक्क एकत्र तुषारस्नान करीत असतानाचा फोटो जाहिरातीत आला होता. अलीकडे त्या बॉम्बे डार्इंगची टॉवेलची जाहिरात अशीच येते– 

"–त्यात काय आहे? 

"–ती पहाच. त्यातली जाड टॉवेल गुंडाळलेली बाई. हे तुम्ही कसं थांबवणार आहात, सांगा, त्याशिवाय त्या ठिकठिकाणी निरोधच्या जाहिराती. कुटुंबनियोजनाचे फलक. मध्यंतरी लूपचा प्रचार झाला. आता तर रेडिओ पण लावायची सोय नाही. फॅमिली प्लॅनिंगची जाहिरात कोणत्या आवडत्या गाण्यानंतर लागेल हे सांगता यायचं नाही. ह्या सगळ्या बकाल, बेगडी, असंस्कृत प्रचाराला कसं थोपवणार आहात? फूटपाथवर ब्रेसियर्स विकतात. बायका अर्धनग्न फिरतात. ते कॅबेरा का काय म्हणतात, ते बंद करायचे म्हणतात, त्याच्याही बातम्या छापतात. काय करायचं ते करा की गुपचूप– 

"–अग ती कॅबेरेची बातमी पंपू कशाला वाचायला जाईल? 

"–एकट्या पंपूचा प्रश्न नाही आज. पंपूपेक्षा वयानं वाढलेली मुलं घरोघरी आहेत. त्यांना हे वाचायला मिळतं, फार तर त्याचा नक्की अर्थ कळत नसेल. पण बंदी करावी असं काहीतरी ते आहे हे नक्की कळतं. आईवडिलांना एकमेकांच्या मिठीत असताना मुलानं पाह्यलं की काय हा प्रॉब्लेम तुमचा आणि माझा नाही, सगळ्या समाजाचा आहे. अर्थात ज्यांना जाणीव आहे अशा समाजाचा. तुमची आणि माझी ताकद इथं कमीच पडणार आहे. 

"–सगळं मान्य आहे. तरीसुद्धा तू पंपूला हेमंतबरोबर पाठवायला नको होतंस. कमीत कमी त्याला पिक्चर कोणतं हे विचारायचं– 

"–तुम्ही विचारा पंपू आला की–"
................................................................................................

"–अगदी साधी स्टोरी. नऊ वर्षाच्या मुलीची एक बाहुली हरवते. आणि तासभर ती मुलगी बाहुली सापडावी म्हणून काय काय करते, कुठे कुठे शोधते त्याचं पिक्चर. शेवटी ती बाहुली सापडते. ती मुलगी बाहुलीला मिठी मारते– भराभरा मुके घेत राहते, इथं पिक्चर संपतं–"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................

September 08, 2022 - September 08, 2022. 

"–बरोबर. बरोबर आहे तुझं. माझंच चुकलं. 

"–असा त्रागा करू नका. 

"–विचार करूनच बोलतोय. वाईटपणा नेहमी मीच घ्यायचा. 

"–कधी हो? वाईटपणा घेण्याची पाळी कधी आली तुमच्यावर? तुम्ही नेहमीच सालस, भोळे, अगदी शंकराचा अवतार ठरलात. शंख चालतो तो माझ्या नावानं. तरी बरं, नोकरीपायी दहा तास घराबाहेरच असते मी. 

"–बरं, बरं. राहू दे ती नेहमीची रेकॉर्ड. उद्यापासून रजा सांग मिळाली की नाही मिळाली ते."
................................................................................................

"–माया-बिया सगळं कळतं. पण मी काही आता लहान नाही. दोन मुलांची आई आहे. अकरा वर्ष नोकरी करते आहे. 

"–हे कुणी नाकारलंय का; ‘घर सांभाळ’ असं सांगितलं की तो लगेच पाणउतारा होतो का? 

"–ते तुम्हाला कळायचं नाही. त्यांची ती नजर, लकब, स्वर मीच बरोबर ओळखते. 

"–हा विपर्यास आहे. 

"–मुळीच नाही. मी नोकरीपायी बाहेर असते, तेव्हा नोकरी कशी सांभाळायची हे मला एक वेळ कळेल, घर कसं सांभाळायचं हे कळणार नाही, एवढा अर्थ त्या एका सूचनेत असतो."
................................................................................................

"–लवकर वाढ. 

"–तू इकडे ये पाहू. ताट घे. तोपर्यंत वाढतेच मी. 

"–हे काय आई? म्हणजे तू भात निवत नाही टाकलास? 

"–निवेल रे आत्ता. तुला आरडाओरडा करायची सवय व्हायला लागली आहे. 

"–आई, मी तुला सांगते, आजी रोज काय करते ते. वृंदावनदादाचे कपडे झाले की तो दप्तर लावतो, तोपर्यंत आजी भात निवत टाकते. मग..."
................................................................................................

"–रंजना, मी जरा पडणार आहे. कधी दुपारचं आडवं व्हायला मिळत नाही. दार उघडू नकोस तासभर कुणालाही. 

"–आई, किती वाजले? 

"–अडीच वाजले. 

"–मग कसली पडतेस तू आई? 

"–का? 

"–दुर्वेकाकी चाळीतल्या बायकांना घेऊन येतील. 

"–कशाला? 

"–इथं त्या दासबोध का कायसंसं वाचतात. 

"–हे केव्हापासून सुरू झालं? 

"–अग, परवा किनई त्या मार्इंचं आणि सुधातार्इंचं घरात भांडण झालं. मार्इंनी सांगितलं काकींना. काकींनी सांगितलं आजीला. मग आजी म्हणाली की मार्इंच्या सुनेची एवढी ऐट नको. आमच्या घरात वाचन करा. मलाही ऐकायला मिळतील चार शब्द. 

"–ह्यांना जर गावाला जायचं होतं तर कशाला दिली परवानगी? 

"–आई, हे तू, गावाहून आजी आली की तिलाच विचार. 

"–शहाणी आहेस फार."
................................................................................................

"–हे पाहा इंद्रायणी, आईसुद्धा सगळ्या गोष्टी मनापासून करते, असं समजू नकोस. निव्वळ गरजेपोटी... 

"–कसली गरज? 

"–आता ते एक्झॅक्टली मी कसं सांगू? मी कामावर जातो, तू जातेस. तिलाही त्यापायी पुष्कळ बाबतीत शेजाऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं. त्या उपकारांची फेड, आईला ज्या मार्गानं करता येण्यासारखी आहे त्या मार्गानं ती करत राहते. 

"–त्यात आमची सोय, गैरसोय पाहायची की नाही? 

"–इच्छा असते ग, पण इलाज नसतो."
................................................................................................

"–मनुष्यस्वभाव, मानसशास्त्र वगैरे दृष्टिकोनातून अत्यंत साधं कारण होतं. उर्मिला घरी राहिली. तिनं चार दिवस घरातलं वातावरण पाह्यलं. आणि तिला कळलं की घरातल्या सगळ्यांनी त्यांचं आयुष्य छान आखलं होतं. आपण घरात नसलो तर कुणाचंही काहीही अडत नाही, हे उर्मिलेनं पाह्यलं. आणि नेमकं तेच तिला फार लागून राह्यलं. रिटायर्ड होणाऱ्या म्हाताऱ्याला नेमकं जे लागून राहतं तेच दुःख. रिटायर्ड झालो की पगार नाही, उद्योग नाही, ह्या विचारापेक्षाही आपल्या गैरहजेरीनं ऑफिस बंद पडणार नाही हे दुःख फार मोठं असतं. तसंच उर्मिलेचं झालं. चिडचिडी, राग– त्याचा होता. आपल्यावाचून कुणाचं तरी अडतं ही भावना फार सौख्यदायक असते. नोकरी करणाऱ्या बायका मग घरापेक्षा ऑफिसात जास्त प्रसन्न असतात. ऑफिसचं काम अंशमात्र त्यांच्यावाचून खोळंबून राहतं. चार आजूबाजूची माणसं दहा वेळा चौकशी करतात. पुष्कळ स्त्रियांच्या बाबतीत केव्हा केव्हा असं घडतं की त्यांना नवऱ्यापेक्षा ऑफिसातला सहकारी जवळचा वाटतो. 

"–नॅचरली. ऑपोझिट सेक्स. 

"–यू आर मिस्टेकन. इथं सेक्सचा प्रश्न अजिबात संभवत नाही. ऑफिसातला सहकारी शांतपणे सगळं ऐकून घेतो."
................................................................................................

"–सॉरी, पद्माकर; ह्यावर उपाय नाही. उपाय प्राथमिक अवस्थेत होऊ शकतो. दुखणं विकोपाला गेल्यावर नाही. इंद्रायणी अकरा वर्ष नोकरी करीत आहे. आता उत्तर नाही. इंद्रायणीच्याच बाबतीत नव्हे, तर एकूण परिस्थितीवरच! वुई आर द व्हिक्टिम्स ऑफ मॉडर्न सिव्हिलायझेशन. आगरकरांच्या काळात स्रियांना शिक्षण कसं देता येईल, हा प्रश्न आगरकर सोडवू शकले नाहीत. तो प्रश्न नंतरच्या पिढीने सोडवला. शिक्षण म्हणजे ज्ञान. साक्षात प्रकाशच. लपून राहणं हा प्रकाशाचा धर्म नाही. त्याप्रमाणे शिक्षण घेतलेल्या बायका, प्रकाशासारख्या पसरल्या. जिथं-तिथं बायका. ह्यांना आता पुन्हा घरांकडे कशा वळवायच्या ते तुला-मला सांगताच येणार नाही. क्वचित पुढची पिढी सांगू शकेल, तेही त्या पिढीला गरज पडली तर. आपण फक्त होईल तितका ताबा ठेवायचा. त्यातून गंमत ही, की हे सगळे प्रॉब्लेम्स चांगुलपणातून निर्णाण होतात."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 08, 2022 - September 08, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
आज तरी भांडशील ना? 
................................................................................................
................................................................................................

"–बिघडलं काय?– पहिलं वर्ष जड जाईल इतकंच. एक वर्ष झाल्यावर कुणाची बायको नवऱ्याशी गोड बोलते?– भांडणच जास्त. आंबेकर त्यातून सुटला की नाही? त्याशिवाय आणखी एक फायदा. बायको अबोला धरील हीसुद्धा भीती नाही. 

"–देवधर, तुझं लेका एकदम दुसरं टोक असतं."
................................................................................................

"–आमचे देवधर काय म्हणताहेत? बायको भांडते हेच ना? 

"–पाह्यलंस देवधर?... ही सगळी गँग इथे जमण्यापूर्वी तू इथून पळायला हवं होतंस, आता सगळे तुझ्या फिरक्या घेत बसतील."
................................................................................................

"–देवधर, देवधर, विचार करून बोल. जगात हुकमी काहीही घडू शकत नाही. 

"–त्या नियमाला अपवाद आमची बायको. तेव्हा पैज घेणार? 

"–मंजूर? 

"–बाय ऑल मीन्स. आजपासून एक सप्ताह भांडायचं ठरवलं तर रोज भांडण. 

"–मी म्हणतो, ठरवल्यानं काहीही घडत नाही. तू भांडून दाखव. इथं उपस्थित असलेला प्रत्येकजण तुला दहा दहा रुपये देईल."
................................................................................................

"–तेव्हा आज सकाळी एक ट्रिक केली. एक कुत्र्याचं पिल्लू पैदा केलं. घरी गेलो. संजीवनी बाहेर गेली होती. नाहीतर ऑफिसला येण्यापूर्वीच वाजलं असतं. ते पिल्लू मग तसंच दरवाजाच्या कडीला बांधलं; आणि ऑफिसला आलो. शेजारी निरोप ठेवला तसा. आता मी फक्त घरी पोहोचण्याचा अवकाश आहे. 

"–मी तुझ्याबरोबर येऊ का आज? 

"–अवश्य."
................................................................................................

"–मिराशी. सरळ सरळ भांडण होतं म्हणून सांगा ना. 

"–... 

"–तुम्ही माझ्याबद्दल काय काय ऐकलं असणार ह्याचा मी अंदाज करू शकते. 

"–नमस्ते..."
................................................................................................

"–मोहिनी, हे माझे मेव्हणे रमेश. आणि रमेश, ही मोहिनी मराठे. आमच्याच ऑफिसात आहे. पुष्कळ दिवस सिनेमाला जायचं चाललं होतं. आज नक्की ठरवलं. संजीवनीला जरा निरोप द्या."
................................................................................................

"–नवल तर आहेच, पण ते घडलंय. माझ्याकडून फार चुका झाल्या आठ दिवस. 

"–म्हणजे? 

"–मी गाढवासारखा वागलो. 

"–म्हणजे कसं? 

"–घरी उशिरा जात होतो. एक दिवस पत्त्याचा अड्डा रात्रभर मांडला. सिगारेट ओढली. ड्रिंक्स पण घेतली. कुत्र्याचं पिल्लू काय सांभाळायला आणलं, आणि कहर म्हणजे काल मोहिनीबरोबर सिनेमाला गेलो. तरी ती शांत. 

"–तुम्हीच सांगता तेव्हा विश्वास ठेवायला हवा. तुम्ही खोटं सांगणार नाही उगीच. 

"–खोटं? मुळीच नाही. भांडण हवं असताना भांडली नाही आणि मला ऐंशी रुपयांना फटका बसला."
................................................................................................

"–मी बोललो परवा पुण्याच्या ट्रिपमध्ये, नवऱ्याचं रोज डोकं उठवतेस; एखादा आठवडा तरी शांत राहून दाखवशील का?– ती ‘हो’ म्हणाली. तुमच्याकडून आत्ता कन्फर्म केलं, भांडली नाही म्हणून... 

"–रमेश, रमेश. मोटार अशीच आता बद्रीकेदारला घेऊन चला. 

"–का? 

"–आठ दिवसांत तिला एवढी कारणं मिळवून दिली आहेत– आता बुडालो, मेलो. रमेश, प्लीज-घराकडे गाडी नेऊ नका."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 08, 2022 - September 08, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
आत्मनस्तु कामाय 
................................................................................................
................................................................................................

"–पण हे हार वगैरे प्रकरण काय आहे? 

"–सर, माझं आजचं यश तुमचं आहे. पेढे इतरांसमोर मी तुम्हाला ऑफिसात देऊ शकतो. पण तिथं हा असा हार घालता येणार नाही. तिथं ते नाटक वाटेल, आणि तुम्हालाही ऑक्‌वर्ड वाटेल."
................................................................................................

"–ऐकलं का, त्यांना जेवायलाच बोलवा. 

"–गुड आयडिया. वर्तक, बाईसाहेब म्हणताहेत जेवायला या. 

"–सर, जेवणाचं म्हणजे... 

"–सबब नाही सांगायची. फक्त दिवस सांगायचा."
................................................................................................

"–वर्तकानं चांगलंच नशीब काढलं. 

"–वरची जागा मिळाली असेल. 

"–नुसत्या वरच्या जागेनं काय होतंय्? तो चालला फॉरीनला. त्याला स्कॉलरशिप मिळाली. 

"–नोकरी सोडून जाणार? 

"–जवळ जवळ तसंच. ‘हिंदुस्थानात परतल्यावर केव्हाही या, नोकरी देऊच–’ असं आमच्या साहेबांनी सांगितलं त्याला. पण ते काही खरं नाही. 

"–म्हणजे काय? 

"–म्हणजे वर्तक येईलच असं नाही. आमच्या ऑफिसपेक्षा मोठ्या कंपन्यांकडून त्याला ऑफर्स येतील."
................................................................................................

"–येस् देसाई. वर्तक केव्हापासून येणार? 

"–त्याची बसायची व्यवस्था झाली की. 

"–म्हणजे? 

"–त्याला केबिन नको? 

"–सध्या वर्तक नार्वेकरांच्या केबिनमध्ये बसेल की. 

"–नार्वेकरांपेक्षा वर्तकची पोस्ट वरची रहाणार आहे. 

"–कसं शक्य आहे? 

"–अरे बाबा, स्पेशल पोस्ट क्रिएट केली आहे. 

"–मग नार्वेकरांचे वांधे. 

"–का?

"– त्यांच्या पोझिशनला धक्का लागत नाही."
................................................................................................

"–नार्वेकरांनी नेहमीप्रमाणे एकदा खोलीत ट्रे मागवला. 

"–अरे त्यावेळी त्यांना केबिन मिळायची होती. हे बाहेरच घडलं हॉलमध्ये. 

"–नार्वेकर चवीचवीनं पंधरावीस मिनिटं चहा घेत बसले होते; आणि साहेब समोर उभं राहून शांतपणे पाहात होता. नार्वेकरांची इतकी तंद्री लागली होती, की त्यांना पत्ता नाही साहेबांचा. सगळा स्टाफ ते पाहात होता, पण कुणाची टाप नाही मधे काही बोलायची. नार्वेकरांनी शेवटचा घोट घेतला आणि मग एखादी तोफ डागावी तसा साहेब गरजला. नार्वेकर मात्र शांत होते. त्यानंतर नार्वेकरांचा चहा बंद झाला. ओळीनं चार वर्षात त्यांनी चहा घेतला नाही. त्यांना प्रमोशन मिळालं, केबिन मिळाली, पण चहा थांबला तो थांबलाच, शेवटी पीटरसाहेब रिटायर झाला. त्याला सेंड ऑफ पार्टी दिली त्या दिवशी ते चहा प्यायले. 

"–त्या दिवशी चहा कसा घेतला ते सांग. त्याला महत्त्व आहे. 

"–पार्टीच्या वेळी पीटरसाहेबानं जाहीर कौतुक केलं ते नार्वेकरांचं. दहा वर्षात नार्वेकरांच्या कामात एकही चूक झाली नाही म्हणून साहेबाला घातलेला हार त्यानं प्रेमानं नार्वेकरांच्या गळ्यात घातला. नंतर चहा झाला. नार्वेकरांनी चहा नाकारला. पीटरसाहेबानं चौकशी केली. तेव्हा नार्वेकर काही बोललेच नाहीत. तिथं आपले खांडेकर होते. नार्वेकरांनी चार वर्षात चहा घेतला नाही हे त्यांनी सांगितलं. साहेबांनी जाहीर माफी मागितली. दिलगिरी नव्हे, चक्क माफी. पार्टीत जेव्हा नार्वेकरांनी पहिला घोट घेतला तेव्हाच साहेबांनी इतरांना चहा घेऊ दिला. चहाच्या अपमानाचं उट्टं नार्वेकरांनी ऑफिसच्या कामावर काढलं नाही ह्याचा साहेबांनी खास उल्लेख केला."
................................................................................................

"–गेले चार दिवस ते गप्प-गप्पच आहेत. असे कधी नसतात ते. स्वभावानं अबोल नाहीत. आमच्या शंतनूला आम्ही जेव्हा पाचगणीला ठेवलं तेव्हा हे असे घुम्यासारखे होते काही दिवस. त्यानंतर हल्ली चार दिवस झाले आहेत पुन्हा... 

"–त्याला मीच जबाबदार आहे काकी. 

"–तुमचा काय संबंध? 

"–मी त्यांच्याच ऑफिसात त्यांचा ऑफिसर म्हणून आलोय. त्याचा त्यांना धक्का बसलाय. वास्तविक मी त्यांच्याशी ऑफिसरसारखा वागलेलो नाही. म्हणजे मला वागता येणारच नाही. हाताखालच्या माणसांना अजून मी सहीसाठी त्यांच्याकडे पाठवतो. पुष्कळदा, सही करण्याचा अधिकार माझा असतानाही! त्यांना लाजवण्याचा किंवा स्वतःचा मोठेपणा दाखवण्याचा अजिबात प्रयत्न नाही माझा. अंतःकरणापासून जे वाटतं ते मी करतोय. कागदोपत्री मी ऑफिसर असेन. मी मात्र नार्वेकरांनाच बॉस मानतोय. तरीसुद्धा ते डिस्टर्बड् आहेत. थोडं ते स्वाभाविक सुद्धा आहे. त्यांचा स्वाभिमान जाज्वल्य आहे. ऑफिसातली माणसं चेष्टेनं म्हणतात की, वासुदेव बळवंत, लोकमान्य, स्वातंत्र्यवीर आणि चौथे आपले नार्वेकर."
................................................................................................

"–नोकरी सोडली हे सांगायची पाळी यायच्या आत तुम्हाला दुसरी नोकरी मिळाली की मी सुटले. 

"–सुटले म्हणजे काय? नोकरी सोडणं हा काही गुन्हा नाही. काही लफडं वगैरे करून नोकरी नाही सोडली मी. स्वाभिमान आहे म्हणून सोडली. 

"–त्याच्यावर विश्वास बसत नाही लोकांचा. 

"–लोक गेले ढगात! तुझा विश्वास आहे की नाही? 

"–त्याचा काय उपयोग?"
................................................................................................

"–तुम्ही ह्या पद्धतीनं किती नोकऱ्या नाकारणार आहात? 

"–माझ्या मनासारखी मिळेपर्यंत सगळ्या. 

"–हा निव्वळ दुरभिमान आहे. 

"–मुळीच नाही. स्वतःच्या कर्तृत्वावरचा हा ठाम विश्वास आहे. 

"–काय होणार आहे काही कळत नाही. शंतनू पाचगणीहून उद्या येणार. त्याला काय सांगायचं त्याची तयारी ठेवा म्हणजे झालं. 

"–पुनः तेच. मी काय अफरातफर केली, का लाच खाल्ली, मला काही कळत नाही. 

"–तुमचं पुनः पुनः तेच. गेले दहा महिने मला जाता-येता तेच ऐकवताय. थोडा व्यवहार, थोडी रीत, आजुबाजूची परिस्थिती पाहाल की नाही? महागाई वाढते आहे. खर्च अवाढव्य चाललाय, शंतनूला पाचगणीत ठेवायलासुद्धा परवडेल की नाही ते पाहायला हवं. पण हा विषय काढायची चोरी घरात. लगेच राख घालायची डोक्यात."
................................................................................................

"–मी बाबांना माझ्यासाठी नोकरी पाहायला सांगितली होती. 

"–का? –त्याचं कारण तुम्हाला माहीत आहे. 

"–त्यापूर्वी माझी परवानगी... 

"–ती मिळणार नाही हे मला माहीत होतं. 

"–म्हणून हा परस्पर व्यवहार... 

"–जावईबुवा, इंदूनं काही कुणा तिऱ्हाइताला सांगितलं नव्हतं. परस्पर व्यवहार जरी झालेला असला तरी तो घरातल्या घरातच झालाय्. 

"–पण का? मी काही बांगड्या भरल्या नाहीत की तिला आता मी पोसू शकत नाही अशी परिस्थिती आलेली नाही. 

"–मान्य आहे. तशी परिस्थिती येऊ नये आणि येणार पण नाही. तरीसुद्धा, काळ कठीण आलाय्. पूर्वीचे दिवस राहिलेले नाहीत. शिक्षण मिळवलेल्या प्रत्येक व्यक्तीनं स्वतःच्या पायावर उभं राह्यला शिकलं पाहिजे. 

"–बाबासाहेब, ह्याचा अर्थ मी काय समजायचा? 

"–काहीही समजा. 

"–इंदूनं नोकरी केलेली मला आवडणार नाही. 

"–मग तुम्ही लवकर नोकरी मिळवा ना."
................................................................................................

"–शंतनू, आई बोलत नाही तुझी? 

"–वर्तककाका, एक सांगू तुम्हाला? 

"–आई, सांगू? 

"–सांग. वर्तक आपलेच आहेत. 

"–आईशी गेल्या पाच वर्षात बाबा एक अक्षर बोललेले नाहीत. 

"–नार्वेकर, मला बोलण्याचा अधिकार नाही, पण हा काकींशी अबोला का, एवढं मला सांगाल का? 

"–जरूर सांगेन. आणि वर्तक, केवळ तुम्हालाच सांगेन. आमचं नोकरीप्रकरण तुम्हाला माहीत आहेच."
................................................................................................

"–इंदू माझ्याशी फार वाईट वागली. वाईट म्हणजे तिच्या दृष्टीनं योग्य असेल. पण सहचारिणीबद्दलच्या माझ्या सर्व कल्पना– अपेक्षांना तडा गेला. संकटाच्या केवळ चाहुलीनं ही एवढी बिथरली! प्रत्यक्ष संकटात हिनं मग काय केलं असतं? अर्थात तिची चूक नाही त्यात. वैभवाची तिला चटक लागली. स्वास्थ्य हाडीमाशी नव्हे, तर रक्तात भिनलं. ऐश्वर्यातदेखील, अलिप्तपणानं राहून ते उपभोगावं ह्याची शिकवण कुणी दिली नाही. मी नाही, आणि तिच्या वडिलांनी तर नाहीच नाही. बाबासाहेबांचं पण नवल वाटतं मला. लग्न झाल्यापासून त्यांच्या मुलीला वैभवात लोळवली तेव्हा ते गृहस्थ सांगायला नाही आले की, एवढ्या सुबत्तेची आमच्या इंदूला सवय नाही म्हणून. जीव तुटला, तो केवळ पोरीसाठीच."
................................................................................................

"–मला फक्त मॉरल सपोर्ट हवा होता. इंदू जर असं म्हणाली असती, की, वेळ पडली तर मी नोकरी करीन, पण तुम्ही कमी पगाराची नोकरी करू नका; तर मी समजू शकलो असतो. पण तसं घडलं नाही. स्वतःच्या पायावर उभं राहता यावं म्हणून ती नोकरी शोधीत होती. ह्याचा अर्थ तिला केवळ स्वतःचा बचाव अभिप्रेत होता."
................................................................................................

" ... मी एक नाही, दोन नाही, अकरा महिने घरातलं वातावरण पाह्यलं. इंदूची प्रत्येक हालचाल, प्रत्येक विचार पाह्यला– ऐकला. माझी मग खात्री पटली, पत्नी पतीवर प्रेम करते हा भ्रम आहे हे पटलं. शेवटी, ‘आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति’ ह्याचाच प्रत्यय आला. ... "
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 08, 2022 - September 09, 2022. 

"–मधू, माथेरानला आल्यापासून एकही सिगारेट ओढली नाही हं. आता मुंबईची गोष्ट निराळी आहे. राणीसाहेबांची मुलाखतच होत नाही... 

"–त्यालाही राणीसाहेबांचा बिझीनेस जबाबदार ना? 

"–मधू, प्लीज रागवायचं नाही. माझी वाट पाहून पाहून ताटकळून जातेस, उपाशीपोटी झोपतेस, हे सगळं मला कळत का नाही? आपला व्यवसायच तसा, त्याला काय करू? 

"–हे कायम असंच चालायचं ना? 

"–थोडं बस्तान बसलं की धावपळ कमी होईल."
................................................................................................

"–कालची गोष्ट निराळी होती. काल प्रयोगाला प्रारंभ होण्यापूर्वी शंभराव्या प्रयोगाचा कसलाही उत्साह नव्हता. मन उदास होतं. शरीर यंत्र बनलं होतं. किल्ली दिली की पळणारं. पडदा वर गेला आणि मग पहिल्या रांगेत, पहिल्या खुर्चीत इंद्रधनुष्य पडलेलं दिसलं. मग माझा मी उरलो नाही. मी नाटकाचाही राह्यलो नाही. प्रेक्षकांचा नाही. समोर फक्त तू होतीस. फक्त तू. काल काय काय बडबडलो हेच कळलं नाही."
................................................................................................

"–पहिल्या रात्री नवऱ्यानं हातात हात घेतला तेव्हा तर आठवलंच असेल की नाटकात निरंजननं अस्साच हात धरला होता म्हणून. 

"–तो भामिनीचा. माधुरीचा नव्हे."
................................................................................................

"–तो निर्णय आम्ही दोघांनी घेतला होता, म्हणजे आहे. आता ऑफिसची टूर संपवून श्रीधर उद्याच परत येतील. नंतर डॉक्टरची अपॉइंटमेंट पण घेतली आहे. एका ठराविक दिवशीच तो उपाय होऊ शकतो, ट्युब-बेबी म्हणतात. ते नाव ऐकलं असशील. 

"–आता तू काय करणार? 

"–त्या दिवशी डॉक्टरांकडे जाणार. त्यांना विश्वासात घेणार आणि उपाय केल्याचं नाटक करायला लावणार."
................................................................................................

"–तू ओरड आता. पण बोललो ते खोटं नव्हतं. हॉस्पिटलमध्ये रोज घटका मोजत होतो. साडेतीन महिन्यात एकदा तरी येशील असं वाटलं होतं. 

"–तू हे केव्हाचं सांगतोस? 

"–त्यालाही बरोब्बर तीन वर्षं झाली. 

"–मग बरोबर आहे. आम्ही सगळेच दोन वर्षं कॅनडाला गेलो होतो. त्या काळातलं इकडंच काहीच माहिती नव्हतं. इकडे परतल्यावर मात्र एखादं मस्त नाटक कधी पाहू असं आम्हा दोघांना झालं होतं. तुझ्या कंपनीची चौकशी केली, पण पत्ताच लागला नाही."
................................................................................................

"–पाळणा कसा हलला या घरात– 

"–निरंजन... 

"–अगदी नाइलाज आहे. 

"–तुझं माझ्यावर हेच का प्रेम... 

"–ते एकतर्फी कधीच असत नाही माधुरी. प्रेमाच्या प्रांतातही आपण राबवले गेलो, आपला एक इन्स्ट्रूमेंट म्हणून उपयोग केला गेला– ह्याची जाणीव झाली की प्रेम कसं राहील? 

"–निरंजन, तू काय बोलतोस हे? 

"–खरं तेच बोलतोय. नाटक संपलं, भामिनी संपली, मेकअप पुसला, अवतार संपला, हे जितक्या निर्विकारपणे तू मला दहा वर्षांपूर्वी सांगितलंस, तितक्याच निर्विकारपणे तू मला तुझा देह दिलास. एक सौदा केलास. व्यवहार साधला. माझ्याही दृष्टीनं तो सगळा आता व्यवहार उरलाय, दहा वर्षांपूर्वीचा हिशोब आज सव्याज वसूल करायला हरकत नाही."
................................................................................................

"–म्हणजे, मी नाही समजलो. 

"–सांगतो. दहा वर्षांपूर्वी टेस्ट ट्यूब बेबीच्या उपायाला मी तयार झालो तो माझ्या मधूसाठी. तो उपाय यशस्वी झाल्याचा दहा वर्षं आनंद होताच. तरीही हे बीज कुणाचं हा विषय डोक्यातून जातच नव्हता. ह्या ताणातून मी आज मोकळा झालो. आता कसं हलकं वाटतंय्. एका कलावंताचं रोप माझ्यासारख्या रसिकाच्या घरी वाढतंय् ह्याचा फार आनंद वाटतोय. हा पोरगा कुणाचा, हे जर समजलं नसतं तर कदाचित त्याचं व्यक्तिमत्त्व फुलवण्याच्या कामात मला अपयश आलं असतं. आता तसं व्हायचं नाही."
................................................................................................

"–आय कॅन अंडरस्टँड निरंजन. असे एक्साइट होऊ नका. आता मी तुम्हाला एकच गोष्ट सांगणार आहे. तुम्हाला काय हवंय ते आत्ता ठरवा. पैसा की आणखीन काही. लक्षात येत नसेल तर सांगतो. पैसे हवे असतील तर आकडा सांगा. खंत न बाळगता मी देईन. गेल्या दहा वर्षांत मधूला आणि मला फार सुखात ठेवलंत. मूल न होणं हे मलाही लांछनच होतं. तो डाग धुतला गेला आणि मधूच्या आयुष्याला अर्थ आला. जो मी कधीच देऊ शकलो नसतो. त्या सगळ्याचं मोल रुपयात करायला मी असमर्थ आहे. त्या सौख्याची किंमत तुमच्या सध्याच्या परिस्थितीइतकी होणार असली तर तो आकडा सांगा. मी एका रकमेनं तो आकडा पुरा करीन. तरीसुद्धा मला वाटतं निरंजन, तुम्ही मागितलं, आणि जेवढं मागितलं तेवढं मी जरी दिलं, तरी हा हिशोब आता पुरा नाही होऊ शकत. 

"–श्रीधर, श्रीधर, तू काय बोलतोस, किती चांगलं–किती शुद्ध–निष्कपटी– 

"–थांब मधू, कुणालाही लाजवायचं, हिणवायचं म्हणून बोलत नाही. जे आतून येतंय ते शब्दांत बांधतोय. त्याला फक्त धैर्य लागतं. पोटी असेल ते ओठी आणायला धाडस लागतं. तेवढं नसतं माझ्याजवळ ते आहे. अर्थात काही काहींना खुद्द स्वतःच्या मनाचीच मागणी कळत नाही त्याला काय करणार? तेव्हा निरंजन, तुम्हाला एक्झॅक्टली काय हवंय ते शोधा. 

"–मी गोंधळलोय श्रीधरपंत. 

"–‘बाप’ म्हणून, बापाला जी भूक असते ती मी किंवा मधू पुरी करू शकणार नाही. तुम्हाला ‘बाप’ म्हणून मुलाकडून जे हवं असेल ते फक्त आनंदाच देऊ शकेल. भविष्यकाळी तोही तुमच्यासारखा एक महान कलाकार होईल. एन्ट्रीलाच त्यानं कडाडून टाळी घेतली की, तुमच्यातल्या कलावंत बापाच्या डोळ्याचं पारणं फिटेल. त्या दिवसाला अर्थात अवकाश आहे. त्याची आपण सर्वांनी वाट पाहायला हवी. तो दिवस उगवायला खूप कालावधी आहे. तोपर्यंत आपण सर्वांनी जगायला हवं. तेव्हा निरंजन, जगायचं म्हणजे पैसा हवा. आय अंडरस्टँड. तुमची मागणी मोकळेपणी सांगा."
................................................................................................

"–निरंजन, श्रीधर गेले. आता गप्प बसू नकोस. मला तुझी अपेक्षा सांग. 

"–... 

"–निरंजन, मला उत्तर हवंय."
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 09, 2022 - September 09, 2022. 

"–एकमेक एकमेकांना सामील होऊ नका. राजाभाऊ, गेल्या दोन दिवसांत हे एकदाही खाली उतरले नाहीत. नाटक नाही, सिनेमा नाही, फार काय संध्याकाळची चौपाटी नाही. मॉर्निंग वॉक तर सोडाच, पण सकाळी केंद्रावरून दूध आणायला सांगितलं तर बिल्डिंगमधल्या तिघाचौघांना सोबत घेऊन गेले. वासूनाना तर सांगत होते आल्यावर, की म्हणे, दूधकेंद्रावरची मोटार आपोआप चालायला लागायची नाही ना, असं हे त्यांना विचारीत होते. रस्ता तर एखाद्या लहान मुलाप्रमाणे पळत पळत क्रॉस केला."
................................................................................................

"–राजाभाऊ, अरे तूही कमाल करतोस. त्यांना त्यांची मतं काय विचारतोस? त्यांनी ही सगळी पुस्तकं, पंचांगं नुसती जमवली आहेत. माझ्या आठवणीत त्यातली एक ओळ तरी त्यांनी वाचली असेल की नसेल, ह्याची मला शंका आहे. ते आव आणून बोलतात, पण अतिशय भित्रे आहेत ते. उगीच आपला वादविवाद वाढतो म्हणून त्यांच्या समोर बोलत नाही मी. 

"–खरं सांगता? 

"–अगदी खरं. आता परवा तू संख्याशास्त्राचं काही काही सांगितलंस ना, आता ती पुस्तकं घरात येऊन पडतील. त्यानंतर महिन्या दोन महिन्यानंतर तू सहज पुस्तकांबाबत विचार. त्यातलं एकही पुस्तक त्यांनी वाचलेलं नसेल."
................................................................................................

"–मला पत्रिका न बघताच माणूस कळतो. सगळेजण भविष्याला भिऊन असतात. तुझे भाई पण तसेच. घरात पुस्तकं असताना भविष्याचा अभ्यास करत नाहीत. 

"–ते का? 

"–कारण अभ्यासानं, काय होणार आहे हे त्यांना खरोखरच कळायला लागेल, आणि मग जर काही प्रतिकूल घडणार असेल, तर त्याचा धक्का आजच बसायचा नाही का? त्यापेक्षा नुसती चर्चा बरी त्यात संशयाचा फायदा असतो. दुसऱ्याला फार कळत नाही असं म्हणत स्वतःची समजूत घालता येते. तुम्हा भविष्य पाहणाऱ्या माणसांना वाटतं की आपण किती अचूक सांगू शकतो म्हणून. पण पत्रिका दाखवणाऱ्या माणसाला तेवढं अचूक समजायला नकोच असतं. अगदी खरं जे असेल तसं सांगा असं माणसं म्हणतात, पण तरीही कुठंतरी, वाईट तर काही नसेल ना ह्याची धाकधूक असते. चांगलंच असावं ह्याबद्दल प्रार्थना असते. सध्या चाललं आहे त्यापेक्षा वाईट, भविष्यात काही नसणार अशा अपेक्षेनंच पत्रिका दाखवली जाते."
................................................................................................

"–ताई कसं सांगू? पुढचं सांगता येत नाही म्हणून पुराणातला दाखला देतो. परीक्षित राजा राजवाडा सोडून गेला नाही पण... 

"–राजाभाऊ कितीही चमत्कार घडला तरी रस्त्यावरची मोटार, फार तर फुटपाथवर चढेल, पण तिसऱ्या मजल्यावरच्या खोलीत घुसणार नाही."
................................................................................................

"–परीक्षित राजाप्रमाणेच घडलं बाबा. 

"–ते कसं काय? रस्त्यावरची मोटार... 

"–ती तिसऱ्या मजल्यावर नाही आली. आमचा भाचा काल इथं आला होता पाच वर्षांचा! 

"–कोण? अतुल का? 

"–हो, तोच. त्याच्या खेळण्यातल्या मोटारीवर त्यांचा पाय पडला आणि मोटारीला चाकं होती ती सरकली आणि हे पडले. त्यांना अजून ते माहीत नाही, बोलू नकोस. 

"–का? 

"–ह्यांना कळलं तर आणखीन चाळीस-पन्नास संख्याशास्त्रावरची पुस्तकं घरात आणून टाकतील. संख्याशास्त्रावर बैठकी सुरू होतील. आता कंटाळा आला बघ पुस्तकांचा. कळलं का?"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 09, 2022 - September 09, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
V.P. KALE
Sanvadini (Marathi) 
by V.P. KALE (Author)  
................................................
................................................
September 08, 2022 - September 09, 2022. 
Purchased September 08, 2022.  

Publisher:- ‎MEHTA PUBLISHING HOUSE 
(1 January 1983)
Language‏:- ‎Marathi
Format: Kindle Edition
Kindle Edition
Marathi Edition  

ASIN:- B01N1EO0ZW
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4974387729