................................................................................................

Hunkar (Marathi)
हुंकार वपु काळे
By V.P. KALE.
................................................................................................
................................................................................................
One story, पहारा, seems to be copied from a key episode of a historically based short series televised in early 1990s, Young Catherine.
As depicted in the series, Young Catherine was confronted with a situation where she was married to the heir to the Russian throne who was incapable of most duties he was expected to perform, and that included providing an heir. Her own mother in law suggested a quiet way out, with a candidate provided. Young Catherine spurned her choice And made her own choice, according to the series - and eventually, the war against her husband, going on to be Catherine the great.
This story is the Indianised version thereof, with a young daughter-in-law and an orphan chosen for the purpose, instead of being secretive and circumspect, meet openly but without yet consummation as per orders.
Author seeks to avoid conflict with conservative readership by the couple refusing not only the secretive consummation but eventually the whole idea.
................................................................................................
................................................................................................
अनुक्रम

TABLE OF CONTENTS

हुंकार
चक्रम
फिरते पंखे
मांजर
कैफ
शिकार
पोरकी
सोनाराने कान टोचले दुसऱ्यांदा
त्याचा येळकोट राहीना
बूमरँग
निर्णय
पहारा
कैफियत
हॉलिडे स्पेशल
‘रिकामी खुर्ची’
अगा जे घडलेचि नाही
तक्षक
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
REVIEW

Introduction

"‘हुंकार’ आणि ‘का रे भुललासी’ ह्या संग्रहांच्या या जरी दुसऱ्या आवृत्त्या असल्या तरी त्यात फेरबदल आहेत. ‘लोंबकळणारी माणसं’, ‘ब्रह्मदेवाचा बाप’, ‘मी, माझी सौ. आणि तिचा प्रियकर’ ह्या न मिळणाऱ्या संग्रहातील निवडक कथा ह्या दोन पुस्तकात प्रकाशित केल्या आहेत. जुन्या काळातल्या बऱ्याचशा कथा आता कालबाह्य वाटतात. त्या कथा कायमच्या पडद्याआड गेल्या तरी चालणार आहे.
"म्हणूनच, तसाच्या तसा संग्रह काढण्यापेक्षा आजही ज्या कथा वाचनीय वाटतील तेवढ्या, ह्या दोन संग्रहांच्या दुसऱ्या आवृत्तीत समाविष्ट केल्या आहेत. ‘लोंबकळणारी माणसं’, ‘ब्रह्मदेवाचा बाप’, आणि ‘मी, माझी सौ. आणि तिचा प्रियकर’ ह्या संग्रहातील इतर कथांचा मी कायमचा निरोप घेतला आहे.
"कथांच्या आवडीनिवडीबाबत मतभेद होणं स्वाभाविक आहे. पण ह्या कल्पनेचं स्वागत तुम्ही जरुर कराल ही अपेक्षा."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................

September 10, 2022 - September 10, 2022.

1. हुंकार

"‘इतक्या अकल्पितपणे भेटशील असं वाटलं नव्हतं.’ फर्स्टक्लासच्या डब्यातला पंखा चालू करीत मी म्हणालो.
"ती ह्यावर नुसती हसली. कपाळावरचा घाम पुसता पुसता तिने हातातली पर्स शेजारी ठेवली."
................................................................................................
"‘शक्यतो लवकर ये. दहा वाजता मला ऑफिसात कामासाठी मुलुंडला जायचं आहे. पाटकरला अपॉइन्टमेंट दिली आहे.’
"‘हूं!’
"तिचा हात हलकेच दाबत मी म्हणालो, ‘जगातला पहिला स्वर म्हणजे परमेश्वराचा ‘हुंकार’ म्हणतात. त्या हुंकाराशेजारी आज तुझा ‘हुंकार’ जाऊन बसला.’"
................................................................................................
"मला नवल वाटलं त्याहीपेक्षा आनंद वाटला. मला कैफ चढला. द्वारका ‘येईन’ म्हणाली. मी बेभान झालो. धुंद झालो. त्याच धुंदीत कापडाच्या दुकानात शिरलो. द्वारकेच्या आवडीची भारीभारी कापडं घेतली. फुलवाल्याला सकाळसाठी अबोलीची वेणी व चाफ्याच्या फुलांची ऑर्डर दिली. द्वारकेला आवडणारा केक घेतला. रात्री दोन वाजेपर्यंत एकट्याने खोली साफ केली, चादरी बदलल्या, अभ्रे बदलले, फर्निचर पुसलं, फार काय, ओल्या फडक्याने जमीनही पुसून काढली. आवडत्या कवितांची वही टेबलावर ठेवली. एक ना दोन. सुचतील, आठवतील– तेवढ्या सगळ्या गोष्टी केल्या."
................................................................................................
"मोटारसायकलवर बसल्यावर पाटकर म्हणाला,
"‘असं वाटतं ऐशीच्या वेगानं गाडी पळवावी. कुठं थांबू नये– काही पाहू नये. होईल ते होईल. पण म्हटलं मागं तू आहेस!– भावनेला विवेकाची पराणी हवीच. स्वप्नाला जाग हवी.’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 10, 2022 - September 10, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
2. चक्रम

"मग एकदा मी मोगऱ्याची दोन फुलं पाकिटात घातली आणि सरळ सरळ वर्गात बेचाळीस दुणे चौऱ्याऐंशी मुलींच्या नजरेच्या पाहाऱ्यात भागवत मास्तरांना ते पाकीट दिलं. ते देताना, ‘वडिलांची चिठ्ठी आहे’ असं म्हणण्याची अर्थातच खबरदारी घेतली. ‘नंतर पाहतो’ असं म्हणत मास्तरांनी खिशात टाकलं."
................................................................................................
"सबंध आठवडा ते शाळेला आलेच नाहीत. त्यानंतर मला डिबेटिंगमध्ये पहिला आलेला श्रीनिवास देवधर भेटला. पण नंतर मग तसे बरेच भेटले. प्रत्येकजण मला आवडायचा. खरं प्रेम कुणावर केलं ह्याचा मला तसा पत्ता लागलाच नाही. परत मी मास्तरांकडे वळले नाही एवढे निश्चित. म्हणूनच आठ दिवसांनी शाळेत आलेल्या मास्तरांना त्यांना फार उशीर झाल्याचं कळलं आणि मग मोगरीच्या फुलांची एकुलती आठवण विसरताना त्यांना फार प्रयास पडले.
"कालांतराने बॅडमिंटन खेळणारा सुरेश दूर राहिला, डिबेटिंगमधला श्रीनिवास बाजूला राहिला, गाणारा रवी, उत्तम पोहणारा बबल्या, नाटकात हमखास चमकणारा रमेश सगळे सगळे आले व गेले. जड पावलांनी उगवणाऱ्या दिवसांना फक्त फुलपाखरांचे पंख लावून गेले हे सगळे, आणि मग एके दिवशी ‘हे’ आले, पसंत करुन गेले आणि हां हां म्हणत लग्न लावून मोकळे झाले."................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 10, 2022 - September 10, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
3. फिरते पंखे

"खरोखरीच शांताराम बोडस अगदी साधा होता. ह्या शतकात न शोभणारा. डावपेचाचं वारं न शिवलेला. निंदा, हेवा, टवाळी हे शब्द त्यानं फक्त शब्दकोशातच वाचलेले आणि वाचल्याबरोबर लगेच विसरलेले असावेत. त्याचं जीवन दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेसारखं होतं. त्याला स्वत:चा असा मंद, पण निश्चित वेग होता. त्या वेगापेक्षा जास्त वेगानं ते कधी धावलंही नाही आणि अडथळ्यापाशी फार वेळ रेंगाळलंही नाही. सुरुवातीला वाटला त्यापेक्षा बोडस खूप निराळा होता. परिस्थितीनं तो गांजलेला होता. माझ्या आणि त्याच्या प्राप्तीमधे जमीन-अस्मानाचा फरक होता. पण यशस्वी आयुष्यक्रमाच्या दृष्टीनं शांताराम निश्चित वरचढ होता. त्यानं आयुष्य हा एक विषय समजून त्याचा अभ्यास केला होता. काही आडाखे बसवले होते. आकडेमोड हातात ठेवली होती. माझं आयुष्य मात्र खुर्द्यासारखं होतं. त्याला बांधीलपणा नव्हता, चाकोरी नव्हती, कड नव्हती. शांताराम माझा हा बेहिशेबी कारभार पाहून गलबलायचा. घाबराघुबरा व्हायचा. त्याला माझ्यासाठी खूप काहीतरी करावंसं वाटायचं. मला कुणीतरी फसवील ह्याची त्याला धास्ती वाटायची. तो मला त्याच्याकडून जेवढं जपता येईल तेवढं जपू लागला. सरसकट सगळे पैसेवाले लोक पैशाच्या व्यवहारात भोळे असतात, कारण पैशाची काळजी करण्याचं त्यांना कारण नसतं आणि म्हणूनच बाकीचे लोक त्यांना फसवायला टपलेले असतात असा त्याचा सरळसरळ समज होता. अशा सगळ्या माणसापासून मला वाचवलं पाहिजे हे त्याचं ठाम मत होतं आणि तशी जबाबदारी त्यानं आपण होऊन उचलली होती. माझ्याकडे तो वेळात वेळ काढून धावतपळत यायचा तेव्हा त्या येण्यामागं मला सावध करण्याचा हेतू असायचा. कोणती वस्तू कोणत्या दुकानात किती नव्या पैशांनी स्वस्त आहे हे तो न विचारता मला सांगायचा."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 10, 2022 - September 10, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
4. मांजर

"मुलाची तक्रार.
"‘आईने माझे मांजर सोडल्यामुळे मी दु:खी आहे.
"आई तुम्हाला आवडत असली तरी तुम्ही तिला पोलिसकडे द्या.
"समाप्त.’"
................................................................................................
"‘कुठाय बबड्या?’
"‘मार्इंच्या घरात दिवसभर रडत बसलाय. जेवलादेखील नाही. शाळेतून आल्यावर सगळ्यांनी समजूत घातली– पण त्याचा आपला एकच सूर, माझं मांजर हवंय. आत्ता पाच वाजता कंटाळून उपाशी पोटी झोपलाय.’"
................................................................................................
"–मी जेमतेम कुलूप काढलं. दरवाजा उघडला, आतल्या सगळ्या मांजरांचा ‘कोरस’ चालला होता. मांजरं खोलीभर पसरलेली होती."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 10, 2022 - September 10, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
5. कैफ

"‘ऑपरेशनच्या आधी तासभर मी हॉस्पिटलमधे गेले तर, ही धामधूम. आदल्या दिवशी रात्रीच ते पळून गेले होते. चिठ्ठी नाही, चपाटी नाही, काही नाही. आज ह्या गोष्टीला सहा वर्षं झाली. त्यांचा पत्ता नाही. पाठीशी पपा आहेत म्हणून मी इतपत आहे. ते नक्की परतणार आहेत. ते जीव द्यायचे नाहीत. असाच कोणता तरी विक्रम करताना ते मला सापडतील. एका तऱ्हेनं, ते असताना मला वाटायचं की विजयला त्यांच्यापासून दूर ठेवायचं. त्यांची सावली नाही पडू द्यायची. पण तसं झालं नसतं!– गेली सहा वर्षं कुठं आहेत ते!– तू आज विजयची हकिगत सांगितलीस आणि पडताळा आला. ते इथंच आहेत. विजयमध्ये आहेत. म्हणून म्हणाले, उपयोग नाही रागावण्याचा! हे रक्त आहे. ती वृत्ती आहे. त्यांच्या परंपरेनं जोपासलेली उसळी आहे. लाट आहे. ती मला थोपवता येणार नाही, आडवता येणार नाही की वळवता येणार नाही. नुसतं पाहात बसायचं, पाहात बसायचं...’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 10, 2022 - September 10, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
6. शिकार

"‘सांगायलाच हवं. कारण ह्या शिकारीत सावजाला वाटतंय आपण शिकारी म्हणून!’
"‘म्हणजे?’ शरदने बुचकळ्यात पडत विचारलं.
"‘तेच तर सांगतोय. माधुरी म्हणते मी तुमच्यावर उपकार केले म्हणून. पण खरे उपकार तुमच्या काकांनीच केलेत तुमच्यावर. तुम्हाला पुरविलेलं शिकारीचं सामान मी काकांच्याकडूनच आणलेलं होतं.’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 10, 2022 - September 10, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
7. पोरकी

"आणि मग गाडी हलली. सगळ्यांचे डोळे पुन:पुन्हा भरुन आले. सरितेनं मोठा हुंदका दिला. श्रीनिवासनं तिला जवळ घेतलं. स्थितप्रज्ञ होता गोपाळकाका!
"पण ही स्थितप्रज्ञता केवळ टॅक्सीत बसेपर्यंत टिकली. टॅक्सी सुरु झाली तशी त्यानं दोन्ही मुलांना कडकडून मिठी मारला१ आणि ओक्साबोक्सी रडत तो बायकोला म्हणाला, ‘आज मुलं पोरकी झाली.’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 10, 2022 - September 10, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
8. सोनाराने कान टोचले दुसऱ्यांदा
................................................................................................
................................................................................................
"जेवणाचं बिल देण्यासाठी बाबल्यानं जेव्हा दहाच्या दोन नोटा बशीत टाकल्या तेव्हा मला उगीचच तीन दिवसांचा पगार डोळ्यासमोर आला. बशीत किती पैसे परत आले हे मी मोजू शकलो नाही. पण टीप म्हणून जेव्हा बाबल्यानं दोनची नोट ठेवलेली पाहिली, तेव्हा मला वेटरचाच हेवा वाटला.
"‘आज चांदणी रात्र आहे. पुन: समुद्रावर जायला तुला आवडेल का?’– बाबल्यानं मला विचारलं. मी मानेनंच होकार दिला.
"टॅक्सीत बसल्यावर बाबल्या म्हणाला, ‘चलो नरीमन पॉइण्ट.’
................................................................................................
"‘चांगले गुण दाखविलेत.’– इथपासून नानांनी जी सुरुवात केली ती विचारु नका. बाबल्यानं टॅक्सीवाल्याचं बिल बुडविलं होतं. तो आता पोलिसांच्या कच्च्या कैदेत होता. टॅक्सीवाला दाजींकडे गेला होता. तिथे टॅक्सीवाल्याकडून आमच्या दोघांचा सगळा कार्यक्रम दाजींना व दाजींकडून नानांना समजला होता. दाजींनी टॅक्सीवाल्याचं सबंध रात्रीचं बिल दिलं होत. मी सकाळी दाजींच्या घरी गेलो नसतो तर त्यातून सुटलो असतो पण दाजींकडून कसला आलाय धोका?– ह्या विचाराने मी त्यांना ऐटीत भेटलो आणि तिथंच चुकलं होतं. जी जागा आपल्याला खूप सुरक्षित वाटते तीच गोत्यात आणते.
"–दाजींसारख्या सोनारानं– ह्या वयात, माझे परत कान टोचले होते– दुसरं काय?"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 10, 2022 - September 10, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
9. त्याचा येळकोट राहीना
................................................................................................
................................................................................................
"‘संशय येऊनही तुम्ही बोलू शकला नसाल. तुमची किती कुचंबणा झाली असेल!’
"‘अग पण का?’
"तरी त्याच स्वरात, भारावलेल्या आवाजात, हुंदके आवरीत भारती म्हणाली, ‘मला वाटलं होतं... एवढा मोटारवाला झाल्यावर तरी कम्याची ही सवय गेली असेल. कम्याला काय मिळतं असं वागून?...’
"बोलण्यासारखं उरलं नव्हतं. भारतीचा हात मी सोडून दिला. खिडकीतून उघड्या आकाशाकडे पाहताना लहानपणचा अभंग आळवून गेला.
"‘त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना!’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 10, 2022 - September 10, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
10. बूमरँग

"ललिता पण पुन: गंभीर झाली व मूळ विषयावर येत म्हणाली, ‘फार विचार करण्यात अर्थ नाही. तुमची योजना मला पटली आहे व तुम्हाला आणखीन् एका बायकोची गरज आहे ह्याची खात्री पटली आहे.’"
................................................................................................
"शांतपणे ललिता म्हणाली, ‘असं ओरडायचं नाही गडे. वाटाघाटींना अनिष्ट वळण लागेल. आणखीन एका पुरुषाचीच गरज जास्त आहे ह्या घरात. परवा तुम्ही दोन महिने आजारी होतात; तेव्हा डॉक्टरकडे जाण्यापासून ते हॉस्पिटलमधे रात्रीचं राहण्यापर्यंतची काम मला करावी लागली. हेच जर मला आणखीन एक नवरा असता तर ही सगळी धावपळ त्यानं केली असती. शिवाय त्याची नोकरी राहिली असती चालू ते निराळाचं. असंच करु या. मीच आणखीन एक लग्न करते. घरात तुमच्या गैरहजेरीत वावरणारा पुरुष माझा नवरा आहे म्हटल्यावर लोकांचा प्रश्न नाही. तुम्ही रात्रीचे आरामात गोष्टी लिहीत बसा; आम्ही नाटकांना जात जाऊ. परतताना मलाही अगदी घरची सोबत होईल...’
"ललिता आता दुसरा नवरा असल्याचे फायदे सांगू लागली. पण आता माझ्या कानात दडे बसायला लागले. पुढचं काही ऐकू येईना. पण आता पळता येणार नव्हतं. तेवढ्यात परमेश्वरच हाकेला धावून आला! रस्त्यावरुन कोणी तरी मला मोठ्यांदा हाक मारली. तसे मुंबईकर चांगले. नवराबायकोच्या चर्चेत नवऱ्याची हार होऊ लागली की नेमके त्यांची सोडवणूक करायला येतात.
"‘मी आलो हं’ असं म्हणत मी गॅलरीत धावलो. पुन: मी चर्चेला सुरुवात करणार नाही, हे ललितेला माहीत आहे. तीही मिस्किलपणे हसून आत गेली. ललिता ‘शार्प’ आहे. हे मी प्रथमच सांगितलं. हार पत्करुनही तिच्याशी चर्चा करायला आवडते; पण तरीही हे असे दोन ‘स्ट्रेट गेम्स’ घेणं ठीक नाही; कारण दुसऱ्या नवऱ्याचे फायदे तिनं मला इतके मुद्देसुदपणे पटवून दिले असते की, मी नकळत तिला ‘दुसरं लग्न कर’ असं म्हणालोही असतो; कारण ललिता खरोखरच ‘शार्प’ आहे!"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 10, 2022 - September 10, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
11. निर्णय

"केव्हातरी ऊर्मिला आपल्यासमोर येणार ह्याची अटकळ धूर्त मार्इंनी केलीच होती. मनुष्यस्वभावाची पारख एवढी चोख व अचूक म्हणूनच नवऱ्याच्या मागं त्या एवढा सगळा व्याप संभाळून होत्या. ऊर्मिलेसारख्या मुलीची सून म्हणून निवड करताना टाकलेले डाव वाया गेले नव्हते. तिथंही त्यांचे आडाखे व फासे अचूक पडलेले होते. त्या मुलीला आपण वाकवू शकू ह्याची अटकळ, वधूपरीक्षेच्या वेळी मिळालेल्या उत्तरांवरुन त्यांनी बांधली होती; आणि त्यांतूनही अंदाज चुकलाच, तर आपलं सगळं कर्तृत्व पणाला लावल्यावर एवढ्याशा मुलीची काय कथा हा आत्मविश्वास मार्इंना होताच!
................................................................................................
"‘लक्षात ठेव मुली, घराण्याला वारस हवाय’– अशी प्रेमळ सूचना पहिल्याच रात्री ऊर्मिलेला दिल्यावर मार्इंनी ऊर्मिलाकडं पाहिलंच नाही. त्या लगबग वृंदावनाजवळ आल्या. ऊर्मिलेकडून आपल्याला हवी असलेली गोष्ट साध्य करुन घेताना फार सावधगिरी बाळगायला हवी हे त्यांनी हेरलंच होतं, त्या सावधगिरीची सुरुवात, ऊर्मिलेला नुसतं अस्वस्थ करुन सोडायचं एवढीच होती. वास्तविक, ह्यापेक्षा दुसरा एखादा मार्ग सरळ– सोपा ठरला असता. पण पुष्कळदा सरळ आणि सोप्या मार्गावर मांडलेले हिशोब लवकर सुटतात. आणि केव्हा केव्हा नको असलेली उत्तरं स्वीकारावी लागतात. मार्इंना हे नको होतं. त्यांना उत्तर हवं होतं आणि ते सुद्धा त्यांना हवं ते उत्तर हवं होते! आणि तेवढ्यासाठी त्यांनी आजवर योजलेले उपायच इथं मांडण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. समोरच्या व्यक्तीला आधी थक्क करायचं, त्याची बुद्धी बधिर करायची आणि मग, ती व्यक्ती अगतिक झाली की, स्वत:ला हवे असलेले तिला निर्णय घ्यायला लावायचे!
................................................................................................
"‘अजून नाही समजलं?– दोष काय फक्त एकाच व्यक्तीत असतो काय?–
"–ऊर्मिला चमकली. तिला आता एकदम सगळ्याचा उलगडा झाला."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 10, 2022 - September 10, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
12. पहारा

This story seems to be copied from a key episode of a historically based short series televised in early 1990s, Young Catherine.
As depicted in the series, Young Catherine was confronted with a situation where she was married to the heir to the Russian throne who was incapable of most duties he was expected to perform, and that included providing an heir. Her own mother in law suggested a quiet way out, with a candidate provided. Young Catherine spurned her choice And made her own choice, according to the series - and eventually, the war against her husband, going on to be Catherine the great.
This story is the Indianised version thereof, with a young daughter-in-law and an orphan chosen for the purpose, instead of being secretive and circumspect, meet openly but without yet consummation as per orders.
Author seeks to avoid conflict with conservative readership by the couple refusing not only the secretive consummation but eventually the whole idea.
................................................................................................
"–माई पहिल्यांदा ह्या आघातानं अगतिक झाल्या. पराभव न पाहिलेल्या मार्इंना हा पराभव पचवणं कठीण जाणार होतं. परिस्थितीला काबूत ठेवणाऱ्या माई आता परिस्थितीच्या अधीन झाल्या.
"–आणि ह्याला कारणीभूत होती ती काल परवा घरात आलेली पोर! ह्या कानाचं त्या कानाला कळू न देता गोष्टी उरकायच्या तर चालली ही हास्यविनोदाचे डांगोरे पिटीत!"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 10, 2022 - September 10, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
13. कैफियत

" ... त्या भेळवाल्यानं तर म्हणे, भेळपुरीवर बिल्डिंग बांधल्याचं समजलं. आमच्या सौ.कडून समजलेली बातमी!
"लक्षात घ्या, म्हणजे ‘सोर्स ऑफ इन्फर्मेशन!’ आमची सौ."
................................................................................................
"मोहितेच्या आगमनानं रखमा-मंजुळा ह्यांच्या हालचालीवर चांगलंच नियंत्रण पडलं, ह्याचा अर्थ त्यांचा व्यवसाय थांबला असं नाही. पण त्या व्यवसायाला जरा शिस्त आली.
"मधे काही दिवस गेले. कसं शांत शांत वाटत होतं. आमच्या सौ.ला काही बातम्या मिळवून द्याव्यात असं ‘पब्लिकला’ वाटत नव्हतं. सौ.चा स्टाफही जरा मोकळा होता. रॉयटरनं गेल्या काही दिवसांत ‘सनसनाटी’ असं काही मिळवलं नव्हतं. स्टाफचे इतर मेंबर्स, आठ वर्षांची बीना, बारा तेरा वर्षाचा श्रीराम (वर्ग चौथा, तुकडी ड, क्रमांक १४) त्याशिवाय सौ.चे चार भाऊ इ. कडून काहीही समजलं नव्हतं."
................................................................................................
"‘आणि काय?– पोलिस खात्याचं हे काम. जॉन तिकडे आणि हा ‘सखाराम’ चव्हाण– हवालदार– पहारा करतोय इकडे.’"

14. हॉलिडे स्पेशल

"–केस वस्तुत: विचित्र!
"– नवऱ्याविरुद्ध सासऱ्याकडेच सुनेनं न्याय मागायचा. पण येतात अशा काही वेळा जेव्हा जगावेगळ्या तऱ्हेनं आधार शोधावा लागतो. चित्रानं हाक घातली होती आणि हातातली कामं टाकून दाजी आले होते."
................................................................................................
"आता आपल्या सुनेला, खात्री पटण्यासाठी पुरावा हवाय. पुरावा!
"कसा द्यायचा?"
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 10, 2022 - September 10, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
15. ‘रिकामी खुर्ची’

"‘आता बोलूच नका! माणसानं माणसासाठी एवढं करु नये म्हणजे काय? हा मी आलोच खाली. पुण्यात काही माझी तारीख खोळंबलेली नाही! येतोच मी!’ बोलता, बोलता दिनकर उठला. धडपडत, नाना प्रकारची सर्कस करीत त्यानं मोठ्या शर्थीनं दरवाजा गाठला आणि दरवाज्यापाशी बसलेल्या लोकांचे शिव्याशाप घेत तो खाली उतरला आणि वेगानं त्या मुलीजवळ आला तो ती मुलगी गाडीत दिनकरच्या जागेवर बसलेल्या एका तरुणाला म्हणत होती,
"– ‘काय माधवदादा, दिली की नाही तुला खिडकीजवळची जागा मिळवून? आता मी जाते घरी, आईला ही गंमत सांगते आणि मारे मला म्हणत होतास, ‘तू कशाला मला स्टेशनवर पोचवायला येतेस’ म्हणून! अच्छा! आता ‘हॉलिडे स्पेशल’ कॅन्सल झाली तरी काळजी नको!...
"– आणि ‘जनता’ हाललीच!"
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 10, 2022 - September 10, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
16. अगा जे घडलेचि नाही
................................................................................................
................................................................................................
" ... त्रिवेणीचा विसर पडू शकेल एवढं चातुर्य, लाघव अनुराधेजवळ नक्कीच होतं. पण चाफ्याच्या सुगंधानं धुंद होणारा माणूस– मोगऱ्याच्या वासाला विसरतो असं थोडंच आहे?"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 10, 2022 - September 10, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
17. तक्षक

"– जागा सोडताना दिनकरनं नऊ हजार पागडी मिळवली होती आणि कमी पडणारे बाराशे रुपये लोकांकडूनच मिळविले होते. त्याशिवाय सरलासारखी प्रेयसी! आणखीन काय हवं?"
................................................................................................
"‘ज्या गृहस्थानं मला पहिल्यांदा मैत्रीच्या नावाखाली पहिला चहा पाजला तिथं माझं पाऊल घसरलं होतं. कारण, त्या चहाने घात केला. त्याचा पहिला फुकट स्पेशल चहा म्हणजे बोरातली आळी होती. त्याचाच पुढे ‘त क्ष क’ झाला. दहाबारा वेळा चहा झाल्यावर मग एका अलिशान हॉटेलात भलं मोठं जेवण झालं! त्या पाठोपाठ लहान लहान भेटीदाखल वस्तू आल्या. ‘ऑफिसर लोक नुसते सहीचे मालक; खरी काम तुमच्यासारखी, हातावर पोटं असलेली माणसंच करतात, तेव्हा अशी प्रेझेण्टस् घेण्याचा अधिकार तुम्हालाच आहे’– अशा स्तुतीची फीत त्या वस्तूंना बांधण्यात येत असे. आतल्या वस्तूपेक्षा आम्ही त्या ‘फितीलाच’ फसत राहिलो. ह्या पाठोपाठ घरातली माणसं!– त्यांनी ह्या प्रकारांना उघड पाठिंबा जरी दाखवला नाही तरी कडवा विरोधही दर्शवला नाही! ‘एखादी गोष्ट न मागता कुणी स्वखुषीनं दिली तर तिचा स्वीकार केला, तर कसलं आलंय पाप?’– अशा तऱ्हेच्या शंकासमाधानांना आम्ही बळी पडत गेलो– ... "
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 10, 2022 - September 10, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 10, 2022 - September 10, 2022.
Purchased September 10, 2022.
Kindle Edition, 152 pages
Published by MEHTA PUBLISHING HOUSE
(first published January 1st 1997)
Publisher: MEHTA PUBLISHING HOUSE
(1 January 1997)
Language: Marathi
Edition language Marathi
ASIN:- B01N464UZJ
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4976768117