Sunday, September 4, 2022

Taptapadi (Marathi) by V.P. KALE.

................................................................................................

Taptapadi (Marathi) 
by V.P. KALE.   

Extraordinary! 

Over and over, author explores women's travails within marriage, and thry are all so true, one wonders how he knew! 

तू येत राहा - Mind-boggling. 

Writer who writes like this, also wrote 'बाई, बायको, कॅलेंडर' (Bai Bayko Calender)? 

Not that that wasn't good! It is! 

तिशी Goes straight to whatever part's that supposed to know - yes, true! 

But this is all life, heart, travails of a woman. How did the author know? 

आसावरी (Asavari) is about the torture every accomplished, successful woman endures, few escaping. 

प्रतीक (Prateek) comes across as expected, not in details or dialogues, but in the very theme. 

That's not to say there aren't profound truths here, too. 

मॅरेज इज ए डील is different. Not an uncommon problem as far as women face in India. 

Wish he'd written दिशा with genders exchanged. 

But he perhaps has. 
................................................................................................
................................................................................................
कथानुक्रम 

तू येत राहा 
तिशी 
आसावरी 
प्रतीक 
पॅटर्न 
मॅरेज इज ए डील 
दिशा

.................................................................................................
REVIEW 

Mind-boggling. 

Writer who writes like this, also wrote 'बाई, बायको, कॅलेंडर' (Bai Bayko Calender)? 

Not that that wasn't good! It is! 
................................................................................................

"“सुगम संगीत नावाचा शब्दही जन्माला आला नव्हता तेव्हापासून मी गातोय,‘भावगीतगायक’ अशी पाटी लावून.” 

"“तेव्हाचं सगळंच वेगळं नव्हतं का?” 

"त्याच्या प्रश्नावर मी खरोखरच तेव्हाच्या काळात गेलो. काहीसा गलबलून गेलो. नको नको त्या आठवणी जाग्या झाल्या. क्षणभर छळून गेल्या. ड्रॉवरमध्ये अनवधानाने हात घालावा आणि नखाग्रात ब्लेड घुसावं तशा वेदना झाल्या. मला माझा व्यथित चेहरा लपवता आला नाही."
................................................................................................

"“तुम्हाला मी आवडले होते?” 

"मी एकेक शब्द उच्चारत म्हणालो, 

"“माझं आत्तापर्यंतचं प्रत्येक गाणं मी फक्त तुझ्यासाठीच म्हणत आलो. प्रत्येक नवी चाल मी तुलाच शिकवली. जाहीर कार्यक्रम तर सोडच, माझं मनातलं गुणगुणणंसुद्धा तुझ्यासाठीच असतं.”"
................................................................................................

"“वाशा, तो विस्तवाशी खेळ ठरेल. विचारांची भूक भागवताना वेगळं काही घडू शकेल. दोन उत्कट जिवांना संधी देऊ नकोस. एकांत देऊ नकोस. तुझं मन खूप मोठं आहे. तुला आज मी खऱ्या अर्थाने ओळखायला लागलोय. तू मोठा आहेस. म्हणून स्पष्ट सांगतो, आमचा एकमेकांवर ताबा राहणार नाही.” 

"मी प्रथमच स्नेहभावाने वासूच्या खांद्यावर हात ठेवला. मख्ख, स्थितप्रज्ञ चेहऱ्याने त्याने माझा हात दूर लोटला आणि कोरड्या आवाजात तो म्हणाला, 

"“तू मला कधीच ओळखणार नाहीस. मी मोठा नाही. मी डँबीस आहे. तुला मोकळं रान देतोय असं समजू नकोस. तुला एकांताची भीती वाटतेय असं दाखवू नकोस. तुला तो हवाय. तसा तुला तो मिळत जाईल. पण त्याचा शून्य उपयोग आहे. ऐक, नीट ऐक. आणि ध्यानात ठेव. सेवा नाकारता येते. परावलंबित्व झुगारून देता येतं, पण मनाचा मोठेपणा झटकता येणं अशक्य असतं. विमल माझ्या मोठेपणाच्या भाराखाली दबून जाईल. ती मर्यादा सोडणार नाही आणि तुला सोडून देणार नाही. क्काय? तू येत राहा.”"
................................................................................................
.................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................

September 04, 2022 September 04, 2022

Goes straight to whatever part's that supposed to know - yes, true! 

But this is all life, heart, travails of a woman. How did the author know? 
................................................................................................

"मोठ्या जाऊबाई गळा काढण्यात पटाईत. आवाज मोठा. पण डोळ्यांत पाण्याचा टिपूस नाही. 

"मधल्या जाऊबाईंच्या डोळ्यांत एक अश्रू आलेला. पदर तोंडावर. डोळ्यांत मुश्किलीने आलेलं पाणी. जमलेल्या नातेवाईकांचं लक्ष जाईपर्यंत मधल्या जाऊबाई तो अश्रू पुसायला तयार नाहीत. 

"माझी नणंद श्यामा हुंदके आवरत आहे. तसं करताना तिची नजर माझ्याकडे. मला रडायला का येत नाही हा तिच्या मनात एकीकडे येणारा विचार. तो विचार नजरेत डोकावतोय. 

"विनायकभावजींचा स्वयंपाकघरात येऊन मला सरळ सरळ गुन्हा केल्याप्रमाणे प्रश्न, 

"“अगोदर कळवलं का नाहीत?” 

"“कधी कळवायचं?” 

"“काल रात्री.” 

"“तुम्ही पार्टीला जाणार होतात ना?” 

"ते गप्प. 

"“आणि हार्टअ‍ॅटॅकने गेल्यावर करणार काय? कळवणार कसं?” 

"“शुद्धीवर होती?” 

"“पाणी आण म्हणाल्या. नेईपर्यंत गेलेल्या.”"
................................................................................................

"सासूबाई पंच्याऐंशी वर्षं जगल्या आणि शेवटची तीन वर्षं इथं राहिल्या. ते हेच कार्य करण्यासाठी. समीरने आणि मी बत्तीस वर्षं मधुचंद्रासारखी घालवली तिला ग्रहण लावण्याचं कार्य त्यांना करायचं होतं. ‘तुझी बायको कशी आहे, ते बोटीवर राहून तुला कळायचं नाही’ असं त्या तीन वर्षं कानीकपाळी ओरडत राहिल्या."................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 04, 2022 September 04, 2022
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
आसावरी
................................................................................................
................................................................................................

Extraordinary! 

Over and over, author explores women's travails within marriage, and thry are all so true, one wonders how he knew! 

This one is about the torture every accomplished, successful woman endures, few escaping. 
................................................................................................

"“बागेश्री एक्स्ट्रॉऑर्डिनरी आहे. ती किती उंची गाठू शकते हा अंदाज आल्यावर संगीत बिथरला. कोणत्याही ऑर्केस्ट्रात गाण्याइतपतच ती असती तर आमचा पोरगा गप्प बसला असता.” 

"“मला हे अजून समजूच शकत नाही.” 

"“हे फार नॉर्मल आहे. अलौकिक कॅलिबरची गोष्ट सोडाच, पण चारचौघांच्या मेळाव्यात एखादी बाई नवऱ्यापेक्षा जास्त चातुर्याने, हिरिरीने वादविवाद करू शकली तर तेवढ्या कारणाने आदळआपट करणारे पुरुष, घरोघरी सापडतील.” 

"“पण का?” 

"“तेवढ्याने त्यांच्या अस्तित्वालाच हादरे बसतात.”"
................................................................................................

"गणूकाक थांबले. जरा अस्वस्थ झाले. मी उतावीळपणे विचारलं,“नाहीतर काय?” 

"“त्याला सांगणार, बागेश्री आणि नातवंडं आता माझ्याजवळ राहतील. इतकी गुणवान पत्नी मिळवण्याची तुझी पात्रता नाही.” 

"“बागेश्रीला पटेल?” 

"“मी आत्ता काही सांगू शकत नाही. करिअर की संसार हा प्रश्न कायम बायकांनीच का सोडवायचा मला कळत नाही. संसाराने व्यक्ती विकसित व्हायला हवी. तसं होत नाही. तिचा बळीच जातो. ही पोरगी सगळ्या टॅलण्ट्सची आहुती देऊन, कोणत्या बळावर उभी आहे, हे तिच्याकडून काढून घेतलं पाहिजे. तिने हा निर्णय का घेतला, पाहायला हवं. बोलेल की नाही कोण जाणे !”"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 04, 2022 September 04, 2022
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
प्रतीक
................................................................................................
................................................................................................

प्रतीक comes across as expected, not in details or dialogues, but in the very theme. 

That's not to say there aren't profound truths here, too. 
................................................................................................

"“कोणता आशीर्वाद देऊ?” 

"“संसारात यशस्वी होईन, असा आशीर्वाद द्या.”"

"“रूपाला माझं काय काय टॉलरेट करावं लागतं?” 

"“ते तिने मला कधीच सांगितलेलं नाही. तुम्हाला ते जाणून घ्यायचंय का?” 

"“हो, म्हणजे मी माझ्यात सुधारणा करीन.” 

"“ते तर अगदीच सोपं आहे. आपली मुलं म्हणजे आपले खरे परीक्षक असतात. आई, वडील म्हणजेच नवरा-बायको आपण होऊन एका टीकाकाराला जन्माला घालतात. ती मुलं परखडपणे कुणाचं चुकतं हे अचूक सांगतात. आपण त्यांना ‘तुला अक्कल नाही’ म्हणून गप्प बसवतो.” 

"प्रशांतने मध्येच विचारलं, 

"“त्यांना अक्कल असते का?” 

"“नसते म्हणूनच ती खरं बोलतात. अक्कल वाढली की अहंकार वाढतो. आडमुठेपणा रक्तात वाहतो. खरं आणि खोटं ह्यात जे सूक्ष्म अंतर आहे तिथं मतलब साठू लागतो. पुढे त्यात स्वार्थाची भर पडते. मुलांना मग कुणाची बाजू घ्यायची ते कळायला लागतं. मुलं सब्जेक्टिव्हली बोलत नाहीत. ऑब्जेक्टिव्हली बोलतात. ह्याउलट आपण सब्जेक्टिव्हली जगतो.”"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 04, 2022 September 04, 2022
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
मॅरेज इज ए डील 
................................................................................................
................................................................................................

Not an uncommon problem as far as women face in India. 
................................................................................................

"“मी सागरला म्हणाले, अल्ट्रा-सोनोग्राफीचं मशीन सुनेच्या पायगुणाने यायला हवं.”"
................................................................................................

"“मी तुझ्याकडे काहीही मागत नाही. तू डॉक्टर नसतीस तरीही चाललं असतं.” 

"“मग डेंटिस्ट मंजिरी का चालली नाही?”
................................................................................................

"“तुमच्या आक्कांनी रात्रभर विचार केला. माझ्यासारखी सोन्याची अंडी देणारी कोंबडी सांभाळायची ह्या खुराड्याने आणि तिची अंडी मात्र दुसऱ्या क्लिनिकमध्ये. त्यापेक्षा सर्वाधिकार दिलेले बरे.”"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 04, 2022 September 04, 2022
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................   
दिशा
................................................................................................
................................................................................................

Wish he'd written this with genders exchanged. 

But he perhaps has. 
................................................................................................

"“ही तुझी मुलगी?” वीणाच्या प्रश्नात जो भाव असायला हवा होता, तोच भाव होता. पूर्वी कुणाला असा धक्का बसला की मालीला अभिमान वाटायचा. आता तिला प्रकट न करता येणाऱ्या वेदना होतात. चंदाने आपल्या देखण्या आजीचं रूप घेतलं की आपल्यावर सूड उगवण्यासाठी, आपली देखणी आई, मुलीच्या रूपाने आपल्या पोटी आली, हा नेहमीचा छळवादी सल आताही टोचू लागला. अनेक वर्षांनी भेटलेल्या वर्गमैत्रिणीची तिला अपूर्वाई वाटली नाही."
................................................................................................

"“एकमेकांच्या पसंतीने लग्न झालं आणि नंतर अंदाज चुकले तर इलाज नाही. पण चंदा, माझी एक क्लासमेट आहे. आम्ही तिला सोनचाफा म्हणत असू. तिला तर जेव्हा नवरा प्रथम बघायला आला त्या क्षणापासून तीव्रतेने जाणवलं होतं की, ह्याचं आणि आपलं एक क्षण जमणार नाही. आणि तरीसुद्धा तिला त्याच माणसाशी लग्न करणं भाग पडलं. परवाच भेटली होती. पिसारा झडून गेलेल्या अवस्थेत दिसली. हे खरं दुर्दैव.” 

"चंदा शहारली. 

"“घाबरू नकोस. प्रत्येकीचं असं होत नाही. लग्नाची गोष्ट सोड. पण इतर अनेक बाबतीत एक कानमंत्र देते आणि पळते. प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय मिळाला नाही तर एक पर्याय हाताशी ठेवायचा.” 

"“एका समस्येवर दुसरा पर्याय असतो?” 

"“समस्या आणि उत्तर ह्यात वेळ म्हणजे टाइम फॅक्टर असतो. फोर्थ डायमेन्शन म्हणतात तो फॅक्टर. म्हणूनच एका उत्तराची वेळ टळली की दुसरं उत्तर शोधावंच लागतं.” 

"“तुमची ती मैत्रीण, जिला न पटलेल्या माणसाशी लग्न करावं लागलं...” 

"“कोणत्याही दडपणाला न जुमानता ते स्थळ नाकारण्याचा एक क्षण होता, तो हुकला. म्हणजे पुन्हा वेळ हाच फॅक्टर...”"
................................................................................................

"स्त्रीला सौंदर्याचा लाभ होणं, तिच्या अस्तित्वासाठी श्वासाइतकं आवश्यक आहे. सौंदर्य हाच अधिकार. ह्याच सौंदर्याच्या अधिकारावर माझ्या आईने श्रीमंत नवरा मिळवला. सौंदर्याप्रमाणेच मूळचीच श्रीमंती लाभली तर माणसाला फारशी अक्कल नसली तरी चालते. श्रीमंत बाप आणि सुंदर आई. एकीने सौंदर्याच्या जोरावर श्रीमंती खरेदी केली, तर एका श्रीमंताने पैशाच्या बळावर सौंदर्य विकत घेतलं. श्रीमंत लोकांना अक्कल उपजत असते असं निर्धन समाजाला वाटतं आणि सौंदर्याला अक्कल लागत नाही. दोन्हीची युती झाली की जग हातात आलं. त्या ट्रॅकवर छोटी गावं लागत नाहीत. ‘लायन,रोटरी’ अशी शहरं असतात. फॉरिनच्या वाऱ्या असतात. तीर्थक्षेत्राला जाणाऱ्या पायी दिंड्या नसतात. कारण पायच ठरणार नाहीत अशी त्यांची ‘तीर्थं’ असतात. तिथून विमानंच सुटतात. एसटीच्या, यात्राकंपनीच्या सर्व्हिसेस् सुटत नाहीत. ही सगळी जमात सुटलेलीच असते. 

"चंदा, ह्या जमातीच्या पंचतारांकित हॉटेलमधले सेमिनार्स मी पाहिलेले आहेत. अमका लायन तमक्या लायनला हार घालतो आणि तो तमका लायन पुन्हा पुन्हा अमक्या लायनचं कौतुक करतो. इनर व्हीलवर, सतत एकमेकांभोवती फिरणाऱ्या ह्या सिंहांजवळ फक्त पैशाचं वंगण असतं आणि सौंदर्याची आयाळ असते. एखादा निर्धन पण साहित्य, नाट्यकला, चित्रकलेचं, गुणांचं धन असलेला माणूस ह्यांचा सभासद होऊ शकत नाही."
................................................................................................

"अर्थात हे कौतुक फार काळ वाट्याला आलं नाही. त्यानंतर माझ्या वाट्याला आली ती कायम मुलं सांभाळणारी पगारी माणसं. त्या माणसांचं आणि माझं कधीच पटलं नाही. ह्या नोकरवर्गाला कितीही पगार द्या, त्यांचं समाधान होत नाही. तू आपल्या हॉस्पिटलमध्ये पोस्ट करत आहेस तेव्हा लेबर स्टाफ म्हणजे काय चीज आहे, हे तुला माहीत आहे. ज्यांना फटके मारून काम करून घेणं आवश्यक आहे, तिथं त्यांच्या युनियन्सपायी, त्यांचे पाय धरावे लागतात. ह्या कामगारांचे मग्रूर नेते, हे कामगार किती तास काम करतात आणि किती तास पानतंबाखू खाऊन, सगळीकडे थुंकत उकिरडा करतात, हे पाहायला कधीच येणार नाहीत. खरं तर एसी गाड्यांतून हिंडणाऱ्या ह्या युनियन नेत्यांना फटके हाणले पाहिजेत. अर्थात माझ्या त्या वयात, सर्वांगाला विड्यांची दुर्गंधी येणाऱ्या माणसांजवळच मला राहावं लागलं. ह्या माणसांबद्दल माझ्या मनात त्या दिवसांपासून राग आहे. विड्या, सिगारेट, तंबाखू आणि लेबर स्टाफ ह्या सगळ्यांची एकदमच तिडीक बसली. आणि हॉस्पिटल चालवायला घेतल्यापासून त्यात भर पडली. चव्वेचाळीस वर्षांत ह्या राज्यकर्त्यांनी पोसलेले हे कामचुकार पोळ आहेत सगळे आणि त्यांना वेठीला धरून स्वतःच्या तुंबड्या भरणारे नेते म्हणजे वळू आहेत. जाऊ दे. चंदा, तुझ्या आईचं म्हणणं तुला कधीच समजणार नाही आणि तुला ते समजलं नाही तर, आय डोण्ट केअर. ज्या व्यक्तीला घरचा आणि दारचा कारभार ताब्यात ठेवायचा आहे, त्या व्यक्तीने कुणाला विश्वासात वगैरे घेण्याच्या भानगडीत पडू नये. त्यापेक्षा सगळ्यांच्या शेपट्या हातात कशा ठेवता येतील, त्याचा विचार करावा."
................................................................................................

"“शी हेट्स यू.” 

"चंदा चमकली. 

"“अर्थात तो मत्सर मुलीचा नाही. सौंदर्याचा आहे. तू पाच-सहा वर्षांची होतीस, तोपर्यंत ती तुला घेऊन अभिमानाने मिरवत असे. तू मोठी व्हायला लागलीस तेव्हा तुमच्यातलं अंतर वाढत गेलं. ट्राय टू रिकलेक्ट अ‍ॅण्ड करेक्ट मी, इफ आय अ‍ॅम राँग.”"
................................................................................................

"“दाराचा आवाज न करता तुझी आई आत आली. तू आणि मी सविताची समजूत घालत होतो. काहीच न सापडल्याने तुझी आई वैतागली. तू नेहमीप्रमाणे खेळायला शेजारी गेली असशील किंवा मी तुला कुठेतरी पिटाळली असेल, ही तिची अपेक्षा. तरी ती तुला एक वाक्य बोललीच, ‘चंदा बेटा, अशा प्रसंगी घरात राहायचं नाही, हे तुला कधी कळणार?’ ”"
................................................................................................

"“डॉक्टर ठकार म्हणून एक गायनॅकॉलॉजिस्ट आहे. ती प्रमोशनवर आली आहे. क्लिनिकल जॉबमध्ये तिला विलक्षण रस आहे हे समजताक्षणी, तिला फक्त मस्टर आणि फायली ह्यात गुंतवली. आईपेक्षा ठकारकडे एक डिग्री जास्त आहे तर पाटीवरच्या नावाखाली पदव्या लिहिण्याची गरज नाही, इथपासून आईने पिच्छा पुरवला. ठकारने पाटी लावायची आणि आईने ती काढून टाकायची, हाच प्रकार पंधरा दिवस चालला होता.” 

"“काय पोरकटपणा...” 

“ती ठकार त्यात दिसायला चांगली. बोलायला लाघवी. मुंबईतले तिचे पूर्वीचे पेशंट त्या ठकारचा पत्ता काढत काढत येतात, ठकारनेच ट्रीटमेंट द्यावी म्हणून. आई अशा पेशंट्सना परस्पर ‘ठकार इथं काम करीत नाही’ म्हणून पिटाळते.” 

"“ठकार गप्प का बसते?” 

"“ती खूप सहनशील आहे. पण तिला जबरदस्त फ्रस्ट्रेशन आलंय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ती जिद्दीने एम्.डी. झाली. कामाला वाघ आहे. एक क्षण रिकामी बसत नाही. आनंदी, टवटवीत वृत्तीची आहे. क्लिनिकल वर्क हे तिचं कर्तृत्वाचं क्षेत्र आहे. बिचारी एम्.डी. म्हणून सर्व्हिसमध्ये आली. वीस वीस तास काम करायची. पण रिटायर होताना मात्र क्लार्क म्हणून रिटायर होईल.” 

"“शी शुड फाइट फॉर हर राइट्स.” 

"“तिच्या ऑफिसातलं तिचं रायटिंग टेबल तिने कोणत्या भिंतीकडे तोंड करून ठेवावं, इथपासून आईचे निर्बंध आहेत. इतरांना सात तास ड्युटी तर ठकारला आठ तास. हॉस्पिटलचा लेबर स्टाफ स्वतःच्या घरकामासाठी वापरते आई. मर्जीतली डॉक्टरमंडळी जेमतेम दोन-तीन तास ड्युटी करून आराम करतात.” 

"“हे चालतं?” 

"“कोण बोलणार? शेपट्या हातात ठेवायच्या हे मुख्य धोरण. अडवणूक हे तत्त्व. मावशी, हे काहीच नाही. डॉक्टर नारिंगे म्हणून एक डॉक्टर होता. उत्कृष्ट चित्रकार आहे तो. रक्तदान मोहीम, दारूबंदी, एड्स असले सप्ताह असले की त्याच्याकडून अप्रतिम पोस्टर्स, बॅनर्स बनवून घ्यायची. त्याची एकच मागणी होती. तो भत्ता वगैरे न मागता कितीही ओव्हरटाइम करायला तयार असायचा. फक्त तीन तास ड्रॉइंग क्लासला जायला वेळ द्या, एवढीच सवलत हवी होती. आईच्या हातात असून तिने ती सवलत दिली नाही. त्याने रिप्रेझेंटेशन केलं तर त्याची थेट कांदिवलीला बदली केली. हे पुन्हा नियमांवर बोट ठेवून. वरची माणसं आपोआप गप्प बसतात. त्या ठकारला तर सळो की पळो करते. तिला अधिकार असून टेलिफोन नाही. कोणत्या तरी एका वॉर्डाचं रिनोव्हेशन चालू आहे. सहा महिने काम चालेल. तिथं फोन पडून आहे, पण तो ठकारला मिळणार नाही. तुम्ही कंटाळला असाल, तरी एक किस्सा सांगते. अशाच एका वॉर्डामधला फोन बंद पडला होता. ते आईला समजलं. तिने त्या ठकारला माझ्यासमोर सुनावलं.

"ठकारने शांतपणे विचारलं, 

"‘स्वतःच्या वॉर्डमधला फोन बंद आहे, हे प्रथम वॉर्ड सिस्टरने सांगितलं पाहिजे, तेही टेलिफोन ऑपरेटरला. बॉम्बे टेलिफोन्सची माणसं आठवड्यातून एकदा चेकिंगसाठी येतात तेव्हा ऑपरेटरने त्यांना सांगायला हवं. आणि तरीही काम झालं नाही तर ठकारबाईंकडे तक्रार यायला हवी.’ आई त्या डॉक्टर ठकारना म्हणाली,‘जो फोन दोन महिने बंद होता, तो मी एका मिनिटात सुरू केला. तुमचं लक्ष कुठं असतं?’ ती ठकारबाई मूळची सुसंस्कृत म्हणून गप्प बसली. ती निघून गेल्यावर मी आईला विचारलं,‘आगीचे बंब काही गावभर, आग लागली आहे का?’–अशा चौकशा करीत भटकत नाहीत. पंचवीस वर्षं अहोरात्र हिक्टॅस्टमी, सीझर्स करीत आयुष्य वेचीत घालवलेल्या एम.डी. डॉक्टरने असली कामं करायची का?’ ”. 

"वीणा नुसती हसली. चंदा न राहवून म्हणाली, “

"धिस इज नथिंग. हैद्राबादला गायनॅक कॉन्फरन्स होती. आमच्या आईने ठकारचा अर्ज दाबून ठेवला आणि ज्या बाईला इंटरेस्ट नव्हतं आणि जी महिन्यानंतर कॉर्पोरेशन सोडून जाणार होती तिला मुद्दाम पाठवलं. काय म्हणावं या वृत्तीला?” 

"“म्हणूनच दुबईला चल.”"
................................................................................................

"त्यानंतरच्या आठ-दहा दिवसांत वर्षाने नवऱ्याला आणि त्याहीपेक्षा चंदाला सळो की पळो केलं. तीनच माणसांच्या संसारातली दोन माणसं हातातून निसटून चालली होती. नवऱ्याबरोबर पतिपत्नीचं नातं वर्षाने बाहेरून कडी लावून, त्याला पकडण्याचा सापळा रचल्यापासून नवऱ्यानेच संपवलं होतं. नवऱ्याचं मग नक्की काहीतरी असणार ह्या भ्रामक कल्पनेने ती पछाडली होती. काहीतरी असणार आणि तेही घटस्फोट घेऊनही पुनर्विवाह न करणाऱ्या सविताबरोबरच, हा ठाम ग्रह होता. पकडता येत नव्हतं. स्वतःच्या जास्तीच्या वयाची दहशत होती. चंदाला तर आता पंख फुटलेले होते. आकाश अमर्याद असलं तरीही उड्डाणाला कुणीतरी दिशा द्यावीच लागते. दुर्दैवाने वीणा भेटली. चंदा हां हां म्हणता भाळली असेल का?"
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 04, 2022 September 04, 2022
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
Taptapadi (Marathi) 
by V.P. KALE  (Author)  
................................................
................................................
September 03, 2022 - September 04, 2022. 
Purchased September 03, 2022. 

Publisher:- MEHTA PUBLISHING HOUSE 
(1 January 1991)
Language:- Marathi
Format: Kindle Edition
Kindle Edition
Marathi Edition

ASIN:- B01N6IHWAZ
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4962738007