................................................................................................

Ghar Haravleli Manasa (Marathi)
by V.P. KALE (Author)

Unbelievable.
Which is not to say that author has lost credibility.

In short, the collection is about deformation humans undergo due to circumstances.
................................................................................................
Kale's first story in this collection, कुचंबणा, inevitably reminds one of Mumbaicha Jaawai, remade subsequently in Hindi as Piya Ka Ghar.
This indeed is the story that the said gilms are based on, with minor changes in details, as it becomes clear while reading on.
Major change in films is of the tone - the very adult problem in the story that's reality of Mumbai, was changed to or covered with humor slightly in Mumbaicha Jaawai, and more so in Piya Ka Ghar.
................................................................................................
................................................................................................
TABLE OF CONTENTS

चिमणीची पहिली काडी
१. कुचंबणा
२. दाम्पत्यसुखाचे रहस्य
३. निरोप
४. यंत्र
५. वाळू
६. जंक्शन
७. मिडलँडिंग
८. असूर
९. गंमत
१०. ‘यशस्वी होशील म्हणा!’
११. जाणार कुठे?
१२. तीन शब्द

REVIEW

"हे माझं चौतिसावं पुस्तक.
"पहिली पुस्तकं मिळत नाहीत. दुसर्या आवृत्त्या काढायच्या होत्या. त्याऐवजी एक नवी कल्पना सुचली.
"अनेक वर्षं मनात एक कल्पना, नव्हे, एक विषय घोळत होता.
"त्या विषयावरच्या, जुन्या पुस्तकांतल्या कथा एकत्र आणल्या.
"बाकीच्या नव्या.
"म्हणजे कथासंग्रहाच्या संदर्भात नव्या.
"एकूण बारा कथांपैकी पहिल्या सहा कथा ह्या आजवरच्या संग्रहांतून प्रकाशित झाल्या आहेत.
"मात्र हे संग्रह उपलब्ध नाहीत.
"उरलेल्या सहा कथा संग्रहाच्या स्वरूपात प्रथमच प्रकाशित होत आहेत.
"‘घर हरवलेली माणसं’ हे ह्या संग्रहाचं नाव.
"हे तीन शब्द केव्हातरी वस्तीला आले.
"कधी आले? - आठवत नाही.
"चिमणी पहिली काडी कधी आणते हे समजत नाही, तसं झालं.
"पण तोवर ह्या शब्दांनी घरटं केलं. त्यांच्यावर प्रेम बसलं.
"ते हुसकूनही जाईनात.
"म्हणून चौतिसाव्या पुस्तकाला तेच नाव देऊन मी त्यांना ‘ओनरशिपचा फ्लॅट’ द्यायचं ठरवलं."
................................................................................................
"कलावंत त्याच्या कलाकृतीत संपूर्ण उतरावा. कोणत्याही निवेदनासाठी किंवा आविष्काराच्या समर्थनासाठी तो मागं उरता कामा नये. प्रवाहात दिवा सोडतात तसं पुस्तक!
"तरणं, बुडणं, पैलतीर गाठणं हे त्या त्या पुस्तकाच्या नशिबावर सोडावं. ..."
................................................................................................
"मुंबईची चाळ माझ्या आयुष्यात एकोणीसशे सेहेचाळीस साली आली.
"मुंबईकर झालो नसतो तर ‘घर’ ह्या विषयाकडे मी पाह्यलं असतं का?
"किंबहुना, मी लेखक तरी झालो असतो का?
"सांगणं कठीण आहे! पण मुंबईकर झालो आणि समोर सात घरांचे दरवाजे एकदम उघडले.
"स्वरांचं सप्तकच एकदम वाजलं.
"सात बिर्हाडं. जवळ जवळ तीस माणसं."
" ... मी त्या सर्वांना गुरु मानलं."
................................................................................................
"‘संसार’ ह्या विषयानं मला पहिली जखम कधी केली?
"तर, वयाच्या दहाव्या वर्षी!
"मी माझ्या श्रीमंत मावशीच्या घरी.
"माझे वडील जेव्हा बेकारीशी, कर्जाशी सामना देत होते, तेव्हा माझी मावशी ऐश्वर्यात लोळत होती. स्टार्च केलेला इस्त्रीचा कपडा मी प्रथम पाह्यला तो मावशीच्या यजमानांच्या अंगावर.
"बुटांना पॉलिश करायला रोज एक चांभार घरी यायचा.
"मावशीचे यजमान त्या काळात, म्हणजे १९४०-४१ सालात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे. हा गृहस्थ पानावर येऊन बसला की गरम फुलके वाढायला स्वयंपाकी तर हातावर पाणी घालायला दुसरा गडी.
"मावशीच्या यजमानांनी ‘लोणचं आहे का?’ असं विचारलं. मावशीनं दीड ते दोन फूट उंचीची, चिनी मातीची, दादरा बांधलेली बरणी नवर्यासमोर आपटली. एकही घास न खाता मावशीचे यजमान पानावरून उठून गेले."
................................................................................................
"दुसरी जखम.
"माझ्या मेव्हण्यांनी, दुसर्या महायुद्धात, कामगारांच्या माना मुरगळून पाण्यासारखा पैसा कमावला. माझी बहीण काळी, पण विलक्षण देखणी! त्या काळात तिचा ‘इलस्ट्रेटेड विकली’ च्या मुखपृष्ठावर फोटो छापून आलेला. पण तिच्या सासूनं, ‘ही काळी चंद्रकळा तुला आता शोभत नाही’ असं मुलाच्या मनात भरवलेलं. ह्या माणसानं माझ्या बहिणीला वेडं ठरवलं. तिची रवानगी येरवड्याला केली. तिला कुणी नातेवाईक नाहीत म्हणून सांगितलं. माझ्या वडिलांनी विनवण्या केल्या. ‘इंदूच्या नकळत तिला लांबून पाहतो’ म्हटलं. त्या माणसानं ते ऐकलं नाही."
................................................................................................
"असे अनेक पराभव मी पाहत आलोय. त्या त्या वयात मला अनेक घटनांचे अर्थ उमगले नाहीत. त्याची फक्त नोंद होत गेली.
"आजही जे पाहतो, त्याचा अर्थबोध होतो असा दावा मुळीच नाही. आजही मी केवळ नोंदणी करणारा सामान्य कारकूनच आहे. नावावर तेहतीस पुस्तकं आहेत, म्हणून मी जीवनाचा भाष्यकार नक्कीच झालेलो नाही.
"विनय नाही.
"अहंकार तर नाहीच नाही!
"जीवनाचा भाष्यकार होण्यासाठी जीवन समजावं लागतं. संसाराचा अर्थ गवसावा लागतो. मला निरनिराळ्या संसारांनी केवळ कोडी घातली.
"कोडी सोडवण्याचा प्रयत्न केला, त्याच्या कथा झाल्या.
"कोडी तशीच राह्यली."
................................................................................................
"माझे वडील राजकमलचे आर्ट डायरेक्टर. पण पगार किती? साडेतीनशे रुपये. नोकरी सांभाळून त्यांनी मध्यरात्रीपर्यंत जागून, ललितकलादर्श नाटक कंपनीचं नेपथ्य सांभाळलं.
"त्या कामाचं त्यांना काय मिळलं?
"तर शंभराव्या, दोनशेंव्या प्रयोगांना पेंढारकरांनी घातलेले हार आणि प्रेक्षकांनी पडद्याला दिलेल्या टाळ्या! वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी, मेंदूला अपुरा रक्तपुरवठा होऊ लागला तेव्हा त्यांना भास व्हायला लागले.
"ते स्वतःशी बोलायचे आणि आम्हाला सांगायचे. वारंवार! काय?
"तर ‘राजकमल किंवा ललितकलादर्शनं पाच हजार रुपये पगारावर मला बोलावलंय्, मी चाललो.’
"एकदम उठायचे आणि चालायला लागायचे.
"अपुर्या पगाराचं, प्राप्तीचं शल्य त्यांना किती होतं हे त्यांच्या वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी आम्हाला समजलं.
"काही काही घरांतून, ‘आज तू दमलीस’ किंवा ‘आज तुम्ही दमलात’ एवढे तीन शब्द ऐकल्याबरोबर, कात टाकून नव्या उमेदीनं उभी राहू शकतील, अशी माणसं मला माहीत आहेत. पण संजीवनी देणारे हे शब्द, उभ्या आयुष्यात त्यांना हव्या त्या माणसांकडून मिळालेले नाहीत. असं का?"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................

September 05, 2022 - September 05, 2022.

This story inevitably reminds one of Mumbaicha Jaawai, remade subsequently in Hindi as Piya Ka Ghar.
This indeed is the story that the said gilms are based on, with minor changes in details, as it becomes clear while reading on.
Major change in films is of the tone - the very adult problem in the story that's reality of Mumbai, was changed to or covered with humor slightly in Mumbaicha Jaawai, and more so in Piya Ka Ghar.
................................................................................................
" ... आपल्या गप्प राहण्यामुळे रत्नाकरचा मूळचा खेळकर स्वभाव जास्त हळवा आणि एकाकी होत चालला आहे ह्याची रोहिणीलाही जाणीव होती. पण स्वतःवर ताबा ठेवायला ती कमी पडत होती! कोल्हापूरचा तिच्या वडिलांचा आठ खोल्यांचा वाडा आणि मुंबईतील दहा बाय् बावीसची एकच खोली ह्या दोन गोष्टीत तुलना करायची नाही असं ती स्वतःला वारंवार बजावीत होती, तरी तिचं चुकार मन दोन्ही गोष्टी सारख्या समोर ठेवीत होतं. लग्नाच्या बंधनापेक्षाही जागेनं जास्त बंधनात टाकलं आहे ह्याची जाणीव देत होतं! रोहिणीनं ह्या बदललेल्या जीवनात चटकन् समरस व्हावं, एकरूप व्हावं अशी अपेक्षा रत्नाकरनं कधीच बाळगली नव्हती. एकमेकांच्या भावनांची एकमेकांना अल्पावधीत ओळख पटली होती. होणार्या कुचंबणेवर दोघांजवळही उपाय नाही, हेही पटलं होतं!"
................................................................................................
"‘म्हणजे सगळं आयुष्य असंच जायचं का?’
"‘मी आता तुला कसं सांगू? जागेची अडचण तू पाहतेसच. नवीन जागा पाहायची म्हणजे चार-पाच हजार पागडी, नंतर भाडंही पन्नास-साठच्या खाली नाही. राहायला जावं लागेल तेही विलेपार्ले किंवा घाटकोपरच्या पलीकडे! एवढं करूनही ते परवडणार नाही. ह्याच्यातूनच मार्ग काढायला हवा!’"
................................................................................................
"रोहिणी जवळजवळ रडू लागली. रत्नाकराची अवस्था आणखी केविलवाणी झाली. प्रयासानं रडं आवरीत रोहिणी म्हणाली,
"‘वाटेल त्या हालात-प्रसंगी एक वेळ जेवूनही मी राहीन, पण आपल्याला आपली जागा हवी.’"
................................................................................................
"(‘पैंजण’ दिवाळी १९६१)"

"आज पण तो तसाच शेजारी येऊन बसला.
"किती आगाऊ माणूस! चौपाटीच्या विस्तीर्ण वाळवंटात आजूबाजूला मुबलक मोकळी जागा पडलेली असताना हा गृहस्थ रोज आपल्या शेजारीच का येऊन बसतो, याचा उलगडा भाऊंना होत नव्हता. गेले पंधरा दिवस हे असं चाललं होतं. त्यामुळे स्वतःच्या मानसिक व्यथेबद्दल विचार करायलादेखील भाऊंना स्वस्थता लाभत नव्हती. गेल्या चार वर्षांत कुणीही त्यांचा असा पिच्छा पुरवला नव्हता. परंतु पत्रिकेत जसा आगंतुक अनिष्ट ग्रह उपटतो, तसा गेल्या पंधरा दिवसांपासून हा अज्ञात गृहस्थ भाऊंच्या राशीला लागला होता. भाऊंनी जागा बदलून पाहिली, चौपाटीवर येण्याच्या वेळेत फरक करून पाहिला, पण व्यर्थ! त्याचा काही उपयोग झाला नाही. भाऊ चौपाटीवर येऊन बसले रे बसले, की पंधरा मिनिटांत हा उपटसुंभ त्यांच्या शेजारी येऊन ठेपलाच!
"आज पण तो आगंतुक गृहस्थ तसाच त्यांच्या शेजारी येऊन बसलाच. एवढंच नव्हे तर आज तो बोलायच्या इराद्यानं आलेला दिसला. पाच-दहा मिनिटं गप्प बसून त्या अज्ञात इसमानं भाऊंना विचारलं, ... "
................................................................................................
"‘पण त्याला वेड लागण्याचं कारण तरी काय?’
"‘तुम्हाला माहीत नाही? त्याला फार मोठा धक्का बसलाय. त्याची बायको चार वर्षांपूर्वी त्याला टाकून पळून गेली! त्याच्या विक्षिप्तपणाला ती कंटाळली अन् अखेर तिनं याला टाकून दिलं. आम्हीच तिला अनाथाश्रमात पोचवलं...’"
................................................................................................
"(‘मोहिनी’ दिवाळी १९५९)"

Shocking story, over half a century later.
................................................................................................
" ... अप्पा परत म्हणाले,
"‘माझी कसली चिंता करतोस? मी मजेत आहे. मन रमवायला मला जागा आहे. आमच्या गजाला काही राहिलं नाही. त्या हॉटेलात जातो स्त्रीची विटंबना पाहायला. त्याला त्याच्यातच लज्जत वाटते. त्याला माझा एक निरोप सांग. म्हणावं, एका स्त्रीचा राग सगळ्या स्त्रीजातीवर काढू नकोस. स्त्रीची अशी कुचेष्टा चाललीय ती पाहत बसू नकोस. माणसात ये. पुन्हा लग्न कर! संसार असाच असतो. लाकडाचा धूर डोळ्यांत जातो म्हणून चूल पेटवायची थांबवायचं नसतं. जीवनात दरी निर्माण झाली म्हणून आपण खोल-खोल जायचं नसतं. ती पार करायची असते. त्याला सांगा एवढं. माझा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. त्याला तुम्ही सांगा. माझा निरोप द्या.’ अप्पा पाठ वळवून दवाखान्याकडे जाऊ लागले. मध्येच त्यांनी धोतराचा सोगा डोळ्याला लावला."
................................................................................................
"(‘अंजली’ दिवाळी १९६३)"
...............................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 05, 2022 - September 05, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
४. यंत्र
................................................................................................
................................................................................................
Over six decades later, there's far more automation than he describes.
But while some part of humans being not so dependent on thise around is true, people aren't as miserable due to mechanisation, as most of those who feared it then had prophesied.
And while people do go on treks and mountaineering, and so on, modern gadgets help there as well. Nobody carries a television on such outings, but phones with GPS are as useful as ropes and proper footwear et al.
................................................................................................
"‘तुला खोटं वाटेल...अतिशयोक्ती वाटेल...पण...’ मुकुंद हुंदके देऊ लागला आणि बोलत राहिला...पण-माझं काही कमीजास्त झालं, तर...तर...ह्यातला एखादा टेपरेकॉर्डर...रडण्याचं रेकॉर्डिंग वाजवत राहील...आणि त्या वेळी विलासिनी तिच्या मोटारीतून पार्टीला जाऊन ह्या सुखसोयींचं, माझ्या बुद्धीचं वर्णन करीत बसेल...’"
................................................................................................
"(‘प्रसाद’ दिवाळी १९५९)"

"‘पुरुष म्हणजे सापाची जात, बायका अगदी गरीब गायी, असंच ना?’
"‘तसंही नाही. डूख धरण्याचे गुणदोष दोघांतही असतात, म्हणूनच स्त्री-पुरुषांनी लग्न वगैरे करून कायम एकमेकांना जखडून घेऊ नये असं माझं मत आहे.
"‘कसं शक्य आहे ते?’
"‘मी इतरांबद्दल बोलत नाही. माझ्यापुरतं मी ते कटाक्षानं टाळणार आहे. लग्नसंस्था, बाप, आई, भाऊ, बहीण ह्या सर्व नात्यांवरचा माझा विश्वास गेल्या चौदापंधरा वर्षात पार उडालाय. हे सर्व खोटं आहे. शेवटी एक पुरुष आणि एक स्त्री हे खरं! निरनिराळ्या नात्यांच्या रूपानं ती वावरतात. समोर मघाशी आकाशात निरनिराळे आकार धारण करणारे ढग फिरत होते. आकार खोटे, ढग खरे. हे जसं तसंच आपलंही. आणि त्याहीपेक्षा शेवटी माणूस हेच आपलं खरं रूप. स्वतःच्या सौख्यासाठीच केवळ धडपडणारा माणूस! अर्थात तो निसर्ग आहे. स्त्री-पुरुषांच्या सौख्यातूनच त्याचा जन्म होतो, तेव्हा जन्मापासून माणसानं स्वार्थी व्हावं ह्यात नवल नाही.’"
................................................................................................
"(‘मेनका’ दिवाळी १९६५)"

"‘बायका मिळवायला लागल्या की नवरे-लोक त्यांच्या कपड्यांची विचारपूससुद्धा करत नाहीत. सासुबाई तसल्याच. घरात वन्संसाठी पातळं आणून झाली. स्वतःसाठी झाली. एक-दोघांना आहेर झाले मोठाले. त्यांनाही पातळं झाली. माझी चौकशीसुद्धा नाही. आम्हीच आमचे कपडे आणायचे. गेल्या सबंध वर्षात आपण होऊन कुणी चौकशी केली नाही. आता मीही कुणाची पर्वा करायची नाही असं ठरवलं आहे.’"
................................................................................................
"(‘अनुराधा’ दिवाळी १९५९)"

"सगळीच भित्री माणसं जशी अरेरावी असतात, तसाच निखिलही अरेरावी निघाला. तो जितका अरेरावी होता तितकाच स्वार्थी होता. कोणत्याही लहानमोठ्या स्वार्थाला धक्का लागायची वेळ आली की तो चिडत होता. बाहेर कोण हे सहन करणार? बाहेरच्या जगात स्वतःचं नाणं खरं असून नुसतं चालत नाही, तर ते वाजवून दाखवण्याची किमया असावी लागते. त्यासाठी थोडं धाडस हवं. आणि इथंच नेमकं गाडं अडकलं होतं."
................................................................................................
"(‘किर्लोस्कर’ ७०० वा अंक)"

It's unclear why, when there was a perfect young man after their daughter - he'd finished a B.Tech. and was earning very well for the time - they had to find another match, and an unappreciating one at that.
................................................................................................
"कालचा दिवस निराळा. सोडून देईन.
"पुण पुन्हा चुकलीस तर याद राख. बापानं लाड केले असतील, इथं उपास पडेल.... फोडून काढीन....
"पहिल्या रात्रीच दमात घेतली पायजेल. मग चिंता नाय्!"
................................................................................................
"(‘मेनका’ दिवाळी १९७९)"

"‘ऐकलं मी सगळं. विचारही केला. आता मी सांगतो ते ऐका. तुमच्यासारखे अनेक नटसम्राट मी पचवलेत आणि वकिली करणार्यांना गुंडाळलंय. तुमच्या तोंडून माझाच मुलगा बोलतोय् हे न कळण्याइतका मी बुळा नाही. आता एक काम करा. आर्किटेक्टचा पेशा सोडून वकिली करताहात तर आता माझा निरोप तुमच्या मित्राला द्या. त्याला सांगा, ‘मी माझ्या गावाला सुखासमाधानात होतो. तिथली प्रॉपर्टी तू मला विकायला लावलीस. इथं सन्मानपूर्वक बोलावलंस म्हणून आलो. मला तुमचं सौंदर्यशास्त्र, डिझाइन वगैरे काही समजत नाही. वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी मी माझं आयुष्य, सवयी, गरजा बदलू शकत नाही. तुम्ही माझ्या वयाचे व्हाल, तेव्हा ते तुम्हालाही जमणार नाही. तेव्हा मी इथं माझ्या पद्धतीनं राहणार - प्रॉपर्टी मी आपण होऊन विकली नाही. पैसे माझे आणि विनियोग त्याचा. माफ करा. तुम्ही जाऊन सांगा त्याला.’
"मी बाहेर पडलो.
"माझ्या छातीतून आत्ता खरी गंमत आली. समोरून लोणकर धावत आला. त्याच्या खांद्यावर थोपटीत मी एकच वाक्य बोललो,
"‘तुम्ही जेव्हा खर्या अर्थानं स्वतःचं घर कराल, तेव्हा आपण मस्त फर्निचर करू.’
................................................................................................
"(‘सुगंधी’ दिवाळी १९७८)"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 05, 2022 - September 05, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
१०. ‘यशस्वी होशील म्हणा!’
................................................................................................
................................................................................................
Unbelievable.
Which is not to say that author has lost credibility.
................................................................................................
"बंदरकर प्रस्थ तर फारच बडं. गाडीवाला माणूस. पेडर रोडवर एक फ्लॅट, दुसरा फ्लॅट जुहूला. हा माणूस जर धरून ठेवला असता तर बिझनेस हां हां म्हणता वाढला असता. बंदरकराच्या मुलीच्या लग्नाचा नजर लागेल असा एक आल्बम जगदीशनं करून दिला. बंदरकरांनी हजार रूपयांचा चेक एका सेकंदात दिला, आणि तस्साच दुसरा आल्बम तातडीनं करून मागितला. तो दुसरा आल्बम त्यांना शेवटपर्यंत मिळाला नाही. बंदरकरांकडे माणसं मुबलक. जाता-येता त्यांचा ड्रायव्हर घरी, ऑफिसात आणि डार्करूमवर यायचा. ब्रह्मसमंधानं झपाटून टाकावं तशी बंदरकरांनी माणसं सोडली होती. त्या काळात जगदीश किती प्रकारच्या थापा मारू शकतो ह्याचं नित्य नवं प्रात्यक्षिक पाहायला मिळत होतं. थापांचं आणि निर्लज्जपणाचंही! अगदी तस्साच प्रकार ह्या माणसानं देवकुळ्यांच्या बाबतीत केला तर?
"सुषमाच्या अंगावर ह्या विचारानं पुन्हा काटा आला. काय वाट्टेल ते करून देवकुळ्यांना सावध करायला हवं. इथं प्रश्न आता निव्वळ जगदीशपुरता राह्यलेला नाही. कंपनीचा खोळंबा होईल, त्याहीपेक्षा इथं आपली स्वतःची प्रतिष्ठा धोक्यात आलेली आहे, येण्याची शक्यता आहे. ‘कॅमेरा’ कंपनी आणि जगदीश ह्या प्रकरणात आपण अलिप्त राहू शकणार नाही. आपला संसार ही आत्तापर्यंत झाकली मूठ होती. कंपनीच्या लौकिकासाठी आणि ‘शब्द’ ईश्वरासमान मानणार्या देवकुळ्यांसाठी जगदीशच्या संदर्भात सगळं सांगावंच लागेल. ह्या कंपनीत आत्तापर्यंत मान खाली जाईल असं आपल्या हातून कधी काही घडलं नाही.
"पण जगदीशनं ती वेळ आणली तर?"
................................................................................................
" ... मनं एकरूप न होता, पुष्कळ घरांतून केवळ कायद्यानं पुरुष बाईचा नवरा आहे, ह्या कागदी आधारावर जे होतं तो खरा व्यभिचार आहे. ... "
................................................................................................
"‘उपभोगायची वस्तू स्वतःच्या हिंमतीवर-घामावर विकत घेण्याचा, त्या सुखाची किंमत मोजायचा जो आनंद असतो, तो कधीच त्यांच्या वाट्याला आलेला नाही. त्या आनंदाला सामोरं जाण्याची ताकद देण्याच्या भावनेनं मी चालले आहे. जिंकले तर एकटी जिंकले असं होणार नाही. सगळे जिंकू. जर हरले तरी मी एकटी हरणार नाही. जिवापलीकडची उडी होती असं म्हणून मी परत येईन. त्यांचा मात्र तो दारुण पराभव ठरेल. माझ्या पराभवापेक्षा जास्त मोठा पराभव. त्यांना कदाचित तो कळणार पण नाही, पण तो त्यांच्याही आयुष्यातला शेवटचा पराभव असेल.’
"नानांचे डोळे भरून आले.
"सुषमा नमस्कारासाठी खाली वाकली.
"‘काय आशीर्वाद देऊ?’
"‘यशस्वी होशील म्हणा!’ प्रसन्नपणे हसत सुषमा म्हणाली."
................................................................................................
"(‘किर्लोस्कर’ दिवाळी १९७८)"
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 05, 2022 - September 06, 2022.

Heartbreaking.
................................................................................................
"‘जाधवराव, आमचेही रिटायर व्हायचे दिवस जवळ आलेत. ‘फार जगलो’ असं म्हणायची पाळी आमच्यावर येणार नाही ना?.....आलीच तर जाणार कुठे?’"
................................................................................................
"(‘पैंजण’ दिवाळी १९७९)"

September 06, 2022 - September 06, 2022.

"तो त्या आरामखुर्चीत बसला आणि त्यानं डोळे मिटून घेतले. ह्या क्षणाची तो दीर्घकाळ प्रतीक्षा करीत होता. त्याच्या दोन महिन्यांच्या वास्तव्यात सगळ्यांशी सगळं बोलून झालं होतं. मँचेस्टर सोडण्यापूर्वी हिंदुस्थानात गेल्याबरोबर आपण सगळ्यांशी अगदी मनसोक्त-मनसोक्त बोलायचं असं तो घोकत होता. पण ते सगळं कधीच संपलं होतं. पुनरुक्तीत स्वारस्य नव्हतं. पुष्कळदा त्याच-त्याच माणसांशी आपण तेच-तेच बोलतो हे त्याला जाणवलं होतं.
"आता एकांत हवा होता."
................................................................................................
"‘दत्ताभावजींकडे एक खोली जास्त आहे. शिवाय बंद केलेली बाल्कनी आहे. तिथं ते नानांना कोंडून ठेवायचे, आणि तितकीच वेळ आली तर त्यांना ते वेताच्या छडीनं गुरासारखं बडवायचे. आमच्या नात्यात हे कुणालाही माहीत नव्हतं. आम्हालाही कल्पना नव्हती. ज्या दिवशी नानांना हे घरी घेऊन आले त्या दिवशी अंगभर वळ होते नानांच्या!’"
................................................................................................
"‘अंत्या, मी तुला काय सांगू? अरे मॅट्रिकनंतर शैलानं दोन वर्षं रात्रंदिवस निनादचा पिच्छा पुरवला होता. नाटक नाही, सिनेमा नाही, मित्र, गप्पा, फिरणं, टी. व्ही., हॉटेल्स, ट्रिप्स-सगळं बंद. एकच नाद, एकच विषय-अभ्यास! अभ्यास! इंटरला क्लास, टक्केवारी... स्वतः ती व्रतस्थ राहिली. तिनं दुसरं आयुष्यच स्वतःला ठेवलं नाही. ऐंशी टक्केवाल्यांना डावलून शेवटी जेव्हा बावन्न टक्केवाल्यांचा नंबर लागतो तेव्हा निनादसारख्या जिवानं इथली यात्रा का संपवू नये? निनादसारख्याचं जीवन उजाड करण्याचा अधिकार सरकारला कुणी दिला? निनादनं सुईसाइड केलं आणि शैलाची ही अवस्था त्या दिवसापासून. काय म्हणशील? ‘मॅट्रिकला पहिला आलेला मुलगा इंटरला कमी मार्क मिळवतो. लोक काय म्हणतील?’ –असं केव्हातरी शैला बोलली. बस्! इन्सल्ट त्याला फार लागला. पोरगं गेलं. सांग, जाब कुणाला विचारू?’"
................................................................................................
"रत्नाकरनं त्या दिवशी लांबीनं भोकं बुजवली नसती तर तुम्ही सर्व मित्रांनीच त्याचा खून केला असतात.’"
................................................................................................
"बिचार्यांची एवढीश्शी आयुष्यं! त्यांचं चिमुकलं आकाश. पण ‘लोक काय म्हणतील!’ ह्या तीन काल्पनिक राक्षसांना त्यांनी आपली आयुष्यं विकून टाकली. ह्या राक्षसांनी आपल्या देखत आपल्या मित्रांचे संसार गिळले. आणखी किती जणांचे गिळले आहेत, कुणास ठाऊक!"
................................................................................................
"(‘सोबत’ दिवाळी १९८०)"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 06, 2022 - September 06, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
Ghar Haravleli Manasa (Marathi)
by V.P. KALE (Author)
................................................
................................................
September 05, 2022 - September 06, 2022
Purchased September 05, 2022.
Publisher:- MEHTA PUBLISHING HOUSE
(1 January 1981)
Language:- Marathi
Format: Kindle Edition
Kindle Edition
Marathi Edition
ASIN:- B01N1TY8NC
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4966956109