................................................................................................

Ka Re Bhulalasi (Marathi)
का रे भुललासी
वपु काळे
V.P. KALE

Book, good. But -
Funny, one thought 'स्वर' was preface or introduction, with a fancy name.
But -
" ... प्रत्येक कथा वाचकाचं मन जिंकून घेते.
"‘स्वर’मधील कथाही वाचून संपल्या तरी
"मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतील..."
That sounds like advertisement for another collection of stories, placed by publishers at beginning of this one, rather than the end as usual!
Does the publisher expect readers to not finish this book?
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
PREFACE

स्वर

Funny, one thought it was preface or introduction, with a fancy name. But -
" ... प्रत्येक कथा वाचकाचं मन जिंकून घेते.
"‘स्वर’मधील कथाही वाचून संपल्या तरी
"मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतील..."
That sounds like advertisement for another collection of stories, placed by publishers at beginning of this one, rather than the end as usual!
Does the publisher expect readers to not finish this book?
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................

September 16, 2022 - September 16, 2022.

अनुक्रम

बी. एम. पी. बेचाळीस बेचाळीस
मुखवटे
तिची आता समजूत घाला
थ्रिल
वर्तुळातला त्रिकोण
सोयरीक
उपेक्षित पान
सतीचं वाण
का रे भुललासी
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
REVIEW

१. बी. एम. पी. बेचाळीस बेचाळीस
................................................................................................
................................................................................................
"‘‘महाराष्ट्र टाइम्सला आज आली बातमी. संध्याकाळमध्ये त्याच दिवशी आली होती. सांज मराठामध्ये पण होती. दोन दिवसांपूर्वी नवशक्ती, लोकसत्तेत आली. टाइम्सला उशिरा आली.’’
"‘‘ही सगळी पत्रं...’’
"‘‘माझे पॅसेंजर्स. त्यांचं हे प्रेम. एका टॅक्सीवाल्यावर. चौदा हजारांपैकी मी एक आणि ही माझी कमाई. ‘नव्या टॅक्सीसाठी पैसेसुद्धा देतो’ अशा मजकुराची पत्रंही आहेत त्यात. आणखी निराळं काय हवं?’’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 16, 2022 - September 16, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
२. मुखवटे

" ... मी दुसरा युक्तिवाद मांडला. ‘‘बरं, ते जाऊ दे. एका सिनेमात कमीतकमी किती अनोळखी माणसांना मिठ्या मारायची तुमची तयारी आहे?’’
"माझ्या ह्या सडेतोड प्रश्नावर ती निरुत्तर झाली. ती लाजली व खाली पाहू लागली. हा दुवा कच्चा आहे हे मी ताबडतोब समजलो.
"‘‘तुम्ही ‘पतिता’ पाहिलात!’’
"‘‘हो!’’
"‘‘स्त्री जन्मा, ही तुझी कहाणी?’’
"‘‘पाहिला.’’
"‘‘दूधभात, सुबह का तारा...’’ ‘
"‘ही सगळी पाहिली आहेत मी!’’
"‘‘मग त्यात पाहा, एकदा बापाला, मग होणार्या नवर्याला, प्रियकराला आणि मग गुंडांनी अत्याचार केला म्हणून, अशा निरनिराळ्या नात्यांनी, कारणांनी नायिकेला कोणाकोणाला मिठ्या माराव्या लागल्या आहेत? त्याआधी काम कसं करायचं. हे समजावून सांगताना डायरेक्टरनी मिठी मारली असेल ती निराळीच!’’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 16, 2022 - September 16, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
३. तिची आता समजूत घाला
................................................................................................
................................................................................................
"‘‘ते राहू दे सगळं. म्हातारी आता येईल. गळा काढून रडेल. तुला फार मारला रे पोराऽऽऽ म्हणून इथं गडबडा लोळेल. माझं काय पण नुकसान झालं नाही त्या मारानं, हे तिला कसं पटवायचं? तिची समजूत घालाल?’’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 16, 2022 - September 16, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
४. थ्रिल

"‘‘बरोबर आहे तुमचा तर्क. तसं सगळं घडणार होतं. माझी बदलीही मुंबईला व्हायची होती. ऑफिसतर्फे क्वार्टर्स, ऑफिसची गाडी हे सगळं मिळायचं होतं.’’
"‘‘मग?’’
"‘‘त्यासाठी फार काहीतरी विकावं लागणार होतं. थोडी हां जी, हां जी, खुशमस्करी... वगैरे वगैरे, हे करायचं नव्हतं. मग मागची माणसं पुढं गेली. माझ्या खांद्यावर ती उभी आहेत. मोटारीतून फिरतात. त्यांची कामं मी करतो. आठवड्यातून तीन वेळा मुंबईला पाठवतात मला; पण मुंबईत क्वार्टर्स देत नाहीत.’’
"‘‘तुम्ही रिप्रेझेंट करत नाही?’’
"‘‘नाही करत. एकदा तसे विचार मनात येऊन गेले; पण त्याच वर्षी बायको वारली. घर खायला उठलं. मागं पाश उरला नाही. प्रवासात वेळ बरा जातो. पहिल्या वर्गाचा भत्ता मिळतो. पण मला जनता क्लास बरा वाटतो. माणसं भेटतात. इथं एकमेकांशी बोलता येतं. पहिल्या वर्गात माणसं भेटत नाहीत. कपडे भेटतात.’’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 16, 2022 - September 16, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
५. वर्तुळातला त्रिकोण
................................................................................................
................................................................................................
"‘‘वयाच्या बाराव्या वर्षी घरातून पळालो. शिक्षणाकडे लक्ष नव्हतं. वेड होतं संगीताचं; पण वडील संगीतद्वेष्टे. मी आणलेली फ्ल्यूट त्यांनी जाळून टाकली. पैसे जमवून विकत आणलेला तंबोरा फोडून टाकला. शाळेतल्या संगीत मास्तरांनी मला कानमंत्र दिला. आसरा देण्याचं आश्वासन दिलं; पण मी घरातून पळाल्यावर त्यांनी सरळ कानावर हात ठेवला. तिथं मी पहिला फटका खाल्ला. नंतर अक्षरश: मोलमजुरीवर दिवस काढले. असाच एक दुसरा संगीतशिक्षक भेटला! पंधरा दिवस त्याच्या जाण्यायेण्याच्या वाटेवर उभा राहून मी त्याला नमस्कार करीत होतो. पंधराव्या दिवशी माझी चौकशी करून मला तो आपल्या घरी घेऊन गेला; पण महिन्यात मला समजलं की, त्याला फक्त घरातल्या सगळ्या कामाला माणूस हवा होता! तरी आशा मेली नाही. कधीतरी तो मला हाक मारील आणि म्हणेल, ‘‘ये, ही सतार घे, व्हायोलिन घे, नाहीतर तबला घे, आवडेल ते वाद्य घे आणि कर सुरुवात.’’ सहा महिने वाट पाहूनही तसं कधी घडलं नाही. कानावर पडेल तेवढं मी ऐकत होतो. त्याच्यापश्चात वाजवून पाहत होतो आणि एके दिवशी असं गुपचूपपणे वाजवून पाहत असतानाच तो समोर उभा राहिला. परवानगीशिवाय वाद्यांना हात लावला! ह्या सबबीवर त्यानं मला घर सोडायला लावलं. त्याच रात्री मी हाताला येईल ती सतार उचलली आणि पोबारा केला. सरळ सरळ मनाशी हिशेब केला होता की, आठ महिने विनावेतन पडेल ते काम केलं त्याच्याकडे, सतार पळवण्यात काहीच पाप नाही. तेव्हापासून भटकतोय! बंधन नाही - दिशा नाही - मार्ग नाही - आदर्श नाही - ध्येय नाही - वात्सल्य नाही - श्रद्धा नाही! कधीही मागं वळून पाहिलं नाही. मागं वळून पाहायला, चालून झालेला रस्ता असावा लागतो. त्याचाच पत्ता नव्हता, मग मागं मान कराच कशाला? अशाच धावपळीत जोडीदारीण मिळाली. ह्याच धावपळीत आम्हालाही मानणारा एक वेडा मिळाला. ह्याच धावपळीतच त्यानं आमच्याकडे सतारीचे धडे घेतले. आता खूप मोठा बजवैया झालाय; पण बेटा तोही पळून गेला एक दिवस! जाताना एकटा नाही गेला तर माझ्या बायकोला घेऊन पळून गेला. काही दिवस थबकलो! मग म्हणालो, पाश गेला! असं हे जीवन. ह्यात कुणासाठी थांबायचं? कुणासाठी मागं वळून पाहायचं?
"‘‘विनायकरावांनी मला एक वर्षाच्या काळात दिशा देण्याचा प्रयत्न केला. कोणत्या श्रद्धेनं केलं ते मी जाणतोय. त्यामागच्या भावना ओळखतोय. ‘श्रद्धा’ शब्द कुणी उच्चारला तर मारायला धावणार मी; पण विनायकरावांपुढं नतमस्तक झालोय. वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय. निश्चित दृष्टिकोनानं जगणारे विनायकराव स्वत:ला अजमाविण्यापलीकडे दुसरं ओळखत नाहीत आणि फक्त नवर्याचा शब्द सांभाळणारी वहिनी स्वत:चं व्यक्तिमत्त्व विसरत आहे. तिचं पोळणारं अंत:करण समजलं असूनही मी त्यावर फुंकर घालू शकलो नाही. कारण, माझा आणि वहिनींचा संबंध जोडणारी माणसं ह्या कृपाळू जगात आहेत आणि सर्वांत भीषण विनोद कोणता असेल तर तो हाच की, विनायकरावांना सावध करायला येणारी माणसं ज्याचं उदाहरण देत असत तो पोळलेला माणूस मीच हे त्यांना माहीत नसायचं! माझ्याच बायकोबद्दलचा हा गाजावाजा ऐकवायचा नाही मला आणि मी मग जोरजोरात मुलांना शिकवायला लागायचो."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 16, 2022 - September 16, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
६. सोयरीक

"‘‘बापलेकाला असले सगळे नाद आहेत! स्थळ सुटलं नाही, मुद्दाम सोडलं मी! वहीत या स्थळापुढं तसा शेरा पडला नाही; कारण ही माहिती ज्या दिवशी कळली त्याच्या आदल्याच दिवशी नेमकी ती वही हरवली!’’
"पंतांनी मांडवाच्या खांबाचा आधार घेतला, त्यांच्या पायाची उभी नस दुखायला लागली! सायटिकाच हा!!"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 16, 2022 - September 16, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
७. उपेक्षित

" ... पुरंदर्यांकडून लग्नासाठी नकार आला. नितीनचे वडील तातडीने पुण्याहून आले. पुरंदर्यांकडून माझ्या प्रेमप्रकरणाची माहिती घरच्या मंडळींना कळली असावी. पुरंदर्यांकडे खेपा घालणारे वडील व श्रीनिवास आता नितीनच्या वडिलांकडे जाऊ-येऊ लागले. घरात नितीनचं कौतुक होऊ लागलं. कसला श्रीनिवास तो! मला वडिलांचीही चीड आली. नगाला नग मिळाल्याप्रमाणे खूश होते सगळे. आई म्हणजे पाण्यातल्या लोण्याप्रमाणे अलिप्त! ... "
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 16, 2022 - September 16, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
८. पान

"खुर्चीवरून उठत बापट म्हणतो, ‘‘नको, तो उपाशी आहे. मला जेवायला बरं वाटत नाही. माझाही खाडा मांडा.’’
"न जेवता बापट निघून जातो – भावासाठी! ह्या गादीवर मी बसलो नसतो तर हे प्रेम मला बघायला मिळालं नसतं. हे कुणीकडं आणि आमचे बंधुराज कुणीकडं! बापूला खंत वाटते त्याच्या एकअष्टमांश खंत आमच्या विश्वासला वाटली असती तर? म्हसोबा! मॅट्रिक असून कामधंदा करीत नाही आणि त्याच्यापेक्षाही मला गंमत वाटते ती आईची. दोघांची आई एकच; पण दोन पोटच्या गोळ्यांत ती एवढी तफावत दाखवते, ह्याचंच मला नवल वाटतं. कालचीच गोष्ट. कपडे दोघांचेही फाटत आले आहेत हे सत्य आहे; पण खरोखरच विश्वासला अष्टौप्रहर लोळण्यापलीकडे काम नसतं. मी मला पँट करायला टाकलेली समजताच आई विश्वासला म्हणत होती, ‘साहजिक आहे बाबा. तो मिळवता आहे. तू ऐदी आहेस. तुला कोण विचारतंय? त्याला बाहेर फिरायचं असतं, तेव्हा त्यालाच आधी कपडे हवेत. ते काही नाही. तू त्याच्या नाकावर टिच्चून एकदम लठ्ठ पगाराची नोकरी धर. चांगली गाडी घेशील तेव्हाच त्याला तोंड दाखवायला ये!’ असलं कान फुंकणारं बोलणं, तेही मला ऐकू येईल असं बोलायचं. विश्वासनं खरोखर गाडी घेतली तर त्यात मला दु:ख का आहे?..."
................................................................................................
"‘‘वा! छान आहे की मग! पाच पांडव झाले. वा वा! नाव सहदेव ठेवा!’’
"पुन्हा पहिल्याप्रमाणं वाजवीपेक्षा जास्त मोठ्यांदा हसत बोरकर म्हणतो,
"‘‘ Thanks for the suggestion.’’ पुन्हा हसणं, आणखीन हसणं. हसणंच! दीड वर्षांपूर्वी घरातली खळबळ शांत करण्यासाठी, काहीच अक्षम्य घडलं नाही हे दाखविण्यासाठी मीही असं हसायचं सोंग चालू ठेवलं होतं. आई मात्र वैतागानं म्हणत होती, ‘‘शर्थ झाली. पाचव्यांदाही मुलगीच. परक्याचं धन. म्हणायचं मात्र, ‘धनाची पेटी’. विश्वास, तू लग्न करशील ते पाठचे सगळे भाऊ असलेल्या मुलीशीच कर रे बाबा. मग ती मुलगी कशीही असो.’’ तेव्हा मात्र मी म्हणालो होतो, ‘‘अगं आई, अशी रागावतेस काय? पाचही मुलीच. पंचकन्या स्मरेनित्यम्. मस्तपैकी छोकरीचं नाव मंदोदरी ठेवू या!’’"
................................................................................................
"‘‘तुमची कोणतीच गोष्ट मला पसंत नाही. बघता तरी किती चमत्कारिक! चमत्कारिक म्हणजे जळून गेलेल्या घराकडे घरमालक बघतो तसं!’’ मी चिडून म्हणालो. मला वाटलं की बिनीवालेही चिडतील. काहीतरी करतील. हो, पिऊन आलेला माणूस. त्याचा काय नेम सांगावा? पण भलतंच झालं. बिनीवाले रडायला लागले. अगदी आवाज काढून रडता रडता म्हणतात,
"‘‘तुमचं खरं आहे. सगळं जळून गेलंय. मन, शरीर, घरदार, व्यवसाय, सगळं सगळं पेटलंय.’’ आणि न जेवताच ते बाहेर पडतात. जाताना पुन्हा पुन्हा म्हणतात, ‘‘सगळं पेटलंय. अदलाबदल झाली आहे, जागा चुकल्यागत. पान बदललं आहे.’’
"नवीन जेवायला आलेले व जेवण करून बाहेर आलेले सगळे गप्प-गप्प झाले. तेवढ्यात बिनीवाल्यांच्याच वयाचे व आमचे जुने मेंबर डॉ. रानडे म्हणाले, ‘‘काय नशीब असतं पाहा रामभाऊ, तीनशे-तीनशे माणसं जेवायला यायची. तुम्ही बसला आहात तेच टेबल. वीस वर्षांपूर्वी त्यांचं होतं हे बोर्डिंग. सदैव एक हात गल्ल्यात. नाण्यांचा आवाज करीत बोलायचं हेच व्यसन. काय रुबाब असायचा विचारू नका. आता सगळं गेलं. भारी भावनाप्रधान माणूस. दिलदार. सगळ्यांनी लुबाडलं. फसवलं. आता ही अवस्था आली आहे. सध्या माझे पेशंट आहेत. रोज सांगतोय, दारू सोडा म्हणून. ते म्हणतात, दारू प्यायलो तर जेवण जाईल. जिथे मालक म्हणून जात होतो तिथे मेंबर म्हणून जायचं ह्या दु:खाची कल्पना तुम्हाला कधीच यायची नाही. दुसरीकडे जात नाहीत.’’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 16, 2022 - September 16, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
९. सतीचं वाण

"‘‘पपा, मी तुम्हाला वचन देते की...’’
"‘‘मी ते वचन घेणार नाही, मी ते मागितलेलं नसताना. ते वचन पाळणं तुझ्या हातातच नाही. उत्कटतेतही जोपर्यंत बुद्धी जागृत आहे तोवर उत्कटता हे वरदान आहे. एरवी तो शाप आहे. शाप हा भोगूनच पार करावा लागतो. पराशराला साडेसातीचा शाप होता. तो क्षणमात्र का होईना चळला त्यातून महाभारत निर्माण झालं. तुझी-माझी तपश्चर्या तर त्याच्याएवढी नाही. म्हणून म्हणालो, की कलाकाराची प्रेयसी राहणं आणि त्याला मर्यादित थांबवणं हेही सतीचं वाण आहे. त्यालाही ताकद हवी. कलाकाराची पत्नी जशी त्यागी हवी तशीच त्याची प्रेयसी पण त्यागी हवी. तसं नसेल तर कलाकाराचा विदूषक होतो. एका नटसम्राटाचं मोठं उदाहरण आपल्याला माहीत आहे. प्रेयसी पण नि:स्वार्थी असेल तर त्याचा उत्कर्ष होईल.’’"
................................................................................................
"पण पुन्हा ह्या विषयावर चर्चा करायचं कारणच उरलं नाही. वैजनाथ नवं नाटक घेऊन दौर्यावर गेला आणि एके दिवशी अगदी अकल्पितपणे त्याच्या विवाहाची बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली.
"त्या बातमीवर वैशालीचा विश्वासच बसला नाही. आपल्याला न सांगता वैजनाथ परस्पर लग्न करील, हे कसं शक्य आहे? वास्तविक वैजनाथ आणि वैशाली ह्यांच्यात लग्नाविषयी चर्चा झाली नव्हती; पण एकमेकांच्या नजरा, एकमेकांना शब्दाच्या पलीकडचं सांगत होत्या. निर्हेतुक-सहेतुक घडलेल्या स्पर्शातून, शब्द व्यक्त करू शकणार नाही ते व्यक्त झालं होतं. आता केवळ शब्दबद्ध व्हायचं राह्यलं होतं. असं असताना वैजनाथनं असं का करावं? आपल्याला कमीतकमी विचारू का नये?"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 16, 2022 - September 17, 2022.

१०. का रे भुललासी

"गेले तीन-चार दिवस तो चमत्कारिक वागतोय हे त्यांनी पाह्यलं होतं. त्याच्या खिशात तीन-चार फोटो सापडले होते. विवस्त्र अवस्थेतल्या बायकांचे ते फोटो होते. अर्थात किशोरकुमारनी ती बाब बिलकुल मनावर घेतलेली नव्हती. इतर सामान्य घरातल्या मध्यमवर्गीय माणसाच्या मुलाच्या खिशात असे फोटो सापडले असते तर ती गोष्ट, घर डोक्यावर घेण्याइतपत गंभीर ठरली असती. दीपकच्या बाबतीत, ती वस्तू अत्यंत गौण होती. त्याच्या वयाच्या दहा-बारा वर्षांपासून तो असे फोटो म्हणा, चित्रं म्हणा, किंवा अपुर्या वस्त्रातल्या बायका पाहत आलेला होता. किशोरकुमारनी त्याला कोणत्याच बाबतीत मज्जाव केला नव्हता. न्यूड पोर्ट्रेट करताना ते दीपकला आवर्जून स्टुडिओत घेत असत.
"ह्या एका मुद्द्यावरून ते पुष्कळदा शारदाबरोबर भांडले होते. शारदाला त्यांचा हा दृष्टिकोन कधीच पटला नव्हता. शारदा बुद्धिमान स्त्री होती. काही वर्षं ती नर्स म्हणून नोकरी करीत होती. न्यूड पोर्ट्रेट्स करणारे किशोरकुमार आणि नर्सिंगची नोकरी करणारी शारदा त्या दोघांना नग्नतेचं नावीन्य, कुतूहल राहिलेलं नव्हतं. त्यात खास काही नसतं ह्याबद्दल त्यांचं दुमत नव्हतं - मतभेद नव्हता. मतभेद होता तो इथंच, की चित्रकाराच्या पेशापासून किशोरकुमारनी दीपकला दूर ठेवावं असं शारदाला वाटायचं आणि किशोरकुमारना वाटायचं की मुलानं आपली गादी पुढे चालवावी. त्याप्रमाणे त्यांनी दीपकला स्वत:बरोबर सगळीकडे न्यायला, दीपकच्या बालपणापासून सुरुवात केली होती. लहानपणापासून दीपकला प्रत्येक गोष्टीचा सराव व्हावा, स्त्री-पुरुष, लैंगिक जीवन, नग्नता – ह्याबद्दल विकृत स्वरूपात मुलाला काही कळण्यापेक्षा, निसर्ग त्याला खर्या अर्थानं, खर्या स्वरूपात समजावा ही किशोरकुमारांची इच्छा होती. त्या दिशेनं त्यांनी दीपकला हाताशी धरलं."
................................................................................................
" ... उपास हे त्याला ढोंग वाटत नव्हतं. देवपूजा हे थोतांड आहे असं तो मानत नव्हता. देवदर्शनासाठी तासन् तास रांगेत तिष्ठत उभी राहणारी माणसं, टेरिलिनच्या पँटमध्ये आहेत, का सोवळं नेसून उभी आहेत हे त्यानं फाजील चोखंदळपणे पाह्यलं नव्हतं. भक्ती ओळखण्याकडे त्याचा कल जास्त होता."
................................................................................................
"‘‘आत्ता नको. माझ्याएवढाच तूही या घटनेनं गोंधळून गेला आहेस. गोंधळलेल्या मन:स्थितीत जे बोलणं होतं त्याला चर्चा म्हणत नाहीत, काथ्याकूट म्हणतात. आपण रात्री भेटू.’’
"मनाचा मोठेपणा दाखवून मेघमाला निघून गेली. अर्थात तिचा हा मोठेपणा तिनं आजच प्रथम दाखवला नव्हता. पहिल्या भेटीपासून तिचं निराळेपण किशोरकुमारांना जाणवलं होतं. मेघमाला किती मोठी आहे, किती विशाल अंत:करणाची आहे, हे कुणाला तरी सांगायचं होतं. पण कुणाला सांगणार? सांगायचं ठरवलं तर फक्त शारदेला सांगावं असं किशोरकुमारना वाटायचं; पण ते कालत्रयी शक्य नव्हतं. एक पुरुष एका बाईची स्तुती करतो? ह्याचा अर्थ काय?
"ह्याचा अर्थ एकच, मामला सरळ नाही. सगळं जग असंच. स्त्री-पुरुषांबाबतीत एकच आडाखा बांधणारं. अन्य काही न जाणणारं. ह्याला अपवाद एकच. तोही पुन्हा मेघमालेचाच."
................................................................................................
" ... गरज ही एकच चीज जगात अशी आहे की, जी शहाण्यासुरत्या माणसाला मूर्खपणा करायला लावते, उद्दामाला वाकवते आणि आयुष्यभर भिऊन राहणार्या माणसाला एखाद्या क्षणी बेफाम बनवते.
"असाच कोणता तरी बदल विमलाबार्इंना पचनी पाडून घ्यावा लागला आणि नोकरीचं जू कुमारच्या कोवळ्या मानेवर ठेवलं गेल्याचं त्यांना पाहावं लागलं. नोकरी त्यातल्या त्यात बरी होती, गावातल्या गावात होती. शाळा, अभ्यास सांभाळून करता येण्यासारखी होती. पगार कल्पनेपेक्षा चांगला होता. कामाचे तास फक्त संध्याकाळचे होते. शाळेतून कुमारनं परस्पर कामावर जावं, तीन-साडेतीन तास झाल्यावर परतावं असं ठरलं होतं. कुमारला नोकरीला ठेवून घेणारा गृहस्थ डॉक्टर होता. डॉक्टर कशाचा तज्ज्ञ वगैरे बाबी तेव्हा विमलाबार्इंनी विचारल्या नव्हत्या. ... "
................................................................................................
"‘‘तुला तुझ्या आईची जेवढी ओळख आहे तेवढी वडिलांची ओळख होती?’’
"प्रश्नाचा रोख कुमारला समजला.
"‘‘म्हणजे वडील?’’
"‘‘होय. दुर्दैवाने ती गोष्ट खरी आहे. ही वॉज माय पेशंट, बट फॉर सम डेज ओन्ली.’’
"‘‘त्यांच्यापायी आईला...’’
"‘‘यू हॅव अंडरस्टुड इट. म्हणूनच सांगतो, डोंट मिसअंडरस्टँड युवर मदर. शी इज जस्ट अॅन अनलकी लेडी.’’"
................................................................................................
"डॉ. कुर्तकोटींच्या बरोबर कुमार आईला घेऊन मुंबईला आला. डॉक्टरांच्याच ओळखीने के.ई.एम. मध्ये पटकन प्रवेश मिळाला. पण एकूणच फार उशीर झाला होता. के.ई.एम. मध्ये प्रवेश मिळाल्यावर पंधराच दिवसांनी विमलाबार्इंनी ह्या जगाचा निरोप घेतला."
................................................................................................
"‘‘खोटं का मानायचं पण? जे पंचेंद्रियांना जातायेता, प्रत्येक क्षणी जाणवतं ते खोटं असेलच कसं?’’
"‘‘ते फार क्षणभंगुर आहे.’’
"‘‘हे कबूल. त्याचं आयुष्य छोटं आहे म्हण. पण खोटं म्हणू नकोस. अशाश्वत असेल पण खोटं नाही.’’"
................................................................................................
"‘‘काहीही म्हण. मी आहे हा असा आहे. शारदानं एक नाही, दोन नाही, सतत पाच वर्षं संसाराची चित्रं माझ्या सान्निध्याच्या कल्पनेत रंगविली. तिचा संसार तिनं पाच वर्षांपूर्वीच सुरू केला. त्याचा उच्चार मात्र आठ दिवसांपूर्वी केला. तू म्हणतोस, त्याप्रमाणे खरोखरच मी जमिनीवर नसतो. जमिनीवर नसतो ह्याचा अर्थ आकाशात असतो, असं मात्र नाही. खरं म्हणजे मी कुठं असतो हे मलाच सांगता नाही येणार. मी माझा नसतो एवढं नक्की. स्वप्न आणि सत्य ह्यांमधल्या सीमारेषा कधीच पुसल्या गेल्या आहेत. म्हणूनच शारदेचा आनंद आपण नष्ट करावा असं वाटेना. ज्या माणसाला भूकच नाही, अन्नावर वासनाच नाही, त्याला पंगतीमधलं कुठलंही पान चालतं.’’"
................................................................................................
"किशोरकुमारना किशोरनं अशा शंका घ्याव्यात ह्याचं नवल वाटलं नाही. मात्र त्याच्या त्या शंका तंतोतंत खर्या ठरल्या, ह्याचं नवल वाटलं.
"शारदाचं आणि त्याचं कधीच पटलं नाही. जिच्या विचारसरणीवर, जिवंत आणि खळखळत्या स्वभावावर आपण खूश झालो, तो तिचा स्वभाव लग्नानंतर एवढा बदलेल ह्याची त्यांना कल्पना नव्हती. किडकिडीत, हडकुळ्या मुलांच्याऐवजी गुटगुटीत मुलांनाच पोलिओ चटकन होऊ शकतो म्हणतात, त्याप्रमाणेच शारदाचं झालं. चांगल्या झाडावर एखादं बांडगूळ यावं आणि मग तेच जास्त फोफावून जावं, त्यात मूळ झाडाचा बळी जावा तसं शारदेच्या बाबतीत प्रत्ययाला आलं. तिचा हसता बोलता स्वभाव, बुद्धिवादीपणा ह्यावर संशयाचं बांडगूळ उगवलं आणि त्यानं केवळ शारदेचा घास घेतला नाही तर किशोरकुमारांच्या अख्ख्या संसाराचा!"
................................................................................................
"‘‘तुझ्या आध्यात्माच्या, विरक्तीच्या, वैराग्याच्या गोळ्या जशा दीपकला पचल्या नाहीत तशाच त्या मानसोपचारवाल्याच्या गोळ्यापण पचणार नाहीत.’’
"‘‘मग?’’
"‘‘काही नाही. सगळं उत्तम होईल. हे सातारा नाही आणि वीस-पंचवीस वर्षांपूर्वीचा हा काळही नाही. जग बदलतं आहे. तू झालास बैरागी. तुला तसे सगळेच दिवस सारखे. पूर्वी गुप्तरोगावरचे इलाजही गुप्तपणे चालायचे. आता तसल्या डॉक्टरांच्या राजरोसपणे पाट्या लागल्या आहेत. एखादा उत्तम डॉक्टर गाठ. दीपक ठीक होईल. त्याला अशी व्याधी होणं ही इष्टापत्ती समज.’’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 17, 2022 - September 18, 2022.

September 16, 2022 - September 18, 2022.
Purchased September 16, 2022.
Publisher: MEHTA PUBLISHING HOUSE
(1 January 1997)
Language: Marathi
ASIN:- B01N3ZW6D9
................................................
................................................
https://www.goodreads.com/review/show/4989003355