................................................................................................

Moden Pan Vaknar Nahi
मोडेन पण वाकणार नाही : वपु काळे / कथासंग्रह (Marathi)
MODEN PAN VAKNAR NAHI
by V.P. KALE.

One does wish the pleasure of reading this book wasn't marred so much by editing and proof-checking mistakes, some glaring even while reading, others obvious when attempting to quote.
This, coupled with mistakes of language - and characterisation - bother all the more in reading the heartbreaking stories, such as पराधीन अाहे जगती.
Why is a refugee after partition, for example, using language idioms that belong to the very community responsible for deaths of his family members, apart from loss of his homes, homeland, all heritage?
But it's obviously not in character, since the language itself is used wrong, and is more of a local urdu speaker than of a refugee, language translated from Marathi and not that of an original Hindi or Punjabi or Sindhi speaker.
................................................................................................
At some point, although not until well into the story, पाळणा is bound to remind one of Tagore's heartbreaking story, 'Khokababur Pratyavartan'.
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
CONTENTS

अनुक्रमणिका

सुंभ जळतो, पीळ उरतो / १
निगेटिव्हज / ९
पंगू / २०
पराधीन अाहे जगती / ३०
खेळणी / ४८
जलधारा / ५९
पाळणा / ७७
पपा / ९१

REVIEW

1. सुंभ जळतो, पीळ उरतो / १
................................................................................................
................................................................................................
"-पंचवीस दिवस उपवास करून धाकटा मरण पावला. मरताना त्यानं अॉफिसच्या कोणत्याही कागदावर सही केली नाही. फंडाचा हिशोब मागितला नाही. कुणालाही अॅथॉरिटी दिली नाही. ‘लेट मार्क खोडला का ?’ एवढाच प्रश्न तो अधूनमधून विचारायचा.
"-धाकटा मेला अाणि दुसऱ्याच दिवशी धाकट्याला माफी केल्याचा हुकूम वरिष्ठांकडून अाला. धाकट्याचा साहेब, ह्या प्रकरणाला त्यानं अनिष्ट वळण दिलं म्हणून, बडतर्फ झाला होता !
"त्यानंतर सहा वर्षांनी सकाळीच मोठा भाऊ धाकट्याच्या घरी वहिनीसमोर उभा राहिला.
"‘वहिनी, हे ठेव.’ मोठ्यानं बॅग उघडली. ती नोटांनी ठेचून भरली होती."
................................................................................................
"वहिनी पुढं होत म्हणाली,
"‘भाऊजी, थांबा ! ती बॅग उचला. ते विष ह्या घरात नको. सहा वर्षांपूर्वी ह्यातली एक नोट जरी मिळाली असती, तरी ती लाखाच्या ठिकाणी होती. नको असताना घरात येणारा पैसा विषच असतो. अाता दारिद्र्य मी पचवलं अाहे. तेव्हा असा पैसा नको. माणूस मरणाला भितो. कारण नंतरचा प्रवास माहीत नसतो. दारिद्र्याचं पण तसंच ! जोपर्यंत संसारात काही कमी नव्हतं तोवर दारिद्र्याची फार भीती वाटायची. पण अाता दारिद्र्य कसं उपभोगायचं हे मला अाणि तुमच्या पुतण्याला चांगलं समजलंय. ती बॅग उचला अाणि जा. अाता कुणाचा अाधार मिळणं हेच अोझं वाटेल.’"
................................................................................................
"बॅगेचं काय झालं हे रघुनाथ वर्तकला माहीत नाही. मोठ्या भावाचं पण काय झालं पुढं, हेही त्याला माहीत नाही. धाकट्याची बायको खस्ता काढत दारिद्र्य उपभोगतेय."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................

September 07, 2022 - September 07, 2022.

2. निगेटिव्हज / ९

"‘सुचित्रा...’
"‘अोरडू नकोस. वास्तविक तू सुटकेचा नि:श्वास टाकायला हवास. माझ्यासारख्या श्रीमंत, सुंदर मुलीचा तुला सहवास मिळाला, माफक मजा करायला मिळाली अाणि वर लगनचं लोढणं गळ्यात पडलं नाही. ही बाब भाग्याची अाहे. मला खूप पैसा हवा, एेषअाराम हवा, तेव्हा लगनची बाब विसर. ह्यापेक्षा अाणखीन स्पष्ट बोलायला लावू नकोस.’"
................................................................................................
"‘फोटोंचे पैसे तुझ्या मिस्टरांकडून मिळणार अाहेत.’
"‘ते फक्त लगनच्या फोटोंचे पैसे देतील.’
"-ह्या एका वाक्यानं रवींद्र जे समजायला हवं ते समजला. ... "
................................................................................................
"‘स्टुडिअोला लागणारं भांडवल मी तुम्हांला देतो. मग काही अडचण ?’
"‘जरा विचार करून सांगतो.’
"‘अॉल राईट. एक लक्षात ठेवा मात्र की, business करायचा म्हणजे studio हवा. तुमचा विचार पक्का झाला की कळवा. मात्र as early as possible. माझ्या कामाचं स्वरूप तुम्हाला नंतर सांगतो.’"
................................................................................................
"सुचित्राचा हा नवा पवित्रा न अोळखण्याइतका रवींद्र दूधखुळा नव्हता. पण तरीही तो शांत होता. सुचित्राला बसण्यासाठी प्रायव्हसी हवी म्हणून त्यानं छोटंसं केबिन तयार केलं. बाईमाणसानं उघड्यावर काउंटरपाशी बसणं योग्य नव्हतं. सुचित्रा रवींद्रच्या गैरहजेरीत चोख काम सांभाळू लागली.
"रवींद्रनं मात्र जो तर्क लढवला होता तो लवकरच खरा ठरला. एक-दोनदा रवीला असं अाढळून अालं की, अापली पाठ वळली रे वळली, की स्टुडिअोच्या सामानात काही तरी फेरफार होतोय. वस्तूंची उलथापालथ होत अाहे. अाणि एके दिवशी सुचित्रा सरळ सरळ सापडली. रवींद्र वाजवीपेक्षा लवकर परतला, तेव्हा स्टुलावर स्टूल ठेवून सुचित्रा सगळ्या निगेटिव्ह तपाशीत होती.
"‘मालकीणबाई स्वत: कष्ट का घेताहेत ?’"
................................................................................................
" ... सुचित्राला काय हवं अाहे हे त्यानं अोळखलं होतं. पण तरी सुचित्रा काय काय अाणखी स्टेप्स घेतेय् ते त्याला पाहायचं होतं. हळूहळू सुचित्रेच्या वागण्यात फरक होऊ लागला. ती वेळोवेळी चिडू लागली. अारडाअोरडा करू लागली. रवींद्र शांत होता. पाहू या, सुचित्रा काय काय अाणखी करते ते, असं म्हणत तो गप्प होता. पण रवींद्रला फार दिवस वाट पाहावी लागली नाही. बाहेरचं काम अाटोपून तो परततो तो, दुरूनच त्याला प्रचंड धूर अाणि अाकाशाला भिडणाऱ्या ज्वाळा दिसल्या."
................................................................................................
"‘सुचे, एेक. हे बघ माझ्या हातांत काय अाहे ते. तुझं वैवाहिक जीवन, एेश्वर्य, स्वास्थ्य, तुझी वैभवाची अभिलाषा अाणि तुझा अख्खा भविष्यकाळ अात्ता माझ्या हातात अाहे. ह्या चार निगेटिव्हज्साठी तू जंग जंग पछाडलेस. शेवटी तू एवढ्या खालच्या पातळीला जाऊन पोहोचलीस. इतक्या नीच मनोवृत्तीच्या बाईवर मी प्रेम केलं ह्याचा पश्चात्ताप होतोय मला. स्वत:च्या संसाराला धक्का लागू नये म्हणून तू अनेकांच्या संसाराला अाग लावलीस. बघ समोर !-स्टुडिअो जळतोय. ती अाग तू लावलीस. त्या स्टुडिअोत अनेकांच्या लगनचे फोटो होते. मंगलकार्यांच्या पवित्र साक्षी होत्या. कित्येकांच्या चिमण्या बाळांचं गोड बालपण अाज फोटोंच्या रूपानं चिरंजीव ठरलं होतं. त्यांची राख होते अाहे. अाणि कित्येकांच्या दिवंगत व्यक्तींच्या शेवटच्या अाठवणी त्यात होत्या, त्या मातीमोल झाल्या. अाणि का ? -तर केवळ एका स्वार्थी, स्वास्थ्यलोलुप स्त्रीचा संसार अभंग राहावा म्हणून. जाना देव ! -तुझं वाटोळं करायचं असतं तर सुचित्रा, तुझ्या संसाराची पहिली रात्र पण मी उगवू दिली नसती. पण मला तसं करायचं नव्हतं-अाणि नाही पण-धर हे !’
"-रवींद्रनं त्या निगेटिव्हज् सुचित्राच्या हातात ठेवल्या, तिच्या गळ्यातली फ्लॅशगन् अाणि कॅमेरा घेतला अाणि एकदाही मागं वळून न बघता तो चालू लागला."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 07, 2022 - September 07, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
3. पंगू / २०

"गाणं संपलं. अातून हाक अाली. मोहिनी उठली. मधल्या दरवाज्यापर्यंत गेली अाणि गोडबोल्यांनी तिला हाक मारली. मोहिनी परत फिरली, तेव्हा तिचा चेहरा साफ उतरला होता. मला त्याचा अर्थ कळेना. चोरट्या नजरेनं मी तिचा व्याकुळ, भांबावलेला चेहरा पाहात राहिलो. ती गोडबोल्यांच्या जवळ अाली. गोडबोल्यांनी खाली वाकून मोहिनीचं जमिनीवर लोळणारं पातळ वर केलं. मी अाणि अप्पा दोघेही थबकलो.
"मोहिनीचा डाव पाय गुडघ्यापर्यंत लाकडाचा होता."
................................................................................................
"‘अंहं ! जुना दोस्त-साठे.’
"‘शक्यच नाही. त्याचं-माझं भांडण झालं होतं.’ ‘
"तेही त्यानं सांगितलं अाणि एवढंही म्हणाला-भांडणं काय अशी वर्षन् वर्ष लक्षात ठेवायची असतात काय ?’
"निव्वळ गैरसमजावर अाधारलेलं अामचं भांडण साधं नव्हतं. उभ्या जन्मात एकमेकांची तोंड पाहायची नाहीत एवढ्यावर येऊन ते थांबलं होतं.
"‘पण एवढं झालं होतं काय ?’ सौ. नं इंटरेस्ट घेऊन विचारलं."
................................................................................................
"‘घडायला नको होतं ते घडलं; चूक अाम्हा दोघांचीही होती. अाम्ही दोघंही मोह अावरायला असमर्थ ठरलो.’
"‘पण म्हणून तिनं अात्महत्या केली ?’
"‘होय. कारण मी लगनला नकार दिला होता.’"
................................................................................................
"नुकतेच गोडबोले भेटल्यानं गतकाळातील अाठवण होऊन मन उदास झालं होतं. त्यात ह्या मनस्तापाची भर पडली होती. अाजही सुमित्रेची अाठवण होऊन डोळ्यांत तरारुन अश्रू उभे राहिले.
"जेवताना मी तिला विचारलं, ‘पण एवढं करून साठे अाला होता कशाला, हे सांगितलंच नाहीस !’
"‘अय्या, खरंच की ! वधूपरीक्षेला निघाले होते. तुम्ही बरोबर हवे होतात.गोडबोले म्हणून कुणी गृहस्थ अाहेत, त्यांची मुलगी खूप सुंदर अाहे म्हणे. नाव पण तसंच अाहे. मोहिनी. अक्षरश: मोहून टाकणारी अाहे म्हणून सांगत होते.’"
................................................................................................
"अातून हाक अाली म्हणून मोहिनी अात गेली. अाणि मी ?-दोन्ही पाय असून मला वाटू लागलं...वाटू लागलं की, कुबड्यांच्या अाधाराशिवाय मला अाता उठताच येणार नाही !"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 07, 2022 - September 07, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
4. पराधीन अाहे जगती / ३०
................................................................................................
................................................................................................
One does wish the pleasure of reading this book wasn't marred so much by editing and proof-checking mistakes, some glaring even while reading, others obvious when attempting to quote.
This, coupled with mistakes of language - and characterisation - bother all the more in reading the heartbreaking stories, such as this.
Why is a refugee after partition, for example, using language idioms that belong to the very community responsible for deaths of his family members, apart from loss of his homes, homeland, all heritage?
But it's obviously not in character, since the language itself is used wrong, and is more of a local urdu speaker than of a refugee, language translated from Marathi and not that of an original Hindi or Punjabi or Sindhi speaker.
................................................................................................
"-तो मुलगा चार अॉक्टोबरला केजींच्या घरासमोर अाला अाणि त्याच दिवशी ही अशी बायकोबरोबर बोलाचाली झाली. नंतर चहा मिळाला स्टो नीट झाल्यामुळे, पण चहाला चहाची चव नव्हती. त्या मुलावरून निर्माण झालेला कडवटपणा मनात घर करून राह्यला. रात्री नऊपर्यंत तो मुलगा केकाटतच होता, ‘जर्मन कंपनीका दिवाला ऽऽ’
"तेव्हापासून केजींना कधी नाही एवढा त्या घराचा राग येऊ लागला. भर वस्तीतलं परळचं ते घर, कितीतरी वर्षांपासून गाडगीळ वकिलांचं घर म्हणून प्रसिद्ध होतं. गाडगीळ वकील मरताना कृष्णाजीपंतांना म्हणाले, ‘कितीही संकटात सापडलास तरी ही वास्तू विकू नकोस.’"
................................................................................................
" ... भरवस्तीतलं ते घर अाता एवढं मोडकळीला येऊ पहात होतं, की डागडुजीची फार गरज होती. तेवढी केजींना एेपत नव्हती. घर विकायची टाप नव्हती. कारण संस्कारांनी ते बांधलेले होते. त्या घरावरून बाहेरची माणसं तर बोलत होतीच, पण केव्हा केव्हा एकुलता मुलगा अाणि अगदी केव्हा तरी विद्या-त्यांची मुलगी पण उपहासानं बोलायची. खुद्द केजी पण त्या घराला केव्हा केव्हा कंटाळायचे. परवाच्या पावसाळ्यात तर, केजींच्या पलंगावरच अभिषेक होत होता. पण जागा बदलून पलंगावर झोपावं अशी एकही दिशा राहिली नव्हती. -ते घर दुरुस्त करायची एेपत नव्हती अाणि विकायला मनही होत नव्हतं. केवळ वडिलांची परवानगी नव्हती म्हणून नाही, तर केजींचा पण त्या जुन्यापुराण्या वास्तूवर जीव होता. ती वास्तू विकताना कवडीमोलानं विकायची अाणि येतील त्या पैशात-अाता अाहे त्याच्या एक चतुर्थांश जागा पत्करायची, तीही शहरापासून दूर, हा हिशेब खिशाला अाणि मनाला न परवडणारा होता.
"-एकीकडे हे असेही विचार होते अाणि एकीकडे त्या सगळ्याचा उबग पण अाला होता. उबग होता तो घराचा नसून अाजूबाजूच्या वातावरणाचा होता. गर्दीचा होता. सुसाट पळणाऱ्या वाहनांचा होता. कर्णपटू हॉर्न्सचा होता. हॉर्न्स ! निरनिराळ्या स्वरांत अोरडणारे हॉर्न्स. पहाटे साडेपाच-सहा वाजल्यापासून रात्री शेवटचा सिनेमा सुटेपर्यंत सतत किंचाळणारे. चारही दिशांना अावाज, अावाज अाणि अावाज ! माणसाचा अातला अावाजही त्याला एेकू न देणारे हे बाहेरचे अावाज, त्यात भर म्हणजे केजींचं घर बैठं. शेजारीच चिकटून असलेल्या इमारती तीन तीन मजली. त्या इमारतींतून फेकलेली घाण केजींच्या गच्चीत, कौलांवर पडायची. तळमजली घर असल्यानं, डबल डेकर बसेसच्या टायर्सचे पण फर्रर्र फर्रर्र अावाज असह्य वाटायचे. अाणि ह्या सर्व अावाजात चार अॉक्टोबरपासून अाणखीन एका कर्णपटू अावाजाची भर पडली होती. ‘कोई बी चीज उठाऽ ऽव !’"
................................................................................................
"केजींच्यामधली हवाच त्या प्रसंगानं गेली. पंकज त्यांचा सावकार झाला. शहांनी मागच्या भिंतीचं भगदाड दुरुस्त करून दिलं. मागून घुसणाऱ्या गुंड पोरांचा त्रास वाचला, पण पंकजचं घरात बस्तान बसलं. तो राजरोस घरात येऊ लागला. घरातली कामं करू लागला. ते सर्व करताना तो प्रौढी बिलकुल मिरवत नव्हता. पण केजींचं मन खात होतं. अातल्या अात चरफडत होतं. जळत होतं. पंकजच्या उपकारातून त्यांना सुटायचं होतं, पण मार्ग खरोखर सापडत नव्हता.
"पंकजचं घरात कौतुक होत होतं; कारण मध्यमवर्गीय कुटुंबाला वेळी-अवेळी फार अावश्यक वाटणाऱ्या, पण तशा अगदी फार सामान्य वस्तू तो कुठून ना कुठून पटकन अाणून द्यायचा. ... "
................................................................................................
"छप्पर तातडीनं दुरुस्त करण्याचा निर्णय सरोजिनीबाईंना घ्यावाच लागला. कारण दोन्ही इमारतींतल्या माणसांनी फेकलेला कचरा अाता अगदी घरातच पडायला लागला. पुन्हा शहांकडून काम करवून घ्यायचं ठरलं. पंकजनं तीन हजार रुपये अाणून दिले; अाणि अायुष्यात-वैवाहिक जीवनात-केजींना न विचारता हे एवढं काम स्वत:च्या हिंमतीवर सरोजिनीबाईंनी एकट्यांनी पार पाडलं."
................................................................................................
"‘पंकज, तुम घुस्सा करके जा रहे हो.’ शरद म्हणाला.
"‘नही भैय्या. घुस्सेसे बचनेके लिये जाता हूँ. अापको मालूम नहीं, हमारे दो घर थे. तीन गाडियाँ थी. लेकिन पार्टिशन के बाद सब छोडके अाना पडा. पिताजी गये, माँ गयी, बहने गयी, मैं अकेला बच गया. घर छोडनेका सगमा जानता हूँ. मेरे खातिर अापका घर दुखी होना नही चाहता इसलिये जाता हूँ. केजीकाका परेशान होते है. जिंदगीमें हम घर बनायेंगे या नहीं बनायेंगे ये तो सिर्फ भगवान जानता है, लेकिन मेरे लिये मैं किसी का घर तोडना नहीं चाहता. बिझिनेस हम किधर भी कर सकते हैं. लेकिन यहाँ बिझनेस के साथ सहारा भी मिलेगा, प्यार मिलेगा एेसा सोचा था. लेकिन खुदा को मंजूर नहीं...’"
................................................................................................
"‘इस घरमें हमने दूधभात खाया है; इधर हम कौनसा भी हिसाब रखना नहीं चाहते. काकाजी, नौकरीवाले लोग कितना अाया, कितना गया इतनाही सोचता है. बिझिनेसवाला कमानेके लिये ही बिझिनेस करता है, लेकिन पहले गमानेकी ताकत महेसूस करने के बाद ! -काकाजी घर गया, मोटारगाडीयाँ गयी, माँ गयी, बाप गया, तीन हजार की बात छोड दो. बिझिनेस में कैसेही कमाऊँगा. खुदा हाफिज.’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 07, 2022 - September 07, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
5. खेळणी / ४८

" ... मोटारीत ती एेसपैस बसली होती. गरीब लोक श्रीमंतांबरोबर वागतात तेव्हा त्यांच्या वागण्यात, बसण्याउठण्यात, बोलण्यात, प्रत्येक हालचालीत एक तऱ्हेचा चोरटेपणा, स्वत:कडे गौणत्व घेऊन वागण्याची वृत्ती असते. त्या वृत्तीचा सरोजमध्ये लवलेशही नव्हता. जणू काय मोटार बाळगणं हा माझा धर्म अाहे-गरीब असणं हा तिचा धर्म होता! मोटारीत बसल्याचं जरी तिला सौख्य वाटत होतं, तरी त्या सौख्याबद्दल तिच्या मनात लालसा उत्पन्न झाली नव्हती!
"-अाणि नेमकं हेच मला खुपू लागलं. अापलं महत्भाग्य म्हणून कुमार अापल्याला भेटला, मागचा अपमान विसरून त्यानं अापल्याला हाक मारली त्याच्यामुळं अापल्याला मोटारीत बसायला मिळालं, - असा भाव तिच्या चेहऱ्यावर पाहायला मिळावा अशी माझी इच्छा होती. तो भाव मला दिसेना. ... "
................................................................................................
"‘ते कार्डबोर्डची खेळणी तयार करतात. त्याच्यावरून कल्पना घेऊन एका कारखान्यात प्लॅस्टिकची, पत्र्याची, कार्डबोर्डांची खेळणी बनवतात.’
"हे सांगता सांगता तिनं खाली वाकून पलंगाखालचा ट्रे अोढला. खरोखरच तिच्या नवऱ्याचं कौशल्य वाखाणण्यासारखं होतं. नुसत्या कार्डबोर्डची केलेली ती खेळणी अप्रतिम अाणि वास्तवपूर्ण होती."
................................................................................................
"‘कुमार, तुमच्या ह्या शंकेचं निरसन करावं असं मला वाटतच नाही. मागं तुम्ही सरोजला मागणी घातली होतीच अाणि तिनं धुडकावून लावली होती हे मला माहीत अाहे. तुमच्या पायाशी वैभव लोळण घेत अाहे. तुम्ही स्वत:ला खूप भाग्यवान समजत असाल, पण मी छातीवर हात मारून सांगतो की, तुमच्यापेक्षा मी जास्त नशीबवान अाहे ! ह्याला पुरावा एकच. तुम्हाला प्रसन्न न झालेली लक्ष्मी-सरोज-माझ्यावर वरदहस्त ठेवून अाहे !’"
................................................................................................
"‘अापण कसे अाहोत हे जर तुला समजलं नसलं तर, ते मी सांगते. ही खेळणी विकत घेण्यामागं तुझा एकच डाव अाहे. अाम्हांला मिंधं करायचा ! हाच तो हेतू. ह्याच हेतूनं तू मैत्री वाढवलीस. ‘तुम्हा श्रीमंतांना वाटतं, अापणच फक्त माणसं अोळखू शकतो. अायुष्यातला पैशाचा, अत्यंत महत्त्वाचा भाग परमेश्वरानं सोडवलेला असतो. म्हणूनच तुम्हाला इतर धंदे करायला सुचतात. सगळ्या वस्तू तुम्ही पैशाने मोजता. माणसांची तुम्हांला कदर नसते. अाणि तरी तुम्हांला वाटतं की, अापणच माणसं अोळखतो ह्याउलट अाम्ही गरीब ! अाम्हाला माणसांची जास्त गरज. जितकी गरज जास्त तितकी पारख जास्त. म्हणूनच सांगते, तू त्यातला नाहीस.’"
................................................................................................
"सरोज न फुटणारं खेळणं निघालं. माझ्या अंगावर पडून मीच फुटायच्या बेताला अालो. त्यापूर्वी मी माघार घेतली !
"-थांबायचं कुठे हेही समजावं लागतं ! सुरुवात थोडी चुकली तरी चालेल !"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 07, 2022 - September 07, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
6. जलधारा / ५९

" ... सांगा मला, एवढ्या निष्पाप, भाबड्या मुलीच्या-क्षणभरच लाभलेल्या प्रेमाशी मी बेमान व्हावं का ? बेईमानी व्हावं का ?’ -माझ्याजवळ शब्द नव्हते. मी मानेनं नकार दिला. ... "
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 07, 2022 - September 07, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
7. पाळणा / ७७

At some point, although not until well into the story, it's bound to remind one of Tagore's heartbreaking story, 'Khokababur Pratyavartan'.
................................................................................................
"घरातलं पहिलं कार्य. वडिलधारं माणूस घरात नाही. लांबचे काका-मामा, स्नेही-सोबती जमले होते, पण एकच भाऊ, तोही नसावा-?
"-मीरा खाली मान घालून वावरत होती, पण वरपक्षातील मंडळींची ही घालमेल तिला जाणवत होती. स्वत: अच्युत दोघा-तिघांना म्हणताना तिनं एेकलं होतं,
"‘अरविंद अाज कसंही करून यायलाच हवा.’"
................................................................................................
"‘मामंजींनी हे वाचलं होतं ?’
"‘खूप उशिरा. जवळ जवळ दोन वर्षांनी. दोन वर्षांत अरविंद घरी फिरकला नाही. काशी, रामेश्वर, अाग्रा, मथुरा सगळीकडे भटकत होता. मधून मधून माहिती कळायची त्याची. बाबांनी विचारून मला एकदा हैराण केलं, तेव्हा मी त्यांना ते पत्र दाखवलं. तीच मी महान चूक केली.’"
................................................................................................
"मीरेचं पहिलंवहिलं बाळंतपण; पण मीरा माहेरी गेली नाही. तिनं अाईलाच अापल्या घरी बोलावून घेतली. मनातला विचार तिनं फक्त अाईला बोलून दाखवला,
"‘मी माहेरी अाले तर भावजी जातील कुठं तरी. लोकांच्या घरी ह्यांनी अकारण खपावं, हे मला खपणार नाही. त्यांना सांगायची सोय नाही, पण त्यांनी मला फार फार जीव लावला अाहे.’"
................................................................................................
"‘वहिनी, तो एवढासा जीव पाळण्याखाली सापडला, त्याचा काय अपराध होता सांगाल मला ? त्या जिवाचं तेव्हा काय झालं असेल ? - मी किती जळतोय त्या अाठवणींनी हे कुणाला माहीत अाहे का ? - खूप ठरवलं होतं की जीव गुंतून नाही द्यायचा कुठं म्हणून. पण हरलो. एवढ्या यात्रा केल्या, साधुपुरुष पाहिले, कथाकीर्तनं एेकली; पण कोरडा नाही राहू शकलो. माया, ममता, वात्सल्य, प्रेम ह्यात मला अडकायचं नव्हतं, पण नाही जमलं. फसलं, फसलं सगळं ! - साफ बुडालो. तुम्ही मला जीव लावायला लागलात. अाता माझी धडगत नाही. मला अाता जाऊ दे. ज्या माणसाला कुणाचाही वियोग सहन नाही होत, त्या माणसानं अलिप्त राहावं. बाभळीच्या झाडासारखं राहावं. काटे बाळगावेत म्हणजे कुणी जवळ करीत नाही, जवळ येतही नाही. मी जातो. मला अडवू नका. जयाला संभाळा. मी थोडासा ॠणमुक्त झालोय. मी येईन, पण अाणखी पाच वर्षांनी येईन. ‘हा भावजींचा मुलगा’ असं तुम्हाला अाणखी पाच वर्षांनी वाटलं, तर जयाला उचलीन अाणि जाईन. त्या वेळेला मात्र प्रतारणा करू नका. जे खरं वाटेल ते सांगा बेधडक.’
"-अरविंद एवढं बोलून निघून गेला.
"-जया झोपाळ्याला घाबरतो हे विजयनं सांगितलं अाणि मीराला हे सगळं अाठवून गेलं. सगळा इतिहास अाठवता अाठवता तिचा डोळा लागला."
................................................................................................
"‘मी त्याला दाखवलं. तुम्ही झोपलेले होतात. दोन्ही मुलं तुझ्या गळ्यात हात टाकून झोपलेली त्यानं पाहिली अाणि तो म्हणाला, ‘माझं काम झालं. मी जातो.’ अाणि लगेच गेला. चक्रमपणा गेला नाही त्याचा अजून.’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 07, 2022 - September 07, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
8. पपा / ९१

"माझ्या वयाच्या अठराव्या वर्षी देवकुळे गुरुजींनी मला नानासाहेब देशमुखांची अोळख करून दिली, ‘ह्यांना नमस्कार कर. हे तुझे पपा, नानासाहेब देशमुख.’
"यांत्रिक हालचाल व्हावी तसे मी हात जोडले.
"भावनेचा लवलेश त्यामागं नव्हता. अादर होता; पण तो कोणत्याही वडील अाणि दारशूर व्यक्तीबद्दल असावा तेवढाच."
................................................................................................
" ... मी त्यांना काय विचारणार ? हा असा प्रसंग, माझ्याच काय पण उभ्या जगात कुणाच्या तरी अायुष्यात अाला असेल का ? अठरा वर्षांत प्रथम एक गृहस्थ, वडील ह्या नात्याने भेटतो अाणि अाश्रमापलीकडे, अठरा वर्षांत ज्या मुलीनं जग पाहिलेलं नाही तिला म्हणतो- काहीही विचार.
"- काय विचारणार ?"
................................................................................................
"‘अापण अापल्या घरी माझी काय अोळख करून देणार अाहात ?’
"‘तू येण्यापूर्वीच तुझी अोळख घरी झालेली अाहे. दोन महिन्यांपूर्वी माझे वडील वारले. कदाचित तू पेपरमध्ये वाचलं असशील. ही गोष्ट वडिलांना सांगण्याचं मला परवापरवापर्यंत धाडस नव्हतं. ते वारल्यावर मी अाईला ही गोष्ट सांगितली. माझ्या दोन्ही मुलांना सांगितली. मुख्य म्हणजे, बायकोला सांगितली. तिनं तिचं अंत:करण अत्यंत विशाल केलं, म्हणूनच मी तुला अाता घरी चल म्हणू शकतोय. अाज सगळं घर तुझ्या स्वागतासाठी, हात पसरून तुला कुशीत घेण्यासाठी अासुसलं अाहे. वीणा, बेटा, मन मोठं कर. तुझ्या बापाचा अपराध पोटात घाल. माझ्या पत्नीनं मला उदार मनानं क्षमा केली. तिच्याएवढी तू मोठी हो. मला तृप्त कर. ‘हो’ म्हण. मला पपा म्हण अाणि माझं घर धन्य कर.’
"‘मी येईन उद्या.’"
................................................................................................
"मी मोहरून पण गेलेली नाही. गोंधळलेली पण नाही. मन जड झालेलं नाही, हलकंही नाही.
"स्थितप्रज्ञावस्था म्हणतात ती अशीच असेल का ?
"ह्या घरात, ह्या क्षणी अाणखी कुणी असं स्थितप्रज्ञ असेल का ?
"देशमुख असतील तसे ?
"राजरोसपणे ते मला अाज ह्या घरी घेऊन अाले. सुरेश-रमेश हे जुळे भाऊ बारा-तेरा वर्षांचे वाटतात. त्यांना व्यवहार नक्की कळत असणार. ते दोघं अापल्याकडे नक्की कोणत्या भावनेनं पाहत असतील ?
"ह्या घरानं माझं स्वागत तर केलं. मी कोण हे ह्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला माहीत अाहे. प्राप्त परिस्थितीत माझा कोणताच अपराध नाही हेसुद्धा प्रत्येकजण जाणून अाहे. तरीदेखील ह्या निरनिराळ्या व्यक्तींना काय वाटत असेल ?
"सुरेश-रमेश, देशमुखांबद्दल काय विचार करत असतील ?"
................................................................................................
"मला देशमुखांचा तो सगळा अाटापिटा स्वार्थी वाटतो. स्वत:च्या दु:खाला त्यांनी पाण्यातल्या माशाची उपमा दिली. ते दु:खी असतीलसुद्धा, पण माझं काय ?"
"देशमुखांना नाव मिळालं. वैभव मिळालं अाणि त्यांचा एवढा महान अपराध पोटात घालणारी पत्नी मिळाली. अाज ते राजरोसपणे वावरत अाहेत. पण माझ्या अाईला त्या काळात, तिचा तो अपराध पोटात घालून तिचा स्वीकार करणारा, मोठ्या अंत:करणाचा पुरुष भेटला असेल का ?"
................................................................................................
"‘त्यांच्याबद्दल अादर वाटतो. मस्तक झुकतं...पण-’
"‘अंत:करण हलत नाही, असंच ना ? असं का व्हावं काही कळत नाही.’
"‘कळत नाही मलाही. माझ्यासाठी किती जीव टाकतात म्हणून सांगू ! पण तरीदेखील त्यांनी प्रथम माझ्यावर फार फार अन्याय केला हा विचारच डोक्यातून जात नाही. मला रात्रंदिवस डोळ्यांसमोर अाश्रम दिसतो. माझ्या शंभर-सव्वाशे हतभागी बहिणी डोळ्यांसमोर येतात. त्या सर्वांची मला गेली अठरा वर्षं अाठवतात. अजून इथं एकेका दिवसाच्या वयाची मुलं तुम्ही अाणता. कोवळी कोवळी, लाल-लाल, निराधार, निष्पाप जीव. त्यांची इच्छा नसताना ती ह्या जगात अालेली. अशाच कोणत्या तरी देशमुखांनी त्या अर्भकांचं पितृत्व नाकारलं, म्हणून ती कोवळी मुलं इथं अालेली. ज्या तऱ्हेनं अठरा वर्षांपूर्वी मी अाले, त्या तऱ्हेनं. हेच हेच, सारखे हेच विचार मनात येतात देशमुखांकडे पाह्यलं की ! असे विचार येऊ देणं हे फार फार वाईट अाहे हे कळतं मला; पण तरी ते विचार येतात. छळतात. देशमुखांच्या घरात मी अाता वाढतेय. ही झुळझुळीत पातळं अायुष्यात प्रथम नेसतेय. त्यांच्या मोटारीतून हिंडते. सगळं सगळं अाबादी-अाबाद अाहे. पण डोक्यात एकदा हे असे सुरुंग उडायला लागले, की काही सुचत नाही. काही वळत नाही. काय करू सांगा !’"
................................................................................................
"अठरा वर्षांतला हिशोब त्यांना जणू अठरा सेकंदांत चुकता करायचा होता. त्यांनी मला सगळा हिंदुस्थान दाखवला. दिल्ली, अाग्रा, फत्तेपूर शिक्री, अबू, काश्मिर, वृंदावन...सगळं सगळं पालथं घातलं.
"रेल्वेचा रे रे करीत होणारा प्रवास त्यांना मंजूर नव्हता. तेवढी सवड पण नव्हती. त्यांच्या कल्पनेतल्या भराऱ्यांशी थोडीफार बरोबरी फक्त विमानांची होत होती."
................................................................................................
"लेकीला न्याय देता देता सप्तपदी चाललेल्या सहधर्मचारिणीवरच ते मोठा अन्याय करून बसले."
................................................................................................
"‘ह्या माणसाकरता तू रडतेस. नानासाहेबांकरिता रडतेस हे पाहून बेटा, मला जरा बरं वाटतंय.’
"‘गुरुजी, मी...मी...मी कुणासाठी रडतेय हेच कळत नाही मला !’
"गुरुजी गंभीर अावाजात म्हणाले,
"‘असं असेल तर मी सांगतो. हातून अन्याय घडला ह्या जाणिवेचं दु:ख अाहे हे.’
"‘अन्याय ?-कुणावर ?’
"‘नानासाहेबांवर.’"
................................................................................................
"‘एेक बेटा, एका दमातच मला सगळं सांगू दे. नानासाहेबांची पत्नी हीच तुझी खरीखुरी अाई. ... "
................................................................................................
"‘बेटा तुझ्या ह्या हंबरड्यानं ह्या भिंती हादरतील, जमीन कापेल, अाकाशही कदाचित दुभंगेल, पण वीणा, बेटा, तुझ्या पपांना ही हाक नाही एेकायला जायची. ते फार दूरवर गेलेत.’"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
September 07, 2022 - September 07, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
Moden Pan Vaknar Nahi
मोडेन पण वाकणार नाही : वपु काळे / कथासंग्रह (Marathi)
MODEN PAN VAKNAR NAHI
by V.P. KALE
by V.P. KALE (Author)

September 06, 2022 - September 07, 2022
Purchased September 06, 2022.
Publisher:- MEHTA PUBLISHING HOUSE
(1 January 1970)
Language:- Marathi
Format: Kindle Edition
Kindle Edition
Marathi Edition
ASIN:- B01N5H1B9C
.............................................
................................................
MODEN PAN VAKNAR NAHI by V.P. KALE
मोडेन पण वाकणार नाही : वपु काळे / कथासंग्रह
© स्वाती चांदोरकर व सुहास काळे
मराठी पुस्तक प्रकाशनाचे हक्क मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशक: सुनील अनिल मेहता,
मेहता पब्लिशिंग हाऊस,
१९४१ सदाशिव पेठ,
माडीवाले कॉलनी, पुणे - ४११०३०.
मुद्रक: मुद्रा,
३८३ नारायण पेठ,
पुणे - ४११०३०.
मुखपृष्ठ : कमल शेडगे
................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4969380905
................................................................................................
................................................................................................
Moden Pan Vaknar Nahi
मोडेन पण वाकणार नाही : वपु काळे / कथासंग्रह (Marathi)
MODEN PAN VAKNAR NAHI
by V.P. KALE
by V.P. KALE (Author)
September 06, 2022 - September 06, 2022