................................................................................................

One For The Road (Marathi)
वन फॉर दि रोड
वसंत पुरुषोत्तम काळे
by V.P. KALE (Author)
................................................................................................
................................................................................................
Author does a huge favour, quoting the original sanskrit of the most famous lines of GeetRamayana -
"‘‘यथा काष्ठ च काष्ठ च समेया तां महादधौ ।
समेत्य च व्यपेयातां तद्वत् भूतसमागम:’’"
And subsequently he assumes a license to comment on Gods of India.
Then again, he could have done the latter, done far worse without fear of repercussions, and never done the former.
So one pays the tribute of gratitude owed.
................................................................................................
................................................................................................
अनुक्रम

महाराजा
ब्ल्यू फिल्म
वन फॉर दो रोड
नारदा, अवतार घ्यायलाच हवा
इन्फेक्शन
दिल की शिकायत
इमारत
पुष्कराज
बदली
अनुभव
कॅब्रे गर्ल

REVIEW

"‘‘बाबा, सरलामावशीचे मिस्टर कॅप्टन आहेत, म्हणून दुपट्यावर महाराजाचं चित्र हवंय.’’"
................................................................................................
"घड्याळात पाह्यलं, तर रात्रीचे दोन वाजलेले. मी दार उघडलं आणि अक्षरश: कोलमडलो. दरवाजात महाराजा!"
................................................................................................
"‘‘आमच्या गावाला एक चित्रकार फिरत फिरत आला होता. मी रस्त्यावर खेळत होतो. तो आमचे खेळ पाहत उभा होता. मधेच त्यानं मला बोलावून घेतलं. म्हणाला, ‘मी सांगेन तसा उभा राहशील का? तुला मी खूप पैसा देईन.’ मी ‘हो’ म्हणालो. त्यानं मला मग लाल मखमलीचा अंगरखा, फेटा, तुरा असा पोशाख चढवला. मी कमरेत वाकून उभा राह्यलो. त्यानं त्यावरून चित्र बनवलं आणि माझ्या वडिलांना पैसे देऊन तो निघून गेला. त्यानंतर सहाच महिन्यांनी मला बोलावणं आलं. मी इंटरव्ह्यूला जो गेलो, त्याच क्षणापासून एअर-इंडियात कायम झालो. त्यांनी पगाराची अपेक्षा विचारली. मला तेव्हा काहीच कळत नव्हतं. मी म्हणालो, ‘चिक्कार वेळ विमानात बसवा, पगार नकोच. फुकट फिरवा म्हणजे झालं.’ ते अधिकारी एकमेकांत हसले आणि मी कायम चिकटलो. आज पळून आलो तेव्हा सुटलो.’’"
................................................................................................
"‘‘काय काय सांगणार? - फार आनंदात मी नोकरी पत्करली. मोठमोठ्या माणसांचा सहवास घडायला लागला. फॉरिनला जाणं हा तर खेळ होऊन बसला. पहिले दिवस फार सौख्याचे होते. भरभराटीचे होते. शुद्ध हवेचे होते. विशाल आभाळाचे होते. आनंद होता. रोज भूमातेचं दर्शन घडत होतं, तिच्या अंगाखांद्यावर बागडत होतो तोपर्यंत ती नीट दिसली नव्हती. दुरून, उंचावरून आणखीन विशाल वाटली. दिवस खरंच सुखाचे होते. जमीन लांबून पाहायची आणि आकाश जवळून. पण एकेदिवशी खडबडून जाग आली. आणि आपलं जीवन किती धोक्याचं आहे, ह्याची कल्पना आली.’’
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................

September 02, 2022 - September 02, 2022.

"ऐन तारुण्यात जर कुणी चोवीस तास स्मशानवैराग्य सांभाळू लागलं तर तिडीक येईल नाही तर काय? कितीही लक्ष द्यायचं नाही असं ठरवलं तरीही धोपेश्वरकरचं अस्तित्व तापदायक ठरायचं. मोकळ्या गप्पांवर बंधन पडायचं."
................................................................................................
"‘‘हवालदार बत्तीस अठरा, तुम्ही दरवाजात बसा. कुणाला सोडू नका. चौपन अठ्ठावीस, तुम्ही सगळ्यांची नावं, पत्ते, ऑफिसची माहिती मिळवा.’’
"इन्स्पेक्टरांनी हुकूम सोडला आणि त्यांनी पुढं होत प्रोजेक्टरवर हात ठेवला.
"पाच मिनिटांत प्रोजेक्टरवाला, त्याचा प्रोजेक्टर घेऊन इन्स्पेक्टरच्या पाठोपाठ गेला.
"हवालदारांनी चोपडी काढली. नावं लिहायला प्रारंभ केला."
................................................................................................
"एक हवालदार दरवाजात बसून राह्यला. दुसरा साहेबांना दहा मिनिटांत भेटून आला. प्रत्येकाकडून पन्नास रुपये वसूल करण्यात आले. पंधरा मिनिटांत सातशे-साडेसातशे रुपये जमले.
"सोमवारी सगळे कामावर आले. पण कुणीही एकमेकांकडं पाहत नव्हतं. कुणी कुणाशी बोलत नव्हतं. पन्नास रुपयांचा हिशोब घरी दाखवताना प्रत्येकाला निरनिराळ्या दिव्यातून जावं लागलं होतं."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 02, 2022 - September 02, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
वन फॉर दो रोड
................................................................................................
................................................................................................
"हळूहळू लक्षात यायला लागलं. मी गाडीत आहे. ऑफिसच्या कामासाठी मुंबईला आलो होतो. आता नागपूरला जातोय. संध्याकाळी बढिया ड्रिंक पार्टी झाली. मला गाडीत चांगली कंपनी मिळू दे, अशी दुसरा पेग घेताना सर्वांनी प्रार्थना केली होती. मुंबईतल्या माझ्या या चोर-कंपनीजवळ एवढी पुण्याई असेल हे मलाच काय, पण त्यांनाही माहीत नसावं-म्हणजे...नाही. तुमची प्रार्थना खरी ठरली असं मी आता पत्रानं कळवलं की माझ्यावर जळतील."
................................................................................................
"‘‘यथा काष्ठ च काष्ठ च समेया तां महादधौ ।समेत्य च व्यपेयातां तद्वत् भूतसमागम:’’"

"‘‘भगवंता, हे सगळे मर्त्य मानवांचे सापळे आपल्याला कशाला?’’
"‘‘अवतार घ्यावा म्हणतोय.’’
"‘‘एवढ्यात?’’
"‘‘अवतार ही जुनी भाषा झाली. ‘दौरा’ असं आता म्हणायला हवं.’’"
................................................................................................
"‘‘अरे मग सामान्य माणूस जगतोय तरी कसा?’’
"‘‘त्याचं संशोधन करायचं असेल तर जरूर अवतार घ्या. मी बुवा थक्क झालो.’’
"‘‘कशामुळं?’’
"‘‘ह्याही परिस्थितीत माणसांनी चिकाटी सोडलेली नाही. आशावाद सोडलेला नाही. अशाही अवस्थेत आनंद निर्माण करण्याची त्यांची धडपड पाहून मी धन्य झालो.’’"
................................................................................................
"‘‘नारायणा, रंभा, ऊर्वशी, तिलोत्तमा, मेनका आपल्याला नवीन नाहीत, तरीही दमयंतीला पाहून देवादिकांची अवस्था काय झाली होती?’’"
................................................................................................
"‘‘होय देवा, पण तरीही ते इतके नि:सत्व आहेत, की रेवतीकडे नुसते बघ बघ बघतील, बाकी काही करणार नाहीत.’’
"‘‘नाही सहन होत. ह्या सगळ्यांना लक्ष्मणाची चित्रं वाट.’’
"‘‘हे जगन्नायका, माझ्या कथाकथनात तू विक्षेप आणीत आहेस. मी जर पुराणातलं उदाहरण दिलं तर तुम्हाला ते आवडणार नाही.’’
"‘‘कोणतं उदाहरण?’’
"‘‘नल-दमयंती विवाहाच्या वेळी तुम्ही सगळे ‘डिट्टो’ नलाचं रूप घेऊन गेलात. का?-का गेलात? तुम्हाला स्वर्गात काय कमी होतं? त्या बिचाऱ्या मानवांनी मग नुसतं बघितलं तर...’’"
................................................................................................
"मंडळींकडचे ज्योक्स संपले. वेळही झाला होता. मग ‘कल्याण, डोंबिवली, ठाणा, घाटकोपर, दादर...’ अशा क्रमानं मंडळी निरोप घेऊन गेली.
"गिरगावकर महाचिवट. ‘चालत तर जायचंय, केव्हाही निघू’ असं म्हणत बसून होते. पण त्यांनाही जावं लागलं.
"गाडी परत येईतो साहेब इथंच थांबणार, तेव्हा किती थांबणार?"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 02, 2022 - September 02, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
इन्फेक्शन
................................................................................................
................................................................................................
"हमाल गेला आणि मी त्या पसरलेल्या सामानाकडे पाहत राह्यलो. जुन्या जागेत आपण किती सामान ठेचून भरलं होतं ह्याची कल्पना, प्रत्येक वस्तूनं आता आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवल्यावर मला आली. काय आवरावं आणि कसं, हेच कळेना. डाळ, तांदूळ आणि गहू हे तिन्ही एकत्र झालं तर गहू बाजूला करायला सुरुवात करावी, की डाळ, की तांदूळ, हे जसं कळणार नाही तसं माझं झालं."
................................................................................................
"मी जरा गंमत करायचं ठरवलं. कागद ओढला आणि लिहिलं.
"सोमवारी- ७।। वाजता, मंगळवारी ६। वाजता, गुरुवारी ८ वाजता, रविवारी सकाळी ९ वाजता आणि संध्याकाळी ४ वाजता येत आहे. शुक्रवार, शनिवारच्या वेळा तुमच्या कळण्यावर अवलंबून आहेत. परिचय आहेच, पहिल्या चहापानाच्या वेळेस तो जास्त जास्त दृढ होत जाईल.
"माझ्या ह्या निरोपावर त्याची चिठ्ठी आली-
"अवश्य!
"दिगंबर छत्रे."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 02, 2022 - September 02, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
दिल की शिकायत
................................................................................................
................................................................................................
"वास्तविक, धैर्यवानांनी चिंताग्रस्त व्हावं अशी ती बाब बिलकूल नव्हती. हृदयावरची शस्त्रक्रिया करणारे अख्ख्या हिंदुस्थानात ते एकटे ‘सर्जन’ आणि त्यांनी प्रॅक्टिस चालू केल्यापासून त्यांनी ऑपरेशन केलेली एकही ‘केस’ दगावली नव्हती. अशी परिस्थिती असूनसुद्धा ‘मधुराणी’चं ऑपरेशन करायचं ठरवल्यापासून त्यांची मन:शांती ढळली होती. त्यांच्या मनावर कसलं तरी अज्ञात दडपण पडलं होतं. त्यांचा कुशल हात जड झाला होता. एकदा तर आपण ही केसच नाकारावी असाही विचार त्यांच्या मनात येऊन गेला. पण मग लाखो तरुणांच्या, तरुणींच्या हृदयांत स्थान मिळवलेल्या सर्वश्रेष्ठ अभिनेत्री मधुराणीला कोण वाचवणार होतं?"
................................................................................................
"धैर्यवानांच्या हॉस्पिटलमधून बाहेर पडलेल्या एका पेशंटनंच मधुराणीला ‘स्पेशल’ खोलीत पाहिलं होतं. आणि ती बातमी फोडण्याचं ‘क्रेडिट’ स्वत: मिळवलं होतं. आणि तेव्हापासून हॉस्पिटलचा फोन क्षणभरदेखील रिकामा राहिला नव्हता. फोनवरून चौकशी करून समाधान लाभेना, तशी पत्रव्यवहाराला सुरुवात झाली. अनेक तरुणींनी संध्याकाळचं चौपाटीवरचं फिरणं बंद केलं होतं, आणि देवीच्या देवळात ‘मधुराणी’साठी प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली होती. तर देवादिकांवर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांनी-तरुणांनी देवाला सत्यनारायणाच्या पूजेचं आमिष दाखवल्याचं पत्रांतून लिहिलं होतं."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 02, 2022 - September 02, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
इमारत
................................................................................................
................................................................................................
"नव्या इमारतीचा चेहरा एकाएकी उतरला. ती थोडीशी जुनी दिसायला लागली.. तिचा क्षणभर समोरच्या इमारतीवर विश्वास बसला नाही. पण ती उगीचच एखाद्याबद्दल खोटं का सांगेल असंही तिला वाटून गेलं. ती काहीशी स्वत:शी म्हणाली,
"‘‘तो तसा वाटला नव्हता.’’
"‘‘आता असा प्रत्येकाचा अनुभव येईल तुला.’’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 02, 2022 - September 02, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
पुष्कराज
................................................................................................
................................................................................................
"डोळ्याला बारीक काड्यांचा चष्मा. त्याच्या काचा आणि काड्या दोन्ही चकाकत होत्या.
"सोन्याचांदीचं दुकान. इथं सगळंच मखमली पेट्यांसारखं मऊ आणि उरलेलं सगळं चकाकणारं.
"दागिने, चांदीची भांडी, चष्म्याच्या काचा, काड्या आणि टक्कलही."
................................................................................................
"गरजवंताला अक्कल असली तरी नोकरी नसते. मी मानेनंच ‘हो’ म्हणालो. तोंडानं ‘हो’ म्हणताना थोडी का होईना जिभेची हालचाल होणारच."
................................................................................................
"सोन्याचा आजचा भाव रु. तीनशे पंचाहत्तर ह्या पाटीवर ‘आपट्यांचा एक तोळा आवाज रु. तीनशे ऐंशी’ असं मला लिहून ठेवावंसं वाटायचं. सोन्याच्या भावाशेजारी आणखी एक पाटी होती. सगळ्या दुकानांत सापडते तशी, पण तितकीच खोटी. ती म्हणजे ‘गिऱ्हाइकांचा संतोष हाच आमचा फायदा.’ ज्याप्रमाणे रंगभूमीवरचा प्रत्येक नट, रंगभूमीची सेवा करण्यासाठीच नट होतो, त्याप्रमाणे प्रत्येक दुकानदार हा केवळ गिऱ्हाइकाच्या संतोषासाठीच राबतो.
"त्या पाटीकडे बघून मला रोज हसायला यायला लागलं. वाटायचं केव्हातरी आपट्यांना विचारावं,
"‘काय हो, तुम्हाला धंद्याच्या वेळी विनोद वर्ज्य आहे, मग ही पाटी इथं कशी चालते?’"
................................................................................................
"पैसा पुरत नाही तिथं पुष्कराज काय करणार? काँग्रेसपेक्षा पुष्कराज बलाढ्य कसा होणार? बायकोशी पटत नाही, म्हणे पुष्कराज वापरा. हाताचीच काय पण पायाची बोटं धरून एका बोटात पाच ग्रहांच्या अंगठ्या बसवल्या तरी ‘पत्नी’ ह्या ग्रहापुढे सगळ्या पालथ्याच पडणार. तिथं ग्रहांची अंगठी लागत नाही तर ‘अनुग्रहाची’ अंगठी लागते हे भुस्कुट्यांना कोण सांगणार? आणि ‘अनुग्रह’चा खडा पैसे मोजून मिळत नाही हे कोण पटवणार?"
................................................................................................
"आपटे, आठवले, पणशीकर, पुरोहित, दाते, रानडे, शहाडे, बेडेकर, भागवत ह्या चालीवरची आडनावं धारण करणाऱ्यांपैकी कुणीही एक व्यवहारात, प्रवासात फसला असं कधी घडेल काय?"
................................................................................................
"सात ते आठ महिन्यांच्या कालावधीनंतर भुस्कुटे जेव्हा पुन्हा दुकानात आले तेव्हा भुस्कुटे वाळले होते आणि दुकानाला बाळसं आलं होतं. भुस्कुटे दुकानाचा कायापालट पाहतच राह्यले. दुकानाला चारही भिंतींना वॉलपेपर लावलेला होता. शोकेसेसना प्रमोशन मिळून सनमायकाची राजवस्त्रं त्यांच्या अंगावर चढली होती. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या फॉल्स सिलिंगच्या भुलभुलैय्याखाली दुकानाचं जुनं छत झाकलं गेलं होतं. नर्तकीप्रमाणे कमरेत वाकलेले दिवे चारही भिंतींवर प्रकाशझोत फेकत होते. जुना कावळ्यासारखा काळा टेलिफोन नाहीसा होऊन त्या जागी नवा प्रियदर्शनी फोन आला होता. गिऱ्हाइकांना बसण्यासाठी लाकडाची दोन डगडगणारी स्टुलं होती. त्यांची जागा डनलॉप आणि फेदरटच रेक्सीनच्या गोल खुर्च्यांनी घेतली होती. दुकानाचं ‘शॉप’ झालं होतं आणि गिऱ्हाइकांना ‘कस्टमर’ किताबत मिळाली होती."
................................................................................................
"कुणी भाबडेपणानं विचारलं, ‘पुष्कराज लाभतो का हो?’ -तर सांगावंसं वाटतं, ‘तो फक्त विकणाऱ्यांना लाभतो आणि विकणारे म्हणजे तुम्ही नव्हेत, तर दुकानदार. त्यांना तो लाभतो.’ पण हा प्रश्न मला चौपाटीवर विचारा. दुकानात नको. ... "
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 02, 2022 - September 02, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
बदली
................................................................................................
................................................................................................
"मुळात दादा दामले हा संथ गडी. धावपळ, दगदग न पेलणारा. तो बँकेत आला की शेजारचा कॅशिअर म्हणायचाच,
"‘‘आली, ‘संथ वाहते कृष्णामाई’ आली.’’
"त्यामुळे त्या दिवशी दादाची टोटल मारताना तिरपीट उडाली. बँकेतले इतर दोघंही त्यापायी रखडले. कोणती एन्ट्री चुकली ह्याचा दोन तास पत्ताच लागेना.
"शेवटी चूक सापडली आणि तिघंही सुटले."
................................................................................................
"‘‘बदली? –म्हणजे?’’
"‘‘म्हणजे भुतांनाही नोकऱ्या असतात. काही ना काही व्यवसाय असतो. आमच्या राज्यातल्या नियमाप्रमाणे माझी आता बदली झाली आहे. मी दोन दिवसांपूर्वी इथं आलो. कुलाब्यापासून बोरीवलीपर्यंत भटकलो. जागा नाही, तेव्हा आज इथं आलो. ह्या जागेवर माझं प्रेम होतंच. आलो. तुझा संसार पाह्यला. मला माणसं आवडली. तेव्हा तुमच्याकडं राहायला येऊ का?’’"
................................................................................................
"तिसऱ्या दिवशी पाणी नाही म्हटल्यावर गणपुलेनं भल्या पहाटे भांडायला सुरुवात केली.
"‘‘दामल्या, साल्या, नळाला काय केलंस बोल.’’
"‘‘मला माहीत नाही.’’
"‘‘एकाएकी माझं पाणी बंद का झालं?’’
"‘‘मला माहित नाही.’’
"‘‘गादीसकट तुला फेकून देईन.’’
"‘‘गादीला हात लावून बघ, मग सांगतो.’’
"ह्या धमकीनंच गणपुले टरकला. तणतणत घरात गेला. आपला नवरा इतक्या खंबीरपणे बोलू शकतो? ... "
................................................................................................
"‘‘अहो, घर हल्ली इतकं स्वच्छ दिसतं. तावदानांवर धूळ नाही. पंखा किती दिवसांत पुसला नाही तरी स्वच्छ राहतो. कुठंही जळमटं नाहीत. कोळिष्टकं नाहीत. नवल आहे की नाही?’’"
................................................................................................
"दुसऱ्या दिवशी साडेबारा वाजता बँक बंद झाली. आता कॅश मोजायची, हिशोब बघायचा असं दादा स्वत:शी म्हणतोय तोच कानाजवळ आवाज आला.
"‘‘शंभराच्या अठ्ठावीस, विसाच्या सत्तेचाळीस, दहाच्या पाचशेएकवीस, पाचाच्या तीनशे एकाहत्तर, दोनाच्या एकसष्ट आणि एकाच्या चारशेबहात्तर आहेत.’’
"‘‘म्हणजे एकबोटे...’’
"‘‘कॅश मोजून तयार आहे. नुसतं सांगतो ते आकडे लिहा आणि झकास झोप काढा. संध्याकाळी पुन्हा येतो.’’"
................................................................................................
"‘‘तो क्षण प्रत्यक्ष उगवला की वाईट वाटतंच. ‘बदली बदली’ म्हणून नाचत होता, आता चेहरा पाहा कसा उतरलाय!’’"

"‘‘संपादकांना शृंगारिक कथा हवी आहे.’’
"‘‘मग मजाच की!’’
"‘‘मजा काय लेका? आफत आहे.’’
"‘‘क्यों?’’
"‘‘मी कधी शृंगारिक लिहितो?’’
"‘‘मग नकार दे.’’
"‘‘चार-पाच वर्षं तेच केलं.’’
"‘‘बरं, मी काय करू?’’
"‘‘मला मदत कर.’’
"‘‘इतकंच ना? मी शृंगार करतो, तू कथा लिही.’’"
................................................................................................
"‘‘मला सगळं सांगायला सवड नाही. हा गठ्ठा उचल. हा कागद ठेव. ह्या कागदावर पुस्तकाचं नाव आणि वाचायची पानं हा सगळा तपशील आणलेला आहे. आज हेडक्लार्क हणमंत्याची रजा आहे. त्याच्या केबिनमधे बस. मी दोघांची टेबलं सांभाळतो. जा, पळ.’’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 02, 2022 - September 02, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
कॅब्रे गर्ल
................................................................................................
................................................................................................
"बारा तारखेचं पत्र उशीरा दिल्यानं बावळे जाम वैतागला होता. सगळं आटपून बोरीबंदरला वेळेवर पोहोचायचं म्हणजे फार वांधा होता. तत्पूर्वी ऑफिसात फोन करून आपण उशीरा येत आहोत हे कळवायचं होतं. त्याहीपेक्षा जास्त पंचाईत झाली होती ती कपड्यांच्या बाबतीत. सर्वांचा आवडता आणि अंगाला चांगला बसणारा शर्ट लाँड्रीत गेला होता. तो आणायला सवड नव्हती. मुद्दाम आणायला निघावं तर सुधा हटकून म्हणणार, ‘तुम्ही कामावर जा. मी आणून ठेवते.’ शेवटी बावळेनं चक्क सूट घालायचं ठरवलं."
................................................................................................
" ... गुळगुळे तसा बऱ्यापैकी मोठ्या पदावर होता. कोणत्याही खात्याचं, कितीही महत्त्वाचं बिल पास करताना खात्यातल्या लोकांना टिपं गाळायला लावणं ही त्याची ख्याती. तुळपुळ्यांचं पत्र आलं. सवयीप्रमाणे प्रथम ते कावले. पण ‘कॅब्रे गर्ल’ आणि ‘यामा’ ह्या दोन नावांनी क्रांती झाली. कपाळावरच्या आठ्या मावळल्या. गुळगुळ्यांच्या कपाळाला आठी नाही हे दृश्य चाळीत कुणी पाह्यलं नाही ते बरं झालं. तो कोणी उभाच्या उभा कोसळला असता."
................................................................................................
"आता फक्त वेळात वेळ काढून, संधी साधून यामाला इशारा करायचा व आपण खाली जाऊन उभं राहायचं असा विचार करीत गुळगुळे उभे असतानाच समोर सावळे उभे. त्यांच्या हातात चिमटा होता. आणि चिमट्यात तापवलेलं दूध.
"सावळ्यांना नको त्यावेळी समोर पाह्यल्यावर, जास्तीच्या आठ्या घालायला गुळगुळ्यांना कपाळच शिल्लक राहिलं नाही."
................................................................................................
"ती निमगौरकाया-यामा-गाडीतून खाली उतरताच बावळे तिला सामोरा गेला. पुढे होत, कमरेत वाकत तो खास ठेवणीतला मऊ आवाज काढत म्हणाला, ‘Excuse me’ बळी क्रमांक एक पाहून यामा खूष झाली. तुळपुळे मामाच्या पत्रानं चोख कामगिरी बजावली होती. यामा नाटकीपणानं म्हणाली,
"‘‘So you are Mr. Bavale?’’
"‘‘हो, आपण कसं ओळखलंत?’’
"‘‘तुमच्या पर्सनॅलिटीबद्दल, मॅनर्सबद्दल मामा सारखं सांगत असतो.’’"
................................................................................................
"बावळेनं यामाला घरापर्यंत आणून सोडलं. गुळगुळ्यांनी किल्ल्या दिल्या. वर येऊन तिचं सामान आणि क्रॉफर्ड मार्केटमध्ये घेतलेली सफरचंदांची टोपली ठेवून तो निघाला.
"‘‘पुन्हा कधी भेटणार?’’
"‘‘दोन दिवस मी इथंच आहे. उद्या दुपारी मला काही व्यक्तींना भेटायचं आहे.’’"
................................................................................................
"सावळेनं आणलेले वेफर्स, बिस्किटं, फरसाण, चिझलिंग ह्या वस्तूंनी भाऊमामाच्या स्वयंपाकघरातल्या बरण्या भरून गेल्या."
................................................................................................
"बावीस वर्षांच्या रुक्ष, गंभीर संसारात, दुसऱ्या स्त्रीच्या सहवासात काही मधुर क्षण घालवण्याचा एकमेव चान्स मुळ्यांच्या आयुष्यात आला आणि तो त्यांच्या बायकोनं उधळून लावला. ... "
................................................................................................
"भाऊसाहेब तुळपुळे आणि भीमाताई यात्रा आटपून परतल्या. त्यांनी घरात पाऊल ठेवलं आणि त्यांचा विश्वासच बसला नाही. घर आरशासारखं स्वच्छ केलेलं होतं. घरात दूध, ताक, दही, सगळं होतं. निरनिराळ्या खाद्यपदार्थांनी बरण्या भरलेल्या होत्या. शिंकाळी, टोपल्यांतून मोसंबी, सफरचंदं, चिक्कू, केळी... वगैरे फळफाळवळं होती. ‘
"‘यमे, तुला एवढा खर्च कुणी करायला सांगितला होता?’’ भाऊसाहेबांनी विचारलं.
"‘‘आणि काय ग, गाडीतून उतरल्या उतरल्या एवढी झाडलोट करायला कुणी सांगितलं?’’
"यामा नुसती हसत होती."
................................................................................................
"‘‘मग स्वत:च्या लग्नाची आमंत्रणं केलीस की नाहीस?’’
"‘‘झकासपैकी टॅक्सीतून. तेही फुकटात. जेवलेही फुकट.’’"

Purchased September 02, 2022.
Publisher:- MEHTA PUBLISHING HOUSE
(1 January 1975)
Language:- Marathi
Format: Kindle Edition
Kindle Edition
Marathi Edition
ASIN:- B01NBM90WN
................................................
................................................
वन फॉर दि रोड
................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4961028649