Thursday, September 15, 2022

Karmachari कर्मचारी (Marathi), by वपु काळे V.P. KALE.

................................................................................................

Karmachari (Marathi)
कर्मचारी 
by वपु काळे
V.P. KALE

Having just finished two of later - and rather ambitious -works of Kale, it's a relief to find this relatively earlier work, with his genre of expertise at close to its best. 

Last story of the collection one recalls having read, decades ago, but only because of the description of blue shine in the simple girl's hair! 
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
अनुक्रम 

अनामिक 
पंतवैद्य 
जठार 
गोखले 
देवस्थळी 
जोशी 
खांबेटे 
श्रीधर 
सातवळेकर 
कल्पना 
कारखानीस 
वंदना सामंत

REVIEW 

"दोन माणसांचं बोलणं तिसऱ्याने ऐकू नये असं म्हणतात. सभ्य म्हणवणाऱ्या माणसाने हा संकेत पाळायचा असतो. एकदम मान्य! कारण मी सभ्य आहे. पण ती दोन माणसं, भर गर्दीत, खेचाखेचीत लोकलमध्ये उभं राहून मोठमोठ्यांदा बोलत असतील तर? कानांत बोटं घालावीत तर कानात बोटं घालण्यासाठीही हात हलवता येत नाही, एवढी गर्दी असते. अतिशयोक्ती नाही, पण आपला हात आपल्याच कानात कशावरून जाईल एवढ्या गर्दीत?"
................................................................................................

"“अरे, मी ऑफिसला जाण्याच्या गडबडीत. हीच गाडी रोज पकडावी लागते. ही चुकली की चुकली. तेव्हा घाईघाईत कपाट उघडलं. हँगरचा शर्ट काढत-काढता चिरंजीव कपाटापाशी कधी आले, कळलंही नाही. भसकन् त्याने हात घातला तो कॅमेऱ्यालाच. मी ‘थांब थांब’ म्हणेपर्यंत त्याने उचललाच. तेवढ्यात आमच्या बाईसाहेब ओरडल्या त्याच्या अंगावर. त्या भीतीनेच त्याने कॅमेरा सोडला हातातून.” 

"“बरं मग?” ऐकणाऱ्याने विचारलं. 

"“मग काय? त्याचं लेन्स सरकलं. रोलीकॉर्ड कॅमेरा. आता नुसतं लेन्स सेट करून द्यायचे पस्तीस रूपये सांगतात. अनपेक्षित खड्डा आला की नाही ह्या महिन्यात?”"
................................................................................................

"“तुमच्यासारखाच प्रकार घडला माझ्या घरी.” 

"“कोणता कॅमेरा?” 

"“रोलीफ्लेक्स.”"

"“कॅमेऱ्याचं लेन्स संपूर्ण निकामी झालंय. टोटली आऊट ऑफ ऑर्डर. बिऑण्ड रिपेअर्स!” 

"“मग आता?” 

"“आता इम्पोर्ट करावं लागेल. दोनशे -तीनशे, जे काय सांगतील तेवढ्याची तयारी ठेवायची. माझी पण तेवढी ऐपत नाही तुम्ही दोन-तीन महिन्यांत तरी कॅमेरा दुरुस्त करून वापरू शकाल. मला वर्षभर थांबावं लागेल कमीत कमी. म्हणून म्हणालो, तुम्ही भाग्यवान आहात.”"
................................................................................................

"“मागे एकदा रोलीफ्लेक्स कॅमेऱ्याबद्दल तुम्ही हेच सांगितलंत. त्यानंतर पाकीट मारलं गेल्यावर तुम्ही स्वत:च्या चोरीबद्दल बोललात. साडेतीनशे रुपये, नागपूरची तिकिटं, आठवतं का? आणि आज आता मुलाचा आजार. तुम्ही सरळ सरळ ह्या थापा मारता असं माझं मत आहे.” 

"—माझं बोलणं संपताच शेकहॅण्ड करण्यासाठी हात पुढे करीत तो म्हणाला, 

"“You are absolutely right. ते तीनही प्रकार तुम्ही एकले होते तर ? That’s good!”"
................................................................................................

"“ते समाधान मी देतो. मी त्या सगळया थापा मारतो ही फॅक्ट आहे. मला काही कमी नाही. माझ्या दाराशी आज चार मोटारी आहेत. मरीन लाइन्सवर दोन इमारती आहेत.”"
................................................................................................

"“Don’t try to expose me.” 

"बोलता-बोलता आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो. खरोखरच त्याची इम्पाला गाडी बाहेर उभी होती. अंगावरच्या सामान्य कपड्यांसह त्या आलिशान गाडीत बसून तो निघून गेला आणि मी तसाच उभा राहिलो."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................

September 14, 2022 - September 15, 2022. 

"गाडी हलते आणि त्याच क्षणी काही सतावणाऱ्या प्रश्नांपैकी एक प्रश्न समोर उभा असतो. एखादी वयस्कर व्यक्ती, हातात दोन तीन पिशव्या घेऊन उभी असते. शेवटच्या क्षणी त्याने गाडी पकडलेली असते. रिझर्वेशनचा डबा आहे हे त्याला माहीतही नसतं किंवा नक्की माहीत असतं. तो आपल्याला सरकून घेण्याची विनंती करतो. अशीच जागा मिळवायची हे त्याने पहिल्यापासूनच ठरवलेलं असतं. 

"पहिला विचार मनात येतो तो रिझर्वेशनच्या रांगेत आपण चार तास घालवले ह्याचा. हे टिकोजीराव असले श्रम न करता, शेवटच्या क्षणी म्हणतात, ‘जरा सरकून घ्या’."
................................................................................................

"प्रत्येक पुरुषाच्या बायकोला असं वाटतं की आपण फार सहनशील, साध्या, भोळ्या, मूकपणाने संसारातले फटके खाणाऱ्या आहोत आणि आपला नवरा एकदम इब्लीस आहे. त्याला जहांबाज बायको मिळणं फार जरुरीचं होतं. वास्तविक प्रत्येक बाई स्वतःच्या नवऱ्याशी यथास्थित खंबीरपणाने, सावधगिरीने संसार करीत असते. तरीही दुसरी बाई तिला फटकळ वाटते, नवऱ्याचा मान न सांभाळणारी दिसते आणि तिला वाटतं, की अशी बाई आपल्या नवऱ्याला मिळायला हवी होती."
................................................................................................

"“बावळट ठरल्यामुळे कोणतंही महत्त्वाचं, दगदगीचं काम आपल्याला कुणी सांगत नाही. घरी बायको पण सांगत नाही आणि ऑफिसात साहेब पण सांगत नाही.” 

"“थोडसं खरं असेल हे, पण तुम्हाला मग प्रमोशन्स कशी मिळणार ?” 

"माझी कीव करत पंतवैद्य म्हणाले, 

"“ही सरकारी नोकरी आहे हे विसरलात. प्रमोशन वगैरे सगळं व्यवस्थित मिळेल. ऑफिस सुपरिटेंडेंट झाल्याशिवाय मी रिटायर्ड होत नाही, एवढं नक्की! काम न करता हे घडू शकतं. सरकारी नोकरीत माणूस लायक आहे की नाही ह्यापेक्षा तो नालायक आहे की नाही हे ठरवायला जास्त वेळ लागतो. नालायक ठरेपर्यंत आपण पर्मनंट होऊन मॅक्झिममला पोहोचतो. तेव्हा ऑफिसात वांधे नाहीत.”"
................................................................................................

"“कधी रागवत नाही?” 

"“रागावते हो! तीही माणूसच आहे. पण मला एक सांगा, हुशार, स्मार्ट, कर्तबगार नवऱ्याच्या बायका नाही चिडत? उलट जास्त चिडतात.” 

"“का?” 

"“नवरा जास्त हुशार असला की तिच्या अपेक्षा वाढतात. अपेक्षा वाढल्या की संघर्ष वाढला. हुशार नवऱ्याला स्वतःची मतं असतात. ती बायकोला कधीच आवडत नाहीत. संसारात नवऱ्याने स्वतःचं मत सोडून बाकी सगळं बायकांना द्यावं ही त्यांची अपेक्षा असते.”"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 15, 2022 - September 15, 2022. 

"निरनिराळ्या उंटांनी सदाशिवला हे असं निर्वासित केलं. त्याचा एक लांबचा चुलता, सख्खा नव्हे – लांबचा, तोच त्याच्या एवढ्या संसारात ठाण मांडून राहिला. तो नुसता राहिला नाही तर आजारी पडून राहिला. त्यात खरं तर चुलत्याची चूक नव्हती. चुलत्याला उंट म्हणता येणार नाही. त्या चुलत्याच्या मुलाने दोनच दिवसांच्या बोलीवर तंबूत प्रवेश केला. चुलत्याची प्रकृती मुंबईतल्या नामांकित डॉक्टरांना दाखवायला म्हणून ते मुंबईत आले. प्राथमिक तपासणी झाली. औषधं लिहून देण्यात आली आणि एकाएकी गावाहून तार आली म्हणून मुलगा गावी गेला. दोन दिवसांत पुन्हा येतो असं सांगून. चुलते इकडे आजारी पडले. सदाशिव पत्रं पाठवून, तारा करून थकला. तो मुलगा परतलाच नाही. स्वतःच्या वडिलांना आपल्या गळयात बांधून मुलगा पसार झालाय हे सदाशिवने ओळखलं. तीन महिन्यांनी चुलत्याला निरोप द्यावा लागला तो चार माणसांच्या खांद्यावरून."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 15, 2022 - September 15, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
गोखले 
................................................................................................
................................................................................................

"एवढं बोलतो न बोलता तोच दारावर धक्के बसले. बायकोने कोण विचारताच बाहेरून उत्तर आलं, 

"“मी पोलिस इन्स्पेक्टर. कुलकर्णी आहेत का?”"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 15, 2022 - September 15, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
देवस्थळी 
................................................................................................
................................................................................................

"देवयानी दोन वर्षांची झाली. 

"जयंत देवस्थळी त्याच्या ऑफिसचा ब्रँच मॅनेजर झाला. 

"दर शनिवारी ऑफिस सुटण्यापूर्वी त्याचा शोफर देवयानीला घेऊन ऑफिसात यायचा. तिच्या येण्याने, दुपारी दोन वाजता सुटणारं ऑफिस एक वाजताच सुटल्यासारखं वाटायचं. देवयानी एखाद्या राजकन्येप्रमाणे ऑफिसात यायची. पपांची केबिन कुठे आहे, हे तिला पाठ झालेलं होतं. स्टाफने मारलेल्या हाका ऐकूच आल्या नाहीत अशा थाटात ती केबिनकडे चालत राहायची. कुणी पकडण्याचा अभिनय केला की ती भिऊन पळू लागायची. तिच्या पायातल्या इवल्याशा बुटांचा मोठा आवाज व्हायचा. तिचे छोटे-छोटे गोरेगोरे पाय, त्याच्यावरचे छोटेसे मोजे….हे सगळं पाहताना स्टाफचं भान हरपून जायचं."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 15, 2022 - September 15, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
जोशी 
................................................................................................
................................................................................................

"“हे वाचा. सरकारने आम्हाला यंदा जे.पी. केलं. जस्टिस ऑफ पीस. आता सांगा, भांडायचं कसं?”"

" ... खरं तर मी त्याच्याकडे न जाणं योग्य होतं. पण तरी मी प्रयत्न करीत राहिलो. सुषमावहिनी, राजेश-मुकेश आम्हाला सोडायला-विसरायला जाम तयार नव्हते. चौघांपैकी घरातल्या मुख्य व्यक्तीने न बोलणं आणि इतरांनी जीव टाकणं, हे त्रांगडं झालं होतं. असला चमत्कारिक ताण माझ्या मनाविरुद्ध माझ्यावर लादला जात होता. त्यातून सुटण्याचा आपल्याकडून प्रामाणिक प्रयत्न करणं एवढंच माझ्या हातात होतं आणि तो करण्यात मी कसर करत नव्हतो की कमीपणा मानत नव्हतो."
................................................................................................

"“तांबेला भेटायला देऊ नका, असं म्हणाला तो.” 

"“भातखंडे…” 

"“It was his last desire.” 

"“पण मी असं काय केलं होतं?” 

"भातखंडेने उत्तर दिलं नाही. खांद्यावर हात पडला. पाठोपाठ शब्द आले, 

"“मिस्टर तांबे, मी तरी असं काय केलं होतं?” 

"तो सुषमावहिनींचा भाऊ असावा. असावा नव्हे, होताच. चेहऱ्यातलं साम्यच होतं ते…"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 15, 2022 - September 15, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
श्रीधर 
................................................................................................
................................................................................................

"“काल ललिता गावाला गेली, मी स्टेशनवर गेलो होतो. ती रडत होती. मी समजूत काढत होतो. तेव्हा आमच्या मेव्हणीने तो प्रकार पाहिला. आणि बिथरलं सगळं.” 

"“लगेच तिने घरी जाऊन काडी लावली.” “

"अगदी लगेच. तेव्हापासून बायकोने आकाशपाताळ एक केलंय. दोन-तीन दिवस मी चांगल्या मनःस्थितीत नव्हतोच. त्यात ह्या गोष्टीची भर पडली. सुतावरून बायका केव्हाच स्वर्गाला जातात आणि आपल्या नाकाशी सूत धरण्याची पाळी आणतात.”"
................................................................................................

"ललितेच्या पत्राला श्रीधर अफूची गोळी म्हणायचा. पत्रातली नशा ती हळूहळू तीव्र होत गेली. श्रीधरचा स्वतःवरचा ताबा हळूहळू सुटत होता. ललितेचं पत्र आलं म्हणजे तो जास्तच उधळल्यासारखा वागायचा. मला पत्र दाखवणं त्याने बंद केलं होतं आजकाल. शेवटी मी धाडस करून ड्रॉवरमधील पत्र काढून चोरून वाचलं आणि खरोखरच ठिणगीतून केवढा प्रचंड वणवा पेटला होता ह्याची मला कल्पना आली. त्या पत्रात श्रीधरला सरळ सरळ सल्ला होता घर सोडण्याचा. ललिता तिचं घर सोडणार होती. श्रीधर व ती एकत्र येणार होती आणि दोन संसारांच्या चितांवर ह्यांचा तिसरा संसार उभा राहायचा होता."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 15, 2022 - September 15, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
सातवळेकर 
................................................................................................
................................................................................................

"सगळया जगातले कागद रातोरात नष्ट व्हावेत. 

"मजा येईल. ह्या ऑफिसात जास्त मोकळी हवा येईल. खिडकीतून जरा आकाश दिसेल. फायली ठेवायला जागा नाही म्हणून आठांपैकी तीन खिडक्या बंद करून तिथं फायली रचल्या आहेत. गेल्या अकरा वर्षांत त्यातली एकही फाइल उघडण्याची वेळ आली नाही. तरी त्या जपायच्या आहेत. आकाश नाही दिसलं तर काय बिघडतं? –असा साहेबांचा सवाल."
................................................................................................

"सातवळेकर चहा घेऊन माझा निरोप आणि ‘कंटाळा’ घेऊन गेला. त्याचे पांढरेशुभ्र दात आणि खळ्या मागे रेंगाळत राहिल्या. 

"गुरुवारी मी कामावर आलो तर ऑफिस निराळंच दिसायला लागलं. एकदा विचारांच्या तंद्रीत पाचव्या मजल्याऐवजी मी चौथ्या मजल्यावरच उतरलो होतो. तेव्हा सगळं असंच निराळं, निराळं वाटत राहिलं. म्हणजे निराळं होतंच ते तीच चूक पुन्हा झाली असणार असं वाटून मी जाणार तोच नेहमीचा शिपाई दिसला. त्यावरून आपण मजला चुकलो नाही ह्याची खात्री पटली. 

"“साहेब, आता झ्याक् वाटतं की नाय?” 

"“निराळं वाटतंय. कशामुळं?” 

"“नव्या साहेबांनी खिडकी उघडली ही.”"
................................................................................................

"रिवाजाप्रमाणे अकरा वाजता चहा आला. सातवळेकरने चहा घेतला नाही. तांब्यांसहित सगळ्यांचा चहा झाला आणि पाचच मिनिटांनी सातवळेकरचा चहा, झकासपैकी स्पेशल ट्रेमधून आला. युनिफॉर्ममधल्या वेटरला पाहून तो चहा बाहेरच्या हॉटेलातून मागवलाय हे लक्षात आलं. 

"तांबे जळजळत्या नजरेने सातवळेकरकडे पाहत होते. राग चहाचा नव्हता. हाताखालचा माणूस, ट्रेमधून चहा पितो, ह्याचा राग होता. अडवणार कुठं?"
................................................................................................

"“उद्या मला सांगितल्याशिवाय जायचं नाही. तू ऑफिसची ड्यूटी कर. लोकांची खाजगी कामं करायची नाहीत.” 

"आपण काहीतरी चक्रव्यूहासारखा पेच टाकला अशा आनंदात तांबे होते. पण दुसऱ्या दिवशी आपोआपच चहा आला. सातवळेकर हॉटेलात काम करणाऱ्या वेटरला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स देऊ शकत नव्हता काय?"
................................................................................................

"सातवळेकरने तांब्यांना जिंकलं. चहाच ट्रे मागवून नाही तर काम करून. ... फाइल दुरुस्तीसाठी परत सातवळेकरकडे पाठवण्याची संधी डोळ्यांत तेल घालून तांब्यांनी शोधली, पण ते जिंकले नाहीत. एक - दोन प्रसंगी तर केवळ सातवळेकरच्या नीटनेटकेपणामुळे तांबे बचावले, नाहीतर ऑफिसच्या बड्या बड्या धेंडांच्या राजकारणात तांब्यांची मान नुसतीच सापडली नसती तर फिरकीच्या तांब्यासारखी कुणीतरी साफ फिरवून टाकली असती."
................................................................................................

"“तुम्हाला कोल्हापुरी चप्पल माहीत आहे ना?” 

"“मी वापरतोय ती.” 

"“तिचा अंगठा तुटला की काय राहतं? आपण तरीही पाय घासत चालतोच. वाट संपवतोच. पण त्याला काय चालणं म्हणतात का?” 

"सातवळेकरने मला निरुत्तर केलं."
................................................................................................

"“ह्यात काही अर्थ आहे का पण? जेवायला वाढतानाची गोष्ट घ्या, वाढताना सांडणारच.” 

"“ह्याच विधानात दुःख आहे. डिंकाची बाटली फुटायचीच, वाढताना सांडणारच, हे सगळं तुम्ही लोकांनी इतकं गृहीत धरलं आहे की त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही. गुरुत्वाकर्षणाप्रमाणे झाडावरचं फळ खालीच पडणार हे जसं स्वाभाविक, तशा माणसाच्या सवयी तुम्ही स्वाभाविक मानता. हेच मला नेमकं मान्य नाही. दहा-दहा वर्षं स्वयंपाकघरात घालवल्यावर एवढं स्किल अंगात यायलाच हवं.” 

"“मान्य आहे, पण हे फार किरकोळ आहे. ह्याने आपलं संपूर्ण वैवाहिक जीवन बरबाद व्हावं– इतकं ते महत्त्वाचं आहे का?” 

"“दुःख वृत्तीचं आहे. सांडलं तर बिघडलं काय? –असाच ह्यांचा युक्तिवाद असतो. अशा पार्टनरला हाताशी धरून, पर्वत पार करायचा आहे.”"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 15, 2022 - September 15, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
कल्पना 
................................................................................................
................................................................................................

" ... ते स्वप्न तिला जपायचं होतं. त्यासाठी आणखीन बारा वर्षं व्यवहार तिला थांबायला लावणार होता. आणखीन बारा वर्षांनंतर हे स्वप्नं पुरं करण्यात आनंद उरेल का ही भीती ग्रासून टाकत होती. पण त्यावर काही उपाय नव्हता. कधीतरी जपलेली स्वप्नं न फुलता तशीच जळून गेली ह्याचं केवळ दुःखच तेव्हा राहिलेलं असेल. कुणी सांगावं, आज दुःख व्यक्त करणारे हे अश्रू आणखीन बारा वर्षांच्या रुक्ष व्यवहारात, नोकरीच्या दुष्ट चाकोरीत कायमचे विरून जातील आणि अश्रूंचं समाधान पण उरणार नाही. आपला आपल्यालाच मग प्रश्न पडेल, की आपण एवढ्या रुक्ष होतो का?"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 15, 2022 - September 15, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
कारखानीस 
................................................................................................
................................................................................................

"कारखानीस जरा उतरलेल्या आवाजात म्हणाले. “आज फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय.” 

"“कोणत्या?” 

""माझ्या ह्या स्वभावापायी मी त्याला मुक्तपणे जगून दिलं नाही. लहान वयात पण नाही आणि तरुणपणी नाही. लहानपणी मी त्याला पतंग उडवू दिला नाही. त्या नादात तो गच्चीतून खाली रस्त्यावर पडेल ह्या भीतीपायी. त्याला अनेक गोष्टींचा नाद होता, वेड होतं. बेभान होण्याचा त्याचा स्थायी स्वभाव होता. आणि मी फाजील जागरूक होतो. त्यापेक्षा वाईट वाटतं ते ह्याचं की, निःसंकोचपणे मी त्याच्यावर प्रेम केलं नाही. वात्सल्यातला आनंद लुटला नाही, स्पर्श केला नाही. त्याच्या गोबऱ्या गोबऱ्या गालांचा मुका घेताना पण आत कुठंतरी सल असायचा की माझ्या आयुष्यातला ह्याचा मुका घेण्याचा हा अखेरचा तर आनंद नसेल ना? पण आता संपल्या सगळया विवंचना, शंकाकुशंका संपल्या. आता शांत वाटतंय.”"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 15, 2022 - September 15, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
वंदना सामंत
................................................................................................
................................................................................................

"शिवा बदलला ह्याला कारण वंदना सामंत!"
................................................................................................

"साहेबांचं लक्ष जेव्हा वंदना सामंतकडे वळलं तेव्हा मात्र मी अस्वस्थ झालो. 

"केबिनबाहेर बसणारा शिवा पण चमकला. तो तुम्हा सर्वांना ओळखून होता. तुम्ही बसल्या जागी हात चोळत बसणारे मर्द आहात ह्यात शिवाला संदेह नव्हता."
................................................................................................

"शेवटी एकच उपाय म्हणून साहेबांनी वंदनाला स्वतंत्र केबिन दिली. 

"ही केबिन साहजिकच साहेबांच्या केबिनला चिकटून होती. वंदनाच्या केबिनमधून साहेबांच्या केबिनमध्ये जाण्याची स्वतंत्र सोय होती. 

"हेडक्लार्कला केबिन नाही आणि साध्या, तेही नवीन आलेल्या क्लार्कला मात्र केबिन ह्या आरोपापासून सुटण्यासाठी वंदना सामंत साहेबांची पर्सनल असिस्टंटच झाली. पत वाढली. पगार वाढला. ऑफिसची जबाबदारी त्या मानाने कमी वाढली, पण अवांतर गोष्टी वाढल्या. 

"नातं वाढलं. 

"घसट वाढली. 

"चर्चा वाढल्या. कानगोष्टी वाढल्या. 

"कुजबूज वाढली. 

"चिठ्ठ्या तर वाढल्याच वाढल्या. 

"वंदना सामंतचा मनस्ताप वाढला. चक्रव्यूह वाढला. 

"पेच वाढले. 

"लिफ्ट देताना मग साहेबांनी विचारलं, 

"“मिसेस् सामंत, चिठ्ठ्यांचं प्रमाण कमी झालं की नाही?” 

"“मुळीच नाही.”"
................................................................................................

"‘शिवा, तू असं कर. तू आता घरी जा. आणि तासा-दीड तासाने साहेबांच्या घराखाली येऊन थांब. मी साहेबांना आता माझ्या घरी घेऊन जाते.” 

"शिवा बरं म्हणून खाली उतरला. 

"पण तिथून तो घरी गेला नाही. तिथंच एका बाजूला उभा राहिला. ह्याचं मुख्य कारण म्हणजे फूटपाथावर उभा असलेला गृहस्थ वंदना सामंतकडे टक लावून पाहत उभा होता. 

"त्या माणसाकडे आणि वंदनाकडे पाहत शिवा तिथंच थांबला."
................................................................................................

"कुलकर्णी, आता हे नाकारण्यात अर्थ नाही. 

"तुमच्या आजारी मुलाला कडेवर घेऊन तुम्ही ते पाहिलंत. 

"तुमच्या आजारी मुलाला कडेवर घेऊन तुम्ही त्याच वेळी तिथून चालला होतात. तुमचे शब्द आहेत ते. तुम्ही म्हणालात, 

"“अहो, चक्क एकमेकांना मिठी मारून बसले होते.” 

"कुलकर्णी कानांवर हात ठेवू नका. आजारी पोराची शपथ घ्यायला तुम्ही कचरला नाहीत."
................................................................................................

"फूटपाथवर तिच्याकडे टक लावून पाहत उभा असलेला गृहस्थ म्हणजे प्रत्यक्ष तिचे मिस्टर होते. अख्खा दिवस वंदनाने केबिन सोडली नाही. साहेबांनी पण तिला बोलावलं नाही. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर पण सुन्न मनाने वंदना जाग्यावर बसून होती. नंतर साहेबच तिच्या केबिनमध्ये गेले."
................................................................................................

"“माझा एक अंदाज आहे. हा ब्लॅकमेलिंगचा प्रकारसुद्धा असण्याची शक्यता आहे. उद्या टेबलावर पाच रुपयांची नोट ठेवून बघा. ती जर नाहीशी झाली तर आपोआप उलगडा होईल. पैशाच्या मोहाने तो प्राणी केव्हातरी सापडेल.” 

"साहेबांचा हा अंदाज खरा ठरला. 

"पाच रुपयांची नोट गायब झाली. 

"आणि मग चिठ्ठ्यांचा आणि पैशाचा रतीब सुरू झाला. 

"साहेबांचे जवळजवळ पाचशे रुपये कमी झाले पण चिठ्ठ्या थांबेनात."
................................................................................................

"मिसेस् वंदना सामंतांचा नखरा वाढला. 

"गालावरचा नैसर्गिक गुलाबी गोरेपणा जाऊन आता कळत-नकळत मॅक्सफॅक्टरखाली अकारण लपायला लागला. 

"ओठांना लिपस्टिकचा आधार वाटू लागला. 

"मऊ मुलायम, काळेभोर केस, पूर्वी तेलाचा हलका हात फिरायचा त्यामुळे केस चमकायचे. त्यावर कळत नकळत निळसर झाक मारायची. नागिणीची उपमा शोभायची. आता फॅशनच्या नावाखाली केस कोरडे राहू लागे. अधूनमधून भरभरीत व्हायला लागले. स्टाइल म्हणून त्यांचा गुंता होऊ लागला. पूर्वी ज्याला ‘जटा’ म्हणत त्याला आता बटा नाव आलं. आणि ज्या खऱ्या ‘बटा’ होत्या, त्यांना कात्री लागली. डोळ्यांना साधं काजळ पुरेनासं झालं. डोळ्यांतूनच चष्म्याच्या काड्या बाहेर याव्यात त्याप्रमाणे डोळ्यांच्या कोपऱ्यातून काळ्या रेषांची टोकं बाहेर येऊ लागली. मूळचे लालचुटूक ओठ आता फिक्कट करण्यात येऊ लागले. 

"ठसठशीत तांबड्या रंगाची टिकली हा मागासलेपणा वाटू लागला. 

"कुंकवाचे रंग बदलायला लागले. 

"ब्रेसियरचा मेक बदलला. मेडनफॉर्मवर येऊन तो थांबला. सर्वांगाने बढती होऊ लागली. मेडनफॉर्म केवळ बघणाऱ्यांच्या नजरांना अस्वस्थ करत नव्हता तर अंगावर खेळणाऱ्या पदराला पण अस्वस्थ करू लागला असावा. 

"कारण पुढे येणाऱ्या शर्यतीत पदर हरला आणि– 

"छातीवर राहण्याची त्याची छाती होईना. 

"इकडे पगार वाढत होता आणि तिकडे अंगावरच्या कपड्यांची बचत वाढत होती. 

"आणि ऑफिसात एके दिवशी बॉम्बस्फोट करणारी बातमी थडकली, 

"वंदना सामंत नवऱ्याला सोडून घाणेकरसाहेबांकडे राहायला गेली. 

"राजरोसपणे."
................................................................................................

"त्याच दिवशी वंदनाच्या टेबलावर शेवटची चिठ्ठी येऊन पडली. 

"ती चिठ्ठी नव्हती. ते एक लांबलचक पत्र होतं आणि त्या पत्राबरोबर जवळजवळ पाचशे रुपये पण होते. 

"म्हणजे ते ब्लॅकमेल नव्हतं तर! 

"नव्हतंच! 

"कारण त्याच दिवशी संध्याकाळी शिवा घरी आला. 

"आला तो मुळी भांडणाच्या पावित्र्यात. 

"मला तो म्हणाला, 

"“वंदनाचं घर मोडलं. आता तुमचा जीव थंड झाला असेल.”"
................................................................................................

"“आपण ह्यावर काय करणार सहस्त्रबुद्धे?” 

"“काही नाही. तुम्ही लेखक लोक शांतपणे गोष्टी वॉच करता. तुम्हाला आज आमच्यापेक्षा समाजात जास्त मान्यता आहे. वंदनासारख्या भाबड्या, निष्पाप पोरीला तुम्ही का नाही वाचवलंत? मला राहवत नव्हतं. साहेबाचा नीचपणा मी जाणून होतो. ह्याच मार्गाने त्याने किती पोरी नासवल्या हे मी तुम्हाला सांगितलं होतं. चिठ्ठ्या ठेवायचं, लिहिण्याचं सगळं काम बिनबोभाटपणे मी करीत होतो. डुलक्या घेण्याचं नाटक करीत, त्यांचा शब्द न् शब्द ऐकत होतो. तुम्ही थोडासा सपोर्ट द्यायला हवा होतात. ती पोरगी वाचली असती.” 

"“तुम्हाला सहस्त्रबुद्धे वाटतंय नुसतं. ‘तुम्हा लेखक लोकांचे हे सगळे कल्पनेचे खेळ आहेत’ असं वंदना म्हणाली असती तर काय राहिलं असतं? तुम्ही पहिली चिठ्ठी ठेवलीत तेव्हा तिने माझाच संशय घेतला. हस्तलिखित वाचायचं निमित्त करून तिने माझंच हस्ताक्षर ताडून पाहिलं. जे घडणार ते घडून जातं. तुम्ही कमी प्रयत्न केलेत का?” 

"सहस्त्रबुद्धे उर्फ शिवा खूप खूप चरफडला, चिडला, अस्वस्थ झाला आणि शेवटी तटस्थ झाला. 

"हल्ली तो कुणाशी बोलत नाही, चालत नाही."
................................................................................................

................................................................................................

................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 15, 2022 - September 15, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
Karmachari (Marathi)
V.P. KALE
................................................
................................................
September 14, 2022 - September 15, 2022. 
Purchased September 14, 2022. 

Publisher: MEHTA PUBLISHING HOUSE 
(1 January 1973)
Language: Marathi

ASIN:- B01N7JTWET
................................................
................................................
कर्मचारी 
by वपु काळे
................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4986881733