Friday, September 16, 2022

Vapu85 वपु ८५ : वपु काळे / कथासंग्रह (Marathi) by V. P. KALE.

................................................................................................

Vapu85 (Marathi)
वपु ८५ : वपु काळे / कथासंग्रह
V. P. KALE
................................................................................................
................................................................................................

Reading the introduction to this collection informs one that this author,  Kale, wasn't appreciated, even mentioned, by critics of his day. 

The writer of the introduction goes berserk extolling general popular opinion of readers, and lampooning the critics. That's ironically quite applicable to writing of Kale, himself, who pans and deplors every popular strain, trend and more of his time, mourning values lost of simpler times. 

So by the standard applied by writer of introduction, films and music of sixties to nineties to today's - all declared worthless by Kale - is superior to the eternal classical music praised by Kale! 

And this writer of the introduction goes all out, no restraint, no punches pulled, no hyperbole missed, in praise of Kale! 
................................................................................................

"कथन-कौशल्याचे असे सामर्थ्य ज्या हरिभाऊंच्या स्फुट गोष्टीत होते, ते पुढे राहिले नाही. तुम्ही इ.स. १९५५च्या सुमारास कथेच्या प्रकाशात आला. या वेळी मराठी कथेने चार-पाच वळणे ओलांडून स्वतःचे स्थान निश्चित केले होते; परंतु तिच्यात कथनाचा हा ओघवता प्रवाह दिसत नाही. नेमका तो तुमच्या कथेत दिसतो."

"वस्तुतः ज्या काळात तुमच्या कथेने मूळ धरले, तो काळ ‘सत्यकथे’ची भलावण करणारा; या मासिकाभोवतीच घुटमळणारा, पण नेमकी तुमची नजर ‘किर्लोस्कर’ कालखंडाकडे गेली. तुम्ही जे संस्कार पचविले, ते ज्या संस्कृतीशी एकरूप होते, तेच मुळी ‘सत्यकथे’शी नाते जोडणारे नव्हते. म्हणून तुमची कथा धबधब्याप्रमाणे वाहत नाही, समुद्राप्रमाणे अथांग दिसत नाही, नदीप्रमाणे किनाऱ्यालगत सुपीकता देत नाही. ती झऱ्याप्रमाणे झुळझुळ वाहते, गुणगुणते. रसिकांवर मोहिनी घालते. मराठी कथेच्या प्रवासाची विविध वळणे तिच्यात दिसतात. शिवाय तिचे गुणगुणणे सतत ऐकू येते. मराठी कथेचा इतिहास लिहिताना समीक्षकांना तुमची आठवण राहिली नाही, हे जेवढे खरे, तेवढेच खोटे आहे. याचे कारण तुमची कथा रसिकांच्या अचूक चिमटीत पकडली जाते व समीक्षकांच्या अचूक चिमटीतून निसटली जाते. जी कथा रसिक डोक्यावर घेतो; तिला एक मस्ती असते आणि मस्ती ही उपेक्षा आणि अपेक्षा यांच्या पलीकडे जाणारी असते. समीक्षक जेव्हा अशा कथेचा नामोल्लेख करीत नाहीत, तेव्हा ती ‘किस्मत हमारे साथ है’ या धुंदीतून जाते. समीक्षक हे शेवटी साहित्य-क्षेत्रात वावरणारे वकीलच असतात. कोर्टात आपला युक्तिवाद पटविणे, खऱ्याचे खोटे करणे अथवा खोट्यालाच खरे म्हणणे, हा त्यांचा खेळ असतो. खरा न्याय जनताजनार्दन देते. मराठी कथेच्या वाटचालीत प्रत्येक वळणावर असे वकील असतात. तेच आपले वकीलपत्र घेऊन पुढे आले. मराठी कथेचा इतिहास अशा वकिलांनी लिहिला आहे. एरव्ही, ज्या काळात कै.वि.सी. गुर्जर यांनी कथा लिहिली, त्या काळात त्यांची उपेक्षा झाली असती का? गुर्जरांनी हजारांहून अधिक कथा लिहिल्या व त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना ओळखले गेले, याचे कारण या लेखकाने कुठलेच वकीलपत्र आपल्या पदरी बांधले नव्हते. गुर्जरांना लोकप्रियता लोकांनी दिली; समीक्षकांनी नव्हे! ... "

So this writer never read Kale's sharp lampooning criticism of popular films, music and fashions prevalent in decades he wrote, or this whole assault against critics who ignored Kale applies only to Marathi literature, at most, and Kale in particular? 

And this writer of the introduction has no qualms mentioning names of great, as if they specifically concurred with him in his extolling Kale - 

" ... भवभूतीसारखा देखील समानधर्म शोधतो. त्याची वाट पाहतो. आंधळा मिल्टन आपल्या काव्यात सांगून गेला : ‘‘They also serve, who only stand and wait.’’ पण या सगळ्यावर ताण म्हणजे काळच या सर्वांचा सूड घेतो. ज्या कथेला– नव्हे, समग्र वाङ्‌मयाला रसिक मिळतो, तेच वाङ्‌मय सार्वत्रिक राहते. मराठी कथेच्या वाटचालीत हरिभाऊ, दिवाकर कृष्ण, फडके, खांडेकर, य.गो. जोशी, गाडगीळ या नावांचा जयघोष झाला असला, तरी त्यांच्या अवतीभोवती कितीतरी नावे अशी आहेत, की जी रसिकतेवर तरंगत होती; आहेत. आजही त्यांच्या कथा रसपूर्ण अभ्यासातून आठवणीत राहतात. उद्या जर मराठी कथेचे युगप्रवर्तक कॅ. लिमयेऐवजी दुसरे कुणी ठरले, तर त्याचे आश्चर्य वाटू नये! तुमची कथा जेव्हा मंत्रमुग्ध होऊन श्रोते ऐकतात, तेव्हा ती रसिकतेच्या लाटेवर तरंगत असते. लाटेचे आयुष्य क्षणभंगुर असेल, पण ते विजेप्रमाणे देदीप्यमान असते. मुख्य म्हणजे, रसिकतेला जोपर्यंत अंत नाही, तोपर्यंत लाटेलाही अंत नाही. वपु, ज्या ‘सत्यकथे’ने व्यंकटेश माडगूळकर यांची कथा उचलून धरली, तोच कथाकार संमेलनाच्या अध्यक्षपदावरून सांगतो काय, तर ...  

"‘‘अनुभवाशी प्रामाणिक राहा आणि स्वतःचीच अभिरुची साक्षी ठेवून लिहा. कुठलीही मळलेली वाट धरू नका. तुमची वाट तुमच्याच पायांना पाडू द्या. ही भूमी एवढी विशाल आहे, की नव्या वाटेसाठी तिच्यावर नित्य जागा असतेच. कोणासारखे होण्यासाठी खपू नका. स्वतःला ओळखण्यासाठीच खपा. अटीतटीच्या खटपटी करू नका. अनुकूल असा मोसम येताच वेलीला फळ धरते. मोसम प्रत्येकाच्या बाबतीत जवळचा किंवा दूरचा असू शकतो. खासगी वा सरकारी पारितोषिकांना फार महत्त्व देऊ नका. रसिकांनी दिलेली दाद हे फारच श्रेष्ठ पारितोषिक असते. समीक्षकांच्या मतामुळे खट्टू होऊ नका. ते त्याचे एकट्याचे मत असते आणि अखेर तोही एक वाचकच असतो.’’ 

"तुमच्या समग्र कथेतून, कथाकथनातून हेच प्रत्ययाला येते. या कथाकाराने तुमची कथा आठवून तर हे लिहिले नसेल ना?"

Question - was a Madgulkar incapable of remembering name of contemporary popular writer, or ashamed of mentioning his name if he meant it? 

It's unclear why this writer of the introduction says about characters of Kale- 

" ... पुण्या-मुंबईकडील सुशिक्षित असतील; पण ती सर्व हाडामांसाची आहेत. ती उपरी वाटत नाहीत. ढोंगी वाटत नाहीत. ... "

Why, is there a supreme court order to the effect that 'पुण्या-मुंबईकडील सुशिक्षित' are 'ढोंगी'? 

Or is it an abrahmic diktat? Is this writer of the introduction attempting to prove his fellow traveller membership of appeasers' club? 

प्रस्तावना 

Reading this introduction to this collection informs one that this author, Kale, wasn't appreciated, even mentioned, by critics of his day.  

................................................

September 15, 2022 - September 15, 2022. 

अनुक्रमणिका 

भातुकली  
कर्मयोगी  
अस्ताई  
सबकॉन्शस लेव्हल  
बॉन्साय

REVIEW 

"‘‘उदय, ट्राय टू अंडरस्टॅण्ड मी. आयुष्यात वाट्याला येणारी उपेक्षा, आपली महत्त्वाकांक्षा न समजणारा कर्तृत्वशून्य जोडीदार, नाव कमावण्याची जिद्द नसलेली मुलं, जिव्हाळ्याचं नाटक करणारे मित्र... या सर्वांवर उतारा म्हणून भातुकली! सर्व मनस्तापांवर पर्याय म्हणून भातुकली आणि भातुकलीतला राजा! आता मला सांगा, ही भातुकली जर प्रत्यक्षात उतरली, तर भातुकलीवर पर्याय आहे का?’’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 15, 2022 - September 15, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
कर्मयोगी
................................................................................................
................................................................................................

"‘‘फॅण्टॅस्टिक!’’ 

"‘‘फॅण्टस्टिक यात वादच नाही– ते तुम्हा आम्हाला. सरकारला नाही. न्यायालयीन चौकशीचा फार्स झाला. त्यापूर्वी डिपार्टमेंटल इन्क्वायरी. दीड वर्ष तमाशा चालला होता. पण शेवटी बाबा सगळ्यातून सुटले.’’ 

"‘‘सुटायलाच हवे होते. त्यांच्यात गीतेवरच्या श्रद्धेनुसार ‘मामनुस्मर, युध्य च’ या तत्त्वानुसार हेच व्हायला हवं होतं.’’ 

"‘‘तेही पुन्हा तुमच्या-आमच्या दृष्टिकोनातून! सरकारी कारणं वेगळी असतात.’’ 

"‘‘म्हणजे?’’ 

"‘‘ती जी विशिष्ट जमात होती, त्या जमातीतल्या माणसांनी ‘समाजातली एक घाण नाहीशी केली गेली, चौकशी करू नये,’ अशा आशयाचं पत्र, एक हजार नागरिकांच्या सह्यांसहित गृहमंत्र्यांना पाठवलं. आपल्याच देशात राहून एका विशिष्ट जमातीसमोर लाचार होणारं सरकार इथंही वाकलं आणि त्या जमातीच्या भावना दुखवायच्या नाहीत, म्हणून चौकशी थांबली. कौतुक बाबांचंच वाटतं. ... "
................................................................................................

"‘‘काका, त्यांना आता वेळीअवेळी, ‘दिवेकरसाब, गोली मत चलाव, मुझे तुम्हारा भाई समझो’ हे ओरडणारा सुडक्या दिसतो. सुडक्याची हत्या आणि शरदकाकाचा मृत्यू याची आता बाबा एकत्र सांगड घालतात. ‘मी कायदा हातात घेतला. सुडक्याचा मी खून केला. शरदला मी मारलं...’ असंच बडबडतात. आता गीताही आठवत नाही आणि ज्ञानेश्वरीचा उपयोग होत नाही. रोज तीन तास पठण चालू असतं. पण सुडक्या अचानक दिसला, की वाचन थांबवतात आणि घरातल्या घरातच कुठंतरी लपून बसतात. सांगा, याच्यावर काय इलाज? कोणतं औषध?’’"
................................................................................................

"‘‘पोलीस स्टेशनवरच्या प्रत्येक माणसानं सांगितलं. हीच वेळ आहे. गणेशचे दोन्ही हात छाटून टाका. मी तसं करू दिलं नाही. कायदा हातात घ्यायचा नाही.’’ 

"‘‘मग?’’ 

"‘‘गणेश त्यातूनही वाचला. चांगला बरा झाला आणि सहा वर्षं खडी फोडायला गेला. माझी जळगावहून नाशिकला बदली झाली आणि चार वर्षांनी पुन्हा जळगावला पोस्टिंग झालं. त्याच वेळेला गणेश तुरुंगातून सुटला आणि दुर्दैवाचा भाग म्हणजे त्यानं एकाच रात्रीत तीन वेगवेगळ्या एरियातल्या फुटपाथवर झोपलेल्या माणसांना कापून काढलं. तेव्हापासून खंत आहे, त्या दिवशी कायदा हातात घेतला असता, तर तीन निरपराध जीव वाचले असते. तीन घरांवर आकाशाची कुऱ्हाड कोसळली नसती.’’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 15, 2022 - September 15, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
अस्ताई    
................................................................................................
................................................................................................

" ... संयोगितेला आणायलाच हवं."

"आपलं पिल्लू आपल्याजवळ! 

"या विचारासरशी तो उठला. गीता-योगितानं टाहो फोडला, 

"‘‘आम्हाला सोडून जाऊ नका.’’ ‘

"‘आपलं तिसरं पिल्लू आणतो, राजा.’’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 15, 2022 - September 15, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
सबकॉन्शस लेव्हल  
................................................................................................
................................................................................................

"शहा दाम्पत्य गेल्यावर पराग विचारात पडला. रोहित संताप आवरण्यासाठी चालत कामावर जातो आणि रोहिणी संतापाला वाट करून द्यायची, म्हणून घरी जात्यावर दळण दळत बसते. पाच बाळंतपणं होऊनही प्रकृती ठणठणीत आहे, यात म्हणूनच नवल नाही. 

"पण तरीही मूळ मुद्दा दूरच राहतो. नवरा-बायकोनं भांडायला हवंच. शहा मंडळींकडूनही हवा तो तपशील मिळाला नाही. आता काय करावं, हे त्याला कळेना. रोहित-रोहिणीजवळ काही बोलायची सोयच नाही, हे आता सिद्ध झालं. दोघांनी त्यांच्या आयुष्यातल्या ‘ऑफ पीरियड’वर खूप विचार केला होता. मुलं आणि त्यांचं संगोपन, त्यांना शिस्त लावणं यातही भांडणं नाहीत. मतभेद होते; पण संघर्ष नव्हता. ... "
................................................................................................

"अपर्णा रोहित-रोहिणीला परागच्या खोलीजवळ घेऊन गेली. खोलीचं दार तिनं किलकिलं केलं. रोहित आणि रोहिणी बघतच राह्यली. 

"पराग भिंतीकडे तोंड करून बसला होता. पण तो नुसता बसला नव्हता. तो जोरजोरात जात्यावर तांदूळ दळत होता आणि समोरच्या भिंतीवर मारुतीचा फोटो लावलेला होता."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 15, 2022 - September 15, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
बॉन्साय
................................................................................................
................................................................................................

"‘‘आपण सुखात का आहोत, हे सांगता आलं, म्हणजे सुख वाढतं.’’ 

"‘‘बरं, मग सांगा.’’ 

"‘‘स्त्रीसहवासाचा पुसटसा अनुभव जरी भूतकाळानं दिला असता, तर त्या अनुभवाशी तुलना करण्याचा मोह झाला असता.’’ 

"चित्रे एवढं सांगून उठले आणि मी विचारात पडले. ... "
................................................................................................

"‘‘आई, मी कधी गप्प बसणार नाही, हे मलाही माहीत आहे. पण यातलं बाबांनी काय दिलं? विचारायला तोंड आहे, पत्ता शोधायला पाय आहेत हे ऐकवलं, की संपलं. हव्या असलेल्या गोष्टी, माहिती, पुस्तकं घरातच मिळाली असती, तर शोधाशोधीत गेलेला वेळ वाचला नसता? परीक्षणासाठी घरात पुस्तकं येऊन पडायची. एक तरी पुस्तक वाचायला मिळालं का? नाटका-सिनेमांचे पासेस, त्यातलं एक तरी नाटक बाबांनी बघू दिलं? घरात वारंवार इतर पत्रकार, लेखक, नाटककार येतात, त्यांच्या गप्पागोष्टीतून आपोआपच आपल्या मुलाच्या कानांवर काही चांगल्या गोष्टी पडतील, असा कधी त्यांनी प्रयत्न केला का? माझ्यासाठी, तुझ्यासाठी, घरासाठी आत्तापर्यंत एकतरी वस्तू त्यांनी आणली का? आणून आणली, ती एकच गोष्ट! बोनसाय केलेलं एक लिंबाचं झाड! ती वस्तूच सगळं सांगते.’’  

"मी त्याला खोदखोदून त्याचा अर्थ विचारला. तो बोलला नाही."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 15, 2022 - September 15, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
Vapu85 (Marathi) by V. P. KALE. 
................................................
................................................
September 15, 2022 - September 15, 2022. 
Purchased September 15, 2022.  

Publisher: MEHTA PUBLISHING HOUSE 
(1 January 1989)
Language: Marathi

ASIN:- B01MZ7YK57
................................................
................................................
वपु ८५ : वपु काळे / कथासंग्रह  
by वपु काळे
VAPU 85 by V. P. KALE 

© स्वाती चांदोरकर व सुहास काळे 
मराठी पुस्तक प्रकाशनाचे हक्क 
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे. 

प्रकाशक : सुनील अनिल मेहता, 
मेहता पब्लिशिंग हाऊस, 
१९४१, सदाशिव पेठ, 
माडीवाले कॉलनी, पुणे – ४११०३०.
................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4988307235